शनिवार, २६ सप्टेंबर, २००९

हत्या !!!

खुप दिवस झाले मनात एक कथा रेंगाळात होती ती आता शब्दातून बाहेर पडत आहे, बघा कशी वाटते ती .

*

"फोन कुणी केला होता ? "- पोलिस अधिकाराने विचारले, " साहेब मी केला होता, ह्यांचा शेजारी आहे मी, रोज सकाळी हे जॉगिंगला येतात पण आज आले नाही म्हणून मी सहज विचारायला आलो तर दार उघडे होते व हे सोफ्यावर.. निपचित पडलेले होते म्हणून मी घाबरुन फोन केला तुम्हाला."- शेजारी म्हणाला.

शहराच्या पॉश एरिया मध्ये राजकिय व व्यवसायी मंडळी मध्ये उठबैस असलेल्या अरविंद ची हत्या झाली होती, बाहेर प्रेसवाले / टिव्ही वाले हल्लाकोळ करत होते व पोलिस अधिकारी आपले काम करत होते, अरविंद चे शव डाव्या बाजूला कललेल्या अवस्थेमध्ये सोफ्यावर होतं, जवळच मोबाईल, सिगरेटचे पॉकिट व समोर टेबलावर दारुची बाटली एक ग्लास गाडीची चावी व टिव्हीचा रिमोट पडलेला होता, ग्लास मध्ये थोडी दारु होती अजून . जवळच एक स्कार्प पडला होता व शक्यतो त्याचा वापर करुनच अरविंदा गळा दाबला गेला असावा. जवळ पास झटापटीच्या काहीच खाणाखुणा दिसत नव्हत्या. वयाने अडतीस-चाळीस च्या दरम्यान असलेल्या व शरिराने ताकतवर असलेल्या अरविंद ने कसा काय वाचण्याचा प्रयत्न केला नसेल हा विचार करत असताना पोलिस अधिकारी इकडे तिकडे पाहू लागले होते त्यांना जी गोष्ट हवी होती ती दिसत नव्हती, पाण्याचा जग अथवा सोड्याची बाटली, म्हणजे काय अरविंद डायरेक्ट पॅग घेत होते व जास्त झाल्यामुळे त्यांच्या कडे आपल्या बचावाची ताकतच राहिली नसावी, हा विचार करत असताना त्या अधिका-याने जेथे ग्लास ठेवला होता तेथे जरा निरखून पाहीले व म्हणाले " येथे अजून एक ग्लास असला पाहीजे, ह्याचा अर्थ ह्यांच्या बरोबर दुसरा कोणी तरी होता जो दारु पण पीत होता व ती शक्यतो शेवटची व्यक्ती होती ज्यांने अरविंदला जिवंत पाहिले असेल. त्यांनी रुमालानेच मोबाईल उचलला, चांगल्या कंपनीचा मोबाईल होता, शेवटची कॉल कुणातरी शर्माची होती जी चाळिस एक सेकंदाची होती पण त्याच्या आधीची कॉल सतिशची होती जी जवळ जवळ अर्धातास चालू होती जी ८ च्या सुमारास आली होती व डॉक्टरांच्या टिम ने सांगितले की हत्या रात्री साडे नऊ ते दहा च्या आसपास झालेली असावी.

*

काही विचार करत पोलिस अधिका-याने सर्व घर व्यवस्थीत पाहून घेतले जवळ जवळ प्रत्येक वस्तू जागेवरच होती, त्यामुळे चोरी हा उद्देश नव्हताच हत्येचा, परत ते किचन मध्ये आले व शोधक नजरेने काही तरी शोधू लागले व त्यांच्या चेह-यावर एक अस्पष्ट असे समाधान दिसले, ते समोरील ग्लासच्या रॅक कडे पाहत होते, १२ ग्लास पैकी एक ग्लास बाहेर टेबलावर होता व एक गायब होता. तो सेट पुर्ण नव्हता, पण शक्यतो एकाद दुसरा ग्लास फुटला असेल कधी तरी हा विचार करुन त्यांनी इकडे तिकडे पाहिले तर प्रत्येक वस्तूचा बरोबर सेट होता, १२ प्लेट, १२ बाऊल्स, चमचे सर्व काही १२ च्या संख्ये मध्ये. ह्यांच्या घराचा नंबर पण डी-१२ होता, तेव्हा शक्यतो अरविंद आपल्या स्वतःसाठी बारा नंबर लकी समजत असावेत, तेव्हा जरी ग्लास फुटला असेल तर त्यांनी तो सेट नक्कीच पुर्ण केला असेल मग. आता तो ग्लास शोधणे गरजेचे होते कारण तो शक्यतो तो हत्या-याला पकडण्यासाठी मदत करेल.

*

बाहेर गार्डन मध्ये, मागे सर्विस कॉटर मध्ये, गॅरेज मध्ये सर्वत्र शोधा सोध करुन झाली पण काहीच सापडले नाही ज्याच्या द्वारे हत्या करणा-याची ओळख होऊ शकेल, अरविंद एकटाच राहत असे व जवळ जवळ तो रोजच पार्टी ला बाहेर जात असे त्यामुळे फक्त सकाळी घरकाम करण्यासाठि एक गडी होता जो घर स्वच्छ करणे, कपडे धुणे इत्यादी करुन २ वाजता निघून जात असे, घराची एक चावी त्याच्या कडे व एक अरविंद कडे होती, व्हिआयपी एरिया असल्यामुळे सर्वत्र गार्ड फिरत असतचं त्यामुळे समोरच्या घराचा गार्डच अरविंदच्या घरावर ही लक्ष ठेऊन असे.

*

गार्ड कडे थोडी फार माहीती मिळाली पण जरा ही कामाची नव्हती, सात-आठ जणे वेगवेगळ्या गाड्या घेऊन आले होते व थोड्या थोड्या अतंराने निघून गेले होते पण रात्री एक गाडी परत आली होती, व लगेच पाच मिनिटात गेली होती, पण काही कारणामुळे गार्ड त्या गाडिचा नंबर सांगू शकत नव्हता.. नाही तो गोंधळला होता, त्यांचे म्हणणे होते की अरविंद हे १२ च्या आसपास गाडी घेऊन बाहेर गेले होते व १२.४५ च्या आसपास परत आले पण डॉक्टरांच्या म्हणण्यानूसार हत्या साडे नऊ च्या आसपास झाली आहे, व सर्वात महत्वाचे गाडी तर आत गॅरेज मध्ये उभी आहे व हा म्हणतो आहे गाडी बाहेर गेली .. तर मग हे गाडीचे काय लफडे .. हा विचार करत पोलिस अधिकारी पुन्हा गॅरेज कडे आला व येथे असलेली स्विफ्ट गाडी ला एक चक्कर मारली व विचार करु लागले. त्यांनी काही तरी नक्की ठरवले व जी फिंगर प्रिंन्ट ची टिम आत ठस्से घेत होती त्यांना ह्या गाडीचे पण ठस्से घेण्यासाठी सांगितले.

*

"यु आर अंडर अरेस्ट मीस्टर सतिश "- पोलिस अधिकारी म्हणाला, " तुम्हाला माहीत आहे मी कोण आहे ते " - सतिश जरा गुर्मीतच म्हणाला, " हम्म, हो मला माहीत आहे तुमचे कनेक्शन खुप वर पर्यंत आहेत पण सबळ पुरावा माझ्या हाती आहे की तुम्हीच अरविंदचा खुन केला आहे व तुमचे हाताचे ठस्से व सर्वात मोठा पुरावा अरविंदचा मोबाईल आहे, ज्या मध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग आहे."
सतिशचा चेहरा पडला व तो मटकन आपल्या खुर्ची वर बसला. " मिस्टर सतिश, तुम्ही अरविंदशी फोन वर अर्धा तास बोललात, काही तरी तुमचा वाद झाला व तु सरळ अरविंदच्या घरी आलात, अरविंद आधी पासून दारु पीत होताच, त्याच्या बरोबर तुम्ही ही दारु पिली व जेव्हा तुम्हाला असे वाटले कि आता अरविंद प्रतिकार करु शकणार नाही तेव्हा त्याच्याच गळ्यातील स्कार्प ने त्याचा गळा आवळला व आपल्या काहीच खाणाखुणा राहू नयेत ह्यासाठी तुम्ही तो ग्लास पण आपल्या बरोबर घेतलात, सरळ गाडीत बसून घरी निघून गेलात, पण येथे तुम्ही एक मोठी चुक केली होती, अरविंद कडे व तुमच्या कडे एकाच कंपनीची , एकाच रंगाची व एकाच मॉडेलची गाडी होती व तुम्ही दोघांनी एकाच दिवशी घेतली होती, व पळून जाण्याच्या गडबडी मध्ये तुम्ही चुकून अरविंदची गाडी घेऊन गेलात, शक्यतो तुम्ही घरी पोहचला असाल तेव्हा तुम्हाला तुमची चुक लक्षात आली, तुम्ही ती आपली चुक सुधारण्यासाठी परत अरविंदच्या घरी आलात, त्याची गाडी जी तुम्ही घेऊन गेला होता त्याला तुम्ही गॅरेज मध्ये उभी केले, येथेच तुम्ही चुकला, अरविंद गाडी गॅरेज मध्ये कधीच उभी करत नसे, हे गॅरेज मध्ये असलेल्या धुळीमुळे आम्हाला समजलेच होते व आजू बाजूला विचारणा केल्यावर पण सर्वांनी घेच सांगितले की गाडी कधीच गॅरेज मध्ये उभी नसते. त्यांनतर तुम्ही अजून चुक केलीत जो ग्लास तुम्ही टेबला वरुन घेऊन आला होता तो नष्ट न करता तुम्ही त्या गाडी मध्येच ठेवला जी गाडी तुम्ही आपली गाडी समजून घेऊन गेला होता, दुसरी चुक तुम्ही केली अरविंदच्या गाडीची चावी तुम्ही परत आत जाऊन अरविंदच्या प्रेता जवळ ठेवली पण त्यावेळी तुम्ही त्यावरचे ठस्से पुसणे विसरलात, घरात तुम्ही सर्व जागी आपले ठस्से साफ केले पण त्या चावी वर व गाडी वर तुमचे ठस्से राहीलेच, आम्ही तुमच्या नकळत तुमच्या हाताचे ठस्से तुमच्या ऑफिस व घरातून घेतले व त्यांची खातर जमा झाल्यावरच तुम्हाला पकडण्यासाठी आलो आहोत वारंट घेऊन. व हत्येचे कारण ही आम्हाला अरविंदच्या मोबाईल मध्येच मिळाले "

*

" अरविंद, हा नेहमी राजकिय नेते व इतर व्यवसायीक लोकांच्या पार्टि मध्ये मला भेटायचा, माझा पण स्वतःचा बिझनेस होता व त्याला वाढवण्यासाठी मी देखील अरविंदच्या ओळखीचा फायदा घेत असे, पण तो पर्यंत मला माहीत नव्हते की अरविंद हा एक नंबरचा नालायक माणूस आहे, त्याच्या बरोबर मी पार्टीमध्ये असताना कधी कधी त्यांने मला कॉल गर्ल्स पुरवल्या व हारामखोराने त्यांचे मोबाईल वर शुटींग केले हे त्यांने मला एकदा दाखवले व म्हणाला की माझ्या गरजापुर्ण करत रहा मी हे प्रेसला देणार नाही पण जेव्हा तु मला पैसे नाही देणार तेव्हा मात्र मी ते प्रेसला व आधी तुझ्या बायकोला दाखवणार म्हनून." सतिश बोलत बोलत थांबला व पाणी पिऊन पुन्हा बोलू लागला " त्यांने आधी गाडी मागीतली मी पण घेणार होतो गाडी, उगाच आपली अब्रु रस्त्यावर येऊ नये म्हणून मी त्याला गाडी घेऊन दिली व त्यांने माझ्या गाडीला व्हिआयपी नंबर दिला व स्वतःच्या गाडीला पण १२ नंबर घेतला, असे तो नेहमीच करु लागला कधी पन्नास हजार तर कधी लाख... अशी त्यांची पैशाची हवस वाढूच लागली होती, मी बरबाद होत होतो, धंद्याचा पैसा त्याला देऊन देऊन माझा धंदा बंद होण्याच्या मार्गावर आला व शेवटचा पर्याय म्हनून मी त्याला एक करोड ची ऑफर दिली व म्हणालो की ते क्लिप्स मला दे. पण त्या हारामखोराला मी सोन्याची अंडी देणारी कोंबडी वाटत होतो त्यामुळे त्यांने त्याला नकार दिला व शेवटचा उपाय म्हनून मी त्याला मारण्याचा प्लान तयार केला मला माहीत होतं की हा रोज संध्याकाळी घरी बसून दारु पितो व फुल्ल टल्ली होऊ पर्यंत पितो व त्या नंतर रात्री १ - दिडच्या आसपास क्लब मध्ये जातो नाचायला. पण तो मरायला एवढा तयार झाला होता की त्या दिवशी त्यांने परत माझ्या कडे दोन लाखाची मागणी केली तेव्हा मात्र मी त्याच्या शी फोन वर भांडलो व पैसे द्यायला येतो म्हणुन त्याच्या घरी गेलो, बाकी पुढचे तुम्हाला माहीत आहेच सर्व." असे म्हणून सतिश शुन्यामध्ये डोळे लावून बसला.

*

काय बोलावं हेच त्या पोलिस अधिका-याला समजले नाही पण तो म्हणाला " सतिशराव, तुमच्या विरुध्द पुरावे सबळ आहेत, पण तुम्ही असा हत्येचा मार्ग शोधावयास नको होता जर तुम्ही आधीच पोलिसांच्या कडे आला असता तर, जी आब्रु वाचवण्यासाठी तुम्ही हत्या केली तीच आबरु कोर्ट व प्रेस समोर उघडी होणारच ना. ठीक आहे तो दोषी होता पण तुम्ही ही कमी दोषी नाही आहात. तुम्ही आपला व्यवसाय वाढवण्यासाठी चुकिचा मार्ग वापरलाच व त्याचा फायदा अरविंद सारखे लोक घेतात.. चला, तुम्हाला आपल्या कबुली जबाबावर सही करायाची आहे आता...

** समाप्त ***

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: