रविवार, ३१ जानेवारी, २०१०

२३ वर्षात काय केले ?

एक सुरेख असा ब्लॊग वाचण्यात आला ज्योती बसूच्यावर बंगाल वर.
संयम श्रीवास्तव नावाच्या लेखकाने इंडिया टाईम्स ब्लॊग वर लिहला आहे.

नावाप्रमाणेच लेखणीचा संयम राखत एक अत्यंत चांगला लेख लिहला आहे ज्यामध्ये ज्योती बसू व कम्युनिस्ट पार्टी २३ वर्ष बंगाल वर राज्य करत होते त्या २३ वर्षात बंगालचा काय हाल झाला व ह्याला जबाबदार कोण ? लेख वाचल्यावर समजून चुकते की काय अवस्था असेल. लेखकाने जे आकडे वापरले आहेत गरिबे रेखेखालचे जिल्हा व इतर ते शक्यतो सरकारी आकडे असावेत व सत्य परिस्थीत अजून वेगळी असावी.

त्या लेखातील काही भाग.

" 23 साल का समय कुछ कम नहीं होता, इतने समय में तो एक देश या राज्य की पूरी तस्वीर बदली जा सकती है। बिहार में नीतिश कुमार ने तो एक टर्म भी पूरा नहीं किया, लेकिन तमाम विपरीत परिस्थितियों के बावजूद राज्य की तस्वीर बदलने में काफी हद तक कामयाब हो रहे हैं। हाल ही में एक सर्वे में यह बात सामने आई कि 2009 में मंदी के बावजूद बिहार की ग्रोथ 11 प्रतिशत से ऊपर रही। क्या कुछ ऐसा कर सके ज्योति बसु अपने राज्य में? तो इसका उत्तर होगा, नहीं। यह जानकर कि बंगाल के 18 जिलों में से 14 देश के सबसे गरीब जिलों में शुमार होते हैं और पुरुलिया में 79 प्रतिशत लोग गरीबी रेखा से नीचे हैं, कोई भी व्यक्ति आसानी से यह समझ सकता है कि वामपंथियों के नेतृत्व में इस राज्य का क्या हाल हो चुका है। "


त्या लेखाचा दुवा.

शनिवार, ३० जानेवारी, २०१०

माझी सफर... नोकरीपर्व ... भाग - ७

राहीलेल्या वेळात सर्व राहीलेली कामे संपवली व एक दिवस जाऊन जेवणाचे पैसे व मागील सर्व देणे चुकवले व तेथेच थोडावेळ दिनेश बरोबर इकडचे तिकडचे बोललो व पुन्हा खोलीवर परत आलो... संध्याकाळी असाच गच्चीवर बसलो असताना मनात विचार आला की अरे आपले येथे काम व्यवस्थीत चालू आहे जास्त नाही पण नफा व्यवस्थीत आहे ते जिदल साहेब पगार किती देणार काय देणार ह्या विषयी काहीच बोलले नाही मी काय करावे ? की चारीजी नी सांगितले आहे तर काही विचार करुनच सांगितले असेलच तेव्हा काय ह्याच्या वर विचार करावा... सोड का होईल ते होईल चल जिंदल कडेच काम करु ह्या विचारावर येऊन मी रात्री झोपी गेलो.

व दुस-या दिवशी जाऊन चारीजींना मी निर्णय सांगितला वर जिदल साहेबांना देखील फोन केला व काही दिवसामध्येच मी त्यांच्याकडे कामासाठी रुजू झालो पहिल्या दिवशीच विक्रम नावाच्या पंजाबी युवकांशी माझी ओळख करुन दिली व राहण्याची व्यवस्था त्याच्या बरोबरच केली गेली. चारीजींनी व्यवस्थीत बोलणी केली असतील ह्या विचाराने मी पगार तथा इतर काही गोष्टी न विचारताच काम चालू केले व कार्यालयातील अस्त-व्यस्त झालेले सर्व सिस्टम तथा प्रिंटरची साफसफाई करुन त्यांना कामा योग्य बनवले, न सांगताच मी काम करत होतो व माझ्या सर्व कामावर, हालचालीवर जिंदल साहबांचे व्यवस्थीत लक्ष होतेच.. मला नेहमी वाटे की त्यांना कसे कळत असे की मी कार्यालयात काय केले.... एके दिवशी त्यांनी आपल्या लहान मुला बरोबर [वयाने नाही पण त्यांना तर तो लहानच वाटायचा २२ वर्षाचा होता तो] अभीषेक शी ओळख करुन दिली व मी त्याच्या साठी एक महत्वाचाच व्यक्ती ठरलो त्याला संगणक हवा होता व कुठला ह्यावा ह्या पासुन कसा चालवावा ह्यांची माहीती तो माझ्याकडुन शिकू लागला व लवकरच त्याने व मी मिळून एक नवीन संगणक घरी आणला तेव्हा मात्र जिंदल साहबांनी मला आपल्या घरीच एक खोली दिली व राहण्याची व्यवस्था करुन दिली. मी त्यांच्या कधी कधी रात्री गप्पा मारत बसायचो, त्यांना निद्रानाशाचा विकार होता व मला रात्री १-२ पर्यंत जागण्याची सवय.
कधी आपल्या बद्दल तर कधी आपल्या तीन लहान भावांशी विषयी सांगत... त्यांनी सांगितलेल्या काही कष्टांचा मी विचार करत असे की हा माणूस स्वत:साठी जगला किती वेळ असे ? वयाच्या २० व्या वर्षा पासून एक पिठाची गिरणी ते ३००-४०० करोड रुपयांची ही कंपनी.. ह्याला खरोखर वेळ मीळाला असे का जिवनामध्ये स्वत:साठी. बाकीचे घरातील सर्वजण त्यांच्या शब्दाच्या आत.. कधी त्यांचा आदेश अथवा गोष्ट कोणी टाळलेली अथवा मोडलेली मला दिसलीच नाही एकदम प्रभावी व्यक्ती. समोरच्याला बोलण्यातूनच आपलंस करुन घेण्याचे खास तत्व त्यांना माहीत होते व त्यांचाचे ते नेहमी वापर करत बोलता बोलत ते माझ्या कडुन कार्ययातील घडामोडी विषयी विचारुन घेत व इतर कर्मचारी वर्ग काय करतो ह्या विषयी विचारत कधी नाव घेऊन अथवा कधी आड्नाव घेऊन.. मग मला लक्षात आले की आपण कार्यालयात काय करतो आहे हे त्यांना कसे कळत असे.

कंपनीमध्ये काम करताना मला चार महीने झाले होते व पगाराचे नाव काही कोणी घेत नव्हते तेव्हा मात्र माझी चलबिचल झाली व मी माझ्या स्वभावाला अनूसरुन सरळ जिंदल साहेबांच्या कडे पोहचलो व त्यांना एकदम प्रेमाने हसतच मी विचारले " बाबूजी, मुझे आज चार महिने हो गये है आप के पास काम करते हुवे, चारीजींने आपसे क्या बात कि है मुझे पता नही पर मुझे आप बता दे की मेरी तनख्वा कब मिलेगी तथा कितनी मिलेगी... क्यूं की मेरे भी कुछ खर्चे है.." त्यांनी जरा ही विचार न करता खिश्यात हात घातला व ५०००.०० रु काढून मला दिले व म्हणाले " इससे काम चलाना आगे देखता हूं क्य तनख्वा देनी है" मला जरा विचित्रच वाटले पण मी काही कुरकुर न करता पैसे घेतले व खोलीत निघून गेलो.

मला येथे काम करता करता चार महीने झाले होतेच त्यामुळे बाकी कर्मचारी वर्गा बरोबर देखील माझी ओळख व्यवस्थीत झाली होती त्यामध्ये तर काही जण खास बंदे होतेच. एक जिवन सिंग ह्या जिदल साहबांचा ड्रायवर.. राजस्थानी ६ फुट उंच एकदम खडा आवाज... माझी त्याची चांगलीच मैत्री जमली होती... हा जिवन सिंग वयाने कमीत कमी ५५ वर्षाचा असावा पण मला तो कधीच आहो-जाहो बोलवू देत नसे मला म्हणत असे " राज, देखो उम्र कुछ नही होती है..... जब हम दोस्त बन सकते है तो काहे काका-मामा या भाई बने ? तुम मुझे अपने दोस्त के तर ही बुलाया करो... देखो कंपनी मै सारे मुझे जिवन सिंग जी कहते है.. तुम्ही भी मुझे जिवन कहा करो" मला ह्या माणसाचा जिंदादिल पणा खुप आवडायचा गेली २२ वर्षे तो तेथे काम करत होता... जेव्हा आला तेव्हा डोक्यावरचे केस काळे होते आता ह्य भरगच्च मिश्या व डोक्यावरची केसे दोन्ही पांढरी पडलेली पण अवखळपणा, मन मात्र एकदम तरुण. खरं जिवनाचा प्रत्येक क्षण आनंदात कसा जगावा हे मला त्याच्याकडुन कळाले व मी त्याला गुरु मानले तो देखील गर्वांना सर्वांना सागायचा " देखो... यह राज भी मुझे गुरु मानता है.... नही तो तुम लोग कभी मेरी कदर ही नही की " व जोर जोरात हसत असे. अजून एक माणूस जोडी... पवन व शर्माची. काय झकास जोडी होती एकाला झाकावा व दुस-यला उघडावा तर दोन्हीतला फरक एकदम स्पष्ट दिसे... पवन सर एकदम बारीक, कामसू... हसणे कधी कधीच... तर शर्माजी गोलगच्च नाही पण भरलेले शरीर व कंपनी मध्ये हसणे हा त्यांचा हक्क असावा ह्या पध्दतीने टेबलावर हात मारून मारुन हसत असत ते देखील सात मंजिली.... काम... अरे राज काम को मार गोली... तुम्हे पता है... आज क्या हुंआ ? अशी त्यांची गाडी चालू होत असे व संपुर्ण दिल्ली फिरुन पुन्हा आपल्या जिदल साहबांच्यावर रोज एकवाक्य ठरलेलेच " राज, पिछले ९ साल हो गए मुझे - पवन को यहा काम करते करते... जिंदल साहब ने एक भी लडकी कभी काम पे नही रखी... तम जरा पुछना उन्हे क्या दिक्कत है... यार हमारा भी दिल करता है... बाते करने के लिए... हसी मजाक करने के लिए... लेकिन यह बुढा.... खुद कुछ करता नही हमे करने देता नही" व पुन्हा जोर जोरात हसे व मी लगेच त्यांना म्हणायचो " शर्माजी, बुढे तो आप भी हो" लगेच शर्माजी " अबे जा, बुढा तेरा बाप, मै तुझे बुढा नजर आता हूं ? ४९ का तो हूं .... अभी कम से कम ५१ साल तर रहूंगा यहा" आमचा हा दंगा रोज संध्याकाळी चालत असे व विक्रम, मी व नरेन वयाने त्यांच्या पेक्षा कितीतरी लहान असलेल्या सह-कर्मचा-याबरोबर ते दिलखुश होऊन गप्पा मारायचे.
आमचे एक सीए होते वर्मा जी त्यांच्या बद्दल तर शर्माजींनी टिप्पणी म्हणजे जाण्याची वेळ आली हे नक्की " अरे, तुम्हे पता है ? यह वर्मा सीए भी है तथा कंपनी मै डायरेक्टर भी.... लेकिन कसे बना ? ... साला ५ सालतक बाबू जी केलीए सुबह सुबह दुध ले के जाता था ... स्कुटर पे.... तब कही जा के सीए बना ...हरा**...." झाले इतके बोलले की आपली पिशवी उचलत व मला म्हणत निघायचे " देख अभी तु नया है.. तो ६ बजे तक काम कर... हम तो पुराने पुर्जे है... हमे ५ बजे जाने की इजाजत है.." व मला डॊळा मारुन निघून जात... ते गेले की पवनजी लगेच बोलायचे " साला बुढा....लडकी की बात हो तो अभी तो मै जवान हूं.... काम की बात होतो पुराना पुर्जा.... राज देखो बुढे को" व गालातल्या गालात हसत आपली पिशवी घेऊन पसार...

क्रमश:

चंद्र हा नभात....
कवीमंडळींपासून शास्त्रज्ञांपर्यंत आणि लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच प्रिय असलेला आकाशीचा चंद्र आज, शनिवारी माघ पौर्णिमेचा मुहूर्त साधून पृथ्वीच्या अधिक जवळ येणार आहे. नेहमीच्या तुलनेत १५ टक्के मोठा आकार आणि ३० टक्के अधिक तेज असे त्याचे आजचे राजस रुपडे असेल. सामान्यत: चंद्र पृथ्वीपासून ३ लाख ८४ हजार ८०० किमी अंतरावर फिरत असतो; आज तो पृथ्वीच्या अधिक निकट म्हणजे ३ लाख ५६ हजार ६३० किमीवर येऊन भ्रमंती करेल. त्यामुळे तो आकाराने मोठा व अधिक तेजस्वी दिसेल. विशेषत: रात्री आठ वाजता त्याचे रूप कमालीचे विलोभनीय असेल.


माहिती : महाराष्ट्र टाईम्स.
चित्र : फोटोबकेट

शुक्रवार, २९ जानेवारी, २०१०

ना पाक Vs आय पी एल

मागच्या आठवड्यात आय पी एल साठी खेळाडू खरेदी विक्री बाझार भरला होता व देश विदेशाचे खेळाडू आतुरतेने आपल्याला मिळणारा भाव / किंमत किती ह्याची वाट पाहत होते. अनेक विक्रमादित्यांबरोबर नवखे खेळाडू देखील स्वतःला विकण्यासाठी आतूर होते व त्यांना कुठली ना कुठली तरी कंपनी विकत घेत होती... अनेकांच्या चेहर्‍यावरुन आनंद ओसाडून वाहत होता...
पण एक ग्रुप मात्र अत्यंत अस्वस्थ दिसत होता पाकिस्तान च्या खेळाडूंचा ग्रुप. जवळ जवळ सर्व कंपन्यांच्या जागा भरल्या पण एक ही पाकी खेळाडू विकला गेला नव्हता... ! पाकिस्तानी संघातील ११ खेळाडू... पण एक ही विकला गेला नाही असे कसे झाले व का झाले ? ह्यामध्ये भारत सरकारचा हात आहे अशी बोंब पाकिस्तान त्याच क्षणापासून मारु लागला होताच.. पण परदेशी समिक्षकांना देखील हा धक्का पचला नाही असे त्यांच्या कमेंट वरुन वाटत आहे.. शाहिद आफ्रिदी, सोहिल तन्वीर सारखे महारथी असलेला संघ... पण एका ही खेळाडूला विकत कोणीच घेतले नाही... का ??

कारण ह्यामागे आहे शुध्द अर्थकारण !

येस.. पैसा बॉस.. !

आय पी एल मध्ये हजारो करोड रु. वाहतात.. कंपन्या करोडो रुं देऊन खेळाडू विकत घेते.. कश्यासाठी ? आपल्या फायद्या साठी. जर समजा मी एका कंपनीचा मालक आहे व मला लाख लाख रु देऊन शाहिद आफ्रिदी, सोहिल तन्वीर मिळणार असतील तर मी त्यांना घेईन का ? हो, पण ते पाकिस्तान सोडून इतर कुठला तरी देशाचे खेळाडू असते तर... थांबा थांबा येथे काही देशभक्तीचा उमाळा नाही आहे येथे पैसा आहे... पैश्याचा गेम आहे...

२६/११ नंतर आपल्या देशात पाकिस्तान विषयी जरा कटू भावना जास्तच वाढीला लागली आहे, त्यातच मागील दोन आठवड्यापुर्वी अमेरिकन सरकारचा एक रिपोर्ट पण प्रकाशीत झाला होता की जर भारतावर परत २६/११ सारखा हल्ला झाला तर युध्दाची शक्यता सर्वात जास्त असेल भारत-पाक युध्दाची शक्यता. पण आपण युध्द ही पायरी सोडू.. समजा हल्ला झालाच तर ? लगेच जनमत विरुध्द होईल व ज्या ज्या सामन्यामध्ये हे पाकिस्तानी खेळाडू असतील त्या त्या सामन्यावर एक तर बहिष्कार टाकला जाईल अथवा हुलडबाजी केली जाईल व त्यांच्या ( खेळाडूं च्या) सुरक्षेचा मोठा प्रश्न उभा राहील व त्याचा खर्च त्या त्या कंपनीला उचलावा लागेल ज्यांने त्यांना विकत घेतले आहे खेळण्यासाठी. हा सर्वात मोठा मुद्दा.

आयपीएल ही शुध्द व्यापार करण्यासाठी तयार करण्यात आली आहे हे सगळ्यांना माहीत आहे, व येथे सर्व आपल्या फायद्यासाठी पैसे गुंतवत आहेत जर फायदा होण्याचा चान्स कमी असेल तर कोण लंगड्या घोड्यावर कोण पैसा लावणार ? आजच्या घडीला पाकिस्तान क्रिकेट टिम किती ही चांगली असू दे पण त्यांचा देश पाकिस्तान खुप वाईट अवस्थेत आहे व त्यांच्या पंतप्रधानांचा देखील देशावर कंट्रोल नाही आहे जेथे आतंकवादी दररोज ब्लास्ट करत फिरत आहे व भारतावर हल्ला करण्याच्या रोज नवीन नवीन फतवे जारी होतात अश्या अवस्थेत पाकीस्तानी खेळाडूच्यावर पैसे लावणारा मुर्खच असेल म्हणून पाकिस्तानी खेळाडू आयपीएल मध्ये विकले गेले नाहीत. व सुरेक्षा कारणामुळेच दक्षिण आफ्रिकेने आपला दौरा रद्द केला , ह्याच कारणामुळे चॅम्पीयन ट्रोफी, वर्ल्ड कप च्या मॅचेस पाकिस्तान मधून बाहेर गेल्या...

पण वास्तवाकडे दुर्लक्ष करुन पाकिस्तानी खेळाडू व राजकर्ते ह्याला भारत विरुध्द पाकिस्तान असा रंग देत आहेत पण भारतीय सरकार ने सरळ शब्दात आयपीएल शी काही संबध नाही व ती व्यवसाईक संस्था आहे असे स्प्ष्ट केले.


रविवार, २४ जानेवारी, २०१०

मराठीचा अभिमान मराठीची शान ! मराठी महाजालावर... - मी मराठी
मराठी भाषेच्या सर्वांगीन विकासासाठी व वाचकांना खाद्य पुरवण्यासाठी आज पासून आम्ही आमचे नवीन संकेतस्थळ मी मराठी चालू करत आहोत.

तुमचे मी मराठी नेटवर्क मराठी लोकांच्यासाठी मराठीतून भावना / कला व्यक्त करण्यासाठी हे स्थळ निर्माण करण्यात आलं आहे.
स्थळावर मराठी मध्ये लेखन करा, आपले विचार, मत तुम्ही आम्हाला rj.jain@gmail.com पाठवू शकता.

आई भवानीच्या साक्षीने आहे आम्ही संकेतस्थळ चालू करत आहोत.

सर्व मराठी मित्रांचे येथे स्वागत आहे, आपण येथे या व आपल्या मनातील विचार येथे मराठीतून व्यक्त करा.सर्वांच्या सुचनांचे स्वागत आहे..


१. चुकीचे टाचण द्या - सुविधा.

ह्या सुविधेचा वापरत सर्व सदस्य करु शकतात.
ह्याचा वापर एखादा लेख / प्रतिसाद नियमबाह्य असेल तर काढू टाकण्यासाठी केला जातो.
२० पेक्षा जास्त सदस्यांनी जर चुकीचे टाचण दिले तर तो लेख / प्रतिसाद आपोआप काढून टाकला जातो.
२ पेक्षा जास्त सदस्यांनी जर चुकीचे असे टाचण दिले असेल तर व्यवस्थापकाकडे तो लेख / प्रतिसाद तपासणीसाठी येतो.
ह्या सुविधे मुळे व्यवस्थापनावरील त्रास कमी होईल व संकेतस्थळावरील वातावरण मुक्त राहील अशी आशा.


२. आजच्या बातम्या

ह्या दुव्यावर तुम्हाला मराठी मधील ठरावी वर्तमानपत्रांच्या महत्वाच्या बातम्या ह्याच संकेतस्थळावर वाचता येतील, अशी सुविधा आहे. ह्यामध्ये अजून काही वर्तमानपत्रांची भर घालण्याचे काम चालू आहे.


३. उघड झाप करणारा मार्गदर्शक व डाव्या बाजूचे ब्लॉक्स.


ह्याचा वापर सदस्य आपल्या सोयीनूसार शकतात.
तुम्ही एकदा केलेली ब्लॉक्स सेटिंग तशीच राहते ( कुकीज डिलिट करत नाही तो पर्यंत)
ह्याचा फायदा संकेतस्थळ वेगाने उघडणे व अनावश्यक माहीती / ब्लॉक्स न दिसणे ह्यासाठी होऊ शकतो.


४. उजव्या बाजूच्या वरच्या कोपर्‍यातील पानं

हे एक उपयोगी असे साधन आहे ज्याचा वापर महत्वाची माहीती / सण / बातमी प्रथम पानावर दाखवण्यासाठी केला जाऊ शकतो.


५. फेसबुक वर मी मराठी

आता तुम्ही सरळ फेसबुक वर मी मराठी वर आलेले लेख वाचू शकता व तेथून मी मराठीवर परस्पर येऊ शकता.
लेख आल्यानंतर काही क्षणामध्येच फेसबुक वर अपडेट होतो.

येथे बघा

६. तुम्ही काय करताय ???

हि सुविधा म्हणजे एक प्रकारचा मायक्रो ब्लॉगिंग आहे, ह्याचा उपयोग तुम्ही तुम्हाला सार्वजनिक आपला संदेश देण्यासाठी करता येतो तसेच हलक्या फुलक्या गप्पासांठी देखील त्याचा वापर होऊ शकतो.
आपला मित्र,

राज जैन
http://www.mimarathi.net

******

गुरुवार, ७ जानेवारी, २०१०

तुझ्या बद्दल सांगु काय मी

तुझ्या बद्दल सांगु काय मी
शब्दांना गुंतवु कसा मी
रात्रीच्या आठवणी नंतर
सकाळच्या सोनेरी उन्हामध्ये
उमलते एखादे फुल.
टपोर्‍या डोळ्यावरील पुसत दव बिंदू
हास्य रंगाचे चेहर्‍यावर घेऊन
सुगंधाची करत बरसात
उमलते एखादे फुल.
नाजुक पाकळी ओठांची
किंचित विलग
आश्वासक शब्दांचा दिलासा देत
तुझ्या बद्दल सांगु काय मी
शब्दांना गुंतवु कसा मी

सोमवार, ४ जानेवारी, २०१०

अशीच एक काळरात्र...

२९/१२/२००९, वेळ रात्रीचे ११. ३०मराठी महाजाल व वर्तमान स्थिती ह्या अश्या महत्त्वाचा विचारास बाजूला करून आम्ही शेयर मार्केट सारख्या दुय्यम गोष्टीवर चर्चा करत करत जेवण करत होतो, जेवण होऊ पर्यंत १ वाजलाच होता. माझ्या ही घरी वाट पाहणारे कोणी नव्हते व मित्राच्या घरी देखील वहिनी घरी गेल्यामुळे प्रेशर नव्हते. बैठक अमर्यादित काळासाठी तहकूब करून आम्ही आमचे आमचे वाहन बाहेर काढले.
नदीपात्राजवळील रास्तावरून आम्ही महादेव मंदिर चौकाकडे जात होतो, तोच मित्राला अजून एक महत्त्वाचा मुद्दा आठवला म्हणून बाइक बाजूला घेऊन आम्ही परत बोलत उभे राहिलो, पाच एक मिनिटाची खडी चर्चा झाल्यावर पुन्हा आम्ही प्रस्थान केले.

३०/१२/२००९ वेळ रात्रीचे १. ३०

आमच्या वाहनांचे स्पीड असावे २०-२५ किमी कारण आम्ही हॅल्मेट घातल्यामुळे कानावर चर्चा कमी पडत होती, त्यासाठी आम्ही हळू हळू चालवत होतो. मेहंदळे गॅरेज रोडवरून आम्ही महादेव चौकाकडे आलो तेव्हा मित्राच्या बाजूला एक खड्डा आला त्यामुळे त्याने गाडी थोडी स्लो करून माझ्या मागे लावली, तो पर्यंत मी रोड चौक क्रॉस करू लागलो होतो...... बस्स्स!!!!!

मेहंदळे गॅरेज रोडवरून आम्ही महादेव चौकाकडे आलो तेव्हा मित्राच्या बाजूला एक खड्डा आला त्यामुळे त्याने गाडी थोडी स्लो करून माझ्या मागे लावली, तो पर्यंत मी रोड चौक क्रॉस करू लागलो होतो...... मी अर्ध्यापेक्षा जास्त अंतर चौकाचे पार केले होते मागून प्रसन्नदा नी आवाज दिला " राज्या थांब. " पण हॅल्मेट मुळे अथवा नशिबामुळे समजा मला तो आवाज कानावर आलाच नाही व जर आला जरी असता तरी मी काही करू शकलोच नसतो. एक भरधाव वेगाने काळ्या रंगाची जीप अत्यंत वेगाने नळ स्टॉप वरून म्हात्रे पुलाकडे जात होता व मधोमध येवढ्या मोठ्या यामाहा बाइकवर असलेला मी त्या जीपवाल्याला शक्यतो दिसलोच नाही. प्रचंड वेगाने त्याने उजव्या बाजूने माझ्या बाइकच्या मधोमध टक्कर मारली व मी हवेत सात-ते-आठ फूट उंच उडालो. जीप माझ्या खालून निघून गेली मी व मी जीपच्या टपावरून खाली रस्त्यावर पडलो. डोक्यावर असलेले हॅल्मेट तेव्हाच कुठे तरी आदळा आपटी मध्ये डोक्यावरून दूर जाऊन पडले. माझी बाइक गोलगोल फिरत डिव्हाडरला टक्कर मारून जवळ जवळ ३०-४० फूट लांब जाऊन पडली. प्रसन्नदा आपली बाइक आहे त्या अवस्थेत सोडून पळत माझ्याकडे आले व हे सर्व नाट्य एवढ्या वेगाने घडले की प्रसन्नदाला जीपचा नंबर नोट करून घेताच आला नाही. व माझी अवस्था पाहून प्रसन्नदा प्रचंड टेन्शन मध्ये आलेच होते.

मला इकडे सर्व काही सुन्न. काहीच संवेदना नाहीत किती वेळ माहीत नाही, पण मी सर्व पाहत होतो डोळे टंकाटंक उघडे होते.
मी रस्त्यावर डाव्याबाजूला कलंडलेल्या अवस्थेत.
कोणी तरी उठवून बसवत होते.
दहा-बारा अनोळखी चेहरे पळत येताना अंधुकसे दिसत होते समोर.
तोच एक प्रश्न कानावर आला.. " राज्या, ठीक आहेस.? "
मी काहीच उत्तर न देता समोरील व्यक्तीकडे बघत होतो.
पुन्हा प्रश्न.. " राज्या मी कोण आहे? मला ओळखतोस का? "
मग मी उत्तर दिले.. "हो, ओळखतो. प्रसन्नदा, प्रसन्न केसकर माझे मित्र. "
पुन्हा प्रश्न.. " कुठे लागले आहे? "
मी माझ्या उजव्या पायाकडे हात दाखवत म्हणालो.. " पूर्णं तुटला आहे. सांभाळून उचला. "
पुन्हा प्रश्न.. " अजून कुठे दुखत आहे "


मी थोडा थोडा सावरलो होतो पण अजून जखम इत्यादी काही समजत नव्हते, पण पाय तुटल्यामुळे ठणकत होता ते कळत होते. जवळच असलेली पोलिस गाडी व व्हॅन जेथे अपघात झाला होता तेथे काही क्षणामध्येच पोहचल्या. रास्तावर थोडे थोडे रक्त पडलेले दिसत होते पण शरीरावर जखम दिसत नव्हती तेव्हा अचानक प्रसन्नदाचे लक्ष माझ्या डाव्या कानाकडे गेले तेथून रक्त येत होते, प्रसन्नदा प्रचंड कासावीस झाले त्यांनी पुन्हा पुन्हा माझे कान तपासून पाहिले तोच मागून कोणी तरी म्हणाले "अहो, डोक्याला जखम आहे. घाबरू नका. " माझा हात मागे गेला तर मी पाहिले तर माझ्या डाव्या बाजूला डोक्यावर मोठी जखम झाली होती, पोलिसांनी जास्त वेळ न घेता मला सरळ उचलला व आपल्या जीपमध्ये मागील बाजूस घातले तेवढ्यात ही मी त्यांना.. " सर माझा उजवा पाय तुटला आहे पूर्णं लटकत आहे मधून, तो जरा जपून, माझी बाइक, हॆल्मेट, एक माझा बूट समोर पडलेले मला दिसत आहेत" ते हवालदार साहेब लगेच म्हणाले " अरे कुणीतरी ह्याची गाडी चौकीकडे घ्या व ह्याचे सामान देखील. " हवालदाराने दरवाजा बंद करून घेतला, पोलिस गाडीच्या मागून प्रसन्नदा आपली बाइक घेऊन येऊ लागले. तो पर्यंत पोलिसांनी मला नॊर्मल प्रश्न विचारत माझ्या जखमांकडे माझे दुर्लक्ष व्हावे म्हणून प्रयत्न चालू केले होते.

३०/१२/२००९ वेळ रात्रीचे १. ५०

पाच-दहा मिनिटामध्ये आमची गाडी सरळ आत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये पोहचली. गाडीतून मला स्ट्रेचर वर इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेले गेले प्रसन्नदा लगेच माझा केस पेपर इत्यादी तयारी करण्यासाठी निघून गेले. स्ट्रेचरवर मला दोन-तीन डॉक्टर एक-दोन वॉर्डबॉय घेरून घेऊन चालले होते, डॉक्टर पटापट अवस्था / दुखणे ह्याची नोंद करू लागले, एका वार्डबॉय ने करा करा कात्रीने माझी अत्यंत आवडती ली कॉपरची जीन्स उजव्या बाजूने कापून काढली, तोच दुसऱ्या वॉर्डबॉय ने वस्तरा घेऊन माझ्या डोक्यावर जेथे जखम झाली होती तेथील चार-पाच इंचाचे मैदान साफ केले. एकाने माझ्या डाव्या हाताची एक नस पकडून एक प्लॅस्टिकची थ्री-वे सुई घुसवली व त्याचे फटाफट बँडेज करून एक-दोन पेनकिलर इंजेक्शन व सलाईन लावण्यात आले. तो पर्यंत डॉक्टरांनी माझ्या उजव्या पायाला सपोर्ट लावून बँडेज बांधून काढले व तत्काळ मला एक्स-रे रूम मध्ये वळवण्यात आले. एवढे सगळे होत असताना देखील मी टकटक सगळ्यांच्याकडे पाहत होतो. तो पर्यंत एका डॉक्टर ने झायलोकीन टचाटचा माझ्या डोक्यात टोचून जेथे जखम झाली होती तेथे पाच टाके घातले. तो पर्यंत प्रसन्नदा माझे ऍडमिशन करून केसपेपर घेऊन आले व रूम मोकळी नसल्याने मला सरळ सी विंगच्या पाचव्या मजल्यावर पोहचवले, बेड नंबर १३.
दिलेल्या औषधामुळे मला झोप येऊ लागली होती व हे सर्व होऊ पर्यंत सकाळचे पाच-साडे पाच वाजले होते. प्रसन्नदा नि मी घरी जाऊन कपडे बदलून येतो, काळजी करू नकोस मी आहे. सर्वांना सांगतो असा सल्ला देऊन निघून गेले. दुखणे वाढत होते पण औषधामुळे झोप येत होती. कळत नकळत कधी झोप लागली कळलेच नाही. सकाळी डॉक्टर देशमुख आले व त्यांनी तपासणी केली व काही औषधे व इंजेक्शन देणेच्या रतीब चालू केला. मित्रांच्यामध्ये बातमी तो पर्यंत पोहचली होती, फोन वाजला तेव्हा मला एकदम नवलच वाटले एवढे सगळे झाले हा कसा काय वाचला, डाव्या खिश्यातून बाहेर काढल्यावर तर चाट पडलो, जसा होता तसाच एकही स्क्रॅच देखील नाही, मी आनंदलो व ज्या ज्या मित्रांचे फोन येत गेले त्यांना उत्तर देत गेलो, जवळ जवळ मित्रांच्यामध्ये सर्वांना समजले होतेच. देश परदेशातून जेथे जेथे बातमी पोहचली तेथून फोन येऊन गेले. जेथे पोहचवणे गरजेचे होते तेथे हलकीच थाप मारली पोट दुखत आहे म्हणून ऍडमिट आहे काळजी नको. उगाच त्यांची पळापळ नको व आता जो त्रास होणार होता / होत आहे तो झाला आहे आता सांगून काय फायदा असा विचार केला व हळूहळू ठीक झाल्यावर व्यवस्थित सांगू हा निर्णय घेतला. पण दुपार पर्यंत ऑपरेशन व इत्यादी गोष्टी कळल्यावर कुणालातरी बोलवून घेणे गरजेचे झाले म्हणून घरी आईला अजून थोडी थाप मारली की थोडे पायाला देखील लागले आहे व कुणाला तरी पाठव, बंडूला पाठव त्याला पुणे माहीत आहे माझ्या बरोबर आला होता माझ्या मित्रांना देखील ओळखतो.

सकाळपासून औषधाचा / इंजेक्शनचा ढोस चालू होता तो दुपार पर्यंत वाढला व मला सांगण्यात आले की रात्री तुमचे ऑपरेशन होईल ८ वाजता चालू. तुम्ही तयार राहा काही काही खाऊ नका पिऊ नका. बरोबर संध्याकाळी ७. ३० मला ऑपरेशन थेटर मध्ये घेऊन जाण्यात आले व कंबरे खालील भूल देण्यात आली. ऑपरेशन टेबल वर मी एकदम येशू ख्रिस्त स्टाइल मध्ये पडलो होतो, डाव्या हातात सलाईन / इंजेक्शन व उजव्या हातामध्ये रक्तदाब व इत्यादी यंत्रे. छाती वर कुठल्याश्या मॉनिटर मधून बाहेर काढलेली -१० रंग बेरंगी वायरी ज्या माझ्या शरीराला जोडलेल्या होत्या. कंबरेखालील भाग सुन्न होता पण मी शुद्धीत होतो, डॉक्टर लोक माझ्या पायाशी जी कुस्ती खेळत होते ते मला समजत होते, ठोकाठोकी, तोडातोडी, ड्रिलिंग, कापाकापी, मी सगळ्याची मजा घेत होतो. पेन किलर दिल्यामुळे जास्त त्रास होत नव्हता पण त्यामुळे हलकी हलकी गुंगी येत होती. ३-४ तासाने ऑपरेशन संपले व मला रेस्ट रूम मध्ये पोहचवला गेला. नंतर कळले की पायावर १३ टाके घातले गेले, एक मस्त पैकी स्टीलचा रॉड घातला गेला आहे व महिन्याभराची कमीत कमी सक्तीची विश्रांती घेणे आवश्यक आहे.

०४/०१/२०१० वेळ दुपारचे १. ३०


आता मी व्यवस्थित आहे आजच पायाचे ड्रेसिंग चेंज झाले, आजच थोडे चाललो आधार घेऊन. प्रगती उत्तम आहे लवकरच पूर्णं बरा होईन हि अपेक्षा. जीवावर बेतलेला अपघात फक्त हॅल्मेटमुळे पायावर निभावला. नाही तर येवढ्या मोठ्या अपघातातून मी वाचलो कसा हा प्रश्न जर कोणी मला विचारले तर मी वर बोट करेन. पुण्यात असलेल्या मित्रांनी प्रचंड मदत केली प्रसन्नदा, मोडक ह्यांनी तर अक्षरशः रात्री जागवल्या माझ्यासाठी, बिपीन कार्यकर्ते, परिकथेतील राजकुमार, धमाल मुलगा व कुटुंब, पुण्याचे पेशवे, छोटा डॉन, टिंग्या, डॉ. दाढे ह्यांनी भेटून तर निखिल देशपांडे, मस्त कलंदर, मनिष, सुहास, व इतर अनेक मित्र मैत्रिणींनी फोनवरून मला मानसिक आधार दिला त्यांचे आभार कसे व्यक्त करावेत तेच कळत नाही आहे. देवाचे अनेकानेक आभार आहेत की त्यांने मला हे सुंदर जग पाहण्यासाठी व ह्याचा परिपुर्ण आनंद घेण्यासाठी अजून एक मोका दिला... थॅक्स गॉड !