बुधवार, ३० सप्टेंबर, २००९

आज मार्केट १७०००

आज मार्केट १७००० च्यावर गेले....

अनेक ज्योतीषी / चॅनेलवाले बोंबलत होते की मार्केट ह्या महिन्यात नक्की पडणार पण.. असल्या लोकांच्या नाकावर टिच्चुन मार्केट ने भरारी मारली... मज्जा आली !

आता काही प्रश्न !

ह्या ज्योतिष्यांचे काय करावे ?

ह्या टिव्ही वाल्यांचे काय करावे ?

जरा काही झाले की मार्केट पडणार... तो मंगळ वाकडा झाला.. तो राहु कुठे तरी घुसला तर म्हणे वाट लावणार... तरी मार्केट वर आलेच ना ?

भले आता खाली जाऊ दे.. पण खाली जाणे गरजचे असते कचरा साफ होतो त्याला करेक्शन असे म्हणतात... कारण भक्कम पाया असला की इमारत चांगली उभी राहते छोटी मोठी वादळे मग काही करु शकणार नाहीत वाकडे त्याचे.... पण हे मार्केट पडणार म्हणून बोंबलणारे कुठे गेले आज काल ;)


जरा या ह्या धाग्यात व कुठे चुकला ते सांगा.... ;)

*

सुरवात माझ्यापासून.

माझे ही मत होते की जेव्हा मार्केट १६००० -१६४०० च्या आसपास येऊल तेव्हा एक करेक्शन होईल व मार्केट परत १५०००-१५००० च्या आसपास जाईल पण FII's ने फुल्ल खरेदी केली व त्यामुळे... बाकीच्यांनी पण.. व मार्केटला चांगलाच सपोर्ट दिला त्यात आपले काही चांगले मुद्दे पण होते जसे.. काही कंपण्यांनी चांगला रिझर्ट पण दिला... व सामान्य गुंतवणूकदार मार्केटमध्ये खरेदीवरच जोर देऊन राहिला व त्यामुळे मार्केट वरच राहिले !

माझा अंदाज येथे चुकला मला वाटलं होते की FII's आपली गुंतवणूक १६००० नंतर काढुन घेतील... व नंतर खरेदी करतील पण त्यांनी स्पेशल जबरा खरेदीच केली :(
पण चांगलेच झाले !

माझी सफर... भाग १

घर तर सोडलेच होते, काय करावे काय नको हेच कळत नव्हते, कसा बसा प्रावास करत मुंबई रेल्वे स्टेशन वर पोहचलो, व विचार करत एके जागी बसलो, काहीच कळत नव्हते तेव्हाच अचानक एक १४-१५ वर्षाचा मुलगा चाय चाय असे ओरडत माझ्या समोरुन गेला मी विचार केला अरे यार जगात काही ही काम करुन जगता येते आपण तर थोडेफार शिकलो देखील आहोत काही हरकत नाही करु काही ही काम करु पण घरी परत जायचे नाही हा ठाम निश्चय. हा विचार केल्या वर समोर जाण्यासाठी तयार रेल्वे पाहीली व त्यात जाऊन बसलो ना टिकीट ना टिकीटाची काळजी. ईकडे तीकडे पाहीले जी जागा मिळाली तेथे जाऊन बसलो जरनल चा डबा तो गर्दी खचाखच, रेल्वे सुटली कोठे जात आहे कोठे जाऊन थांबेल काहीच माहीत नाही, जसावेळ गेला तसे ईतरांच्या बोलण्यातून लक्षात आले की ही ट्रेन तर कलकत्ताला चाललेली आहे.
तीन दिवसाच्या थकलेल्या , उपाशी प्रवासानंतर हावडा स्टेशनवर गाडी थांबली... टिकीट कोणी विचारलेच नाही ह्या खुशीत बाहेर पडणार ईतक्यात टिकीट तपासणारा माझ्या समोर
तो . - "टिकीट दिखा"
मी . - " नाही आहे"
तो. - "क्या.. शहर में नया है क्या छोरे.. चल बडे बाबू के पास चल"
मी थोड्या फार गयावया केला माफी मागीतली पण तो बिचारा काय करणार त्याला कळायला हवे ना मी काय बोलतो आहे ते ? ना धड मराठी ना धड हिंदी... चित्रपट पाहून पाहून जेवढे हिंदी येत होते त्यावर त्याचे समाधान झाले नाही... बडे बाबू जवळ गेलो तर तो बिचारा रात्री होणा-या पार्टीची काळजी करत फोन वर बोलणी करत होतो, टिकीट तपासणा-याने माझ्या कडे बोट दाखवले व म्हणाला "टिकीट नही है इस के पास" बाबू ला काय झाले काय माहीत व त्या टिकीट तपासणा-याला बंगाली मध्ये काहीतरी सांगीतले व चक्क मला जाऊ दिले.. मी देवाचे आभार मानले व रेल्वे स्टेशन च्या बाहेर आलो, इकडे तीकडे पाहीले काहीच समजेना नवीन जागा, नवीन शहर, नवीन लोक, नवीन भाषा.. कोणाला विचारावे तर काय विचारावे हा देखील प्रश्न पडला होता, गेट मधून बाहेर आलो ईकडे तीकडे फिरत हुगली नदीच्या फुलावरुन {ब्रीजवरुन} जाताना लक्षात आले की अरे हा तर लोखंडाने तयार केलेला आहे {हाच तो जग प्रसिध्द हावडा ब्रिज}, तेथेच जरा बाजूला बाकड्यावर बसलो व वरुन खाली वाहणा-या पाण्याकडे तर कधी तेथून जाणा-या गाड्याकडे पाहत विचार करु लागलो आपण येथे आलोतर आहोत पण ना कोणी ओळखीचे ना जाणकार ना काही माहीती कसे करावे ? काय करावे ? तो समोरून एक संतांचा दल जाताना दिसला व मी नकळत त्याच्या पाठी मागे चालू लागलो माझ्या सारखे असंख्य लोक त्यांचा पाठीमागे चालले होते त्यात मी एकदम मिसळून गेलो कोणाला काहीच गरज नव्हती की मी कोण , येथे का व ह्या संताच्या मागे कुठे चललो आहे... त्यांना सोडा मलाच खबर नव्हती की मी कुथे चाललो आहे..

ती संतांची टोळी प्रवास करत कलकत्ताच्या बाबू घाटावर विसावली, तेथेच शेकडॊ मंडप लागले होते , असंख्य लोक, साधू महाराज ह्यांचा जमावडा लागलेला होता कोणी मोठमोठ्या आवाजात श्री श्री ह्यांचा विजय घोष करत होता तर कोणी आरती ... मी थोडा विचार केला तर ल़क्षात आले की हा तर एक जत्रेचा प्रकार दिसतो आहे मी इकडे तीकडे पाहत त्या जत्रेमध्ये घुसलो.... एक दोन फलक व बोर्ड लावले होते त्यातून असे लक्षात आले की ही सर्व मंडळी गंगासागर यात्रेसाठी येथे जमली आहेत व येथून गंगासागर -८०-९० किलोमीटर वर आहे तेव्हा हा त्यांचा पडाव आहे, साधू , सन्यांशी व महाराजांच्या तसेच भक्तांच्या जेवणाची सोय देखील अनेक मंडळांनी, संस्थेनी व मोठ मोठ्या कंपन्यानी केलेली होती.
फिरता - फिरता एकदमच एका मांडवाचे नाव वाचून थबकलो "विश्व हिंदू परिषद -कलकत्ता" अरे हे नाव तर कुठेतरी वाचलेले आहे... ह्म्म अरे कोल्हापूर ला नेहरु बागेत सकाळ सकाळी काही मंडळी येत नव्हती का फिरायला त्यातले जगताप काका परिषद वालेच ना... मी सरळ आत गेलो व समोर पांढ-या शुभ्र कपड्यामध्ये बसलेल्या वडिलधारी मानसाला नमस्कार केला व म्हणालो " बाबू जी थॊडा भुकां हूं कुछ काम मीलेगा ? काम के बाद खा ना देना " तो एकदम विचित्र नजरे ने माझ्याकडे पाहू लागला व किंचित सा हसतच बोलला " अरे बेटा, यहा तो सबको खाना बट रहा है जा तु भी खा ले , खाने के बाद मेरे पास आना"

जेवण झाले व मी त्यांच्या जवळ जाऊन आभार प्रकट केले, त्यांनी आपुलकी ने माझी माहीती विचारुन घेतली व एक फोन लावला थोड्यावेळा ने फोन ठेवत म्हणाले "कोई बात नही बेटा, ले फोन , पहले अपने घर फोन करो तथा घरवालोंको बता कि तु ठीक ठाक है तथा यहा विश्व हिंदू परिषद के कार्यालय मै रह रहा है".. मी त्यांना कसेबसे समजावले व म्हणालो जो पर्यंत काही बनत नाही तो पर्यंत घरी फोन नाही करणार. त्यांनी जास्त ओढावे न घेता तो विषय सोडुन दिला व म्हणाले " बेटा, तुम यही रहो हमारे साथ कुछ दिन यह गंगासागर यात्रा खत्म होणे के बाद तुम्हारी व्यवस्था कर देंगे कही ना कही.. मेरा नाम विजय दिवेदी है... तुम मुझे विजय जी कह सकते हो या फिर दिवेदी जी तुम्हारी मर्जी " व हसत आपले काम करु लागले.
तो दिवस होता ३ जानेवारी चा व १४ जानेवारी पर्यंत यात्रा संपणार होती तो पर्यंत मी मनपूर्वक दिवेदी जी सांगतील ते काम करु लागलो त्यांनी थोडे फार प्रयत्न करुन माझ्या साठी एका दुकानातून काही शर्ट व काही कपडे आणले व तेथेच एका बाजूला माडवात माझी राहण्याची व्यवस्था करुन दिली. जेवण देण्याचे व खास खास साधू महाराजांना आवश्य असे फलाहार देण्याचे काम मी पाहू लागलो, पण जे साधू संत माझ्या वाटणीला आले ते नागा साधू { हे प्रचंड कडक पध्दतीने व अवघड अशी तपस्या करतात व हे हिमालयातून फक्त गंगासागर यात्रेसाठी च शहरी वस्तीवर येतात} ह्यांना जास्त काही लागतच नव्हते काही केळी व सफरचंद दिले की माझे काम संपले, तर मग फावल्या वेळेत कुठे पाचजन्य मासीक वाच तर कूठे दिवेदीजीं ना विनंती करुन काही वर्तमानपत्रे वाच हे करु लागलो, माझी वाचण्याची आवड पाहून दिवेदी जी आपल्या ग्रंथ संग्रहातून काही पुस्तके माझ्या हाती दिली त्यातूनच मी विश्व हिंदू परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख करुन घेतली व मला ही ह्यांच्या कार्यामध्ये ओढ वाटू लागली दिवेदी जी च्या जवळ मोकळा वेळ भेटला तर हूगली नदीच्या तीरावर बागेत फिरता फिरता ते मला असंख्य गोष्टी सांगत ज्यामध्ये हेगडेवार जी, सावकर जी व सध्याची देशाची गरज हे विषय प्रमुख असत, मी बोलता बोलता एक दिवस त्यांना एकल विधालया विषयी विचारले व त्यांनी मला त्यावर त्यांच्या कडे उपलब्ध असलेली पुस्तके व कात्रणे वाचण्यासाठी मला दिली.

दिवसामागून दिवस गेले व यात्रा संपली { १४ जानेवारी संक्रातीचा दिवस} गंगासागरच्या तिरावर मी दिवेदी जी जेव्हा शेवटी पोहचलो तेव्हा ते मला म्हणाले "राज बेटा, आज स्नान कर ना यहा, बहोत पुन्य मिलेगा, तुम्हारे सातो जन्म सफल हो जायेंगे, जो कुलपुरुष भगवान द्वार गये है उन्हे भी आज तु नहा कर मुक्ती कर देगा..... सात धाम बार बार गंगासागर जिवन मैं एक बार ... लोग यहा आने के लिये तरसते है मन्नते मांगते है लेकिन तुम भगवान की दया से अपने आप यहां आ गये हो...जा नहा ले " एक दम भारावलेल्या अवस्थेत मी गंगा नदी व सागर ह्यांचे मिलन संगमाला आपल्या डोळ्यात साठवून घेतले व गंगेचे पाणी डोक्यावर घेता ना एकदम स्वर्ग सुखाचा आनंद भेटला, ज्या नदी विषयी शालेय जिवनात, आजीच्या गोष्टीमध्ये, महाभारतामध्ये वाचले त्या नदीचे पाणी आज आपल्या भाग्यामध्ये देखील आहे हा विचार करुन सुखावलो पण पुढील काय माहीत होते की ह्याच नदीच्या सानिध्यात मला माझ्या जिवनातील अत्यंत महत्वाचे वर्ष काढायचे आहे... देवाची करणी कोल्हापूरातील एक गल्ली मधून देखील एकटा कधीच बाहेर न पडलेला मुलगा ईतक्या दुर देशाच्या दुस-या टोकाला येथे गंगासागर पर्यंत पोहचला. शक्यतो दिवेदी जी नी माझ्या मनातील विचार ओळखले व हळुच माझी पाठ थोपटत म्हणाले " बेटा, जिवन तो अभी शुरु होगा तुम्हारा.... चल परसो तुम्हे ... जहा जाना है वहा का नाम सुनते ही तुम्हारे शरीर पे रोंगटे खडे हो जांयेंगे .... पता है तुम्हे कहा जाना है ? तुम परसो की ट्रेन से "अयोध्या" जाओगें वहा तुम्हे श्री राजीव शर्मा मिलेंगे कार्यालय में ठीक है "

१८ जानेवारी ला मी दिवेदींजी च्या परवानगीने कलकत्ता च्या काली मंदीराचे दर्शन घेऊन आलो व संध्याकाळी त्यांचे आशिर्वाद घेऊन कानपुर ला जाणा-या गाडीमध्ये बसलो.... कोल्हापुर ते मुंबई ते कलकत्ता ते फैजाबाद हा माझा सफर .... पण ह्या सफरीने माझा जिवनाला एक वेगळाचा अर्थ प्राप्त करुन दिला. २० तारखेला फैजाबाद रेल्वे स्टेशन वर उतरलो व जवळच असलेल्या अयोध्या नगरी साठी वाटचाल करु लागलो... जेव्हा प्रथम पाय अयोध्येमध्ये ठेवला तेव्हाच दिवेदींचे वाक्य आठवले " शरीर पें रोंगटे खडे हो जायेंगें" व खरोखर अंगावर काटे उभे झाले होते... मी अयोध्या नगरीमध्ये पोहचलो...

क्रमश:

सोमवार, २८ सप्टेंबर, २००९

माझं कोल्हापुर - भाग १

एन एच ४, शिरोळ- सांगली नाक्यावरुन दोन-तीन किलोमिटर दुरवर पंचगंगेच्या ब्रीज नंतर एक उजव्या बाजुला एक कट आहे, तेथेच कोप-यावर तावडे हॊटेल कधी काळी हे टपरी वजा हॊटेल एनएच ४ वरील एक प्रसिध्द जागा. तेथून वळण घेतल्यावर जरा पुढे गेले की आता कमान आहे जी सध्याच म्हणजे आठ-नऊ वर्ष झाली उभी करुन जी महापालिकेने उभारली आहे, लोकमत, पुढारी किंवा तस्म कुठलातरी वर्तमानपत्राची अथवा कंपनीची जाहिरात तुमचे स्वागत करेल, आजूबाजुला शेती व थोडे पुढे गेले तर कोल्हापुर जकात नाका व तुमचा प्रवेश करवीर नगरी, महालक्ष्मीचे निवास स्थान, पैहलवानांची नगरी, कलानगरी कोल्हापुरमध्ये प्रवेश.

सुरवात तर मी कुठून ही करु शकतो पण कोल्हापुर म्हणजे माझा घरं, तेव्हा कधी काळी कोल्हापुर मध्ये आम्ही राहत होतो शिवाजी पेठ मध्ये तेथून सुरवात ! दिपक आईस्क्रमि, जो शिवाजी पेठेच्या आसपास राहिला असेल त्याला हे नाव माहीत नाही असा विरळाच ! प्रकाश रणदिवे, कोकाट्यांची गल्ली, कोल्हापुर हा पत्ता व त्याच्या शेजारी एका खोली मध्ये आमचं घरं ! एका कोप-यात स्टोव्ह व स्वयंपाकाचे सामान, एका कोप-यात तिजोरी व तिजोरीवर हंथरुन पाघंरुन. बसायला चटई व एका बाजूला अक्काचा पाळणा, कधी मी त्या पाळण्यात मी देखील झुललो असेन, आज ही तो पाळणा घरात आहे, आता त्यात माझा सर्वात लहान भाचा झुलतो आहे. बाबा एका कपड्याच्या दुकानात कामाला जात, आई सांगते जेव्हा अक्का जन्मली होती तेव्हा बाबांचा पगार चाळिस रुपये होता, मला विचित्र वाटायचे चाळीस रुपयात कसे काय त्यांनी घर चालवले असेल.

कधी काळी पडद्यावर चित्रपट पाहीला होता तो प्रथम येथेच शिवाजी पेठेत, गणपतीला अथवा दिवाळीला सर्व जण वर्गणी काढून पडदा चित्रपट लावत, दोन खांब व त्याच्या मध्ये भला मोठा पडदा. पब्लिकला दोन्ही बाजूला बसायची सोय. एका बाजूला प्रोजेक्ट्रर. व संध्याकाळी ७.३० नंतर अंधार पडू लागल्यावर चित्रपटाला सुरवात, मिथूनचे डान्स डान्स, जी-९ व तस्म चित्रपट मी येथे पाहीले. ह्याच शिवाजी पेठेच्या जवळ मंगळवार पेठेत आमची नुतन मराठि विद्यालय शाळा, तेव्हा ती बालवाडी ते सातवी पर्यंत होती, शक्यतो आज ही सातवी पर्यंतच आहे, त्याच्या समोर नुतन मराठी हायस्कुल, पण आमची शाळा म्हणजे विद्यालय. एका जुनाट वाड्यामध्ये असलेली शाळा, खासबाग मैदानाच्या एकदम पाठीला बाजूला.

रस्त्यावरुन पाहीले तर एकाद्या वाड्यासारखीच दिसणारी शाळा, चार बाय चार फुटाचा एक बोर्ड मेन रोड वर शाळेचा. थोडे आत गेले की कमानी जवळच एक जुना शोभे यात्रेचा भला मोठा रथ जो काम करत नव्हता शक्यतो, अथवा मी त्याला कधी मिरवणुकीमध्ये पाहिला नाही त्यामुळे मला वाटते की तो कार्यरत नसावा, भला मोठा लाकडी दरवाजा जसा गढ / किल्यावर असतो तसा त्यातून आत गेले कि डाव्या बाजूला हेडमास्तरांचे ऑफिस व तेथेच स्टाफरुम. उजव्या बाजुला, पाचवी, सहावी व सातवीचे वर्ग व त्यांच्या तुकड्या, दोन मंजली बिल्डींग वजा वाड्यामध्येच, तेथून जरा पुढे गेले की पुन्हा एक गेट व त्या गेट नंतर छोटेखानी पटांगण (अगदीच छोटे असे कुणाच्या तरी घराबाहेरील अंगण असावे) हीच आमची मधल्या सुट्टीतील हक्काची जागा, येथे एक मोठी ओसरी वजा हॉल लाकडी खांब असलेला व त्या हॉलच्या वरती भुत आहे अशी वावडी त्यामुळे कधीच गेलो नाही, पण नंतर नंतर कळाले जेव्हा मी सातवी मध्ये आलो तेव्हा की ते शाळेचे गोडाऊन व स्टोअर रुम होती. त्या पटागंणामध्ये एक पाण्याची टाकी. येथेच आमची सकाळची प्रार्थना व शाळेचे विविध कार्यक्रम होतं.

तेथून जरा पुढे गेले की एका दरवाज्यातून आत गेल्यावर वाडाच्या मागच्या बाजूला नवीनच बांधलेली पत्राचा शेड असलेली शाळा बालवाडी ते पाचवीच्या मुला मुलींची. आता सर्व॑ काही शिक्षकांची नावे आठवत नाहीत, काही आठवतात, देसाई सर, पाटिल सर, जाधव मॅडम, निकम मॅडम.. असेच दोन चार.

आमच्या घरापासून शाळा जास्त लांब नव्हती असेल दोन-तीन किलोमिटर वर, आधी आधी आई सोडायला येत असे, नंतर आम्ही जवळ पासची मुले-मुली मिळूनच जाऊ लागलो, सगळेच गल्या-दोन गल्या सोडून राहत असतं, आमच्या मधील मोठी मुले दादागिरी करत आम्हाला शाळेत पोहचवत व परत घेउन येत. माझ्या आई कडे माझा लहानपणाचा फोटो आहे, त्यात मला पाहिल्यावर तर मलाच जाम हसू येतं, पाठीला दप्तर, काखेत पाणी पिण्याची छोटीशी बाटली.. त्या बाटलीला गळ्यात अडकवण्यासाठी पट्टा होता... तिला काही तरि म्हणत आता आठवत नाही आहे, पांढरा हाफ बाजूचा शर्ट व खाकी चड्डी व चड्डीवर लाल रंगाचा हुकवाला बेल्ट. तेल डोक्याला चापून लावलेले, कपाळावर गंध व डोळ्यात काजळ, कधी कधी मला विश्वास बसत नाही की तो माझाच फोटो आहे ह्यावर.

त्यावेळी आमच्या दप्तरामध्ये एक लाकडी पाटी, चार-पाच चुन्याच्या पेन्सिली व काही रंग बिरंगी खडू, एक अंकलिपीचे पुस्तक व जेवणाचा स्टिलचा छोटासा डब्बा. वही, पेन असली थेरं आम्ही पाचवीत आल्यावर चालू झाली. पहिली ते पाचवी पर्यतंची मुले / मुली खालीच बसत चटई वर समोर एक लाकडी फळा व त्याच्या बाजूला एका पट्टी वर बाईची छडी व फळा फुसायचा कपडा.. कधी कधी डस्टर. अ ब क ड येथेच गिरवलं व बे एके बे पण येथेच शिकलो, शिकण्यात तरबेज होतो पण उनाड खुप त्यामुळे शिक्षणाकडे लक्ष कमी व दंग्यात जास्त, तरी ही मी पहिली ते पाचवी पर्यंत सलग पहिला व दुसरा नंबर घेत असे शाळेत.

शाळेत दंगा खुप केला, कधी कुणाला मार, कधी मुलींची वेणी ओढ, कधी कुणी पाटी वर लिहलेले फुस, कुणाला चिमटा काढ, कुणाचा डब्बा पळव, दप्तर बाहेर फेकुन दे तर कधी वर्गाचा दरवाजा बाहेरुन बंद कर... असेल अनेक धंदे मी शाळेत असताना केले होते, दर दोन आठवड्यानंतर मला आईला शाळेत घेऊन यावे लागते कारण माझी कंप्लेट. पण तरी मॅडमचा / सरांचा माझ्या खुप जिव कारण मी हुशार. मला कधी कधी रावळगाम चे चॉकलेट तर कधी डब्यातून आणलेली पोळी कुणी ना कुणी देतच असे.

पहिली ते पाचवी ही पाच वर्ष भुरकन संपली, व आम्ही मोठे झालो कमीत कमी मॅडम तर आम्हाला हेच म्हणायच्या, दंगा करु नका आता तुम्ही मोठी मुलं झाला आहात तुम्ही पाचवी आहात. जेव्हा पाचवीत आलो तेव्हा मला आठवतं, महाद्वार रोड वरुन मी आई, बाबा व अक्का जाऊन माझी पुस्तके, वह्या व पेन घेऊन आलो होतो, व घरात बसून बाबांनी संध्याकाळी त्या सर्व पुस्तकांच्यावर , वह्यांच्यावर वर्तमानपत्रांचे कवर घातले होते व पेन ने प्रत्येक पुस्तक / वही च्या पानावर जय जिनेन्द्र व ओम लिहले होते. किती तरी दिवस मी ती पुस्तकांना व वह्यांना अक्कालाच काय पण बाबांना पण हात लावू देत नसे, सदा सर्वदा दप्तर माझ्या जवळच असे.

मधल्या सुट्टीत गोट्या खेळने अथवा विटी दांडू, हा रोजचाच कार्यक्रम. गोट्या खेळताना दंगा जास्त होत असे, अंगठा जमीनीवर टेकवून मधल्या बोटाने समोरची गोटी उडवली की एकदम गलका होत असे, व मग कुठले तरी सर, मॅडम आम्हाला तंबी देत व आम्ही गप्प रे गप्प रे चा परत गलका करु, मग कोणी तरी पाठीवर दणका दिल्याशिवाय तोंडे बंदच होतं नसे. विटी दांडू खेळताना कधी कुणाला लागली तर कुणाच्या डोळ्याला लागली असं झालं की मग जे जे खेळत होते त्यांना पायाचे अंगठे धरुन शाळा सुटू पर्यंत उभे राहण्याची शिक्षा मिळत असे, मोठी मुले, व्हालीबॉल, फुटबॉल बाहेर रोड वर खेळत व आम्हा लहान मुलांना शाळेच्या आवारातच खेळण्याची परवानगी होती, मुली आपल्या कंचाकैऊडी अथवा लंगडी असले काहीतरी विचित्र खेळत व आमच्या पैकी कोणी तरी मग जी लंगडी घालत असे तिला धक्का देऊन येत असे.

क्रमशः

रविवार, २७ सप्टेंबर, २००९

आज वीर शहिद भगतसिंग ह्यांचा जन्मदिवस !
ह्या वीराला शत शत नमन !
*
सरकारला तर कधीच विसर पडला आहे ह्या शहिदाचा पण जनतेला ही त्याचा विसर पडावा हे दुर्भाग्य !
ह्या शहिदाचे विस्मरण होऊ नये म्हणून आपण काय करु शकतो ह्या बद्दल आपण येथे चर्चा करु ह्या भावनेने हा धागा सुरु करत आहे....!

भटकंती तिसरा स्टॉप - दिल्ली -११०००६

दिल्ली पीनकोड ६ भाग असेलही असा, पण बाकी दिल्लीत तो असा बेटासारखा राहू शकेल का? - मनिष ह्यांचा एक प्रतिसाद. हे वाचल्यावर मनात आलं की चला जरा मिपा करांना दिल्ली-६ ची सफर घडवू या. दिल्ली-६ चित्रपटात दाखवलेला भाग हा दिल्ली-६ चा नाहीच आहे, पोलिसांनी व सरकारने सुरक्षतेचे कारण करुन दिल्ली-६च्या टिमला शुटिंग करुच दिलेले नव्हते, त्यांनी दिल्ली पासून दुर राजस्थानमधील एका लोकेशनवर ते शुटींग केले आहे काही भागाचे.

***


चांदणी चौकचा परिसरजुन्या काळातील चांदणी चौकचा परिसर


लाल किल्याच्या लाहोरी गेटच्या समोरील भाग म्हणजेच दिल्ली-११०००६.
दिल्लीतील सर्वात प्रसिध्द असा चांदणी चौकचा परिसर. जवळ ३०० वर्षापुर्वी वसलेला हा दिल्लीचा भाग एक महत्वपुर्ण भाग. भारतातील प्रमुख धर्म तुम्हाला येथे प्रामुख्याने पहायला मिळतात, हिंदु, जैन, मुसमान, ख्रिच्चन व सिख. येथे ह्या धर्माची श्रध्दास्थाने देखील जवळ जवळच आहेत. शंकर मंदिर, रामलिला मैदान, जैनांचे लाल मंदिर, जामा मसजिद व सिखांचे सिसगंज गुरुद्वारा , ख्रिच्चनांचा चर्च, हे मुख्य नाही तर दोन किलोमिटरच्या परीसरातील मंदिरे व धर्मस्थळे ह्यावर लिहायला बसले तर एक चांगला मोठा लेख तयार होइल इतकी त्यांची संख्या.
ज्यांना दिल्लीची गर्दी अनुभवांची आहे त्यांनी येथे एक चक्कर जरुर मारावी, प्रचंड गर्दी, गोंधळ व धावपळ, मध्येच सायकल रिक्षावाले.. बाजूला ओरडणारे फेरीवाले.. मंदिरातून.. येणारा घंटानाद, मसजिद मधून येणारी प्रार्थनेची बांग, गुरुद्वारातून येणार एक ओंकार.. सगळे एकसाथ एक वेळ चालू असतं, सकाळी ७ वाजल्या पासून येथील रस्ते भरुन जातात ते मध्य रात्रीपर्यंत हलचल चालूच असते.
ह्या भागाचं एक वेगळे पण म्हणजे ज्या धर्माचा सण आहे त्या धर्माच्या रंगात हा भाग नाहून निघतो.. शिवरात्री असो वा दिवाळी.. सगळी कडे त्या दिवसाच्या निमित्याने व्यापार होतो... ईद असो वा गुरु दिन तोच रंग तुम्हाला दिसेल. भरीस भर म्हणून जगप्रसिध्द २६ जानेवारीची परेड चा रुट देखील येथून जातो. समोरच असलेला लाल किल्ला व धर्मस्थळे ह्यामुळे येथे येणा-या पर्यटकांची संख्या अफाट असते. मी कधी ही तीकडे गेलो तर मला नेहमीच त्या जागेचे काही ना काही तरी वेगळे पण जाणवतं, येवढ्या धर्माचे, भारतातील कानाकोप-यातून आलेला समुदाय ह्या इवल्याश्या जागे मध्ये कसा समावला असेल, अरुंद बोळ, गल्ल्या, एकदम शतकापुर्वीच्या पध्दतीचे दोन-तीन मंजीली इमारती, त्या इमारतीवर असलेल्या बरसाती, गल्ली बोळातून लोंबकळणा-या तारा.. आडवे तीडवे खांब, रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसलेले फेरीवाले.. छोटे दुकानदार, खाण्यापिण्यांची असंख्य दुकाने, पराठेवाली गल्ली, नटराज दहि-भल्ले, सर्वत्र पसरलेला अतराचा सुगंध.. सगळं विचित्र वाटतं तरी ही कुठंतरी आपण पण त्याच गर्दीचा , त्याच वातावरणाचा भाग झालेलो असतो.शहाजहानची सर्वात मोठी मुलगी जहांआरा साठी निर्माण करण्यात आलेला हा सराय (परिसर) सुंदर गार्डन व एतिहासिक वास्तूनीं नटलेला हा भाग खरं तर लाहोरी गेट पासून फतेपुर मसजीद पर्यंत जाण्यासाठी तयार केलेला मार्ग. हा चार भागामध्ये विभाजित केलेला आहे १. उर्दु बझार, २. फुल मंडी ३. जैहरी बझार / असर्फि बझार ४. चादंणी चौक. येथे इंग्रजांनी बांघलेला एक ११० फुट घंटाघर (घड्याळ टॉवर) बांधलेला होता तो १९५१ मध्ये पाडून मार्केट साठी जागा वाढवली गेली. हा भाग मला वाटतं भारतीय इतिहासाचा एक मुक साक्षीदार आहे, मुघल राजांनी केलेल्या हत्या, गुरु तेगबहाद्दुर ह्यांचे केलेले सिर-कलम व अनेक गोष्टी ह्या भागात घडल्या, पण तसाच हा भाग भारतीय स्वातंत्र्यातील अनेक मोठ मोठ्या घडामोडीला देखील साक्षीदार आहे.येथे काय नाही मिळत, कपड्यापासून ते इलेक्टॉनिक वस्तू पर्यंत, चादरी पासून ते मखमली कालिन पर्यंत सगळे विकले जाते, खाण्यापिण्याच्या वस्तूची तर येथे रेलचेल आहे, पण येवढं सगळं असताना ह्या भागाचा विकास का नाही झाला, माझ्या नजरेने जे पाहीले त्यानुसार ह्या ला जबाबदार काही अंशी सरकार जरी असले तरी देखील येथील गर्दी व तंग रस्ते ह्यामुळे सरकारला काही ही करायला तयार होत नसावी, मी एकदोन जणांशी जेव्हा ह्या बद्दल बोललो ते ते म्हणाले "राज, दिल्ली का दिल है यह.. एक दिन भी यहा काम रुक गया तो समजो दिल्ली रुक गई." एका अंशी हे खरं वाटतं. खरोखर दिल्ली -६ हे दिल्लीचे दिलच आहे, जर दिल्ली जाणून घ्यायची असेल तर एकदा का होईना दिल्ली-६ ला भेट दिलीच पाहीजे.


सिसगंज गुरुद्वारा
* सर्व फोटो महाजालावरून सभार.

रम्य सकाळ !

शनिवार, २६ सप्टेंबर, २००९

हत्या !!!

खुप दिवस झाले मनात एक कथा रेंगाळात होती ती आता शब्दातून बाहेर पडत आहे, बघा कशी वाटते ती .

*

"फोन कुणी केला होता ? "- पोलिस अधिकाराने विचारले, " साहेब मी केला होता, ह्यांचा शेजारी आहे मी, रोज सकाळी हे जॉगिंगला येतात पण आज आले नाही म्हणून मी सहज विचारायला आलो तर दार उघडे होते व हे सोफ्यावर.. निपचित पडलेले होते म्हणून मी घाबरुन फोन केला तुम्हाला."- शेजारी म्हणाला.

शहराच्या पॉश एरिया मध्ये राजकिय व व्यवसायी मंडळी मध्ये उठबैस असलेल्या अरविंद ची हत्या झाली होती, बाहेर प्रेसवाले / टिव्ही वाले हल्लाकोळ करत होते व पोलिस अधिकारी आपले काम करत होते, अरविंद चे शव डाव्या बाजूला कललेल्या अवस्थेमध्ये सोफ्यावर होतं, जवळच मोबाईल, सिगरेटचे पॉकिट व समोर टेबलावर दारुची बाटली एक ग्लास गाडीची चावी व टिव्हीचा रिमोट पडलेला होता, ग्लास मध्ये थोडी दारु होती अजून . जवळच एक स्कार्प पडला होता व शक्यतो त्याचा वापर करुनच अरविंदा गळा दाबला गेला असावा. जवळ पास झटापटीच्या काहीच खाणाखुणा दिसत नव्हत्या. वयाने अडतीस-चाळीस च्या दरम्यान असलेल्या व शरिराने ताकतवर असलेल्या अरविंद ने कसा काय वाचण्याचा प्रयत्न केला नसेल हा विचार करत असताना पोलिस अधिकारी इकडे तिकडे पाहू लागले होते त्यांना जी गोष्ट हवी होती ती दिसत नव्हती, पाण्याचा जग अथवा सोड्याची बाटली, म्हणजे काय अरविंद डायरेक्ट पॅग घेत होते व जास्त झाल्यामुळे त्यांच्या कडे आपल्या बचावाची ताकतच राहिली नसावी, हा विचार करत असताना त्या अधिका-याने जेथे ग्लास ठेवला होता तेथे जरा निरखून पाहीले व म्हणाले " येथे अजून एक ग्लास असला पाहीजे, ह्याचा अर्थ ह्यांच्या बरोबर दुसरा कोणी तरी होता जो दारु पण पीत होता व ती शक्यतो शेवटची व्यक्ती होती ज्यांने अरविंदला जिवंत पाहिले असेल. त्यांनी रुमालानेच मोबाईल उचलला, चांगल्या कंपनीचा मोबाईल होता, शेवटची कॉल कुणातरी शर्माची होती जी चाळिस एक सेकंदाची होती पण त्याच्या आधीची कॉल सतिशची होती जी जवळ जवळ अर्धातास चालू होती जी ८ च्या सुमारास आली होती व डॉक्टरांच्या टिम ने सांगितले की हत्या रात्री साडे नऊ ते दहा च्या आसपास झालेली असावी.

*

काही विचार करत पोलिस अधिका-याने सर्व घर व्यवस्थीत पाहून घेतले जवळ जवळ प्रत्येक वस्तू जागेवरच होती, त्यामुळे चोरी हा उद्देश नव्हताच हत्येचा, परत ते किचन मध्ये आले व शोधक नजरेने काही तरी शोधू लागले व त्यांच्या चेह-यावर एक अस्पष्ट असे समाधान दिसले, ते समोरील ग्लासच्या रॅक कडे पाहत होते, १२ ग्लास पैकी एक ग्लास बाहेर टेबलावर होता व एक गायब होता. तो सेट पुर्ण नव्हता, पण शक्यतो एकाद दुसरा ग्लास फुटला असेल कधी तरी हा विचार करुन त्यांनी इकडे तिकडे पाहिले तर प्रत्येक वस्तूचा बरोबर सेट होता, १२ प्लेट, १२ बाऊल्स, चमचे सर्व काही १२ च्या संख्ये मध्ये. ह्यांच्या घराचा नंबर पण डी-१२ होता, तेव्हा शक्यतो अरविंद आपल्या स्वतःसाठी बारा नंबर लकी समजत असावेत, तेव्हा जरी ग्लास फुटला असेल तर त्यांनी तो सेट नक्कीच पुर्ण केला असेल मग. आता तो ग्लास शोधणे गरजेचे होते कारण तो शक्यतो तो हत्या-याला पकडण्यासाठी मदत करेल.

*

बाहेर गार्डन मध्ये, मागे सर्विस कॉटर मध्ये, गॅरेज मध्ये सर्वत्र शोधा सोध करुन झाली पण काहीच सापडले नाही ज्याच्या द्वारे हत्या करणा-याची ओळख होऊ शकेल, अरविंद एकटाच राहत असे व जवळ जवळ तो रोजच पार्टी ला बाहेर जात असे त्यामुळे फक्त सकाळी घरकाम करण्यासाठि एक गडी होता जो घर स्वच्छ करणे, कपडे धुणे इत्यादी करुन २ वाजता निघून जात असे, घराची एक चावी त्याच्या कडे व एक अरविंद कडे होती, व्हिआयपी एरिया असल्यामुळे सर्वत्र गार्ड फिरत असतचं त्यामुळे समोरच्या घराचा गार्डच अरविंदच्या घरावर ही लक्ष ठेऊन असे.

*

गार्ड कडे थोडी फार माहीती मिळाली पण जरा ही कामाची नव्हती, सात-आठ जणे वेगवेगळ्या गाड्या घेऊन आले होते व थोड्या थोड्या अतंराने निघून गेले होते पण रात्री एक गाडी परत आली होती, व लगेच पाच मिनिटात गेली होती, पण काही कारणामुळे गार्ड त्या गाडिचा नंबर सांगू शकत नव्हता.. नाही तो गोंधळला होता, त्यांचे म्हणणे होते की अरविंद हे १२ च्या आसपास गाडी घेऊन बाहेर गेले होते व १२.४५ च्या आसपास परत आले पण डॉक्टरांच्या म्हणण्यानूसार हत्या साडे नऊ च्या आसपास झाली आहे, व सर्वात महत्वाचे गाडी तर आत गॅरेज मध्ये उभी आहे व हा म्हणतो आहे गाडी बाहेर गेली .. तर मग हे गाडीचे काय लफडे .. हा विचार करत पोलिस अधिकारी पुन्हा गॅरेज कडे आला व येथे असलेली स्विफ्ट गाडी ला एक चक्कर मारली व विचार करु लागले. त्यांनी काही तरी नक्की ठरवले व जी फिंगर प्रिंन्ट ची टिम आत ठस्से घेत होती त्यांना ह्या गाडीचे पण ठस्से घेण्यासाठी सांगितले.

*

"यु आर अंडर अरेस्ट मीस्टर सतिश "- पोलिस अधिकारी म्हणाला, " तुम्हाला माहीत आहे मी कोण आहे ते " - सतिश जरा गुर्मीतच म्हणाला, " हम्म, हो मला माहीत आहे तुमचे कनेक्शन खुप वर पर्यंत आहेत पण सबळ पुरावा माझ्या हाती आहे की तुम्हीच अरविंदचा खुन केला आहे व तुमचे हाताचे ठस्से व सर्वात मोठा पुरावा अरविंदचा मोबाईल आहे, ज्या मध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग आहे."
सतिशचा चेहरा पडला व तो मटकन आपल्या खुर्ची वर बसला. " मिस्टर सतिश, तुम्ही अरविंदशी फोन वर अर्धा तास बोललात, काही तरी तुमचा वाद झाला व तु सरळ अरविंदच्या घरी आलात, अरविंद आधी पासून दारु पीत होताच, त्याच्या बरोबर तुम्ही ही दारु पिली व जेव्हा तुम्हाला असे वाटले कि आता अरविंद प्रतिकार करु शकणार नाही तेव्हा त्याच्याच गळ्यातील स्कार्प ने त्याचा गळा आवळला व आपल्या काहीच खाणाखुणा राहू नयेत ह्यासाठी तुम्ही तो ग्लास पण आपल्या बरोबर घेतलात, सरळ गाडीत बसून घरी निघून गेलात, पण येथे तुम्ही एक मोठी चुक केली होती, अरविंद कडे व तुमच्या कडे एकाच कंपनीची , एकाच रंगाची व एकाच मॉडेलची गाडी होती व तुम्ही दोघांनी एकाच दिवशी घेतली होती, व पळून जाण्याच्या गडबडी मध्ये तुम्ही चुकून अरविंदची गाडी घेऊन गेलात, शक्यतो तुम्ही घरी पोहचला असाल तेव्हा तुम्हाला तुमची चुक लक्षात आली, तुम्ही ती आपली चुक सुधारण्यासाठी परत अरविंदच्या घरी आलात, त्याची गाडी जी तुम्ही घेऊन गेला होता त्याला तुम्ही गॅरेज मध्ये उभी केले, येथेच तुम्ही चुकला, अरविंद गाडी गॅरेज मध्ये कधीच उभी करत नसे, हे गॅरेज मध्ये असलेल्या धुळीमुळे आम्हाला समजलेच होते व आजू बाजूला विचारणा केल्यावर पण सर्वांनी घेच सांगितले की गाडी कधीच गॅरेज मध्ये उभी नसते. त्यांनतर तुम्ही अजून चुक केलीत जो ग्लास तुम्ही टेबला वरुन घेऊन आला होता तो नष्ट न करता तुम्ही त्या गाडी मध्येच ठेवला जी गाडी तुम्ही आपली गाडी समजून घेऊन गेला होता, दुसरी चुक तुम्ही केली अरविंदच्या गाडीची चावी तुम्ही परत आत जाऊन अरविंदच्या प्रेता जवळ ठेवली पण त्यावेळी तुम्ही त्यावरचे ठस्से पुसणे विसरलात, घरात तुम्ही सर्व जागी आपले ठस्से साफ केले पण त्या चावी वर व गाडी वर तुमचे ठस्से राहीलेच, आम्ही तुमच्या नकळत तुमच्या हाताचे ठस्से तुमच्या ऑफिस व घरातून घेतले व त्यांची खातर जमा झाल्यावरच तुम्हाला पकडण्यासाठी आलो आहोत वारंट घेऊन. व हत्येचे कारण ही आम्हाला अरविंदच्या मोबाईल मध्येच मिळाले "

*

" अरविंद, हा नेहमी राजकिय नेते व इतर व्यवसायीक लोकांच्या पार्टि मध्ये मला भेटायचा, माझा पण स्वतःचा बिझनेस होता व त्याला वाढवण्यासाठी मी देखील अरविंदच्या ओळखीचा फायदा घेत असे, पण तो पर्यंत मला माहीत नव्हते की अरविंद हा एक नंबरचा नालायक माणूस आहे, त्याच्या बरोबर मी पार्टीमध्ये असताना कधी कधी त्यांने मला कॉल गर्ल्स पुरवल्या व हारामखोराने त्यांचे मोबाईल वर शुटींग केले हे त्यांने मला एकदा दाखवले व म्हणाला की माझ्या गरजापुर्ण करत रहा मी हे प्रेसला देणार नाही पण जेव्हा तु मला पैसे नाही देणार तेव्हा मात्र मी ते प्रेसला व आधी तुझ्या बायकोला दाखवणार म्हनून." सतिश बोलत बोलत थांबला व पाणी पिऊन पुन्हा बोलू लागला " त्यांने आधी गाडी मागीतली मी पण घेणार होतो गाडी, उगाच आपली अब्रु रस्त्यावर येऊ नये म्हणून मी त्याला गाडी घेऊन दिली व त्यांने माझ्या गाडीला व्हिआयपी नंबर दिला व स्वतःच्या गाडीला पण १२ नंबर घेतला, असे तो नेहमीच करु लागला कधी पन्नास हजार तर कधी लाख... अशी त्यांची पैशाची हवस वाढूच लागली होती, मी बरबाद होत होतो, धंद्याचा पैसा त्याला देऊन देऊन माझा धंदा बंद होण्याच्या मार्गावर आला व शेवटचा पर्याय म्हनून मी त्याला एक करोड ची ऑफर दिली व म्हणालो की ते क्लिप्स मला दे. पण त्या हारामखोराला मी सोन्याची अंडी देणारी कोंबडी वाटत होतो त्यामुळे त्यांने त्याला नकार दिला व शेवटचा उपाय म्हनून मी त्याला मारण्याचा प्लान तयार केला मला माहीत होतं की हा रोज संध्याकाळी घरी बसून दारु पितो व फुल्ल टल्ली होऊ पर्यंत पितो व त्या नंतर रात्री १ - दिडच्या आसपास क्लब मध्ये जातो नाचायला. पण तो मरायला एवढा तयार झाला होता की त्या दिवशी त्यांने परत माझ्या कडे दोन लाखाची मागणी केली तेव्हा मात्र मी त्याच्या शी फोन वर भांडलो व पैसे द्यायला येतो म्हणुन त्याच्या घरी गेलो, बाकी पुढचे तुम्हाला माहीत आहेच सर्व." असे म्हणून सतिश शुन्यामध्ये डोळे लावून बसला.

*

काय बोलावं हेच त्या पोलिस अधिका-याला समजले नाही पण तो म्हणाला " सतिशराव, तुमच्या विरुध्द पुरावे सबळ आहेत, पण तुम्ही असा हत्येचा मार्ग शोधावयास नको होता जर तुम्ही आधीच पोलिसांच्या कडे आला असता तर, जी आब्रु वाचवण्यासाठी तुम्ही हत्या केली तीच आबरु कोर्ट व प्रेस समोर उघडी होणारच ना. ठीक आहे तो दोषी होता पण तुम्ही ही कमी दोषी नाही आहात. तुम्ही आपला व्यवसाय वाढवण्यासाठी चुकिचा मार्ग वापरलाच व त्याचा फायदा अरविंद सारखे लोक घेतात.. चला, तुम्हाला आपल्या कबुली जबाबावर सही करायाची आहे आता...

** समाप्त ***

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २००९

अहिंसावादी - म्हणजे काय ?

मी जैन !

त्यामुळे लहानपणापासूनच मी अहिंसा अहिंसा चा जाप करताना घरापासून बस्ती (जैन मंदिर) पर्यंत लोकांना / मुनींना पाहीले आहे त्यात मला काहीच नाविन्य नाही पण भटांच्या एकाला चित्रकलेला (डिजिटल कला) एका मिपाकरांने प्रतिसाद दिला की मला पहिले आवडले व दुसरे नाही कारण ते अहिंसावादी आहेत म्हणून.

आता मला एक गोष्ट नेहमीच भेडसावत असते... ती गोष्ट त्यांच्या त्या वाक्याने एकदम मनात परत आली व त्यासाठी हा काथ्याकुट !

जगदिश चंन्द्र बोस ह्यांनी १९३७ पुर्वीच हा शोध लावला होता की वनस्पती व झाडं ह्यांना जाणीव असते म्हणजे त्यांच्या पण जीव असतो ते सजीव आहेत, आता हिंसा म्हणजे काय ? एखाद्याने एखादाचा जीव घेणे / विनाकारण जीव घेणे म्हणजे हिंसा हाच अर्थ मला माहीत आहे व शक्यतो तुम्हाला ही.

आपण खाण्यापासून ते कागदापर्यंत अनेक कारणांनी वनस्पती / झाडे ह्यांची हत्याच करत आलो आहोत की मग ? कारण जगदिश चंन्द्र बोस ह्यांचे संशोधन आपण मान्य करतो ( जगाने मान्य केले) म्हणजे आपण मानतो की वनस्पती सजीव आहे त्यानुसार आपण एखादी वनस्पती तोडली तर ती हत्याच ना ? मग आपण अहिंसावादी कसे ?

जर आपण स्वतःला अहिंसावादी म्हणतो तर आपण उठता बसता अनेक हत्या करतो हे कोणालाच माहीत नसावे ? अनेक प्रकारच्या केस्मेटीक क्रीम मध्ये व्हेल मासा पासून प्राप्त केलेले तेल (चरबी) वापरली जातेच की, मागे मॅड टिव्ही वर पाहीले जे ब्रेश आपण आपल्या मुलाला चित्रकलेची आवड लागावी म्हणून विकत आणून देतो त्या ब्रेश साठी अनेक छिछुंदर ( * मराठी शब्द) ह्या प्राणांची हत्या केली जाते ! एका छिछुंदर चा जीव घेतला तर फक्त दहा ब्रेश तयार होता आता बोला.

सर्वात सर्व जागी सहज पणे मिळणारे डिझेल / प्रेट्रोल व इतर त्यांचे उप पदार्थ हे पण जैविक इंधन आहे ... म्हणजे कोणाकडून तरी हत्या झालीच ना.. भले ती निसर्गाकडुन होऊ दे !

काही गोष्टी जश्या.. बुट / चपला / पर्स / वायरींगचे सामान / हिरे छाटणीचे काम लहान मुलांच्या कडून अत्यंत अत्याचार करुन करुन घेतले जातात... त्यांना मानसिक / शारिरिक इजा केली जाते म्हणजे ती देखील एक प्रकारची हिंसाच ना :?

आपण अजारी असल्यावर काही दवादारु करतो.. मेडीसीन खातो / पीतो ! काही अशा मेडीसीन मध्ये देखील काही जिवांची हिंसा करुनच त्याच्या तील उपयोगी द्रव्य / पदार्थ वापरला जातो ..जर वर दिलेल्या उदाहरणांना तुम्ही गरज म्हणत असाल तर मग आपण हिंसेचेच समर्थन करतो असे वाटत नाही का ?

आपण पुर्ण पणेच परजीवी आहोत असे तुम्हाला वाटतं का ?

जर आपण परजीवी आहोत मग आपण अहिंसावादी कसे ठरतो :?

गुरुवार, २४ सप्टेंबर, २००९

भटकंती - दुसरा स्टॉप - मनाली (हिमाचल प्रदेश)

 


 


 दिल्ली पासून रोड ने ५०० किलोमीटर अंतरावर असलेले एक नितातं सुंदर थंड हवेचे ठीकाण, रेल्वे ने जायचे असेल तर तुम्हाला शिमला किंवा कालका जावे लागेल व तेथून मनाली बस ने.  खोल वर पसरलेल्या द-या व आकाशाला गाठण्याची स्पर्धा करत असलेली हिमशिखरे हेच मनालीचे दैवत.
जाण्याचा कालावधी जानेवारी ते जुन पर्यंत कधी ही... पण जानेवारी मध्ये गेला तर बर्फाचा आनंद भेटु शकतो..  मी मागील दोन वर्ष सलग मनालीला गेलो माझ्या आवडत्या ठिकाणा मध्ये ह्याचा नंबर सगळ्यात पहिलाच येतो !हॉटेल्स घेउन का तेथे गेला तर गेस्ट हाऊस चा शोध घ्या...  गेस्ट हाऊस मध्ये सर्विस चांगली भेटते व स्थानिक लोकच गेस्ट हाऊस चालवत असल्यामुळे तुम्हाला चांगले मार्गदर्शन मिळू शकते, तेथे दोन प्रकारचे वाटाडे भेटतात एक तुम्हाला मुर्ख बनवणारे व एक तुम्हाला खरोखर नितांत सुंदर असे मनाली फिरवणारे.. तुम्ही जेथे राहण्यासाठी उतरला असाल त्याच्या आजू बाजुला जरा चक्कर मारा एखादा कोणीतरी स्थानिक पकडा... ( आम्ही धुम्रपान करतो त्यामुळे आम्हाला लगेच कोणी ना कोणी भेटतच .. फक्त एकच प्रश्न माचिस है क्या ? लगेच गप्पा चालू)  त्याच्याशी गप्पा मारा व त्याला हलकेच विचारुन घ्या वाटाड्या कोण चांगला आहे व योग्य पैशात कोण फिरवेल.. ;)


मनालीला गेल्यावर खर्च करु नका अफाट महाग वस्तू भेटतात तेथे.. आपल्या कॅमराची बॅटरी, खाण्यासाठी स्नॅक व बाकीच्या गरजेच्या वस्तु मनालीला येण्यापुर्वीच विकत घेऊन ठेवा.. दोष त्यांचा नाही आहे त्यांना काही सामान विकण्यासाठी आणने म्हणजे १०० किलोमिटरचा प्रवास करावा लागतो त्यामुळे वस्तु महाग मिळतात व पर्यटनस्थळ म्हणाले की वस्तु तश्याच जरा महाग होतात.. शाल भेटते... हाताने विनलेल्या शॉल एकदम  सुंदर कलाकुसरी असलेल्या शॉल !


२२०० मिटर उंची वर.. व्यास नदीच्या काठावर वसलेले हे छोटे शहर सर्व बाजूने सुंदर आहे,  जास्त करुन नवविवाहीत जोडपी येथे आपला हनिमुन अविस्मरणीय बनवण्यासाठी येतात व त्यासाठीच जोडी(कपल) साठी  येथे विविध डिस्काऊट लावलेले दिसतात जागोजागी  ;)

दोन्ही फोटो आपले मिपा सदस्य सुचेल तसं


मनाली मध्ये पाहण्यासारखं हिडंम्बा मंदीर (महाभारतील भिमाची पत्नी) आहे एकदम सुंदर शिल्पकला तुम्हाला येथे पाहता येइल मंदिराचा परिसर देखील पाहण्यासारखा आहे.. त्यानंतर तिब्बती गुफा देखील पाहण्यासारखी आहे.. येथे बुध्दाची मोठी मुर्ती पाहण्यालायक आहे तसेच बैध्द साधु.. लामा ह्यांची जिवनचर्या जवळून पाहता येते. जर कोणाला झरे / पाण्याचे गरम कुंड पाहण्याची आवड असेल तर त्याने जवळच असलेल्या वसिष्ठ गावात जायला विसरुच नका..  अत्यंत उपयोगी व मेडीकल उपयोगासाठी ह्यांचे पाणी निरनिराळ्या रोगात वापरले जाते... त्वचा रोगावर अत्यंत गुणकारी पाणी तेथील आहे असे मानले जाते.रोहतांग दर्या..  मनाली पासून लद्‍दाख रोड वर पाच-सात किलोमिटर दुरवर असलेले ठीकाण.... आह... एकदम.. सुंदर.. ज्या बद्दल तुम्ही कल्पनासुध्दा करु शकणार नाही असा निसर्ग पाहावयास मिळतो.. ह्याला दर्या का म्हणतात माहीत आहे ? येथे गेल्यावर तुम्हाला असे वाटते की आपण बर्फाच्या समुद्रात उभे आहोत...  :)  अत्यंत सुंदर... मनाली जावे तर रोहतांग दर्या जरुर पहावा.. येथे वर्ष भर बर्फ जमेलेलीच असते.. त्यामुळे कधी ही जा.. ! तसेच मनाली पासून दर्या पर्यत चालतच यावे लागते (खेचर /घोडी मिळतात पण आपण चालतच जाव लै मजा)  ह्या मार्गात जो आनंद भेटतो तो कुठेच भेटणार नाही ... अगदी पट्टणीटोपला सुध्दा नाही  ;)


 तीनचार दिवस फिरण्यासाठी एकदम मस्त ठीकाण.

हॉटेल्स तुम्हाला ६००-१२०० पर्यंत रुम देतात.
गेस्ट हाऊस मध्ये ४००-५०० व उत्तम प्रतीच्या गेस्ट हाऊस मध्ये ८००+ !
जवळ जवळ सर्व हॉटेल्स व गेस्ट हाऊस ब्रेकफास्ट हा फ्रीच देतात (आधीच माहीती घ्यावी) जेवण थोडं महाग आहे व कमी शिजलेले मिळण्याची शक्यता जास्त.. कारण उंच जागेचे ठीकाण !

दिल्ली पासून तुम्ही ५०० रु. आरामात बसने खात पीत जाऊ शकता, ट्रेन ने गेलो नाही पण जास्त टिकीट नसावे.

मनाली मध्ये फिरण्याचा खर्च नाहीच असे समजा.. जर गाईड घेतला तर गोष्ट वेगळी.. कारण जवळ जवळ सर्व मनाली चालतच फिरावे लागते .. कारण डोंगर द-यांचा प्रदेश त्यामुळे ४X४ गाडी असने गरजेचे ... त्यापेक्षा चालत फिरलेले छान.. व जेव्हा बर्फ पडतो तेव्हा गाडी खुप वेगाने घसरतात त्यामुळे मनाली मध्ये गाडी ही ठरावीक जागे पर्यंतच जाऊ शकते. 


 


* टिप : फोटो माझे नाही आहेत, गुगलसेवा वापरली आहे..  मागे विदा उडाल्यामुळे काही फोटो सापडत नाही आहेत पण जसे सापडतील तसेच ह्यात बदल करेन.

बुधवार, २३ सप्टेंबर, २००९

नियती....

*

केव्हा पासून मी असा वेड्यासारखा पळत आहे, किती दिवस.. किती महिने.. किती वर्ष झाली.. खोल दरीतून डोंगर माथ्यापर्यंत... माथ्यावरुन खाली पायथ्यापर्यंत... रानातून.. जंगलातून.. रणरणत्या उन्हातून असाच सुसाट वेड्या सारखा पळत आहे मी.. ना थकलो.. ना हरलो. का ? कश्यासाठी... माझं गाव तर केव्हाच मागे राहिले तरी देखील मी असा हा वेड्यासारखा धावत आहे... मला ते हवे आहे ते... जे समोर उंच डोगरावर दिसत आहे... जे चमकत आहे तेच तेच ते हवे आहे मला. किती ही कष्ट करायला लागू दे मला ते हवेच आहे.. अरे हे कोण माझी वाट अडवून उभे आहे... जाउ द्या हो मला का उगाच माझी वाट अडवत आहात तुम्ही... मला ते हवे आहे... जाऊ द्या..

*

अरे थांब रे, किती धावशील जरा थांब. मी किती वेळा तुला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तु थांबतच नाही आहेस, शेवटी मलाच तुझ्या समोर यावे लागले, मी कोण आहे ? मी मी आहे.. मीच तो विश्वकर्मा... परमेश्वर... तुझा देव व मीच तो निसर्ग आहे ! सर्वकाही असलेला मीच तो सर्वशक्तीमान आहे. पण तु सांग मला तु एवढा जीव तोडून पळत का आहेस.. कुठे लागले खरचडले.. अगणित जख्मा झाल्या आहेत तुझ्या शरिरावर.. तु किती जणांना जखमा देऊ इथवर पोहचला आहेस.. पण का जेवढा पळत आहेस ? अरे ती प्रत्येक चमकती वस्तु तुझ्यासाठी नाही आहे रे, का धावतो आहेस जीव तोडून. तुझ्या नियती मध्ये जे लिहले आहे मी तेच तुला भेटणार आहे, जरा थांब, मागे वळून तरी बघ.

*

अरे असाल तुम्ही सर्वशक्तीमान परमेश्वर ! पण हे जे मी मिळवत आलो आहे हे मी मिळवलं आहे.. माझं रक्त जाळलं आहे मी इंथवर पोहचायला स्वतः स्वतः कष्ट केले आहे, व जे समोर दिसत आहे ना ते देखील मी मिळवणारच तुम्ही कोण मला अडवणारे ? तुमची कधी मदत घेतली मी इथवर पोहचायला ? कधी अपेक्षा तरी केली का मी तुमच्या मदतीची ? तरी ही इथ पर्यंत पोहचलोच ना. माझे लक्ष्य मी ठरवलं व मी मीळवलं ह्यात तुमचा काय संबध ? का अडवत आहात माझी वाट तुम्ही.. जाऊ द्या मला.

*

थांब, थांब. ठीक आहे रे तुला वाटत आहे ना सर्व तुच मिळवलंस.. स्वतःच्या कष्टाच्या जोरावर.. बुध्दीच्या जोरावर ? पण जे तुला मिळालं ते तुलाच का मिळाले इतरांना का नाही मिळालं ? व जे इतरांना मिळाले ते तुला का नाही मिळालं ? ह्याचा कधी विचार केला आहेस ? कधी करणार तु विचार तु तर फक्त पळतो आहेस.. जरा बघ पाहू तुला काय काय मिळालं ? तुला जे जे भेटलं ते सर्व अप्रतिमच होते ना ? तरी ही तु नव नव्या वस्तुचा हव्यास ठेवत गेला व पळत राहिला... व एक एक वस्तु तु जी मिळवत गेलास त्या जागी आपली एक एक वस्तू सोडत आलास तु ? प्रत्येक नव्या वस्तू साठी तु जुनी वस्तू टाकतच आला आहेस रे. मगं असे कसे म्हणतो आहेस की सर्वकाही तुच मिळवलं आहेस... व तुझ्याकडेच आहे. अरे मुर्खा तुझी झोळी रिकामीच राहिली रे तु फक्त नव्याचा हव्यास धरला आहेस व सुसाट पळत सुटलास ह्यालाच नियती म्हणतात रे.. जे मागे राहीले ते सोड आता पण कमीत कमी जे आहे तुझ्याजवळ ते तर संभाळ रे.

*

माझं काय चुकलं ? तुम्हीच माझी नियती लिहलीत अशी जगावेगळी त्याला मी काय करु ? माझी काय चूक ? मला जे हवे ते कधीच मिळू दिले नाही साधा प्रयत्न जरी केला तरी अडथळांचा डोंगर उभा केला तुम्ही माझ्यासमोर.. तरी ही मी जिद्दीने सर्व अडथळे पुर्ण करत गेलोच ना.. पण तुम्ही परत माझ्याबरोबर खेळी केली.. माझी झोळी फाटकीच ठेवली तुम्ही.. असू दे माझी झोळी फाटली.. मी प्रयत्न करणारच. मी पण पाहू इच्छीत आहे माझी जिद्द मोठी की तुमची नियती.. मी भांडणार आहे तुमच्याशी .. तुम्ही लिहलेल्या नियतीशी ! बंडखोर आहे मी.. समजा बंड केले आहे मी तुमच्या विरुध्द .. माझ्या नियती विरुध्द ! पाहू कोण मला थोपवतं.. जेव्हा जेव्हा मदती साठी आजूबाजुला पाहीले तर दुर दुर पर्यंत तुम्ही कोठेच नव्हता.. धडपडलो.. पडलो.. तरी ही स्वतःच उभा राहीलो.. जेथे रस्ता नव्हता तेथे मार्ग मी शोधला.. रक्ताचे पाणी करत मी येथेवर पोहचलो व आता अचानक तुम्ही समोर उभे राहता व म्हणता थांब ? का ? का मी थांबावे ?

*

अरे नियम आहे रे हा.. निसर्गाचा नियम आहे, तु ज्या वस्तुच्या मागे धावत आहेस ती तुझ्या नियती मध्येच नाही आहे म्हणून मी तुला थोपवत आहे.. तुझे कष्ट वाचवत आहे.. तु जिवाच्या आकांताने प्रयत्न करत आहे मान्य.. पण शेवटी जर तुला ती वस्तु मीळालीच नाही तर ? तुझ्यासमोर जे शुन्य उभे राहील त्याचे काय ? ज्या वस्तु साथी तु आपला श्वास विसरुन कष्ट करत आहेस तीच मिळाली नाही तर तुझे श्वास तरी तुझी साथ देतील काय रे ? आपली हद्द ओळख रे.. केव्हा पासून तुला हेच समजवण्याचा प्रयत्न करत आहे हद्द ओळख.. जर नियती करण्यावर आली तर असल्याचे नसले होऊन जाईल... तुझ्या हातातील हिरे माणिक मोती.. मातीमोल होऊन जातील व तु काहीच करु शकणार नाहीस... असाच उभा राहशील ह्या दगडा सारख ! जरा थांब.. व मागे वळून तरी बघ.. तुझी हद्द तर तु नाहि ना सोडून आलास मागे ?

*

माझी हद्द मी ठरवणार आहे ह्यावेळी.. खुप झाले तुमचे व तुमच्या नियतीचे.. प्रत्येक वेळी मीच का हार मानावी ? मला काही हवे तर लगेच म्हणे आपली हद्द ओळख.. मला नाही माहीत माझी हद्द काय आहे.. व राहिला श्वासांचा प्रश्न तर माझ्या ध्येयासाठी मी ते पण त्यागेन.. पण मी प्रयत्न करणारच भले सर्व काही मातीमोल होवो.. पण हा शेवटाचा प्रयत्न मी करणारच... असेच जर नियती नियती करुन थांबू लागलो तर माझ्यातला मीच हरवेल व मीच हरवलो तर मग ध्येय काय कामाचे व काय कामाचे हे हिरे मोती माणिक ? तेव्हा रस्ता सोडा.. मी पुढे जाणारच आहे.. हार तर हार पण ती हार वीरासारखी छातीवर छेलणार आहे... पण नियती विरुध्द एकदातरी बंड करुन पाहणार आहे....

*

भटकंती - पहीला स्टॉप - गुडगांव ! (गुरुगांव)

पुरातनकाळात पांडव व कौरव ह्यांना शिक्षण देणारे गुरु द्रोणाचार्य ह्यांना आपल्या उपजाविकेसाठी हे गाव दान दिले होते म्हणून ह्याचे नाव गुडगाव (गुरु गाव) ह्या गावात एक प्राचीन शितला माताचे मंदिर सोडले व गुरु द्रोणाचार्याचा एक पुतळा सोडला तर ह्या बद्दल काहीच पुरावा सापडत नाही, तसेच हा भाग नेहमीच युध्दाच्या सावली खालीच राहीला ते दिल्ली मुळे.. दिल्ली फक्त १८ किलोमिटर दुर. इतिहासाचे साक्ष देणारे असे काहीच बांधकाम आसपास दिसत नाही ते मोगलांच्या आक्रमणामुळे.. ह्यांचे समाज जिवन पण विस्कळीत काही जण शेती करत पण मुख्य म्हणजे घरातील एक्-दोन व्यक्ती सैन्यात अथवा कोतवालीत (त्या काळचे पोलिस) , गावात बहुसंख्य हिंदू व मुळ समाज यादव कुलीन मुळ भाषा हरयानवी त्यामुळे सर्वच जण यादव भेटतात येथे भरलेल्या बस मध्ये यादव साहेब अशी आरोळी दिली तर ९५ % लोकं तुमच्याकडे वळून पाहतील एवढी संख्या.


शितला माता मंदिर

१९८० च्या पुर्वी एक राजधानी शेजारचं एक काही खेडी मिळून असलेला भाग म्हणजे गुडगावं, येवढीच ओळख ह्या गावाची, गाव हो त्यावेळी हे गावच होते, पण १९८१ ला संजय गांधीने येथे मारुती निर्माण करणारी कंपनी मारुती उद्योग लिमिटेड चालू केली व ह्या खेडेगावाचं भाग्य चमकलं ! लोकांना रोजगार मिळू लागला व नवनवीन काम धंदे येथे चालू झाले, व पुढे काही वर्षातच होंडाची हिरो होंडाचा प्लान्ट पण येथे चालू झाला व गुडगाव प्रगती पथावर धावू लागला. १९८० ते ९४ पर्यंतचा कालखंडामध्ये लोकांना कामे उपलब्ध भरपुर झाली पण त्याच्या जिवनमानात काहीच फरक पडला नव्हता, खुप लोकांना एक वेळचे जेवण पण मिळणे दुरापास्त झालेले असायचे , पण त्याकाळात सरकार ने गुडगावंच्या जयपुर हायवे च्या नजदीक काही शे एकड जमीन कारखाने व उद्योग धंदे काढण्यासाठी आवंटीत केली "मानेसर" गावाजवळ, आय एम टी मानेसर. पण कामधंदा तेथे चालू होण्यासाठी १९९८ उजाडले, पण जेव्हा येथे कंपन्यांना जागा मिळाली तेव्हा मात्र गुडगाव ची प्रगती तुफान वेगाने झाली, पण त्या वेगा बरोबरच स्थानिक लोकांचे पण नशीब उघडले, ज्या जमीनींत काहीच उगवत नव्हते.. काही हजार मध्ये एकडं अशी विकली जाणारी जमीन .. अचानक लाखो-करोडोचा भाव मिळवून देऊ लागली, आज जो गुडगाव चा पॉश येरिया म्हणून ओळखला जातो तो डीएलएफ फेस पण... तेथे १९८० च्या पुर्वी जंगल होते व ज्यांच्या खानदान मध्ये कोणा आजोबा / पणजोबाला त्यावेळच्या सरकारने / राजाने दान दिलेली जमीन, कित्येकांना माहीत देखील नव्हते की त्यांची जमीन तेथे आहे पण जेव्हा डिएलएफ ने जमीन विकत घेण्याचा सपाटा लावला व त्याच्या मागोमाग बाकीच्या पण रिअल एस्टेच्या कंपन्यांनी पैसा अक्षरश: ओतला.. गुडगांव मध्ये पैश्याचा पाऊस सुरु झाला... लाख ते करोड पर्यंत आकडा पोहचायला... काहीच महीने लागले !आताचे गुडगाव

२००० च्या आयटी बुम मधे जर बेंगलोर हैद्राबाद खालोखाल फायदा झाले असलेले शहर म्हणजे गुडगांव... पावसाळ्यात जसे कुत्राची छत्री उगवते तश्या भल्या मोठ्या इमारती व त्यामध्ये असंख्य कॉलसेंटर व आयटी कंपन्या. व ह्या कंपण्यासाठी लागणारा मनुष्यबळ... गुडगाव अफाट वाढले... आधी काहीच गल्ली-रस्ते असलेले - हायवेच्या दुस-या बाजूला ज्म्गल असलेले गुडगाव .. जसे फाटले होते... सैरावैरा.. वाढत वाढत.. नको तसे वाढले, लोकाच्या हाती प्रचंड पैसा, त्या पैशाच्या बळावर बांधकाम व इमारती वर इमारती.... टोलेजंग इमारती... गुडगाव बदलं !
ज्या रस्त्यावर कधी बैलगाडी चालत असे त्या रस्तावर आता बीएमडब्लु.. मर्क्..अश्या महाग गाड्या सरास धावू लागल्या.. !
मोठ मोठया कंपन्या, बँका, ट्रव्हल कंपन्या... ह्यांनी गुडगाव काबीज केले... पण एकच बाजूला हायवेच्या पलिकडील बाजू पॉश बाजू.... व अली कडे तेच जुने भकास गुडगाव.. आपला जुना डोलारा संभाळत सावरण्याचा व जे काय चालू आहे ते समजण्याचा प्रयत्न करत असलेले.. पण हळू हळू जुने गुडगाव पण ह्या नवीनतेला समरस झाला व तो देखील सहज पणे मॉल्स व कॉप्लेक्स मध्ये फिरु लागला..शहरामध्ये मॉल्स एवढे झाले की ओल्ड महरोली-गुडगाव रोड कधी मॉल रोड मध्ये तबदील झाला प्रशासनाला देखील कळाले नाही, सीटी मॉल, सहारा मॉल, वाटीका, मेट्रोपॉलिटीन, एमबीयन मॉल.. डिएलफ, गोल्डसुक, सीटी मॉल-२, सेंटर मॉल, सीटी सेंटर एक ना दोन २००८ जानेवारीमध्ये मध्ये तयार व वापरत असलेले मॉल्स ४८ होते तर निर्माणाधीन १८५ ! ह्याच मॉल्स नी गुडगाव मध्ये मेट्रो लाईफ स्टाईल आणली... व गुडगाव दिल्ली एनसीआर मधील सर्वात श्रीमंत भाग झाला, मोठ मोठे ब्रन्डस येथे आम झाले, लोकाच्या बोलण्याचालण्यामध्ये ब्रन्ड झळकु लागले.


सिटी सेंटर

दिल्ली जवळचे, एयर पोर्ट १५ मिनिटाच्या रस्तावर, चांगले हॉस्पिटल्स, चांगली सुविधा असलेले शहर. ह्यामुळे ह्या शहराचा प्रचंड विकास मागील दहा वर्षात झाला, त्यातच दिल्ली ते मानेसर एक्सप्रेस हायवे चा प्रोजेक्ट सरकारने हाती घेतला व दोन वर्षात पुर्ण पण केला आता गाड्या सुसाट धावतात... सकाळाच्या वेळी तर एयरपोर्ट वर फक्त ८-९ मिनिटामध्ये व करोलबाग ३० मिनिटे. आता सरकारने नवीन प्रोजेक्ट हाती घेतला आहे पिन्क सीटी एक्सप्रेस हायवे.. गुडगाव-जयपुर २०० किलोमिटर... सध्या वेळ चार तास ते पाच पास.. पण हा प्रोजेक्ट चालू झाला तर दोन्-तीन तासात जयपुर. तीकडे दिल्ली हून मेट्रो निघालीच आहे गुडगाव कडे... ६०% काम पुर्ण झाले आहे व ह्या वर्षाच्या अखेरीस ती गुडगाव मध्ये पळू लागेल.. अजून काय हवं !


दिल्ली ते मानेसर एक्सप्रेस हायवे

म्हणतात ना सुंदरतेला / प्रगतीला अभिशाप असतोच त्या पध्दतीने येथे लोकल बस सेवा नाही, रिक्षा चालतात पण मिटर नाही.. वडाप पध्दत सर्वच जागी, मॉल्स आहेत पण घराजवळ असे वाण्याचे दुकान नाही.. की छोटी मोठी भाजी मंडी नाही.. मुले आहेत पण खेळायला ग्राउंड नाही.. कुठ जायचे तर स्वतःचे वाहन असणे सर्वात महत्वाचे हा गुडगावचा अलिखित नियम आहे, त्यामुळे भरमसाट गाड्या, बाइक्स रोडवर त्यामुळे कधी कधी छोटे मोठे तास्-दोन तास असे ट्रफिक जॅम लागतो, तसेच येथे श्रीमंत व गरिब ह्यात गॅप येवढा मोठा झाला की संघटीत गुन्हेगारी वाढू लागली व प्रगती बरोबरच गुन्हेविश्वात पण गुडगाव ने प्रचंड प्रगती केली, किडनॅपींग, खुन, चो-या-दरोडे तर आम बात.... ! अपघातंचे प्रमाण प्रचंड वाढले.. व प्रशासन जसे भारतात सर्व जागी आहे तसेच ढम्म ! काही फरक पडत नाही.. !सिग्नेचर टॉवर
पण गुडगावं आपले सुखी ... मज्जेत राहणे... आजचा दिवस सुखात काढला उद्याचे उद्यावर हा शहराचा अलिखित नियम.

कधी आलात इकडे तर नक्की भेट द्या.. मनाला मोहीनी घालेल हे शहर.. ह्याचा चटक्-भडक पणा शक्यतो तुम्हाला आवडेल ही व चुकुन तुम्ही माझ्यासारखेच येथेच स्थाइक व्हाल :)* चित्रे गुगलसेवा !

सोमवार, २१ सप्टेंबर, २००९

शेयर मार्केट (बेसिक) भाग -३

मागील भागामध्ये आपण अकाउंटसाठी काय काय करावे लागेल व ब्रोकरेज म्हणजे काय हे पाहीले आता आपण आपले ट्रेडिंग कसे करावे हे शिकू.

ऑनलाईन ट्रेडिंग म्हणजे तुमच्या व्यक्तीगत संगणकावर कंपनीने प्रोव्हाईड केलेल्या प्रणाली द्वारे शेयरची खरेदी / विक्री करणे.
व ऑफलाईन ड्रेडिंग म्हणजे ब्रोकर ने केलेली व्यवस्था ज्याद्वारे तुम्ही त्याच्या ऑफिस मध्ये / ट्रेडिंग हाऊस मध्ये जाऊन अथवा फोन करुन आपल्या शेयरची खरेदी / विक्री करु शकतात.

ऑनलाईन ट्रेडिंग मध्ये कंपनी तुम्हाला एक ऑनलाईन ट्रेडिंग इंटरफेस सुविधा अथवा एक ओडिएन डाएट / नाव्हो नावाची प्रणाली प्रोव्हाईड करतात ज्याद्वारे तुम्ही खरेदी / विक्री चालू करु शकता.


ओडिएन प्रणाली

ओडिएन चांगले आहे व वापरावयास सोपे पण आहे.

*

ऑनलाईन ट्रेडिंग इंटरफेसमध्ये कंपनी तुम्हाला जावा बेस्ड सुविधा प्रोव्हाईड करते त्यासाठी तुमच्या संगणकावर एक छोटीसी प्रणाली जावा व्हर्चुअल मशीन (Java Virtual Machine ) प्रस्थापीत करावी लागते. त्यानंतर तुम्हाला दिलेल्या युजरनेम व पासर्वड द्वारे तुम्ही आपल्या ऑनलाईन ट्रेडिंग इंटरफेस मध्ये प्रवेश करु शकता.

जेव्हा तुम्ही ऑनलाईन ट्रेडिंग इंटरफेस मध्ये प्रवेश कराल तेव्हा सर्व प्रथम तुम्हाला आपल्यासाठी स्क्रिप्ट प्रोफाईल तयार करावे लागेल.
स्क्रिप्ट प्रोफाईल म्हणजे तुम्हाला ज्या शेयर्स मध्ये ट्रेडिंग करावयाचे आहे त्याची एक लिस्ट.

जर तुम्ही सेक्टर प्रमाणे आपली लिस्ट तयार केली तर शेअर वर नजर ठेवण्यासाठी सोपे जाते.
उदा. बँकिंग सेक्टर साठी एक प्रोफाईल , आयटी सेक्टर साठी एक व अ‍ॅटोमोबाईल साठि एक प्रोफाईल.
ह्याचा फायदा हा आहे की तुम्ही एकाच वेळी एका सेक्टर मधील उतारचढाव व्यवस्थीत पाहू शकता व गोंधळ पण होणार नाही.

ऑनलाईन ट्रेडिंग इंटरफेस मध्ये काही चांगल्या गोष्टि आहेत जसे की नवीन वापरकर्ताला ह्याचा वापर एकदम सुसह असतो जास्त अडचण वाटत नाही... सर्व काम माऊस द्वारे होऊ शकते. पण जर तुम्ही प्रोफेशनल ट्रेडर आहात तर मात्र ऑनलाईन ट्रेडिंग इंटरफेस तुमच्यासाठी नाही.. कारण येथे थोडा वेग कमी पडतो ऑनलाईन ट्रेडिंग इंटरफेसचा.

*

जर तुम्हाला कंपनी ओडिएन डाएट / नाव्हो नावाची प्रणाली देत असेल तर त्यांची स्थापना पण कंपनीचाच व्यक्ती करुन देईल व त्याच्याकडून थोडे बेसिक माहीती सुध्दा भेटेल.
ज्यांना फास्ट ट्रेडिंग करायचे आहे ( म्हणजे दिवसाला कमीत कमी २५ च्या वर ट्रेड ) त्यांच्यासाठी ओडिएन डाएट / नाव्हो नावाची प्रणालीच गरजेची आहे कारण ह्यामध्ये सर्वकाम किबोर्ड द्वारे होते व वेगाने ऑर्डर ईन्ट्री करता येते तसेच शेयरचा ग्राफ / मार्केटचा उतारचढाव / सेक्टर प्रमाणे चढ-घट घ्याची सर्व माहिती तुम्हाला आपल्या स्क्रीन वर दिसत राहते व त्यामुळे वेगाने निर्णय घेता येतो.
*

जेव्हा तुम्ही एखादी एक स्क्रिप्ट आपल्या प्रोफाईल मध्ये सेव्ह करता त्याच्यावर राईट क्लिक करुन / अथवा एफ१ दाबला तर खरेदी विंन्डो तुमच्या समोर येतो व तुम्ही तेथे तुम्हाला काही इंन्ट्री करावी लागेल, जशी तुम्हाला किती शेयर विकत घेणे आहेत, काय रेट ने विकत घेणे आहेत, मार्केट रेट ने घेणे आहे की तुम्हाला हव्या त्या किंमतीला.

समजा तुम्हाला Sesa Goa स्क्रिप्ट मध्ये तुम्हाला खरेदी (इच्छुक भाव) २५०.१५ पैसे दिसत आहे व विक्री (इच्छुक भाव) २५०.७५ जर तुम्हाला खरेदी करायचे आहे तर दोन मार्ग आहेत जो विकणारा आहे त्याचा रेट २५०.७५ आहे तर तुम्ही तुमचा खरेदी भाव २५०.७५ ठरवून घेऊ शकता पण जर तुम्हाला २५०.१५ नेच विकत घेणे आहे तर तुम्हाला तो भाव ठरवावा लागेल पण जो पर्यंत २५०.१५ च्या भावाने विक्रेता येणार नाही मार्केट मध्ये तो पर्यंत तुम्हाला तो शेयर मिळणार नाही.
समजा एखाद्याने आपला विक्रि रेट २५०.१५ ठरवला तर लगेच तुम्हाला शेयर मिळतील असे नाही, कारण तुमच्या प्रमाणेच अनेकजण तो रेट लावून वाट पाहत असतील , तर सिस्टम तुम्हाला नंबर प्रमाणे शेयर देत राहतो म्हणजे समजा तुम्हाला १०० शेयर खरेदी करायचे आहेत व तुमच्या आधी ४०० शेयर त्याच रेटने खरेदी होण्यासाठी वेटिंगमध्ये आहेत तर आधी त्यांना मिळेल व मग तुम्हाला.

समजा तुमच्याकडे १०० शेयर सेसागोवाचे जमा झाले, खरेदी प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर तुमच्याकडे शेयर जमा झाले की नाही हे पहाण्यासाठी तुम्हाला ट्रेड रिपोर्ट चेक करावे लागेल जेव्हा तुमच्या ट्रेड रिपोर्ट मध्ये व नेट पोझिशन मध्ये शेयर दाखवत असेल तेव्हाच तुम्ही ते शेयर विकण्याची प्रक्रिया चालू करा नाही तर शॉर्ट सेलिंग होईल ( हे नंतर समजावून घेउ की शॉर्ट सेलिंग म्हणजे काय) शेयर विकण्यासाठी तुम्हाला खरेदी भाव काय आहे ह्याचा अंदाज घ्यावा लागेल.

१ शेयरची किंमत = २५०.१५ पैसे X १०० = २५०१५.०० रु. जो मार्केट रेट आहे त्याप्रमाणे.
व तुम्ही ते १०० शेयर २५१.५० पैसेच्या भावाने विकले तर २५१५०.०० रु.


काय काय खर्च जोडला जातो त्याची माहीती.

खर्च नंबर एक = ब्रोकरेज = ३ पैसे इंन्ट्राडेवर / डिलेव्हरी वर ३० पैसे.
खर्च नंबर दोन = सर्व्हिस टेक्स =१०.३% बोकरेजवर
खर्च नंबर तीन = एसटीटी ( सिक्युरिटी ट्रानजेक्शन टॅक्स ) = इंन्ट्राडे वर ०.०२५% विक्रिवर फक्त / डिलेव्हरी विक्रिवर ०.१२५% खरेदी विक्रीवर


१०० शेयर खरेदीवर २५०१५.०० रु. चा खर्च.
२५०१५.०० रु वर ब्रोकरेज ३ पैसे प्रमाणे ईन्ट्राडेवर ७.५० पैसे. / ३० पैसे दराने डिलेव्हरीवर ७५.०५ पैसे.
ब्रोकरेजवर सर्विस टेक्स ईन्ट्राडेवर ०.७७ पैसे. / डिलेव्हरीवर ७.७८ पैसे.
_______________________________

२५०२३.२७ ह्या भावाने तुम्हाला १०० शेयर भेटले (सर्व खर्च जोडून) ईन्ट्राडेवर.
२५०९७.८३ ह्या भावाने तुम्हाला १०० शेयर भेटले (सर्व खर्च जोडून) डीलेव्हरीवर.


