माझी सफर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
माझी सफर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १० सप्टेंबर, २०१०

पुणे-भिमाशंकर-शिवनेरी-लेण्याद्री-नाशिक-त्रिंबकेश्वर-मेटघर किल्ला- अंजनेरीगड-पुणे - भाग १

शनिवारीच बाईकवरुन कामानिमित्य पनवेलवारी ( २४० किमी येणे जाणे) करुन रात्री २ वाजता पोहचलो होतो घरी.

रवीवारी सकाळ सकाळी आई म्हणाली की नाशिकला जातोस का उद्या ( २१० किमी) ? पोर्णिमा आहे व एक पुजा करायची राहीली आहे तुम्ही नागबळी व त्रीपिंडीदान. हे राम ! हेच शब्द बाहेर पडले तरी म्हणालो बघतो विचार करुन. महाजालावर थोडीफार शोधाशोध केली तर तो भाग तर प्रचंड देखणा व निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेला आहे असे समजले. आईची इच्छा देखील पुर्ण होईल व थोडेफार जे ताप चालू आहेत ते देखील ह्या पुजेमुळे कमी होतात का हे पाहू असा उद्दात्त हेतू मनात ठेऊन आपले मित्रवर्य श्री पाषाणभेद ह्यांना फोन लावला व थोडक्यात विचार सांगितला. लगेच महाराजांनी इकडे तिकडे फोन करुन एक पंडित शोधला जो त्रिंबकेश्वर ( नाशिक पासून ३० किमी) मध्ये दोन्ही पुजा करुन देतो असा.

आईला ही माहिती दिली व म्हणालो उद्या सकाळी निघतो पहाटे उठव मला. सर्व तयारी सकाळीच करेन ;) झाले गजर लावले गेले, जबरदस्तीने दिवसाढवळ्या रात्री १० वाजता झोपा असा आदेश झाला, मन मोडून झोपी गेलो... सकाळी आईने ५ वाजता मला उठवण्याचा एक निष्फळ प्रयत्न केला मग सहा वाजता मग सात वाजता शेवटी ७.३० वाजता मी उठलो. साहेबांचा फोन परत आला की निघालो की नाही असे विचारणारा.. मी लगेच धावपळ करुन तयारी सुरु केली अंघोळ इत्यादी छोटी मोठी कामे लगेच १० मिनिटात आवरुन ८ वाजता नाष्टा करुन सरळ ८.३० ला हायवेवर लागलो.

रम्य सकाळ होती, हिरवळच हिरवळ चोहीकडे, पक्षी-पक्षिणी गुलुगुलु बोलत आहेत असे दृष्य मला तरी कोठे नजरेस पडले नाही पण हा नाही म्हणायला दोनचार म्हशी व गायी सकाळचा नाष्टा करायला बाहेर पडलेल्या दिसल्या... चला तेवढेच निसर्ग सौंदर्य पहाण्याची सुरवात झाली..
हायवेवर गाडी सुसाट पळवायचा हा विचार करुन सगळे ब्रेक, केबली, चाके, इंजिन, हवा, पाणी, बॅटरी चेक करुन घेतले व सुरवात केली प्रवासाची.

तोच आठवले अरे नाशिकला जायचे कसे ? रस्ता ? अडला राजे मीमकरांचे पाय धरी ! पटापट दोनचार फोन केले व दोनचार वेगवेगळे रस्ते सांगितले गेले, हरी ओम म्हणत बाईक लावली सरळ मुंबई हायवेला. हिंजवडचा उड्डाणपुल मागे टाकून पहिल्याच वळणावर एकाला विचारले नाशिक फाटा ? त्यांने कसाबसा रस्ता सांगितला त्याचे आभार माणून गाडी त्या वळणावर घातली, मग वाकड, चिचवड, पिंपरी इत्यादी भागाला फेरी मारुन विमोच्या (विवेक मोडकांच्या) घराचा रस्त्याला गाडी आल्यावर मग डोक्यात आले आपण शक्यतो रस्त्ता चुकलो. परत एकाला विचारुन घेतले व मग नाशिक हायवेवर लागलो (टोटल ६० एक किमी अतिरिक्त फिरणे).

नाशिकचा बोर्ड दिसला २१० किमी. च्यामायला म्हणजे ह्या फाट्यापासून २१० किमी व घरापासून इथपर्यंतचा प्रवास कोण मोजणार ? सिस्टमला दोनचार शिव्या देऊन पुढे निघालो, चाकण मागे गेले व मंद पाऊस चालू झाला. मस्त पैकी थंड हवा थोंडाला लागत होती व सकाळ पासून रस्ता शोधताना झालेली चिडचिड आपोआप कमी कमी होत गेली. ८०-९० चा काटा कधी मागे पडला व १०० च्यावर स्पिडवर बाईक कधी धावू लागली काही कळले देखील नाही मार्ग दाखवणारे बोर्ड झर झर मागे पडत होते मंचर जवळ आल्याचा एक बोर्ड समोर दिसला भिमाशंकर ! हे नाव कुठेतरी वाचले होते आठवत नव्हते, परत एकदा पाषाणभेद यांना फोन लावला व विचारले अरे भिमाशंकर ला काय आहे ?

प्रश्नातच उत्तर होते, सरळ डावीकडे बाईक टर्न केली व भिमाशंकरच्या रस्त्याला लागलो. दैवी प्रवास ! ह्या एका शब्दात वर्णन होऊ शकते. वाटेतच्या दोन्ही बाजूने निसर्गांने अक्षरशः अदभुत खेळ मांडला होता ऊन-पाऊस व निसर्गरम्य असा व मंत्रमुग्ध होऊन पहात रहावे असा खेळ ! गडबडीने बाईक रस्ताच्या बाजूला लावली व फोन बाहेर काढून फोटो काढायची तयारी केली तेव्हाच समजले मोबाईल मेला आहे ते. रात्रभर चार्ज करायचाच राहून गेला होता. त्याक्षणी खुप असाह्य वाटले रे.. यार ! वाटले देऊ या भिरकावून दरीमध्ये नोकियाला ;) पण आता हाच एकमेव आधार असल्यामुळे व आमचा जिवापाड प्रिय सॅमसंग अतिदक्षता विभागात अ‍ॅडमीट असल्यामुळे नोकिया विषयी सध्या मला खुप ममत्व वाटले म्हणून पुन्हा खिश्यात ठेऊन दिला. मधी एक दोनहॉटेल मध्ये ट्राय केला पण लाईट नव्हती व संध्याकाळी ५ वाजता येणार होती :( , भिमाशंकर विषयी मी काही लिहावे एवढा चांगला लेखक नाही आहे पण पुन्हा एकदा मी नक्की भिमाशंकर ला जाईन लवकरच व चांगले शेकड्यानी फोटो काढेन व ते प्रकाशित करेन.

भटकणे हा उद्देश असल्यामुळे देवदर्शन इत्यादी फंदामध्ये पडलो नाही व मला लवकर नाशिक गाठायचे होते म्हणून भिमाशंकरची ही भेट थोडी लवकरच संपवली वर परतीच्या प्रवासास लागलो. दिड एकतासाच्या ड्राईव्ह नंतर एका हॉटेलात फोन चार्जिंगला लावला व मस्तपैकी वडापावावर दणका दिला फोन चार्ज होई पर्यंत मी इकडे तिकडे फिरावे म्हणून हॉटेलातून बाहेर पडलो तर समोर एक फाटा दिसत होता व तेथे बोर्ड लावला होता.. शिवनेरी २५ किमी... फक्त २५ किमी व शिवनेरी इकडे आहे ? आयला मी तर समजत होतो.. जाऊ दे. येथे पर्यत आलोच आहे तर जरा शिवनेरी जाऊन येऊ तसा ही हा भुईकोट किल्ला आहे असे शाळेतील पुस्तकात वाचले होतेच त्यामुळे चढाचढी करावी लागणार नाही व चालाचाली देखील असा विचार डोक्यात डोकाऊ लागला एक मन म्हणत होते जाऊ या एक म्हणत होते नको ! शेवटी माझा विजय झाला व दुष्ट दुसरे मन हरले.

नंतर च्या दहा मिनिटामध्ये मी शिवनेरीच्या रस्तावर वार्‍याशी शर्यत करत होतो.

अर्धा-पाऊण तासामध्येच शिवनेरीच्या पार्किंग लॉटमध्ये बाईक लावली ५ रु.चे टिकिट फाड्ले गेले व मस्त १० रु.चे लिंबू सरबत घेतले व गडाकडे जावयास निघालो पण गडाकडे बघिल्यावर लक्ष्यात आले की आपल्याला शाळेत शक्यतो चुकीचे शिकवले गेले आहे ;) शिवनेरी भुईकोट किल्ला नाही आहे चढावे लागनाराच व समोरचा गडाचा मॅप पाहून खात्रीच पटली की चालावे देखील प्रचंड लागणार आहे.... छत्रपती शिवाजी महाराज की ! असा एक घोष दिला तोच पाचपन्नास आवाज दुमदुमले जय !!!!!!!!!! आयला वर पायर्‍यावर खुप पब्लिक दिसत होते म्हणजे ह्या गडावर तरी मी नक्कीच एकटा भुतासारखा भटकणार नव्हतो तर... !

shivneri 1

पायथ्यावरुन शिवनेरीच्या आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर

shivneri २


shivneri ३

गडाचा मुख्य दरवाजा !

shivneri ४


shivneri ५

आई शिवाई चे मंदिर आत फोटो काढू देत नाहीत.


shivneri ६


अंबरखाना

shivneri ७


shivneri ८

गडावरील मनमोहक दृष्य !

shivneri ९


shivneri १०


shivneri ११


shivneri १२


shivneri १३

शिवाजी महाराजांचे जन्म स्थळ !

shivneri १४


shivneri १५




क्रमशः


( जेथे फोन चार्जिंगला लावला होता तेथून जेव्हा फोन काढला तेव्हा लक्ष्यात आले की फोनचा डिस्पले गंडला आहे :( पांढरा फटाक पडला होता. हे सर्व फोटो अंदाजाने घेतले आहेत त्यामुळे चांगले आले नाही आहेत समक्ष्व.)

रविवार, ११ एप्रिल, २०१०

प्रवास !

तु केव्हा शांतचित्त बसतोस व कधी तुझा संगणक तुझ्याबरोबर नसतो ? हा प्रश्न माझे अनेक मित्र नेहमी विचारतात कारण माझा स्वभाव त्यांना माहीत आहे, खुप चंचल व संगणक म्हणजे माझा दुसरा जीव पण मी संगणकापासून वेगळा झालो की मला निसर्ग हवा असतो मनसोक्त जगण्याचा आनंद उपभोगण्यासाठी. मग कधी दोन दिवसाची सुट्टी मिळो वा चार दिवसाची, मग सरळ हिमालयाची नाहीतर राजस्थानची वाट पकडणे हा आता छंद जडला आहे, हिमालयाच्या सानिध्यात गेलो की सर्व टेन्शन, सर्व काम सर्व दुनियादारी ह्यापासून मी मुक्त होतो व मनसोक्त फिरतो व परत आपल्या रुटीनच्या कामावर परत नव्या तेजाने, नव्या विश्वासाने. कुठे व असे जायचे असे प्रश्न मला कधीच पडत नाहीत, घरी जाऊन मोजकीच बँग भरणे व गाडीने जायचे असेल तर गाडी बाहेर काढणे नाही तर सरळ हायवे वर एखाद्या ट्रकला / गाडीला हात देऊन विचारायचे बाबा रे कुठे जाणार आहेस ? तो म्हणाला जयपुर तर जयपुरला जायचे, तो म्हणाला चंडीगड तर चंडीगड... एकदा दिल्ली (NCR) पार केली तर जेथे वाटेल तेथे गाडी थाबवायला लावायची व एखाद्या धाब्यावर जाऊन अंदाज घ्यायचा की कुठला ट्रक कुठे चालला आहे. थोड्या गप्पा व एक दोन सिगरेट शेयर केल्या की लगेच कळते की कुठली गाडी कुठे जाणार आहे व कोण कुठे सोडू शकतो, मग त्याच्याशी थोडा गप्पा मारल्या की आपल्या मनातील गोष्ट त्याला सांगायची पंजाबी असेल तर लगेच पाठीत रट्टा देऊन म्हणजे " ओ, पुतर.. चल मैं छोड देता हूं तुम्हे ". मग ज्या प्रवासाची सुरवात येवढी मजेदार होऊ शकते मग तो प्रवास कीती मजेदार होऊ शकतो ना ? ट्रक प्रवासात एक खबरदारी की फक्त ट्रक मधून दिवसा प्रवास करावा, कारण हे ट्रकवाले रात्री नेहमी दारु घेऊन ट्रक चालवतात व कुठला प्रवास तुमचा शेवटचा प्रवास होईल सांगता येणार नाही. टप्पा टप्पाने प्रवास केला की थोडे शरीर हार मानू लागते पण त्याची एक मजा वेगळीच, वेगवेगळ्या लोकांशी बोलत, चालत तर कधी मिळेल त्या वाहनाने प्रवास करणे म्हणजे काय हे केल्या शिवाय समजणार नाही.

कुठून तरी दुरवरुन एक पाण्याचा झरा हिमालयाच्या अंगाखांद्यावर खेळत खेळत, पहाडावरुन दरीतून वाहत, मोठ्या प्रवाहामध्ये बदलतो व तो प्रवाह कधी मोठ्या नदी मध्ये परिवर्तित होतो व एका दैवीय वलय आदीकालापासून कसे त्या नदीच्या नावाबरोबर जुडले जाते हा प्रवास नक्की पहावा असा. प्रत्येक भारतीय मनामध्ये गंगानदीसाठी एक वेगळी खास भावना आहे जी शब्दामध्ये व्यक्त करणे खरोखर अवघड. पण मला गंगा ही नदी धार्मिक कारणापेक्षा जास्त नदीने जोपासलेला निसर्गामुळे आवडते, तुम्हाला स्वर्गिय आनंद अनुभव करुन देणारा निसर्ग, तुम्ही निसर्गापेक्षा नक्कीच मोठे नाही ह्याची जाणीव करुन देणारा निसर्ग . पण दोन वेळा प्रयत्न करुन ही मला गंगोत्रीचे दर्शन घेता आले नाही, कधी तरी खराब वातावरण तर कधी दुसरीच अडचण, पण तरी ही जेवढे जमेल तेवढे मी गंगेचे खोरे पालथं घातले. माझ्या जिवनातील काही महिने हरिद्वारमध्ये होतो त्याची आठवण नेहमी येत राहते व अधून मधून मी हरिद्वार दर्शन करण्यासाठी जातो, जुन्या आठवणी ताज्या होतात व मातेचे दर्शन घेता येते हा त्यामागचा निस्वार्थ उद्देश. कुठे गेलो कसा गेलो, कुठले गाव मध्ये लागले हे मला आठवत नाही कारण माझा मेंदू जे गरजेचे आहे तेवढेच लक्ष्यात ठेवतो, हे मी अनुभवले आहे खुपदा, एखादी खुण, एखादे झाडं, एखादे मंदिर हे माझे लॅन्डमार्क, गावांची नावे व लोकांचे मोबाईल नंबर लक्ष्यात ठेव म्हणाले की माझा मेंदू एकदम नकार देतो.

धडपडत जेव्हा तुम्ही हरिद्वारमध्ये पोहचालं तेव्हा तुम्हाला पाय दुखणे व अंग दुखणे हे छोटे छोटे त्रास चालू होतात, काही न करता सरळ हर की पौडींकडे चालू लागणे व तेथे आपले कपडे सुरक्षित जागी ठेवल्यावर, सर घाट उतरत गंगेच्या पाण्याजवळ येणे व एकदा पाया पडून पोहाता येत असेल तर सुर मारणे, दोन मिनिटामध्ये सर्व शारिरिक मानसिक त्रास गायब ! हा अनुभव आहे, कधी अनुभव घेऊन बघा, जेव्हा तुमचे शरीर पाण्याला स्पर्श करते तेव्हा थंड पाण्याचा एक वेगळाच करंट तुमच्या शरीराला आंदोलित करतो पण नंतर त्या पाण्यातून बाहेर यावेच वाटत नाही, मनसोक्त दंगा घालू झाल्यावर देखील तुम्ही स्वतःवर जबरदस्ती करुन पाण्यातून बाहेर येता.

हर की पौडीं चा घाट म्हणजे गंगा दर्शन नाही ह्यांचा अनुभव जर तुम्हाला घेणे असेल तर तर तुम्हाला थोडे पायी चालावे लागेल काही एक किलोमिटर, नदीच्या काठाने, सरळ वाटचाल चालू करावी नदीच्या उलट दिशेला, म्हणजेच उगमाकडे. येथे अजून कचरा पोहचला नसेल अश्या जागी, का व कश्यासाठी हा जर प्रश्न मनात येत असेल तर सरळ मागे वळावे व हरिद्वार मधील जनसागरामध्ये विरघळून जावे, हर की पौडीं वर जाऊन पाण्यात थोडावेळ खेळावं व संध्याकाळची भरगच्च गर्दी असलेली आरती उरकावी व आपल्या घरी निघण्याची तयारी करावी कारण पुढील मार्ग तुमच्यासाठी नाही आहे. किती जण जाणार आहात की एकटेच ते तुम्ही ठरवा, मी तर कधी कधी एकटाच गेलो आहे व मला एकटेच जायला आवडेल कारण एक निरव शांतता अनुभव करणे व निसर्गाचे मंजुळ गीत तुम्हाला आपल्या कानी पडावे असे वाटतं असेल तर तुम्ही निशब्द होणे आधी गरजेचे आहे, जो पर्यंत तुम्ही शांत नाही तो पर्यंत तुम्ही निसर्गाचा आनंद कसा घेणार ?

तयारी ? कसलीच नाही. आपले नेहमीचे स्पोर्ट्स शुज, थोडीशी हलकी रात्री थंडी वाजते त्यासाठी स्लिपींग बॅग, पाठीवर लटकवण्याची सॅक व त्यामध्ये थोडे चॉकलेट्स, थोडी बिस्कुट्स व हलकी फळे, एक-दोन लिटर ज्युस. व कमीत कमी वजन. सुरक्षा करण्यासाठी छोटा चाकू, नायलॉनची रस्सी, पाण्यासाठी बाटली, लायटर (एक-दोन, एक संपला तर ) , टॉर्च व त्याच्या बॅट-या. बस !



क्रमशः

शनिवार, २७ मार्च, २०१०

हरवलेली पानं.... भाग - १

प्रस्तावना :- मनोगत :- जे काही म्हणायचे आहे ते :-

मागील आठवड्यात निखिल देशपांडे ह्यांनी माझ्या एका जुन्या लेखाचा हरवलेला धागा मला समोर आणून दिला व आज मी तो लेख " एक सोडून.... " लेख लिहला. जेवढे लेखन मी आजपर्यंत मराठी महाजालावर केले असेल त्यात कुठे ना कुठे सत्याचा अंश होता. माझी सफर ही लेखमाला वाचून चतुरंग ह्या सदस्यांने मला प्रतिसाद दिला होता त्याचा पुर्ण भाग आठवत नाही पण एक वाक्य नक्कीच होते, जीवन हे सफरचंदासारखं नसतं ! कुठून ही सुरवात करा.. गोडवाच मिळेल... असे नक्कीच नसते.... अशीच काही पानं मागे राहीली होती.. माझी सफरची सुरवात अशीच कुठेतरी मागे राहीली होती.. कारण काही पानं अशीचं हरवली होती.. काही पाने मुद्दाम मी झाकून ठेवली होती तर काही काळाच्या आड नकळत गेली होती.. ती आज अशीच मनावर ठसठसीत होती म्हणून हे सर्व काही... भाग किती, क्रमशः किती.. मला नाही माहीत, माझे सफरचे २० भाग झाले होते ते देखील अगदी अजाणतेपणे.. हे तर मी जाणूनबूजून लिहीत आहे त्यामुळे नक्की माहीत नाही कधी व कुठे थांबेन ते.. पण सुरवात आज नक्की करायला हवी आहे, उद्या जाताना मनात शल्य नको... !

काही जणांना वाटतं हे सगळे असे का ? हा राजे उर्फ राज जैन जो आज आपल्या समोर उभा आहे तो असा नसावा, माझी सफर लिहली मी तेव्हा मी वेगळा होतो व आज आहे त्यापेक्षा नक्कीच वेगळा होतो, एक तप पुर्ण झाले आहे. एखाद्या गोष्टीकडे तटस्थपणे पाहण्याची नजर मला कर्मामुळे, नशीबामुळे वयाच्या हिशोबाप्रमाणे जरा लवकरच मिळाली. ज्यांनी माझी सफर वाचली नाही त्यांना शक्यतो काही संदर्भ लागणार नाहीत पण ठीक आहे कधी ना कधी वाचतील व त्यांना मी काय म्हणतो आहे हे कळेल. असे नाही आहे मी सर्व जागी एकदम बरोबर आहे कुठे कुठे नक्की मी चुकत असेन चुकलो असेन नाही असे नाही पण हे जीवन मला असेच कळले व जसे कळले त्या शब्दात मी येथे लिहीत आहे, आईने कधी मध्ये रागामध्ये, प्रेमामध्ये ह्या गोष्टी सांगितल्या व मी तश्याच जगत आलो त्यामुळे शक्यतो कुणाची मने दुखावतील कोणाच्या हदयास घाव होईल, पण जेव्हा मुक्त होणे ठरवले आहेच तर सर्व गोष्टींना सामोरे जाणे हे माझे कर्तव्य आहे. म्हणून जे सत्य आहे तेच लिहीत आहे.. परवा पाय तुटला म्हणून घरी पडून होतो.. कधी कळून नये त्या गोष्टी कळाल्या.. तिळतिळ तुटावे असा हाल झाला... त्याचा परिणाम समजा अथवा आत्म्याची हाक...

*************

कधीतरी डोळे उघडले असतील जेव्हा मी जन्मायला आलो तेव्हा, विश्व म्हणजे काय हे डोळे उघडून पाहण्याचा प्रयत्न केला असेल तेव्हा माझ्यासमोर माझी आई, मावशी व मावशीचा नवरा सोडून कोणीच नव्हते. कुठेतरी इंचलकरंजी सारख्या खेडेगाव वजा शहरामध्ये मी जन्मलो. ते ही मावशीच्या घरी. एका खोलीत संसार तेथे एक जीव नवा. सांगायला व वाचायला सोपं वाटतं पण जगणे म्हणजे नरक हे समजणे खरोखर अशक्य हे समजणे थोडे फार नक्कीच अवघड आहे.

माझी आई, कधीतरी बालविवाह कायदा जुमानत नव्हता तेव्हा लग्न झालेलं, घरात जास्त कोणी शिकले नसेलले तरी रुढारुढ परंपरेपासून दुर असे माझे अजोळ पण कसे काय त्या विवाहास तयार झाले देव जाणे, जेथे लग्न ठरवले होते तेथे मानपानावरुन कसल्याश्या गोष्टीवरुन वाद झाला व वादाचे रुपांतर लग्न मोडण्यापर्यंत झाले, आजोबानीं देखील रागाच्या भरात लग्न तोडले. कुठेतरी कोल्हापुरामध्ये एका कपड्याच्या दुकानामध्ये काम करणारा घरदार सोडून दुरवर राहणारा कोणीतरी सांगितला म्हणून त्याला जावई करुन घेतला, घर काय, घराची अवस्था काय, घरात आहे काय, मागे कोण, पुढे कोण, काय नाही आहे काय, काय आहे, मुलगी जगणार कशी, राहणार कुठे ह्याचा सारासार विचार न करता रागाच्या भरात लग्न लावून दिले. लग्नाच्या पहिल्याच दिवशी महाशय तर्र होऊन घरी परतले होते व तो दिवस व शेवटचा दिवस ना ती दारु सुटली ना आईच्या मागच्या दारुची पिंडा... लग्नानंतर काही दिवसामध्येच दारुपायी मंगळसुत्र विकले गेले..

लग्नानंतर घर म्हणजे विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर, असे दिवस काढले तीने, कधी ही खोली कधी ती खोली, कधी शिवाजी पेठ, कधी मंगळवार पेठ कधी बुधवार पेठ तर कधी शुक्रवार पेठ. पण समाधान नाही तीच्या जीवाला, एकाचे दोन जीव झाले तरी साहेब काय सुधरावयास तयार नाहीत, शेवटी कसे बसे मावशीच्या नवर्‍याने इचलकरंजीमध्ये नोकरी लावली व आमचे शब्दश: घर... नाही उरलेले जपलेले, चार तांबे, दोन ताटे, एक स्टो, दोन सतरंजी, व दोन-तीन चादरी अक्षरशः गोळा करुन आपला वाड्यात एक खोली टाकले व त्यांचा संसार उभा केला, तेव्हा आईला दिवस गेलेले व महाराज नेहमी नशेमध्ये चुर, पगार मधल्यामध्ये कुठे गायब होत असे ते देखील कोणास कळायचे नाही. दुसर्‍याच्या घरादारची भांडी व कपडे-धुणे करुन काबाड कष्ट करुन आईने पोटात मला वाढवले. कसेबसे मी दोन वर्षाचे झालो तोच ताई पण घरात आली ते पण जीव घेणे दुखणे घेऊन, कसेबसे देवाची कृपा होती म्हणून वाचली व दोन महिन्यानंतर घरी आली, माझ्या पाठची पण सगळेच ताई म्हणायचे तिला म्हणून मी पण.

आई गावभर लोणी व तुप गोळा करायची व आठवडी बाजारासाठी ते तुप व लोणी डोक्यावर ठेऊन चालत १६ किलोमीटर दुरवर असलेल्या सदलगा ह्या गावी विकायला घेऊन जायची. काखेत ताई व चालत मी ! किती चालणार मी पण.. शेवटी रडारड, मग एका बाजूला अक्का व एका बाजूला मी वर डोक्यावर कपड्यांचा गठ्ठा व त्यात कुठेतरी तुप व लोणी. कपडे विकणे व त्याच बरोबर लोणी व तुप विकणे हा जोड धंदा. आठवड्यातून एकदाच पण तीची बिचारीची फरफट व्हायची ह्यामध्ये, दोघे लहान कधी ताईचे रडणे कधी माझे, हट्टी लहानपणापासूनच मी त्यामुळे प्रचंड त्रास. चार पाऊले चालले नाही की मला उचलून घे हा घोष. व राहीले बाबा, त्यांचे भावविश्वच वेगळे, ते कुठे असायचे व कुठे नाही देवाला माहीत. कधी मन केले तर दारुच्या दुकानात कामाला तर कधी हातमागावर....

हळुहळु मी देखील मोठा झालो, बाबा व आई परत कोल्हापुरला आले राहण्यासाठी. शिवाजी पेठेत. काय झाले काय माहीत पण माझे आजोबा म्हणजे माझ्या आईचे वडिल कधी आमच्या घरी आलेच नाहीत. पोरीला चुकीच्या हातात दिले ह्याचे शल्य की काय देव जाणे पण ते कधी फिरकलेच नाहीत कोल्हापुरकडे.. मरे पर्यंत ! माझी शाळा जवळच, मंगळवार पेठेत. केजी बीजी काय नव्हतं त्यावेळी. सरळ पाच वर्षांनी पहिलीत प्रवेश. मला जास्त नाही आठवत पण कधी कधी आई सांगायची एकदा प्रवेश घेण्यासाठी बाबा शाळेत गेले होते ते परत कधीच गेलेले नाहीत शाळेत. बाबांना मदत व्हावी म्हणून आईने घरी शिवण मशीन आणले तेव्हा असेन मी ४-५ वर्षाचा ते मशीन सरळ पाठीचा मणका दुखावला तेव्हाच बंद झाले नाही तर आहोरात्र चालूच होते... !

काही गोष्टी मला हळूहळू कळत होत्या पण अक्का पाठची तिला काहीच कळत नसे व तिला काही हवे नको ते मला व माझ्या ताकतीबाहेरचे असेल तर आईला सांगणे... एवढंच तिला कळायचे. आज तिला आठवत ही नसेल, कीती वेळा तिला सफरचंद हवेत म्हणून मी अंबाबाईच्या मंदिरासमोरील मार्केट मधून फेरीवाल्यांच्याकडून चोरली असतील व किती वेळा मला हवे म्हणून चिक्कू चोरले असतील. शाळेत प्रवेश झाला त्या दिवशी शक्यतो माझे आई-वडील एकत्र शाळेत आले असतील त्यानंतर कधीच नाही बाहूबली हॉस्टेलपर्यंत..तर नक्कीच नाही.. कारण मी गायब होतो म्हणून आले होते मी नसताना.

एक खोली, त्यातच किचन त्यातच बेडरुम व त्यातच बाजूला दोन-तीन फुट उंच भिंत बांधून केलेली बाथरुम. संडास कुठेतरी खाली नाहीतर सार्वजनिक. हे असे आमचे घर. चुल ठेवायला परवानगी नाही म्हणून स्टोव्ह. अल्युमिलियमची भांडी व स्टिलची दोन-चार ताटं.. आज नवल वाटतं तीने तो संसार कसा निभावला असेल.. कशी ती जगली असेल.. ती त्यावेळी.

शाळेतील सहली व शाळेतील जगणे हेच भावविश्व तेव्हा देखील व नंतर देखील. आम्ही कोठे ही गेलो तर माझी ताई माझ्याबरोबर असे. शाळेत हुषार, पहिले ते सहावी पर्यंत कधीच एक नंबर सोडला नाही कधी तरी दोन नंबर पण पहिल्या दोनात मी नक्कीच असे. शाळेतील शिक्षकांचे, मॅडमचे तेवढेच प्रेम... पण माझ्या एवढा दंगेखोर व टवाळखोर दुसरा कोणीच नव्हता शाळेत. त्यामुळे रोज मार व रोज ओरडणे. घरी आले तर गल्ली भर मस्ती करुन झालेली असायची. कधी बाबांनी माझा अभ्यास घेतला असावा असे आठवत देखील नाही, ना मला ना ताईला. हा पण मार मात्र प्रचंड खल्ला असेल, ताईने कमीच, शक्यतो नाहीच, पण मी मात्र... हिशोब नाही !

आधी शिवाजी पेठ ते मंगळवार पेठ व नंतर काही दिवसानंतर बुधवार पेठ ते मंगळवार पेठ, आम्ही चालत शाळेत यायचो, मी ताईचा हात पकडायचो व शाळेत आल्यावर सोडायचे. आमची रुपा खुप हुषार, माझ्यापेक्षा ही खुप हुषार अनेक पट्टीने, तिला चांगले काय वाईट काय लगेच समजायचे, खुप गोड.. पण माझ्या मनात नेहमी गोंधळ चाले, मी दंगा केला असो वा नसो बाईनीं बोलवले असो वा नसो माझे बाबा कधी शाळेत आलेच नाहीत. मात्र घरी मात्र मार कधी चुकायचा नाही, काही करो वा न करो, त्यांचा राग कुठेतरी नक्कीच निघायचा... त्यांची माझी काय दुश्मनी होती देवास ठाऊक. पण कधी जवळ घेणे नाही ना कधी प्रेमाने डोक्यावर हात फिरवणे नाही, नाही म्हणायला कसे काय कोण जाणे मी लहान असेन तेव्हा किती ते पण आठवत नाही व ताईला देखील आज आठवणार नाही, कधीतरी असे अचानक आम्हाला सहपरिवार आई, मी व अक्काला गोव्याला घेऊन गोव्याला आले, शक्यतो बाबांच्या बरोबर ह्या जन्मातील ती पहिली व शेवटची ट्रिप असावी ती आमची, त्यामुळे असेल नक्की माहीत नाही, पण मला ती ट्रिप नक्की पुर्ण आठवते, ते बीच, ते चर्च व तो दोना-पावला बीच जेथे बाबांनी त्यांची गोष्ट सांगितली होती व नंतर मोठे झाल्यावर कळाले होते की एक दुजें के लिए हा चित्रपट त्याच गोष्टीवर बेतला होता. ह्या नंतर असंख्य वेळा गोव्याला गेलो असेन पण दोना-पावला बीचवर कधी चुकून पण पाऊल नाही ठेवले आज देखील.

दहावी बारावीला मी टॉप करेन असा आत्मविश्वास माझ्या शाळेतील सरांना, मॅडमना देखील होता, आत्मस्तुती नाही पण जवळ जवळ प्रत्येक प्रश्नाचे उत्तरासाठी माझा हात वर असे व परिक्षेत देखील मी नेहमीच वरचढ असे... जवळ जवळ पहिली ते पाचवी-सहावी पर्यंत तरी नक्कीच... सायन्स असो वा ईतिहास.. नाहीतर भुगोल नाहीतर गणीत.. व्याकरण व इंग्रजी ह्यामध्ये जरा तडफडायचो पण कच्चा नक्कीच नव्हतो. नुतन मराठी विद्यालय सुटले व कधी जाउन बाहुबली हॉस्टेल मध्ये पडलो ते कळालेच नाही, आईचे शिलाई मशीन कधी थांबलेच नाही, रोज बाहेर असलेली सवत, ती दारु कुठल्या अंगाने घरात शिरली ते देखील आईला कळालेच नाही. रोज बाहेर घेणारे बाबा आजकाल घरात बसूनच बाटलीवर बाटली गटकवू लागले.कष्टाचे दिवस कमी झाले असे मनात येऊपर्यंत अपार कष्ट समोर येऊन पडले. लोकांच्या परकर व पिकोफॉल करण्याच्या कामावर घर चालणार नाही हे आईला लवकरच उमजले व तीने खानावळ चालू केली, हॉस्टेलमध्ये माझी पळापळ, घरात आई सोडून कुणालाच मी नको आहे ही भावना ह्यामुळे प्रचंड तगमग व त्यावर उपाय म्हणून रोज सकाळी उठून हॉस्टेल मधून पळण्याचा प्लॉन, फसला की मार, परत दुसरा दिवस परत दुसर प्लॉन.. ! आई जवळ जाणे हा एकच ध्यास, त्यावेळी कोणास ठाऊक कोणाला समजला नाही किंवा उमजला नाही, आई शिवाय राहणे शक्यच नव्हते ना.. रोज तीचीच सवय सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपूपर्यंत.

पण ते माझे भाव विश्व कोणास समजलेच नाही मी रोजच्या रोज निगरगट्ट होत गेलो, एकदा तर हॉस्टेल मधून चांगले चार दिवस पळून गेलो ना घरी गेलो ना हॉस्टेलमध्ये परतलो... पाचव्या दिवशी आईचीच आठवण जीवावर आली म्हणून परत ग़ंगावेशेत येऊन उभा राहीलो, पण ते चार दिवस दाजीपुरच्या जंगलात एका १२-१३ वर्षाच्या पोराने कसे काढले असतील ते येथे लिहणे शक्यपण नाही व मला लिहणे देखील. त्यानंतर आमचे जीवन जसे ढवळून निघाले, हॉस्टेल मधून मी परत कोल्हापुरात आलो व बाबांनी पण नोकरी सोडून कपड्याचा स्टॉल महाद्वार रोडवर घातला होता, आईचे काम देखील चालूच होते, दिवसभर मशीनवर परकर शिवणे, पिकोफॉल करणे... व सकाळ संध्याकाळ पिसीआर हॉस्पिटलच्या शिकाऊ डॉक्टर ना डब्बा पोहचवणे.. कधी ते जेवायला याचे तर कधी आम्ही डब्बा पोहचवायचो. असेच एक दिवस प्रचंड पाऊस पडत होता, जेवण तयार होते पण कोणीच पोहचू शकत नाही अशी अवस्था. नऊ वाजत आले होते शेवटी आईने शेजारच्या मुलाची सायकल मागून घेतली व मला डब्बे पोहचवण्यास सांगितले. त्याआधी कधी डब्बे पोहचवले नव्हते असे नाही पण एवढ्या रात्री आईने मला एकट्याला बाहेर पाठवण्याची पहिलीच वेळ. हो ना करत मी डब्बा घेऊन निघालो व परतुं येताना टाऊनहॉलच्या पाठीमागे असलेल्या सोन्यामारुती चौकामध्ये पाऊसामुळे रस्त्यात अडव्या पडलेल्या झाडाच्या फांदीला धडकून माझा अपघात झाला व मी मोकळे डब्बे व सायकल घेऊन उत्ताणा पडलो. जिवनात पहिला झालेला अपघात. जास्त काही लागले नाही पण.. बाबांच्या शिव्या व मार.. दुसर्‍याच्या मुलाची सायकल तुटली ह्याचा राग प्रचंड, पण स्वतःचा मुलगा सहिसलामत आहे ह्याची त्यांना फिकर नक्कीच नव्हती त्यावेळी.. काय करणार अक्कामाई पोटात गेली होती व ती बोलत व मारत होती...

क्रमशः

मंगळवार, २ मार्च, २०१०

माझी सफर....आई... १८

तात्यांनी ओळख करुन दिली व त्या बिचारीचा आश्रुंचा बांध तुटावा अशी अवस्था झाली ! अर्धा एक तास ती रडल्या वर माझ्या जवळ आली व म्हणालदा..."दादा... बाबा गेले रे " असे म्हणून तीची शुध्दी हरपली.....

तो दिवस पुर्ण रडारडी मध्येच संपला, अक्काला कसे बसे सर्व काही समजावून मी परत मावशीच्या घरी आलो.. दोन दिवसामध्ये त्याना माझे ईतक्या वर्षाचे जिवनचक्र माहीत झाले व मला आई-वडीलांचे... माझ्या सारखा कमनशीबी कोणीच नसावे ह्या दुनियामध्ये... घराच्या वाईट अवस्थे मध्येच मी माझ्या घरासोबत नव्हतो.. ह्याचे दुखः जास्त होते..
पण कालचक्र सर्व दुखःवर उपाय ! अठवड्यानंतर फोन करुन विभा व ईतर मित्रमंडळीना बातमी सांगतली की मी घरी पोहचलो आहे.. पण आई प्रवासासाठी बाहेर आहे व दोन महीने लागतील तीला परत येण्यासाठी... व तोपर्यंत मी येथेच राहणार की परत दिल्लीला येणार ह्याचा निर्णय दोन एक दिवसामध्ये घेऊन फोन करेन.
तात्या व मी असेच शेतामध्ये फिरत होतो व बोलता बोलता तात्या म्हणाले.. " राजा, तुला माहीत नसेल पण दोन एक दिवसामध्ये मुर्हत काढून पंडीताकडून तुझी शुध्दी करुन घ्यावी अशी तुझ्या मावशीचा व माझी ईच्छा आहे"
मी " माझी शुध्दी ? का ? "
तात्या " कसे सांगू....तु ईतकी वर्ष बाहेर राहीलास.. ना तुझा अता ना पत्ता ! ..तुला जाऊन देखील त्यावेळी १० वर्ष झाली होती... तेव्हा आम्ही तुझे श्राध्द घातले होते... "
मी त्यांना बघतच राहीलो.... व एकदमच हसलो.. व म्हणालो "जेव्हा मी हरिद्वारमध्ये होतो.. तेव्हा माझ्या मनात नेहमी येत असे की मला काही बरे वाइट झालेच तर माझे क्रियाक्रम कोण करणार.. येथे माझे श्राध्द कोण घालणार.. तुम्ही सर्व माझे श्राध्द घालाल अशी पुसटशी देखील कल्पना नव्हती मला ... चला काही हरकत नाही.. मला नाही फरक पडत ह्या गोष्टीमुळे... पण तुम्ही माझा मृत्यूदाखला तर घेतला नाही ना ???"
तात्या " अरे नाही.. गरजच नाही पडली.. राशन कार्ड वर तुझे अजून नाव आहे"
मी " धन्यवाद...!" व आम्ही घरी परतलो... पण दोन महीने काम न करता येथे राहणे मला चालणार नव्हेते.. तेव्हा मी परत दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला व मावशीकडे माझा पत्ता व फोन नंबर लिहून दिला व दुस-या दिवशी मी सरळ पुण्यात आलो ... पुणा ते दिल्ली परत !

कामावर पुन्हा रुजू झालो व दोन दिवसातून एकदा मावशी कडे फोन करणे चालु झाले... पण ह्या सर्व लफड्यात मी व विभा जवळ जवळ... भेटेनासे झालो व कळत नकळत संपर्क देखील कमी होऊ लागला होता... त्यातच एक दिवस संजनाचा फोन आला ती म्हणाली.. " राज अभी के अभी घर पें आ जाओ !!"
मी तीला समजवण्याचा पर्यंत केला की काम करतो आहे..व सुट्टी झाली की येतो.. ती ठीक आहे म्हणाली व मी काम संपवून संध्याकाळी तीच्या घरी गेलो...
संजना " देखो राज... एक काम का प्रपोजल है ... पढो !" तीने काही पेपर हाती दिले व मी ते वाचू लागलो... चीन मधून काही संगणक सामान आयात करण्याबद्दल ते प्रपोजल होते.. मी म्हणालो .." अच्छा, काम है... कमाई हो सकती है.. ! " संजना " राज, तुम्हा रे नेहरु प्लेस में अच्छे जाणकार है... तुम अगर चाहो तो.. हमारे साथ पाटर्नरशीप में काम कर सकते हो..." मी म्हणालो " नही.. यार.. मेरे पास ईतना सारा पैसा कहा से आयेगा !" संजना " पैसे पुछे तुझे हमने ??.... वर्कीग पाटर्नरशीप ३०% तुम्हारा.. बाकी हमारा..!" मी म्हणालो.." हम्म ! मुझे दिक्कत नही है.. पर दो एक दिन तु पहले सोचो.. अपने पतीसे बात करो फिर !"
असे म्हणून मी जाण्याची तयारी करु लागलो व बाईक ची चावी शोधू लागलो !.. चावी कोठे गेली यार ... " संजना, चाबी देखी है... " संजना " नहीं... रुक जा, चाय तयार है.. पीके जाना !" मी ठीक आहे म्हणून.. सरळ समोर असलेल्या पीसीवर जाऊन बसलो.. डिस्कटॉप वर काही फोल्डर होते तेथे विभा नावाचा देखील एक फोल्डर होता.. हे घर.. मला काही नवीन नाही.. सगळेच मला ओळखतात.. विभा तर आपली.. तीचा फोल्डर उघडला तर काय फरक .. असा विचार करुन मी फोल्डर उघडला..त्यात विना व अना ने घरीच खेचलेले काही विभाचे फोटो होते.. मी ते फोटो पाहण्यात ईतका गुंग होतो.. की संजनाने चहा समोर ठेवलेला देखील मला जाणवले नव्हते....
संजना " जिसे फोटो में देख रहे हो.. व इस रुम में कम से कम १५ मिनिट से बैठी है..." मी दचकलोच.. व फटाफट तो फोल्डर बंद करण्यासाठी धडपडलो.. जवळच ठेवलेले स्पीकर व ईतर वस्तू माझ्या धडपडीमुळे खाली पडल्या.. व मी जरा हलकाच हसत... म्हणालो " बच्चोंने फोटो अच्छे खिचे है !... अरे विभा तुम कब आयी ? " सोप्यावर बसलेल्या पाहून मी विचारले.
मी असे विचारताच रागाने पाय आपटत ती सरळ संजनाच्या मुलीच्या रुम कडे निघून गेली.. व मला संजनाने तीच्या पाठीमागे पाठवले...
मी "विभा.. बात सूनो.." पण ती आपल्या रागातच होती.. मी दोन तीनदा प्रयत्न केला व सरळ बाहेर येऊन संजना बरोबर.. कामाची बोलणी चालू केली... अर्धा एकतास आमची मिटींग झाली व कामाचे स्वरुप लक्षात आले.. व मी काम करने नक्की केले.. तो पर्यंत विभाचा राग उतरला होता.. ती बाहेर आली.. " तुम्हे यहा वापस आ के... हप्ता हो गया है.. ना तुमने फोन कीया ना मिलने आहे.. क्या समजते हो अपने आप को" - विभा.
हम्म मॅडम ह्या रागात आहे तर.. मी तीला समोर बसवले व माझ्या सर्व प्रवासाची तीला माहीती व्यवस्थीत दिली व म्हणालो.." यार.. थोडा परेशान था.. ईन दिनों में... उस में ऑफिस का सारा काम रुका पडा था..टाईम नही था.. संजना के घर भी में आज ही आया हूं.. पुछो ! " ती जरा शांत झाली व म्हणाली.. " अपनी मम्मी से मिलने कब जाओगे?... जब मिलोगे ना तब उन्हे यही लेके आना... अपने साथ रहेगी ऑन्टी !" मी हसलो व म्हणालो.." ठीक है..प्लान कुछ मेरा भी यही था' थोड्यावेळाने मी पुन्हा जाण्यासाठी उठलो तेव्हा मात्र विभाने चावी माझ्या हातात दिली व हसली ! मी म्हणालो.." अच्छा इस वजह से मुझे पहले चाबी नहीं मिली थी" व मी विभाला तीच्या घरी सोडून सरळ रुम वर आलो !!!

मी दिल्लीला परत येऊन एक महीना झाला होता... व संजनाच्या नवीन कामासाठी मला आपली पहली जॉब सोडावी लागणार होती.. व कंपनीने दिलेली रुम वजा घर देखील ! त्याची तयारी करुन मी कंपनी मध्ये वर्मासरांकडे मी जॉब सोडणार आहे ह्याचा उल्लेख केला.. त्यांनी प्रचंड समजावून पाहीले व नंतर परवानगी दिली व मी संजना सोबत पाटर्नर म्हणून काम चालू केले... पण सामान आणण्यासाठी चीन ला जाणे गरजेचे होते.. व टेकनीकल माहीती मला जास्त होती म्हणून माझे ही जाणे गरजेचे होते... पण संजना व तीचे पती म्हणत होते की ह्या महीन्यामध्येच जाऊ.. पण आई देखील यात्रेवरुन परत येणार होती ते ह्याच महीन्यात कसे करावे ह्या विचारामध्ये मी मावशी कडे फोन लावला ..." मावशी, आईची काही खबर कधी येणार आहे परत .. फोन आला होता का ? " मावशी " अरे .. ह्याच आठवड्यात येणार आहे.. परत... तीचा फोन आला होता.. तु पण ये !" मी हो म्हणालो व फोन ठेवला.. मी संजनाला कल्पना दिली व म्हणालो... जाण्याची तयारी चालू करा टीकीट बूक करा मी घरी जाऊन लगेच परत येतो..!

मी सरळ दिल्ली एयरपोर्टवर जाऊन शुक्रवारची पुण्याची टीकीट बूक केली व परत येण्यासाठी बुधवारची !! शनीवारी आई घरी येणार होती !!
बझार मध्ये जाऊन.. अक्कासाठी एक तोळ्याची सोन्याची चेन व आई साठी देखील एक चेन घेतली व रुमवर जाऊन जाण्याची तयारी केली व संध्याकाळी निवांत बसून विभाला फोन करुन सर्व कल्पना दिली.. !

मी पुण्यामार्गे... सरळ कोल्हापुर व घरी पोहचलो... शनीवारी दुपारी !.....मावशीच्या घरात तर एकदम गर्दी झालेली होती... सर्व प्रवासी मंडळी देखील काही वेळापुर्वीच पोहचली होती व आई देखील...!
मी बाहेर ऊभा होतो.. व तात्या आले व मला आत घेऊन गेलो.. आई शी कसे भेटावे ह्याचा मनात विचार करत होतो.. काय सांगायचे.. कसे सांगायचे... माफी मागावी तर कशी ... डोळे पाण्याने सारखे सारखे भरुन येत होते... व मी सरळ घराचा पाठीमागील अंगणात पोहचलो... तेथे आई व मावशी बोलत बसली होती व मावशीने माझ्याकडे पाहीले व आईला म्हणाली " अक्का... राजा आला बघ ! " आई पळत माझ्या जवळ आली व मला छातीशी धरुन ओसाबोस्की रडू लागली.. व पाच दहा मिनीटे अशीच गेली.. ! मावशीने तीला धीर देऊन खाली बसवले व मी म्हणालो.." यऊ.. मी आलो आहे ना ... " व मी देखील डोळे पुसू लागलो व तात्या माझ्याकडे आले व मला बाजूला बसवले व पिण्यासाठी पाणी देऊन म्हणाले " राजा.. लेका रडतोस काय... आता तु मोठा झालेला आहेस.. आता काही काळजी नाही आम्हाला देखील.... मला देखील तीन मुलीच होत्या.. सगळ्या पाहूण्यामध्ये तु एकुलता एक मुलगा.. आम्ही मेलास असे समजून होतो पण देवाच्या कृपेने तु परत आला ... !! गप्प बस आता रडू नकोस.."
तासादोनतासाने सर्व वातावरण निवळले.. तात्या जाऊन अक्काला देखील घेऊन आला... तात्याच्या मुली.. माझा मावस बहीणी देखील आपल्या सासर हून परत आल्या होत्या....मला भेटायला !!!!.... राजा दादाला भेटायला... वर्षानू वर्ष राखी बाधण्यासाठी हक्काचा त्यांना दादा परत आला होता ना !
पुर्ण शनीवार.. रवीवार गप्पा मारण्यात व माझी सफर ह्याच मध्ये संपले ! मी हलकेच तात्यांना सूचना दिली की मला मंगळवारी संध्याकाळी जावयास हवे कारण ह्यामहीन्याच्या शेवटी मी चीनला जाणार आहे... ! तात्या ठिक आहे म्हणाले !
मला बेसनलाडू लहानपणी खुप आवडत असत व आईला तर विश्वासच बसला नाही की मी घर सोडल्यापासून बेसनलाडू साधा चाखूनपण बघीतला नाही ईतक्यावर्षात... खास माझ्यासाठी संध्याकाळी बेसनलाडू तयार करण्यात आले व माझी आवड्ती वाम्ग्याची भाजी !!!
ईतक्यावर्षाने घरचे आईच्या हातचे जेवण खाऊन मी तृप्त झालो होतो...! सोमवारी सकाळ्सकाळी मला जवळच्या देवस्थानावर घेउन गेले व आईने आपले सर्व नवस फेडले !!!
तीचा राजा परत आला होता.... ज्याला सर्व नातेवाईक नावे ठेवत होते की कोणी त्याला हॉटेलात सफाईकामाला देखील ठेवणार नाही.. असे छाती ठोक सांगणारे होते... त्याच्या.. विरुध्द जाऊन तीचा मुलगा यश घेऊन आला होता.. मोठया कंपनी मध्ये चांगले हजारो मध्ये पगार मिळवत होता.. तीचा नवस पुर्ण झाला !! तीने माझ्याकडे एक मागणे मागीतले म्हणाली जाण्याआधी तू गाव जेवण घाल ! बस. मी म्हणालो खरोखर मोठी गडबड झाली माझी बुधवारची टीकीटे बुक आहेत व जाणे गरजेचे .. पण तु म्हणतेस तर घालू गावजेवण !!

क्रमशः

मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१०

माझी सफर..... भेट -भाग -१७

मी जेथे होतो तेथेच पोहचलो होतो.... नोकरी करत होतो त्यामुळे परत जाणे गरजेचे होते काय करावे काय नाही ह्या विवंचनेतून मी परत दिल्लीला जाणे व काही काळाने परत येणे हा निर्णय घेतला.

काहीच कळत नव्हते काय करावे ? कोल्हापुरातून परत जाणे हे गरजेचे होते कारण नोकरी ! पैसा हवा होता येथे परत येण्यासाठी.
मनाला कसेबसे समजावले व परत दिल्लीला जाणे नक्की केले.
असाच फिरत फिरत मी महाद्वार रोडवरुन पापाच्या टिकटी कडे चालतच निघालो होतो, समोरुन एक चेहरा ओळखीचा वाटत होता, पण कोठे पाहीले होते अथवा ह्यांचे नाव काय असावे हा गोंधळ चालू होता व ती व्यक्ती माझ्यासमोरुन निघून गेली.. तोच त्यांचे नाव आठवले, पाटिल काकू... आमचे पुर्वीचे शेजारी ! मी लगेच मागे वळलो व त्यांच्या जवळ गेलो.
मी - " नमस्कार, तुम्ही पाटील काकू ना ? ज्या बुधवार पेठे मध्ये राहत होता...रॉकेल डेपो जवळ ? "
त्या - " हो. पण मी तुम्हाला ओळखले नाही "
मी - "काकू मी राजा.. जैन... सुशिला जैन ह्यांचा मुलगा, आम्ही तुमच्या शेजारी राहत होतो आठवले ?"
त्या - " राजा तू ! कीती बदलला आहेस रे, व मोठा ही झाला आहे ! कोठे असतोस रे.... आई कशी आहे... बाबा अजून ही दारु पीतात ?"
माझ्या डोळ्यातून एकदमच पाणी आले व मला डोळ्यासमोर अंधाकार झाल्या प्रमाणे वाटले मला वाटले होते ह्या भल्या मोठ्या कोल्हापुरात मी खुपच वर्षाने परत आलो आहे कोणाला ओळखेन न ओळखेन पण नशीबाने ह्या भेटल्या ... पण नशीब फुटकेच होते ह्यापण त्याच विवंचनेत होत्या ज्या विवंचनेत मी होतो... मी त्यांना जवळच कामत मध्ये घेऊन गेलो व सविस्तर सगळे सांगितले.. काकूच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले व म्हणाली " लेका... हे काय झाले रे.. एका भरलेल्या घराची अशी कशी वाताहात लागली.. काळजी करु नकोस देव बघतो आहे... आज ना उद्या तुला तुझे आई वडील भेटतीलच."

मी त्यांचा निरोप घेऊन परत हॉटेलवर आलो व सर्वात प्रथम जाण्याचे टीकीट रद्द केले व निर्णय घेतला की परत नसलापूरला जाणे व तेथून काही मार्ग दिसतो का ते पाहणे !

सकाळ सकाळी मी नसलापुरला पोहचलो व गावाच्या पारावर बसलेल्या वृध्द लोकांच्या समुहाकडे गेलो व आपली ओळख सांगितली, त्यातील काही नी मला लहान पणी पाहीलेले होते तर काहीं ना माझे नाव तुरळक आठवत होते... मी त्यांच्या कडे खुप आस लावून आलो होतो... व देवा ने माझी प्रार्थना स्वीकार केली एकाने मला माझ्या मोठ्या मावशीच्या घराचा पत्ता दिला.
मी थोडा आनंदलो व मार्ग दिसला म्हणून परत देवाचे आभार मानले... सरळ बस पकडुन कुडची येथे गेलो व तेथे जाऊन मावशीच्या घरचा पत्ता शोधला, घराच्या जवळ येता येता मला दरदरुन घाम फुटू लागला व ह्रदयाची गती वाढू लागली ... मी घरासमोर जाउन उभा राहीलो व दरवाजा वाजवला...

एक लहानशी ७ एक वर्षाची मुलगीने दरवाजा उघडला... व मला विचारु लागली " आपण कोण ?"
मी म्हणालो" मावशीला.... सारीका मावशीला बोलवशील का ?"
ती हो म्हणालो व आत निघून गेली , थोड्या एक वेळाने सारीका मावशी आतून बाहेर आल्या.. मी त्यांना १४ एक वर्षानंतर पाहत होतो.. शक्यतो मी ८ एक वर्षाचा होतो तेव्हा पाहीले होते ....
मावशी - " कोण पाहीजे ?" माझी सगी मावशी मला विचार होती व मी जरा हसलो व म्हणालो " मावशी मी राजा... तुमच्या लहान बहीणीचा मुलगा ... कोल्हापुरवाला"
त्या एकदमच दचकल्या व म्हणाल्या " राजा तू ? यल्ल दी नो मगना ( कुठे होतास रे लेकाच्या - कन्नडमध्ये) आत ये "
त्या पाणी घेऊन आल्या व घरातील सर्व मंडळी माझ्या भोवती बसलेली मोठी माणसे""मी आज भूत पाहीले "ह्या नजरे ने मला निहाळत होते.. दोन एक तास माझी कर्म कहाणी एकल्यावर तात्यांनी (मावशीचा नवरा) माझ्या पाठीवर थोपाटले व म्हणाले " राजा, एका चुकीचे प्रचंड मोठे परिणाम तु व तुझ्या घरातल्यांनी भोगले... देवाची करणी.. पण तु गेल्या नंतर आम्ही सर्वांनी प्रचंड शोधा शोध केली.. तु कोठे काही भेटला नाहीस ना काही खबर... पाच एक वर्षानी तुझे वडील देखील अती दारु मुळे मरण पावले .... तुझ्या बहीणीचे लग्न आम्ही करुन दिले आहे एका चांगल्या घरात ! तुझी आई व माझी आई व गावातील अजून काही जणी चारधाम यात्रेसाठी गेल्या आहेत... मागच्याच आठवड्यात त्यांना परत येण्यासाठी दिड एक महीना हवा.."
माझ्या डोळ्यातून निरंतर आश्रु वाहू लागले व मी तेथून उठलो व म्हणलो जरा मला वर बालकनी वर जाणे आहे रस्ता दाखवता का ?
माहीत नाही कीती वेळ मी तसाच बाल्कनी मध्ये उभा होतो व डोळ्यातून पाणी वाहत होते...
मी घराचा कुलदिपक .. एकच मुलगा ! पण वडील वारले व मी त्याना अग्नी देण्यासाठी पण उपलब्ध नव्हतो... ह्याचीच मला लाज वाटू लागली ! मीच का नाही मेलो ... हा विचार डोक्यात सारखा सारखा येऊ लागला ! तोच मावशीने मला हलवले व म्हणाली.. " जे झाले ते झाले विसर सगळे व चल खाली .. थोडे फार खाऊन घे ! "
मी म्हणालो " नको.. मी जरा कोल्हापुरला जाऊन येतो, तेथील एका लॉजवर माझे कपडे आहेत ते घेऊन येतो ! "
त्यांनी मला जाऊच दिले नाही व म्हणाले " अजून एक दिवस थांब.. सकाळी तुझ्या बहीणीच्या घरी जाऊ "

मी रात्र कशी काढली हे माहीत नाही.. सकाळ सकाळी आम्ही तयार होऊन तात्याच्या बरोबर अक्काच्या ... बहीणीच्या घरी निघालो..

दोन एक तासाच्या प्रवासानंतर आम्ही एका मळ्यातील घरासमोर थांबलो...
तात्यांनी आवाज दिला " कोणी आहे का घरात "
एक माझ्या वयाचा मुलगा बाहेर आला व तात्यांना पाहून नमस्कार केला व म्हणाला " अहो पाहूणे... आत या ! तुमचेच घर आहे असे विचारुन काय येताय" तात्यांनी मला परिचय करुन दिला व म्हणाले " राजा.. हे सागर. रुपाचा नवरा !" व सागरला सांगितले मी कोण आहे ते.
सागर " तुम्हीच का रुपाचे भाऊ.... अहो किती शोधायचे तुम्हाला... जेव्हा जेव्हा पुणा-मुंबईला गेलो... नजर तुम्हालाच शोधत असे... तुमचा एक लहान पणीचा फोटो आहे माझ्या कडे अजून ही..." असे म्हणून रुपाला आवाज दिला.

आतून एक एक स्त्री बाहेर आली व पाठोपाठ दोन लहान लहान मुले.

काय बोलावे काय.. विचारावे... काय उत्तर द्यावे.. काही शब्द भेटत नव्हते ना गळ्यातून आवाज येत होता!
तात्यांनी ओळख करुन दिली व त्या बिचारीचा आश्रुंचा बांध तुटावा अशी अवस्था झाली ! अर्धा एक तास ती रडल्या वर माझ्या जवळ आली व म्हणालदा..."दादा... बाबा गेले रे " असे म्हणून तीची शुध्दी हरपली.....

सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१०

माझी सफर........ कोल्हापुर.. भाग-१६

काही नवीन घरे व बदल पाहून आपलीच गल्ली कळेना हीच आहे की नाही ? पण घरमालकांचे नाव आठवत आहेत व त्यामुळे मी त्यांच्या समोर जाऊन उभा राहीलो व त्यांना विचारले. पण त्यांच्या कडुन काही जास्त माहीती मिळाली नाही व मी विचार मग्न होउन परत रंकाळ्यावर पोहचलो व वडीलांचे जुने मित्र आठवू लागलो व एकदोन आठवले व मी त्याच्या जवळ मंगळवार पेठेत पोहचलो.
जोशीकाका , मी त्यांना नमस्कार केला व आपली ओळख सांगितली , त्यांनी मला सांगितले की सहा एक वर्षापुर्वीच वडिलांनी कोल्हापुर सोडले व सांगली जवळ कुठल्या तरी गावी राहण्या करता गेले. का गेले ? कसे गेले ? काय कारण होते ते काही कळालेच नाही खरंतर त्यांना देखील माहीत नव्हते.

पुन्हा मी शुन्य जागी पोहचलो होतो, मानसिक त्रास होतच होता व त्यात पाण्याच्या बदलामुळे मी अजारी पडलो. जरा जास्तच तब्ब्येत खराब होत होतवामी पुन्हा परत दिल्लीला जाणे ह्या निर्णयावर येऊन पोहचलो, जेथे जेथे शक्य होते तेथे तेथे गेलो, वडीलांचा कडील कुठल्याही नातेवाईक / काका ह्यांना मी ओळखत नव्हतो ना त्यांचे घर माहित होते, आई कडील पाहून्याची फक्त नावेच आठवत होती पण ती लहान लहान गावे आठवत नव्हती.. काय करावे कसे करावे !

मी शिवाजी पेठ पासून बुधवार पेठ पायी फिरलो... काही खुणा दिसतात का... कुठला चेहरा ओळखिचा दिसतो का... हे पाहण्यातच दिवस दिवस निघून जात होते.... शेवटी शेवटी मी घरातल्यांच्या भेटीची आस सोडून देऊ लागलो... तोच एक बस समोरुन गेली.... चिक्कोडी ! अरे हे गाव तर माहीत आहे आपल्याला मामाच्या गावी जाताना रस्त्यात पडत होते ...

मी सरळ दोन एक तासाचा प्रवास करुन चिक्कोडीला पोहचलो... व बसस्थानकांवरील उभ्या सर्व गाड्यावरील पाट्या वाचणे हे नक्की करुन मी ईकडे तीकडे पाहू लागलो तर .. तेथे ही एक अडचण उभी राहीली.. सर्व नावे कन्नड मध्ये... लहानपणी कन्नड येत होते पण वाचणे येत नव्हते.. फक्त बोलणे ईतकेच. दोन एक सिगरेट तेथेच उभ्या उभ्या मारल्या व बसस्थानकाच्या बाहेर आलो.

कोणी... निपाणी... निपाणी असे ओरडत होता... कोणी कागवाड.. कागवाड असे... त्याच वेळी रायबाग हे नाव कानावर पडले व मी तडक त्या मिनीबस जवळ गेलो व विचारले रायबागला जाण्यासाठी किती वेळ लागेल ? त्या मिनीबस मधून प्रवास करत मी रायबाग बस स्थानकावर पोहचलो... लहान पणी खरेदी साठी मामा बरोबर आलो होतो असे आठवत होते पण कसे ? कोठून हे काही आठवेना !
रायबाग मध्ये हाती काहीच लागले नाही , मी परत चिक्कोडी साठी बस मध्ये बसलो .. बसचा प्रवास चालू होता.. तोच एका छोट्याश्या स्थानकावर बस थांबली... व एकाने आरोळी दिली...नसलापूर... मी एकदम उभा राहीलो व म्हणालो.. " थांबा.. मी उतरणार आहे "
हेच माझ्या मामाचे गाव ! नसलापूर !
अजोबाचे घर शोधत शोधत मी जैन मंदीराजवळ आलो व एकाला विचारले ..."काका..अप्पासो मगदुम ह्यांचे घर ? " त्याने जैन मंदीरासमोरील गल्ली समोर बोट केले व म्हणाला... सरळ आत जा... आंब्याच्या झाडाजवळील घर" पण आता तेथे कोणी राहत नाही... ते सर्व गाव सोडून मळ्यात राहण्यासाठी गेले आहेत...

मळा.... कोठे शोधावा हा मळा... त्या माणसालाच रस्ता विचारला व मळ्याच्या दिशेने वाटचाल चालू केली !
गावा बाहेर दोन एक किलोमीटर चालत मी आलो.. जवळपास चिटपाखरु देखील दिसेना की कोणाला तरी विचारावे मगदुमांचे घर कोठे आहे !
अर्धा एक तास चालल्यावर एका शेतात एक आजोबा काम करताना दिसले, मी त्यांना जाऊन विचारले " काका, मगदुमांचे घर कुठे आहे ?' त्यांनी विचारले " मगदुम.. कोण ? मास्तर का ?" मी हो म्हणालो. त्यानी सांगितले की मी उलट दिशेला आलो आहे... पुन्हा त्यांनी मला रस्ता दाखवला व मी त्यांना नमस्कार करुन पुन्हा... घर शोधण्यासाठी पायपिट करु लागलो.
संध्याकाळ होऊ लागली होती.. समोरच काही घरे दिसत होती तेथे गेलो व त्यांना विचारले की हे मगदुमांचे घर का ?
एक बाई बाहेर आली व म्हणाली " हो, तुम्ही कोण ?"
मी म्हणलो " अप्पासो मगदुमांचा मी सर्वात लहान नातू.."
त्या म्हणाल्या " अप्पासो मगदुम तर वारले काही वर्षापुर्वीच "
मी थबकलोच... काय बोलावे हे कळे ना.. परत विचारले " मामा.. त्यांचा मुलगा ? "
ती म्हणाली " ते तर बेळगाव मध्ये राहण्यासाठी गेले आहेत.. आम्ही हे घर व शेत विकत घेतले आहे चार वर्षापुर्वी"
मी " त्यांचा काही पत्ता आहे तुमच्याकडे ?"
ती म्हणाली " माझ्या कडे नाही आहे पण माझ्या मुलाकडे आहे पण तो सर्विससाठी बाहेर गावी राहतो.. आल्यावर घेते, दोन महीन्यानंतर तो घरी येईल"
मी " तुमच्या मुलाचा फोन नंबर आहे का तुमच्याकडे? "
ती म्हणाली " आहे देते" थोड्यावेळाने तीने मला एक नंबर आणून दिला व मी तीला माझा नंबर दिला व म्हणालो " मी फोन करेन त्यांना, पण शक्य नाही झाले तर त्याना माझा फोन नंबर जरुर द्या."

मी परत चिक्कोडी ते कोल्हापूर आलो, रात्र झाल्यामुळे मी फोन सकाळी करण्याचा निर्णय घेतला व झोपी गेलो.
सकाळ सकाळी मी त्यांना फोन लावला व विचारना केली पण त्याच्याकडून काही पत्ता मिळाला नाही.. ते म्हणाले की दोन एक वर्ष झाली आमचा संपर्क नाही आहे...

मी जेथे होतो तेथेच पोहचलो होतो.... नोकरी करत होतो त्यामुळे परत जाणे गरजेचे होते काय करावे काय नाही ह्या विवंचनेतून मी परत दिल्लीला जाणे व काही काळाने परत येणे हा निर्णय घेतला.

माझी सफर........परतीचा प्रवास .... भाग-१५

"राज, आज तुम मुझे सबकुछ बता देना जो तुम हो, तुम महाराष्ट्र के कोल्हापुर से हो यह छोड कर बाकी मुझे कुछ भी पता नही है तुम्हारे बारे में" विभा.
"ह्म्म ठीक है बता हूं" - विभाच्या घरी मी संजना व विभा तथा तीची आई बसलो होतो तेव्हा हा संवाद झाला व जे मी सांगितले तेच येथे मराठी मध्ये लिहीत आहे मी अचानक घर का सोडले ह्याचे उत्तर येथेच सापडेल.

गावाकडची शेती भाऊ बंदकी मध्ये गेली व मी जा घरात जन्म घेतला ते घर वडीलांच्या मित्रामुळे लिलाव झाले होते व ह्याच दुख:त वडील जे कमवू लागले ते दारु मध्ये घालवू लागले व त्यांचे माझ्यावरील प्रेम कसे व का हे माहीत नाही पण अटू लागले व मला लहानपणा पासूनच प्रचंड मार व शिव्या मिळू लागल्या, जसा जसा मोठा होत गेलो तसा तसा मी प्रचंड रागीट व उच्छःदी बनू लागलो घरी जो मार मिळायचा त्याचे समाधान मी सकाळी ८ला बाहेर जाणे व रात्री १० नंतर घरी येणे ह्या नियमामध्ये मिळाले, कारण सकाळी मी उठायच्या आधी बाबा बाहेर कामावर व मी रात्री घरी येण्याआधी झोपी गेले असायचे व आमच्या मधील संवाद संपला तो संपलाच. पण आमच्या दोघाच्या लढाई मध्ये बिचारी आई नेहमी आग का विस्तव अश्या प्रकारात राहू लागली बाबाची बाजू घेतली की मी नाराज व माझी घेतली तर बाबा नाराज. आमच्या तिघांना जोडणारा दुवा माझी लहान बहीण अक्का, ती मला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असे माझ्या हून ती लहान दोन वर्षाने. वयाच्या दहाव्या वर्षीच मी पहील्यांदा पळून गेलो पण दोनच दिवसांनी मला माझ्या मित्राच्या गावावरुन पकडून आणले व बाबांनी मला न मारता शिव्याच शिव्या देऊन मला पळुन जाण्याचे बक्षीस दिले ते एक वेळचे जेवण बंद.

माझ्यात व घरामध्ये दुरी वाढूच लागली व घरापासून दुर राहण्याचा प्रयत्न करु लागलो, पण शाळेत झालेल्या मुलीच्या लफड्यात बाबांना शाळेत यावे लागले व मला पुन्हा प्रचंड मार पड्ला व मी पुन्हा पळुन गेलो.
दोन एक महीने कोल्हापुरातच राहीलो शाळेत गेलो पण घरी गेलो नाही पंचगंगेच्या काठीच राहीलो. अश्यातच मला पुन्हा समजावून घरी आणले गेले व मला एके जागी कामावर लावले गेले पण माझे प्रताप पाहून मला कामावरुन कमी केले, त्यातच माझ्या व्यसनांची गोष्ट घरी कळाली व मला पहील्यांदा घरातून बाहेर काढले दोन एक वर्ष मी सांगली व कोल्हापुर येथेच फिरत राहीलो व वयाच्या १७ व्यावर्षी स्नेहा, संगणक संस्था हे प्रताप केले पण किरण ने संस्था बंद करुन माझे सर्व मार्ग बंद केले होते. मनाचा हिय्या करुन घरी गेलो तर बहीण पुढील शि़क्षण व्यवस्थीत व्हावे ह्यासाठी मामाच्या घरीच राहत होती व बाबानीं मला पाहील्यावर परत माझा उदो उदो केला व आई काहीच न बोलता गप्प उभी राहील व मी तडत रेल्वे स्टेशन गाठले व सरळ मुंबई ला पोहचलो... (ह्या पुढिल सर्व गोष्टी माझी सफर च्या १४ भागात आहे )

विभा म्हणाली " राज, तुने कभी ट्राय कीया है घर फोन करणे का ? घरवालों को खोज ने का ? उन्हें बाताया की तुम यहा हो ? " मी सर्वच प्रश्नांची उत्तरे नकारामध्ये दीली व मी सरळ विषय संपवायला सांगितला.

पण विभाच्या प्रश्नांनी मी विचारचक्रामध्ये अडकलो व खुप दिवस विचार केल्यावर मी सर्वात प्रथम स्नेहाच्या घरी फोन लावला, माझे नशीब चांगले होते ती बाळंतपणासाठी घरी आली होती व मी तीला सर्व काही सांगितले व मार्ग सांग असे म्हणालो. ती म्हणाली " राज, तु काळजी करु नकोस मी पाहते प्रयत्न करुन , करते थोडी शोधा शोध व मी तुला कळवत जाईन काय घडले ते ठीक आहे, उगाच काळजी करु नकोस कामात लक्ष दे व काम करत राहा." स्नेहाच्या ह्या आश्वासक बोलामुळे मला अधार मिळाल्या सारखे वाटले.

घरी जाण्य़ाची आई वडीलांना, अक्काला भेटण्याची माझ्या मनाला हुरहुर कधीचीच लागली होती पण मी माझे मन कोणासमोर असे मोकळे केलेच नव्हते कधी. स्नेहा ने खुप शोधा शोध करुन पाहीले पण तीला काही माझ्या घरच्यांच्या विषयी माहीती भेटलीच नाही. मी प्रचंड निराश झालो व कामावरुन लक्ष उडू लागले, प्रचंड तनावामध्ये मी दोन-तीन महीने काढले व पुन्हा स्वत: कोल्हापुरला जाऊन शोध घ्यावा ह्या विचारावर मी आलो.

मी कोल्हापुर जाण्यासाठी तयार झालो व कंपनी मधुन सुट्टी मंजुर करुन घेतली व मी कोल्हापुरला जाण्यासाठी मुंबईला आलो.... १२ वर्षाने पुन्हा महाराष्ट्रात, त्याच मुंबई मध्ये जेथून मी महाराष्ट्रातून बाहेर पडलो होतो त्या मुंबई मध्ये.

सकाळ सकाळी गाडी कोल्हापुरात पोहचली व मी सरळ सयाद्री मध्ये एक रुम बुक केली व अघोळ करुन सरळ पहील्यांदा महालक्ष्मी मंदीरामध्ये गेलो व मातेचे दर्शन करुन जेथे आम्ही रहात होतो त्या जुन्या पेठेत, गल्लीमध्ये पोहचलो....

बुधवार, १० फेब्रुवारी, २०१०

माझी सफर........प्रेम पर्व.... भाग-१४

दोन दिवस झाले होते विभा भेटून. संजनाने गडबड केलीच होती पण चूक माझी देखील होती माझी व्यक्तीगत डायरी माझ्या कडे नाही आहे हे मला लवकर लक्ष्यात आलेच नव्हते... ही माझी चूक.
तिस-या दिवशी देखील १० वाजले तरी विभा कार्यालयात आली नाही हे पाहून मात्र माझे मन अस्वस्थ झाले व काही विचारणा न करता मी तडक विभाच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला, मी लगेच बाहेर पडलो व अर्धा तासाच्या आतच विभाच्या घराच्या गेट समोर उभा राहीलो, पण आत कसे जावे व काय बोलावे ह्या विचारात मी खुप वेळ बाहेरच उभा राहीलो तोच विभाची आई बाझार खरेदी वरुन परत येत होती व मला पाहून म्हणाली " अरे बेटे राज, बाहर काहे खडे हो अंदर चलो" मी त्यांच्या मागोमाग घरात घूसलो व माझी तळमळत असलेली नजर शक्यतो तीच्या आईने ओळखली व मला म्हणाली " अरे राज, विभा तो घर में नही है, वह नैनीताल गयी है, अपने चाचा के घर ! दो दिन हो गये है" मी जरा रिलाक्स झालो व म्हणालो " अभी अचानक नैनीताल क्या कर ने चली गयी, बिना बता ये ?" तीची आई म्हणाली " अचानक नही गयी है, एक दिन तो तबीय्यत खराब थी उसकी डॊक्टर साहब बोले की सैर करना जरूरी है तब गयी है वह दोपहर को पिताजी के साथ... वह कंपनी फोन लगा रही थी पर मेंने ही मना किया था फोन करने के लिए .. कही कुछ काम ना बता दे उसे .. यह सोच कर ! पर तुम्हे तो फोन किया होगा ना उसने ?" मी म्हणालो " नही. आंन्टी जी, में चलता हूं अभी मुझे कई जाना भी है, विभा अपना फोन ले गयी है क्या साथ में ? " तीची आई म्हणाली " हां"

मी खुप विचार केला व मनाचा हिय्या करुन एसटीडी वरुन फोन लावला... रिंग होत होती ... खुप वेळानंतर तीने फोन उचलला " कोन " मी म्हणालो " अरे विभा में राज ! तुम्हारी तबीयत कैसी है " ती म्हणाली " अरे राज, अभी तो ठीक है, तबीयत तुम्ह बताओं तुम्हारा क्या हाल है " मी म्हणालो " अच्छा है, तुम्ह से कुछ बात करनी थी... अगर बुरा ना मानो तो ?" ती म्हणाली " देखो राज, इतने दुर से तुम ने फोन कीया है, तथा मेरी तबीयत के बारे मे पुछ रहे हो मुझे काफी अच्छा लगा, लेकीन बाकी बाते जब तुम यहा आयोगे मुझे मिलोगे तभी करेंगे.. पता नोट करो अभी," मी जरा चकरावलोच पण एका आजारी तथा जी मला आवडते त्या मुलीची इच्छा मोड ने मला जरा वेगळेच वाटले व मी नकळत तीचा पत्ता नोट करु घेतला.

"क्या, नैनीताल, अभी जाना है, तुम्हे क्या लगा.. नैनीताल यही है.. कीं तुम बस में बैठ गये तथा एक घंटे में पोहच जाओगे ! " - ईती वर्माजी.
"लेकीन सर मेरा जाना बहोत जरुरी है.." मी (जाने का महत्वाचे आहे हे मी स्वत:लाच पटवून देऊ शकलो नव्हतो तेथे वर्माजींना काय पटवणार)
"अबे लेकीन काम कोन करेगा तेरा यहा, " - वर्माजीं. पण एक तासाच्या मिटींग नंतर मात्र ते तयार झाले पण का व कसे हे देव जाने.

"अरे हीरो उठो, नैनीताल आ गया है, बस आगे नही जायेगी अब. पता नही सोना ही था तो बस में क्यूं सोते हो भाई.... कही रुम लो वहा सो जायो मस्त !!" - बस कंडेक्टर.
" अरे भाई, जरा सस्तासा हॊटेल बता देना मुझे कोन सा है ! "- मीच नेहमी प्रमाणे.
" हम्म, नीचे उतर पहले. जहा देखेगा वही हॊटेल मीलेगा तुझे " - - बस कंडेक्टर.

खुप घासाघासी करुन एक रुम फिक्स केली व जवळचे असलेले सर्व सामान तेथे ठेऊन मी लगेच यसटीडी जवळ गेलो व विभाला फोन लावला " विभा में राज, नैनीताल में पोहच गया हूं.... तुम्हारा दिया हुआ पत्ता तो है मेरे पास फिर भी जरा तुम गाईड करोगी मुझे ?"
" सच्ची ? " विभा. " तुम सही में नैनीताल पोहच गये हो ? "
मी - " नहीं, मे तो नैनीताल के यसटीडी बुथ से तुम्हे पागल बनाने के लिए फोन कर रहा हूं..! क्या बात कर रही हो विभा, में यहा नैनीताल में हूं.. आना कहा है बता दो !"
" राज मुझे विश्वास नही हो रहा है, तुम नैनीताल में आ गये हो।" - विभा. " देखो किसी को पुछ कर तुम ज्योलीकोट रोड की तरफ आ जाना, वहा से बस मेरे चाचा का हॊटेल xyz तुम्हे दिख जायेगा" - विभा.
मी ठीक आहे असे म्हणून ज्योलीकोट मार्ग शोधून त्यीच्या काकाच्या हॊटेल जवळ पोहचलो, तर तेथे तीचे वडील बागेत काहीतरी माळीला सांगताना दिसले मी त्याच्या जवळ गेलो व नम्स्कार केला " नमस्ते अंकल जी"
"हो, राज तुम यहा कैसे ?" -अंकल.
"नैनीताल घूमने आया था अंकल जी" - मी
"अब, इस महीने मे ?, अरे नैनीताल तो जरा गरमीओं मे आते... चलो अंदर जरा चाय पीते है" - अंकल.
इकडची तीकडची खुप बोलणी झाली पण बुढा मुळ गोष्टीवर काय येत नव्हता व मला विभाचा विषय काढता येत नव्हता मी काय करावे ह्या विचारात असतानाच एक नोकर त्याच्या कडे आला व म्हणाला " सर, विभाजी आप को बुला रही है" तो अंकल काही म्हणायच्या आतच मी म्हणालो " अरे वा, विभा भी आप के साथ है ?" मला जरा त्याचा चेहरा पडल्यासारखा वाटला पण काही क्षणाने तो हसून म्हणालो " हां, वह भी यही है,मीलोगे उसे ? चलो. "
मी आपल्याच हुशारीवर बेहद खुष झालो व मनातल्या मनात म्हणालो " देखा, राज का दिमाग." मी त्यांच्या बरोबर विभाच्या रुम वर पोहलो.
तीचा बाप तीच्याशी काय बोलला व काय नाही हे काही लिहीत बसत नाही, जास्तच फिल्मी वाटू लागेल मला व तुम्हाला देखील.
"विभा, तुझ्याशी काही बोलायचे आहे मला, मध्ये बोलू नकोस, फक्त मी काय सांगतो ते लक्ष दे" - मी.
"ठीक है बोलो" - विभा.
"देखो विभा जो कुछ संजनाने कहा, तुम्हे अच्छा लगा नही लगा मुझे पता नही, लेकीन तुम मुझे धक्के दे के यहा से निकालो उस से पहले एक ही बात मुझे तुम पसंद हो, मुझे तुमसे प्यार है"- व मी खिश्यात हात घातला व तीच्यासाठी घेतलेले एक गिफ्ट तीच्या समोर धरले.
ती दंगा करेल, शिव्याशाप देईल, मला म्हणेल तुझी आई बहीण आहेत की नाहीत घरात अथवा आपल्या वडीलांना बोलवेल..... असे काही मला वाटत होते.. पण तसे काही न घडता ती मला म्हणाली " डियर, हीच जर गोष्ट तु मला संजनाने सांगायच्या आधी सांगितली असतीस तर...."

मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०१०

माझी सफर........प्रेम पर्व.... भाग-१३

लहाना मुला बरोबर मुलासारखंच वागावे तर सम-वयस्क मित्रा बरोबर मित्राप्रमाणे, हा माझा सिध्दांत विभाला व संजनाला दोघींना देखील आवडला व त्या दोन छकुल्या मुलींबरोबर जसा मी रमत गेलो तसे तसे त्या घरासोबत माझे नाते एकदम मजबुत होऊन गेले, मी जेव्हा ही वेळ मीळत असे त्या घरी पळत असे, माझ्या कंपनी पासून त्यांचे घर जवळ जवळ ४० एक किलोमीटर होते पण मला ते अंतर त्यावेळी काहीच वाटायचे नाही व त्या घराला देखील मी शक्यतो आपलासा वाटत होतो त्यामुळे मला घरी येण्या-जाण्याची काही काल मर्यादा कधी पडलीच नाही, घरातील सर्व मेंबर मला आपलाच समजत व त्या दोघी छकुल्या तर रवीवारची वाट पाहत बसत की राज मामा घरी येणार व आम्हाला संगणक शिकवणार, फिरायला घेऊन जाणार हे त्यांचे प्लान मी येण्याच्या आधीच तयार असत. संजना कामात बीझी तर तीचे पती एअर्फोर्स मध्ये कामावर कधी दिल्ली तर कधी बाहेर शहरी. त्यांचे आई-वडील वयाने ७० पार त्यामुळे त्या मुलींना माझाच एक आधार राहीला हसण्या खेलण्यासाठी व मला त्यांचा.

"अरे राज, बच्चोंके च्क्कर में तो तुम मुझे भुल ही गये हो ना.. ? तुम्हे याद होना चाहिए की में भी तुम्हारी एक दोस्त हुं" विभा. हा विभाचा माझ्यावरचा शेरा नेहमीच लागू पडत असे कारण संजनाच्या घरी जान्याच्या आधी मी विभाच्या घ्री जाईन हा माझा निर्णय विभाच्या गेट पर्यंत जाऊ पर्यंत बदलत असे व मी विचार करत असे की यार असे मुलीच्या घरी सारखे सारखे गेल्यावर तीचे आईवडील काय म्हणतील असा विचार करुन मी माझा मोर्चा सरळ संजनाच्या घराकडेच जात असे , असे नेहमी होत राही व विभा मला रोज आपल्या घरी बोलवत राही.

एके दिवशी विभा माझ्या केबीन मध्ये आली व मला म्हणाली " राज आज कोई बहाना नहीं चाहीए, देखो आज मेरा बर्थडे है, शाम को छोटीसी पार्टी है घर पें तुम सीधे घर चले आना, संजना भी वही मिलेगी तथा बच्चे भी, ठीक है" माझा हो - ना काही विचारता सरळ बाहेर गेली व अर्धा-दिवसाची रजा टाकून घरी निघून गेली. मी देखील मागोमाग अर्धा-दिवसाच्या रजेचा अर्ज घेऊन वर्माजीच्या समोर उभा राहीलो, पहील्यांदा त्यानी काही न बोलता रजा मंजुर केली व मी बाहेर जाता जाता फक्त एवढेच म्हणाले " बिना गिफ्ट मत जाना" व हसले. मी चमकुन त्यांच्या कडे पाहीले त्यांच्या डोळ्यात मला असे दिसले की ते म्हणता हेत " जा बेटा जा, मुझे पता है तुम कहा जा रहे हो"

गिफ्ट खरेदी करणे - सर्वात मोठा प्रश्न की तीला काय आवडत असेल, मी विचार केला अरे यार तु तीला कधीच तीची आवड - नावड विचारलीच नाहीस गिफ्ट कसे घेणार.
तरी देखील मनाचा हिय्या करुन मी बाझार मध्ये एका शोरुममध्ये घुसलो, व प्रचंड भाव पाहून परत मागे फिरलो, जिवाची मोठीच घालमेल चालू होती व विचार केला, लेका कधी मुलीसाठी गिफ्ट खरेदी केले असते तर तुला नक्की माहीत असते की मुलींना काय आवडते ते, स्नेहाला पण कधी गिफ्ट दिले नाहीस ना कधी कोणाला. आता काय करावे, ह्या विचारामध्ये मी मग्न असताना वेळ भराभर निघून जात होता माझा कडे एक तास वाचला होता तीच्या घरी जाण्य़ासाठी, मी मुर्खासारखा ईकडे-तीकडे शोधक नजरेने फिरत होतो व मला काहीच तीच्यासाठी योग्य वाटत नव्हते, तेव्हा मात्र मी गिफ्ट न घेताच तीच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला व लगेच घरी जाण्यासाठी मार्केटच्या बाहेर आलो तर बाहेर एक फुलवाला फुले विकत बसला होता, माझ्या चेह-यावर एक बेरकी हसू उमटलं व मी लगेच एक फुलांचा गुच्छ डॊळे मीटून निवडला व सरळ पैसे देऊन तीच्या घराकडे निघालो.

जसे ती वाट पाहत उभी असावी ह्या पध्दतीने ती मला घराबाहेरच भेटली दरवाज्याजवळ. विभाला मी ती फुले दिली व म्हणालो " मुझे बस यही पसंद आया, जो तुम्हे में दे सकता था" ती ने हसून ती फुले आपल्या छातीशी लावली व म्हणाली " तु यहा मेरे घर पें आए हो यही बडी बात है, बाकी यह फुल मुझे बहोत पसंद है, थक्स." व मला आत घेऊन गेली व मी नियमाप्रमाणे तीच्या आईला व वडीलांना भेटलो व नमस्कार करुन तेथेच एका कोप-यामध्ये मी उभा राहीलो, तीचे जे मित्र आले होते त्यासर्वामध्ये मी एक बावळटासारखा दिसत होतो ना त्यांच्या सारखे कपडे माझे किमती ना माझ्या कडे त्या सोन्याच्या साखळ्य़ा गळ्या भोवती. पण जसा जसा वेळ जाऊ लागला तसे तसे समजू लागले की ही सर्व मंडळी फक्त एक फार्मालिटी पुर्ण करण्यासाठी येथे आलेली आहेत ना कोणाला वाढदिवसाचे अप्रुप ना कोणाला विभाचे. सर्वांना खाने पीणे व फक्त केक शी मतलब. मी जैन त्यामुळे केक ह्या प्रकारापासून दुरच उभा होतो, जेव्हा विभा माझ्या जवळ केक घेऊन आली तेव्हा मी तीला सांगितले "माफ करना में केक नही खां पाऊंगा, इस में अंडा है ना" ती हसली व म्हणाली " मुझे पता है तुम जैन हो, कोई बात नहीं यह दुसरा वाला केक लों इस में अंडा नही है" मी तो केक घेऊन तेथेच बाजूला उभा राहीलो.

ह्या ५.५ ईचाच्या पोरीमध्ये आहे काय ? का मी येथे उभा हा, गिफ्ट दिले , केक देखील खाल्ला तरी देखील मी येथे का उभा ?
आज ही सफेद ड्रेस मध्ये नेहमी पेक्षा सुंदर दिसत आहे ना ? नेहमी ही केसे बांधून फिरते पण हीला कोणीतरी सांगा हो, मोकळ्या केसामध्ये ही जरा जास्तच सुंदर दिसत आहे, नेहमी माझ्या समोर गालातल्या गालात ह्सणारी ही विभा आज एकदम दिलखुलास पणे हसत आहे मी आजच तीचे हे निरागस हसू पाहत आहे, कार्यालयीन वेळेत ही कीती व्यवहारीक वागते व आपल्या मित्रांसोबत. मैत्रीणी सोबत की मनमोकळे पणाने वागते... सुंदरता तन में नही मन में होनी चाहीए... असे म्हणतात, खरोखर तन भी सुंदर व मन भी सुंदर अशी ही विभा. माझा विषयी आपुलकी बाळगते अथवा दया माहीत नाही पण माझ्याशी खुपच प्रेमाने वागते.. असाचा बीनपायाचा मी विचार करत उभा होतो तोच मला विभाने आवाज दिला व मला विचारले " अरे कहां खो गए हो राज ? आज यहीं रुक जाना देर हो गयी है" मी म्हणालो " अरे नहीं, अभी तो दस ही बजे है, जादा टाईम नही हुंआ है, मे चला जाऊगां" तीने जरा जास्तच प्रयत्न केला पण मी जाने नक्की केले होते तेव्हा तीचा नाईलाज झाला व मला नाक्यापर्यंत सोडण्यासाठी ती माझ्या बरोबर चालत चालत येऊ लागली.

"राज, पता है, यह सब दोस्त बहोत कुछ गिफ्ट लाए, यह सब मुझे बचपण से जान ते है, सब को मेरी पसंद पता है, पर फिर भी कोई मेरी पसंद का गिफ्ट नही लाया" मी जरा नर्वस झालो व म्हणालो " यार, मुझे माफ करना, तुम्हे अचानक ही बताया था की तुम्हारा बर्थडे है, तथा मुझे पता नहीं था की तुम्हे क्या पसंद है, मेंने कधी तुमसे पुच्छा ही नही था" पण त्याच वेळी विभा म्हणाली " अरे नहीं, पुरी बात तो सुना करो पहले कभी, तुम जो फुल लाए थे ना वह मुझे बहोत पसंद आएं, सच्ची" मी म्हणालो" अरे मुझे पता है, तुम मेरा दिल रखने के लीए कह रही हो, पर कोई बात नहीं तुम्हारा एक गिफ्ट मेरे उपर उधार रहा..ठीक है"

मी तीला तेथेच सोडुन पुढे रिक्षा स्टाप वर उभा राहीलो काही काळ, तीने दोन एक मीनीटे वाट पाहीली व आपल्या घरी निघून गेली, मी तसाच चालत निघालो व मनामध्ये एक प्रकारचे युध्द चालू होते, यार ती कीती मार्डन मुलगी आहे, तु कुठे, स्नेहा मुळे झालेली पोकळी भरुन काढण्याचा तुझा प्रयत्न असेल तर विचार देखील करु नको, तु तीच्या शिवाय जगू शकत नाहीस हे तुला माहीत आहे, तर दुसरे मन अरे लेका, असे काय एकाच मुली मागे जगणे शक्य आहे का ? परत पहीले मन, अरे यार, ना तुझ्या कडे घर ना दार. काय म्हणून ती तुझ्यावर प्रेम करेल अथवा तुझे प्रेम स्विकारेल. असे काही ना काही विचार डोक्यात घेऊन मी कळत न कळत मारुती कंपनीच्या गेट पर्यंत आलो व मागून एका बाईक वाल्याने मानेसर जाण्याचा रस्ता विचारला मी त्याला म्हणालो " आप को दिक्कत ना हो तो में आप को मानेसर के रोड्तक ले जाता हूं, मुझे भी वही जाना है: तो ठीक आहे म्हणाला व मी त्याच्या बरोबर कंपनी गेट पर्यंत आलो.

रोज रोज ची बस व रिक्षाची कटकट मला अतीच होत होती मी वर्माजी तथा साहबांची बोलून दोन एक महीन्याचा पगार आगावू घेतला व नवीन सीबीझी होंडाची घेतली.
लहान छकुल्या मुलींना भेटावे ह्या उद्देशाने मी संजनाच्या घरी गेलो पण हाती माझ्या कंपनी मधील माझी पिशवी देखील होती, लहान मुलींनी खेळता खेळता माझ्या पिशवीतील सर्व सामान विस्कटले व त्यातील काही सीडी, फ्लापी काढून खेळू लागल्या, मी त्यांना मना केली तर छोटी रुसून एका खोलीत नीघून गेली, मोठीला मी जवळ घेतले व समजावून सांगितले की बेटा ही सर्व माझ्या कामाच्या वस्तू आहेत ह्या हरवल्या तर माझे काम थांबेल, ती समजली व जाऊन आपल्या लहान बहीणीला देखील समजावून आली पण एका अटीवर काहीतर खाण्यासाठी आना, आताच्या आता. मी काही चिप्सची पाकेटे व काही चाक्लेट आणून दिले तेव्हा तीने काही सामान परत दिले पण नजर चुकीने माझी महत्वाची डायरी तेथेच राहीली, व त्याचा मला खुप मोठा त्रास पुढे होणार होता.

दोन एक दिवसानंतर रवीवारी मी संजना व विभा जवळच्या एका मार्केट मध्ये फिरत होतो तोच एका मोबाईल दुकानातुन मला दोघींनी मिळून एक मोबाईल घेण्यास भाग पाडले व बोलता बोलता संजना माझ्या लग्नाचा विषय घेऊन माझ्याशी व विभाशी बोलू लागली व तीने अचानक विभाला विचारले " तुम करोगी शादी राज से ? यह शायद तुम से प्यार भी करता है" मी दचकलोच व संजनाला म्हणालो " अरे सिंस यह क्या बोल रही है आप, संजना गलत बात है यह, बुरा मत मान ना सिस्टर ने मजा की या है" मी परत संजनाला म्हणालो " यह आप को कीस ने बताया" संजना म्हणाली " तुम्हारी डायरी ने, जो तुम घर भुल गये हो, कल."

विभा काही न बोलताच सरळ निघून गेली, संजना व मी एकदम विचारत पडलो की अरे यार गफलत तर नाही ना झाली ?

सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१०

माझी सफर.... मैत्री !!! --- भाग -१२

सर्व काही व्यवस्थीत चालू होते, एक दोनदा कंपनीच्या कामासाठी मला गुजरात तथा मध्यप्रदेशला पाठवले गेले होते पण ह्यावेळी मला जवळच जयपुर येथे पाठवले गेले ते सरळ एक महीन्यासाठी. एक सुंदर शहर व एकदम मस्त समाज असे जयपुरचे मी वर्णन करेन, शहरापासून १५ एक कीमी वर आमची कंपनी होती व राहण्याची व जेवणाची सोय तेथेच. ह्या मुळे मी मात्र जाम खुष होतो जेवण बनवण्याची कटकट मीटली होती व संध्याकाळचा वेळ मला जसा हवा तसा वापरता येत होतो, तेव्हा मी जवळ जवळ मी महीनाभर रोज कोठे ना कोठे जयपुर फिरुन येत असे. जयपुर वारी मध्ये वेगळे असे काही घडले नव्हते तेव्हा जास्त काही लिहीत बसत नाही.

महिन्याच्या कालावधी नंतर मी परत गुरगांव कार्यालयात आलो व व सर्व रिपोर्ट व्यवस्थापनाला देऊन मी आपल्या कामावर रुजू झालो, तर येथे जरा नवीनच अडचण आली होती काही उंदरांच्या दंग्यामुळे कंपनीतील नेटवर्क विसकटले होते व काही प्रमाणात केबल्स ही खराब झाल्या होत्या रितसर पध्दतीने केबल तथा जरुरी सामान ह्याचा मी पीओ बनवून घेतला व लगेच दुस-या दिवशी सामान पोहचल्यावर नवीन केबल टाकणे चालू केलेच होते.. जुन्या पध्दतीच्या ह्या कंपनीमध्ये केबल टाकताना माझे केस , कपडे हे धुळीने माखलेच होते व चेह-यावर ही काही जागी काळे पाढंरे डाग पडले होते अश्या अवतारात मी एका केबीन मधुन दुस-या केबीन पर्यंत काम करत होतो, उन्हाळ्याचे दिवस त्यातून मी घामाघुम झालो होतो तेव्हा मी आपला शर्ट काढला व टी-शर्ट मध्येच काम चालू केले, माझा शर्ट व कंपनीचे आय-कार्ड दोन्ही बाजूलाच पडले होते व मी ते उचलून वर ठेवावे ह्या उद्देशाने माझ्या केबीन कडे ह्याच अवतारात निघालो, तोच एक मधुर आवाज कानावर पडला " अरे सुनो" मी चमकुन इकडे तिकडे पाहीले तर जी केबिन गेली सात-आठ महिने बंद होती ती उघडलेली होती व एक युवती हातामध्ये काही जुन्या फायली घेऊन काहीतरी शोधत होती, ती मला म्हणाली, " जरा बहाद्दुर को बोल ना मुझे चाय पीलायेगा" मी तीच्या चेह-याकडे पाहातच राहीलो व तीने पुन्हा मला तीच आर्डर परत मला दिली, मी हसलो व म्हणालो " अभी बोलता हूं" मी विचार करत च बाहेर रिशेपशन जवळ आलो व रिशेपशन वर जो शर्मा होता त्याला मी विचारना केली की ही नवीन बया कोण ? तर तो म्हणाला " दस-दिन हो गये है कंपनी में काम कर रही है.. पर क्या काम कर रही है यह तो साहब को ही पता होगा" मी त्याला तीची आर्डर सांगितली व आपले काम पुन्हा चालू केले.

दोन एक दिवसामध्ये माझे काम संपले व मी नेहमी प्रमाणे माझ्या केबीन मध्ये बसू लागलो, तोच शर्मा माझ्या कडे आला व साहबांनी बोलवले आहे असे सांगून निघून गेला, मी लगेच साहेबांच्या केबीन मध्ये गेलो " राज, देखो व जो विभा है ना उसे एक पीसी तथा प्रिंन्टर चाहीए देखना को कुछ होता है क्या , जादा दिन के लिए नही चाहीए १० दिन काही उसका काम है" मी ठीक आहे म्हणालो व एक पीसी विभाच्या केबीन मध्ये घेऊन गेलो व त्यांना माझी ओळख करुन दिली व म्हणालो " अगली बार चाय चाहीए होतो २३१ पें रिंग करना " मी असे म्हणताच ती एकदम जोरात हसली व माझी क्षमा मागीतली व आपली ओळख करुन दिली.

कंपनीमध्ये तीचे काम दुपार पर्यंत चालत असे व ती तीन नंतर आपल्या घरी जात असे पण जशी जशी आमची ओळख होत गेली तसे तसे तीचे घरी जाण्याचे टाईम बदलू लागले, पाच-सहा दिवसामध्ये आमची चांगलीच गट्टी जमली व आम्ही खुप जुने दोस्त असू ह्या पध्दतीने वागू लागलो होतो, माझी ही जवळीक वर्माजींनी ओळखली व मला आपल्या केबीन मध्ये बोलावले, एकदोन कामाच्या गोष्टी करुन ते मुख्य मुद्द्यावर आले व म्हणाले "राज, दो-तीन दिन से देख रहा हूं तुम बहोत खुश रहने लगे हो.. क्या बात है?" मी जरा वरमलोच व म्हणालो असे काही नाही आहे मी असाच आहे तर ते हसत म्हणाले " कोई बात नही सीए ट्रेनी है वह, चल उसे रख ना न रख ना मेरे हात में है... जा तू" मी हसत बाहेर आलो व मी विचार केला खरोखर माझ्यात काही बदल झाला आहे का ?

दोन एक दिवसांनी विभाने मला सांगितले की कंपनीमध्ये ती अजून दोन एक महीना ट्रेनिंग घेणार आहे व त्याची परवानगी तीने वर्मा सर कडून घेतली, मी अचानकच हसलो व मला वर्माजींचे बोल आठवले, तीने खुप प्रयत्न केला विचार ण्याचा की मी का हसलो पण मी वेळ मारुन नेली. ती देखील विचारात पडली की हा असा मध्येच का हसला असावा, पण तीने जास्त वेळ न घेता आपल्या कामावर परत गेली.

कामाच्यावेळेतून मला बाहेर जाण्याचा वेळ कधी मीळत नसे व कधी वेळ मीळालाच तर बाहेर जाऊन काय करावे ह्या विचाराने मी कंपनी मध्येच पडीक असे, पण एक रविवारी विचार केला चला आज बाजार मध्ये जाऊन कपडे घेऊ व जरा फिरुन येऊ या. प्लान तयार केला की लगेच अमंलबजावणी करने हा माझा स्वभाव त्यामुळे मी लगेच सेक्टर १४ पोहचलो व काही दुकानामध्ये फे-या मारल्या पण जिवनामध्ये दोनगोष्टी कधी जमल्याच नाही एक भाजी विकत घेणे व दुसरे कपडे विकत घेणे, मी माझा कपडे खरेदी करण्याचा निर्णय रद्द केलाच होता तोच मागुन कोणीतरी राज अशी आवाज दिली , व पक्के माहित होते की तो आवाज विभाचाच आहे, मी मागे वळुन पाहिले तर ही आपल्या मत्रिणी बरोबर येत होती, मी हसून तीचे व तीच्या मैत्रीणेचे स्वागत केले व विचारले " यहा कहा, घुम रही हो आप ? " तीने सांगितले की दर रवीवारी ती व तिची मैत्रीण येथेच फिरत असतात काही ना काही खरेदी करण्यासाठी. मी माझे कारण सांगितले तर ती म्हणाली चल ठीक आहे मी करुन देते खरेदी.

