गुरुवार, २४ सप्टेंबर, २००९

भटकंती - दुसरा स्टॉप - मनाली (हिमाचल प्रदेश)

 


 


 



दिल्ली पासून रोड ने ५०० किलोमीटर अंतरावर असलेले एक नितातं सुंदर थंड हवेचे ठीकाण, रेल्वे ने जायचे असेल तर तुम्हाला शिमला किंवा कालका जावे लागेल व तेथून मनाली बस ने.  खोल वर पसरलेल्या द-या व आकाशाला गाठण्याची स्पर्धा करत असलेली हिमशिखरे हेच मनालीचे दैवत.
जाण्याचा कालावधी जानेवारी ते जुन पर्यंत कधी ही... पण जानेवारी मध्ये गेला तर बर्फाचा आनंद भेटु शकतो..  मी मागील दोन वर्ष सलग मनालीला गेलो माझ्या आवडत्या ठिकाणा मध्ये ह्याचा नंबर सगळ्यात पहिलाच येतो !



हॉटेल्स घेउन का तेथे गेला तर गेस्ट हाऊस चा शोध घ्या...  गेस्ट हाऊस मध्ये सर्विस चांगली भेटते व स्थानिक लोकच गेस्ट हाऊस चालवत असल्यामुळे तुम्हाला चांगले मार्गदर्शन मिळू शकते, तेथे दोन प्रकारचे वाटाडे भेटतात एक तुम्हाला मुर्ख बनवणारे व एक तुम्हाला खरोखर नितांत सुंदर असे मनाली फिरवणारे.. तुम्ही जेथे राहण्यासाठी उतरला असाल त्याच्या आजू बाजुला जरा चक्कर मारा एखादा कोणीतरी स्थानिक पकडा... ( आम्ही धुम्रपान करतो त्यामुळे आम्हाला लगेच कोणी ना कोणी भेटतच .. फक्त एकच प्रश्न माचिस है क्या ? लगेच गप्पा चालू)  त्याच्याशी गप्पा मारा व त्याला हलकेच विचारुन घ्या वाटाड्या कोण चांगला आहे व योग्य पैशात कोण फिरवेल.. ;)


मनालीला गेल्यावर खर्च करु नका अफाट महाग वस्तू भेटतात तेथे.. आपल्या कॅमराची बॅटरी, खाण्यासाठी स्नॅक व बाकीच्या गरजेच्या वस्तु मनालीला येण्यापुर्वीच विकत घेऊन ठेवा.. दोष त्यांचा नाही आहे त्यांना काही सामान विकण्यासाठी आणने म्हणजे १०० किलोमिटरचा प्रवास करावा लागतो त्यामुळे वस्तु महाग मिळतात व पर्यटनस्थळ म्हणाले की वस्तु तश्याच जरा महाग होतात.. शाल भेटते... हाताने विनलेल्या शॉल एकदम  सुंदर कलाकुसरी असलेल्या शॉल !


२२०० मिटर उंची वर.. व्यास नदीच्या काठावर वसलेले हे छोटे शहर सर्व बाजूने सुंदर आहे,  जास्त करुन नवविवाहीत जोडपी येथे आपला हनिमुन अविस्मरणीय बनवण्यासाठी येतात व त्यासाठीच जोडी(कपल) साठी  येथे विविध डिस्काऊट लावलेले दिसतात जागोजागी  ;)





दोन्ही फोटो आपले मिपा सदस्य सुचेल तसं


मनाली मध्ये पाहण्यासारखं हिडंम्बा मंदीर (महाभारतील भिमाची पत्नी) आहे एकदम सुंदर शिल्पकला तुम्हाला येथे पाहता येइल मंदिराचा परिसर देखील पाहण्यासारखा आहे.. त्यानंतर तिब्बती गुफा देखील पाहण्यासारखी आहे.. येथे बुध्दाची मोठी मुर्ती पाहण्यालायक आहे तसेच बैध्द साधु.. लामा ह्यांची जिवनचर्या जवळून पाहता येते. जर कोणाला झरे / पाण्याचे गरम कुंड पाहण्याची आवड असेल तर त्याने जवळच असलेल्या वसिष्ठ गावात जायला विसरुच नका..  अत्यंत उपयोगी व मेडीकल उपयोगासाठी ह्यांचे पाणी निरनिराळ्या रोगात वापरले जाते... त्वचा रोगावर अत्यंत गुणकारी पाणी तेथील आहे असे मानले जाते.



रोहतांग दर्या..  मनाली पासून लद्‍दाख रोड वर पाच-सात किलोमिटर दुरवर असलेले ठीकाण.... आह... एकदम.. सुंदर.. ज्या बद्दल तुम्ही कल्पनासुध्दा करु शकणार नाही असा निसर्ग पाहावयास मिळतो.. ह्याला दर्या का म्हणतात माहीत आहे ? येथे गेल्यावर तुम्हाला असे वाटते की आपण बर्फाच्या समुद्रात उभे आहोत...  :)  अत्यंत सुंदर... मनाली जावे तर रोहतांग दर्या जरुर पहावा.. येथे वर्ष भर बर्फ जमेलेलीच असते.. त्यामुळे कधी ही जा.. ! तसेच मनाली पासून दर्या पर्यत चालतच यावे लागते (खेचर /घोडी मिळतात पण आपण चालतच जाव लै मजा)  ह्या मार्गात जो आनंद भेटतो तो कुठेच भेटणार नाही ... अगदी पट्टणीटोपला सुध्दा नाही  ;)


 तीनचार दिवस फिरण्यासाठी एकदम मस्त ठीकाण.

हॉटेल्स तुम्हाला ६००-१२०० पर्यंत रुम देतात.
गेस्ट हाऊस मध्ये ४००-५०० व उत्तम प्रतीच्या गेस्ट हाऊस मध्ये ८००+ !
जवळ जवळ सर्व हॉटेल्स व गेस्ट हाऊस ब्रेकफास्ट हा फ्रीच देतात (आधीच माहीती घ्यावी) जेवण थोडं महाग आहे व कमी शिजलेले मिळण्याची शक्यता जास्त.. कारण उंच जागेचे ठीकाण !

दिल्ली पासून तुम्ही ५०० रु. आरामात बसने खात पीत जाऊ शकता, ट्रेन ने गेलो नाही पण जास्त टिकीट नसावे.

मनाली मध्ये फिरण्याचा खर्च नाहीच असे समजा.. जर गाईड घेतला तर गोष्ट वेगळी.. कारण जवळ जवळ सर्व मनाली चालतच फिरावे लागते .. कारण डोंगर द-यांचा प्रदेश त्यामुळे ४X४ गाडी असने गरजेचे ... त्यापेक्षा चालत फिरलेले छान.. व जेव्हा बर्फ पडतो तेव्हा गाडी खुप वेगाने घसरतात त्यामुळे मनाली मध्ये गाडी ही ठरावीक जागे पर्यंतच जाऊ शकते.



 


 


* टिप : फोटो माझे नाही आहेत, गुगलसेवा वापरली आहे..  मागे विदा उडाल्यामुळे काही फोटो सापडत नाही आहेत पण जसे सापडतील तसेच ह्यात बदल करेन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: