शनिवार, २७ फेब्रुवारी, २०१०

चिली मध्ये प्रचंड मोठा भुकंप

दक्षिण अमेरिकेतील चिली देशातील कन्सेप्सिअन शहरात आज पहाटे ३ . ३४ वाजता झालेल्या भूकंपाने ७८ जणांचा बळी घेतला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष मायकल बॅचलेट यांनी पत्रकारांना दिली. या भूकंपाची तीव्रता ८.८ रिश्टर इतकी होती.

इमारती हादरल्या आणि राजधानी सॅन्टियागोतील वीजपुरवठाही ठप्प झाला. चिलीतील भूकंपानंतर लगेच चिली आणि पेरू या देशांना , ` पॅसिफिक त्सुनामी केंद्रा ' तर्फे संभाव्य त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. कन्सेप्सिअन शहरापासून ईशान्येकडे सुमारे ९० किलोमीटर अंतरावर भूगर्भात ५५ किलोमीटरवर या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे.प्रचंड मोठा भुकंप झाला आहे, हैतीच्या भुकंपापेक्षा कैक पटीने हा भुकंप मोठा आहे समजले.. कोणाकडे काही बातमी असेल तर येथे द्यावी ही विनंती.* वरील माहीती टाईम्स ऑफ ईडियाच्या सौजन्यांने. त्यांच्या संकेतस्थळावरुन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: