बुधवार, २४ मार्च, २०१०
देव.. चमत्कार व मी
दैवी चमत्कार मान्य करणे न करणे विज्ञाननिष्ठ व्यक्तीला सोपं जाते कारण त्याची मुळापासून आपल्या विज्ञानावर श्रध्दा असते व आपले मत बरोबर आहे ह्यासाठी विज्ञाननिष्ठ पुरावा ही त्याच्याकडे असतो ( जसे नाईल ह्यांनी विहीरी बाबत गणित मांडले आहे तसे) व प्रत्येक वेळी ते पुरावे सामान्य व्यक्तीला देखील पटतात. सामान्य व्यक्तीला आपल्या पुरातन संस्कृतीतून बाहेर पडण्यासाठी, पुरातन कथांना, चमत्कारांना, पुराण पुरुषाच्या अस्तित्वाला, देवाला नाकारणे जवळ जवळ अशक्य होऊन बसलेले असते कारण संस्कार, लोक-शिक्षणाची कमतरता.
मी स्वतः चमत्कार मान्य करतो पण तो विज्ञाननिष्ठ चमत्कार ! बाकी कुठला ही चमत्कार मी मान्य करु शकत नाही ह्यांचे कारण शक्यतो माझ्या वाचनामध्ये असेल किंवा जेव्हापासून डिस्कव्हरी व नॅशनल जीओग्रॉफिक टाईपची सर्वांग सुंदर दुरचित्रवाण्या आल्या त्यामुळे असेल. ह्यांनी दृष्टी दिली एखाद्या चमत्काराकडे कसे पहावे ह्याची. मी देवाचे अस्तित्व नाकारतो असे देखील नाही आहे कारण शेवटी मी देखील त्याच मातीतून आलो आहे जेथे लहानपणापासून देव सदैव आपल्याला पाहात आहे आपले कर्म पहात आहे असे शिकवले जाते. पण तरी ही काही गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर तोलून नक्की पहाव्या असे वाटतं.
कित्येक पिढ्यामागे माहीत नाही पण आमच्या घरातील एका व्यक्तीला आपला मुळ धर्म सोडून जैन धर्मात प्रवेश करावे असे वाटले असेल व त्यांनी त्यानूसार केला. पण मुळ धर्मातील देव हे ते देखील त्याग करु शकले नाहीत त्यामुळे नवीन धर्मात आल्यावर जसे नवीन देव देव्हार्यात आले तसेच जुने देव देखील तेथेच राहीले त्यामुळे आमच्या घरात लक्ष्मीपुजन होते, गणपती पुजन होते, कुल दैवत नाईकबाचे पुजन होते व त्याच बरोबर २४ तिर्थंकरांचे देखील पुजन मनन होते. त्यामुळे लहानपणापासून देव ह्या संकल्पनेवर प्रचंड विश्वासाचे वातावरण आमच्या घरात दिसे. देव व देवाचे मंदिर ह्या विषयी मला काय वाटते दे मी मागे एका लेखामध्ये लिहले आहे पण येथे देवाचेच अस्तित्व नाकारणारे वातावरण पाहीले की माझ्यासारखा माणूस बावरुन जातो. कोणाला बरोबर मानावे, कोणाचे सत्य सत्य म्हणून अंगिकारावे ह्या गोंधळात तो गप्प राहणेच पसंद करतो.
चमत्काराचा व माझा सरळ संबध आला तो जेव्हा मी बाहुबली हॉस्टेलमध्ये शिक्षण घेत असताना नेहमी दंगा व हॉस्टेलमधून पळून जाते असे प्रकार करत असे तेव्हा. कोणीतरी आईला सांगितले की ह्याच्यावर (माझ्यावर) कोणीतरी करणी केली असू शकते मग लगेच आमच्या माता आम्हाला कोल्हापुर पासून १३०-१४० किमी दुरवर कर्नाटकात एकोंडी नावाच्या गावी घेऊन गेल्या. बुवामहाराजांनी मला एका पुजेचे ठिकाण असलेल्या पाटावर बसवले व आपले मंत्र पठण चालू केले काही मिनिटानंतर डोक्यावर टपा टपा लिंबू पडू लागले चांगले वीस तीस लिंबू खाली पडले. अंगारा फुंकणे, चित्रविचित्र आवाज काढत गोल गोल फिरणे वर करुन लिंबू पाडणे हे काही वेळ चालू राहीले व आई कडून ५०१ रु. दक्षिणा घेऊन माझ्या डोक्यावरचे भुत उतरले आहे असे सांगून बोळवणी केली. त्या एरियातून बाहेर पडल्या पडल्या मी आईला प्रश्न विचारला ते महाराज मला बाहेर अंगणात बसवून ते लिंबू पाडून दाखवतील का ? झाले देवाबद्दल काय वाटेल ते विचारतोस म्हणून धप्पा धप्पा मार पडला रस्त्यावरच. माझी आई कमी शिकलेली आहे त्यामुळे मी त्या चमत्कारावर शंका व्यक्त करतो आहे म्हणजे मी त्याचे अस्तित्वच नाकारत आहे असे तिला वाटले. ( त्यानंतर देखील मी हॉस्टेलमधून अनेकवेळा पळून गेलो ही गोष्ट निराळीच ;) )
ह्यानंतरचा चमत्कार आमच्या पाहुण्यामध्येच एक स्त्री करत असे. पाटावर जोंधळे पसरवून त्यावर भरलेली पाण्याची तांब्याची घागर ठेवत असे समोर ती बसत असे व विरुध्द बाजूला ज्याला काही अडचण आहे ती व्यक्ती. मनातल्या मनात प्रश्न विचारायचे व त्या घागरी च्या काठांना दोन्ही हाताच्या मधल्या बोटाने फक्त स्पर्श करायचा व तिकडून तीने देखील तश्याच पध्दतीने स्पर्श करायचा उत्तर हो असेल तर घागर उजव्याबाजूला फिरु लागे व नाही असेल तर डाव्या बाजूला. मला ते पाहून एकदम तिच्यामध्ये असलेल्या शक्तीबद्दल तिच्या कार्याबद्दल व तिच्या अंगात येण्याबद्दल प्रचंड विश्वास वाटू लागला व काहीतरी दैवी शक्ती आहे ह्यामध्ये नक्की ह्या निर्णयापर्यंत आलो. असे काही दिवस भारावलेल्या अवस्थेत मी चांगल्या मुलासारखा वागलो तर घरी देखील तिच्याबद्दल विश्वास निर्माण झाला मग दर रवीवारी त्या पाहुणीकडे आमच्या फेर्या वाढल्या. घर पाहुण्याचेच असल्यामु़ळे मला व माझ्या बहिणीला प्रचंड मोकळीक होतीच. आम्ही खेळता खेळता त्या पुजाघरात शिरलो तर समोर ती घागर व साहित्य तयार होते अंगात मस्ती फार त्यामुळे लगेच समोर जबरदस्तीने बहिणीला बसवले व तिला त्या घागरीला स्पर्श करण्यास सांगितले व मी देखील केला काय नवल ती घागर माझ्यासारख्याच्या स्पर्शाने देखील उजवीकडे फिरली, मी बहिणीला हात त्या घागरीवरुन काढून पुन्हा स्पर्श करायला लावला पण आधी उजवे बोट स्पर्श कर असे सांगितले मग परत घाघर फिरली डाव्याबाजूला. हे पाहून माझी बहिणीची तंतरी उडली व ती तेथेच किंचाळली घागर फिरत आहे बघून. झाले परत मार पडला पण मला कळाले ही काहीही असो चमत्कार नक्कीच नाही आहे ह्यामागे. घरी आल्यावर आईला पटवून देण्याचा खुप प्रयत्न केला घरीच तसा सेटअप करुन तीला घागर फिरवून दाखवली तरी तीने ते मान्य केले नाही की तो चमत्कार नव्हता.
ही झाली दोन उदाहरणे भोंदुबाजीची म्हणा अथवा चमत्काराची कारण दोन्ही जागी लोकांच्या प्रचंड रांगा लागायच्या संकट निवारण्यासाठी. चांगल्या गोष्टीचा प्रसार होण्यासाठी वर्षानू वर्ष लागतात पण एखादा चमत्कार काही तासामध्ये जगभर पसरु शकतो, आपल्यापैकी जवळ जवळ सर्वांना "गणपती दुध पितो" चा पराक्रम माहीत असेल ना ! त्या दिवशी आमच्या घरातील डाव्या सोंडेचा सोनेरी गणपती देखील चमच्याने दुध पित होता व वाड्यात आमच्याच घरी गणपतीची मुर्ती असल्यामुळे घरी प्रचंड गर्दी व बाहेर रांगा लागल्या होत्या ते अजून आठवते ;)
असे अनेक चमत्कार करणारे पाहणे माझ्या नशीबी आले पण परवा परवा जेव्हा अपघात झाला म्हणून घरी आडवा पडलो होतो तेव्हा आईला कोणी तरी माझी दृष्ट काढावयास सांगितली, अर्धातास लेक्चर दिले पण आई काय बधली नाही व शेवटी मी हार मान्य करुन तीला तिचे कार्य करु दिले. दहा-बारा वाळलेल्या लाल मिर्च्या तीने माझ्यावर उतरवून चुलीत टाकल्या व चार पाच मिनिटाने माझ्याकडे आली व म्हणाली बघ.. आता तरी समजले का ? मला काहीच समजले नाही तेव्हा तीने मला सांगितले की तु एक लाल मीर्ची चुलीत टाकून बघ. काही न करता उचलायची व चुलीत टाकायची. माझे विज्ञान निष्ठ मन ह्यासाठी लगेच तयार झाले व म्हणालो बघ ह्या मिर्चीचा पण धुर होणार नाही म्हणून समोर असलेल्या पोत्यात हात घालून एक मिर्ची उचलली व सरळ स्वंयपाक घरातील चुलीत टाकली.......दहा मिनिटे खोकुन खोकुन जीव अर्धमेला झाला..
आईच्या डोळयात विजयी भाव होते व माझ्या मनात हे असे कसे झाले असावे ह्याचा विचार. त्याच पोत्यातील बागडी मिर्च्या ( कर्नाटकातील एक लाल मिर्चीचा प्रकार जो प्रचंड तिखट असतो व जहाल देखील) आईने माझ्यासमोर घेतल्या होत्या व चुलीतल्या निखार्यावर टाकल्या होता तेव्हा धुर न होता मिर्च्या जळून गेल्या पण त्याच पोत्यातील मिर्ची मी जेव्हा निखार्यावर नुस्तीच टाकली तेव्हा मात्र ती मिर्ची जळून न जाता घरात मिर्चीचा धुर करुन गेली असे का घडले असावे ? ह्याचे उत्तर मला काही सापडले नाही, आमच्या स्वयंपाक घरातून त्यानंतरचे चारपाच दिवस मिर्च्याचा धुर येतच असे.. कारण माझे समाधान झाले नव्हते पण प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मी मिर्ची टाकत असे तेव्हा धूर होत असे हे नक्की. शेवटी माझी मावस बहिणी आपल्या बाळाला घेऊन मला बघायला आली होती ते बाळ प्रचंड रडत होते म्हणुन आईने परत तोच प्रयोग त्या बाळावर केला तेव्हा मात्र धुर झाला नाही त्यामुळे डोके जाम सटकले विश्वास ठेवू नये असे नक्की माझे मन सांगत होते पण जे डोळ्यासमोर घडले त्याला काय म्हणावे ! ह्याला मी चमत्कार नक्कीच म्हणणार नाही पण कुठेतरी काहीतरी नक्की ह्यामागे कारण असेल हे मात्र खरं.
जाता जाता....
आग्र्याला ताजमहल आहे जगप्रसिध्द, वास्तू शास्त्रातील चमत्कार असे पण म्हणतात काही जण पण त्याचे मला कधीच आकर्षण वाटले नाही पण तेच जयपुर मध्ये हवा महल आहे तो मला नक्कीच चमत्कार वाटतो भर उन्हाळ्यात बाहेर ४०-४२ अंश उष्णता रखरखत असते व हवामहल मधील प्रत्येक खोली एसी लावल्याप्रमाणे थंडगार असते... चमत्कार म्हणावा तर ह्याला !
शनिवार, २४ ऑक्टोबर, २००९
... देवाचं घर !
’खरोखरच देव सगळीकडे असतो का?’ मी कित्येक वेळा शाळेत जातायेताना आई अंबाबाईला विचारले असेल, “आई तू असतेस सगळीकडे तर दिसणार कधी? आणि मग तुझ्यासाठी हे मंदिर तरी कशाला ?” पण नेहमीच तिचा प्रसन्न, हसरा चेहरा माझ्याशी न बोलताच शांत असायचा. मग मी घरी परतलो की माझ्या आईला परत तेच प्रश्न. आई म्हणायची, “अरे जसे आपल्याला घर हवे तसेच आई अंबाबाईला पण हवे ना! त्यासाठी ते दगडाचे देऊळ.” तेव्हापासून प्रत्येक देवळात मला घर दिसतं...जिवंतपणाचा भास होतो. अगदी आजही प्रत्येक मंदिर संपूर्ण फिरून, प्रत्येक दगडाला हात लावला की त्यांची स्पंदनं मला जाणवतात.
कोल्हापूरला आमच्या घराजवळ लक्ष्मीसेन मठ नावाचा एक जैन मठ होता. तिथल्या तीर्थंकरांच्या संगमरवरात कोरलेल्या पांढ-याशुभ्र, देखण्या, रेखीव मूर्ती काय, तो कणखर काळ्या दगडातला डोंगराचा राजा ज्योतिबा काय किंवा कात्यायनीच्या मंदिरातील कात्यायनी मातेची मूर्ती काय! सा-याच कशा मूर्त होऊन समोर उभ्या असतात की जिवंत वाटतात पाहताना. कळत नकळत कधीतरी आपोआप हात जोडले जातात...कधी देवासाठी किंवा कधी त्या दगडात प्राण फुंकणा-या कारागीरांसाठी!
आपल्या महाराष्ट्रात मंदिरांच्या नाना त-हा! कोकणातलं देवगडपासून जवळच समुद्रकिना-यावर असलेलं एक शिवमंदिर...(नाव आठवत नाही आहे खूप वर्षांपूर्वी गेलो होतो) केवळ नितांतसुंदर! सिंधु नदीचा अंश असलेला, मंदिराच्या पायाशी सतत अर्घ्य देणारा समुद्र, देवळाच्या गाभा-यात घुमणा-या रुद्राचा लयबद्ध गंभीर सूर प्रतिध्वनीत करणारी त्याची ती एकसंध गाज! हा समुद्रही त्या शंकरासारखाच...वरवर त्याच्या जटेतल्या गंगेएवढाच शांत पण त्या लयीतच खोल कुठेतरी प्रलयाची, रौद्राची सूप्त शक्ती असलेला...
गणपतीपुळ्याच्या मंदिराचे तर काय वर्णन करावे? लाल दगडामध्ये उभे असलेले हे मंदिर...पेशवेकालीन शैलीचा प्रभाव...समोरच्या समुद्राच्या खोलीशी स्पर्धा करणारे दहा मजली उंच कळस! शिखरांचा भार तोलणारे शेकडो हत्ती आणि वर पाय-यापाय-यांनी निमुळते होत जाणारे शिखर! देखणी कलाकुसर असलेले माझे एकदम आवडते मंदिर.
जैनांची मंदिरे तर दृष्ट लागावीत एवढी सुंदर...त्यातही श्वेतांबर जैंनाचे मंदिर म्हणजे तर स्वर्गीय. अगदी पहिल्या पायरीपासून शिखरापर्यंत सर्वकाही नीटनेटके...सर्व काही सफेद, निष्कलंक...देवापुढे तेवणा-या चांदीच्या समईच्या शुभ्र कळ्यांसारखी! बाहेरच्या रणरणत्या उन्हातून अचानक त्या संगमरवरी मंदिरात शिरल्यावर जसं शरीराला थंड वाटतं तसंच आतली महावीरांची अथवा तीर्थंकरांची शांतचित्ताने बसलेली मूर्ती, तिचे अर्धोन्मलित डोळे, अस्फुट मंदस्मित करत असलेले ते ओठ हे सारं पाहून आतूनदेखील तसंच थंड, शांत वाटतं.
दक्षिण भारतीय मंदिरे तर फक्त दर्शनाचा विषय नाहीच तेथे तर प्रत्येक मंदिर एक वेगळे विश्व आहे, त्यांचा एक वेगळाच बाज आहे. मला आठवतं ते विजयवाडामध्ये कृष्णा-गोदावरीच्या संगमाजवळ असलेले दुर्गा मंदिर...एखाद्या चित्रकाराने कागदावर पेन्सिलीने काढलेले रेखाचित्रच कागदातून प्रत्यक्षात यावं अगदी तसं!! देऊळ काळ्या पत्थरामध्ये तर शिखर अर्धे सोन्याने मढवलेले ! सकाळची कोवळी उन्हं त्या शिखरावर पडली की त्या झळाळीने आकाशात तरंगणा-या एखादया ढगाला सोन्याची झालर दिसत असे. अनेक अप्सरांच्या देवीदेवतांच्या रेखीव मुर्ती, त्यांचे भावरंगीन नृत्याविष्कार, त्यांच्या चेह-यावरचे तल्लीन भाव तिथे असे काही कोरलेले होते की देवांच्या सभेतल्या नारद-तुंबरांच्या गाण्याचा, सरस्वतीच्या वीणावादनाचा, मॄदुंगाच्या तालाचा भास होत रहातो. एकेका मूर्तीतून एकेक गोष्ट उलगडत रहाते...कालाच्या पटासारखीच निरंतर...गणेशमूर्ती असो वा ताडंव करण्या-या शंकराचे उग्र रुप दर्शन...विष्णू अवतार महिमा असो वा दुर्गेचं अक्राळविक्राळ रूप असो...हजारो वर्षापासून अखंड उन्हं, वारा पाऊस ह्याचा मारा झेलत उभे असलेली ही निःशब्द...निर्जीव मंदिरं नकळत बरंच काही सांगून जातात.
भटकत भटकत मी उत्तर भारतात आलो तसं हे वेडही माझ्याबरोबरच आलं. कलकत्यातील कालीमातेचे मंदिर असो वा लाल मंदिर असो, मनात कितीही कल्लोळ असला तरी मंदिराभोवती फिरताना मात्र एक प्रकारची आंतरिक स्थिरता जाणवली. जेव्हा मी सर्व प्रथम अमृतसरचे सुवर्ण मंदिर पाहीले तेव्हा थक्कच झालो. मंदिरात घातलेल्या धुपाने सुवासिक झालेलं धुकं...त्या सुवासाचा माग काढत मंदिराच्या खुल्या कवाडातून आत शिरणारी सकाळची कोवळी उन्हं...वातावरणात भरून राहिलेला ओंकाराचा घोष किंवा गुरुग्रंथ साहेबचे पठण आणि ती सगळी पुण्याई, तो सेवाभाव वर्षानुवर्ष आपल्या पोटात साठवून ठेवला समोरचा संथ तलाव. तलावाच्या भोवतीच्या कठडयावर बसावं आणि त्या पाण्यामध्ये पाय सोडून शांत चित्ताने समोर चालू असलेला धार्मिक सोहळा पाहत बसावे...जिवंतपणी स्वर्गात असण्याची, अमृताच्या स्पर्शाची अनुभूती ती हीच असावी का? असं क्षणोक्षणी वाटावं असं वातावरण.
उंच डोंगरद-यावर देखील मानवाने अनेक सुंदर कला कृती निर्माण केल्या आहेत. त्या बाबतीत हिमाचल प्रदेश एक नंबरवर ! अनेक शतकापासून ह्या देवभूमीवर कित्येक मंदिरे आणि मठ वसलेले आहेत. कुलुमनाली इथे असलेले हिडंबा देवीचे पुरातन मंदिर असो वा चंबा येथील लक्ष्मी नारायण मंदिर...शिखर पद्धतीचं संपुर्ण दगडी बांधकाम.पहाताक्षणीच ह्यांचं वेगळेपण जाणवतं. इतर मंदिरांत गर्भगृहाला वरती कळस असतो. इथे मात्र पूर्ण मंदिराचा आकारच कळसासारखा असतो. हा गाभारा हा कळस असा वेगळं दाखवताच येत नाही.
आणखी एक सहज जाणवलेली गोष्ट म्हणजे दक्षिण भारतीय मंदिरामध्ये भिंतीशिल्पांना मखर हा प्रकार नसतो. पण इकडे उत्तर भारतात मात्र एकेक भिंतीशिल्पंदेखील दगडी देव्हा-यात बसवलेली असतात. शिवाय उत्तर भारतीय मंदिरं तिथल्या आसपासच्या दगडामातीतून जन्मल्यासारखी वाटतात. कारण मंदिर उभं करण्यासाठी स्थानिक दगडांचा वापर केला जातो. दक्षिण भारतीय मंदिरामध्ये मात्र अनेकवेळा दुरदुरुन दगड जमा करुन मग मंदिर निर्माण केले गेले असावे असे वाटते. मंदिर आणि आसपासचा परिसर पाहिल्यावर देवळाचं वेगळेपण लक्षात येतं. कदाचित “मातीचे पाय” संपून दिव्यत्त्वाची सुरुवात ह्या देवळात होते हे तर इथे सुचवायचं नसेल नां?
बाहेरुन झालेले शेकडो हल्ले व मुस्लीम बादशाहांनी वेळोवेळी केलेली मंदिरांची तोडफोड ह्यामुळे उत्तरेतील अनेक सुंदर मंदिरे मातीमोल झाली पण त्याचवेळी पूर्वेकडे मात्र शिल्पकला बहरतच होती. त्यामुळेच ओडिसात अनेक सुंदर सुंदर मंदिरे आजही दिमाखात उभी आहेत...मग ते जगन्नाथ मंदिर असो वा कोणार्कचे सूर्य मंदिर. पूर्वेकडली मंदिरं ही अखंड दगडातून उभी राहिली आहेत हे त्यांचे वेगळेपण म्हणता येईल. भुवनेश्वरमधील मंदिरे पाहिली की हे वेगळेपण खूप प्रकर्षाने जाणवतं व तिथल्या कलाकारांची कल्पक दूरदृष्टीदेखील! निमुळती होत जाणारी शिखरे व कामरसामध्ये रत असलेल्या यती-अप्सरांची भिंतीशिल्पंदेखील ह्यांचं एक वेगळेपणच म्हणता येईल. त्यावेळच्या राजेमहाराजांनी मंदिराच्यावर मनसोक्त धन खर्च केले त्यामुळेच इथले कलाकार रामायण महाभारतातल्या कथांनी मंदिरांच्या भिंती जिवंत करू शकले. माझ्या माहितीप्रमाणे ओरिसातलं सर्वात जुनं परशुरामेश्वर मंदिरदेखील अशाच उत्तम कलेचा नमुना आहे. उत्तरेकडे राजकीय अस्थिरतेला मंदिरांच्या पावित्र्याचा, सौंदर्याचा उःशाप मिळाला आहे आणि पूर्वेकडे शृंगाराला, आध्यात्माला तिथल्या शांततेचं, सुबत्तेचं कोंदण लाभलेलं आहे. असं म्हणता येईल.
मंदिराच्या बाबतीत संपन्नता बघायची असेल तर मात्र गुजरातशिवाय पर्याय नाही. गुजरातमध्ये अगदी गल्लीबोळातही मंदिर पहायला मिळते. पण ती छोटी मंदिरेदेखील देखणीच असतात. इथल्या सुबत्तेचं प्रतिबिंब इथल्या मंदिरात पहायला मिळतं. भरूचच्या स्वामीनारायण मंदिराबाबत किंवा सोरटी सोमनाथाच्या मंदिराबाबतीत हेच म्हणता येईल. जैन मंदिरांच्या शिखरांवर जशी धर्मध्वजा फडकत असते, तोच प्रकार गुजरातमधील जवळजवळ सर्व मंदिरांमधेही दिसतो. आता जैनांनी ही पद्धत गुजरातमधून घेतली की गुजरातने जैंनाकडून हे माहीत नाही. गुर्जर समाजाच्या रक्तात भिनलेल्या व्यवस्थापन कौशल्याला इथली मंदिरंही अपवाद नाहीत. मंदिर स्वच्छ ठेवणे, गडबडगोंधळ टाळून शांतता राखणे हा ह्या व्यवस्थापनाचाच भाग.
मंदिराच्या हवेशीर बांधकामामुळे मंदिरात एक प्रकारचा मोकळेपणा जाणवतो. हिरे, मोती, सोन्याचा मुक्तहस्ताने केलेला वापर, मंदिर तोलून धरणारे कोरीव स्तंभ आणि त्या स्तंभांवरील दर्शनीय शिल्पकृती ह्यामुळे इथली मंदिरं निश्चितच प्रेक्षणीय झाली आहेत.
सारा भारत फिरलो, अनेक मंदिरं पाहिली. ती सारीच आपापल्या परीने सुंदर होती. सर्वत्र असलेला देव त्या सौंदर्यातून, तिथे भरून राहिलेल्या पावित्र्यातून, ते मंदीर घडवणा-या हजारो कारागीरांच्या कष्टांतून तिथे प्रकट झाला होता. जिथे जिथे अशी शांतता, सौंदर्य, कष्ट, पावित्र्य असतं तिथेच मला देव जाणवेल. देवाच्या शोधात आता मला कधीच फार दूर जावे लागणार नाही.
*
मी काही आर्किटेक्चरचा (वास्तुशास्त्राचा?) अभ्यासक नाही आहे, जे मला वाटलं तेच लिहीलं आहे, त्यामुळे काही जागी चुका असतील तर समक्ष्व.
रविवार, १८ ऑक्टोबर, २००९
माझी सफर... कार्य सिध्दी ... भाग - ६
असेच एक दिवस चारीजींनी मला बोलवले व म्हणाले " तुम्हे यही करोलबाग में जैन साब के यहा जाना है, वह टी,टी. गार्मेंट के मालिक है... जाणते हो ना टी.टी. ?" मी हो म्हणालो व त्यांची परवानगी घेऊन जैन साहबांकडे गेलो दरवाजावर परवानगी घेऊन मी त्यांच्या कार्यालयात पोहचलो तर समोर जैन साहेब बसले होते व मी जाताच त्यांना अभिवादन करुन म्हणालो की " सर, मै राज जैन, मुझे चारीजींने आपके पास भेजा है, आप को कुछ काम है" ते हो म्हणाले व मला एका संगणकाकडे बोट दाखऊन म्हणाले " बेटा, देखो इसे कुछ हुआ है, तथा इस मे मेरे काम की बहोत सारी चीजे है तथा वह मेरी सारी चीजे जरुरत की है" मी हो म्हणालो व त्यांच्या संगणकाकडे वळलो, थोडेफार काम केल्यावर मी त्यांना सांगितले की काही वस्तूंची गरज आहे व मला ती विकत आणावी लागेल. त्यांनी लगेच किती पैसे लागतील विचारुन घेतले व पैसे मला दिले , काही वेळानंतर मी त्यांचा संगणक चालू करुन त्यांना दाखवला व त्यांच्या सर्व महत्वाच्या फाईली त्यांना दाखवून मी त्यांना सांगितले की काय अडचण होती व किती पैसे खर्च झाले, व वाचलेले पैसे मी त्यांना परत दीले व त्यांची परवानगी घेऊन चारीजीच्या कडे परत आलो तो पर्यंत चारीजी व जैन साहेब ह्यांचे फोन वर बोलणे चालू होते मी गेल्यावर चारीजींनी फोन खाली ठेवला व म्हणालो " वा, राज आज तो तुमने बडा ही काम कर दिया" मी हसत म्हणालो " नही सर, इतना बडा भी नही था यह काम, बस कुछ सामान खराब था, बदल दिया तथा चालू करके उन्हे दे दिया" ते म्हणाले " नही, छोटा नही था काम , वहा जो आदमी आता था उसने तो नया पीसी लेने के लिये कहा था तथा वह लुटने के चक्कर में था पर तुम्हारी वजह से उन्ह के पैसे बच गये तथा उन्होने तुम्हे १०००.०० रु. देने के लिए मुझे कहा है तथा शाम के समय उन्ह के यहा जाना व तुम्हे कुछ गिफ्ट भी करना चाहते है" मी हसलो व म्हणालो " नही सर इसकी क्या जरुरत है, आप उन्हे मना कर दो कृपा कर के" पण त्यांनी जे उत्तर दिले ते मात्र माझ्यासाठी एकदम जिवनमार्गच ठरले, ते म्हणाले " राज, जिवन में कभी पैसे को ना मत कह ना तथा जो तुम ने काम किया है उसका मुल्य जरुर लेना, शर्म पैसे की कभी नही हो नी चाहीए" मी हसत मान डोलावली व आपल्या कामाला लागलो.
चारी जींच्या कृपेने तथा माझ्या काही करण्याच्या इच्छेला मान देऊन काही महत्वाच्या व्यक्ती तथा संस्था मला संगणकाच्या कामासाठी बोलवू लागल्या व रोजचा कामाचा व्याप वाढू लागला. तेव्हा चारी जीं नी माझ्या साठी खोली वर एक फोन लावून दिला व म्हणाले की ह्याचा उपयोग आजच्या घडीला सर्वात जास्त होऊ शकतो तेव्हा सर्वांना हा नंबर दे. माझे रोज बस मधून फिरणे तथा पायी चालणे ह्यामुळे तथा काही हवामानाचा फरक असेल त्यामुळे मी काही दिवस आजारी पडलो तेव्हा मात्र चारी जींनी विचारले " राज, कितना पैसा जोडा है ? " मी म्हणालो की जास्त नाही १५०००.०० एक हजार रु. आहेत तेव्हा चारी जीं नी आपल्या जवळचे ५०००.०० रू. दीले व म्हणाले की एखाद दुसरी मोटर-सायकल पाहून खरेदी करुन टाक आजच, शुभ दिवस आहे आज. मी हो म्हणालो व तेथून सरळ दिनेश जवळ आलो, दिनेश तेथेच त्या गल्ली मध्ये राहत होता माझ्या खोली च्या जवळच जेथे मी जेवण करतो ते त्यांच्या काकाचे हॊटेल. मी दिनेशला एक बाईक हवी आहे असे सांगताच तो मला म्हणाला " अरे राज सर, क्या बात है, अच्छे टाईम पें बोला है आपने, अभी रुको दो बाईक दिखा देता हूं जो चाहिए वह ले लेना" मी तेथेच थांबलो व म्हणालो "ठीक है, जल्दी वापस आना प्लीज मुझे कही जाना है" तो लगेच गेला व दोन मित्रांच्या बरोबर लवकरच दोन बाईक घेऊन परत आला, दोन्ही RX-100 यामाहा होत्या, एकाची किमंत त्याने २५०००.०० रु. व एकाची १८०००.०० रु सागितली, दोन्हीचा वापर करुन पाहिला व चारीजींना फोन केला व त्यांना सांगितले तेव्हा त्यांनी मला काही त्यातले कळत नाही तुच बघ म्हणून फोन ठेवला. मी जास्त विचार न करता १८०००.०० वाली गाडी घेतली व म्हणालो " पैसा अभी ले के जाना भाई, लेकिन नाम करा के आज ही देना मुझे" तो म्हणाला की सेल नोट देइन व ट्रान्स्फर दोन दिवसामध्ये करुन देइन. मी हो म्हणालो.
बाईक झाली, काम देखील व्यवस्थीत चालू झाले, नोकरी तर होतीच, व राहण्याची देखील अडचण जवळ जवळ संपलीच होती तेव्हा चारी जींच्या सांगण्यावरुन मी एका छोट्याश्या जागी दुकान काढण्याचे नक्की केले पण चारी जीचे एक मित्र व मोठे चित्रपट निर्माते श्री.......... जींनी मला सांगितले की करोलबाग मध्ये एका जागीची बिल्डींग आहे तेथे त्यांच्या शेयर मार्केटचे काम त्यांचा छोटा मुलगा पाहतो तेथे काम चालू कर व तेथेच पुर्वी त्यांच्या मुलाने संगणकाचे काम करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा नाव व फोन नंबर सगलेच तयार मिळेल, मी त्यांच्या ह्या सल्ल्याला हो म्हणून तेथेच काम चालू केले.
चारी जीची आर्थिक मदत व माझ्या कामावर माझा असलेला विश्वास ह्यामुळे कामामध्ये माझा व्यवस्थित नफा चालू झाला व मी त्यातील काही शेयर चारी जीं तथा तो चित्रपट निर्माता ह्यांना देऊ लागलो.
एक दिवस चारीजीं नी मला कार्यालयात बोलावले व एका व्यक्तीशी भेट घालून दिली व म्हणाले " राज, यह जिंदल भाई साब है, इन्ह का बहोत बडा कारोबार है तथा यह तुम्हे अपने साथ रखना चाहते है, तुम जाना चाहोगे ?" मी त्या व्यक्तीकडे निहाळून पाहीले तर ५.६ ची उंची व्यवस्थीत कपडे, एक फाईल हातामध्ये व चेह-यावर एक यशस्वी हसू. मी त्या व्यक्त दर्शनाने अथवा चारीं जींचा मान राखावा ह्या उदेशाने म्हणालो " चारी जी, आजतक आपने जो कहा है कभी मेंने मना की या है ? " चारी जींच्या चेह-यावर एक समाधानाचे हसू मी पाहीली व मी त्यांच्या विश्वासानूसारच बोललो हे मला खुप आनंद देऊन गेले. दोन-चार दिवसानंतर मी जिंदल ह्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेलो व त्यांची भेट घेऊन व्यवस्थीत कामाविषयी माहीती घेतली व त्यांच्या कडुन दोन एक आठवड्याचा वेळ मागून घेतला.
क्रमश :
* काही व्यक्ती तथा संस्थेची नावे काळजीपुर्वक येथे लिहलेली नाही आहेत क्षमा असावी, काहीतरी अनुबंध असल्यामुळे अथवा त्यांचे व्यक्तीगत जिवन येथे महाजालावर येऊ नये ह्या उद्देशाने.
शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २००९
दिवाळी...
राजा, लेका उठ, सकाळ झाली रे, तुला बाबा बरोबर दुकानावर जायचे आहे ना.. उठ लवकर.
दिवाळीच्या १५ दिवस आधी पासून आमच्या घरातली सकाळ जवळजवळ रोज ह्याच वाक्याने होत असायची.
आई घरात आलेले कपड्यांचे गठ्ठे उसवायला बाबांची मदत करत असे व अक्का ते साईज वाईज लावत असे व बाबा ते आपल्याजवळ असलेल्या बिलावरुन माल बरोबर आहे की नाही हे नोंद करत असत, मी डोळे चोळत उभा राहूपर्यंत त्यांचे अर्धे काम झाले असायचे, व मला बाबा म्हणायचे राजा तयार हो लवकर साडे-सातच्या आत साफसफाई करुन दुकान उघडू आपण.. बोहनी चांगली होईल आवर पटापटा. मी जरा अनिच्छेनेच अंघोळ इत्यादी करुन तयार होतं असे व तो पर्यंत बाबा आपले नाष्टाकरुन पुढे गेलेपण असायचे मागे माझ्यासाठी दोन पिशव्या माल ठेऊन जायचे. मी नाष्टा करुन तयार होऊपर्यंत अक्का दुसरा गठ्ठा सोडवून त्यातला माल मोजायला बसायची.. तीला पाहून कधी हसू येत असे तर कधी राग. हसू ह्यासाठी की ती मोजता मोजता चुकायची.. माझ्या पेक्ष्यालहान वयाने व राग ह्यासाठी की हिच्यामुळे मला शिव्या बसायच्या कारण ही लहान असूनपण काम करायची.
मी पिशव्या घेऊन दुकानात पोहचूपर्यंत बाबा रोडवर पाणी मारुन झाडून मारुन साफसफाई आवरलेली असायची व कपडे लटकवण्याचे लोखंडी स्टॆन्ड लावून मोकळे झालेले असायचे व नवीन आलेला माल साईजप्रमाणे एका जागी जमा करत बसलेले दिसायचे, दुकान... दुकान कसले ज्याला ना शटर ना कुलुप.. महाद्वाररोडवर ड्रेसलॆन्ड दुकानासमोर ची ५ बाय ५ फुटाची जागा, कधी बाबा ह्याच ड्रेसलॆन्ड दुकानामध्ये २५० महिना पगारीवर नोकरी करत पण स्वत:च काम चालू करु म्हणून नोकरी सोडून मालकाच्या परवानगीने ड्रेसलॆन्डच्या बाहेरच दुकान थाटले.. १०-१० चे प्लॆस्टिकची चटाई व कधीमधी पाऊस पडला तर एक्स्ट्रा हिस्सा झाकायला कामी यावा म्हणून.. आधी गांधीनगर मधून माल आणत पण जरा स्वस्त मिळते म्हणून स्वत: मुंबईला जाऊन आता माल घेऊन येत असत.. बाबा एक वर्षाच्या लहान मुलीपासून १४-१५ वर्षाच्या मुलीचे ड्रेस विकत असतं व मला ह्याचा खुप राग.... कारण वर्गात मुले चिडवायची.. कधीमधी... आला लेडिज ड्रेसवाला म्हणून..
सकाळी नऊ वाजेपर्यंत आमचं दुकान एकदम नटून थटून तयार होत असे.. व आता वाट बघायची ती फक्त बोहनीची... बोहनी होत नाही तो पर्यंत बाबाजवळच्या मित्राजवळ बसून नवाकाळ वाचायचे व चहा चालू असायचा कधीमधी ग्राहक आले की लगेच उठून येत असत व ग्राहकाने खरेदी केली तर ठीक नाही तर परत मित्राच्या दुकानात.. त्यांना वाटायचे ग्राहकाची वाट बघितली तर ते येणारच नाही. मग कधीकधी दहा साडे दहाच्या आसपास बोहणी होत असे व मग बाबा खुष, एकदा बोहणी झाली की मग काही हरकत नाही कधीकधी बोहणीसाठी बाबा आपल्याला पडलेल्या किमतीला पण कपडे विकत व स्वत: मागून एक रुपया त्या ग्राहकाकडून घेत व म्हणत " ताई, हीच गं आजची दिवसाची कमाईची सुरवात." व ती बै हसून तो एक रुपया आनंदाने देऊन जात असे व बाबा तो एक रुपये आपल्या जवळ्या ड्ब्बात आई आंबाबाईच्या फोटोवर ठेवत व म्हणत... आई तुच बघ गं... तुझ्यासाठीच ही सुरवात. तो पर्यंत आई व अक्का घरातले काम संपवून आमचे डब्बे घेऊन हजर होत असतं...
जसाजसा दिवस चढत जाई तसे तसे खरेदीदार वाढत जात... मी साईजनूसार कपडे काढून देणे व ग्राहकांनी विसकटलेल्या कपड्यांची घडी घालणे हे काम करत असे व जेव्हा मोकळा वेळ मिळत असे तेव्हा गल्यातील पैसे क्रमवार लावत असे तेव्हा बाबा म्हणायचे राज्या लेका तु दहादा मोजलेस तरी पैसे तेवढेच राहणार ... मी त्यांना म्हणत असे बाबा असेच कपडे विकत राहिले तर आपण दिवाळीच्या दिवशी काय विकणार माल कमी पडेल ना.... मग ते म्हणायचे राजा लेका तुझ्या तोंडात साखर पडो... माझ्यामुळे पण आमच्या दुकानात जरा खरेदी जास्त होत असे असे मला वाटायचे तसे बाबांना पण वाटायचे कारण माझ्या शाळेतील सर्व मुली आमच्याकडेच ड्रेस घ्यायला येत असतं दिवाळीच्या... डिस्काउंटसाठी. अक्का व मी एकाच शाळेत असल्यामुळे माझ्या वर्गमैत्रीणी चांगल्या अक्काला माहीत होत्या.. एखादी आली खरेदीला की मी लगेच पुढे होत असे व ती म्हणायची मागून.. आली सटवाई.. हे येडं गेले बघ...तिच्यामागे.. मी डोळे वटारुन बघायच्या आधीच बाबा तीच्याकडे बघायचे व खुद करुन हसायचे...व स्वत: मागे जाऊन बसायचे व मला पुढे करायचे.... मी तिला आवडेल असे ड्रेस काढून दाखवत असे व तिच्याकडे बघत.. काही तरी भलाताच भाव सांगायचो.. जर जास्त सांगितला तर तिच्या बरोबर असलेली आई-मावशी-आजी बोलायच्या आत बाबा बोलायचे राजा लेका भाव तो नाही आहे... तो आहे. व कधी कमी सांगितला तर काहीच बोलायचे नाहीत व जेव्हा तीची खरेदारी संपत असे व ती निघून गेली असे तेव्हा ते मला म्हणायचे... राजा तुझ्या खात्यात ते २० रु. तीला तु खरेदी दरापेक्षा दहा रु कमी दर लावलास व दहा रु फायद्याचे... ते पण तुझ्याखात्यात.... आई व अक्का फिस्स करुन हसायच्या व मी बाबांच्या मागे बाबा मी घेईन त्यांच्याकडून ते पैसे... कारण दिवाळीच्या फटाकामध्ये व कपड्यामधून ते वजा होणार हे मला पण माहीत असत असे...
दिवसामागून दिवस जात होते.. दिवाळी सहा दिवसावर होती मला आठवतं... माल जवळजवळ संपत आला होता... बाबा खुष होते... पण अजून विक्री झाली असती व फायदा अजून झाला असता असे त्यांना राहून राहून वाटत होते...त्यांच्या मनात काय आले काय माहीत व चार वाजताच मला म्हणाले... राजा तु मुंबईला जा रातच्या गाडीने. झाले आई एकदम म्हणाली..... असे काय करत आहात हा एवढासा.. वर त्याला मुंबईला पाठवत आहात... कुठे हरवला तर... ? तेव्हा बाबा म्हणाले... हॊस्टेल मधून पळून पळून हा तरबेज झाला आहे येईल परत.. राजा मी सेठला फोन करतो... तो तुला दादरलाच देईल सगळे गठ्ठे.. बस्स तु जायचे व पैसे त्याला देणे व गठ्ठे घेऊन येणे.. येवढं करशील राजा माझ्या.. बाबांची मी धावपळ बघीतली होती... मनात धस्स होत होते की मुंबईला... ते पण एकटंच जायचे ? पण मी हो म्हणालो व बाबा जाम खुष... माझ्याकडे पैसे दिले... २४००० रु. सगळे पाचशेच्या नोटा.. कुठल्यातरी सेठ कडून लहान नोटा बदलून मोठ्या नोटा घेऊन आले होते बाबा.. त्या बरोबर माझ्या खर्चासाठी व गाडी भाड्यासाठी पाचशे रु सुट्टे.. जिवनात पहिल्यांदा मुंबई... !
बाबांनी मला रात्रीच्या कोल्हापुर मुंबई बस मध्ये चढवलं व कंडेक्टरला सांगितले की न विसरता ह्याला दादरला उतरवा. जवळ असलेल्या पैसे व त्याच्या काळजीमुळे मी एक मिनिट झोपलो नाही... ना काही खाण्यासाठी उतरलो... बरोबर दादरला मी उतरलो व बाबानी सांगितलेले काम पुर्ण करुन मी सरळ कोल्हापुरच्या गाडीत बसलो.... सकाळी साडे पाचलाच बस कोल्हापुर मध्ये आली जवळ जवळ दिड तास आधी.. कपड्यांची भले मोठी चार-चार गठ्ठडे व मी चिमुरडा पोरं... एक दोन प्रवासी व कंडेक्टर ने मदत करुन सगळे गठडे गाडीवरुन खाली उतरवून दिली, मी आता काय करावे ह्याचा विचार करत उभा होतो तोच समोर एक रिक्षा दिसली. मी त्याला बोलवले व म्हणालो मला बुधवार पेठेत जायचे आहे, हे सामान आहे बरोबर.. त्याने मला वरुन खाली पर्यंत बघीतले व म्हणाला चल.. कसेबसे मागील सिटवर सर्व गठडे त्यांने दाबून दाबून भरले वर मला आपल्या सिटजवळ बसून सरळ टाऊन हॉल मार्गे बुधवारपेठेत रिक्षा उभी केली व म्हणाला घर सांग रे बाळा.. तेथेच पोहचवतो. नाही तर तू हे सामान कसे घेऊन जाणार.. मी त्याला बोळा बोळातून घेऊन घरासमोर रिक्षा उभी केली.... व पळतच वर गेले.. तेव्हा आम्ही दुस-या माळ्यावर राहत असू.. आतातून आवाज येत होता..... बाबांचा आवाज होता... अगं पावणेसात झाले पोरं आलं असे स्टेन्डवर.. एवढं वझं त्याच्याजवळ असेल व त्यातून थकलं पण असेल ते... नाष्टा राहू दे मी जातो...... दरवाजा उघडला व मी बाबाच्या𐑪समोर... मी गच्च्च मिठी मारली बाबांना व म्हणालो.... मला नाही जायचे आहे परत कधी मुंबईला.. !
रिक्षावाल्याचे पैसे देऊन बाबांनी सर्व गठ्ठडी उतरवली व त्या रिक्ष्यावाल्या बरोबर वर आले व आईला म्हणाले अगं चहा टाक दोन कप. मी आपला आईच्या पदराबरोबर खेळत म्हणालो... आई भुक लागली आहे.. आई ने माझ्याकडे बघितले व म्हणाली.... बस. तोपर्यंत हे बेसनचे लाडू खा व मी करते तुझ्यासाठी काही.... जास्त वेळ नाही फक्त २८-३० एक तास घरातून बाहेर होतो मी.... गेलो व आलो... कुठेच सामान सोडून उतरलो नाही... अन्नाचा एक कण माझ्या पोटात नव्हता... रिक्ष्यावाला गेला तेव्हा मी बाबाच्याकडे गेलो व मी त्यांना त्या सेठ ने दिलेले बिल व मालाची रिसीट दिली व वाचलेले सर्व पैसे बाबांना परत दिले व म्हणालो... मी झोपू... ! बाबा त्या पैश्याकडे बघत मला गच्चपणे आपल्या छातीशी लावले व म्हणाले.. राजा तु खरोखर खुळा आहेस... रे माझ्या पोरा.. झोप. आरामात ये नंतर ये जेव्हा तु उठशील तेव्हा.. व आईला म्हणाले... अगं ये... हे बघ... कार्ट... मुंबईला जाऊन परत आलं... जेवलंपण नाही वाटतं.... रस्तात सगळेच पैसे परत घेऊन आलं आहे... आपले पाणावलेले डोळ्यांनी माझ्याकडे बघत म्हणाले... राजा लेका... जेवला का नाहीस रे ? तोच आई आतून म्हणाली.. आला आहे तुमचा मुलगा उठा व थोडे खाऊन घ्या.. परवा पासून तुम्हीपण नाही व अक्कापण जेवली नाही आहे.... व आता मला पण भुक लागली आहे.... !
कधीच विसरु शकणार नाही अशी ही माझी दिवाळी.... शेवटची दिवाळी....त्यानंतर कधीच वेळच नाही आली दिवाळी साजरी करण्याची.... बाबांचे काम कधी व कसे बिघडले व कधी मी दुरदुर होत एवढा दुर झालो की... शेवटं दर्शनपण दुर्लभ झाले... का हा प्रश्न मला तर नेहमी पडतो... अल्लडपणा.. नादानपणा ह्या नादात मी खुप काही गमवले... आज ही आठवतं.... घराबाहेर कंदिल उभा करणे... आई व अक्काची रांगोळीसाठी चाललेली तयारी.. व मी गोळा केलेले फटाके.... बाबांची दिवाळी तर तेव्हापण रोडवरच... आपल्या दुकानाबरोबर...! उन्हातान्हात...! संध्याकाळी... घरी.. थकलेले .... सावकाराचे घेतलेले पैसे कसे परत करावे ह्या चिंतेत... त्यांचा बॅगपायपर व चार मिनारचे पॅकेट... मी व अक्का बाहेर फटाके सोडत असू व बाबा... असेच एकटे... ग्लास हातात घेऊन...... ह्याला नशीब म्हणावे की नियती मला माहीत नाही पण ती दिवाळी व आजची दिवाळी मी घरात आपल्या माणसांच्याबरोबर कधीच साजरी करु शकलो नाही बुक केलेली टिकीटे मी स्वत: रद्द करावी अशी अवस्था येते.... कधी कधी.... ह्यावेळी पण... कुठेतरी जगातल्या कोप-यात बसून एकटे.. बाहेर चालू असलेली आतिशबाजी बघत.... व समोर चालत असलेली गर्दी बघत..... माझी दिवाळी नेहमी प्रमाणेच संपेल... !
बुधवार, १४ ऑक्टोबर, २००९
माझी सफर... मैहरोली ते करोलबाग - भाग ५
दिवस व रात्र कशीबशी निघून गेली व मी सकाळ सकाळी मंदिराच्या कार्यालयात जाऊन पुन्हा पंडीत जींची विचारणा केली तो म्हणाला की थोडा वेळ थांब येतीलचे, थोडा वेळ थोडा वेळ करत करत १०.०० वाजले पण ते काही आले नाहीत, माझ्या कडे पाहून तो म्हणाला " भाई, आज तो आए नहीं, तथा मेरे पास उन्हका कोई पत्ता तो भी नही है, यही मिलते थे रोज जरुरत नही पडी कभी पता जाणने की" मी हसून म्हणालो" कोई बात नहीं, आज नही तो कल सही" व परत धर्मशाळेत आलो व दिवेदींजींना फोन लावला पण ते फोन वर भेटले नाहीत आशा निराशा असा भावनिक खेळ चालू झाला होता पैसे झरझर करुन संपत होते व पंडित जी अथवा दिवेदी जी काय मला मिळायला तयार नव्हते अथवा देवाच्या मनात काहीतरी वेगळेच होते,
४ थ्या दिवशी मात्र पैसे संपले व मी हिशोब करु लागलो की कोठे कोठे खर्च केले व कीती पण त्याचा काहीच उपयोग नव्हता खिश्यामध्ये दमडी नव्हती तेव्हा हिशोब काय कामाचा. सकाळ पासून काही खाल्ले देखील नाही व संध्याकाळी धर्मशाळेने नियमाप्रमाणे पैसे मागितले त्यांना मी माझी अडचण सांगितली व म्हणालो की एक दिवसाचा मुक्काम राहू द्या, बेचारा तो देखिल नोकर माणूस पन त्याच्या मध्ये देव होताच त्यांने परवानगी दिली व म्हणाला" देखो भाई एक नही, दो दिन रुको यह तो धर्मशाला है ही, हम पैसे ईसलिए लेते है की थोडी साफ सफाई रहे तथा लोग आरामसे रह सकें " असे म्हणून तो पुढे निघून गेला. मी मनातल्या मनात त्यांचे आभार मानले व भुके पोटी विचार करु लागलो की आता काय ?
विचार करता करता बाहेर आलो तोच एक महाशय जे मंदिर कार्यालयात काम करायचे ते माझ्या जवळ आले व म्हणाले " भाई, अभी खबर मिली है की पंडीत जी बिमार थे इस वजह से व मंदिर नही आ रहे थे पर व कल सुबह यहा मिल जायेंगे" मी आनंदाने त्यांचे आभार मानले व म्हणालो " अब कोई फिकर नही रही काम हो ना हो कम से कम उन्हे मिलतो जाऊंगा ही"
सकाळ सकाळी मंदिरात गेलो व तर देवाप्रमाणे कार्यालयात पंडितजी बसले भेटले मी त्यांना ओळख तथा शर्माजींचा व माझा संबध ह्या विषयी माहीती दिली व म्हणालो की काही काम हवे आहे, पंडीत जी म्हणाले " हम्म, भाई देखो, शर्माजी तथा मै पुराने साथी रहे है तथा एक ही प्रांत के है, तुम कहा ठहरे हो ?वही आज भी रुक जायो मै तुम्हारे लिए किसी से बात करता हूं कल सुबह मिल लेना मुझे" मी त्यांचे आभार मानले व मंदिरात दर्शनासाठी गेले, तेथे पहिल्यांदा दिड दिवसानंतर अन्न प्रसादाच्या रुपाने माझ्या पोटात गेले व थोडा फार आराम भेटला."
दुस-या दिवशी सकाळी पंडित जीं माझ्या साठी बातमी घेऊन आले व म्हणाले की " बेटा, तुम्हारा काम हो गया है तथा तुम्ह यहा से झेंडावालान, करोल बाग जाओ तथा वहा ***** का कार्यालय है वहा तुम्हे श्री चारी जी मिलेंगे ठिक है, यह रहा पता तथा उन्ह का फोन नंबर,, मेरा नाम बता दे ना, जरुर तुम्हे काम देंगे वह मेरे बहोत अजीज स्नेही है" मी त्यांच्या चरणाला हात लावून नमस्कार केला व म्हणालो " पंडित जी, आपने जो मेरे लिए किया है, यह मै जिवन भर नहीं भुलुंगा" कार्यालयातील त्या व्यक्तीचे देखील आभार मानले व धर्मशाळेत जाऊन कपडे तथा पिशवी घेऊन कार्यालयात गेलो व त्यांना चावी हात देवून त्यांचे आभार मानले व म्हणालॊ की "मेरा काम हो गया है भाई साब, मैं अब यहांसे जा रहा हूं पर वापस जरुर आऊंगा आपसे मिलने" व तेथून सरळ मुख्य रोडवर आलो व एकाला विचारले की " भाई, करोल बागला रस्ता कुठला जातो ?" तो " अरे भाई, बसे जाओ बहोत दुर है " मी " नहीं भाई साब पैसे खत्म हो चूके है" मी हसलो.. पण ते हसू एकदम निराळे होते त्यामध्ये मला देखील एक निराशा जाणवली " तो म्हणाला " नये हो क्या ? रुक अभी तुम्हे बस मै बिठा देता हूं" व त्यांने जवळच उभी असलेल्या बसच्या चालकाशी बोलणी करुन मला बस मध्ये पाठवले मी त्याचे आभार मानले व म्हणालो देव अजून माझ्या बरोबरच आहे.
करोलबाग बाग पासून झेडावालान जवळच आहे, तेथे गेल्यावर मला ते कार्यालय तथा ती व्यक्ती देखील सापडली मी त्यांना नमस्कार केला व म्हणालो " सर, मैं राज जैन, पंडीत जीं ने आपसे बात की होगी" ते आपल्या चष्मातून माझ्याकडे बघत म्हणाले " हम्म, क्या काम जाणते हो, यहा तो प्रेस का काम है, पंडीत जी बता रहे थे की तुम्हे Computer चलाना आता है" मी हो म्हणालो. ते म्हणाले " ठीक है, तुम्ह यही मेरे साथाआ काम करोगें तुम्हारे रहने का प्रबंध मै ने कही करोलबाग मे किंया है वहा अपने ही प्रेस का पुराना कार्यालय है फिलाल तुम वही रहना, पंडीत जी ने तुम्हारे बारे में बताया तो है सब लेकिन तुम फिर अपने बारे मैं बता दो" मी त्यांना सर्व राम कथा पुन्हा सांगितली व ते म्हणाले " अछा तो तुम महाराष्ट्र से हो, ठिक है सही जगह आये हो यहा बहोत सारे व्यक्ती मिलेंगे तुम्हे महाराष्ट्र के" व से म्हणून खिश्यातून ५००.०० रुं दिले व म्हणाले " यह रखना खर्चे के लिए तथा जरुरत हो तो मांग लेना ठिक है, अब तुम बाहर जो रामकिशन जी बैठे है उन्हे अंदर भेज तो मै उन्हे तुम्हे जहा रहना है बहा पोहचाने के लिए तथा वहा क्या कमी है यह देखने के लिए भेजता हूं"
थोड्या वेळाने चार-पाच अरुंद असे बोळ फिरत मी एका चागल्या बांधले गेलेल्या बिल्डींग समोर उभा राहिलो व रामकिशन जी आपले आत जाउन चावी घेऊन परत माझ्या कडे आले व म्हणाले " देखो वह उपर तीसरे माले पे दुसरा कमरा है ना उसकी यह चावी है, पहले वाले कमरे मे मै रहता हूं, जा, कुछ जरुरत हो तो बोलना मुझे, बिस्तर तथा बाकी जरुरत की चिजे देखील है उपर" मी त्याला म्हणालो" भाई, कमरा तो बाद मै भी देख लूंगा फले मुझे खाना खाना है दो दिन हो गए है अच्छा तथा सस्ता कोई हॊटेल बता दो जहा मैं खाना खा सकूं" तो हसला व मला संगे घेऊन गेला एका हॊटेल मध्ये मालकाशी माझी ओळख करुन दिली व माझे खाते तेथे चालू करुन म्हणाला " देखो, यहां सुबह, शाम खाना खा के यहा लिख देना पैसे महिने के आखिर में दे देना ठिक है"
मी जेवण करुन सरळ आपल्या खोली कडे आलो व दरवाजा उघडून आत प्रवेश केला...
क्रमशः
रविवार, ११ ऑक्टोबर, २००९
माझी सफर... दिल्ली सफर - भाग ४
काका " कुछ नहीं बेटा यह सब सत्ता तथा अधिकार की माया है बाकी कुछ नहीं, कुछ साल पहले यह कुमाऊं से यहा आया था, बडे बडे विचार तथा सपने मन में रखकर, खुद एक पेशे से शिक्षक था यह यही एक स्कुल में बच्चों को पढाता था, लेकिन एक दिन एक नेता की बातो में आ गया , तथा काम छोड के उस के आगे पीछे घुम ने लगा पर यह था होशियार इस कारण जल्दी ही ऊसने अपनी जगह बना ली थी, पर यहा प्रांत के कुछ लोगों कों यह रास नहीं आया तथा झुठेमुठे किस्से संघटन में इसके नाम से फैला दिए तथा एक दिन तो कुछ लोगोंने उसे पिटा भी. तब कही जा कर यह संघटन से बाहर हो गया खुद ही, यह तो अपने गांव वापस जाना चाहता था उसी समय पर राजींव जीं के गुरू तथा भाई प्रेमप्रकाश जीं ने उन्हे जाने नही दिया तथा उसे आगे कुछ काम देने का वादा कर कर अपने साथ यही धर्मशाले में जगह दी, पिछले ५ सालों में ना उसे काम दिया ना उसकी कोई सुध ली... दो टाईम का भोजन यही धर्मशाला में मिलता ही था तथा एक दिन उसकी बुढीं मां भी चल बसी वहा गांव मैं तो यह रह गया अकेला ब्रम्हचारी बनकर अपना जिवन निठ्ठलो कि तरह निकाल रहा है बचे हूंये जिंदगी के पल. अभी कुछ दिन पहले ही बता रहा था उसे यकीन ही नही तो विश्वास अभी है की प्रेमप्रकाश ही वह व्यक्ती था जीसने उसे पिटवाया तथा संघटन से बाहर करवा दिया... मुझे तो विश्वास था ही मै उसे भी अच्छी तरह जान ता हूं थोडा लालची किस्म का आदमी है यह प्रेमप्रकाश... पर बेटे तुम्हारा काम कैसा चल रहा है ? तनख्वा तो समय पर मिल रही है ना ?" मी म्हणालो हो सगळ व्यवस्थीत आहे, व तिथून बाहेर पडलो, व हरिद्वार ला आल्या पासून आज पर्यंत च्या घडामोडी वर पुन्हा पुन्हा विचार केला व संघटनेत माझी ओळख करुन देताना राजीव जीं तथा इतर व्यक्तीनीं केलेली माझी स्तुती मी जरा वेगळ्याच नजरे ने पाहण्याचा प्रयत्न केला व एक निश्चय करुन घरी परतो.
थोडी जास्त नसली तरी आनंद व माझी बोलचाल बंदच होती कधी कधीच एकमेकांशी बोलत असू पण ह्यावेळी मी स्वत: आनंद जवळ जाऊन क्षमा मागीतली व त्यांच्या संगे नेहमीच्या पध्दतीने बोलणी चालू केली व काही दिवसामध्येच तो ही पुर्वी प्रमाणे हसत-खेळत माझ्याशी राहू लागला व माझ्या बरोबर पुन्हा गंगेच्या किनारी येऊन तास तास भर बसू लागला त्याच वेळी मी त्याच्या बद्दलची माहीती त्याच्या कडुन काढून घेतली व कथा थोडीफार तशीच होती जी स्वप्ने शर्माजी तथा मला दाखवली गेली होती तीच स्वप्ने तो देखील आपल्या उराशी बाळगून बसला होता, तेव्हा मात्र मी पुन्हा पुन्हा विचार करु लागलो की काय करावे ? रस्ता शोधणे खुप गरजेचे व निकडीचे झाले होते मला माझे जिवन अश्या या धर्मशाळेत अथवा कोणाची जी हूजूरी करत घालवायचे नव्हतेच तेव्हा मी ठरवले की कामावर गेल्यानंतर ह्यांचा काय तो निकाल लावायचाच.
कामावर पोहचल्या पोहचल्या मी सर्व प्रथम जो व्यक्ती मला भेटण्यासाठी योग्य वाटला तो म्हणजे आमचे अकांन्टट श्री. जगराम सिंग जी त्यांना जाउन मी माझ्या हिशोबा बद्दल विचारले, माझा पगार हा कोणाच्या मार्फत राजीवजींच्या जवळ जातो व किती ? आता मात्र मला चक्कर येण्याचीच वेळ आली होती... कारण माझ्या हिशोबाने माझा पगार हा १८००.०० रु होता व तो नेहमी मला राजीवजींच्या मार्फत मीळत होता पण येथे तर मोठेच लफडे चालू होते.... माझा पगार हा कार्यालयातून आनंद मार्फत राजीवजींना मिळायचा ३८००.०० रु. व माझ्या हाती यायचे फक्त हजार रुपये तथा राजीवजी म्हणायचे की तुझे आठशे रु. हे माझ्या कडे जमा राहतील ज्यावेळी तुला गरज लागेल तेव्हा तु परत घे... झाले मी मात्र तेथेच मटकन बसलो व म्हणालो धोका, असला कसला हा धोका छे कोणावर भरोसा करुन फायदा नाही एकतर पुर्ण पगार नाही जे मीळत होता त्यातील देखील अर्धे हाती.... नकोच आज काहीतरी फायनल करुच. त्याच क्षणी परत हरिद्वारच्या बस मध्ये बसलो व तडक शर्माजींच्या जवळ गेलो व सर्व कहानी-कथा त्यांना सांगितली डोळ्यातून रागाने पाणी वाहू लागले होते व शर्माजी मला समजावून सांगत होते की अजून काही फरक नाही पडला आपला रस्ता बघ .. नवीन मार्ग शोध काही जास्त नुकसान झाले नाही उलट तु येथेच येऊन काही ना काही शिकला आहेस, माझ्या ही डोक्यात ही गोष्ट व्यवस्थीत बसली की चल काही हरकत नाही आपण मार्ग काढूच.
शर्माजीं आपल्यापरीने माझ्या साठी काही मार्ग निघतो का हे शोधत होते व एक दिवस त्यांनी मला सांगितले की जर तु दिल्ली ला गेलास तर काहीतरी तुझी व्यवस्था होईल बघ प्रयत्न करुन तेथील कार्यालयातील एका व्यक्तीचे नाव व पत्ता त्यांनी एका कागदावर लिहून दिले व म्हणाले बघ कधी जातोस ते. मी दिल्ली येथे जाण्याचा मार्ग शोधू लागलो पण काहीच कल्पना येत नव्हती की दिल्ली ला जाणार आहे हे राजीव जींना सांगावे की न सांगाता जावे ? विचार करुन करुन डोके पकले होते, रात्र रात्र भर जागे राहून मी विचार करायचो की कसे येथून बाहेर पडावे, काय मार्ग शोधावा.... व एक दिवस मी मनाचा पक्का इरादा करुन राजीव जीं समोर गेलो व म्हणालो " राजीव जीं, मै थोडा दिल्ली जाके आना चाहता हूं, वहा मेरे प्रांत के कुछ लोग रहते है उन्हे मिल के वापस आना चाहता हूं अगर आप जाने की इजाजत दे तो" राजीव जीं नी थोडा फार विचार केला व म्हणाले " ठीक है लेकिन वापस जल्दी आना नही तो काम पें बुरा असर पडेगा ठीक है, आनंद इसे कुछ रुपये दे दो "
दोन हजार रुपये व आपले सर्व कपडे घेउन मी शर्माजींच्या जवळ गेलो व त्यांना नमस्कार करुन म्हणलो " मैं जा रहा हूं शर्माजी आपने जो सहयोग तथा प्यार दिया उसके लिए मै पुरी जिंदगी आपका अहसानमंद रहूंगा" असे म्हणून मी लगेच तेथून बाहेर पडलो व बिर्ला मंदिर तथा गीता भवन वर जाऊन देवाचे दर्शन घेतले व गंगेचे पाणी डोक्याला लावून तडक रेल्वे स्टेशन वर जाऊन गाडीची वाट पाहू लागलो.
दिल्ली .... बाप रे देशाची राजधानी दिल्ली.... प्रचंड मोठे शहर व शहराचे नाव सोडले तर मला काहीच माहीत नाही नव्हते की कुठे उतरावे कुठे जावे व काय करावे ? शर्माजींनी जो पत्ता दिला होता तो मी जवळ जवळ पाठ करुन ठेवला होता, सकाळी सकाळी दिल्ली रेल्वे स्टेशन ला मी जेव्हा उतरलो तेव्हा मात्र मनाची धाक धूक वाढलीच होती मी एकटा ज्याच्या भरोश्यावर येथे आलो आहे त्याला कधी जिवनामध्ये देखील पाहीले नव्हते त्याला काय सांगायचे व कसे करायचे ह्याचाच विचार करत मी रेल्वे स्टेशन च्या बाहेर आलो व एका माणसाला विचार ले "भाई यह रोहीणी कहा है ? " तो मला म्हणाला " रिक्षावाले से पुछ" मी तडक एक रिक्षावाला पकडला व विचारले " भाई साब, यह रोहीणी कितनी दुर है ? " तो म्हणाला " अरे पास ही है, बोला कहां छोड दु" कोल्हापूर नंतर रिक्षात बसण्याचा हा माझा पहिला योग मी म्हणालो चल जवळच आहे म्हणतो आहे त जास्तीत जास्त ३०-४० रु घेईल व जाऊन रिक्षात बसलो, २ तासानंतर रिक्षा त्यांने एका रस्ताच्या बाजूला उभी करुन तो म्हणाला " हां भाई रोहीणी तो आगयी अब बता किस गली मकान मैं जाना है ? " मी त्याला थोडी फार माहीती दिल्यावर त्यांने त्या घरासमोर मला उभे केले व म्हणाला " हा भाई उतरो अब ३५०.०० रु. दो" मला चक्कर च आली व थोडे बहोत त्याच्याशी भांडलो देखील व आसपासच्या लोकांना बोलवून मी थोडा फार दंगा देखील केला तेव्हा मात्र तो रिक्षावाला नरमला व २५०.०० रु. वर तडजोड करुन निघून गेला., पण मला हा २५०.०० रु. फटका खुप मोठा पडला होता. मी घराची बेल जावली तर थोड्या वेळाने एक मुलाने दरवाजा उघडला व त्याच्या पाठोपाठ त्यांचे वडीले देखील बाहेर आले, मी त्यांना नमस्कार केला व विचारले की " पं. हरीकृष्णजी से मिलना था क्या वह घर पे है ? " ती व्यक्ती मला म्हणाली " भाई, यहा तो हरीकृष्णजी तो अब नही रहते कुछ साल पहले ही वह अपना यह मकान मुझे बेचकर कही मैहरोली रोड पे रहने चले गये है" माझ्या पायाखालची जमीनच खसकली व मी त्यांना पुन्हा विचारले " भाईसाब, क्या आप के पास उन्ह का पुरा पत्ता या फोन नंबर है, मेरा उन्हसे मिलना बहोत जरुरी है " पण हाय देवा ह्याच्या कडे त्यांच्या बद्दल काहीच माहीती नव्हती पण एक मात्र गोष्ट त्यांने माझ्या कामाची सांगितली की ते सकाळ सकाळी मैहरोली रोड वरील कत्यानी मंदिरामध्ये जरुर येतात, मी त्यांचे आभार मानून मैहरोली जाण्यासाठी बसची वाट पाहू लागलो, थोड्यावेळाने कळाले की येथून प्रथम नेहरु प्लेस किंवा करोलबाग ला जावे लागेल व तेथून मैहरोली ला बस मिळेल. मी तडक करोलबाग बस मध्ये बसून मैहरोलीच्या रस्तावर आलो.
क्रमश:
मंगळवार, ६ ऑक्टोबर, २००९
माझी सफर... हरिद्वार मध्ये - भाग ३
आनंद व माझी सुरवातीलाच चांगली मैत्री बनली व तो माझ्या बरोबर कधी गंगेच्या तीरावर तर कधी बिर्ला मंदिरामध्ये... तर कधी वेळ मिळालाच तर लक्ष्मण झुल्यावर फिरु लागला, शर्माजी व माझी आध्यात्मिक जोडी छान जमली व तेथेच पहील्यादां रामायण ही वाचले व महाभारत ही , तसेच अनेक.. कथा त्यांच्या सोबत वाचल्या, राजीव जी संस्थे मध्ये मोठ्या पदावर असल्यामुळे त्यांच्या आज ईकडे उद्या तिकडे अशा वा-या चालतच असत, माझा हरिद्वारचा स्नेह बंध असा बांधला गेलाच होता पण त्यावर मानाचा तुरा खोवला तो राजीव जींनी एक दिवस एक बातमी घेऊनच ते कार्यालयात आले व मला बोलवले " राज, कल से तु अपने एक स्नेही श्री निरंजन जैन जी के यहां जायोगे तथा उन का एक कॊलेज है यहा रुडकी में तुम वहा काम करना ठीक है कल मैं तुम्हे एक पत्र के साथ वहा भेजूंगा लेकिन सुबह जल्दी जाना होगा करीब ६.०० बजे तुम्हे वह अपने कार्यालय में मिलेंगे." वाह माझ्या तोंडातून दुसरे काहीच बाहेर पडले नाही व मी सकाळ सकाळी तयार होऊन जैन साहबांच्या कार्यालयात ५.५० लाच पोहचलो व त्यांचा फायदा देखील मला त्याच वेळी झाला व त्यांना माझ्या वेळेत कामावर येण्याबद्दल सागण्याची गरजच राहीली नाही. मी तेथे काम करु लागलो प्रथम प्रथम कार्यालयातीलच छोटे छोटे काम मला दिले गेले जसा एक चपराशी पण मी काही कुरकुर न करता काम करु लागलो दिवसामागून दिवस जात होते अशीच चार महिने गेली एक दिवस मी थोडा वेळ मोकळा होता म्हणून कार्यालयातल्याच संगणकावर बसून गेम खेळू लागलो कसा वेळ गेला कळालेच नाही पण त्याच वेळी जैन साहेब हे माझ्या पाठीमागे उभे राहीले होते, त्यांनी माझी गेम संपल्यावर मी जसा उठलो तसेच ते बोलले " राज जैन, आप मेरे साथ थोडी देर बात करोगें अभी" त्यांचा दरारा मला माहीतच होता मी नखशिखांत हादरलो होतो दरदरुन घाम फुटला होता व मी विचार करतो होतो आता काय उत्तर द्यायचे ह्यांना व नंतर काय सांगायचे राजीव जींना ज्यांनी आपला शब्द टाकून मला येथे कामावर लागले होते.
जैन साहेब " तुम्हे यह पीसी चला ना कबसे आता है ? "
मी : " जादा कुछ नही आता सर, पहले मै एक सेंटर चला ता था तब थोडा बहोत सिखाता पर उसे भी अब दो साल हो चूके है सिर्फ कभी कभी गेम खेलता था यही पर"
जैन साहेब : " ठीक है, कम से कम तुम्हे यह तो मालूम है ना की पीसी क्या होता है तथा काम कैसे करता है. तो कल से तुम अरविंद वर्माजी के साथ काम करोगे तथा computer Lab का रख्रखाव देखोगे" मी ठीक आहे म्हटलं व दुस-या दिवसापासून नवीन कामाला सुरवात देखील केली.
अरविंद वर्मा एक गुणी व अत्यंत आनंदी असणारा माणूस ह्याला हसण्यासाठी काही कारणाची गरज देखील लागत नसे व स्वभाव एकदम गरिब त्यामुळे त्यांची व माझी जोडी एकदमच मस्त जमली व त्यांनी मला संगणक व संगणकाचे काम ह्या बद्दल माहीती देण्यास सुरवात केली पहिल्या महिन्यात खुपच अवघड गेले कारण एक तर हिंदी व English दोन्ही बाजू माझ्या कुमकुवत होत्या व संगणकात ह्या शिवाय काहीच चालणार नव्हते तेव्हा मात्र गोची झाली मग मात्र अरविंद सरांनी माझी रोजच्या रोज इंग्रजी तथा हिंदीचा क्लास चालू केला रोज अर्धा एक तास ते मला दोन्ही भाषेतील महत्वाचे व रोज उपयोगी पडणारे शब्द तथा वाक्य शिकवू लागले व त्याच बरोबर मी त्यांच्या मदतीने संगणकावर हात फिरवू लागलो व काही दिवसामध्येच मी पत्रे प्रिंन्ट करणे व खर्चाच्या नोंदी ठेवण्यासारखे काम करु लागलो, त्यांना त्यांनी मला नवनवीन प्रणाली देखील संगणकावर वापरणे शिकवले.
दिवसामागून दिवस जात होते व मला हरिद्वार येथे येऊन ५-६ महिने झाले होते पण पगार अजून फिक्स झाला नव्हता व जो रोज खर्च मिळत होता तो राजीव जींकडून मिळत होता तेव्हा मी एकदा राजीव जींना ह्या बद्दल विचारले तर त्यांनी काळजी करु नकोस असे सांगितले, काही दिवसानंतर मात्र त्यांनी मला बातमी दिली की तुझा पगार हा १८००.०० रु. आहे व तो मला प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला मिळणार होता. मी खुपच आनंदलो आता येथे काम करण्याला एक सकारात्मक परिणाम मला भेटला होता व मी जीव तोडून संगणकाचे शिक्षण नेटाने चालू ठेवले, कधी कधी कार्यालयीन काम संपल्यावर देखील मी संगणकावर बसून असे तेव्हा ही बातमी चपराशीच्या मार्फत जैन साहबांना कळाली व त्यांनी अरविंदकडे ह्या विषयी विचार ना केली की कार्यालय बंद झाले असताना देखील राज कोणाच्या परवानगीने कार्यालयात उशिरापर्यंत थांबत आहे ? तेव्हा अरविंद सरांनी खुप प्रयत्न करुन माझी शिकण्याची ईच्छा व माझा पुढे संस्थेला होणारा फायदा ह्याबदल जैन साहबांना सांगितले तेव्हा मात्र मला एकदम कायदेशीर परवानगी मिळाली उशिरापर्यंत काम करण्याची तथा माझ्या साठी ग्रंथालय व संगणक खोली ही मी जाऊ पर्यंत खुल्ली ठेवण्याची परवानगी तसेच जाताना सर्व दरवाजे व खिडक्या बंद आहेत ह्याची खात्री करुन जाण्याची अट घातली गेली, ह्या सगळ्या गोष्टी बस मधून जाताना अरविंद सरांनी सागितल्या व माझ्याकडुन २००.०० रु. मागितले व म्हणाले " मै आप को कुछ जरुरी किताबे तथा सीडी ला के देता हूं जिसकी मदत से आप अपना काम जल्दी सिख सकोगे. " मी त्यांना सांगितले की मला पैसे राजीव जी कडे मागावे लागतील व मी ते शक्यतो उद्या देऊ शकेन व तो विषय तेथेच संपला पण मी घरी पोहचू पर्यंत विचार करत होतो की कुठल्या तोंडाने राजीव जींकडे पैसे मागू माझे राहणे , खाने, गाडी खर्च तर तेच देत होते व त्यांच्यावर आणखी किती ओझे टाकायचे ? मी विचार करता करता घरी पोहचलो व शर्माजींना माझी अडचण सांगितली तेव्हा मी शर्माजींना एक पार्ट-टाईम काम माझ्या साठी पाहण्याची विनंती करुन मी गंगे किनारी जाऊन बसलो.
माझ्या जवळच एक सज्जन व्यक्ती बसले होते व ते काहीतरी श्लोक तोंडातल्या तोंडात पुटपुटत होते व मला ते श्लोक कुठेतरी वाचल्या सारखे अथवा कानावरुन गेल्या सारखे वाटले व मी त्याची पुजा संपल्यावर त्यांना त्या श्लोकासंबधी माहीती विचारली, ते एकदम खुश होऊन म्हणाले " अरे भाई यह श्लोक तो भगवत गीता अध्याय में से है " व त्यांनंतर माझ्याशी गप्पा मारता मारता ते म्हणाले " देखो वहां जो बिर्ला मंदिर है ना उसके पिछे ही गीता भवन है तुम्ह वहा आ जाना सुबह या शाम को, बहोत सारे भक्त आते है तथा भक्ती में गाते रहते है तुम्हे भी आनंद मिलेगा" मी म्हणालो " ठिक है, वैसे भी मै काम से ५.०० बजे तक फ्री हो जाता हूं मै अवश्य आ जाऊंगा"
मी तेथेच थॊडा वेळ बसलो व नंतर बिर्ला मंदिरात जाऊन बसलो हे जे बिर्ला मंदिर होते ते एक नितांत सुंदर मंदिर होते व ६ फूट मंदिर हे गंगेमध्ये होते, मला येथे खुप शांती मिळायची व मी विचार करायचो की बिर्ला जींनी हे मंदिर उभे करताना काय विचार केला असे व त्यांनी इतके पैसे मंदिरांसाठी का लावले असतील तर त्यांचे उत्तर मला तेथेच बसल्या बसल्या मिळायचे की मनाची शांती त्यासाठी मंदिर उभे करण्याचा खर्च काहीच नसेल त्यांच्यासाठी.
* हेच ते बिर्ला मंदिर जो भाग पाण्यामध्ये आहे तेथे बसण्याची व जाप करण्याची सुविधा आहे .
संध्याकाळी जरा वेळानेच ६.०० वाजता मी गीता भवन मध्ये गेलो व तेथे त्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करु लागलो तर ती व्यक्तीच समोर आली व म्हणाली " आजा बेटे, देखो आज सारे लोग यहा समय पर आ गए है तुम्हारी ही कमी मुझे लग रही थी, जा ओ पहले मुरारी जीं के दर्शन कर के आ जाओ हम आज भजन यही बैठके करेंगे" मी मंदिरामध्ये जाऊन भगवान कृष्णाचे दर्शन घेतले व परत त्यांच्या बैठकीत आलो तर तेथे माझी ओळख करुन दिली व माझी देखील मी ओळख करुन दिली. काही काळ जवळ जवळ एक तास-दिड तासानंतर मी परवानगी घेऊन बाहेर आलो व माझ्या पाठीमागेच एक व्यक्ती बाहेर आला व म्हणाला " भाई, जरा सुनना मै रवी मुनराल हूं यही रहता हूं तथा मेरी छोटीसी दुकान है यही रोड पे आगे चल के, अभी तुम बता रहे थे की तुम कॊम्पूटर के जाणकार हो तथा तुम्हारे पास शाम का समय फ्री रहता है ? " मी म्हणालो " नहीं टाईम तो फ्री है लेकिन दुकान का अथवा आपके हिसाब किताब का काम नही देख सकता इतना भी मुझे अभी आता नही है" व मी त्यांच्या कडे पाहू लागलो व मनात विचार केला बघ लेका कसे लगेच लक्षात आले माझ्या की तू कामासाठीच विचारणार आहेस ते. पण तो विचार मनात येतो तोच ती व्यक्ती परत म्हणाली " नहीं नही मुझे दुकान के काम के लीए नही चाहीए आपका समय, मेरा एक बेटा है उसे मे सिखा ना चाहता हूं, तथा यहा आसपास कोई है नही सिखाने वाला मै दिल्ली से क कॊम्पूटर ले के घर में रखा है लेकिन उसे सिखा नही सकता मैं अगर आप अपना थोडा समय देतो वह भी कुछ सिख जाएंगा" मी त्यांना म्हणालो राजीव जींना विचारुन सांगतो व मी तडक आपल्या घराकडे निघालो तर वाटेत शर्माजी तथा राजीवजी भेटले व ते मलाच शोधत होते कासावीस होऊन.
राजीव जी " राज यह कोई तरीका है तुम पिछले चार घंटे से गायब हो किसी को अत्ता पता नहीं की कहा चले गये हो, हम तो परेशान हो गये थे, उस अरविंद का फोन आया था कि तूम पैसे को लेकर चिंतीत हो, तभी शर्माजी भी कह पडे की हा तुम परेशान हो हम ने सोचा की तुमने कही.... नहीं भगवान का लाख लाख शुक्र है की तुम सही सलाम हो कहा गये थे ? "
मला माहीतच नव्हते की माझ्यासाठी इतका गोंधळ तेथे कार्यलयात व घरामध्ये चालला आहे की ह्यांनी विचार केला की मी जीवाचे काही बरे वाइट करुन घेतले असावे व त्याच शंकेने ते गंगेचा तीरावर मला शोधण्यासाठी निघाले होते. मला हसू आवरले नाही व मी म्हणालो " राजीवजी मै आप को जान देने वालों में से लगता हूं क्या ? मै तो प्रथम बिर्ला मंदिर बाद में गंगा के किनारे तथा आखिर मैं गीता मंदिर चला गया था भजन करने... नहीं सुनने" त्या नंतर राजीव जीं शी मी रवी मुनराल ह्यांच्या विषयी सांगीतले तर ते लगेच म्हणाले " बेटा, जाना तुम्ह उनके पास अच्छे लोग है तथा तु किसी को सिखा दोगे तो तुम्हारे लिये भी अच्छा रहेगा तुम्हारा अभ्यास होता रहेगा ठीक है ना ? " मी त्यांना हो म्हणालो व आपल्या खोलीत जाऊन बसलो.
आज आनंदचा मुड खराब दिसत होता व तो राजीवजीं काही बोलत होते व मला असे वाटले की माझा विषय चालू आहे बाहेर म्हणून मी लगेच बाहेर आलो तर राजीव जीं आनंदला सांगत होते की " मै राज से बात करता हूं" व मी त्यांना विचार ले की काय झाले ? तर राजीव जींनी आनंदला बाहेर जाण्यासाठी सांगितले व मला आपल्या जवळ बसवून म्हणाले " बेटा, देखो यह आनंद भी तुम्हारे ही साथ का है वह हम सब के लिए खाना बनाता है, चाय बनाता है तुम भी कभी कभी समय मिले तो उसकी मदत किया करो वह यहि तो कह रहा था ओर कुछ नही, बस थोडासा काम बाटलो उसे भी सकुन मिलेगा व तुम्हे भी. क्या कहते हो ?" मी विचारातच पडलो म्हणालो " राजीव जी, अगर यहि बात थी तो वह मुझे भी तो कह सकता था, मै तो सुबह का अपना खाना खुद बना ता हूं तो शाम को भी मै उसकी मदत कर सकता हूं कोई बडी बात नहीं थी इसमें की आप को बताया जाये" व आनंद व माझ्यामध्ये पहीली धुसपुस येथे मी संपुष्टात आणली.
रोज सकाळी पाच वाजता उठून सकाळ सकाळी गंगेच्या बर्फासारख्या पाण्याने आंघोळ आवरुन , स्वत:चे जेवण व डब्बा तयार करुन मी ७.०० वाजता विध्यालयात पोहचत असे व दुपारी १.०० वाजता सुट्टी झाली की दोन तास संगणकावर प्रयोग करुन मी ३.०० / ३.३० च्या सुमारास घरी परतत असे व नंतर एक तास भर रवी जीच्या मुलाला संगणक शिकवत असे, व संध्याकाळी कधी बिर्ला मंदिर तर कधी हर की पैंडी तर कधी गीता मंदिर तास भर बसून येत असे व रात्री ८.३० च्या सुमारास आनंदला जेवण बनवण्यासाठी मदत करित असे.. असे एक दमच सुरळीत जिवन माझे चालू होते व असेच कधी वर्ष निघून गेले हेच कळाले नाही, व अचानक एक दिवस शर्माजी व मी बोलत असताना मला शर्माजी जींनी स्वत: बद्दल माहीती दिली जी मला आज पर्यंत त्यांनी सांगितली नव्हती तेव्हा मात्र मी विचार मग्न झालो वर रात्री झोपताना त्या बद्दल विचार करु लागलो की काय करावे ? व कसे ?
क्रमश:
शुक्रवार, २ ऑक्टोबर, २००९
माझी सफर - अयोध्या - कानपूर वारी --- भाग -२
कानपुर मध्ये रात्री १२.०० / १.०० च्या दरमान पोहचलो व जो पत्ता अयोध्या येथे सांगितला होता तो विश्व हिंदू परिषद, लाल मंदिर मैदान, कानपूर बस इतकाच होता, एक दोन रिक्षा वाल्यांना विचारले तर कोणी २०.०० रुपये तर कोणी २५.०० रुपये मागीतले , खिश्यात तर फक्त पन्नास रुपये राहीले होते व मला जेवण ही करायचे होते तेव्हा रिक्षाने जाण्याचा विचार टाळला, व पायीच निघालो, २ / ३ किलोमीटर चालल्यावर समोर सर्कल मध्ये एक पोलिस गाडी व काही पोलिस उभे दिसले जिवनात कधीच चुकीचे काम {पोलिसांच्या हाती पडण्या ईतके}
केले नव्हते त्यामुळे भिती ही वाटली नाही व मी सरळ त्यांच्या जवळ गेलो पोलिसांच्या गाडी वर लिहले होते "आपके लिए, आप के साथ, हमेशा" मी थोडेस धाडस केले व त्यांना पत्ता विचार ला झाले पोलिसांना दोन तासासाठी मी टाईमपास ठरलो ,
पोलिस : " कहा से आया बे ?"
मी : "हूं तो कोल्हापुर महाराष्ट्र का पर अभी अयोध्या से आया हूं"
पोलिस : " यहा क्या करने आया बे ? तुम्हारे ईस थैले में क्या है? दिखा जल्दी, साले कही असला {दारु-गोळा} तो पार्सल नही कर रहा हैं ना ? "
मी जाम घाबरलो मी म्हणालो "नाही नाही देखो कुछ भी नही है मेरे थैले में "
थोडे फार शोधा शोध करुन {केल्याचे नाटक करुन} मला तो म्हणाला " देख अभी तो मै तुम्हे जाने नही दे सकता साब आने दे फिर देखेंगे"
मी तेथेच शेकोटी समोर बसलो व विचार करु लागलो की पुढे काय ?
तासाभराने त्यांचे साब आले व थोडी फार तीच कथा पुढे करित माझे कपडे व माझी त्यांच्या भाषेत तलाशी घेतली व मला पुढे जाण्याचा रस्ता सांगून जाऊ दिले. मी हुश करु लाल मंदिराजवळ पोहचलो तर कार्यालयामध्ये सर्वजन झोपले होते तेव्हा मी तेथेच गेटवर रात्र काढायची हे ठरवून बाहेर बसलो. जी लोक येथे दिल्ली बाजूला जानेवारी महिन्यात आली असतील तर त्यांना कल्पना असेल की येथील थंडी काय चीज असते त्यावेळी अंगावरचे कपडे सोडुन माझ्या जवळ अंगावर घेण्यासारखे काहीच नव्हते, तरी ही मी बाहेर बसलोच कसा हेच आज मला कळत नाही. सकाळ चे ५.३० वाजले असतील एक गुरखा जो रात्री गस्त घालत होता तो माझ्या जवळ आला व माझी विचार पुस केली मी जेव्हा त्याला राजीव जींचे नाव सांगितले तसा तो उडालाच व म्हणाला " क्या तुम राजीव जी के जाणकार हो , माफ करना भाई उन्हे मै अभी जगा हूं" असे बोलून तो पळतच आत गेला, पण तो पर्यंत थंडीमुळे माझे अंग आकडून आले व शक्यतो मी बेशुध्द देखील पडलो किंवा प्रचंड झोप आली असे काहीतरी झाले असावे, पण जेव्हा थोड्या वेळाने जाग आली तेव्हा दोन-चार जण माझ्या जवळ सोप्यावर बसले होते व मी एका बेड वर पडलो होतो मी लगेच उठलो तेव्हा एक व्यक्ती बोलला " अरे काई बात नही लेटे रहो, तो तुम ही राज जैन हो क्या दिवेदीजी का फोन तो आया था तुम्हारे बारे में, पर जब मेरा यहा आने का कार्यक्रम बना तो मैंने वापस फोन किया था पर तब तुम वहा से निकल चुके थे, चलो काई बात नही तुम सही जगह पोहच तो गये." थोडा नहा धो के तयार हो जायो हमे कही जाना है, आज से तुम्ह मेरे साथ ही रह ना ठीक है" मी देवाचे नाव घेतले व म्हणालो चल देवाची कृपा आहे अजून माझ्यावर.
थोड्या वेळाने मी तयार होऊन त्यांच्या समोर गेलो व विचारले की मला काय काम करावयाचे आहे ते सांगा त्यानूसार मी तयारी करतो त्यावर ते फक्त हसले व म्हणाले " अरे भाई, तुम्ह थके हूये अभी आये हो, थोडा ईधर उधर देख लो जो भी काम अच्छा लगे वही तुम करना " मी देखील थोडा हसलो व लगेच काम शोधावयास चालू केले तेव्हा मला समोरच पुस्तकांचा गठा पडलेला दिसला व एक कार्यकर्ता तेथे त्यावर पत्ते लिहीत होता त्याच्या जवळ गेलो व परवानगी घेऊन लगेच त्याच्या बरोबर पत्ते लिहू लागलो, तासाभराने राजीव जींनी मला बोलवले व म्हणाले चल तु माझ्या बरोबर . मी त्यांच्या बरोबर गाडीतून निघालो एक तास भरच्या प्रवासानंतर एका घरासमोर येऊन गाडी थांबली व राजीव जी व त्यांच्या पिशवी घेऊन मी त्यांच्या मागोमाग आत गेलो, आत जाताच मला धक्का बसला अरे हया व्यक्तीला कोठे तरी पाहिले आहे कोठे बरे.... तेव्हा आठवले जी पुस्तके बाबू घाटवर वाचली होती त्या पुस्तकांमध्ये ह्यांचा फोटो देखिल होता नाव ह्यांचे " श्री अशोक सिंघल " मी नमस्कार केला व बाजूला उभा राहीलो, ते दोघे काही तरी अर्धातास बोलत होते पण माझे त्याच्या व्यक्तिमत्वाकडे सोडून दुसरे लक्षच नव्हते कोठे. ही अशोक सिंघल मी माझ्यावर पडलेली पहीली छाप होती, थोड्यावेळाने त्यांचे लक्ष माझ्या कडे गेले तेव्हा हसत राजीव जींना त्यांनी माझ्या बद्दल विचारले व राजीवजीं नी त्याना माझी माहीती पुरवली माझ्या कडे संगणकाचे शिक्षण आहे असे त्यांना समजताच ते राजीव जीनां म्हणाले " भाई राजीव, ईन्हे तो आप अपने आर. के. पुरम कार्यालय मै रखो" तेव्हा राजीवजीं नी त्यांना नम्र पणे नकार दिला व त्यांनी मला स्वत: संगेच ठेवणार असल्याचा उल्लेख पुन्हा एकदा केला.
बुधवार, ३० सप्टेंबर, २००९
माझी सफर... भाग १
तीन दिवसाच्या थकलेल्या , उपाशी प्रवासानंतर हावडा स्टेशनवर गाडी थांबली... टिकीट कोणी विचारलेच नाही ह्या खुशीत बाहेर पडणार ईतक्यात टिकीट तपासणारा माझ्या समोर
तो . - "टिकीट दिखा"
मी . - " नाही आहे"
तो. - "क्या.. शहर में नया है क्या छोरे.. चल बडे बाबू के पास चल"
मी थोड्या फार गयावया केला माफी मागीतली पण तो बिचारा काय करणार त्याला कळायला हवे ना मी काय बोलतो आहे ते ? ना धड मराठी ना धड हिंदी... चित्रपट पाहून पाहून जेवढे हिंदी येत होते त्यावर त्याचे समाधान झाले नाही... बडे बाबू जवळ गेलो तर तो बिचारा रात्री होणा-या पार्टीची काळजी करत फोन वर बोलणी करत होतो, टिकीट तपासणा-याने माझ्या कडे बोट दाखवले व म्हणाला "टिकीट नही है इस के पास" बाबू ला काय झाले काय माहीत व त्या टिकीट तपासणा-याला बंगाली मध्ये काहीतरी सांगीतले व चक्क मला जाऊ दिले.. मी देवाचे आभार मानले व रेल्वे स्टेशन च्या बाहेर आलो, इकडे तीकडे पाहीले काहीच समजेना नवीन जागा, नवीन शहर, नवीन लोक, नवीन भाषा.. कोणाला विचारावे तर काय विचारावे हा देखील प्रश्न पडला होता, गेट मधून बाहेर आलो ईकडे तीकडे फिरत हुगली नदीच्या फुलावरुन {ब्रीजवरुन} जाताना लक्षात आले की अरे हा तर लोखंडाने तयार केलेला आहे {हाच तो जग प्रसिध्द हावडा ब्रिज}, तेथेच जरा बाजूला बाकड्यावर बसलो व वरुन खाली वाहणा-या पाण्याकडे तर कधी तेथून जाणा-या गाड्याकडे पाहत विचार करु लागलो आपण येथे आलोतर आहोत पण ना कोणी ओळखीचे ना जाणकार ना काही माहीती कसे करावे ? काय करावे ? तो समोरून एक संतांचा दल जाताना दिसला व मी नकळत त्याच्या पाठी मागे चालू लागलो माझ्या सारखे असंख्य लोक त्यांचा पाठीमागे चालले होते त्यात मी एकदम मिसळून गेलो कोणाला काहीच गरज नव्हती की मी कोण , येथे का व ह्या संताच्या मागे कुठे चललो आहे... त्यांना सोडा मलाच खबर नव्हती की मी कुथे चाललो आहे..
ती संतांची टोळी प्रवास करत कलकत्ताच्या बाबू घाटावर विसावली, तेथेच शेकडॊ मंडप लागले होते , असंख्य लोक, साधू महाराज ह्यांचा जमावडा लागलेला होता कोणी मोठमोठ्या आवाजात श्री श्री ह्यांचा विजय घोष करत होता तर कोणी आरती ... मी थोडा विचार केला तर ल़क्षात आले की हा तर एक जत्रेचा प्रकार दिसतो आहे मी इकडे तीकडे पाहत त्या जत्रेमध्ये घुसलो.... एक दोन फलक व बोर्ड लावले होते त्यातून असे लक्षात आले की ही सर्व मंडळी गंगासागर यात्रेसाठी येथे जमली आहेत व येथून गंगासागर -८०-९० किलोमीटर वर आहे तेव्हा हा त्यांचा पडाव आहे, साधू , सन्यांशी व महाराजांच्या तसेच भक्तांच्या जेवणाची सोय देखील अनेक मंडळांनी, संस्थेनी व मोठ मोठ्या कंपन्यानी केलेली होती.
फिरता - फिरता एकदमच एका मांडवाचे नाव वाचून थबकलो "विश्व हिंदू परिषद -कलकत्ता" अरे हे नाव तर कुठेतरी वाचलेले आहे... ह्म्म अरे कोल्हापूर ला नेहरु बागेत सकाळ सकाळी काही मंडळी येत नव्हती का फिरायला त्यातले जगताप काका परिषद वालेच ना... मी सरळ आत गेलो व समोर पांढ-या शुभ्र कपड्यामध्ये बसलेल्या वडिलधारी मानसाला नमस्कार केला व म्हणालो " बाबू जी थॊडा भुकां हूं कुछ काम मीलेगा ? काम के बाद खा ना देना " तो एकदम विचित्र नजरे ने माझ्याकडे पाहू लागला व किंचित सा हसतच बोलला " अरे बेटा, यहा तो सबको खाना बट रहा है जा तु भी खा ले , खाने के बाद मेरे पास आना"
जेवण झाले व मी त्यांच्या जवळ जाऊन आभार प्रकट केले, त्यांनी आपुलकी ने माझी माहीती विचारुन घेतली व एक फोन लावला थोड्यावेळा ने फोन ठेवत म्हणाले "कोई बात नही बेटा, ले फोन , पहले अपने घर फोन करो तथा घरवालोंको बता कि तु ठीक ठाक है तथा यहा विश्व हिंदू परिषद के कार्यालय मै रह रहा है".. मी त्यांना कसेबसे समजावले व म्हणालो जो पर्यंत काही बनत नाही तो पर्यंत घरी फोन नाही करणार. त्यांनी जास्त ओढावे न घेता तो विषय सोडुन दिला व म्हणाले " बेटा, तुम यही रहो हमारे साथ कुछ दिन यह गंगासागर यात्रा खत्म होणे के बाद तुम्हारी व्यवस्था कर देंगे कही ना कही.. मेरा नाम विजय दिवेदी है... तुम मुझे विजय जी कह सकते हो या फिर दिवेदी जी तुम्हारी मर्जी " व हसत आपले काम करु लागले.
तो दिवस होता ३ जानेवारी चा व १४ जानेवारी पर्यंत यात्रा संपणार होती तो पर्यंत मी मनपूर्वक दिवेदी जी सांगतील ते काम करु लागलो त्यांनी थोडे फार प्रयत्न करुन माझ्या साठी एका दुकानातून काही शर्ट व काही कपडे आणले व तेथेच एका बाजूला माडवात माझी राहण्याची व्यवस्था करुन दिली. जेवण देण्याचे व खास खास साधू महाराजांना आवश्य असे फलाहार देण्याचे काम मी पाहू लागलो, पण जे साधू संत माझ्या वाटणीला आले ते नागा साधू { हे प्रचंड कडक पध्दतीने व अवघड अशी तपस्या करतात व हे हिमालयातून फक्त गंगासागर यात्रेसाठी च शहरी वस्तीवर येतात} ह्यांना जास्त काही लागतच नव्हते काही केळी व सफरचंद दिले की माझे काम संपले, तर मग फावल्या वेळेत कुठे पाचजन्य मासीक वाच तर कूठे दिवेदीजीं ना विनंती करुन काही वर्तमानपत्रे वाच हे करु लागलो, माझी वाचण्याची आवड पाहून दिवेदी जी आपल्या ग्रंथ संग्रहातून काही पुस्तके माझ्या हाती दिली त्यातूनच मी विश्व हिंदू परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख करुन घेतली व मला ही ह्यांच्या कार्यामध्ये ओढ वाटू लागली दिवेदी जी च्या जवळ मोकळा वेळ भेटला तर हूगली नदीच्या तीरावर बागेत फिरता फिरता ते मला असंख्य गोष्टी सांगत ज्यामध्ये हेगडेवार जी, सावकर जी व सध्याची देशाची गरज हे विषय प्रमुख असत, मी बोलता बोलता एक दिवस त्यांना एकल विधालया विषयी विचारले व त्यांनी मला त्यावर त्यांच्या कडे उपलब्ध असलेली पुस्तके व कात्रणे वाचण्यासाठी मला दिली.
दिवसामागून दिवस गेले व यात्रा संपली { १४ जानेवारी संक्रातीचा दिवस} गंगासागरच्या तिरावर मी दिवेदी जी जेव्हा शेवटी पोहचलो तेव्हा ते मला म्हणाले "राज बेटा, आज स्नान कर ना यहा, बहोत पुन्य मिलेगा, तुम्हारे सातो जन्म सफल हो जायेंगे, जो कुलपुरुष भगवान द्वार गये है उन्हे भी आज तु नहा कर मुक्ती कर देगा..... सात धाम बार बार गंगासागर जिवन मैं एक बार ... लोग यहा आने के लिये तरसते है मन्नते मांगते है लेकिन तुम भगवान की दया से अपने आप यहां आ गये हो...जा नहा ले " एक दम भारावलेल्या अवस्थेत मी गंगा नदी व सागर ह्यांचे मिलन संगमाला आपल्या डोळ्यात साठवून घेतले व गंगेचे पाणी डोक्यावर घेता ना एकदम स्वर्ग सुखाचा आनंद भेटला, ज्या नदी विषयी शालेय जिवनात, आजीच्या गोष्टीमध्ये, महाभारतामध्ये वाचले त्या नदीचे पाणी आज आपल्या भाग्यामध्ये देखील आहे हा विचार करुन सुखावलो पण पुढील काय माहीत होते की ह्याच नदीच्या सानिध्यात मला माझ्या जिवनातील अत्यंत महत्वाचे वर्ष काढायचे आहे... देवाची करणी कोल्हापूरातील एक गल्ली मधून देखील एकटा कधीच बाहेर न पडलेला मुलगा ईतक्या दुर देशाच्या दुस-या टोकाला येथे गंगासागर पर्यंत पोहचला. शक्यतो दिवेदी जी नी माझ्या मनातील विचार ओळखले व हळुच माझी पाठ थोपटत म्हणाले " बेटा, जिवन तो अभी शुरु होगा तुम्हारा.... चल परसो तुम्हे ... जहा जाना है वहा का नाम सुनते ही तुम्हारे शरीर पे रोंगटे खडे हो जांयेंगे .... पता है तुम्हे कहा जाना है ? तुम परसो की ट्रेन से "अयोध्या" जाओगें वहा तुम्हे श्री राजीव शर्मा मिलेंगे कार्यालय में ठीक है "
१८ जानेवारी ला मी दिवेदींजी च्या परवानगीने कलकत्ता च्या काली मंदीराचे दर्शन घेऊन आलो व संध्याकाळी त्यांचे आशिर्वाद घेऊन कानपुर ला जाणा-या गाडीमध्ये बसलो.... कोल्हापुर ते मुंबई ते कलकत्ता ते फैजाबाद हा माझा सफर .... पण ह्या सफरीने माझा जिवनाला एक वेगळाचा अर्थ प्राप्त करुन दिला. २० तारखेला फैजाबाद रेल्वे स्टेशन वर उतरलो व जवळच असलेल्या अयोध्या नगरी साठी वाटचाल करु लागलो... जेव्हा प्रथम पाय अयोध्येमध्ये ठेवला तेव्हाच दिवेदींचे वाक्य आठवले " शरीर पें रोंगटे खडे हो जायेंगें" व खरोखर अंगावर काटे उभे झाले होते... मी अयोध्या नगरीमध्ये पोहचलो...
क्रमश:
सोमवार, २८ सप्टेंबर, २००९
माझं कोल्हापुर - भाग १
सुरवात तर मी कुठून ही करु शकतो पण कोल्हापुर म्हणजे माझा घरं, तेव्हा कधी काळी कोल्हापुर मध्ये आम्ही राहत होतो शिवाजी पेठ मध्ये तेथून सुरवात ! दिपक आईस्क्रमि, जो शिवाजी पेठेच्या आसपास राहिला असेल त्याला हे नाव माहीत नाही असा विरळाच ! प्रकाश रणदिवे, कोकाट्यांची गल्ली, कोल्हापुर हा पत्ता व त्याच्या शेजारी एका खोली मध्ये आमचं घरं ! एका कोप-यात स्टोव्ह व स्वयंपाकाचे सामान, एका कोप-यात तिजोरी व तिजोरीवर हंथरुन पाघंरुन. बसायला चटई व एका बाजूला अक्काचा पाळणा, कधी मी त्या पाळण्यात मी देखील झुललो असेन, आज ही तो पाळणा घरात आहे, आता त्यात माझा सर्वात लहान भाचा झुलतो आहे. बाबा एका कपड्याच्या दुकानात कामाला जात, आई सांगते जेव्हा अक्का जन्मली होती तेव्हा बाबांचा पगार चाळिस रुपये होता, मला विचित्र वाटायचे चाळीस रुपयात कसे काय त्यांनी घर चालवले असेल.
कधी काळी पडद्यावर चित्रपट पाहीला होता तो प्रथम येथेच शिवाजी पेठेत, गणपतीला अथवा दिवाळीला सर्व जण वर्गणी काढून पडदा चित्रपट लावत, दोन खांब व त्याच्या मध्ये भला मोठा पडदा. पब्लिकला दोन्ही बाजूला बसायची सोय. एका बाजूला प्रोजेक्ट्रर. व संध्याकाळी ७.३० नंतर अंधार पडू लागल्यावर चित्रपटाला सुरवात, मिथूनचे डान्स डान्स, जी-९ व तस्म चित्रपट मी येथे पाहीले. ह्याच शिवाजी पेठेच्या जवळ मंगळवार पेठेत आमची नुतन मराठि विद्यालय शाळा, तेव्हा ती बालवाडी ते सातवी पर्यंत होती, शक्यतो आज ही सातवी पर्यंतच आहे, त्याच्या समोर नुतन मराठी हायस्कुल, पण आमची शाळा म्हणजे विद्यालय. एका जुनाट वाड्यामध्ये असलेली शाळा, खासबाग मैदानाच्या एकदम पाठीला बाजूला.
रस्त्यावरुन पाहीले तर एकाद्या वाड्यासारखीच दिसणारी शाळा, चार बाय चार फुटाचा एक बोर्ड मेन रोड वर शाळेचा. थोडे आत गेले की कमानी जवळच एक जुना शोभे यात्रेचा भला मोठा रथ जो काम करत नव्हता शक्यतो, अथवा मी त्याला कधी मिरवणुकीमध्ये पाहिला नाही त्यामुळे मला वाटते की तो कार्यरत नसावा, भला मोठा लाकडी दरवाजा जसा गढ / किल्यावर असतो तसा त्यातून आत गेले कि डाव्या बाजूला हेडमास्तरांचे ऑफिस व तेथेच स्टाफरुम. उजव्या बाजुला, पाचवी, सहावी व सातवीचे वर्ग व त्यांच्या तुकड्या, दोन मंजली बिल्डींग वजा वाड्यामध्येच, तेथून जरा पुढे गेले की पुन्हा एक गेट व त्या गेट नंतर छोटेखानी पटांगण (अगदीच छोटे असे कुणाच्या तरी घराबाहेरील अंगण असावे) हीच आमची मधल्या सुट्टीतील हक्काची जागा, येथे एक मोठी ओसरी वजा हॉल लाकडी खांब असलेला व त्या हॉलच्या वरती भुत आहे अशी वावडी त्यामुळे कधीच गेलो नाही, पण नंतर नंतर कळाले जेव्हा मी सातवी मध्ये आलो तेव्हा की ते शाळेचे गोडाऊन व स्टोअर रुम होती. त्या पटागंणामध्ये एक पाण्याची टाकी. येथेच आमची सकाळची प्रार्थना व शाळेचे विविध कार्यक्रम होतं.
तेथून जरा पुढे गेले की एका दरवाज्यातून आत गेल्यावर वाडाच्या मागच्या बाजूला नवीनच बांधलेली पत्राचा शेड असलेली शाळा बालवाडी ते पाचवीच्या मुला मुलींची. आता सर्व॑ काही शिक्षकांची नावे आठवत नाहीत, काही आठवतात, देसाई सर, पाटिल सर, जाधव मॅडम, निकम मॅडम.. असेच दोन चार.
आमच्या घरापासून शाळा जास्त लांब नव्हती असेल दोन-तीन किलोमिटर वर, आधी आधी आई सोडायला येत असे, नंतर आम्ही जवळ पासची मुले-मुली मिळूनच जाऊ लागलो, सगळेच गल्या-दोन गल्या सोडून राहत असतं, आमच्या मधील मोठी मुले दादागिरी करत आम्हाला शाळेत पोहचवत व परत घेउन येत. माझ्या आई कडे माझा लहानपणाचा फोटो आहे, त्यात मला पाहिल्यावर तर मलाच जाम हसू येतं, पाठीला दप्तर, काखेत पाणी पिण्याची छोटीशी बाटली.. त्या बाटलीला गळ्यात अडकवण्यासाठी पट्टा होता... तिला काही तरि म्हणत आता आठवत नाही आहे, पांढरा हाफ बाजूचा शर्ट व खाकी चड्डी व चड्डीवर लाल रंगाचा हुकवाला बेल्ट. तेल डोक्याला चापून लावलेले, कपाळावर गंध व डोळ्यात काजळ, कधी कधी मला विश्वास बसत नाही की तो माझाच फोटो आहे ह्यावर.
त्यावेळी आमच्या दप्तरामध्ये एक लाकडी पाटी, चार-पाच चुन्याच्या पेन्सिली व काही रंग बिरंगी खडू, एक अंकलिपीचे पुस्तक व जेवणाचा स्टिलचा छोटासा डब्बा. वही, पेन असली थेरं आम्ही पाचवीत आल्यावर चालू झाली. पहिली ते पाचवी पर्यतंची मुले / मुली खालीच बसत चटई वर समोर एक लाकडी फळा व त्याच्या बाजूला एका पट्टी वर बाईची छडी व फळा फुसायचा कपडा.. कधी कधी डस्टर. अ ब क ड येथेच गिरवलं व बे एके बे पण येथेच शिकलो, शिकण्यात तरबेज होतो पण उनाड खुप त्यामुळे शिक्षणाकडे लक्ष कमी व दंग्यात जास्त, तरी ही मी पहिली ते पाचवी पर्यंत सलग पहिला व दुसरा नंबर घेत असे शाळेत.
शाळेत दंगा खुप केला, कधी कुणाला मार, कधी मुलींची वेणी ओढ, कधी कुणी पाटी वर लिहलेले फुस, कुणाला चिमटा काढ, कुणाचा डब्बा पळव, दप्तर बाहेर फेकुन दे तर कधी वर्गाचा दरवाजा बाहेरुन बंद कर... असेल अनेक धंदे मी शाळेत असताना केले होते, दर दोन आठवड्यानंतर मला आईला शाळेत घेऊन यावे लागते कारण माझी कंप्लेट. पण तरी मॅडमचा / सरांचा माझ्या खुप जिव कारण मी हुशार. मला कधी कधी रावळगाम चे चॉकलेट तर कधी डब्यातून आणलेली पोळी कुणी ना कुणी देतच असे.
पहिली ते पाचवी ही पाच वर्ष भुरकन संपली, व आम्ही मोठे झालो कमीत कमी मॅडम तर आम्हाला हेच म्हणायच्या, दंगा करु नका आता तुम्ही मोठी मुलं झाला आहात तुम्ही पाचवी आहात. जेव्हा पाचवीत आलो तेव्हा मला आठवतं, महाद्वार रोड वरुन मी आई, बाबा व अक्का जाऊन माझी पुस्तके, वह्या व पेन घेऊन आलो होतो, व घरात बसून बाबांनी संध्याकाळी त्या सर्व पुस्तकांच्यावर , वह्यांच्यावर वर्तमानपत्रांचे कवर घातले होते व पेन ने प्रत्येक पुस्तक / वही च्या पानावर जय जिनेन्द्र व ओम लिहले होते. किती तरी दिवस मी ती पुस्तकांना व वह्यांना अक्कालाच काय पण बाबांना पण हात लावू देत नसे, सदा सर्वदा दप्तर माझ्या जवळच असे.
मधल्या सुट्टीत गोट्या खेळने अथवा विटी दांडू, हा रोजचाच कार्यक्रम. गोट्या खेळताना दंगा जास्त होत असे, अंगठा जमीनीवर टेकवून मधल्या बोटाने समोरची गोटी उडवली की एकदम गलका होत असे, व मग कुठले तरी सर, मॅडम आम्हाला तंबी देत व आम्ही गप्प रे गप्प रे चा परत गलका करु, मग कोणी तरी पाठीवर दणका दिल्याशिवाय तोंडे बंदच होतं नसे. विटी दांडू खेळताना कधी कुणाला लागली तर कुणाच्या डोळ्याला लागली असं झालं की मग जे जे खेळत होते त्यांना पायाचे अंगठे धरुन शाळा सुटू पर्यंत उभे राहण्याची शिक्षा मिळत असे, मोठी मुले, व्हालीबॉल, फुटबॉल बाहेर रोड वर खेळत व आम्हा लहान मुलांना शाळेच्या आवारातच खेळण्याची परवानगी होती, मुली आपल्या कंचाकैऊडी अथवा लंगडी असले काहीतरी विचित्र खेळत व आमच्या पैकी कोणी तरी मग जी लंगडी घालत असे तिला धक्का देऊन येत असे.
क्रमशः
बुधवार, २५ मार्च, २००९
बाहूबली हॉस्टेलचे दिवस - भाग ३
असाच एके रवीवारी मी आपल्या हॉल मध्ये बसून गप्पा मारत होतो व बरोबर बुध्दीबळाचा खेळ देखील चालू होता माझ्या समोर निल बसला होता व तो थोडाफार चिटिंग करुन जिंकत होता असे मला वाटत होतं व मी जरा चिढल्यावर आवाज चढवून ओरडलो व थोड्या वेळात तेथे लढाई सुरु झाली .. व आमचा दंगा अण्णाच्या कानापर्यंत पोहचला व अण्णा तेथे पोहचले.. मी म्हणालो झालं.. पुन्हा मार ! जसे त्यांना माझ्या मनातील भावना कळालीच असावी त्यांनी सरळ मला पकडला व धुतला व निलला तोंडी चेतावणी दिली व निघून गेले..
मी निलवर चिढलोच होतो पण त्यांनी फक्त मलाच मारले ह्याचा खुप राग आला होता व मी रागाने सरळ डोंगरावरील मंदिराकडे जाण्यासाठी पाय-या चढू लागलो.. थोडा फार पुढे गेलोच असेन डोक्यात एक आयडीया आली व विचार केला पाय-या सोडून आडवाटेने वर जाऊ.. (आजकाल त्याला ट्रकिंग म्हणतात) व एकटाच व कधीकाळी तेथे चांगलेच जंगल वाटावे अशी परिस्थीती पण मी बिनधास्त होऊन वर चढत होतो व जरा वाईट रस्ता भेटला की रस्ता बदलत असे.. असा मी चांगला अर्धा एक तास चालत होतो पण माथा काही येत नव्हता त्यामुळे मी जरा थांबून मागे वळून पाहीले की आपण बरोबर रस्त्यावर आहोत की नाही.. पण खाली ना मंदिर दिसे ना मी समजलो, चढण चुकवण्यासाठी मी जो आडराणाचा रस्ता पकडला होता डोगराचे चक्कर घालण्यासाठी तयार झालेला होता व मी त्या रस्त्याबरोबर डोंगराच्या एकदम विरुध्द बाजुला आलो होतो.. व समोर पाहीले तर दुरवर हायवे दिसत होता... मी विचार केला की किती दुर असेल हायवे ? एक तासाचा रस्ता अथवा दोन ? येथून सरळ चालत गेलो तर ? कोणाला सापडणार पण नाही व सरळ मेन रोड.. कोणाकडून मदत घेऊन शिरोली नाका व तेथून कोल्हापुरात.. रेल्वे स्टेशन पासून सरळ चालत गेलं की दसरा चोक व सरळ पुढे गेले की बुधवार पेठ.. बस आलं घर !
डोक्यात कल्पना आली म्हणजे त्यावर लगेच अमंल केला पाहीजे ह्या मताचा मी.. सरळ उलट्या बाजूने चालत मी डोंगर उतरलो व त्या रस्त्याच्या दिशेने चालू लागलो... शेतातुन.. आड रस्त्याने.. चालत चालत... सुखलेले ओढे पार करत मी हातकलंगडे रस्त्यावर आलो ना मध्ये गाव आलं ना कोणी पकडणारं ! मी एकदम खुशीत जवळ जवळ पळतच बस स्टन्ड वर आलो पण खिश्यात पैसे नव्हते.. बस ने कसे जावे ह्या विचार होतो व तेथेच बाकावर बसलो...
चार एक वाजत आले होते म्हणजे मी जवळ जवळ पाच तास हॉस्टेलच्या बाहेर होतो व कोणालाच पत्ता नव्हता .. पण माझ्या डोक्यात एक शंका आली.. साडेचार च्या प्रार्थेनेला मी दिसलो नाही की मग ते शोधायला सुरवात करतील व येथे देखील पोहचतील.. आई-बाबा आपल्याला पण रेल्वेनेच घेऊन आले होते येथे आपण पण रेल्वेनेच जाऊ या.. टिकीट घेण्याची पण गरज नाही... व लगेच पोहचू.. मी स्ट्न्डच्या मागेच असलेल्या रेल्वे स्थानकावर गेलो व कोल्हापुरला जाणारी रेल्वे विचारली !
तेथे कळाली की ५.४५ ला आहे ट्रेन.. मी तेथेच एका बाकावर बसलो... ५.३० लाच ट्रेन आली व मी ट्रेन वर कोल्हापुर नाव वाचले व बसलो ! पाच एक मिनिटानी गाडी सुटली .. पाऊण तासात थांबली देखील व आजु बाजूची लोक आपले सामान उचलून बाहेर जाऊ लागली त्यातील एक म्हणाला, मिरजेचे स्टेशन लई मोठं हाय नाही ! मी चमकलो... व खिडकीतून बाहेर बघीतलं तर कोल्हापुरचं स्टेशन वाटतच नव्हतं बाहेर... मी बाहेर आलो व बोर्ड बघीतला मिरज जंग्शन !
मनात एकदम गोंधळ चालू झाला ... कोल्हापुरची गाडी मिरजेला कशी आली ? की आपण चुकीच्या गाडीमध्ये बसलो ? परत कोल्हापुरच्या गाडीची वाट बघावी व कोणाला तरी विचारुन मग ट्रेन मध्ये बसावे ह्या विचाराने मी आजू बाजूला बघीतले तर तेथे एक आजोबा बसले होते आहात पुस्तके व बॅग घेऊन.. मी त्यांना विचारलं " आजोबा, कोल्हापुरला जाणारी गाडी कधी आहे ? " त्यांनी मला बघीतलं व म्हणाले... " येत आहे .. पाच मिनिटामध्ये.. आज लेट झाली नाही तर मिळाली नस्ती ही गाडी ... तु कोणा बरोबर आहेस बाळा ? " मी म्हणालो " एकटाच आहे.. चुकुन मिरजेला आलो.." ते गालातल्या गालात हसले ! दहा एक मिनिटानी गाडी आली व ते माझ्या बरोबरच गाडीत चढले... ! इकडचे तिकडे विचारल्यावर त्यांनी विचारलं " कुठल्या शाळेत शिकतोस " मी म्हणालो " बाहुबली हॉस्टेल मध्ये" ते म्हणाले " ठिक आहे"
थोड्या वेळाने अंधार पडला होता बाहेर... गाडी थांबली व आजोबा आपले सामान घेऊन उभे राहीले व म्हणाले " बाळा, जरा मदत कर ही पिशवी घेऊन बाहेर ये माझ्या बरोबर " मी सरळ त्यांची पिशवी उचलली व त्यांच्या बरोबर बाहेर आलो... जसा मी बाहेर आलो तसाच त्यांनी मला पकडला... व दोन कानाखाली वाजवल्या व जवळच असलेल्या हातकलंगडे स्टेशन मास्टरच्या केबीन मध्ये ओढत नेलं व त्यांना म्हणाले " हॉस्टेल वरुन कोणी मुलगा पळाल्याची खबर आहे काय ? " तो म्हणाला " हो आहे, एक सकाळ पासून गायब आहे.." त्यांनी मला त्याच्या हावाली करत म्हणाले " हाच तो, कळवा हॉस्टेला, बरं झालं मला मिरजेत सापडला.. स्टेशन वरच " माझं तोंड एकदम चिमणी एवढं बारीक झालं व पुन्हा मार पडणार ह्या विचाराने मी थरथर कापु लागलो.
स्टेशन मास्तरांनी तासच्या आत मला हॉस्टेल वर पोहचवण्याची व्यवस्था केली ! आठच्या आत मी हॉस्टेल मध्ये अण्णाच्या समोर उभा होतो !
क्रमशः
मंगळवार, २७ जानेवारी, २००९
दिल्ली ते दिल्ली ! भाग - ३
आम्ही लगेच ( ?) निघालो व काही तासातच ठाण्याला पोहचलो.
ठाण्याला पोहचल्यावर मला पहिल्यांदा कळाले की वंदना हे नाव बस स्थानकाचं देखील असू शकते.... लवकरच रिक्षा पकडुन आम्ही मार्गस्थ झालो.. लुईसवाडी. भव्य अश्या अपार्टमेंट जवळ पोहचु पर्यंत प्रभु आम्हाला मोबो वर मार्गदर्शन करतच होते... लिफ्ट द्वारे ४थ्या मजल्यावर पोहचलो, दरवाजा उघडा ठेऊन एक वयाने आजोबा सारखे व्यक्ती बसलेले दिसले व आम्हाला बघताच ताडकन उठून आले व आत या म्हणत... आत घेतले ! काही क्षणामध्ये ओळख-पाळख झाली निलकांतने माझी ओळख करुन दिली व क्षणार्धात प्रभुने कट्टा चालू केला.
प्रभु " सर्वसाक्षी, विजुभाऊ, टार्या व रामदास येतीलच आता." मी " ह्म्म." प्रभु " तु मिपावर का दिसत नाहीस ?" मी " हम्म नाही, असंच थोडंस मतभेद" प्रभु " का ?" मी "२६/११ च्या वेळी तात्याशी भांडलो, लेखन अप्रसिध्द करण्याच्या मुद्द्यावर. मतभेद बाकी काही नाही" त्यानंतर शब्दशः दहा मिनिटामध्ये किस पाडणे ह्या वाक्यप्रचाराचा पुर्ण अर्थ मला समजला ;) माझे एक वाक्य प्रभुची दहा उत्तरे ! " तुझ्या बाबाचं काय जातं ? " इति प्रभु. पंधरा मिनिटे निलकांत व मी एकत बसलो.."मी चुकलो... मला माफ करा... मी पुन्हा असं नाही करणार...." असे बोंबलावे असा आत्माचा आवाज मला येऊ लागला होता... तोच फोन वाजला व प्रभु फोनशी चिटकले.. त्यामुळे जरा माझा आत्मा वर मी दोघे पण चिंतन करु शकलो. हात पाय धुन घेतले व मस्त पैकी एक ग्लास रिचवला पाण्याचा.... तेव्हा कुठे समाधान वाटले... दरवाजाला लागूनच लिफ्ट होती... त्यातून चित्रविचित्र आवाज आले.. तोच प्रभु म्हणाले " आले.. साक्षी व रामदास आले.. त्यांचा फोन होता..." तोच दोन महापुरुषांचे आगमन झाले, राम राम - नमस्कार , साक्षी साहेबांनी आपले नेहमीचे हत्यार (कॅमेरा) काढून समोरील... टेबलावर ठेवले.. व बाजूला पडलेली प्रवासाची माझी बॅग पाहून प्रभुनां विचारले " कुठे प्रवासाला ? " प्रभुने माझ्या कडे उंगलीदर्शन करुन सांगितले " ही त्याची.. राज जैन" मी " सर्वसाक्षी साहेब, मी तुमचा मनोगत पासूनचा चाहता... तुमचं लेखन आवडतं बरं मला खुप." आपला नेहमीचा मस्का ट्राय !
हसून " अच्छा... तुमच्या प्रतिक्रिया असतात.. " आपल्या मस्काची वाट लागलेली पाहून मी तीच गोळी परत रामदास बुवा कडे पण फिरवली.. ते पण आपले स्मित हास्य करुन गप्प... मी मोठ्या प्रमाणे विचार करुन तोंड बंद ठेवले व त्यांच्या गप्पा मध्ये रस घेऊ लागलो....
तोच कोणी तरी म्हणाले " तुम्हीच का राज जैन ? वाटत नाही तुमच्या कडे पाहून" मी त्यां सर्वांची नजर चुकवून राहीलेली गेम पुर्ण करत होतो मोबो मध्ये... मी कावराबावरा होऊन इकडे तिकडे पाहीले... समोर रामदास-प्रभु-साक्षी-विजुभाऊ-निलकांत कोणी प्रश्न विचारला ते काही कळाले नाही तरी पण हसून सगळ्याच्या कडे पाहीले व म्हणालो " हो मीच आहे.... पण हा प्रश्न का बरे ? " तोच प्रभुंचा फोन वाजला... मी वाचलो ... ! प्रभु म्हणाले "अरे लेका ल म्हणजे ... लंडनचा ;) " एवढेच आम्ही एकले व मी व रामदास ह्याचा हास्य कार्यक्रम चालू झाला..." टारझनचा होता... फिरतो आहे आपल्या जेन बरोबर लेकाचा इलिफंटा वर... तीन वाजताच सांगितले होते की टायमात ये म्हणून आला तर ठीक... मी आता फोनच नाय करत."- प्रभु.
आत किचन मध्ये... काकु काही तरी तळत होत्या.. व त्याचा मंद असा सुवास बाहेर बैठकी मध्ये दरवळत होता... व पोटाले उंदिर जागे होऊन उड्या मारुन लागलेच होते तो पर्यंत पुन्हा लिफ्ट वाजली.... व तात्या आले... ! ती भरभक्कम काय मी प्रथमच पाहत होतो.... फोटो मध्ये खुपच बारिक दिसतात बॉ तात्या... ;) माझ्या बलदंड व राक्षसी देहा समोर तात्यांचा देह म्हणजे काय ? मी उंदीर ते हत्ती ! त्यांना पण नमस्कार चमत्कार करुन झाले.. ते पण आपल्या जागे वर बसले ... पण मी जाणार आहे मी जाणार आहे लवकर.. क्लाइंट कडे जाणे आहे.. पैसाचा मामला असे काही तरी बडबडत बसले... ! प्रभु म्हणाले " बस रे. जाशील. हे सर्वसाक्षी पण परोल वर आले आहेत... " सर्वसाक्षी " हो कुटूंब गेलं आहे हळदी कुंकु करायला.. तो पर्यंत पेरोलच आहे... बाकी आठ ला मी पण जाणार.."
रामदासबुवा तर खुप मितभाषी आहेत बॉ... आमच्या बडबड्या ग्रुप मध्ये.. निलकांत-विजुभाउ व हे गप्पचुप ! त्यांचा लेख आला होता चित्रलेखा मध्ये... व तो चित्रलेखा माझ्या बॅग मध्येच होता त्याचा आधार घेऊन मी त्यांचे अभिनंदन केले व लेख छान असल्याची माहीती... ! त्यावर ते पुन्हा हसून गप्प ! तोच किचन मधून बिस्किट आंबाडे घेऊन आले ... मला तर तो उडीद वड्याचा लहान भाऊ असावे असेच वाटत होते पण गोळे मस्त होते... हिरव्या मिर्चांची चटणी व बिस्किट आंबाडे जबरा.... ! एक.. दोन..तीन... असे अगणित पोटात सरकवल्यावर पोटाराम शांत झाला माझा.. ! काकुंची व आपल्या मुलाची अभिषेक ची ओळख करुन दिली प्रभुंनी.... आम्ही नमस्कार केला... तात्याने दंडवत घातला... आम्हाला आपल्यात असले संस्कार का नष्ट झाले ह्याचा विचार करण्यास एक संधी मिळाली... मी पुढे होऊन नमस्कार घालावा हा विचार करत होतोच.. पण काकु किचन मध्ये.. काय तर सुर-सुर वाजले म्हणून आत गेल्या... व माझा संस्कार दाखवा कार्यक्रम तेथेच बंद पडला..
पुन्हा चर्चेची गाडी मी मिपावर नसल्याच्या मुद्द्यावर..... रामदास " तुम्ही मिपावर दिसत नाही आजकाल " प्रभु " येडझवा आहे.." साक्षी " हो तुम्ही दिसत नाही" तात्या " सोडून गेला आहे... " मी एकाद्या निर्लज गुन्हेगारासारखा हसत " नाही हो... येतो आहे.. येणार आहे... " म्हणत ... म्हणालो " तात्या, क्लास झाला आहे.. परवा दिल्ली पोहच्लो की लॉग इन होतो.. " ... विजुभाउ पण हसत म्हणाले " ह्म्म.. पाहू" तात्या पण " पाहू" असे म्हणुन पण तात्या मी निघतो, असे सांगून पार झाले !
पुन्हा फोन प्रभुचा.. " आला... येईल आता लगेच टार्या... त्याला घेऊन येतो मी... बसा.." अहो आम्ही पण येतो " साक्षी साहेब पण चला मी पण येतो असे म्हणून.. मागे मागे... त्याच्या मागे रामदास बुवा... त्यासर्वांच्या मागे निलकांत.... आता मोकळ्या हॉल मध्ये मी बसून काय करु.... व काही तरी पोटात गेल्यावर धुराडे काढणे जरुरि म्हणून मी पण त्याच्या मागे मागे... प्रभु सर ह्या वयात देखील ;) सर सर चार मजले उतरून खाली गेले... पाय-यांनी... ! मला स्वतःची लाज वाटू नये म्हणून मी-विजुभाउ-निलकांत... सर्वजण देखील त्याच्या पाठी मागे पाय-या उतरुन खाली गेलो... !