आता

विक्री = २५१५०.०० रु.

१०० शेयर खरेदीवर २५१५०.०० रु. चा खर्च.
२५१५०.०० रु वर ब्रोकरेज ३ पैसे प्रमाणे ईन्ट्राडेवर ७.५५ पैसे. / ३० पैसे दराने डिलेव्हरीवर ७५.४५ पैसे.
ब्रोकरेजवर सर्विस टेक्स ईन्ट्राडेवर ०.७८ पैसे. / डिलेव्हरीवर ७.७७ पैसे.
विक्रीसाठी एसटिटि ( सिक्युरिटी ट्रानजेक्शन टॅक्स ) इंन्ट्राडेसाठी ६.२९ रु. / डिलेव्हरीवर ३१.४४ रु.

विक्रि खर्च काढून तुमची विक्री रक्कम = २५१३५.३८ ईन्ट्राडेवर
विक्रि खर्च काढून तुमची विक्री रक्कम = २५०३५.३४ डिलेव्हरीवर.आता तुम्हाला फायदा झाला की तोटा हे पाहू.

ईन्ट्राडे वर...

खरेदी भाव - २५०२३.२७
(वजा) -
विक्रि भाव - २५१३५.३८
___________
एकुन -११२.११

म्हणजे ईन्ट्राडेवर तुम्हाला ११२.११ पैसे फायदा झाला ( नेट पोझीशन मध्ये फायदा नेहमी वजा व तोटा नेहमी आधी चिन्हाने दाखवला जातो)

डिलेव्हरीवर...

खरेदी भाव - २५०९७.८३
(अधिक) +
विक्रि भाव - २५०३५.३४
___________
एकुन +६२.४९

म्हणजे डिलेव्हरीवर तुम्हाला ६२.४९ पैसे तोटा झाला ( नेट पोझीशन मध्ये फायदा नेहमी वजा व तोटा नेहमी आधी चिन्हाने दाखवला जातो)
ह्याचा अर्थ तुम्हाला डिलेव्हरी मध्ये प्रॉफिट मार्जिन नेहमी इन्ट्राडे पेक्षा जास्त ठेवावे लागेल कमीत कमी डिलेव्हरीचा खर्चाचा अंदाज घेऊनच शेयर विक्रीची किमंत ठरवावी जेणे करुन तुम्हाला नकळत तोटा होणार नाही.

पुढील भागात आपण चार्ट / ग्राफ पहाणे व इंट्राडे टिप्स कसे काम करतात ते पाहू.


छायाचित्र गुगलद्वारे
क्रमश :

शनिवार, १९ सप्टेंबर, २००९

लफडा

प्रेम बिमसब झुट.. नाटकं आहेत.. प्रेमात पडायचं कश्याला ?
हा मुर्खासारखा प्रश्न मी अनेकांच्या तोंडातून बाहेर पडताना पाहीला आहे,
त्यांची किव करावी शी वाटते,
अरे यार प्रेम कधी ना कधी तुम्ही पण केलंच असेल ना..
पण काही कारणामुळे तुम्ही अयशस्वी झालात म्हणुन सरळ प्रेम भावनेवर ब्लेम ?
नाय यार हे काय चांगले नाही ! आपण आपला दोष कोणावर तरी का काढायचा :?

आता बघ ना, परवा माझा एक मित्र खुप दुख:त होता दारु पीत होता..
मी विचारलं काय झालं रे बाबा.. तु असा देवदास कसा झाला
तो म्हणाला... ती नाही म्हणाली.. व दोस्ती पण तुटली !
मी म्हणालो... असं कसं ? प्रेम नाही तर नाही दोस्तीची का वाट लावली तीने ?
तो म्हणाला... माहीत नाही... भेटु नकोस म्हणून सांगितले ती ने !
मी म्हणालो... ओ तेरी लफडा मोठा आहे... माझ्याशी बोलायला सांग !

ती हा ना करत बोलली माझ्याशी !
मी म्हणालो... तो त्याने तुला प्रपोज केलं !
ती म्हणाली... हो. पण मी नाही म्हणाले !
मी म्हणालो... का ? नाही म्हणालीस !
ती म्हणाली... आवडला नाही !
मी म्हणालो .. दोस्ती होती ना ?
ती म्हणाली.. हो दोस्ती होती !
मी म्हणालो... मग नावडत्या व्यक्ती बरोबर दोस्ती कशी ?
ती म्हणाली .. दोस्त म्हणून आवडत होता पण त्या नजरेने नाही पाहीलं कधी !
मी म्हणालो... ती नजर ? चल ठीक ती नजर नाही पण दोस्त म्हणून तर आवडता होता ना ?
ती म्हणाली... ह्म्म हो, दोस्त म्हणून चांगला होता.
मी म्हणालो... मग दोस्ती का तोडली ?
ती म्हणाली... त्याने प्रपोज केलं होतं ना त्यामुळे !
मी म्हणालो... प्रपोज ठीक आहे.. पण दोस्ती का तोडलीस ?
ती म्हणाली... माहीत नाही, पण भीती.
मी म्हणालो... दोस्ताची भीती ?
ती म्हणाली... नाही, पुन्हा प्रपोजची भीती.
मी म्हणालो... नाही म्हणाली तर तो पुन्हा का प्रपोज करेल ?
ती म्हणाली... केला तर ? त्यामुळे दोस्ती नकोच.
मी म्हणालो... प्रपोजचं केलं ना.. चाकू दर नाही दाखवला !
ती म्हणाली... पण मला भिती वाटत होती म्हणून दोस्ती पण नको म्हणाले !
मी म्हणालो... तुला कोण दुसरा आवडतो ?
ती म्हणाली... हो !
मी म्हणालो... तुझी त्याच्याशी मैत्री आहे ?
ती म्हणाली... हो !
मी म्हणालो... तु त्याला प्रपोज केलंस ?
ती म्हणाली... नाही, भीती वाटते.. नाही म्हणेल ह्याची !
मी म्हणालो... तुला कसली नाही हीची भीती.. विचारुन बघ.
ती म्हणाली... नाही म्हणाला तर दोस्ती पण तुटेल.
मी म्हणालो... तुटली तर तुटली.. त्यात काय !
ती म्हणाली... नाही, चांगला मुलगा आहे.. !
मी म्हणालो... ज्यानं प्रपोज केलं त्याच्यात व तुझ्यात काय फरक आहे माहीत आहे ?
ती म्हणाली... नाही.. !
मी म्हणालो.. त्याच्यात गट्स आहेत.. आपलं प्रेम व्यक्त करण्याचं !
ती म्हणाली... ह्म्म शक्यतो !
मी म्हणालो... शक्यतो नाही , आहेत. ज्याच्या मध्ये गट्स आहेत अश्या मित्राला तु सोडत आहेस.
ती म्हणाली... पण !
मी म्हणालो... आता कसला पण ? तो देवदास झाला !
ती म्हणाली... हो कळालं मला पण !
मी म्हणालो... मग ?
ती म्हणाली... तु समजव त्याला.
मी म्हणालो... तेच करतो आहे.
ती म्हणाली... विचार करेन.


गेली ! त्याला फोनवला व म्हणालो तुझं अर्ध काम रस्तावर आणलं आहे खड्डा मारु नकोस परत.. वाट बघ !


काही कळाले का तुम्हाला वर काय लिहले आहे ते ?
मला पण नाही ;)

पण तुटलेले दोस्ती व प्रेम जोडायला मला खुप आवडतं !
अरे लोकांना कळतच नाही आपण भांडणाच्या नादात कीती आनंदाचे क्षण व्यर्थ घालवतो ते !

कोण समजवणार ह्यांना ! प्रेमाची महती ... दोस्तीची ताकत जेव्हा ती / तो जवळून गेल्यावर कळते !


भांडा रे भांडायला कोण नको म्हणत आहे... पण जरा प्रेम राहु द्या मनात .. सगळेच दरवाजे कधी बंद करायचे नसतात.. न जा ने कोण कधी जिवनामध्ये कुठल्या वाटेला भेटेल !

माय व्हॅलंटाईन

माय लास्ट व्हॅलंटाईन !

कशी आहेस तु ? आनंदात आहेस ना ? मला विसरली आहेस ना आता नक्कीच ? असे अनेक प्रश्न मला विचारायचे आहेत गं. पण त्या प्रश्नांना तुझ्या पर्यंत कसे पोहचवू ! चल हरकत नाही मी पाहतो आहे ना तुला ह्यातच आनंद आहे ! तुला जाणवत नसेल की मी तुझ्या आसपास आहे.. माझं मन तुझ्याच आसपास घुटमळत आहे... !कित्येक वर्ष झाली मला तुला काही गिफ्ट देऊन पण.. तुला आठवतं का ? आपला लास्ट व्हॅलंटाईन डे ? नेहमी प्रमाणेच मी आलो होतो तुझ्या जवळ... पण आपल्या बाबांना आसपास पाहून नजरेच खुणवले होते... नंतर .. कसं विसरु ते मी ! तु दिलेले एकएक गिफ्ट माझ्या घरी अजून ही असेल. ... ती कोमजलेली फुलं.. तो माझ्या नावाचा काचेचा गोलक.. ते तु दिलेला.. पेन .... ती ग्रिटिंग कार्डस... सर्व काही आहे अजुन ही माझ्या बॆगेत.. ! मी दिलेले गिफ्ट तु असेच जपुन ठेवले आहेस का ? ह्म्म.. नसावी.. तु नाही ठेवणार मला माहीत आहे... ! हरकत नाही..!तु नेहमी म्हणायचीस .. आपलं प्रेम कसं नजर लागण्यासारखं आहे नाही... लोकांना तर नवल वाटत असे... ही विचित्र जोडी पाहून... तु परी सारखी रेखीव व मी असाच नमुना ! तरी ही आपलं प्रेम फुललं पण न जाने कुनाची नजर लागली... असल्याचं नसलेले झालं ! हरकत नाही यार हे सगळे माझं नशीब खोटं ... त्यामुळे !


तुझ्या प्रत्येक शब्दांना मी जपावं व तुझ्या साठीच शेवट पर्यंत श्वास घ्यावा, हा असला विचार मी खुप वेळा केला.... व्हॅलंटाईन डे आला परत.. दर वर्षी येतो... ह्यावेळी पण आला ! तुझी आठवण आली... ! येऊ नये ह्यासाठी खुप प्रयत्न केला.. पण मी वेडा.. !
तुझ्याच आठवणीमध्ये झुरतो.. आहे.. असाच.. वेड्यासारखा ! कधी तरी जाईन ही हे जग सोडून.. तेव्हा मात्र मला खरोखर आनंद मिळेल.. मुक्त झाल्याचा आनंद !


तसं पाहता ह्या दिवसाचं मला काहीच अप्रुप नाही गं .... असे अनेक दिवस येतात जाता.. प्रेमी-प्रेमिका आपले मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी हाच दिवस वापरतात... सगळेच वापरतात म्हणून मी देखील वापरत होतो बस्स ! पण आज तु जवळ नसल्यावर मला खरंच ह्या दिवसाचं महत्व कळालं गं ! कधीच आठवण येऊ देत नाही मी तुझी... पण ह्या दिवशी मी मात्र असाह्य होतो... अगनिक एसएमएस.. मेल... मित्रांचे संदेश.. व प्रत्येकामध्ये.. प्रेमाचा इजहार ! कसं गुदमरल्या सारखं होतं मला हे तुला नाही समजणार कधी ! तु कधी आपलं कोणीतरी हरवलं आहे.. दुर गेलं आहे... असा विचारचं केला नसशील त्यामुळे तुला काहीच वाटत नसेल ... त्यामुळेच तुला कळनार नाही विरहाचं दुख: काय.. आहे... माझ्या मनाची उलाघाल समजणं तुला जमणारच नाही... शक्यतो हे सगळे माझ्या मनाचे खेळ आहेत हे मला ही माहीत आहे.. .. तु आता माझी नाहीस हे देखील.. पण कधी तरी... कुठल्यातरी जन्मामध्ये तु फक्त माझीच होण्यासाठी नक्कीच ये ...******************


काही नाती... कधीच जुळत नाही ! पण त्या नात्यांच्या मुळे होणा-या अगणिक जखम घेऊन कोणी तर असाच माझ्या सारखां अश्वथामा वावरत असेल... कुठे तरी... बाबा रे... हे दुख:.. प्रेम... नशा... काहीच नाही रे ! उगाच झुरत नको बसू.... कुठल्यातरी... कोप-यावर.. जिवनाच्या अनोळखी वळणावर... कोणी ना कोणी तर आपलं भेटेल... त्याचा हात पकड ! जगण्यातला आनंद तुला नक्कीच सापडेल रे भावा ! आम्ही काय रे ! आलो काय गेलो काय.... आता संपलोच आहे... असाच एखादा क्षण मला मुक्त करुन जाईल !

त्या दिवशी... माझा व्हॅलंटाईन पण माझ्या ऋणातून व मी त्याच्या ऋणातून मुक्त होईन.*******************
दिल-ए-नादान अजब जुस्तजू में क्यूँ है
तुझसे शौक-ए-गुफ्तगु में क्यूँ है
मैंने चाहा है बहुत तुझ को
तु मेरी हर एक आरजू में है
तु मेरे साथ है तो लगता है ऐसे
एक उजाला सा मेरी रूह में है
जुदा खुद से करूं तो कैसे करूं
तेरी चाहत तो गर्दिश-ए-लहू में है। - अनाम कवी

वहां कौन है तेरा मुसाफिर जायेगा कहां

वहां कौन है तेरा मुसाफिर जायेगा कहां


दम ले ले घड़ी भर ये छैंया पाएगा कहां

बीत गये दिन, प्‍यार के पल छिन

सपना बनी वो रातें

भूल गये वो, तू भी भुला दे

प्‍यार की वो मुलाक़ातें

सब दूर अंधेरा, मुसाफिर जाएगा कहां ।।

कोई भी तेरी राह ना देखे, नैन बिछाए ना कोई

दर्द से तेरे कोई ना तड़पा, आंख किसी की ना रोई

कहे किसको तू मेरा, मुसाफिर जाएगा कहां ।।

कहते हैं ज्ञानी, दुनिया है फ़ानी

पानी में लिखी कहानी

है सबकी देखी, है सबकी जानी

हाथ किसी के ना आई,

कुछ तेरा ना मेरा, मुसाफिर जायेगा कहां ।।

दम ले ले घड़ी भर ये छैंया पायेगा कहां ।।
गाईड मधिल एक माझं आवड्तं गाणं मी एकत आपल्या संगणकावर खेळत होतो...
आज तीला जाऊन काही वर्षे झाली... व आजच अनिल ने वळण.. ही कथा लिहली... ! ह्या दर्द पेक्षा अजून काय मोठा दर्द हवा जिवनामध्ये... हा डोक्यात विचार चालू होताच तोच काही तरी डोक्यात आलं व लिहायला बसलो.. नाय घाबरु नका प्रेमभंगावर नाही लिहतो आहे ;) पण प्रेमावर जरुर लिहतो आहे... सांगावं लागत आहे हो... मी जरी संगणक / नेटवर्कींग / शेयर मार्केट बद्दल जरी लिहले तरी लोकांना वाटतं की त्यात पण प्रेमभंगावरची कथा असू शकेल =)) पण आज तुम्हाला पिडायचा प्लान नाही आहे.. आज माफ केला....;) काही प्रश्न पडले मनाला त्यांचे उत्तर शोधत शोधत मनामध्ये काही विचार उमलले तेच लिहतो आहे.. !

अनेक कवी / लेखक / कथा / चित्रपट आम्हाला जवानीच्या उंभरठ्यापासून हेच सांगून गेले की प्रेम फक्त एकदाचं होतं.. ! पहिलं प्रेम ते प्रेम बाकी.. ? हा प्रश्न डोक्यात आला व मी जरा गोंधळलो.. माझे पहीले प्रेम काय होतं ? त्याकाळी मला कोण तरी दुसरीच आवडत होती... ते माझं प्रेम होतं.. पण प्रेमाचं वय नव्हत.. त्यावेळी मी शाळेत होतो ;) .. त्यानंतर ही प्रेम झालं.. त्यावेळी मी दहावी मध्ये होते... ;) तीन एक आठवडे प्रेमप्रकरण चालवलं.. पण मी शाळा सोडली व तीने मला... त्यानंतर ची सर्व कहानी मिपावर आहेच... ! मग हे काय सगळे माझे मुखवटे होते ? नाही यार.. बॉस ! प्रेम लाईफ मध्ये एकदाचं होतं असे नाही.... प्रेम एक अशी भावना आहे की... ज्यामध्ये तुम्ही कुणावर प्रेम करता आहात.. हे जरुरी नाही पण कोण तुमच्यावर जिवापाड प्रेम करत आहे.. कोण तुम्हाला ह्दयाच्या एका कोप-यातून साद देत आहे.... हे समजणे जरुरी आहे.. !

कोणी तरी हळूवार पणे तुमच्या जिवनामध्ये प्रवेश करतो... तुमच्या आवडी निवडी.. तुमचं जगणं.. हसणं .. रडणे.. बिझी असने... रागावणॆ... दुर जाणे.. जवळ येणे.. तुमचा विचित्र स्वभाव... स्वत:च संभाळणे... दुख: मध्ये पण हसणे... कळत नकळत स्वत:ला हरवणं... हे कोणी तरी पाहत असतं ! कोणी तरी चुकुन का होईना तुमच्या कडू आठवणी व तुमच्या मध्ये आलेली / आलेला असतो / असते ... त्यावेळी काय करावं हेच आपल्याला कळत नाही व आपण नकळत त्या प्रेमापासून दुर जाण्याचा प्रयत्न करतो... मग त्यासाठी आपण खुप बचकानी कारणे देतो.. मी असा आहे ..ती अशी आहे... मी एवढा शिकलेला आहे.. ती एवढी शिकलेली आहे.. मी ह्या लेव्हलला आहे ती त्या लेव्हलला आहे.. मी असा आहे ती अशी आहे... तीच्या बरोबर स्वत:लाच कळत नकळत कंपेयर करतो व आपण त्या नात्यापासून दुर जाण्याचा प्रयत्न करतो.. स्वत:ला एका कोषामध्ये गुरफटून घेण्याचा प्रयत्न करतो... व अचानक आपण एक स्वत:ला कुठल्यातरी गोष्टी मध्ये रमवून घेण्याचा प्रयत्न करु लागतो... सुखाचे पल असेच स्वत: आपल्या जवळ आले असताना आपण पळून जाण्याचा प्रयत्न करतो.. व त्या मागे आपल्याकडे कारणे देखील सशक्त असतात.. असं आपल्याला वाटतं.. पण खरं तर ती कारणे एकदम पोकळ असतात हे आपल्या मनाला पण माहीत असतंच !

आपण आपल्या मनाला जुन्या गोष्टी मध्येच रमण्याचा प्रयत्न करतो... आपण स्वत:च आपल्या जुन्या जखमा रोज ओरबडून काढतो... जर ते जमले नाही तर.. कुठतरी कुठल्यातरी गोष्टीचा संदर्भ आपल्या दुख:शी लावतो.. व जे जवळ आहेत ते थोडेफार किमती अश्रु जो आपल्या जवळच नाही त्याच्यासाठी व्यर्थ करतो.. ते जमले नाही तर मग कुठे... व्यसनामध्ये.. स्वत:ला परत गुरफटून घेतो व म्हणतो... माझं दुख: कुणाला कळणार.... अरे मुर्खा ! कोण तरी जवळ येत आहे हे सोडून शतकामागे झालेल्या प्रेमप्रकरणावर रडत बसलास तर कोण येईल तुझ्या जवळ... हे माझं मत.. पण मी पण चुकतोच.. ना.. बरोबर आहे.. दर्द खुप मोठी गोष्ट असते.. सहन करणे व लपवणे तर खुप मोठ्या गोष्टी... भले भले... बरबाद ह्या दर्द मुळे... ! पण ह्या दर्द वर कोण तरी फुंकर घालायला तयार असले तर ? तरी ही त्रासच ? का तर..मागचे जिवन कधी तरी पुढे येईल.. अरे यार.. जर मागचे जिवन तु आपल्या खांद्यावर बाळगण्याची हिंमत ठेवतो तर.. त्याला / तीला सांगायला काय हरकत आहे... जर खरंच ती / तो तुला सर्व गुण - अवगुण माहीत असताना तुझ्या वर प्रेम करत आहे तर काय अडचण सत्य बोलायला ? समजा तीने / त्याने जर तुमचे दुख: दर्द समजुन घेतला तर ? अरे यार... बहार येईल जिंदगी मध्ये... जे हरवलेले सुख आहे...ते खरचं पदरात येईल... जन्नत दिसेल प्रेमामध्ये ! कोणीतरी हक्काचे असेल आपल्या जवळ.. ! व समजा तीने / त्याने तुमचे सत्य स्विकारलेच नाही तर... अरे बॊस... ना दुनियासे दारु खतम हुई ना.. दोस्त... ;) चालूच आहे ना जिने .. ! पण जरा पॉझीटिव्ह विचार करायला काय हरकत आहे ?

माझे जरा नशीब कमजोर होतं.. अथवा... प्रेम नावाचा हिस्सा माझ्या नशिबी नव्हताच.. असे अनेक जण डायलॉग मारतात... अरे प्रेम रोज तुमच्या ह्दयाला टकटक करुन जातं .. पण त्याला तुम्ही प्रतिसाद कुठे देत आहात... म्हणे नशीबात नव्हतं... ! माय फुट... अरे ज्या जगात कुत्र्या माजंरावर जिवापाड प्रेम करणारे आहेत... तेथे एका बोलत्या.. चालत्या.... ह्याचं हदय धडकतं .. ज्याला प्रेम भावना म्हणजे काय कळतं... अश्या मनुष्याशी कोणी प्रेम करणारेच नाही ह्या जगात असं कसं होईल यार... ! कोणी तरी आहे यार.. समजुन घेण्याची बात आहे... जर हे समजल तर मग काय.... गालावर मोरपंखांचा स्पर्श होणे म्हणजे काय हे काही क्षणात समजेल.. पण येथे एक अट आहे...खुप कमी वेळा असं होतं की ती प्रेमाबद्द्ल स्वत: बोलते.. बॉस हे तुला स्वत:ला ओळखावे लागेल... नाही तर गाडी कधीच रस्तावर येणार नाही... ! हिंमत तर करावी लागते.. त्याने / तीने केली तर क्या बात !

मला ही माहीत आहे ह्या सगळ्या लिहण्या-बोलण्याच्या गोष्टी.. पण मित्रा जर तुला कोण तरी भेटलेच...तर.. तु काय करणार त्यावेळी ? मागे मी एका गोष्टीत गटस बद्द्ल लिहले होते.. ही खुप कामाची गोष्ट आहे बॉस ज्याच्याकडे गटस आहेत ना.. ती व्यक्ती कधीच मरत नाही... मी लिहून देतो हवं तर.. भरोसा ठेवा...! अरे जराशी हिंमत... जगण्यातील मजा कळेल यार.. ! शोधा शोधा.... जवळ पास कोणीतरी असेल जो तुमच्यावर जिवापाड प्रेम करत असेल.... ! जेव्हा हे प्रेम मिळेल ना तुम्हाला बॉस ... तु खुषीने पागल होशील हे नक्कीच.. अरे प्रेमाची नशा तुला माहीत असेलच.... जरी माहीत नसली तरी... कोणी तुझ्यावर प्रेम करतं... ही भावनाच अनमोल आहे यार... ! जगणं खुप सोपं आहे.. मित्रा.. अरे आरामात जगता येतं फक्त मुखवटे चढवं बस्स..पण प्रेमात मुखवटे नाही चालत बॉस ... ! चुकुन मुखवटा घालून प्रेम केलंस ना.... तोंडावर पडशील... जेथे प्रेम आहे तेथे सत्य देखील असावेच लागते नाही तर... लफडा.. त्याला प्रेम नाही म्हणत मग... त्याला धोका म्हणतात...! सत्याला जवळ ठेव .... कधी तरी... जिवनाच्या कुठल्यातरी मार्गावर कोणी ना कोणी एक गुलाबाचं फुलं तुझ्यासाठी खास घेऊन उभे असेल... जेव्हा ती व्यक्ती तुला भेटेल तेव्हा शक्यतो तुझ्या कडे काही नसेल देण्यासाठी.... पण जी व्यक्ती तुला देण्यासाठी काही घेऊन येत आहे त्यासाठी तुझे बोलच अनमोल असतील.. प्रेमाचं असंच असत यार... जे घेण्यावर नाही... देण्यावर भरोसा ठेवतं !!!! चिल्ड !! बी कुल !..... जरा मागील रात्र सोड... नवीन पहाट होत आहे.... नवीन सुर्य उगवत आहे.. स्वप्न व सत्य ह्यातील फरक कळण्याचा वेळ आला आहे.... जागा हो बॉस जागा हो !

***********
क्रमश: नका समजू..जो पर्यंत जगत आहे तो पर्यंत प्रेमाचा कधीच द एंन्ड होणार नाही.... पण कधीतरी असाच वेळ मिळाला व काही डोक्यात घोळत असेल त्यावेळी पुढील पार्ट जरुर लिहीन.... :)

***********
हसण्यासाठी कारण शोधत बसू नका... बस हसा.. हसा.. मनसोक्त हसा... जगण्याचे चारच पल असतात आपल्या जवळ... बाकीचे जगणे आपण कोणा ना कोणासाठी तरी जगत असतो... पण ते चार पल असे जगा की जगाला याद राहिले पाहीजे.. हां यार तो होता... खुप मजेशीर, हसमुख व जिंदादिल ! मुडदे मला मित्र म्हणून आवडत नाहीत बॉस !!!

<बेवडा>

येतो एक आवाज गुत्यातून
चीरुन दारुड्यांचा पडदा..
अन रम, आपली व्हिसकी
दंग पिण्यात बेवडा...!!

अन इथे...
पुन्हा पिण्याची उबाळ येथे
पडले हो बेवारस...
बेवडा एक परि, करुनी तंगडी वरी
हसले सगळे त्यावरी, खी खी खी... !

बियर मध्ये स्नानं करिश्ये..
बेंजोचा आवाज जबर
बेवड्यांच्या मुखा वरती
दारु, व्हिसकी ची संतत धार..

इथे..
घोंगावती तोंडावरती
असंख्य माशा किती
खिदळतं उभी माणसे.
दुरुनच जरा बघती...

बारबालेची मिठी गळा
जर गेला माझा हात कमरे वर
मला ती जागा आवडे निरंतर
ती वाजवे थप्पड मला तर

हेची ध्यान..
गुत्यात चाले
डान्स बार..

आली आली पोलीसाची,
गाडी आली कुठुन
करुनी बंद गुत्ता, बेवड्यांचा
नेले तंगडी पकडून... !!

मदिरेचे शिरोमणी
गाती अम्रुत वाणी..
नवीन पोपट हा:
लागला विटु विटु बोलाया:...

रात्र संपली त्याची माझी
अन गुत्येवाला ही झोपला
ॐ शांती : शाती: शांती:

********

चन्द्रशेखर गोखले ह्यांची क्षमा मागून त्यांच्या ह्या कवितेचे विडंबन !
* नाव नाय सुचलं .. सुचवा.

हत्या !!!

खुप दिवस झाले मनात एक कथा रेंगाळात होती ती आता शब्दातून बाहेर पडत आहे, बघा कशी वाटते ती .

*

"फोन कुणी केला होता ? "- पोलिस अधिकाराने विचारले, " साहेब मी केला होता, ह्यांचा शेजारी आहे मी, रोज सकाळी हे जॉगिंगला येतात पण आज आले नाही म्हणून मी सहज विचारायला आलो तर दार उघडे होते व हे सोफ्यावर.. निपचित पडलेले होते म्हणून मी घाबरुन फोन केला तुम्हाला."- शेजारी म्हणाला.

शहराच्या पॉश एरिया मध्ये राजकिय व व्यवसायी मंडळी मध्ये उठबैस असलेल्या अरविंद ची हत्या झाली होती, बाहेर प्रेसवाले / टिव्ही वाले हल्लाकोळ करत होते व पोलिस अधिकारी आपले काम करत होते, अरविंद चे शव डाव्या बाजूला कललेल्या अवस्थेमध्ये सोफ्यावर होतं, जवळच मोबाईल, सिगरेटचे पॉकिट व समोर टेबलावर दारुची बाटली एक ग्लास गाडीची चावी व टिव्हीचा रिमोट पडलेला होता, ग्लास मध्ये थोडी दारु होती अजून . जवळच एक स्कार्प पडला होता व शक्यतो त्याचा वापर करुनच अरविंदा गळा दाबला गेला असावा. जवळ पास झटापटीच्या काहीच खाणाखुणा दिसत नव्हत्या. वयाने अडतीस-चाळीस च्या दरम्यान असलेल्या व शरिराने ताकतवर असलेल्या अरविंद ने कसा काय वाचण्याचा प्रयत्न केला नसेल हा विचार करत असताना पोलिस अधिकारी इकडे तिकडे पाहू लागले होते त्यांना जी गोष्ट हवी होती ती दिसत नव्हती, पाण्याचा जग अथवा सोड्याची बाटली, म्हणजे काय अरविंद डायरेक्ट पॅग घेत होते व जास्त झाल्यामुळे त्यांच्या कडे आपल्या बचावाची ताकतच राहिली नसावी, हा विचार करत असताना त्या अधिका-याने जेथे ग्लास ठेवला होता तेथे जरा निरखून पाहीले व म्हणाले " येथे अजून एक ग्लास असला पाहीजे, ह्याचा अर्थ ह्यांच्या बरोबर दुसरा कोणी तरी होता जो दारु पण पीत होता व ती शक्यतो शेवटची व्यक्ती होती ज्यांने अरविंदला जिवंत पाहिले असेल. त्यांनी रुमालानेच मोबाईल उचलला, चांगल्या कंपनीचा मोबाईल होता, शेवटची कॉल कुणातरी शर्माची होती जी चाळिस एक सेकंदाची होती पण त्याच्या आधीची कॉल सतिशची होती जी जवळ जवळ अर्धातास चालू होती जी ८ च्या सुमारास आली होती व डॉक्टरांच्या टिम ने सांगितले की हत्या रात्री साडे नऊ ते दहा च्या आसपास झालेली असावी.

*

काही विचार करत पोलिस अधिका-याने सर्व घर व्यवस्थीत पाहून घेतले जवळ जवळ प्रत्येक वस्तू जागेवरच होती, त्यामुळे चोरी हा उद्देश नव्हताच हत्येचा, परत ते किचन मध्ये आले व शोधक नजरेने काही तरी शोधू लागले व त्यांच्या चेह-यावर एक अस्पष्ट असे समाधान दिसले, ते समोरील ग्लासच्या रॅक कडे पाहत होते, १२ ग्लास पैकी एक ग्लास बाहेर टेबलावर होता व एक गायब होता. तो सेट पुर्ण नव्हता, पण शक्यतो एकाद दुसरा ग्लास फुटला असेल कधी तरी हा विचार करुन त्यांनी इकडे तिकडे पाहिले तर प्रत्येक वस्तूचा बरोबर सेट होता, १२ प्लेट, १२ बाऊल्स, चमचे सर्व काही १२ च्या संख्ये मध्ये. ह्यांच्या घराचा नंबर पण डी-१२ होता, तेव्हा शक्यतो अरविंद आपल्या स्वतःसाठी बारा नंबर लकी समजत असावेत, तेव्हा जरी ग्लास फुटला असेल तर त्यांनी तो सेट नक्कीच पुर्ण केला असेल मग. आता तो ग्लास शोधणे गरजेचे होते कारण तो शक्यतो तो हत्या-याला पकडण्यासाठी मदत करेल.

*

बाहेर गार्डन मध्ये, मागे सर्विस कॉटर मध्ये, गॅरेज मध्ये सर्वत्र शोधा सोध करुन झाली पण काहीच सापडले नाही ज्याच्या द्वारे हत्या करणा-याची ओळख होऊ शकेल, अरविंद एकटाच राहत असे व जवळ जवळ तो रोजच पार्टी ला बाहेर जात असे त्यामुळे फक्त सकाळी घरकाम करण्यासाठि एक गडी होता जो घर स्वच्छ करणे, कपडे धुणे इत्यादी करुन २ वाजता निघून जात असे, घराची एक चावी त्याच्या कडे व एक अरविंद कडे होती, व्हिआयपी एरिया असल्यामुळे सर्वत्र गार्ड फिरत असतचं त्यामुळे समोरच्या घराचा गार्डच अरविंदच्या घरावर ही लक्ष ठेऊन असे.

*

गार्ड कडे थोडी फार माहीती मिळाली पण जरा ही कामाची नव्हती, सात-आठ जणे वेगवेगळ्या गाड्या घेऊन आले होते व थोड्या थोड्या अतंराने निघून गेले होते पण रात्री एक गाडी परत आली होती, व लगेच पाच मिनिटात गेली होती, पण काही कारणामुळे गार्ड त्या गाडिचा नंबर सांगू शकत नव्हता.. नाही तो गोंधळला होता, त्यांचे म्हणणे होते की अरविंद हे १२ च्या आसपास गाडी घेऊन बाहेर गेले होते व १२.४५ च्या आसपास परत आले पण डॉक्टरांच्या म्हणण्यानूसार हत्या साडे नऊ च्या आसपास झाली आहे, व सर्वात महत्वाचे गाडी तर आत गॅरेज मध्ये उभी आहे व हा म्हणतो आहे गाडी बाहेर गेली .. तर मग हे गाडीचे काय लफडे .. हा विचार करत पोलिस अधिकारी पुन्हा गॅरेज कडे आला व येथे असलेली स्विफ्ट गाडी ला एक चक्कर मारली व विचार करु लागले. त्यांनी काही तरी नक्की ठरवले व जी फिंगर प्रिंन्ट ची टिम आत ठस्से घेत होती त्यांना ह्या गाडीचे पण ठस्से घेण्यासाठी सांगितले.

*

"यु आर अंडर अरेस्ट मीस्टर सतिश "- पोलिस अधिकारी म्हणाला, " तुम्हाला माहीत आहे मी कोण आहे ते " - सतिश जरा गुर्मीतच म्हणाला, " हम्म, हो मला माहीत आहे तुमचे कनेक्शन खुप वर पर्यंत आहेत पण सबळ पुरावा माझ्या हाती आहे की तुम्हीच अरविंदचा खुन केला आहे व तुमचे हाताचे ठस्से व सर्वात मोठा पुरावा अरविंदचा मोबाईल आहे, ज्या मध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग आहे."
सतिशचा चेहरा पडला व तो मटकन आपल्या खुर्ची वर बसला. " मिस्टर सतिश, तुम्ही अरविंदशी फोन वर अर्धा तास बोललात, काही तरी तुमचा वाद झाला व तु सरळ अरविंदच्या घरी आलात, अरविंद आधी पासून दारु पीत होताच, त्याच्या बरोबर तुम्ही ही दारु पिली व जेव्हा तुम्हाला असे वाटले कि आता अरविंद प्रतिकार करु शकणार नाही तेव्हा त्याच्याच गळ्यातील स्कार्प ने त्याचा गळा आवळला व आपल्या काहीच खाणाखुणा राहू नयेत ह्यासाठी तुम्ही तो ग्लास पण आपल्या बरोबर घेतलात, सरळ गाडीत बसून घरी निघून गेलात, पण येथे तुम्ही एक मोठी चुक केली होती, अरविंद कडे व तुमच्या कडे एकाच कंपनीची , एकाच रंगाची व एकाच मॉडेलची गाडी होती व तुम्ही दोघांनी एकाच दिवशी घेतली होती, व पळून जाण्याच्या गडबडी मध्ये तुम्ही चुकून अरविंदची गाडी घेऊन गेलात, शक्यतो तुम्ही घरी पोहचला असाल तेव्हा तुम्हाला तुमची चुक लक्षात आली, तुम्ही ती आपली चुक सुधारण्यासाठी परत अरविंदच्या घरी आलात, त्याची गाडी जी तुम्ही घेऊन गेला होता त्याला तुम्ही गॅरेज मध्ये उभी केले, येथेच तुम्ही चुकला, अरविंद गाडी गॅरेज मध्ये कधीच उभी करत नसे, हे गॅरेज मध्ये असलेल्या धुळीमुळे आम्हाला समजलेच होते व आजू बाजूला विचारणा केल्यावर पण सर्वांनी घेच सांगितले की गाडी कधीच गॅरेज मध्ये उभी नसते. त्यांनतर तुम्ही अजून चुक केलीत जो ग्लास तुम्ही टेबला वरुन घेऊन आला होता तो नष्ट न करता तुम्ही त्या गाडी मध्येच ठेवला जी गाडी तुम्ही आपली गाडी समजून घेऊन गेला होता, दुसरी चुक तुम्ही केली अरविंदच्या गाडीची चावी तुम्ही परत आत जाऊन अरविंदच्या प्रेता जवळ ठेवली पण त्यावेळी तुम्ही त्यावरचे ठस्से पुसणे विसरलात, घरात तुम्ही सर्व जागी आपले ठस्से साफ केले पण त्या चावी वर व गाडी वर तुमचे ठस्से राहीलेच, आम्ही तुमच्या नकळत तुमच्या हाताचे ठस्से तुमच्या ऑफिस व घरातून घेतले व त्यांची खातर जमा झाल्यावरच तुम्हाला पकडण्यासाठी आलो आहोत वारंट घेऊन. व हत्येचे कारण ही आम्हाला अरविंदच्या मोबाईल मध्येच मिळाले "

*

" अरविंद, हा नेहमी राजकिय नेते व इतर व्यवसायीक लोकांच्या पार्टि मध्ये मला भेटायचा, माझा पण स्वतःचा बिझनेस होता व त्याला वाढवण्यासाठी मी देखील अरविंदच्या ओळखीचा फायदा घेत असे, पण तो पर्यंत मला माहीत नव्हते की अरविंद हा एक नंबरचा नालायक माणूस आहे, त्याच्या बरोबर मी पार्टीमध्ये असताना कधी कधी त्यांने मला कॉल गर्ल्स पुरवल्या व हारामखोराने त्यांचे मोबाईल वर शुटींग केले हे त्यांने मला एकदा दाखवले व म्हणाला की माझ्या गरजापुर्ण करत रहा मी हे प्रेसला देणार नाही पण जेव्हा तु मला पैसे नाही देणार तेव्हा मात्र मी ते प्रेसला व आधी तुझ्या बायकोला दाखवणार म्हनून." सतिश बोलत बोलत थांबला व पाणी पिऊन पुन्हा बोलू लागला " त्यांने आधी गाडी मागीतली मी पण घेणार होतो गाडी, उगाच आपली अब्रु रस्त्यावर येऊ नये म्हणून मी त्याला गाडी घेऊन दिली व त्यांने माझ्या गाडीला व्हिआयपी नंबर दिला व स्वतःच्या गाडीला पण १२ नंबर घेतला, असे तो नेहमीच करु लागला कधी पन्नास हजार तर कधी लाख... अशी त्यांची पैशाची हवस वाढूच लागली होती, मी बरबाद होत होतो, धंद्याचा पैसा त्याला देऊन देऊन माझा धंदा बंद होण्याच्या मार्गावर आला व शेवटचा पर्याय म्हनून मी त्याला एक करोड ची ऑफर दिली व म्हणालो की ते क्लिप्स मला दे. पण त्या हारामखोराला मी सोन्याची अंडी देणारी कोंबडी वाटत होतो त्यामुळे त्यांने त्याला नकार दिला व शेवटचा उपाय म्हनून मी त्याला मारण्याचा प्लान तयार केला मला माहीत होतं की हा रोज संध्याकाळी घरी बसून दारु पितो व फुल्ल टल्ली होऊ पर्यंत पितो व त्या नंतर रात्री १ - दिडच्या आसपास क्लब मध्ये जातो नाचायला. पण तो मरायला एवढा तयार झाला होता की त्या दिवशी त्यांने परत माझ्या कडे दोन लाखाची मागणी केली तेव्हा मात्र मी त्याच्या शी फोन वर भांडलो व पैसे द्यायला येतो म्हणुन त्याच्या घरी गेलो, बाकी पुढचे तुम्हाला माहीत आहेच सर्व." असे म्हणून सतिश शुन्यामध्ये डोळे लावून बसला.

*

काय बोलावं हेच त्या पोलिस अधिका-याला समजले नाही पण तो म्हणाला " सतिशराव, तुमच्या विरुध्द पुरावे सबळ आहेत, पण तुम्ही असा हत्येचा मार्ग शोधावयास नको होता जर तुम्ही आधीच पोलिसांच्या कडे आला असता तर, जी आब्रु वाचवण्यासाठी तुम्ही हत्या केली तीच आबरु कोर्ट व प्रेस समोर उघडी होणारच ना. ठीक आहे तो दोषी होता पण तुम्ही ही कमी दोषी नाही आहात. तुम्ही आपला व्यवसाय वाढवण्यासाठी चुकिचा मार्ग वापरलाच व त्याचा फायदा अरविंद सारखे लोक घेतात.. चला, तुम्हाला आपल्या कबुली जबाबावर सही करायाची आहे आता...


** समाप्त ***

<काय काय वाटतयं>

सगळं डोकं गरगरतय विचित्र वाटतयं
मळमळतय असलं विचित्र फिलिंग वाटतयं
काल पिलेली बाहेर येऊ असं विचारतेय वाटतयं
आताशा अवस्थेमध्ये खुप अस्वस्थ वाटतयं
सगळे जवळ असूनसुध्दा उतारा देणारा एकपण नाही असं वाटतयं
काल रात्री राहिला अर्धा पॅग तो अर्ध्यावर सोडून दिला वाटतयं
'वॅट ६९' कालचा ब्रान्ड आपला नव्हंताच असं वाटतयं
आताशा सकाळ सकाळी खूप मळमळतयं
कसं सगळे विचित्र विचित्र वाटतय
समोर पडलेला तो अर्धा पॅगचा उतारा दिसतोयं
जरा घटकाभर डोकं दाबणारी कोणी लाभणारच नाही वाटतयं
आताशा अवस्थेमध्ये लिंबू पाणी देणारं कोणीच नाही असं वाटतयं
लोक म्हणतात कशाला येवढा पितो कशाला डोकं हँग होव्हर मध्ये झुलेतयं
पण सप्तर॑गी ही दुनिया आपल्यासाठी नाहीच अस॑ वाटतय॑
सोडा असताना पण 'निट' च पिली असं वाटतय
आज पुन्हा सोडायची शपथ घ्यावी असे वाटतय


प्रेरणा - हीच आहे असं वाटतयं ;)

<काल>

नक्कीच काल काहीतरी चुकलय काज
कशानं हे अंग दुखतय आज ?

कधी नाही त्या सुचल्या दोनच ओळी
दंगा घातला भलत्याच वेळी
अनावर नशा रात्रीची व ती खेळी
खेळातील ते वेडे सुख दुखतय आज !

मनातच काय तो खेळ आता डोक्यात ही नाही
सुखाचे गाव कुठे दुरवर राही
दुखती कंबर मलमची का वाट पाही
टपटप पाणी डोळ्यातून पडतय आज !

उदास चेह-याची वाकडी मान
निस्तेज झालो लचकली मान
एक नंबरी जुनं दुखणं
वर आलं उफाळून पुन्हा काल ?

प्रेरणा - आज

माझे महान प्रयोग - २

माझे महान प्रयोग - १ मागील भाग.

सकाळ : ७.१५ मिनिटे नंतर टाईम आसपास ग्रहीत धरा.

सतबीरला काल सुट्टी घे म्हणून सांगतले होतेच, त्यानुसार तो सकाळ पासूनच गायब होता + फ्रिज मधील बियर चे कॅन पण.
चहाची तलफ होती, त्यामुळे उठल्या उठल्या सरळ किचन मध्ये प्रवेश केला, वरुन कोणीतरी फुले टाकत आहे.. दुरवर कुठे तरी जय हो जय हो चा घोष चालू आहे, कोणी तरी सुगंधी द्रव्य शिपंडत आहे असा काही तरी भास मला जेव्हा मी प्रथम काहीतरी निर्माण करण्यासाठी किचन मध्ये प्रवेश करताना झाला !

माझ्या मते चहा ही एक सोपी कृती आहे, चहा पावडर, साखर व दुध ! झाला चहा तयार.. पण माझ्या ह्या मताला लवकरच तडा गेला.. ! भाडं कुठलं घ्यावं ह्यावर दोन मिनिटे चिंतन झाले पण भाजपाच्या चिंतन शिबीराप्रमाणेच काही नक्की न झाल्या मुळे हातात जे आलं ते भांडे उचलले व गॅसवर ठेवले, एक कप शोधला व एक कप पाणी त्या भांड्यात ओतले, मस्त पैकी फ्रिज मधून दुध बाहेर काढले व एक कप प्रमाणे भांड्यात ओतले, थोडीशी शोधाशोध चालू केली साखरे साठी, वरच्या रॅक वरील डब्बा काडताना डब्ब्या बरोबर दोन-तीन ग्लास पण खाली आले, मी कॅच केले असे मला वाटले पण क्षणातच खनखणाट झाला व तीन्ही ग्लास भुईसपाट झाले... हातातला डब्बा किचन च्या ओट्यावर ठेऊन आधी झाडू शोधला व प्लॅस्टिकची सुपली घेऊन धारातिर्थ पडलेले ग्लास चे मोठे तुकडे गोळा केले व डस्टबीन मध्ये त्यांना समाधी दिली. परत माझा मोर्चा चहा कडे वळवला, चहा पुड माझ्या नशीबाने समोरच होती, पण आधी चहा पुड घालावी की आधी साखर ह्या बद्दल निर्णय होत नव्हता त्यामुळे एका हातात एक चमचा साखर व दुस-या हातात एक चमचा चहापुड असे सम प्रमाण त्या दुध-पाणी मध्ये टाकले पण जो कलर निर्माण झाला त्यानुसार मला असे वाटले की चहापुड कमी आहे त्यामुळे मी अजून एक चमचा चहा पावडर टाकली, तोच आठवले की चहापुड जास्त झाली की चहा कडू होतो त्यामुळे मी परत एक चमचा साखर घातली.

सर्व तयारी करुन मी एक कप व काही बिस्किटे काढून ट्रे मध्ये सजवली व विचार केला की अजून एक पाच मिनिटात चहा तयार होईल तो पर्यंत आपण डिश टिव्ही चालू करुन येऊ या. मी टिव्ही चालू करुन परत आलो पण भांड्यात काहीच प्रतिक्रिया चालू असलेली दिसली नाही, मी जरा गडबडलो व खाली वाकून गॅस कडे पाहीले तर मी गॅस पेटवला नव्हता हे मला कळाले, मी स्वतःच हसलो व नॉब फिरवून गॅस चालू केला व लायटर ने खॅट खॅट केले पण गॅस नाही पेटला, आता मात्र मी मला समजेणासे झाले की गॅस का पेटत नाही आहे, मी शेगडी पासून खाली जाणारी नळी पाहील तर मला रेग्युलेटर आठवला, मी सिलेंडर वर असलेला रेगुलेटर पाहिला तर तो सतबीर ने काढून ठेवला होता, मी त्याला मस्त पैकी शिव्या दिल्या दोन तीन.. व तो रेगुलेटर परत सिलेंडर वर जोडला व नॉब चालू करुन गॅस पेटवला.

तोच टिव्ही वर माझे आवडते गाणे, मस्स्ककली मटककली चालू झाले पण बाहेर आलो व टिव्ही वरी गाणे पाहू लागलो तो मला आठवल की चहा. मी पळत आत आलो तर अजून उकळी फुटली नव्हती, मी गॅस समोरच उभे रहावे ह्या निर्णयावर आलो व तेथेच उभा राहिलो चहा कडे बघत. तोच मला आठवलं की कुठे तरी हल्दीराम भुजीया आहे डब्यात, ती पण काढू म्हणून मी मागे वळुन डब्बा शोधू लागलो, डब्बा हाती लागताच मागे काही तरी सुं.. सुं... सुं.. झाले ! चहा ने बंड केला होते व काही चहा उकळी बरोबर भांड्यातून बाहेर शेगडी वर पसरला होता.. मी डोक्याला हात लावला व फटाफट गॅस बंद केला व ह्या गडबडीत ओट्यावर ठेवलेला चहापावडरचा डब्बा खाली कोसळला व मी त्याचे झाकण लावले नव्हते हे सांगण्याची काही गरज नसावीच ;)

७.२५ मिनिटे नंतर

मस्त पै़की स्वतः तयार केलेल्या चहाचा घोट घेत मी टिव्ही पाहत बसलो व काही वेळाने ताणून दिली परत....

९.२५ मिनिटे नंतर

मिपा उघडला, माझ्या व्यतिरिक्त नवीन लेखन इत्यादी शोधले काही सापडले नाही ;) सरळ पाककृती विभागात क्लिकलो व मटार-पालक पराठे हा जरा त्यातल्या त्यात सोपा प्रकार निवडा, जेवणासाठी. व कुणाची ही मदत घ्यायची नाही हे ठरवले.

सोपंच आहे, मटार २ वाट्या, पालक २ वाट्या,आल १ पेरा एवढं,लसुण ४ पाकळ्या, मिरची /तिखट आवडीनुसार,मीठ चविनुसार
कणिक अंदाजे, तांदुळाचे पिठ ४ चमचे, पिठ मळुन घेण्यासाठी तेल , पराठे बनविण्यासाठी १ प्लास्टिक पिशवी. बस्स ! जास्त कटकट नाही.. की झंझट नाही.. हा विचार करुन मी हेच करायचं ठरवले.

आधी फ्रिज मध्ये / किचन मध्ये काय काय सामान आहे व नाही आहे ह्याची लिस्ट तयार केली.
मटार - हाजीर.
पालक - हाजीर.
आलं - गैर हाजीर.
लसुण - हाजीर
मीरच्या - हाजीर (लाल / हिरव्या / शिमल्या मिर्च वाल्या पण हाजीर)
तांदुळाचे पिठ - गैर हाजीर
तेल - हाजीर
प्लास्टीक पिशवी :? - सहा पिशव्या हाजीर ( हे कश्याला हा प्रश्न )

म्हणजे आलं व पिठ ह्यांची जुळणा करायला हवी, कॉलीनीतल्या दुकान वाल्याला फोन केला.
मी " आलं है ? "
तो " आलं ?"
मी " स्वारी, अदरक है ? "
तो " है"
मी " १०० गॅम "
तो " आगे "
मी " चावल का आटा है ?"
तो " क्या.. नही है."
मी " तो बस अदरक भेज दे, एफ-३१ में"
तो " क्या साब, मजाक कर रहे हो, १०० ग्रॅम अदरक के लिए किसे भेजू"

त्याच्या ह्या नख-यामुळे मला एका आल्याच्या तुकड्यासाठी दोन साबुण व शॅप्मु विनाकारण घ्यावा लागला.

१०.०५ मिनिटे नंतर

आलं झालं, पिठाचं काय करायचं ? शेवटी डोक्यात आयडीयाची कल्पनेने भरारी घेतली व किचन मध्ये जाऊन तांदळाचा शोध चालू केला, तांदुळ मिळाले पण माझा धक्का लागून चार अंडी ठेवलेला बाऊल खाली पडला व त्याच्या बरोबर अंडी पण.... ! झालं पुन्हा पुसणे साफ सफाई करुन मी, तांदुळ व मिक्सर समोरासमोर बसलो. तांदुळ मिक्सर मध्ये घातले व मिक्सर चालू केला... घर घर घर... चांगले दहा मिनिटे फिरवले व ढक्कण उघडून बघितले तर तांदळाचे छोटे छोटे तुकडे झाले होते पण पिठ काय तयार झाले नाही, शेवटी मी मिक्सरचे मॅन्युअल शोधण्याचा प्रयत्न केला व ते बॉक्स मध्येच सापडले. त्यात लिहल्यानुसार मी त्याच्या ब्लेडस बदलल्या व पुन्हा मिक्सी चालू करुन तांदळाचे पिठ निर्माण केले. त्याला ३० % कोणी ही पिठ म्हनून शकेल येवढे ते बारिक जरुर झाले ;)

एक स्टेप पुर्ण केल्याचा आनंद माझ्या चेह-यावर दिसू लागला होता.

आता बस तयारी चालू करायची व पराठे तयार !

पाणी उकळायला ठेवले व त्यात मटार + पालक घड्याळ लावून आठ मिनिटे उकळली, व नंतर मिक्सि मध्ये सर्व आयटम जे हाजीर होते त्यांना १० मिनिटे फिरवले.. मस्त पैकी त्याचे पण पिठासारखे बारिक बारिक तुकडे झाले... ब्लेड चेंज करायला विसरलो होतो. तरी हरकत नाही ह्यामुळे काही फरक पडणार नाही हा उच्च विचार करुन मी ते सर्व मिश्रण एका भांड्यात ओतले. व तयार मिश्रणात तांदळाचे पिठ घातले पण किती घालावे ह्यावर गाडी अडली पण मीच अंदाजे सर्व पिठ त्यात ओतले, आता कणिक हा काय आयटम आहे हे डोके खाजवले तरी शेवट पर्यंत मला उमजले नाही त्यामुळे तो आयटमी मी फालतू चा समजला व त्याला लिस्ट मधून बाहेर केला.
पाककृती लेखिकेने / लेखकाने सैलसर मळून घ्या असं लिहले आहे पण सैलसर मळणे म्हणजे काय हे मला उमजले नाही त्यामुळे मी सैलसर चा अर्थ पाणी जास्त पिठ कमी असा घेतला व त्यानुसार मळायला सुरवात केली माझ्या हिशोबाने पाणी जास्त होते पण हळू हळू मळताना पिठ जास्त मजबुत होऊ लागले व पाणी गायब, म्हणून परत पाणी घातले तर ह्यावेळी पाणी जरा जास्तच पडले म्हणून परत जरा पिठ घातले असे करत करत जे दळलेले पिठ होते ते सर्वं संपले.. पण थोडेसे सॉस सारखे पातळ पिठ मळून तयार झाले, ज्याचा रंग हिरवा दिसत होता.

आता प्लास्टिकच्या पिशवीची जुळणा करुन मी ते मिश्रण त्यावर थापले... (थापल्या पेक्षा पसरवले हे योग्य वाटत आहे) गॅस चालू केला, तवा त्यावर ठेवला व पाच एक मिनिटाने तवा गरम झाल्या वर मी ते मिश्रण तव्यावर ठेवले... तोच ती प्लॅस्टिकची फिशवी भसाभास आजूने जळू लागली व एक सहन न होऊ शकणारा दुर्गंध किचन मध्ये पसरला.. मला लक्ष्यात आले की आपण चुकलो आहोत.. मी लगेच गॅस बंद केला एक ग्लास पाणी तव्यावर ओतला, तव्याचा हाल पाहण्या लायक झाला होता, वरचे पराठा मिश्रण खाली पडले व प्लास्टिक सगळे तव्याला चिटकले... मी निराशेने तो तवा बाजूला ठेवला व दुसरा नवीन नॉन्स्टिकचा तवा परत गॅस वर ठेवला... आता मला तेल का हवे ते कळाले.

मी पुन्हा एक प्लास्टिकची पिशवी घेतली त्याला तेल लावले व मिश्रण त्यावर पसरवले व त्याला उचलून तव्यावर उलटा केला पण सर्व मिश्रण लोळागोळा होऊन एकाच जागी पडले... मी हळुच उलाथण्याने ते मिश्रण सर्व तव्याभर पसरवले व माझ्या डोक्यात आयडीया चमकली... की पुढील वेळी आपण सरळ तव्याला तेल लावू व त्यावर मिश्रण पसरवू !

मी माझा पहिला स्वनिर्मित पराठा तव्यातून बाहेर काढला व त्याला एका प्लेट मध्ये ठेवला, व दुस-याची तयारी करु लागलो, दुसरा सरळ तव्यावरच पसरवला व तो पकण्याची वाट पाहू लागलो तोच बाजूला प्लेट मध्ये असलेला पराठा मला खुणवत होता.. टेस्ट कर टेस्ट कर पण मी स्वतःला संयमीत करुन उभाच राहीलो पण काही क्षणात संयम सुटला व मी सरळ त्या पराठ्याचा एक
तुकडा तोडून तोंडात टाकला... अरे वा ! मस्त चव. पण जरा कच्चां राहिला असावा असे वाटले पराठा, मी जरा निरखुन पाहीले तर मी पराठा तव्यावर फिरवलाच नव्हता.

१०.४५ मिनिटे नंतर

दोन-तीन पराठे करपल्यामुळे... जळल्यामुळे.. खराब झाले पण त्यानंतरचे दहा-बारा पराठे एकदम व्यवस्थीत झाले, जरा टेस्ट विचित्र होता.. पण ठिक स्वतः तयार केलेल्या आयटम ला का नावे ठेवा.. काही नाही जरा मिठ घालायला विसरलो होतो.. हिरवी कि लाल मिर्च ह्या नादात दोन्ही मिर्च घातली होती त्यामुळे तिखट जाळ झाला होता पराठा पण टेस्टी होता बॉस ! मी जोर लावून दोन पराठे कसे बसे खल्ले ! व किचनचा दरवाजा बंद करुन मस्त पैकी दोन ग्लास मोसंबी ज्युस घेतला व गप्प संगणक चालू करुन मिपा-मिपा खेळू लागलो ;)

चार अंडी, दोन-तीन काचेचे फुटलेले ग्लास, मिक्सर + मिक्सरची सर्व भांडी व ब्लेड्स , सर्व किचन भर पसरलेले सामान, खाली काढून ठेवलेले डब्बे व डझनाने धुण्याची भांडी एक प्लास्टिक जळून चिटकलेला तवा व दहा एक मटार-पालक पराठे चे पराठे मी सतबीर साठी सोडून त्याच्या येण्याची वाट बघू लागलो !

संध्याकाळी ०५.१० मिनिटे नंतर

"हे भगवान, किचन में क्या करने गये थे... यह आटा कुं गोंद के रखा है... यह प्लेटे में क्या कालीसी रोटी रखी है.. .. क्या करते हो राज भाई ! ओ मेरी मां ! ग्लास फोडा क्या.... " - एका पायावर नाचत सतबीर किचन मधून बाहेर येताना मला दिसला व मी लगेच मागच्या दाराने.... बागे कडे सटकलो !

रात्रीचे ११.३५ मिनिटे नंतर

पोट का गुडुम गुडुम वाजत आहे................... !

***************************************************
* आता सध्या कानाला खडा लावला आहे.. नो प्रयोग @ किचन ! ना बाबा ना !

माझे महान प्रयोग - १

मागील आठवडा असाच झोपून घालवला, खुप कंटाळा येतो नाही असं बेड वर पडून राहणे, पण ह्या रविवारची सकाळ जरा वेगळीच होती मस्त पैकी अंगात तरतरी जाणवत होती व शक्ती आली आहे असे वाटत होते, त्यामुळे विचार केला चला आज जरा बाहेर पडू, थोडा वेळ बागेत फिरलो, हिरवळीचा आनंद घेतला. रविवार होता त्यामुळे सर्वत्र आनंदी आनंद होता, , युवक-युवती मस्त पैकी सकाळाच्या कोवळ्या उन्हात गप्पा मारत होते, दोनचार आजोबा टाईप व्यक्तीमहत्वे त्यांच्या कडे चोरून चोरुन पाहत गप्पा मारत होते... पण हे सर्व बघून मी लवकरच कंटाळलो व परत घरी आलो, इकडे तिकडे करताना दिवाळीच्या वेळेस आणलेला डिस्टेंपरचा डब्बा दिसला व मनात एक विचार चमकला की चला आज आपली रुम पेंट करु या. दहा लिटरचा डिस्टेंपरचा डब्बा घेऊन मी आपल्या रुम मध्ये आलो व कुठली भिंत रंगवावी ह्याचा विचार चालू केला, बेडच्या समोरची भिंत स्काय ब्ल्यु रंगाने रंगवायचे मनात ठरवले व रुम मधील सामान एक एक करुन बाहेर काढायला सुरवात केली !

सर्व सामान जेव्हा मी बाहेरील हॉल मध्ये काढले तोच आमचा गडी किचन मधून बाहेर आला व म्हणाला " क्या कर रहे हो भाई ?"
मी म्हणालो " कुछ नही, जा तु रोटी बना" मी असे म्हणून बाथरुम मधील बाल्टी घेऊन आलो व दिड एक लिटर डिस्टेंपर बाल्टी मध्ये ओतले, तोच लक्ष्यात आले की ब्रेश नाही आहे व ब्ल्यु पिडीडिंन्ट तर नाहीच आहे, मग हळूच प्रेमाने गड्याला हाक दिली व म्हणालो " सतबीर, एक काम कर यार, मार्केट से ब्रेश तथा ब्ल्यु पिडीडिंन्ट ले के आजा यार.. बाईकले के जा." त्याने मला खाऊ का गिळू नजरे ने बघत म्हणाला " मै रोटी बना रहा हूं ! आप को भी कुछ काम नही है.. रुको अभीला के देता हुं! " चरफडत तो सामान घेऊन येण्यासाठी कसाबसा गेला, आजकाल शोधायला गेले तर देव भेटेल पण गडी भेटणार नाही, त्यामुळे ह्यांचे भाव जरा वाढलेलेच असतात, असो.

तो येऊ पर्यंत जरा आपलं कपाट साफ करु ह्या विचाराने कपाट साफ करायला घेतले, कपाट उघडताच समोर चार्-पाच सिग्नेचर च्या बाटल्या डोळ्यासमोर चमकल्या... अत्यंत दुखःने मी त्या बाटल्या उचलून आपल्या नजरे आड करत हॉल मधील कपाटमध्ये ठेवले ! व परत रुम मधील कपाटाकडे वळलो, खालचा कप्पा साफ करताना फोस्टर बियर च्या कॅनचा सरळ सरळ बॉक्सच हाती लागला जो मागच्या महिन्यात केलेल्या कॅकटेल पार्टी साठी आणला होतो, पण सर्वांचाच व्हिस्की व व्होडका मध्ये टांगा पलटी झाल्यामुळे बियर पण आहे हे जवळ जवळ सर्व जण विसरले होते व ती पेटी कपाटात राहिली होती, मी अत्यानंदाने वेडा व्हायचा तेवढा राहिलो.. चला डॉक्टर ने व्हिस्की सांगितले आहे घेऊ नको, बीयर ला थोडीच ना आहे... हा विचार करुन मी लगेच त्यातील दोन्-चार कॅन फ्रिज मध्ये लावल्या व निवांत पणे सोफ्यावर हुडपलो... आता काही वेळात बियर थंड होणार व मी त्या सर्व च्या सर्व गटकणार.. आठवडाभर पिली नाही त्याचा वचपा आज काढणार म्हणून मी खुषीत होतो, तोच माझ्या डोक्यात विचार आला च्यामायला त्या उमेश ला (माझा मित्र + डॉक्टर) विचारुन घेऊ या एकदा की बियर चालेल का नाही, नाही तर बियरच्या नादात मला स्वर्ग मिळायचा फुकटात...

मी त्याला फोन लावला " उमेश, क्या हाल है भाई ?"
तो " मजे में, हॉस्पिटल में हुं बोल, ठीक है अब. कोई तकलिफ ?"
मी " नही यार, ठीक हुं, मेरे पास व्हिस्की है... "
तो जवळ जवळ ओरडलाच " राज, हात तोड डालूंगा, साले व्हिक्सि को हात भी लगा या तो"
मी नर्वस होत म्हणालो " अबे, पुरी बात तो सुन. मेरे पास तीन-चार बोतले पडी हुंई है, जो मेरे काम की तो फिलाल है नहीं, तु ले जा." मी त्याला लालच + मस्का लावत म्हणालो.
तो " अच्छा ! चल कोई बात नहीं, दोस्त कब काम आएगें, शाम को ले जाऊंगा"
मी " तुझ्या आवशीचा घो, फुकट म्हणजे दे"
तो " क्या बोला बे ? समज में नही आया"
मी सावरासावरी करत म्हणालो " अबे तुझे नही, मुझे बियर चल सकती है क्या ?"
तो म्हणाला " चलेगी... जल्दी उपर जाना है तो पी , तेरे पास बियर का भी स्टॉक पडा है क्या ?"
मी गडबडीने म्हणालो " नही, नही. मंगाने वाला था, अब नहीं "
तो " अब आया लाईन पें, शाम को घर आ रहा हूं "
मी " ठीक. आ जाना !"

म्हणजे, पिण्याचा मार्ग संपला होता, पण येवढं होऊ पर्यंत सतबीर ब्रेश व बाकीचे सामान घेऊन माझ्या समोर उभा राहिला,मी त्याच्या हातातून सामान घेतले व सरळ आपल्या रुम मध्ये गेलो व आतातून दरवाजा बंद करुन घेतला.
बाल्टी मध्ये हलकेसे पिडीडिंन्ट टाकुन मी त्याला कश्याने घुसळायचा हा विचार करु लागलो काहीच सापडले नाही म्हणून शेवटी सरळ हात घातला व घुसळू लागलो .. थोड्या वेळा ने फिकट निळा रंग दिसू लागला पण त्या रंगाने माझे समाधान झाले नाही म्हनून अजून जरा पिडीडिंन्ट ओतले पण जरा जास्तच पडला पिडीडिंन्ट त्यामुळे तो एकदम निळा पेंट तयार झाला हे पाहून मी त्यात अजून थोडे डिस्टेंपर घातले अर्धा एक लिटर तर तो रंग परत हलका निळा झाला... थोडा पिडीडिंन्ट थोडा डिस्टेपर असे करत करत सरते शेवटी मला हवा तो निळा रंग तयार झाला, पण तो पर्यंत बाल्टी आर्धी भरली होती जवळ जवळ सहा एक लिटर रंग तयार झाला होता.. आता काय करायचे हा विचार करता करता मला ती सैफ अली खान ची पेंट ची जाहिरात आठवली ज्यामध्ये तो रंग ब्रेश ने भिंती वर झाडतो, हवे तसे ब्रेश फिरवतो व एक सुंदर कला कृती निर्माण होते, माझ्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली व मी ती कल्पना प्रत्यक्षात आपल्या भिंती वर उमठवण्याची तयारी सुरु केली.

पहिला ब्रेश रंगात बुडवला व झपाक करुन भिंती वर उडवला, पण भिंती वर थोडा व माझ्या चेह-यावर जास्त उडाला... मी सद-याच्या बाही ने तोंड फुसत आपले काम नेटाने चालू ठेवले, कधी तलवारी सारखा ब्रश चालव तर कधी, गाडीचे स्टेरिंग फिरवत आहे तसा चालव, कधी उड्या मारत चालव तर कधी आडवा तिडवा जसा हवा तसा फिरव... तास भराच्या महनती नंतर अर्धी भिंत माझ्या कलाकृती ने भरली होती, माझी छाती एक इंच भर फुलली व मी परत नेटाने काम चालू केले, सपासप ब्रेश चालवत राहिलो व पुर्ण सहा लिटर पेंट भिंत वर अक्षरशः ओतून मी एकदम कौतुकाने ती माझी भिंत पहात उभा राहिलो !

टक टक, टक टक.
"भाई, क्या कर रहे हो अंदर ?" सतबीर म्हणाला बाहेरून.
"रुक जा पाच मिनिट" मी म्हणालो.

पुन्हा एकदा आपल्या कलाकृती वर नजर टाकुन मी विजयी आवेशा मध्ये दरवाजा उघडला तोच सतबीर तोंड वासून उभा माझ्या समोर.
"हे भगवान, कलर से नहा लिया है क्या ?" असे म्हणून तो अक्षरशः पोट धरुन हसू लागला.. मी त्याच्या कडे रागाने बघत हॉल मधील आरसा समोर उभा राहिलो, ७०% मी रंगात भिजलो होतो, केसं, तोंड, कपडे... चप्पल सर्व काही निळा / आकाशी रंग झाला होता, मी हसत म्हणालो, " अबे, कुछ काम करते करते गंदे हो गये तो उस में हसने वाली कोणसी बात है ?, चल चाय बना ! "
मी माझ्या हातातला ब्रश तलवारी सारखा फिरवत परत आपल्या रुम मध्ये गेलो व आपली कलाकृतीला आपल्या नजरेत साठवत उभा राहिलो, तोच सतबीर चहा घेऊन आत आला व भिंती कडे बघत म्हणाला " ए क्या है सब ? बाल्टी फेक दी क्या दिवार पें ?" मी कपाळाला हात लावत म्हणालो " अबे, ढक्कन. यह नया टाईप का डिझाईन है... अच्छा लग रहा है ना ? " मी त्याला डोळ्याने वटारत म्हणालो... त्याला समजले होयच म्हणायचे आहे ते. तो म्हणाला " बहोत बढियां, यह सब ठीक है... पर आपने फर्श क्युं रंग दिया.. अब इसे धोयेगा कोन ?" तेव्हा मी खाली बघितले, जवळ जवळ सर्व रुम ची फर्श निळ्या रंगात रंगली होती.. मी ब्रेश जसे हवे तसे चालवले त्यावेळी अर्धा रंग भिंती वर व अर्धा रंग सर्व रुम मध्ये पसरला होता.. मी आपली जिभ चावत त्याला म्हणालो " कोण साफ करेगा मतलब. दो घंटे के अंदर साफ कर रुम. मै अभी घुम के आता हूं बाहर से. तब तक एकदम ठीक ठाक होणी चाहीए रुम."

असे म्हणून मी जवळ जवळ पळतच बाथरुम मध्ये गेलो व अंघोळीला उभा राहिलो, आत मन भरुन हसून घेतल्या वर मी अंघोळ करुन बाहेर आलो तोच सतबीर चे एक वाक्य कानावर पडले जो फोन वर बोलत होता आपल्या कुठल्या तरी जाणकाराशी " रे यार, हमारे साहब भी पगला गये है, पुरा घर गंदा कर दिया.. मेरा संन्डे बरबाद कर दिया यार... ! " अरे रे मला खुप वाइट वाटले म्हटले ह्याचे पण काही प्लान असतील... आपल्या मुळे राहिलेच. त्याला बोलवले व म्हणालो " फ्रिज में चार बियर की कॅन रखी है, कल छुट्टी ले लेना, साथ में बियर भी लेके जा. लेकिन आज रुम साफ कर फटाफट." तो म्हणाला " ठिक है साब, पर फिर मत करना पेंन्ट का काम.. आप के बस की नहीं है.... पेंट करना.. दिवार खराब कर दी." माझ्या महान कलाकृतीला खराब म्हणाल्या म्हणाल्या मला खुप राग आला त्याचा पण.. हा गेला तर उपासमार होईल व अजून एक भुकबळी म्हणून आपली पण सरकार दप्तरी नोंद होईल ह्या भविष्यकालीन विचार करुन मी त्याला काहीच म्हणालो नाही.....

पण,

उद्या सुट्टी दिली आहे त्याला... उद्याची उचापत आताच माझ्या मनात रेंगत होती.. उद्या सतबीर ला सुट्टी दिली आहे.. मिपावर पाककृती दालन मध्ये डझनाने कलाकृती पडल्या आहेत त्यातील एक उचलणे व स्वयंपाक घरात आपली तलवार चालवणे.... ढ्णठढड्याण !!!!!!! ढ्णठढड्याण !!!!!!! ढ्णठढड्याण !!!!!!!

माझं थोबाड... भाग- ०

" एकदम आपल्या आजोबांवर गेलं आहे नाही बाळ, त्यांच्या सारखच नाक, त्याच्या सारखेच डोळे" - मावशी म्हणाली, मी जेव्हा जन्मलो तेव्हा. (हे परवा परवा मावशीने सांगितले व खालील मामाचा पण संवाद.)
" कार्ट, एकदम बाबाच्या वळणावर गेलं आहे, केसं बघ कशी आहेत ह्याची उंदरा सारखी, वसावसा अंगावर येतो, नाही जमनार, ह्याचं व माझं नाही जमणार कधी " मामा. जेव्हा मी ५ वर्षाचा होतो.
" राजा लेका, थोबाड रंगवीन तुझं एक कानाखाली वाजवली तर " बाबा जेव्हा त्यांचे चारमिनार सिगरेटचे पाकिट आपोआप मोकळं होऊ लागलं तेव्हा.
" थोबाड बघितलं आहे का आरसामध्ये कधी ?" पहिली मुलगी जीला प्रपोज केलं होतं ती (वय लिहायची गरज नाही ;) )
"
"किती काळवंडला आहे चेहरा माझ्या बाळाचा, कशाला उन्हात खेळतो रे " मोठी माऊशी.
" तोंडाला काय लावून घेतले आहेस बाळा ? आमचा राजा कुठे आहे ? " रंगपंचमीला ग्रीस कोणी तरी फासल्यामुळे चेहरा / केसं अनोळखी झाला तेव्हा आई म्हणाली.
"कुठ थोबाड फोडून घेतलं रे " माझा एक मित्र, जेव्हा मी मार खाऊन आलो होतो शाळेतून.
" अपना फेस देखा है क्या, साला तु पियेगा बियर, मेरे साथ ? " एका बियर पिण्याच्या पैजेच्या वेळी मित्र.

असं आयुष्यभर कोठे ना कुठे नेहमी तोंडाचा, थोबाडाचा माझ्या चेहराच्या उदोउदो होतच असे. कधी शाळेत, कधी हॉस्टेल मध्ये कुठल्यातरी सराने / बाईने वाजवल्यामुळे चेहराचा रंग बदलतच असे त्यात नवीन काही नव्हतंच मला, पण कधी खुप वेळ पंचगंगेत डुबक्या मारल्यामुळे तर रंगपंचमीला डोळ्यात रंग गेल्यामुळे ताबारलेले डोळे व त्यात आमचं चित्रविचित्र थोबाड बघून लहान मुले बघताच रडायला सूरु होतं. कधी काळी सायकल शिकताना पडलो त्यामुळे नाकाच्या सुरवातीलाच एक कच, चांगलाच मोठा, तर अक्काचे पुस्तक फाडले होते म्हणून तीने कानाजवळ आपल्या नखांनी केलेली नक्षी, भले मोठे डोळे व कधी काळी क्रिकेटचा बॉल लागल्यावर सुजलेले व वाकडे झालेले नाक, उजव्या होठावर तिळ , स्वर नलिका दोन इंच बाहेर आल्या सारखी दिसणे ! भुवयावर केसं देवानं जसे वरदान दिले असावे तसे दोन्ही सख्खे जुळे भाऊ असल्यासारखे जुडलेले, म्हणजे आमचं थोबाड. रंग तसा गोराच, जसं १००% पाढं-या रंगात ४०% काळा व ३०% ताबुस रंग मिक्स केल्यावर जसा रंग तयार होईल तसा, पण लहान पणी मी खुप गोरा होतो पण गल्लीतल्या काही मुलींची नजर लागल्यामुळे माझा रंग काळवंडला असं आई आज ही सांगते.

असो,

आता थोबाड आठवायचं कारणं म्हणजे, मागील आठवड्यापासून वेळ मिळाला नव्हता व हा आठवडा आजारपणात काढला त्यामुळे थोबाडा कडे बघायला वेळ मिळालाच नाही आज जरा कंटाळा आला होता टिपी करुन म्हनून विचार केला मोकळा वेळ सतकारणी लावावा, त्यासाठी जवळच असलेल्या माझ्या नावडत्या हजामाकडे कडे गेलो व म्हणालो " काट डाल सबकुछ... " तो दचकला व म्हणाला " क्या साहब ? सबकुछ सफाचट ? गंजा होणा है क्या ? " अरे लेका... " नाही यार, थोडा बाल कम कर बाकी दाढी, मुछे सफाचट."
तो आपला नेहमीचा कपडा माझ्या अंगावर ओढून गळाला फास बसावा ह्या हेतूने टाईट बांधत म्हणाला " साब, चार्-पाच दिन से दिखे नही आप" लेका मी मसनात गेलो होतो तु आपलं काम कर ना भाऊ.. हा उच्च विचार माझ्या मनात आला होता की बोलावं त्याला पण त्याच्या हातात माझी मुंडी व थोबाड दोन्ही होतंच तसेच एक कात्री व समोर ठेवलेला वस्तरा पण दिसत होता त्यामुळे मी त्याला एकदम संयमाने म्हणालो " बिझनेस मिटिंग मे बिझी था.. तु काटो बाल.. काटो.."

पंधरा मिनिटामध्ये त्यांने माझी केसं कमी कापली व मेंदुला बोलून बोलून झिनझिन्या जास्त आणल्या, आधीच आजारी त्यात जरा पण विचार केला की गुढगा दुखतो त्यात तो माझं नसलेलं डोकं खात होता भसा भसा.. पण आलीया भोगासी , कर्म. आपल्याच पापाची फळे ह्याच भुतलावर मिळतात असं कुठ तरी वाचलं होतं, त्याचं मुर्तीमंत उदाहरण माझ्यासमोर बोलत होतं, राजकारणापासून पाकीस्तान पर्यंत पाकिस्तान पासून हेमामालिनी पर्यंत अर्धा तासात त्याने सबसे तेज चॅनेलला पण लाजवेल ह्या स्पीड मध्ये बातम्या दिल्या, हिचं लग्न झालं, तीचं अफेयर झालं, तो मेला तो जगला. सर्व काही. घरा जवळ आहे व जास्त लाबं मी जाऊ शकत नाही त्यामुळे ह्याच्या कडे येण्याची बुध्दी झाली व मी माझ्या बुध्दी वर किव करत बसलो होतो.

फक्त एक तासात त्याने माझे केस कापले व पुढील अर्धातास त्यांने माझी दाढी व मिशी काढायला घेतली ह्यावरुन तुम्हाला त्याचा कामाचा वेग व बोलण्याचा वेग कळालाच असेल. असो, त्यांने तोडावर फसाफसा पाणी मारत माझ्या चेहरा निरखुन पाहात म्हणाला " साब, आप का फेशीयल कर दुं क्या ? चेहरा साफ हो जायेगा, रंग भी निखर जायेगा" मी त्याच्या कडे डोळे मोठे करुन बघीतले तेव्हा तो गडबडून म्हणाला " नहीं नहीं, आपका रंग तो साफ है ही, फेशीयल से निखर जायेगा, कंपनी गॅरेंटी देती है साब कलर गोरा होने की, बाल भी काले करा लो या गारनियर के यह रंग शेड देख लो जो पसंद हो वही तयार कर देता हूं" त्याच्या कामाचा वेग व बोलण्याचा वेग पाहून मी नकार देण्याचं ठरवलं होतं पण, समोर आरशामध्ये पाहिल्यावर मला माझा लहानपणाचा गोरा रंग आठवला व त्या नजर लावणा-या मुलींच्या नावाने बोटे मोडली व त्याच रागात मी त्याला हो म्हणावे की नाही ह्याचा मी विचार करत होतो तो त्याने काही ही विचार न करता त्याने सरळ माझ्या थोबाडाला कसलीशी क्रिम फासू लागला व दहा एक मिनिटात माझ्या थोबाडावर चांगलाच पांढ-या रंगाचा थर जमा करुन बाहेर गेला मला कळालेच नाही, मी त्याला शोधण्यासाठी , पाहण्याचा वळण्याचा प्रयत्न केला तर तो बाहेरुन ओरडला " हिल ना मत साब, क्रिम को सुख ने आराम से सिट पर बैठे रहो." मी जो हुकुम सरकार असं म्हणत चुपचाप बसून राहिलो.

काही मिनिटात तो आता ही क्रिम धुणार व माझा रंग एकदम उजळणार व आपला हरवलेला गोरा रंग सापडणार अशी काही दिवास्वप्ने मला त्या खुर्चीवर बसून पडू लागली ! पंधरा मिनिटाने तो आला व हळुहळु माझ्या चेह-यावरील ती क्रिम काढून लागला, मी एकदम काही तरी मी नवल पाहणार आज ह्या नजरेने समोर अरसामध्ये आपलं थोबाड पाहत होतो, पण कसले काय ०.००१% पण रंग गोरा झाला आहे असं मला तरी वाटलं नाही पण तो लेकाचा म्हणाला " देखा साब, कितना फरक पडा आप अगले हप्ते भी करा ले ना दो चार बार करोगे तो आप का रंग गोरा जरुर होगा. " आता चेह-यावर प्रयोग केलाच होतो आता केसांच्या कडे त्याचे लक्ष होते पण मी त्याच क्षणी भानावर आलो व म्हणालो " बाल कलर मत करना बाद में देखुंगा, जब टाईम होगा तब." त्याचं मन खट्टु झालं पण मी आपल्या निर्णयावर पक्का होतो पण त्याने ठरवलं असावं की अजून काहीतरी प्रयोग करायचाच माझ्या वर त्यासाठी त्याने पुन्हा माझ्या भुवया पाहत म्हणाला" साब, एक काम करता हूं, आप कि भोएं ठिक ठाक करता हूं.. ठीक है" त्याला केसाला कलर करुन नको असे सांगून त्याचं मन मी दुखावलंच होतं... आता चार भुवयावरील केसंच काढतो म्हणत आहे तर काढू दे बापडा हा उच्च विचार करुन मी त्याला बरं कर म्हणलो... थोड्या वेळाने कळालं कि तो माझा उच्च नाही तर हुच्च विचार होता.

त्याने कसलासा तरी धागा आपल्या ड्राव्ह मधून काढला व थोडी पावडर माझ्या भुवयाच्या मध्ये लावली व धाग्याचे एक टोक हातात व एक तोंडात पकडून त्याचे त्याचा काहीतर शस्त्रासारखा वापर चालू करुन अक्षरश: माझ्या भुवयावरील केसं उपटू लागला, मला वाटलं होतं कात्री ने नाही तर वस्तराने करेल केसं कमी तर हा लेकाचा एक एक केसांना उखडून काढत होता... भयानक त्रास होत होता एक केस जेथून निघे तेथे रक्त आलं की काय असं वाटतं होतो, तो आपलं ते शस्त्र चालवत म्हणाला "साब, अब देख ना आपका चेहरा आप को भी नया दिखेगा" माझ्या डोळ्यात आसवं जमा झाली होती व मी आता सुरवात झालीच आहे ह्याचा कुठे तरी अंत असेल असा विचार करुन त्याचे अत्याचार सहन करत राहिलो, थोड्यावेळाने त्याने आपले शस्त्र म्यान केले व माझं थोबाड परत साफ करत म्हणाला "देखो साब, हो गया कितना आसान था" मी माझ्या भुवया चोळत म्हणालो " बहोत आसान था... कितना हुवा "

खिश्यातून दिलेले अडीचशे रुपये, कोरलेल्या भुवया व माझा न उजळलेलं थोबाड घेऊन मी तेथून बाहेर पडलो. व शिकलेली अक्कल आपल्या मेंदुमध्ये कुठेतरी खुणगाठ बांधावी तशी बाधून स्वतःशीच निर्णय घेतला की आज पासून आपल्या थोबाडावर कुणालाच प्रयोग करुन द्यायचे नाहीत... जे आहे, जसं आहे तसं आपलं !

हा विचार करुन आपल्या घराकडे चाललो तर एक मित्र भेटला व म्हणाला " क्या हाल है, अच्छे दिख रहे हो, दाढी-मुछ कटवाई बढिया किया, एक काम कर ना जो तुम्हारा डॉक्टर दोस्त है ना, उसको बोल तेरी तेढीं नाक व सींधा कर दे! एकदम हिरो लगेगा भाई तु " माझ्या चेहराचा बदललेला रंग व मी माझं पायतान हात घेण्यासाठी खाली वाकलो.... हे पाहताच तो सुसाट सटकला तेथून !


माझं थोबाड समाप्त !