मनातील ईच्छा पुर्ण झाली मला संगे कोणीतरी हवेच होते तेव्हा ही विभा आली, मी,ती व तीची मैत्रिण माझे कपडे खरेदी करण्यासाठी एका शोरुम मध्ये घुसलो " तेथील एक दोन कपड्यांचे भाव पाहताच मी विभाच्या कानामध्ये कुजबुजलो व म्हणालो " विभा मेरा बजेट सिर्फ २००० तक ही है " ती हसली व म्हणाली " बहोत है २००० तो रुको पहले पसंद करो" तीन शर्ट दोन टिशर्ट व दोन एक जिन्स अशी खरेदी विभाने मला १६०० रु. मध्ये करुन दिली व मी तीचे आभार मानले व तीला म्हणालो " विभा तुम नही आते तो शायद में खाली हात ही रुम पे जाता, चलो तुम्हारी वजह से मेरा एक काम तो हो गया चलो तुम मेरे साथ एक एक कप चाय पीलो या कुछ खालो" ती हसली व म्हणाली " नही कभी ओर दिन आप की चाय का मजा लेंगे, मुझे देर हो रही है में चलती हू" असे म्हणून ती आपल्या मैत्रीणी बरोबर निघून गेली व मी काही क्षण तेथेच थांबलो व परत आपल्या रुम वर आलो, आल्या वर सर्व कपडे पाहीले तर जरा मी वैतागलोच अरे यार, कसला हा रंग, काय ही रंगसंगती, आणी ही विभाच्या नजरेतील अर्धवट रंग गेलेली सर्वात मस्त जिन्स. कोई बात नही १६०० गये पाणी में... व मी दिवस भर झालेल्या घडामोडीचा पुन्हा विचार केला तेव्हा आठवले की आपण आपल्या आवडीचे काही घेतलेच नाही ही सर्व निवड तर विभाची आहे, मी जरा दचकलोच व म्हणलो, राज बेटा जरा दुर रह ना.... अभी तो बहोत कुछ करना है"

जवळ दिवाळी आली होती सर्वजण आपापल्या घरी जाण्याची, कपडे खरेदी करण्याची अथवा सोने चांदी खरेदी करण्याचा प्लान तयार करत होते व मी मात्र विचार मग्न होऊन मागे गेलेल्या जिवनातील एक एक दिवाळाची आठवण काढून त्यावरच खुष होत होतो. मी जरा भुतकाळामध्येच मग्न राहू लागलो व कामामध्ये चुका करु लागलो, तेव्हा माझी गत ना घर का ना घाट का...... अशी झाली होती, एक दिवस असेच बसलो होतो केबीन मध्ये तर शर्माजींनी एक साप्ताहीक वाचन्यासाठी दिले तर त्या साप्ताहीकामध्ये भारतभर साज-या होणा-या दिवाळीची सचित्र माहीती दिली होती, एका पानावर महाराष्ट्रातील दिवाळीची माहीती व काही चित्रे दिली होती ते पाहताच कळत न कळत डोळ्यातुन काही आश्रु गालावर ओघाळत आले व ते मी फुसत असतानाच विभा माझ्या केबिनमध्ये आली व माझा मुड पाहून विचारु लागली " राज, क्या हुवा ? " मी " कुछ नही, तुम बता क्या काम था " पण तीने पिच्छा सोडला नाही व जवळ जवळ दहा मिनिटे ती माझ्या जवळ बसुन दिवाळीची माझी अडचण समजुन घेतली, व म्हणाली बस यही बात ? चल यह दिवाली हम मनायेंगे एकदम खुषी से " मी हसलो व म्हणालो " वह सब ठीक है, तुम बता काम क्या था " ती हसतच बाहेर निघून गेली व थोड्यावेळाने परत आली व म्हणाली "देखो परसो संन्डे है तब तुम पालम विहार आ जाना मेरे घर पे मुझे फोन करना वहा आ के वहां से में तुझे लेके अपने दिदी के घर चलूंगी वही पास में है, वह भी १० साल महाराष्ट्र में रही है मेरी अभी बात हुंई है उससे ठीक है ना" मी हो म्हणालो व विचार केला चल थोड्या ओळखी तर वाढतीलच अजून काय... मी होकार दिला.

रवीवारी जसा प्लान होता तसा मी विभा बरोबर तीच्या बहीणीच्या घरी आलो, एक छानसं तीन खोल्यांचे ते बसके घर, आतील रंगसंगती तथा सामान सगळे कसे एकदम व्यव्स्थीत. तोच तीची बहीण आली संजना. माझी ओळख करुन घेतली व मला सांगितले की तीने आपले काही शिक्षण नागपुरला घेतले होते व काही काळ ती पुण्यात देखील होती पण मराठी सध्या ती विसरली होती जे काही तेथे शिकलेली होती ते. त्यांच्या घरी दोन लहान मुली होत्या, त्या ही आमच्या गप्पा मध्ये सामिल झाल्या व कामाच्या विषयावरुन घरी असलेला संगणक ही मला दाखवला, त्यांनी तो नवीन घेतला होता. चहा व खान्यापीण्याचे सामान तयार करण्यासाठी त्या दोघी स्वयंपाक घरात गेल्या व मी ह्या लहान मुलीं बरोबर बोलत बसलो.
"आपका नाम क्या है बेटा " "मामा, मेरा नाम वीना है" मोठी मुलगी प्रथम बोलली व लगेच पाठून छोटी देखील " मेरा नाम अना है.. अनामिका" मी हसलो. थोड्यावेळातच त्या छोट्या मुली बरोबर तथा विना बरोबर गट्टी जमवली व त्यांच्याशी गप्पा मारु लागलो, मोठीचे वय नऊ वर्ष तर, छोटीचे वय सात वर्ष. दोघी Egilish मिडीयम शाळेमध्ये जात होत्या व बोलता बोलता माझ्या बोलण्यातील चुका काढत होत्या. चहा पाणी झाल्यावर विभाने सांगितले की ही संजना तीची मुंहबोली (मानलेली) बहीण. मी त्यांना म्हणालो खरोखर खुप दिवसानंतर मी एका घरगुती वातावरणामध्ये आलो व मला तुम्हाला भेटून आनंद झाला व तसेच तुमच्या मोठ्या मुलीने मला मामा बनवलेच आहे तर चला मला देखील भाऊबीज व राखी साठी येथेच एक बहीण भेटली व मी हसतच त्यांचा व त्या दोन छोट्या मुलींचा निरोप घेतला व विभा बरोबर तीला सोडण्यासाठी तीच्या घरापर्यंत गेलो.

माझी सफर... सत्व-परिक्षा.. भाग -११

कंपनीमध्ये मी चांगलाच रमलो होतो व जवळ जवळ कंपनीमधील सर्वजण मला नावानीशीच ओळखू लागली होती, संगणक कमीच होते व जे होते देखील जुने, मी थोडाफार प्रयत्न करुन व मालकाशी बोलणी करुन काही नवीन संगणक विकत घेण्याचा व जूने संगणक नवीन लोकांना देण्याचा निर्णय घेतला, व गुडगांव व दिल्ली मधील काही दुकानातून कोटेशन्स मागवली, चार पाच चांगले भाव पाहून मी ती कोटेशन्स मालकांच्या समोर ठेवली व म्हणालो निवडा जो भाव व काम ठीक देइल त्यांला काम देऊ असे ही सांगितले तेव्हा ते म्हणाले ते सर्व तु पाहा व मला फक्त रक्कम सांग कीती चा चेक तयार करायचा तो. मी हसलो व ठीक आहे असे म्हणून बाहेर आलो तोच दोन एक व्यक्ती माझी बाहेर वाट पाहत होते, मी त्यांच्या जवळ गेलो व त्यांची विचारपूस केली, तेव्हा कळाले की ज्या काही कोटेशन्स आल्या होत्या त्यातील एका कंपनीचे प्रतिनिधी म्हणून ते माझ्या कडे आले होते,
प्रतिनिधी -"नमस्कार सर."
मी - "नमस्कार बोला."
प्रतिनिधी -"सर, आमची कोट तुम्हाला भेटलीच असेल."
मी - "हो, भेटली ना. विचार चालू आहे अजून काही नक्की झालेले नाही आहे पाहू"
प्रतिनिधी -"सर, आम्ही चांगली सर्विस देऊ, तसेच तुमचा फोन आलेल्या काही मिनिटामध्येच आमचा अभियंता तुमच्या कंपनीमध्ये पोहचेल, दहा मिनिटाचाच रस्ता आहे"
मी - "ह्म्म्म, बरोबर आहे."
प्रतिनिधी -"सर बाकीच्या काही दुकानदारांचे कोट तुमच्या कडे आले असतील त्यातील सर्वात कमी कोट आमचीच आहे ह्याची खात्री आहे आम्हाला"
मी - फक्त हसलो.
प्रतिनिधी -"तरी ही मार्केटचे काम आहे जरा कमी जास्त झाले असेल तर आम्ही बदल करु शक्तो कोट मध्ये"
मी - "ह्म्म नाही कोट मालकांच्या समोर गेली आहे मी काही करु शकत नाही आता पण पाहू काय होते ते"
प्रतिनिधीचा साथी -"सर, मी अरविंद आहे व ही संस्था माझीच आहे गेली ५ वर्ष मी ह्या व्यवसायामध्ये आहे, व मला माहीत आहे कोट गेली आहे पण तुमच्या हाती सर्व काही आहे असे माझे गुप्त सुत्र... सांगत होता"
मी - "च्या मायला, कंपनी मध्ये गुप्त-सुत्र...माफ करा मी मराठीमध्ये बोललो, आमच्या कंपनीमध्ये तुमचा जुगाड मी समजलो नाही"
अरविंद -"सर, काय करावे हा कारोबार जरा असाच आहे सर्व माहीती ठेवावी लागते आम्हाला."
मी - " ह्म्म बरोबर, तर मग."
अरविंद-" सर, ईकडचे तिकडचे बोलत बसत नाही, १० टक्के व नक्की करा."
मी - "दहा टक्के ??? " च्यायला ही काय नवीन भानगड.
अरविंद-"सर, ठीक है ११% कर लो...ह्म्म्म नही सीधा आप १२ % कर लो ठिक है अब. तो कब फोन करु पीओ के लिये ?"
मी - अजून गोंधळलोच होतो काही कळत नव्हते हा काय बोलतो आहे ते, मी सरळ त्यांना म्हणालो थांबा आलोच. व जवळ जवळ पळतच माझे एक सहकारी व नवीन मित्र यादव ह्यांच्या कडे गेलो व सगळी बातचित त्यांना सांगितली, ते हसत म्हणाले " अबे, वह तुम्हे तुम्हारा हिस्सा बता रहा है... १२% मतलब जो भी बिल बनेगा उसका १२%. हा कर दे बेटा, तेरे तो मजे है अब."मी हसलो व परत मिटीग रुमवर आलो.
मी अरविंदला म्हणालो "ठीक है, कल बात कर ना एक बार"

संपुर्ण दिवस १२% वरच मी फिरत राहीलो, कमीत कमी मला २८००० हजार रुपये मिळणार होते, काय करावे , कसे करावे.. हाच विचार करत थांबलो, चार महिन्याचा सरळ सरळ पगार हाती येणार होता काय करावे..
दिवस संपला, एकच्या जागी दोन बियर संपल्या व वैतागुन झोपी गेलो तर रात्रभर झोप नाही आली, अर्धवट झोपलेल्या अवस्थेत मी विचार करता करता एक निर्णय घेतला व रात्री एकदम शांत झोपलो.

सकाळच्या कामातून मालक असे मोकळे झाले तसा मी त्यांच्या जवळ गेलो व त्यांना सर्व काही खरं खरं सांगितले, ते माझ्याकडे पाहतच राहीले व म्हणाले "अरे, भाई यह सब तु मुझे बता रहा है, यह तो मुझे सब पता है, सारी जगह काम इसी तरीके से चलता है, अपने यहा भी, लेकीन तु पहला आदमी है जो अपने मालिक को बता रहा है" असे म्हणत जोर जोरात हसू लागले, मला काहीच कळाले नाही व चुपचाप त्यांच्याकडे पाहत उभा राहीलो, त्यांनी इंटरकॊम वर कंपनीचे जीएम शी बोलणी केली व त्यांना आपल्या रुम वर बोलावले, ते आल्यावर म्हणाले " वर्मा जी, देखो मै नही कहता था मेरा बेटा उं ही कीसी को मेरे यहा काम के लिए नही भेजेगा व तो हीरा है तथा अपने साथ हीरे ही रखता है, देखो ईसे आप कहते थे की यह २८०००.०० मे बिक जायेगा, यह मेरे सामने खडा है आप के २८०००.०० की पेशकश बता रहा है" व पुन्हा हसू लागले व वर्माजी माझ्या कडे पाहत म्हणाले, " बेटे, १२ साल की नोकरी में मैंने पहली बार धोका खाया आदमी पहचानने में, माफ करना कल जो तुम्हारे साथ घटा व सब मेरी तथा इंन्ही की प्लानिंग थी." अरे बाप रे, मी तर चक्क परवानगी न घेताच एका खुर्चीवर मटकन बसलो व आपला चेहरा झाकून घेतला व माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. ते पाहू वर्माजी तथा मालिक दोघे गडबडले व म्हणाले" अरे राज बेटा, क्या बात है क्या हुंवा, कोई बात चुभी क्या तुम्हे ? अगर हां तो माफ कर ना भाई." मी म्हणालो " सर नहीं, यह बात नही हैं, आपने जो कीया तथा बताया यह एक मालिक कर के आप का फर्ज था, आपको अपने कंपनी मी सिर्फ अच्छे लोग ही चाहींए, पर मेरे आखोंमे आसू मेरे घरवालों की याद की वजह से आये, शायद मैंने ही उन्हे समजने मे देरी की लेकीन जो बात आपको मैंने बतायी उसके पिच्छे मेरी प्रेरणा मेरे संस्कार ही थे जो बचप्पन में मुझे अपने घर से मिले थे.. उसी के वजह से मेरे आखं हर आयी मुझे माफ कर ना सर. " "अरे राज, कोई बात नाही, लेकिन सच्ची बात बता ने का तुम्हे भी तो फायदा है ... वर्माची इस को पक्का कर लो तथा इसकी पगार आज से ३०००.०० रू. बढां दो "
वर्माजीं माझ्या कडे हसत म्हणाले "तो राज, आज पार्टी होगी तुम्हारे तरफ से हा.... हा हा..." मी देखील हसत हो म्हणालो पण मालिक म्हणाले " अरे छोडॊ, आज सबका दोपहर का लंच कंपनी खाते से, बाद में राज से पार्टी लेना वर्माजी" मी हसलो व म्हणालो "सर कोई बात नही लेकीन आप का ट्टीफन का क्या हो ?" व हसत बाहेर आलो. आपल्या केबीन मध्ये जाऊन सर्वात प्रथम देवाचे आभार मानले व म्हणालो " अरे देवा, असेच मला पापातून नेहमी वाचवत राहा रे, गणेशा"

क्रमश

माझी सफर... माझा स्वयंपाक व विचार चक्र- १०

मी तडक आपल्या रुम वर आलो व आपले कपडे बांधले व बाहेर रस्तावर आलो, संध्याकाळची वेळ, थंडीचा महिना कुठे जायचे ? हा विचार डोक्यात चालू झाला...

परत चारींजीच्या जवळ जाणे मला योग्य वाटत नव्हते, व नवीन मार्ग शोधावा ह्या साठी मी प्रयत्न करु लागलो..राहण्याची सोय प्रथम केली व लगेच नेहरु प्लेस गाठले व नेहरु प्लेस मध्ये कमीत कमी ३००च्या वर संगणक दुकाने होती (आहेत व आज जास्त संख्या असेल)
दोन चार जणांशी बोलणी केली व एक छानशी नोकरी पकडली... महीना ३५०० वर पण हे पैसे पुरेसे नव्हते त्यासाठी लगेच थोडी धावपळ केली व संध्याकाळ साठी काम शोधले व तेथे ३०००.०० वर काम पक्के केले.. सकाळी ८.३० ते ५.० पर्यंत एका दुकानात व ५.३० ते रात्री ११.०० पर्यंत एका दुकानात असे दोन शिफ्ट मध्ये काम पकडले... सगळं कसे मना प्रमाणे चालू होते, चार महीने एकदम व्यवस्थीत गेले व तेथे खुप काही शिकण्यासाठी देखील भेटले व मी आनंदात असतो तेव्हा पहिल्यांदा आठवण येते ती कोल्हापूरची. मला कोल्हापूर सोडून खुप काळ झाला होता... एकदा मनाचा ठीय्या करुन जवळच्या नातेवाईकांना फोन करावा व आई व वडीलांची खबर घ्यावी व माझी माहीती त्यांच्या पर्यंत पोहचवावी हा विचार सारखा सारखा मनामध्ये डोकावू लागलाच होता तेव्हा फोन बुथ वर गेलो व नंबर फिरवला... पण नशीब अजून कच्चेच होते ... फोन बंद झाला होता. प्रचंड निराशा मनामध्ये घेऊन रुम वर आलो, तो पर्यंत नवीन नावाचा एक त्या गल्ली मधील मुलगा माझी वाट पाहतच उभा होता.. माझ्या जवळ येऊन त्याने मला आपल्या संगणकामध्ये आलेली अडचण सांगितली व मला घरी घेऊन गेला चांगलाच श्रीमंत घरचा एकुलता एक मुलगा होता तो.

काही वेळ संगणकाशी घालवल्यावर मी त्या संगणकातील अडचण दुर करुन त्याला दिली व त्याच्या कडून मोबदला घेतला, पण नवीन ने मला संगणक दुरुस्त झालेल्या आनंदामुळे बाहेर जेवणासाठी घेऊन गेला जेव्हा आम्ही परत आलो तो पर्यंत त्याचे वडील घरी परत आले होते त्यांनी माझी थोडीफार माहीती विचारली व आत निघून गेले, दोन एक दिवसांनी तोच नवीन मला बोलवण्यासाठी रवीवारी माझ्या रुम वर आला व आपल्या वडीलांकडे घेऊन गेला, त्यांनी आपल्या कंपनी मध्ये काम करण्याविषयी मला विचारणा केली व पगार तथा सुविधा दोन्ही बद्दल मला माहीती दिली, मी एक तारखे नंतर कंपनीसंगे काम करेन असे त्यांना सागून परत आपल्या रुम वर आलो, नेहरु प्लेस मध्ये जेथे काम करत होतो तेथे सुचना दिली व पगार तथा बाकी हिशोब पुर्ण केला.

दिल्ली पासून ३० एक कि.मी. वर गुडगांव मध्ये त्यांच्या कारखान्यामध्ये मला घेऊन गेले व काम तथा राहण्याची सुविधा दाखवली, तेथे १० एक संगणक व काही प्रिंन्टर होते व महाजालाची जोडणी व कार्यालयाच्या वरच मला राहण्याची सुविधा केली होती तेथे एक कपाट एक गादी व एक चादर ह्या वस्तू. लाईट ही असून नसल्यासारखी व भिंतीचा रंग येथे तेथे उडालेला व जागो जागी खड्डे तश्यात भरीस भर खिडकीला दरवाजाच नव्हता... पण जे मुफ्त मध्ये मिळाले ते काय वाईट असे ठरवून आपले सामान ठेवले. जेवणाची सोय विचारली तेव्हा मात्र माझी विकेट उडाली.. ते म्हणाले समोरच स्वयंपाक घर आहे तेथे सर्व सामान आहे व जे नसेल ते तु पाहा जेवण तुझे तुलाच करावे लागेल कारण कंपनीच्या आसपास कोठेही जेवणावळ / ढाबा नाही आहे..पुढे ४-५ किंमींवर धाबा आहे पण जाण्यायेण्याचा वेळ व खर्च पाहता तु येथेच जेवण तयार कर.

दिवसभर मला सुट्टीच दिली होती व सकाळ पासून मी उपाशीच फिरत होतो तेव्हा स्वयंपाक घरात जाऊन मी काय काय आहे ते पाहून घेतले सर्व सामान होते पण खुप मोठा प्रश्न होता जेवण तयार कसे करावे ? कारण मला जेवण तयार करताच येत नव्हते व कधी प्रयोग देखील केला नव्हता. तरी देखील प्रयोग करावा ह्या विचाराने मी तांदुळ निवड्ले व चुल पेटवली पाण्याचा अंदाज घ्यावा असे कुठे कुठे तरी मी जो स्वयंपाक करतो त्याच्या तोंडून कानावर पडले होतेच पण पाण्याचा अंदाज घेणे म्हणजे काय हेच माहीत नव्हते तरी देखील प्रयत्न करावा ह्या उद्देशाने पाणी घातले व तादूळ घातले व त्यावर झाकण ठेवले व मी भात तयार होण्याची वाट पाहू लागलो, थोड्या वेळाने थोडा फार करपल्याचा वास आल्या आल्या मी पळत जाऊन आपला भात पाहीला सर्व बाजूने काळा पडलेला पण थोडाफार मध्ये चांगल्या (अर्ध कच्च्या अवस्थेत) अवस्थेत भात दिसला. तोच भात ताटामध्ये वाढून घेतला व थोडे लाल चटणी व तेथे मिक्स करुन माझ्या हाताचे पहील्याच जेवणाचा चव मी चाखला... आळणी मीठच घातले नव्हते तरी देखील तसेच वरुन मीठ टाकून मी आपले जेवण सुरु ठेवले कधी कच्चे / कधी जळलेले असे लाल चटणी / मीठ /तेल व भात असे विचित्रच नवीन डीश मी तयार केली... व जवळ जवळ एक महिना मी रोज एक विचित्र भात तयार करत असे व व रोज नवीन डीश जेवताना अनुभवत असे ह्या मध्ये ही मला खुप आनंद मिळायचा... पण प्रयोग करता करता महिन्यानंतर एकदा माझा भात नेहमीच्या भाताप्रमाणे तयार झालाच. भात शिकलोच होतो आता बारी होती आमटी अथवा भाजीची... आमटी व भाजी अर जे जे अत्याचार मी केले तेथे लिहणे म्हणजे पाप आहे असे मला वाटते तेव्हा तो विषय सोडुनच देऊ. प्रचंड महनतीने भाजी शिकलो व चपाती करण्याचा अचाट प्रयोग चालू केला कधी रशिया तर कधी अमेरिका तर कधी कधी माझे आवडते कोल्हापुर अश्या आकाराच्या मी चपात्या ? तयार करु लागलो व जेवतानाच त्यांचा आकार पाहून स्वत:वरच हसत असे.

ह्या कंपनी मध्ये राहून मी जेवण करणे तर शिकलोच पण कसे जगावे हे देखील शिकलो ... आनंदाने जिवनातील प्रत्येक क्षण अनुभवत मी आपले जिवन गाडी ओढतच होतो व वेळ मिळेल तसे तसे घरी फोन करण्याचा प्रयत्न चालुच केला होता पण नंबर बदलल्यामुळे कुठेच कसलाही संपर्क होऊ शकला नव्हता.... प्रत्येक दिवस आनंदाने संपत असे पण रात्री वेळ काढणे जिवावर येत असे कारण ह्याच्या आधी मी लोकांच्या मध्येच राहत असे पण हा कारखाना संध्याकाळ नंतर जवळ जवळ मृत समान असे व अश्या वेळी मनामध्ये घराचे विचार, मित्र मंडळी, कोल्हापुर, पन्हाळा चे विचार भरकटत असत व प्रचंड मानसीक त्रास होऊ लागला व ह्या वर मला उपाय ही सापडला.. बियरचा रोज एक बियर व रात्रीची आरामाची झोप ना घराचा विचार ना स्वत:चा विचार फक्त जगत जाणे हा विचार डोक्यात....

माझी सफर... निर्णय भाग - ९

पोर्ट ब्लेयर च्या विमानतळावर कंपनीचा एक सदस्य मला घेण्यासाठी आलाच होता. थोड्या वेळाने मी कार्यालयात पोहचलो व तेथे जाऊन श्री अनुज पाटलांची भेट घेतली व काही कागद पत्रे त्यांच्या हाती सोपवली व त्यांना राहण्याच्या सोयी बद्दल विचारणा केली, त्यांनी देखील सर्व माहीती मला दिली व कार्यालयीन नियमांची तसेच येथे जे काम मला बघावयाचे आहे त्याची थोडीफार माहीती मला दिली जवळ जवळ अर्धा एक तास आम्ही बोलत होतो पण अनुज ह्यांच्या तोंडून एक ही मराठी शब्द बाहेर पडला नव्हता, तरी देखील मधून मधून त्यांना जाणिव करुन देण्यासाठी की मला मराठी येते मी काही प्रश्न मराठीतून विचारत असे, पण त्या महामानवाने एकाही प्रश्नाचे उत्तर मराठीतून दिले नाहीच. मी ही काही हरकत न घेता तेथून बाहेर आलो व पहिलाच दिवस असल्याने थोडे फार जवळची मार्केट एकाची सोबत घेऊन फिरुन आलो व जरुरी सामान विकत घेतले व संध्याकाळच्या वेळी कंपनीच्या गेस्ट रुम मध्ये पोहचलो. तर तेथे थोडाफार माहोल बद्दलेला दिसला व कंपनीचे अनुज सर, प्रदिप सर, गुप्ताजी, अविनाश असे चार-पाच जण माझी वाट पाहत बसले होते. माझी काळजीपुर्वक माहीती घेतली पण त्यांच्या बोलण्यातून मला थोडा वेगळेपणा वाट्त होता मी ती शंका माझ्याच वयाच्या अविनाश समोर बोलून दाखवली तेव्हा तो हसत म्हणाला " अरे राज सर, कुछ नही है सब ने थोडी थोडी लेनी चालू ही की है अभी वह देखो वहा टेबल पे.." माझी नजर तिकडे टेबलाजवळ गेली तर तेथे एकदम मैफिल जमली होती. सगळे आपले कार्यलयीन अधिकार / खुर्ची विसरुन एक दुस-याला दारु पाजत होते व त्यामध्ये कंपनीचा चपराशी देखील शामिल होता.. तिकडे जिंदल मध्ये मला असे कधीच काही दिसले अथवा कळाले नव्हते की कोण कोण दारु पितो ईत्यादी पण येथे पहिल्या दिवशीच पार्टी टाईम. काहीजणांच्या आग्रहानंतर मी आपला एक ग्लास घेऊन त्याच्या गप्पामध्ये शामिल झालो येथे माझा रुल मी लागू केला रुल एक. अनजान व्यक्ती समोर जास्त पिणे नाही व जास्त बोलणे नाही. रुल दोन. आपले डोळे व कान सतत उघडे ठेवणे. व ह्या रुलस चा मला नेहमीच फायदा होतो. सर्वजण एकदम मस्त पैकी मजा करत होते बोलण्यातूनच कळाले की कोण्याच्या तरी बायकोचा वाढदिवस आहे त्यामुळे ही पार्टी. हे सगळी पार्टीच भारतातील एक-एक प्रदेशातून आली होती कोणीच लोकल नव्हते, त्यामुळे भाषा व शिव्या ह्या माहीत असल्यामुळे काही जास्त विचित्र वाटत नव्हते, पण जेव्हा थोड्य़ा वेळाने अनुज सर माझ्या जवळ आले व मला बाजूला घेऊन माझ्या शी मराठीमध्ये बोलू लागले तेव्हा मात्र मला असे वाटले की मी महाराष्ट्रामध्ये आपल्या लोकाच्यामध्ये आलो आहे, कमीत कमी ४ वर्षाच्या कालावधीनंतर मी मराठी प्रथमच बोलत होतो.. व मला नेहमीच्या वापरातील मराठी शब्दच सापडत नव्हते तेव्हा मात्र मी त्यांची क्षमा मागीतली व म्हणालो " सर जास्तच काळ येथे झाला व पंजाबी, हिंदी लोकांच्या सोबत बोलून बोलून स्वत:ची जन्म भाषा मात्र थोडीफार विसरलो आहे." त्यानी हसून उत्तर दिले " काही हरकत नाही, माझे देखील असे होते कधी कधी गावी गेल्यावर, वाईट वाटून घेऊ नकोस. बाकी मी कार्यालयात मराठी बोललो नाही ह्याचा राग तर नाही ना ? अरे आपल्या आसपास जी लोक काम करत आहेत त्याना वेगळे पण वाटू नये ह्या साठीच मी तुझ्याशी हिंदीतून बोलत होतो, मी जे म्हणतो आहे ते तु समजतो आहेस ना ? " मग ईतरची तीकडची बोलणी झाली व जेवण करुन ते परत आपल्या घरी. व मी आपल्या रुम वर परत आलो.

दुसरा दिवस मात्र एकदमच आवाहानात्मक होता, एखाद दुसरा संगणक चालू होत होता... चालू म्हणजे फक्त BIOS दाखवत होतो, बाकी सगळे १२ संगणक बंद. काहीचा OS तर काही़चा RAM, तर काही मध्ये Software खराब. पुर्ण दिवसामध्ये एक संगणक संपुर्ण पणे खराब करुन ५ संगणक चालू केले. सपोर्ट साठी जे साहित्य मी संगे आणले होते ते सर्व संपले [काही RAM, Prosessor, Motherbaord's] मी अनुज सरांना ह्याची रिपोर्ट दिली व रुम वर जाऊन तानून दीली, मस्त पैकी झोपलो. दिलेल्या लिस्ट मधील सामान येण्यासाठी कमीत कमी ४ दिवसांचा वेळ होता तो पर्यंत अंदमान निकोबार फिरण्याचा मी प्रोग्रम घेऊन अनुज सरांच्या कडे पोहचलोच होतो तो पर्यंत त्यांनीच माझा प्रोग्रम तयार केला होता, ते म्हणाले, " राज, देखो सामान तो ५-६ दिन के बाद ही आयेगा, तब तक तु मेरे साथ यहा के छोटे मोठे काम करणे मे मदत करो, यह लिस्ट काम की" मी ती लिस्ट घेऊन आपल्या टेबला जवळ आलो व मनातल्या मनात चरफडत मी ती लिस्ट वाचून काढली, बागेची हालत खराब आहे माळीला सांगून ती ठीक करा, कुठे कुठे लाईट नाही आहे तेथे लावा, काही नळ खराब आहेत, काही गेट वर बेल नाही आहे.
सहाव्या दिवशी अर्धाहून अधीक काम पुर्ण केले व तो पर्यंत संध्याकाळ पर्यंत माझे सामान माझ्याजवळ पोहचले. बाकी पाच संगणकांचे काम व बाकी छोटे मोठे काम मी एका आठवड्यातच निपटून काढले व नेटवर्कचे काम चालू केले व ते देखील चार दिवसामध्ये संपवले, येथे येऊन तीन आठवडेच झाली होती तो पर्यंत मला फोन करुन जिंदल साहबांनी परत बोलवले दिल्लीला. अनुज सरांनी ह्याची कल्पना मला दिली व बाकी राहिलेले थोडेफार काम तेथूनच कोणाकडुन तरी करुन घेऊ असेल म्हणाले व मला परत जाण्याची तयारी कर असे सांगून मोकळे झाले, माझ्या परत जाण्याची दिवशी मात्र अनूज सर मला म्हणाले " राज माफ कर, अरे मला असे वाटले होते की जिंदल साहेब तुला दोन-तीन महिन्यासाठी येथे ठेवतील ह्यासाठीच मी तुला कोठे ही फिरु दिले नाही, पण पुढील वेळी मात्र मी स्वत: तुला घेऊन जाईन फिरण्यासाठी अंदमान निकोबार हे नक्की ह्यावेळी जरा चुक झाली." मी म्हणालो काही हरकत नाही सर ह्याच कंपनी मध्ये काम करत आहे पुढे मागे वेळ येईलच फिरण्याची येथे. मी तेथून परत दिल्लीला आलो.

कंपनीमध्ये आल्या आल्या मला शिमला जाण्याची तयारी करण्याचे सांगितले गेले तेव्हा मात्र मी भडकलोच . व सरळ जिंदल साहबांच्या समोर जाऊन नकार दिला व म्हणालो " बाबूजी, अभी कल ही तो आया हूं मै, मुझे यहा के भी तो काम देखने है, आते ही यहा मेरे लिऎ ढेरसारा काम पडा है तबभी मुझे आप शिमला भेज रहे हो," जिंदल साहेब एकदम आरामात मला म्हणाले " ठीक है तो मै चारी जी कॊ मना करता हूं की राज नही आयेगा, आप अपना काम खुद करे।" चारीजींचे नाव आल्या आल्याच मी जरा वरमलो व म्हणालो " चारीजीं ? वहा शिमला क्या कर रहे है?" तेव्हा जिदल साहेब म्हणाले," अरे वहा शिमला में चारीजी का तथा मै मिलके एक स्कुल चलाते है वहा कुछ नये पीसी लगाने है वहा तुम्हे जाना है।" मी ठीक आहे म्हणालो व एक नवीन प्रवासाची सुरवात पुन्हा चालू केली.

अंदमान हून आल्यानंतर मी एका आठवड्याच्या आतच शिमला मध्ये आलो होतो, थंडीची ती नुक्तीच सुरवात होती पण माहोल एकदम मस्त होता. जे चित्रपटामध्ये शिमला पाहिले होते त्या शिमला मध्ये मी स्वत: होतो व माझ्या नशिबावर मला जरा देखील विश्वास वाट नव्हता की कधी अंदमान तर कधी विमान प्रवास तर येथे मी स्वत: शिमला मध्ये ? जे माझे नेहमीचे काम होते ते मी चालू केले व दोन-चार दिवसामध्येच ज्या काही संगणकीय अडचणी होतो व जे नवे संगणक जोडायचे होते ते पुर्ण करुन मी चारीजींची परवानगी घेऊन शिमला फिरून आलो. रोज सकाळी पहाडावर चढून वर तास तास भर बसण्याची व निसर्गाच्या अदभूत करणीचा आनंद घेणे हा कार्यक्रमी चांगला चार दिवस चालवला, जिंदल साहबांच्या एका फोन ने परत मला दिल्ली मध्ये पोहचवले, पण तेथे ती पोहचण्य़ाआधीच माझ्या यशस्वी शिमला तथा अंदमान वारी मुळे माझ्या बद्दल त्यांना विश्वास वाटत होता की काय जाने मी पोहचण्याआधीच मला तेथून परत एकदा प्रवासासाठी पाठवण्याची तयारी जिंदल साहबांनी केली होती. मला पुण्याला जायचे होते पण काही कारणामुळे मला पुण्याच्या जागी विशाखापट्ट्णम ला जाण्याची तयारी करा असे सांगीतले गेले पण बीन-पगारी मला येथे ११ महिने झाली होती व हे पक्क केले की जो पर्यंत पगार ठरत नाही व त्यानूसार पगार भेटत नाही तो पर्यंत नो वर्क. काम बंद..

माझ्या ह्या काम बंद आंदोलनांची माहीती काही तासातच जिंदल साहबांच्या जवळ पोहचली, व मला बोलवणे आले, दिड तासाच्या वाद विवादातून काहीच बाहेर पडले नाही अथवा जिंदल साहबांनी बाहेर पडू दिले नाही व मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेऊन व त्यांच्या समोर बोलून दाखवून मी त्यांच्या रुम मधून बाहेर आलो, शर्माजींनी मला खंदा वीर असे म्हणून पाठीवर थाप मारली व म्हणाले " राज, जो काम में पिछले ९ साल में नही कर पाया वह तुमने कर दिखा या, जा बेटे जा यहा से अच्छा कुछ तेरे लिऎ भी होगा तभी तो भगवान यह चहाता है तु यहा ना रहे.. जा"

मी तडक आपल्या रुम वर आलो व आपले कपडे बांधले व बाहेर रस्तावर आलो, संध्याकाळची वेळ, थंडीचा महिना कुठे जायचे ? हा विचार डोक्यात चालू झाला...

माझी सफर... पुन्हा प्रवास ... भाग - 8

" साला बुढा....लडकी की बात हो तो अभी तो मै जवान हूं.... काम की बात होतो पुराना पुर्जा.... राज देखो बुढे को" व गालातल्या गालात हसत आपली पिशवी घेऊन पसार...

दिवसामागून दिवस जात होते, कंपनीमधील सर्व संगणक तथा प्रिंन्टर ह्याची सेवापाणी व्यवस्थीत झाली होती, एके दिवशी जिंदल साहबांनी मला परत एकदा आपल्या केबीनमध्ये बोलवले व म्हणाले, राज तुला काम करावे लागेल लवकरात लवकर तु एक नवीन संगणक खरेदी करुन माझ्या बाजूच्या केबीन मध्ये लाव व त्यामध्ये आजपर्यंत उपलब्ध असलेले सर्वा प्रगत साहित्य लाव म्हणजे विनयला आवडेल, अरे हो, माझा लहान मुलगा विनय सीडनीहून परत येत आहे ह्या आठवड्यामध्ये व पुढील आठवड्यापासून तो कार्यालय मध्ये रोज येत जाईल, मी ठीक आहे असे म्हणून बाहेर आलो व नवीन संगणकासाठी आवश्यक सामान खरेदी करुन परत आलो व झालेले बिल जिंदल साहबांची सही घेऊन सीए जवळ दिले व मी परत आपल्या केबीन मध्ये जाऊन संगणक जोडणी करु लागलो.
दुस-या दिवशी जिंदल साहबांनी मला केबीन मध्ये बोलवले व ते बिल माझ्या तोंडासमोर नाचवत म्हणाले " राज, यह क्या ? तुमने ईतने पैसे खर्च कर दिये एक पीसी के लिये ?" समोर खुर्चीवर सीए बसला होता व त्यांनेच त्यांना भडकवले होते असे मला वाटत होते पण मी जरा डोके चालवून म्हणालो " बाबूजी, आपने तो कहा था लेटेस्ट पीसी लगाना ?, तो आप किसी से कह के दुसरी जगह से कोटेशन चेक करे की क्या मै जो सामान लाया हूं वह महगां है ?" असे मी बोलल्यावर ते थोडे वरमले व म्हणाले की तु प्रथम सीए नां विचारुन मग सामान खरेदी करित जा पुढे... मी ठीक आहे म्हणालो व लगेच ते वरमले आहेत हे पाहू पगाराविषयी पुन्हा विचारले, त्यांनी परत तेच पालूपद पुढे चालू ठेवले व मागील महिन्याप्रमाणे परत एकदा मला खर्चासाठी काही पैसे हाती दिले तेव्हा मात्र मी थोडा वैतागलोच पण काहीही न बोलता हाती आलेले पैसे घेऊन मी बाहेर आलो व केबीन मध्ये जाऊन विचार करु लागलो की पगाराचे काय ?

मी ह्यावेळी मात्र एक प्लान केला व रवीवारी तडक चारीजींच्या घरी जाऊन पोहचलो व त्यांना नमस्कार करुन त्याच्या समोर जाऊन बसलो, ईकडची तीकडची काही बोलणी झाल्यावर मी लगेच मुद्द्याला हात घातला व म्हणालो, चारीजीं, वहा काम तो बढीयां है पर पगार कभीतक दिया नही है, खर्चा देते रहते है पर पगार नही दे रहे है ना मै कुछ समज पा रहा हूं ना कुछ कर पा रहा हूं" चारीजींना ही ह्यांचे थोडे अप्रुप वाटले की पगार दिला नाही व त्यांनी जिदल साहबांची बोलणी करण्याचे आश्वासन दिले व मी तेथून परत आल्या कार्यालयात आलो.

माझा बाण एकदमच वर्मी लागला होता व संध्याकाळीच घरी मला बोलवणे आले व मी काही वेळातच जिंदल साहबांच्या समोर. माझ्या कडे ते जरा रागानेच पाहत म्हणाले, बेटे मुझे बता मैने तुझे पैसे मना किये है ?तुझे यहा खाना नही मिल रहा है ? रहना अच्छा नही है ? क्या बात है बता दो पहले , तुम सीधे चारीजीचे पास पोहच गये, पहले मुझसे बात करते फिर जाते वहा..
मी त्यांना म्हणालो... बाबूजी मैने तो आप को १० बार कहा होगा पगार के लिए लेकिन आपने कभी सोचा ही नही... दो-चार हजार हात मे रख देते हो... अगले महीने का वादा करते हो.. मुझे भी तो अच्छा नही लगता बार बार तनख्वा के लिए कहना पर मेरी भी मजबूरी है" मग ते म्हणाले ठीक है करता हूं. व परत मला मोकळ्या हाताने पाठवले.

दोन दिवसानंतर मला बोलवले व म्हणाले की तयारी कर तुला अंदमान निकोबार ला जाणे आहे.. मी आनंदानेच हो म्हणालो व लगेच बाहेर आलो व जाऊन शर्माजींना भेटलो व त्यानां सांगितले, ते देखील खुश झाले व म्हणाले " राज बेटा, अच्छा मोका है.. जा थोडा घुम के भी आ तथा व एक तुम्हा रे ही महाराष्ट्र के व्यक्ती है श्री. अनूज पाटील, मस्त आदमी है... परिवार के साथ रहता है वही सबकुछ देखता है वहा.. जा, पैसे की जरुरत हो तो मुझे बता ना"

सगळी तयारी झाली पण मला हे माहीत नव्हते की मी अंदमान ला का जातो आहे.. मी जरा योग्य वेळ पाहून जिदंल साहबांच्या कडे गेलो व विचारना केली, तेव्हा त्यानी मला सांगितले की तेथे काही संगणक खराब आहेत तर काही नवीन सामान लावने आहे कमीत कमी दोन एक महिने तेथे थांबावे लागेल. मी त्या पध्दतीनूसार तेथे फोन करुन जे सामान हवे आहे त्याची लिस्ट तयार केली व ती लिस्ट जिंदल साहबांना दिली व त्यांच्या परवानगीने नेहरु प्लेस ल जाऊन सर्व सामान खरेदी केले व त्या नंतर तीन दिवसांनी मला माझ्या हाती टीकीट दिले गेले ते होते दिल्ली-कलकत्ता-पोर्टब्लेयर विमान प्रवासाचे. मी थोडा घाबरलोच विमान प्रवास व मी. मी परत मदतीची गरज समजून सर्वात प्रथम जिवन सिंगला भेटलो व म्हणालो " जिवन, गुरुदेव जरा मदत करना तथा यह बता दो की आपने कभी प्लेन में सफर कीया है ?" तो ज्या नजरेने माझ्या कडे पाहत होता तेव्हाच मला लक्षात आले की आपण चुकीचा माणुस पकडला आहे, उत्तराची अपेक्षा न करता मी सरळ पवन जींच्या समोर गेलो व तोच प्रश्न पुन्हा विचारला. त्यांनी हसतच मला जवळ बसवले व जवळ जवळ सर्व माहीती मला दिली.

शर्माजींना देखील ह्याची बातमी लागलीच होती व ते मला पाहताच म्हणाले " हा राज बेटे बडा तीर मारा, ९ साल हो गये मुझे यहा झक मारते हुये पर हमे तो ट्रेन से भी कही नही भेजा कंपनी ने पर तुझे तो सिधे हवा मे भेज रही है... हा हा... यार एक काम कर ना, प्लेन में ना जो लडकीयां होती है ना मस्त होती जब वापस आयेगा ना तब बात करेंगे." मी लगेच त्यांना म्हणालो " शर्माजी ... कमसे कम नाम के वास्ते ही सही कुछ शर्म करो... बाबूजी आप भी ना आपकी उम्र देखो... आप की बाते देखो" मग शर्माजी पुन्हा जोर जोरात हसत व म्हणत" तो तुभी बोलना सिख ही गया... यह सब जिंदल की माया है"

पवन जींनी मला विमानतळावर पोहचवले व माझ्या जिवनातील प्रथम विमान प्रवासाला सुरवात होणार होती लवकरच....

शनिवार, ३० जानेवारी, २०१०

माझी सफर... नोकरीपर्व ... भाग - ७

राहीलेल्या वेळात सर्व राहीलेली कामे संपवली व एक दिवस जाऊन जेवणाचे पैसे व मागील सर्व देणे चुकवले व तेथेच थोडावेळ दिनेश बरोबर इकडचे तिकडचे बोललो व पुन्हा खोलीवर परत आलो... संध्याकाळी असाच गच्चीवर बसलो असताना मनात विचार आला की अरे आपले येथे काम व्यवस्थीत चालू आहे जास्त नाही पण नफा व्यवस्थीत आहे ते जिदल साहेब पगार किती देणार काय देणार ह्या विषयी काहीच बोलले नाही मी काय करावे ? की चारीजी नी सांगितले आहे तर काही विचार करुनच सांगितले असेलच तेव्हा काय ह्याच्या वर विचार करावा... सोड का होईल ते होईल चल जिंदल कडेच काम करु ह्या विचारावर येऊन मी रात्री झोपी गेलो.

व दुस-या दिवशी जाऊन चारीजींना मी निर्णय सांगितला वर जिदल साहेबांना देखील फोन केला व काही दिवसामध्येच मी त्यांच्याकडे कामासाठी रुजू झालो पहिल्या दिवशीच विक्रम नावाच्या पंजाबी युवकांशी माझी ओळख करुन दिली व राहण्याची व्यवस्था त्याच्या बरोबरच केली गेली. चारीजींनी व्यवस्थीत बोलणी केली असतील ह्या विचाराने मी पगार तथा इतर काही गोष्टी न विचारताच काम चालू केले व कार्यालयातील अस्त-व्यस्त झालेले सर्व सिस्टम तथा प्रिंटरची साफसफाई करुन त्यांना कामा योग्य बनवले, न सांगताच मी काम करत होतो व माझ्या सर्व कामावर, हालचालीवर जिंदल साहबांचे व्यवस्थीत लक्ष होतेच.. मला नेहमी वाटे की त्यांना कसे कळत असे की मी कार्यालयात काय केले.... एके दिवशी त्यांनी आपल्या लहान मुला बरोबर [वयाने नाही पण त्यांना तर तो लहानच वाटायचा २२ वर्षाचा होता तो] अभीषेक शी ओळख करुन दिली व मी त्याच्या साठी एक महत्वाचाच व्यक्ती ठरलो त्याला संगणक हवा होता व कुठला ह्यावा ह्या पासुन कसा चालवावा ह्यांची माहीती तो माझ्याकडुन शिकू लागला व लवकरच त्याने व मी मिळून एक नवीन संगणक घरी आणला तेव्हा मात्र जिंदल साहबांनी मला आपल्या घरीच एक खोली दिली व राहण्याची व्यवस्था करुन दिली. मी त्यांच्या कधी कधी रात्री गप्पा मारत बसायचो, त्यांना निद्रानाशाचा विकार होता व मला रात्री १-२ पर्यंत जागण्याची सवय.
कधी आपल्या बद्दल तर कधी आपल्या तीन लहान भावांशी विषयी सांगत... त्यांनी सांगितलेल्या काही कष्टांचा मी विचार करत असे की हा माणूस स्वत:साठी जगला किती वेळ असे ? वयाच्या २० व्या वर्षा पासून एक पिठाची गिरणी ते ३००-४०० करोड रुपयांची ही कंपनी.. ह्याला खरोखर वेळ मीळाला असे का जिवनामध्ये स्वत:साठी. बाकीचे घरातील सर्वजण त्यांच्या शब्दाच्या आत.. कधी त्यांचा आदेश अथवा गोष्ट कोणी टाळलेली अथवा मोडलेली मला दिसलीच नाही एकदम प्रभावी व्यक्ती. समोरच्याला बोलण्यातूनच आपलंस करुन घेण्याचे खास तत्व त्यांना माहीत होते व त्यांचाचे ते नेहमी वापर करत बोलता बोलत ते माझ्या कडुन कार्ययातील घडामोडी विषयी विचारुन घेत व इतर कर्मचारी वर्ग काय करतो ह्या विषयी विचारत कधी नाव घेऊन अथवा कधी आड्नाव घेऊन.. मग मला लक्षात आले की आपण कार्यालयात काय करतो आहे हे त्यांना कसे कळत असे.

कंपनीमध्ये काम करताना मला चार महीने झाले होते व पगाराचे नाव काही कोणी घेत नव्हते तेव्हा मात्र माझी चलबिचल झाली व मी माझ्या स्वभावाला अनूसरुन सरळ जिंदल साहेबांच्या कडे पोहचलो व त्यांना एकदम प्रेमाने हसतच मी विचारले " बाबूजी, मुझे आज चार महिने हो गये है आप के पास काम करते हुवे, चारीजींने आपसे क्या बात कि है मुझे पता नही पर मुझे आप बता दे की मेरी तनख्वा कब मिलेगी तथा कितनी मिलेगी... क्यूं की मेरे भी कुछ खर्चे है.." त्यांनी जरा ही विचार न करता खिश्यात हात घातला व ५०००.०० रु काढून मला दिले व म्हणाले " इससे काम चलाना आगे देखता हूं क्य तनख्वा देनी है" मला जरा विचित्रच वाटले पण मी काही कुरकुर न करता पैसे घेतले व खोलीत निघून गेलो.

मला येथे काम करता करता चार महीने झाले होतेच त्यामुळे बाकी कर्मचारी वर्गा बरोबर देखील माझी ओळख व्यवस्थीत झाली होती त्यामध्ये तर काही जण खास बंदे होतेच. एक जिवन सिंग ह्या जिदल साहबांचा ड्रायवर.. राजस्थानी ६ फुट उंच एकदम खडा आवाज... माझी त्याची चांगलीच मैत्री जमली होती... हा जिवन सिंग वयाने कमीत कमी ५५ वर्षाचा असावा पण मला तो कधीच आहो-जाहो बोलवू देत नसे मला म्हणत असे " राज, देखो उम्र कुछ नही होती है..... जब हम दोस्त बन सकते है तो काहे काका-मामा या भाई बने ? तुम मुझे अपने दोस्त के तर ही बुलाया करो... देखो कंपनी मै सारे मुझे जिवन सिंग जी कहते है.. तुम्ही भी मुझे जिवन कहा करो" मला ह्या माणसाचा जिंदादिल पणा खुप आवडायचा गेली २२ वर्षे तो तेथे काम करत होता... जेव्हा आला तेव्हा डोक्यावरचे केस काळे होते आता ह्य भरगच्च मिश्या व डोक्यावरची केसे दोन्ही पांढरी पडलेली पण अवखळपणा, मन मात्र एकदम तरुण. खरं जिवनाचा प्रत्येक क्षण आनंदात कसा जगावा हे मला त्याच्याकडुन कळाले व मी त्याला गुरु मानले तो देखील गर्वांना सर्वांना सागायचा " देखो... यह राज भी मुझे गुरु मानता है.... नही तो तुम लोग कभी मेरी कदर ही नही की " व जोर जोरात हसत असे. अजून एक माणूस जोडी... पवन व शर्माची. काय झकास जोडी होती एकाला झाकावा व दुस-यला उघडावा तर दोन्हीतला फरक एकदम स्पष्ट दिसे... पवन सर एकदम बारीक, कामसू... हसणे कधी कधीच... तर शर्माजी गोलगच्च नाही पण भरलेले शरीर व कंपनी मध्ये हसणे हा त्यांचा हक्क असावा ह्या पध्दतीने टेबलावर हात मारून मारुन हसत असत ते देखील सात मंजिली.... काम... अरे राज काम को मार गोली... तुम्हे पता है... आज क्या हुंआ ? अशी त्यांची गाडी चालू होत असे व संपुर्ण दिल्ली फिरुन पुन्हा आपल्या जिदल साहबांच्यावर रोज एकवाक्य ठरलेलेच " राज, पिछले ९ साल हो गए मुझे - पवन को यहा काम करते करते... जिंदल साहब ने एक भी लडकी कभी काम पे नही रखी... तम जरा पुछना उन्हे क्या दिक्कत है... यार हमारा भी दिल करता है... बाते करने के लिए... हसी मजाक करने के लिए... लेकिन यह बुढा.... खुद कुछ करता नही हमे करने देता नही" व पुन्हा जोर जोरात हसे व मी लगेच त्यांना म्हणायचो " शर्माजी, बुढे तो आप भी हो" लगेच शर्माजी " अबे जा, बुढा तेरा बाप, मै तुझे बुढा नजर आता हूं ? ४९ का तो हूं .... अभी कम से कम ५१ साल तर रहूंगा यहा" आमचा हा दंगा रोज संध्याकाळी चालत असे व विक्रम, मी व नरेन वयाने त्यांच्या पेक्षा कितीतरी लहान असलेल्या सह-कर्मचा-याबरोबर ते दिलखुश होऊन गप्पा मारायचे.
आमचे एक सीए होते वर्मा जी त्यांच्या बद्दल तर शर्माजींनी टिप्पणी म्हणजे जाण्याची वेळ आली हे नक्की " अरे, तुम्हे पता है ? यह वर्मा सीए भी है तथा कंपनी मै डायरेक्टर भी.... लेकिन कसे बना ? ... साला ५ सालतक बाबू जी केलीए सुबह सुबह दुध ले के जाता था ... स्कुटर पे.... तब कही जा के सीए बना ...हरा**...." झाले इतके बोलले की आपली पिशवी उचलत व मला म्हणत निघायचे " देख अभी तु नया है.. तो ६ बजे तक काम कर... हम तो पुराने पुर्जे है... हमे ५ बजे जाने की इजाजत है.." व मला डॊळा मारुन निघून जात... ते गेले की पवनजी लगेच बोलायचे " साला बुढा....लडकी की बात हो तो अभी तो मै जवान हूं.... काम की बात होतो पुराना पुर्जा.... राज देखो बुढे को" व गालातल्या गालात हसत आपली पिशवी घेऊन पसार...

क्रमश:

रविवार, १८ ऑक्टोबर, २००९

माझी सफर... कार्य सिध्दी ... भाग - ६

दिल्ली मध्ये कामाची, राहण्याची व खाण्याची व्यवस्था उत्तम झाली होती तसेच जे चारी जी होते ते एक सदगृहस्थ, सरळ मार्गी जिवन व तसेच त्यांचे कुटूंब. काही दिवसामध्येच मी देखील त्यांच्या कार्यालयीन जिवनाचाच एक महत्वाचा भाग बनलो, त्यांच्या मुळे किती तरी प्रयोग करुन करुन मी संगणक दुरुस्ती देखील शिकलोच. कधी बोर्ड बदल कधी विंडॊज बदल, कधी प्रिंटर वर काम करुन बघ , तर कधी नेट वर. वेगळ वेगळ्या संकेतस्थळावर जाऊन संगणकाबद्दलची माहीती आपल्याकडे जमा करणे व त्यांचे रात्री बसून अभ्यास करणे ह्यावरच काही महीने माझा जोर होता, चारी जींनी देखील धाडस करुन कधी मला आपला संगणक तर कधी स्वत:चा Laptop दुरुस्ती साठी दिला व मी देखील त्यांच्या विश्वासला तडा जाऊ न देता त्यांचे काम व्यवस्थीत करुन देऊ लागलो, तेव्हा मात्र त्यांनी माझी शिफारीश वेग-वेगळ्या व्यक्ती समोर करणे चालू केले व एखाद दुसरे बाहेरील काम देखील मला ते करण्यासाठी पाठवू लागले, ते नेहमी म्हणायचे "राज , देखो तुम्हे यह काम सिखना पडेगा क्यूं की यह काम तुम्हे पुरी जिंदगी रोटी देगा.. यहा तुम कहा से कहा तक पोहच सकते हो.. बहोत बहोत ३०००.०० से ८०००.०० रु. ही कमा सकोगे... पर यह जो काम है एक दिन तुम्हे दिन के ५०००.०० रु. कमा के देगा देखना..." व मी हसून हो म्हणत असे.

असेच एक दिवस चारीजींनी मला बोलवले व म्हणाले " तुम्हे यही करोलबाग में जैन साब के यहा जाना है, वह टी,टी. गार्मेंट के मालिक है... जाणते हो ना टी.टी. ?" मी हो म्हणालो व त्यांची परवानगी घेऊन जैन साहबांकडे गेलो दरवाजावर परवानगी घेऊन मी त्यांच्या कार्यालयात पोहचलो तर समोर जैन साहेब बसले होते व मी जाताच त्यांना अभिवादन करुन म्हणालो की " सर, मै राज जैन, मुझे चारीजींने आपके पास भेजा है, आप को कुछ काम है" ते हो म्हणाले व मला एका संगणकाकडे बोट दाखऊन म्हणाले " बेटा, देखो इसे कुछ हुआ है, तथा इस मे मेरे काम की बहोत सारी चीजे है तथा वह मेरी सारी चीजे जरुरत की है" मी हो म्हणालो व त्यांच्या संगणकाकडे वळलो, थोडेफार काम केल्यावर मी त्यांना सांगितले की काही वस्तूंची गरज आहे व मला ती विकत आणावी लागेल. त्यांनी लगेच किती पैसे लागतील विचारुन घेतले व पैसे मला दिले , काही वेळानंतर मी त्यांचा संगणक चालू करुन त्यांना दाखवला व त्यांच्या सर्व महत्वाच्या फाईली त्यांना दाखवून मी त्यांना सांगितले की काय अडचण होती व किती पैसे खर्च झाले, व वाचलेले पैसे मी त्यांना परत दीले व त्यांची परवानगी घेऊन चारीजीच्या कडे परत आलो तो पर्यंत चारीजी व जैन साहेब ह्यांचे फोन वर बोलणे चालू होते मी गेल्यावर चारीजींनी फोन खाली ठेवला व म्हणालो " वा, राज आज तो तुमने बडा ही काम कर दिया" मी हसत म्हणालो " नही सर, इतना बडा भी नही था यह काम, बस कुछ सामान खराब था, बदल दिया तथा चालू करके उन्हे दे दिया" ते म्हणाले " नही, छोटा नही था काम , वहा जो आदमी आता था उसने तो नया पीसी लेने के लिये कहा था तथा वह लुटने के चक्कर में था पर तुम्हारी वजह से उन्ह के पैसे बच गये तथा उन्होने तुम्हे १०००.०० रु. देने के लिए मुझे कहा है तथा शाम के समय उन्ह के यहा जाना व तुम्हे कुछ गिफ्ट भी करना चाहते है" मी हसलो व म्हणालो " नही सर इसकी क्या जरुरत है, आप उन्हे मना कर दो कृपा कर के" पण त्यांनी जे उत्तर दिले ते मात्र माझ्यासाठी एकदम जिवनमार्गच ठरले, ते म्हणाले " राज, जिवन में कभी पैसे को ना मत कह ना तथा जो तुम ने काम किया है उसका मुल्य जरुर लेना, शर्म पैसे की कभी नही हो नी चाहीए" मी हसत मान डोलावली व आपल्या कामाला लागलो.

चारी जींच्या कृपेने तथा माझ्या काही करण्याच्या इच्छेला मान देऊन काही महत्वाच्या व्यक्ती तथा संस्था मला संगणकाच्या कामासाठी बोलवू लागल्या व रोजचा कामाचा व्याप वाढू लागला. तेव्हा चारी जीं नी माझ्या साठी खोली वर एक फोन लावून दिला व म्हणाले की ह्याचा उपयोग आजच्या घडीला सर्वात जास्त होऊ शकतो तेव्हा सर्वांना हा नंबर दे. माझे रोज बस मधून फिरणे तथा पायी चालणे ह्यामुळे तथा काही हवामानाचा फरक असेल त्यामुळे मी काही दिवस आजारी पडलो तेव्हा मात्र चारी जींनी विचारले " राज, कितना पैसा जोडा है ? " मी म्हणालो की जास्त नाही १५०००.०० एक हजार रु. आहेत तेव्हा चारी जीं नी आपल्या जवळचे ५०००.०० रू. दीले व म्हणाले की एखाद दुसरी मोटर-सायकल पाहून खरेदी करुन टाक आजच, शुभ दिवस आहे आज. मी हो म्हणालो व तेथून सरळ दिनेश जवळ आलो, दिनेश तेथेच त्या गल्ली मध्ये राहत होता माझ्या खोली च्या जवळच जेथे मी जेवण करतो ते त्यांच्या काकाचे हॊटेल. मी दिनेशला एक बाईक हवी आहे असे सांगताच तो मला म्हणाला " अरे राज सर, क्या बात है, अच्छे टाईम पें बोला है आपने, अभी रुको दो बाईक दिखा देता हूं जो चाहिए वह ले लेना" मी तेथेच थांबलो व म्हणालो "ठीक है, जल्दी वापस आना प्लीज मुझे कही जाना है" तो लगेच गेला व दोन मित्रांच्या बरोबर लवकरच दोन बाईक घेऊन परत आला, दोन्ही RX-100 यामाहा होत्या, एकाची किमंत त्याने २५०००.०० रु. व एकाची १८०००.०० रु सागितली, दोन्हीचा वापर करुन पाहिला व चारीजींना फोन केला व त्यांना सांगितले तेव्हा त्यांनी मला काही त्यातले कळत नाही तुच बघ म्हणून फोन ठेवला. मी जास्त विचार न करता १८०००.०० वाली गाडी घेतली व म्हणालो " पैसा अभी ले के जाना भाई, लेकिन नाम करा के आज ही देना मुझे" तो म्हणाला की सेल नोट देइन व ट्रान्स्फर दोन दिवसामध्ये करुन देइन. मी हो म्हणालो.

बाईक झाली, काम देखील व्यवस्थीत चालू झाले, नोकरी तर होतीच, व राहण्याची देखील अडचण जवळ जवळ संपलीच होती तेव्हा चारी जींच्या सांगण्यावरुन मी एका छोट्याश्या जागी दुकान काढण्याचे नक्की केले पण चारी जीचे एक मित्र व मोठे चित्रपट निर्माते श्री.......... जींनी मला सांगितले की करोलबाग मध्ये एका जागीची बिल्डींग आहे तेथे त्यांच्या शेयर मार्केटचे काम त्यांचा छोटा मुलगा पाहतो तेथे काम चालू कर व तेथेच पुर्वी त्यांच्या मुलाने संगणकाचे काम करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा नाव व फोन नंबर सगलेच तयार मिळेल, मी त्यांच्या ह्या सल्ल्याला हो म्हणून तेथेच काम चालू केले.

चारी जीची आर्थिक मदत व माझ्या कामावर माझा असलेला विश्वास ह्यामुळे कामामध्ये माझा व्यवस्थित नफा चालू झाला व मी त्यातील काही शेयर चारी जीं तथा तो चित्रपट निर्माता ह्यांना देऊ लागलो.
एक दिवस चारीजीं नी मला कार्यालयात बोलावले व एका व्यक्तीशी भेट घालून दिली व म्हणाले " राज, यह जिंदल भाई साब है, इन्ह का बहोत बडा कारोबार है तथा यह तुम्हे अपने साथ रखना चाहते है, तुम जाना चाहोगे ?" मी त्या व्यक्तीकडे निहाळून पाहीले तर ५.६ ची उंची व्यवस्थीत कपडे, एक फाईल हातामध्ये व चेह-यावर एक यशस्वी हसू. मी त्या व्यक्त दर्शनाने अथवा चारीं जींचा मान राखावा ह्या उदेशाने म्हणालो " चारी जी, आजतक आपने जो कहा है कभी मेंने मना की या है ? " चारी जींच्या चेह-यावर एक समाधानाचे हसू मी पाहीली व मी त्यांच्या विश्वासानूसारच बोललो हे मला खुप आनंद देऊन गेले. दोन-चार दिवसानंतर मी जिंदल ह्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेलो व त्यांची भेट घेऊन व्यवस्थीत कामाविषयी माहीती घेतली व त्यांच्या कडुन दोन एक आठवड्याचा वेळ मागून घेतला.

क्रमश :

* काही व्यक्ती तथा संस्थेची नावे काळजीपुर्वक येथे लिहलेली नाही आहेत क्षमा असावी, काहीतरी अनुबंध असल्यामुळे अथवा त्यांचे व्यक्तीगत जिवन येथे महाजालावर येऊ नये ह्या उद्देशाने.