जवळच असलेल्या टपरी वरुन प्रत्येकांने आपापले सामान घेतले व चर्चा पुन्हा रंगू लागली... दोन एक धुराडे सोडून होऊ पर्यंत साक्षी साहेबांनी सुभाषचंद्र बोस ह्याच्या बद्दल तसेच काही अनाम क्रातिंवाराबद्द्ल उत्तम माहीती सांगितली ! पाच मिनिटात दर्शन देणारा टारझन साडे पंचवीस मिनिटे झाली तरी लापता होता.. पुन्हा गाडी माझ्या विषयावर आली... व माझा व्यवसाय पोटापाण्याचे हाल ह्यावर एक अत्यंत महत्वपुर्ण तथा गहन चर्चा झाली.. मुद्दे एकदम राष्ट्रीय स्थराचे म्हणजेच दिल्ली कडील होते म्हणून त्यावर आधी काही लिहीत नाही गुप्ततेचा भंग होतो... मध्येच रामदास बुवांनी शेयर मार्केट कधी वर जाइल असा प्रश्न करुन मला यार्कर टाकला... पण मी पाच्-सात वर्ष झाली मराठी महाजाल विश्वावर वावरत आहे त्यामुळे असले यार्कर अपेक्षीत होते पण रामदास बुवाच माझी मागून विकेट घेतील ही मनात जरा ही कुशंका नव्हती... पण विकेट पडलीच होती.. काय तरि सांगायचे म्हणून.. मागच्या आठवड्यात.. तासभर बसून तयार केलेल्या मार्केट रिपोर्ट मधीले एक पेटेंट वाक्य टाकले... होईल वर होइल.. पण सत्यम मुळे गोंधळ वाढला आहे... पाहू काय होतं ते" असे थातुर्-मातुर उचारून मी माझी लंगोटी संभाळली ! तोच पुन्हा मोबो वाजला प्रभुचा व तो आला.. घेऊन येतो असे म्हणन टांगा टाकत (उंची मुळे चालत गेले हे वाक्य येथे चांगले दिसत नाही) गेले त्यावेळी मी पाहीले अरे हे तर बरमुड्यावर गेले... पॅन्ट घालायला विसरले की हा देखील समुउपदेशातील एक उपदेश.. लाजू नका. ! पण माझ्या मनातील प्रश्न मी तीथेच गिळला व पुन्हा चर्चेत सहभागी झालो... तो पर्यंत निलकांत व साक्षी ह्यांची गाडी लई पुढे गेली होती व मुद्दे काहीच कळत नव्हते... हे पाहून मी पुन्हा एक धुराडा सोडला व निचिंत पणे उभा राहीलो...
प्रभु ज्या वेगाने गेले होते त्याच वेगाने एकटेच परत आले.. टार्याला विसरलेली काय ? असा बाळबोध प्रश्न माझ्या मनात आला पण येवढ्या वयस्कर ;) मानसाला कसे विचारावे म्हणून गप्प बसलो... तोच मागून एक रिक्षा दिसली व दोनचार टन वजन भरले असावे ह्या प्रकारे हळू हळू.. पुढे येत होती... मी विचार करतच होतो... की वाहतूकीच्या साधनातून लोक आपले वजनी सामानाची का ने-आण करतात, मुंबई मध्ये काही कायदा आहे का नाही.. हा प्रश्न मी निलकांतला विचारावे म्हणून सारावलो होतो तोच.. त्याच रिक्षातून... एक सुकुमार... नवयुवक आपले एक ट्नी धुड सांभाळत बाहेर पडला... व रिक्षावाल्याला पैसे देऊन आमच्या कडे पाहून हसू लागला.. व प्रभु सरांच्या कडे आला... ह्याला कुठे तरी पाहीला आहे हा विचार डोक्यात घण घालू लागला व सर्वाच्या खरडवह्या डोळ्यासमोरुन काढल्यावर टारझन म्हणजे हाच नमुना ह्यावर शिक्कामोर्तब केला.
" अरे हेच काय राज जैन, वाटत नाय यार..." असा चार-पाच वेळा माझा उलेख त्याने केला व ह्याला उचलून चवथ्यामाळावरुन सरळ ग्राऊडला टाकावे ह्यासाठी माझे हात सळसळू लागले पण मी ६० किलो तो ६०० किलो कुठ पेलवणार ह्या व्यवसायीक हिशोबाने मी तो विचार रद्द करुन त्याच्या विनोदाला दाद दिली. :D थोड्या वेळाने टार्याची पण पोट पुजा झाली ( त्याच्या गळ्यातच चिकटले असेल... पोटापर्यंत पोहचलेच नसेल पण .. राहु दे) पुन्हा एकदा अभिषेक ची ओळख परेड झाली व गाडी त्याच्या शिक्षणावर पोहचली... ! अभिषेक कडे पाहून व त्याचे शिक्षण पाहून आनंद झाला... त्याने कुठला तरी उच्च कोर्स लावला आहे व त्या कोर्स साठी फक्त १०० सिट साठी काही शे अर्ज होते त्या पण हा पहिल्या पाच मध्येच निवडला गेला असे काहीतरी मला कळाले ( आम्ही दहावी पास... ते पण.. कसे दे देवालाच माहीत.. त्यामुळे त्याची डीटेल देऊ शकत नाही)
वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही.. एक निलकांत सोडला तर बाकी सगळे मला नवीन होते व त्यांना मी नवीन पण जसे काही वर्षापासूनचे जुने सवंगडी बोलावेत वागावेत असे सगळे वागले... खुप आनंद झाला.... ! कधी मधी साक्षी साहेबांनी एकदोन फोटो क्लिकले ... ! व रामदास-साक्षी-प्रभु-विजुभाउ एका गुप्त मिटींग ला जाण्यासाठी व निलकांत-टार्या पुणे ला जाण्यासाठी व मी दिल्ली ला जाण्यासाठी बाहेर पडलो... !
प्रभु, निलकांत, विजुभाउ, साक्षी साहेब, तात्या व रामदास बुवा ह्या सर्वांनाच भेटून आनंद झाला ! असेच आपण नेहमी भेट राहू हा आशावाद घेऊन मी.. मिपावर पुन्हा लिहते झाल्यावर काय काय फाडायचे व काय काय शिवायचे ह्याचे प्लान करत आपल्या ट्रेन कडे रवाना झालो !
हुश्श !!!
समाप्त !
पण ह्यावेळचा माझा प्रवास माझ्या जन्मभर लक्ष्यात राहील मी एक-दोन नाही तर चांगले ९ मिपा करांना भेटलो... चार जनांशी फोनवर बोललो ! सगळेच फंडू आहेत... सगळे आपापले व्यवसाय-काम- धंदे संभाळत असे एक दुस-यांना भेटत असतात हे पाहू धन्य झालो.. ! याहू ग्रुप वर शेकडोंनी मित्र व जीमेल मध्ये काही हजार आयडी पण कोणाशी भेटावे.. कोणासाठी आपला कामधंदा सोडून जावे एवढी आत्मीयता मला कधीच झाली नाही पण मिपावर ती आत्मियता निर्माण झाली व अनेक वर्षापासून अमराठी मित्राच्या गराड्यात हरवलेला राज जैन... परत आपल्याच मातीच्या... भाषेच्या मित्रांच्या जगात आला... हे पाहून त्या देवाला देखील आनंद झाला असेल... !
शुक्रवार, २३ जानेवारी, २००९
बाहूबली हॉस्टेलचे दिवस - भाग ७
बाबांनी मला अण्णाच्या तावडीत दिला व म्हणाले " काहीच महीने आहेत संभाळून घ्या, पण सुधारयलाच हवा." अण्णा हो म्हणाले व हसले. ( त्यावेळी त्यांच क्रिप्टीक मला समजलं नाही प्रभु संगे नव्हते ना ) बाबा निघून गेले व अण्णानी कोंबडीची मान पकडावी तशी माझी पकडली व हसत म्हणाले " कशाला सारखा मार खातोस.." मी म्हणालो " तुम्हीच तर मारता." अण्णाने डोळे वटारले व मी आपली पिशवी घेउन सरळ हॉल कडे घुम ठोकली.
चांगले पंधरा वीस दिवस मी एकदम व्यवस्थीत राहीलो.. ना दंगा, ना पळापळ.. अभ्यास व्यवस्थीत... सकाळी टायमात उठणे.. व्यायाम... कश्यात कश्यात चुक नाही... त्या दिवसामध्ये अण्णाला पण विचित्र वाटले असावे इतका मी सुधरल्या सारखा राहू लागलो, शेवटी निलला राहवले नाही व त्याने विचारलेच " राज, काय झालं ? तु असा एकदम व्यवस्थीत का वागत आहेस ?" मी म्हणालो " अरे काहीच महीने आहेत आई म्हणाली आहे की मी सरळ वागलो तर मला पुढील वर्षी येथे ठेवणार नाहीत." निल हसत म्हणाला " माझी आई पण असे म्हणाली होती मला मी सरळ वागत आहे बघून पुन्हा तीन वर्षाची फी भरली मागच्याच वर्षी." असे म्हनून तो गेला. माझ्या डोक्यात किडा उठला.. जर अण्णाने सांगितले की मी चांगला वागत आहे व बाबांनी पुन्हा फी भरली तर ?
अण्णाचे दिवस पुन्हा फिरले फक्त तो तेच पंधरा वीस दिवस सुखाने झोपला असेल..... हा हाल झाला की हॉस्टेल मध्ये कुठ ही कट् असा आवाज झाला तरी तो "राजा.." असे किंचाळायचा. खुप त्रास दिला त्यांना मी त्या काळात.... पण शांतीसागर महाराजांच्या जन्म दिनानिमित्य प्रमुख पाहूण्याच्या समोर भाषणासाठी कोणच उभं राहत नव्हतं त्यावेळी मी हात वर केला होता व व्यवस्थीत चांगले भाषण दिले होते व पाहुण्याच्याकडुन पेनचं गिफ्ट पण मिळवलं होतं तेव्हा मात्र अण्णा आनंदला होता जाम... ! त्यानंतर मी किती ही खोड्या केल्या .. त्रास दिला पण अण्णाने हात नाही उचलला.... फक्त डोळ्यानेच रागवायचा... २६ जानेवारीच्या दिवशी पण त्याने माझ्या कडुन पाहुण्याच्या समोर भाषण म्हणवून घेतले... माझा इतिहास चांगलाच होता व स्मरणशक्ती त्यामुळे मी हातात लिहलेला कागद न घेताच मनानेच भाषण देत असे तेच अण्णाला आवडले असावे... अण्णा सुधरला होता की मी सुधरलो होतो माहीत नाही पण आमच्यात जुळु लागलं होतं...
पण तो शनिवार आला व सगळी गडबड झाली... जवळच्या गावात राहणा-या विद्यार्थांनी खबर आणली गावाच्या जत्रेची पुढील शनिवारी कुंभोज गावात जत्रा होती व हॉस्टेल च्या मुलांना तिकडे जाण्यास मनाई होती.. पण मी आमच्या हॉल मधील दहा-पंधरा मुलांच्या समोर व्यवस्थीत भाषण दिले व प्लॅन करुन दिला की कसे जायचं व यायचं पोरं जाम खुश.. अण्णाला पटवायची तयारी मी केली होती... तो शनिवार आला सकाळच्या शाळे नंतर मी अण्णाकडे गेलो व डोंगरावर फिरायला जाण्याची परवानगी मागितली.. अण्णा म्हणाला.. " कोणाला तरी बरोबर घेऊन जा, व संध्याकाळी आल्यावर मला काय काय पाहीले.. काय काय फळे दिसली ह्याची नोंद करुन दे. " मी मनात म्हणालो.. " ह्यात पण अभ्यासच ? " आमच्या शाळेत तो एक विषय होता... !
आम्ही मस्त पैकी चांगले चार्-पाच तास जत्रे मध्ये भरकटलो.. जे मनाला येईल ते केलं... ! कोणाला गोळ्या खायच्या होत्या त्याने गोळ्या खाल्या.... कोणाला... चिवडा खायचा होता त्यानं ते खालं... मला केक खायचा होता मी केक खल्ला ( स्वतः च्या पैशाने) आम्ही मस्त पैकी मजा करुन पाचच्या आत हॉस्टेल जवळ पोहचलो, कोणाला काही ही न बोलण्याची सर्वांना शपथ दिली व सगळे आपल्या हॉल वर परतलो.
पण साला एक फुटिर निघाला... गद्दार.. माझ्या केक ची खबर अण्णाला दिली कोणी तरी सोमवारी-मंगळवारी ! अण्णाचे हात शक्यतो शिवशिवत असावेत कोणाला तरी मारण्यासाठी मी तावडीत सापडलोच होतो... धु धु धुतला !! प्रचंड मार म्हणजे काय हे मला त्या दिवशी समजले ! जेव्हा मारुन थकले तेव्हा त्यांनी एकच वाक्य बोलले " केक खाताना मजा आली का नाही ? धर्म भ्रष्ट केलास...." माझे डोके च्मकले मी म्हणालो " अण्णा, मी केक खाल्ला तर ह्यात धर्म कुठे आला मधी..." परत धुतला .. व म्हणाले " अंड्याचा केक खल्लास वर धर्म कुठे बुडाला" मी त्या परिस्थिती पण चेह-यावर हसू आणत म्हणालो " अण्णा, तो केक अंड्याचा नव्हता.. केक म्हणजे चॉकलेट आहे ते... त्याचे नाव केक आहे.. लाल रंगाचं... शाळेच्या दुकानात पण मिळते" अण्णा वरमला... एका पोराला जवळ बोलवलं व विचारलं की केक नावचं चॉकलेट येतं का ते.. तो हो म्हणाला.. अण्णाने मला सोडलं ! तो वरमलेला पाहून मी विचारलं " तुम्हाला कोण म्हणालं की मी केक खल्ला ? " अण्णा माझ्या कडे बघत म्हणाला " कोणी नाही जा आपल्या हॉल वर.. चल." मी गुमान हॉलवर आलो... जे संगे आलो होते जत्रेला त्या सर्वाच्यावर संशय.
तो फुटिर निघाला म्हणून काय झालं त्याचा पण एक दोस्त फुटीर झाला व मला सुचना दिली की कोणी अण्णाला सांगितलं !
"गुंडगिरी करतोस, तुम्ही कोल्हापुरची पोरं, एक जात गुंड... ! का मारलंस त्याला ? " मी गप्प मान खाली घालून उभा... फुटीराने जशी मला बातमी दिली होती त्या नुसार त्याला मी धुतला होता... चांगल अंघोळीच्या विहीरी मध्ये धक्का दिला होता... " त्याचा जिव गेला असता तर ? तु काय केले असतेस ? " अण्णा आपल्या टिपीकल भाषेमध्ये आला होता... त्याचा राग त्याच्या थरथरण्यावर कळालाच होता... त्याने एका शिपायाला बोलवलं व म्हणाला " ह्याचं नाव लिहून घे. ह्याचा शाळेतून दाखला घेऊन ये. मी ऑफिस मधुन येथला दाखला घेऊन येतो. ह्याला पाठवा परत घरी कोणाचा तरी जीव घेईल हे कार्ट"
कुणाचा जिव घेण्याचा का प्लान नव्हता माझा व घरी परिक्षे शिवाय जाणे म्हणजे तेथे पण मार... ह्या दोन्ही गोष्टी मुळे मी रडू लागलो व अण्णाच्या पायात बसलो व पुन्हा चुक करणार नाही हाच एक घोष लावला ! काय झालं काय माहीत पण अण्णा वरमला..! त्यानंतर मी दोन महीने पुर्ण शांतते मध्ये काढले व शालेय परिक्षेचा निकाल हाती येऊ पर्यंत अण्णाच्या हाताला लागलो नाही, जेव्हा निकाल हाती आला... तेव्हा आई-बाबा येणार होते घेण्यासाठी... २ च्या बस ने मी.. सकाळी अण्णा कडे गेलो व अण्णाला म्हणालो " अण्णा... मी पास झालो. बाबा येणार आहेत मला घेऊन जाण्यासाठी." अण्णानी माझ्या केसातून हात फिरवला व म्हणाले " ठीक. घरी जास्त दंगा करु नकोस... जेव्हा मोठा होशिल तेव्हा मला येऊन नक्की भेट... मला माहीत आहे तु पुन्हा येणार नाही इकडे"
*******************
२००७
*******************
कित्येक वर्षानंतर मी बाहुबलि मध्ये गेलो होतो... तेच हॉस्टेल... तेच हॉल.. तीच शाळा...तेच भोजनालय... तेच मंदिर.... थोडे फार नवीन बांधकाम सोडले तर काहीच बदलले नव्हते... दोन चार पोरं समोरुन येताना दिसली.... पांढरा शर्ट... काळी चढ्डी ! टिपीकल बाहुबली शाळेचा ड्रेस. त्यांना विचारलं " शाळा चांगली आहे का रे ? " मुलं " हो " मी " हॉस्टेल? " पोरं काहीच बोलली नाही नुस्तेच हसलीत.... जसा मी हसत होतो त्याकाळी... मी " अण्णा अजून मारतो का रे ? " मुलं " अण्णा. नाही... पण अण्णा हॉस्टेल बघत नाहीत आता.. ते आपल्या रुम मध्येच असतात.. " त्यांनी नवीन अण्णाचे नाव सांगितले पण माझे लक्ष तिकडे नव्हतेच.. मी सरळ अण्णाच्या जुन्या रुम वर गेलो.... तीच टिपिकल रुम... काही ही बदल नाही.... पुस्तकांचे रॅक एका बाजुला... खॉट एका बाजुला... दोन लाकडी खुच्या... व एक छोटेखानी किचन. मी बेड वर पाहीले अण्णा आराम करत होते... मी आत गेलो व पाया जवळ बसलो, व अण्णा अजून पर्यंत तसाच ड्रेस घालत होते जसा मी बघीतला होता.. पांढरा सदरा व पांढरे धोतरं ! त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला.... त्यांनी डोळे उघडले व म्हणाले " मी आपल्याला ओळखले नाही." मी म्हणालो " अण्णा, मी राज जैन... कोल्हापुरचा.. येथे होतो... १९** मध्ये... एकच वर्ष " डोक्याला जरा ताण देत म्हणाले " राजा, अप्पासोचा मुलगा. कपडे व्यापारी" ते मला विसरले नाहीत हे पाहू माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागले , मी त्यांच्या पायावर हात ठेवत म्हणालो " हो, तोच, मी." खुप गप्पा मारल्या त्याच्या सोबत.... व जाताना शेवटी म्हणालो.... " अण्णा, एक सत्य सांगतो... त्यावेळी कुंभोज मध्ये मी केकच खाल्ला होता.. अडां केक. तुम्ही ज्या मुलाला बोलवले होते ना की केक नावाचं चॉकलेट आहे का नाही... विचारायला... तो निल होता... तो माझ्या साठी खोटं बोलला होता... " अण्णा हसत म्हणाले " तु जेव्हा जाण्यासाठी आला होतास ना माझ्या कडे... त्याच्या आधीच निल माझ्या कडे माफी मागून गेला होता... व खरं काय ते सांगून देखील. " मी त्याच्याकडे बघतच राहीलो.... अण्णा म्हणाले " आपला धर्म अहिंसा शिकवतो.. इतकी वर्ष झाली... कुठे ना कुठे तुला देखील अहिंसेचे महत्व कळालेच असेल नाही ! मग.. आम्ही हॉस्टेल मध्ये शाळेमध्ये हेच शिकवण्याचा प्रयत्न करतो.. बस पण तुम्ही मुलं ... तुझ्यासारखी वात्रट मुंल हा स्वर्ग सोडून पळुन जायला बघतात..."
मी त्यांना पुन्हा नमस्कार करुन बाहेर आलो व बाहुबली मुर्तीचे दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे वळलो.
समाप्त.