सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१०

माझी सफर... पुन्हा प्रवास ... भाग - 8

" साला बुढा....लडकी की बात हो तो अभी तो मै जवान हूं.... काम की बात होतो पुराना पुर्जा.... राज देखो बुढे को" व गालातल्या गालात हसत आपली पिशवी घेऊन पसार...

दिवसामागून दिवस जात होते, कंपनीमधील सर्व संगणक तथा प्रिंन्टर ह्याची सेवापाणी व्यवस्थीत झाली होती, एके दिवशी जिंदल साहबांनी मला परत एकदा आपल्या केबीनमध्ये बोलवले व म्हणाले, राज तुला काम करावे लागेल लवकरात लवकर तु एक नवीन संगणक खरेदी करुन माझ्या बाजूच्या केबीन मध्ये लाव व त्यामध्ये आजपर्यंत उपलब्ध असलेले सर्वा प्रगत साहित्य लाव म्हणजे विनयला आवडेल, अरे हो, माझा लहान मुलगा विनय सीडनीहून परत येत आहे ह्या आठवड्यामध्ये व पुढील आठवड्यापासून तो कार्यालय मध्ये रोज येत जाईल, मी ठीक आहे असे म्हणून बाहेर आलो व नवीन संगणकासाठी आवश्यक सामान खरेदी करुन परत आलो व झालेले बिल जिंदल साहबांची सही घेऊन सीए जवळ दिले व मी परत आपल्या केबीन मध्ये जाऊन संगणक जोडणी करु लागलो.
दुस-या दिवशी जिंदल साहबांनी मला केबीन मध्ये बोलवले व ते बिल माझ्या तोंडासमोर नाचवत म्हणाले " राज, यह क्या ? तुमने ईतने पैसे खर्च कर दिये एक पीसी के लिये ?" समोर खुर्चीवर सीए बसला होता व त्यांनेच त्यांना भडकवले होते असे मला वाटत होते पण मी जरा डोके चालवून म्हणालो " बाबूजी, आपने तो कहा था लेटेस्ट पीसी लगाना ?, तो आप किसी से कह के दुसरी जगह से कोटेशन चेक करे की क्या मै जो सामान लाया हूं वह महगां है ?" असे मी बोलल्यावर ते थोडे वरमले व म्हणाले की तु प्रथम सीए नां विचारुन मग सामान खरेदी करित जा पुढे... मी ठीक आहे म्हणालो व लगेच ते वरमले आहेत हे पाहू पगाराविषयी पुन्हा विचारले, त्यांनी परत तेच पालूपद पुढे चालू ठेवले व मागील महिन्याप्रमाणे परत एकदा मला खर्चासाठी काही पैसे हाती दिले तेव्हा मात्र मी थोडा वैतागलोच पण काहीही न बोलता हाती आलेले पैसे घेऊन मी बाहेर आलो व केबीन मध्ये जाऊन विचार करु लागलो की पगाराचे काय ?

मी ह्यावेळी मात्र एक प्लान केला व रवीवारी तडक चारीजींच्या घरी जाऊन पोहचलो व त्यांना नमस्कार करुन त्याच्या समोर जाऊन बसलो, ईकडची तीकडची काही बोलणी झाल्यावर मी लगेच मुद्द्याला हात घातला व म्हणालो, चारीजीं, वहा काम तो बढीयां है पर पगार कभीतक दिया नही है, खर्चा देते रहते है पर पगार नही दे रहे है ना मै कुछ समज पा रहा हूं ना कुछ कर पा रहा हूं" चारीजींना ही ह्यांचे थोडे अप्रुप वाटले की पगार दिला नाही व त्यांनी जिदल साहबांची बोलणी करण्याचे आश्वासन दिले व मी तेथून परत आल्या कार्यालयात आलो.

माझा बाण एकदमच वर्मी लागला होता व संध्याकाळीच घरी मला बोलवणे आले व मी काही वेळातच जिंदल साहबांच्या समोर. माझ्या कडे ते जरा रागानेच पाहत म्हणाले, बेटे मुझे बता मैने तुझे पैसे मना किये है ?तुझे यहा खाना नही मिल रहा है ? रहना अच्छा नही है ? क्या बात है बता दो पहले , तुम सीधे चारीजीचे पास पोहच गये, पहले मुझसे बात करते फिर जाते वहा..
मी त्यांना म्हणालो... बाबूजी मैने तो आप को १० बार कहा होगा पगार के लिए लेकिन आपने कभी सोचा ही नही... दो-चार हजार हात मे रख देते हो... अगले महीने का वादा करते हो.. मुझे भी तो अच्छा नही लगता बार बार तनख्वा के लिए कहना पर मेरी भी मजबूरी है" मग ते म्हणाले ठीक है करता हूं. व परत मला मोकळ्या हाताने पाठवले.

दोन दिवसानंतर मला बोलवले व म्हणाले की तयारी कर तुला अंदमान निकोबार ला जाणे आहे.. मी आनंदानेच हो म्हणालो व लगेच बाहेर आलो व जाऊन शर्माजींना भेटलो व त्यानां सांगितले, ते देखील खुश झाले व म्हणाले " राज बेटा, अच्छा मोका है.. जा थोडा घुम के भी आ तथा व एक तुम्हा रे ही महाराष्ट्र के व्यक्ती है श्री. अनूज पाटील, मस्त आदमी है... परिवार के साथ रहता है वही सबकुछ देखता है वहा.. जा, पैसे की जरुरत हो तो मुझे बता ना"

सगळी तयारी झाली पण मला हे माहीत नव्हते की मी अंदमान ला का जातो आहे.. मी जरा योग्य वेळ पाहून जिदंल साहबांच्या कडे गेलो व विचारना केली, तेव्हा त्यानी मला सांगितले की तेथे काही संगणक खराब आहेत तर काही नवीन सामान लावने आहे कमीत कमी दोन एक महिने तेथे थांबावे लागेल. मी त्या पध्दतीनूसार तेथे फोन करुन जे सामान हवे आहे त्याची लिस्ट तयार केली व ती लिस्ट जिंदल साहबांना दिली व त्यांच्या परवानगीने नेहरु प्लेस ल जाऊन सर्व सामान खरेदी केले व त्या नंतर तीन दिवसांनी मला माझ्या हाती टीकीट दिले गेले ते होते दिल्ली-कलकत्ता-पोर्टब्लेयर विमान प्रवासाचे. मी थोडा घाबरलोच विमान प्रवास व मी. मी परत मदतीची गरज समजून सर्वात प्रथम जिवन सिंगला भेटलो व म्हणालो " जिवन, गुरुदेव जरा मदत करना तथा यह बता दो की आपने कभी प्लेन में सफर कीया है ?" तो ज्या नजरेने माझ्या कडे पाहत होता तेव्हाच मला लक्षात आले की आपण चुकीचा माणुस पकडला आहे, उत्तराची अपेक्षा न करता मी सरळ पवन जींच्या समोर गेलो व तोच प्रश्न पुन्हा विचारला. त्यांनी हसतच मला जवळ बसवले व जवळ जवळ सर्व माहीती मला दिली.

शर्माजींना देखील ह्याची बातमी लागलीच होती व ते मला पाहताच म्हणाले " हा राज बेटे बडा तीर मारा, ९ साल हो गये मुझे यहा झक मारते हुये पर हमे तो ट्रेन से भी कही नही भेजा कंपनी ने पर तुझे तो सिधे हवा मे भेज रही है... हा हा... यार एक काम कर ना, प्लेन में ना जो लडकीयां होती है ना मस्त होती जब वापस आयेगा ना तब बात करेंगे." मी लगेच त्यांना म्हणालो " शर्माजी ... कमसे कम नाम के वास्ते ही सही कुछ शर्म करो... बाबूजी आप भी ना आपकी उम्र देखो... आप की बाते देखो" मग शर्माजी पुन्हा जोर जोरात हसत व म्हणत" तो तुभी बोलना सिख ही गया... यह सब जिंदल की माया है"

पवन जींनी मला विमानतळावर पोहचवले व माझ्या जिवनातील प्रथम विमान प्रवासाला सुरवात होणार होती लवकरच....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: