रविवार, ११ ऑक्टोबर, २००९

माझी सफर... दिल्ली सफर - भाग ४

काल जे शर्माजींनी सांगितले होते ते खरे आहे का ? ह प्रश्नच मला टोचत होता, मी विचार केला की खरं खोटे आपण स्वत:च शोधायचे व त्या तयारीला लागलो, दुपारी कामावरुन आल्या आल्या प्रथम कुच केली ती त्या रोडवरील माझ्या माहीतीच्या पण तेथे पुर्वीपासून राहत असलेल्या रामावतार कांका कडे मी नमस्कार करुन त्यांच्या सोबत बोलत बसलो व गल्ली ते दिल्ली ह्या सर्व विषयांवर बोलून झाल्यावर मी मुळ मुद्द्यावर हात घातला,"काका, आप यहा शर्माजीं को कबसे जानते हो ?" काका " अरे अपने शर्माजी जो तुम्हारे साथ रहते है वहीं ना, उन्हे तो मै काफी अरसे से जाणता हूं ... कम से कम १० साल से, क्यूं क्या बात है ? कोई परेशानी है क्या उन्ह से ? अरे उन्ह की किसी भी बात का बुरा मत मान ना बेचारा सरल आदमी है, बस किस्मत का मारा है, नहीं तो यह भी आज संघटन मैं काफी उप्पर तक पोहच जाता" माझा विश्वास पक्का झाला व मी त्यांना अजून खोदुन विचारले की " क्या हूआ उन्ह के साथ ?"
काका " कुछ नहीं बेटा यह सब सत्ता तथा अधिकार की माया है बाकी कुछ नहीं, कुछ साल पहले यह कुमाऊं से यहा आया था, बडे बडे विचार तथा सपने मन में रखकर, खुद एक पेशे से शिक्षक था यह यही एक स्कुल में बच्चों को पढाता था, लेकिन एक दिन एक नेता की बातो में आ गया , तथा काम छोड के उस के आगे पीछे घुम ने लगा पर यह था होशियार इस कारण जल्दी ही ऊसने अपनी जगह बना ली थी, पर यहा प्रांत के कुछ लोगों कों यह रास नहीं आया तथा झुठेमुठे किस्से संघटन में इसके नाम से फैला दिए तथा एक दिन तो कुछ लोगोंने उसे पिटा भी. तब कही जा कर यह संघटन से बाहर हो गया खुद ही, यह तो अपने गांव वापस जाना चाहता था उसी समय पर राजींव जीं के गुरू तथा भाई प्रेमप्रकाश जीं ने उन्हे जाने नही दिया तथा उसे आगे कुछ काम देने का वादा कर कर अपने साथ यही धर्मशाले में जगह दी, पिछले ५ सालों में ना उसे काम दिया ना उसकी कोई सुध ली... दो टाईम का भोजन यही धर्मशाला में मिलता ही था तथा एक दिन उसकी बुढीं मां भी चल बसी वहा गांव मैं तो यह रह गया अकेला ब्रम्हचारी बनकर अपना जिवन निठ्ठलो कि तरह निकाल रहा है बचे हूंये जिंदगी के पल. अभी कुछ दिन पहले ही बता रहा था उसे यकीन ही नही तो विश्वास अभी है की प्रेमप्रकाश ही वह व्यक्ती था जीसने उसे पिटवाया तथा संघटन से बाहर करवा दिया... मुझे तो विश्वास था ही मै उसे भी अच्छी तरह जान ता हूं थोडा लालची किस्म का आदमी है यह प्रेमप्रकाश... पर बेटे तुम्हारा काम कैसा चल रहा है ? तनख्वा तो समय पर मिल रही है ना ?" मी म्हणालो हो सगळ व्यवस्थीत आहे, व तिथून बाहेर पडलो, व हरिद्वार ला आल्या पासून आज पर्यंत च्या घडामोडी वर पुन्हा पुन्हा विचार केला व संघटनेत माझी ओळख करुन देताना राजीव जीं तथा इतर व्यक्तीनीं केलेली माझी स्तुती मी जरा वेगळ्याच नजरे ने पाहण्याचा प्रयत्न केला व एक निश्चय करुन घरी परतो.

थोडी जास्त नसली तरी आनंद व माझी बोलचाल बंदच होती कधी कधीच एकमेकांशी बोलत असू पण ह्यावेळी मी स्वत: आनंद जवळ जाऊन क्षमा मागीतली व त्यांच्या संगे नेहमीच्या पध्दतीने बोलणी चालू केली व काही दिवसामध्येच तो ही पुर्वी प्रमाणे हसत-खेळत माझ्याशी राहू लागला व माझ्या बरोबर पुन्हा गंगेच्या किनारी येऊन तास तास भर बसू लागला त्याच वेळी मी त्याच्या बद्दलची माहीती त्याच्या कडुन काढून घेतली व कथा थोडीफार तशीच होती जी स्वप्ने शर्माजी तथा मला दाखवली गेली होती तीच स्वप्ने तो देखील आपल्या उराशी बाळगून बसला होता, तेव्हा मात्र मी पुन्हा पुन्हा विचार करु लागलो की काय करावे ? रस्ता शोधणे खुप गरजेचे व निकडीचे झाले होते मला माझे जिवन अश्या या धर्मशाळेत अथवा कोणाची जी हूजूरी करत घालवायचे नव्हतेच तेव्हा मी ठरवले की कामावर गेल्यानंतर ह्यांचा काय तो निकाल लावायचाच.

कामावर पोहचल्या पोहचल्या मी सर्व प्रथम जो व्यक्ती मला भेटण्यासाठी योग्य वाटला तो म्हणजे आमचे अकांन्टट श्री. जगराम सिंग जी त्यांना जाउन मी माझ्या हिशोबा बद्दल विचारले, माझा पगार हा कोणाच्या मार्फत राजीवजींच्या जवळ जातो व किती ? आता मात्र मला चक्कर येण्याचीच वेळ आली होती... कारण माझ्या हिशोबाने माझा पगार हा १८००.०० रु होता व तो नेहमी मला राजीवजींच्या मार्फत मीळत होता पण येथे तर मोठेच लफडे चालू होते.... माझा पगार हा कार्यालयातून आनंद मार्फत राजीवजींना मिळायचा ३८००.०० रु. व माझ्या हाती यायचे फक्त हजार रुपये तथा राजीवजी म्हणायचे की तुझे आठशे रु. हे माझ्या कडे जमा राहतील ज्यावेळी तुला गरज लागेल तेव्हा तु परत घे... झाले मी मात्र तेथेच मटकन बसलो व म्हणालो धोका, असला कसला हा धोका छे कोणावर भरोसा करुन फायदा नाही एकतर पुर्ण पगार नाही जे मीळत होता त्यातील देखील अर्धे हाती.... नकोच आज काहीतरी फायनल करुच. त्याच क्षणी परत हरिद्वारच्या बस मध्ये बसलो व तडक शर्माजींच्या जवळ गेलो व सर्व कहानी-कथा त्यांना सांगितली डोळ्यातून रागाने पाणी वाहू लागले होते व शर्माजी मला समजावून सांगत होते की अजून काही फरक नाही पडला आपला रस्ता बघ .. नवीन मार्ग शोध काही जास्त नुकसान झाले नाही उलट तु येथेच येऊन काही ना काही शिकला आहेस, माझ्या ही डोक्यात ही गोष्ट व्यवस्थीत बसली की चल काही हरकत नाही आपण मार्ग काढूच.

शर्माजीं आपल्यापरीने माझ्या साठी काही मार्ग निघतो का हे शोधत होते व एक दिवस त्यांनी मला सांगितले की जर तु दिल्ली ला गेलास तर काहीतरी तुझी व्यवस्था होईल बघ प्रयत्न करुन तेथील कार्यालयातील एका व्यक्तीचे नाव व पत्ता त्यांनी एका कागदावर लिहून दिले व म्हणाले बघ कधी जातोस ते. मी दिल्ली येथे जाण्याचा मार्ग शोधू लागलो पण काहीच कल्पना येत नव्हती की दिल्ली ला जाणार आहे हे राजीव जींना सांगावे की न सांगाता जावे ? विचार करुन करुन डोके पकले होते, रात्र रात्र भर जागे राहून मी विचार करायचो की कसे येथून बाहेर पडावे, काय मार्ग शोधावा.... व एक दिवस मी मनाचा पक्का इरादा करुन राजीव जीं समोर गेलो व म्हणालो " राजीव जीं, मै थोडा दिल्ली जाके आना चाहता हूं, वहा मेरे प्रांत के कुछ लोग रहते है उन्हे मिल के वापस आना चाहता हूं अगर आप जाने की इजाजत दे तो" राजीव जीं नी थोडा फार विचार केला व म्हणाले " ठीक है लेकिन वापस जल्दी आना नही तो काम पें बुरा असर पडेगा ठीक है, आनंद इसे कुछ रुपये दे दो "

दोन हजार रुपये व आपले सर्व कपडे घेउन मी शर्माजींच्या जवळ गेलो व त्यांना नमस्कार करुन म्हणलो " मैं जा रहा हूं शर्माजी आपने जो सहयोग तथा प्यार दिया उसके लिए मै पुरी जिंदगी आपका अहसानमंद रहूंगा" असे म्हणून मी लगेच तेथून बाहेर पडलो व बिर्ला मंदिर तथा गीता भवन वर जाऊन देवाचे दर्शन घेतले व गंगेचे पाणी डोक्याला लावून तडक रेल्वे स्टेशन वर जाऊन गाडीची वाट पाहू लागलो.

दिल्ली .... बाप रे देशाची राजधानी दिल्ली.... प्रचंड मोठे शहर व शहराचे नाव सोडले तर मला काहीच माहीत नाही नव्हते की कुठे उतरावे कुठे जावे व काय करावे ? शर्माजींनी जो पत्ता दिला होता तो मी जवळ जवळ पाठ करुन ठेवला होता, सकाळी सकाळी दिल्ली रेल्वे स्टेशन ला मी जेव्हा उतरलो तेव्हा मात्र मनाची धाक धूक वाढलीच होती मी एकटा ज्याच्या भरोश्यावर येथे आलो आहे त्याला कधी जिवनामध्ये देखील पाहीले नव्हते त्याला काय सांगायचे व कसे करायचे ह्याचाच विचार करत मी रेल्वे स्टेशन च्या बाहेर आलो व एका माणसाला विचार ले "भाई यह रोहीणी कहा है ? " तो मला म्हणाला " रिक्षावाले से पुछ" मी तडक एक रिक्षावाला पकडला व विचारले " भाई साब, यह रोहीणी कितनी दुर है ? " तो म्हणाला " अरे पास ही है, बोला कहां छोड दु" कोल्हापूर नंतर रिक्षात बसण्याचा हा माझा पहिला योग मी म्हणालो चल जवळच आहे म्हणतो आहे त जास्तीत जास्त ३०-४० रु घेईल व जाऊन रिक्षात बसलो, २ तासानंतर रिक्षा त्यांने एका रस्ताच्या बाजूला उभी करुन तो म्हणाला " हां भाई रोहीणी तो आगयी अब बता किस गली मकान मैं जाना है ? " मी त्याला थोडी फार माहीती दिल्यावर त्यांने त्या घरासमोर मला उभे केले व म्हणाला " हा भाई उतरो अब ३५०.०० रु. दो" मला चक्कर च आली व थोडे बहोत त्याच्याशी भांडलो देखील व आसपासच्या लोकांना बोलवून मी थोडा फार दंगा देखील केला तेव्हा मात्र तो रिक्षावाला नरमला व २५०.०० रु. वर तडजोड करुन निघून गेला., पण मला हा २५०.०० रु. फटका खुप मोठा पडला होता. मी घराची बेल जावली तर थोड्या वेळाने एक मुलाने दरवाजा उघडला व त्याच्या पाठोपाठ त्यांचे वडीले देखील बाहेर आले, मी त्यांना नमस्कार केला व विचारले की " पं. हरीकृष्णजी से मिलना था क्या वह घर पे है ? " ती व्यक्ती मला म्हणाली " भाई, यहा तो हरीकृष्णजी तो अब नही रहते कुछ साल पहले ही वह अपना यह मकान मुझे बेचकर कही मैहरोली रोड पे रहने चले गये है" माझ्या पायाखालची जमीनच खसकली व मी त्यांना पुन्हा विचारले " भाईसाब, क्या आप के पास उन्ह का पुरा पत्ता या फोन नंबर है, मेरा उन्हसे मिलना बहोत जरुरी है " पण हाय देवा ह्याच्या कडे त्यांच्या बद्दल काहीच माहीती नव्हती पण एक मात्र गोष्ट त्यांने माझ्या कामाची सांगितली की ते सकाळ सकाळी मैहरोली रोड वरील कत्यानी मंदिरामध्ये जरुर येतात, मी त्यांचे आभार मानून मैहरोली जाण्यासाठी बसची वाट पाहू लागलो, थोड्यावेळाने कळाले की येथून प्रथम नेहरु प्लेस किंवा करोलबाग ला जावे लागेल व तेथून मैहरोली ला बस मिळेल. मी तडक करोलबाग बस मध्ये बसून मैहरोलीच्या रस्तावर आलो.

क्रमश:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: