बुधवार, २३ सप्टेंबर, २००९

भटकंती - पहीला स्टॉप - गुडगांव ! (गुरुगांव)

पुरातनकाळात पांडव व कौरव ह्यांना शिक्षण देणारे गुरु द्रोणाचार्य ह्यांना आपल्या उपजाविकेसाठी हे गाव दान दिले होते म्हणून ह्याचे नाव गुडगाव (गुरु गाव) ह्या गावात एक प्राचीन शितला माताचे मंदिर सोडले व गुरु द्रोणाचार्याचा एक पुतळा सोडला तर ह्या बद्दल काहीच पुरावा सापडत नाही, तसेच हा भाग नेहमीच युध्दाच्या सावली खालीच राहीला ते दिल्ली मुळे.. दिल्ली फक्त १८ किलोमिटर दुर. इतिहासाचे साक्ष देणारे असे काहीच बांधकाम आसपास दिसत नाही ते मोगलांच्या आक्रमणामुळे.. ह्यांचे समाज जिवन पण विस्कळीत काही जण शेती करत पण मुख्य म्हणजे घरातील एक्-दोन व्यक्ती सैन्यात अथवा कोतवालीत (त्या काळचे पोलिस) , गावात बहुसंख्य हिंदू व मुळ समाज यादव कुलीन मुळ भाषा हरयानवी त्यामुळे सर्वच जण यादव भेटतात येथे भरलेल्या बस मध्ये यादव साहेब अशी आरोळी दिली तर ९५ % लोकं तुमच्याकडे वळून पाहतील एवढी संख्या.


शितला माता मंदिर

१९८० च्या पुर्वी एक राजधानी शेजारचं एक काही खेडी मिळून असलेला भाग म्हणजे गुडगावं, येवढीच ओळख ह्या गावाची, गाव हो त्यावेळी हे गावच होते, पण १९८१ ला संजय गांधीने येथे मारुती निर्माण करणारी कंपनी मारुती उद्योग लिमिटेड चालू केली व ह्या खेडेगावाचं भाग्य चमकलं ! लोकांना रोजगार मिळू लागला व नवनवीन काम धंदे येथे चालू झाले, व पुढे काही वर्षातच होंडाची हिरो होंडाचा प्लान्ट पण येथे चालू झाला व गुडगाव प्रगती पथावर धावू लागला. १९८० ते ९४ पर्यंतचा कालखंडामध्ये लोकांना कामे उपलब्ध भरपुर झाली पण त्याच्या जिवनमानात काहीच फरक पडला नव्हता, खुप लोकांना एक वेळचे जेवण पण मिळणे दुरापास्त झालेले असायचे , पण त्याकाळात सरकार ने गुडगावंच्या जयपुर हायवे च्या नजदीक काही शे एकड जमीन कारखाने व उद्योग धंदे काढण्यासाठी आवंटीत केली "मानेसर" गावाजवळ, आय एम टी मानेसर. पण कामधंदा तेथे चालू होण्यासाठी १९९८ उजाडले, पण जेव्हा येथे कंपन्यांना जागा मिळाली तेव्हा मात्र गुडगाव ची प्रगती तुफान वेगाने झाली, पण त्या वेगा बरोबरच स्थानिक लोकांचे पण नशीब उघडले, ज्या जमीनींत काहीच उगवत नव्हते.. काही हजार मध्ये एकडं अशी विकली जाणारी जमीन .. अचानक लाखो-करोडोचा भाव मिळवून देऊ लागली, आज जो गुडगाव चा पॉश येरिया म्हणून ओळखला जातो तो डीएलएफ फेस पण... तेथे १९८० च्या पुर्वी जंगल होते व ज्यांच्या खानदान मध्ये कोणा आजोबा / पणजोबाला त्यावेळच्या सरकारने / राजाने दान दिलेली जमीन, कित्येकांना माहीत देखील नव्हते की त्यांची जमीन तेथे आहे पण जेव्हा डिएलएफ ने जमीन विकत घेण्याचा सपाटा लावला व त्याच्या मागोमाग बाकीच्या पण रिअल एस्टेच्या कंपन्यांनी पैसा अक्षरश: ओतला.. गुडगांव मध्ये पैश्याचा पाऊस सुरु झाला... लाख ते करोड पर्यंत आकडा पोहचायला... काहीच महीने लागले !



आताचे गुडगाव

२००० च्या आयटी बुम मधे जर बेंगलोर हैद्राबाद खालोखाल फायदा झाले असलेले शहर म्हणजे गुडगांव... पावसाळ्यात जसे कुत्राची छत्री उगवते तश्या भल्या मोठ्या इमारती व त्यामध्ये असंख्य कॉलसेंटर व आयटी कंपन्या. व ह्या कंपण्यासाठी लागणारा मनुष्यबळ... गुडगाव अफाट वाढले... आधी काहीच गल्ली-रस्ते असलेले - हायवेच्या दुस-या बाजूला ज्म्गल असलेले गुडगाव .. जसे फाटले होते... सैरावैरा.. वाढत वाढत.. नको तसे वाढले, लोकाच्या हाती प्रचंड पैसा, त्या पैशाच्या बळावर बांधकाम व इमारती वर इमारती.... टोलेजंग इमारती... गुडगाव बदलं !
ज्या रस्त्यावर कधी बैलगाडी चालत असे त्या रस्तावर आता बीएमडब्लु.. मर्क्..अश्या महाग गाड्या सरास धावू लागल्या.. !
मोठ मोठया कंपन्या, बँका, ट्रव्हल कंपन्या... ह्यांनी गुडगाव काबीज केले... पण एकच बाजूला हायवेच्या पलिकडील बाजू पॉश बाजू.... व अली कडे तेच जुने भकास गुडगाव.. आपला जुना डोलारा संभाळत सावरण्याचा व जे काय चालू आहे ते समजण्याचा प्रयत्न करत असलेले.. पण हळू हळू जुने गुडगाव पण ह्या नवीनतेला समरस झाला व तो देखील सहज पणे मॉल्स व कॉप्लेक्स मध्ये फिरु लागला..



शहरामध्ये मॉल्स एवढे झाले की ओल्ड महरोली-गुडगाव रोड कधी मॉल रोड मध्ये तबदील झाला प्रशासनाला देखील कळाले नाही, सीटी मॉल, सहारा मॉल, वाटीका, मेट्रोपॉलिटीन, एमबीयन मॉल.. डिएलफ, गोल्डसुक, सीटी मॉल-२, सेंटर मॉल, सीटी सेंटर एक ना दोन २००८ जानेवारीमध्ये मध्ये तयार व वापरत असलेले मॉल्स ४८ होते तर निर्माणाधीन १८५ ! ह्याच मॉल्स नी गुडगाव मध्ये मेट्रो लाईफ स्टाईल आणली... व गुडगाव दिल्ली एनसीआर मधील सर्वात श्रीमंत भाग झाला, मोठ मोठे ब्रन्डस येथे आम झाले, लोकाच्या बोलण्याचालण्यामध्ये ब्रन्ड झळकु लागले.


सिटी सेंटर

दिल्ली जवळचे, एयर पोर्ट १५ मिनिटाच्या रस्तावर, चांगले हॉस्पिटल्स, चांगली सुविधा असलेले शहर. ह्यामुळे ह्या शहराचा प्रचंड विकास मागील दहा वर्षात झाला, त्यातच दिल्ली ते मानेसर एक्सप्रेस हायवे चा प्रोजेक्ट सरकारने हाती घेतला व दोन वर्षात पुर्ण पण केला आता गाड्या सुसाट धावतात... सकाळाच्या वेळी तर एयरपोर्ट वर फक्त ८-९ मिनिटामध्ये व करोलबाग ३० मिनिटे. आता सरकारने नवीन प्रोजेक्ट हाती घेतला आहे पिन्क सीटी एक्सप्रेस हायवे.. गुडगाव-जयपुर २०० किलोमिटर... सध्या वेळ चार तास ते पाच पास.. पण हा प्रोजेक्ट चालू झाला तर दोन्-तीन तासात जयपुर. तीकडे दिल्ली हून मेट्रो निघालीच आहे गुडगाव कडे... ६०% काम पुर्ण झाले आहे व ह्या वर्षाच्या अखेरीस ती गुडगाव मध्ये पळू लागेल.. अजून काय हवं !


दिल्ली ते मानेसर एक्सप्रेस हायवे

म्हणतात ना सुंदरतेला / प्रगतीला अभिशाप असतोच त्या पध्दतीने येथे लोकल बस सेवा नाही, रिक्षा चालतात पण मिटर नाही.. वडाप पध्दत सर्वच जागी, मॉल्स आहेत पण घराजवळ असे वाण्याचे दुकान नाही.. की छोटी मोठी भाजी मंडी नाही.. मुले आहेत पण खेळायला ग्राउंड नाही.. कुठ जायचे तर स्वतःचे वाहन असणे सर्वात महत्वाचे हा गुडगावचा अलिखित नियम आहे, त्यामुळे भरमसाट गाड्या, बाइक्स रोडवर त्यामुळे कधी कधी छोटे मोठे तास्-दोन तास असे ट्रफिक जॅम लागतो, तसेच येथे श्रीमंत व गरिब ह्यात गॅप येवढा मोठा झाला की संघटीत गुन्हेगारी वाढू लागली व प्रगती बरोबरच गुन्हेविश्वात पण गुडगाव ने प्रचंड प्रगती केली, किडनॅपींग, खुन, चो-या-दरोडे तर आम बात.... ! अपघातंचे प्रमाण प्रचंड वाढले.. व प्रशासन जसे भारतात सर्व जागी आहे तसेच ढम्म ! काही फरक पडत नाही.. !



सिग्नेचर टॉवर
पण गुडगावं आपले सुखी ... मज्जेत राहणे... आजचा दिवस सुखात काढला उद्याचे उद्यावर हा शहराचा अलिखित नियम.

कधी आलात इकडे तर नक्की भेट द्या.. मनाला मोहीनी घालेल हे शहर.. ह्याचा चटक्-भडक पणा शक्यतो तुम्हाला आवडेल ही व चुकुन तुम्ही माझ्यासारखेच येथेच स्थाइक व्हाल :)



* चित्रे गुगलसेवा !

1 टिप्पणी:

Arun Joshi म्हणाले...

Nice one. I also stay here and hence could associate with it