सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१०

माझी सफर........परतीचा प्रवास .... भाग-१५

"राज, आज तुम मुझे सबकुछ बता देना जो तुम हो, तुम महाराष्ट्र के कोल्हापुर से हो यह छोड कर बाकी मुझे कुछ भी पता नही है तुम्हारे बारे में" विभा.
"ह्म्म ठीक है बता हूं" - विभाच्या घरी मी संजना व विभा तथा तीची आई बसलो होतो तेव्हा हा संवाद झाला व जे मी सांगितले तेच येथे मराठी मध्ये लिहीत आहे मी अचानक घर का सोडले ह्याचे उत्तर येथेच सापडेल.

गावाकडची शेती भाऊ बंदकी मध्ये गेली व मी जा घरात जन्म घेतला ते घर वडीलांच्या मित्रामुळे लिलाव झाले होते व ह्याच दुख:त वडील जे कमवू लागले ते दारु मध्ये घालवू लागले व त्यांचे माझ्यावरील प्रेम कसे व का हे माहीत नाही पण अटू लागले व मला लहानपणा पासूनच प्रचंड मार व शिव्या मिळू लागल्या, जसा जसा मोठा होत गेलो तसा तसा मी प्रचंड रागीट व उच्छःदी बनू लागलो घरी जो मार मिळायचा त्याचे समाधान मी सकाळी ८ला बाहेर जाणे व रात्री १० नंतर घरी येणे ह्या नियमामध्ये मिळाले, कारण सकाळी मी उठायच्या आधी बाबा बाहेर कामावर व मी रात्री घरी येण्याआधी झोपी गेले असायचे व आमच्या मधील संवाद संपला तो संपलाच. पण आमच्या दोघाच्या लढाई मध्ये बिचारी आई नेहमी आग का विस्तव अश्या प्रकारात राहू लागली बाबाची बाजू घेतली की मी नाराज व माझी घेतली तर बाबा नाराज. आमच्या तिघांना जोडणारा दुवा माझी लहान बहीण अक्का, ती मला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असे माझ्या हून ती लहान दोन वर्षाने. वयाच्या दहाव्या वर्षीच मी पहील्यांदा पळून गेलो पण दोनच दिवसांनी मला माझ्या मित्राच्या गावावरुन पकडून आणले व बाबांनी मला न मारता शिव्याच शिव्या देऊन मला पळुन जाण्याचे बक्षीस दिले ते एक वेळचे जेवण बंद.

माझ्यात व घरामध्ये दुरी वाढूच लागली व घरापासून दुर राहण्याचा प्रयत्न करु लागलो, पण शाळेत झालेल्या मुलीच्या लफड्यात बाबांना शाळेत यावे लागले व मला पुन्हा प्रचंड मार पड्ला व मी पुन्हा पळुन गेलो.
दोन एक महीने कोल्हापुरातच राहीलो शाळेत गेलो पण घरी गेलो नाही पंचगंगेच्या काठीच राहीलो. अश्यातच मला पुन्हा समजावून घरी आणले गेले व मला एके जागी कामावर लावले गेले पण माझे प्रताप पाहून मला कामावरुन कमी केले, त्यातच माझ्या व्यसनांची गोष्ट घरी कळाली व मला पहील्यांदा घरातून बाहेर काढले दोन एक वर्ष मी सांगली व कोल्हापुर येथेच फिरत राहीलो व वयाच्या १७ व्यावर्षी स्नेहा, संगणक संस्था हे प्रताप केले पण किरण ने संस्था बंद करुन माझे सर्व मार्ग बंद केले होते. मनाचा हिय्या करुन घरी गेलो तर बहीण पुढील शि़क्षण व्यवस्थीत व्हावे ह्यासाठी मामाच्या घरीच राहत होती व बाबानीं मला पाहील्यावर परत माझा उदो उदो केला व आई काहीच न बोलता गप्प उभी राहील व मी तडत रेल्वे स्टेशन गाठले व सरळ मुंबई ला पोहचलो... (ह्या पुढिल सर्व गोष्टी माझी सफर च्या १४ भागात आहे )

विभा म्हणाली " राज, तुने कभी ट्राय कीया है घर फोन करणे का ? घरवालों को खोज ने का ? उन्हें बाताया की तुम यहा हो ? " मी सर्वच प्रश्नांची उत्तरे नकारामध्ये दीली व मी सरळ विषय संपवायला सांगितला.

पण विभाच्या प्रश्नांनी मी विचारचक्रामध्ये अडकलो व खुप दिवस विचार केल्यावर मी सर्वात प्रथम स्नेहाच्या घरी फोन लावला, माझे नशीब चांगले होते ती बाळंतपणासाठी घरी आली होती व मी तीला सर्व काही सांगितले व मार्ग सांग असे म्हणालो. ती म्हणाली " राज, तु काळजी करु नकोस मी पाहते प्रयत्न करुन , करते थोडी शोधा शोध व मी तुला कळवत जाईन काय घडले ते ठीक आहे, उगाच काळजी करु नकोस कामात लक्ष दे व काम करत राहा." स्नेहाच्या ह्या आश्वासक बोलामुळे मला अधार मिळाल्या सारखे वाटले.

घरी जाण्य़ाची आई वडीलांना, अक्काला भेटण्याची माझ्या मनाला हुरहुर कधीचीच लागली होती पण मी माझे मन कोणासमोर असे मोकळे केलेच नव्हते कधी. स्नेहा ने खुप शोधा शोध करुन पाहीले पण तीला काही माझ्या घरच्यांच्या विषयी माहीती भेटलीच नाही. मी प्रचंड निराश झालो व कामावरुन लक्ष उडू लागले, प्रचंड तनावामध्ये मी दोन-तीन महीने काढले व पुन्हा स्वत: कोल्हापुरला जाऊन शोध घ्यावा ह्या विचारावर मी आलो.

मी कोल्हापुर जाण्यासाठी तयार झालो व कंपनी मधुन सुट्टी मंजुर करुन घेतली व मी कोल्हापुरला जाण्यासाठी मुंबईला आलो.... १२ वर्षाने पुन्हा महाराष्ट्रात, त्याच मुंबई मध्ये जेथून मी महाराष्ट्रातून बाहेर पडलो होतो त्या मुंबई मध्ये.

सकाळ सकाळी गाडी कोल्हापुरात पोहचली व मी सरळ सयाद्री मध्ये एक रुम बुक केली व अघोळ करुन सरळ पहील्यांदा महालक्ष्मी मंदीरामध्ये गेलो व मातेचे दर्शन करुन जेथे आम्ही रहात होतो त्या जुन्या पेठेत, गल्लीमध्ये पोहचलो....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: