शुक्रवार, २९ जानेवारी, २०१०

ना पाक Vs आय पी एल

मागच्या आठवड्यात आय पी एल साठी खेळाडू खरेदी विक्री बाझार भरला होता व देश विदेशाचे खेळाडू आतुरतेने आपल्याला मिळणारा भाव / किंमत किती ह्याची वाट पाहत होते. अनेक विक्रमादित्यांबरोबर नवखे खेळाडू देखील स्वतःला विकण्यासाठी आतूर होते व त्यांना कुठली ना कुठली तरी कंपनी विकत घेत होती... अनेकांच्या चेहर्‍यावरुन आनंद ओसाडून वाहत होता...
पण एक ग्रुप मात्र अत्यंत अस्वस्थ दिसत होता पाकिस्तान च्या खेळाडूंचा ग्रुप. जवळ जवळ सर्व कंपन्यांच्या जागा भरल्या पण एक ही पाकी खेळाडू विकला गेला नव्हता... ! पाकिस्तानी संघातील ११ खेळाडू... पण एक ही विकला गेला नाही असे कसे झाले व का झाले ? ह्यामध्ये भारत सरकारचा हात आहे अशी बोंब पाकिस्तान त्याच क्षणापासून मारु लागला होताच.. पण परदेशी समिक्षकांना देखील हा धक्का पचला नाही असे त्यांच्या कमेंट वरुन वाटत आहे.. शाहिद आफ्रिदी, सोहिल तन्वीर सारखे महारथी असलेला संघ... पण एका ही खेळाडूला विकत कोणीच घेतले नाही... का ??

कारण ह्यामागे आहे शुध्द अर्थकारण !

येस.. पैसा बॉस.. !

आय पी एल मध्ये हजारो करोड रु. वाहतात.. कंपन्या करोडो रुं देऊन खेळाडू विकत घेते.. कश्यासाठी ? आपल्या फायद्या साठी. जर समजा मी एका कंपनीचा मालक आहे व मला लाख लाख रु देऊन शाहिद आफ्रिदी, सोहिल तन्वीर मिळणार असतील तर मी त्यांना घेईन का ? हो, पण ते पाकिस्तान सोडून इतर कुठला तरी देशाचे खेळाडू असते तर... थांबा थांबा येथे काही देशभक्तीचा उमाळा नाही आहे येथे पैसा आहे... पैश्याचा गेम आहे...

२६/११ नंतर आपल्या देशात पाकिस्तान विषयी जरा कटू भावना जास्तच वाढीला लागली आहे, त्यातच मागील दोन आठवड्यापुर्वी अमेरिकन सरकारचा एक रिपोर्ट पण प्रकाशीत झाला होता की जर भारतावर परत २६/११ सारखा हल्ला झाला तर युध्दाची शक्यता सर्वात जास्त असेल भारत-पाक युध्दाची शक्यता. पण आपण युध्द ही पायरी सोडू.. समजा हल्ला झालाच तर ? लगेच जनमत विरुध्द होईल व ज्या ज्या सामन्यामध्ये हे पाकिस्तानी खेळाडू असतील त्या त्या सामन्यावर एक तर बहिष्कार टाकला जाईल अथवा हुलडबाजी केली जाईल व त्यांच्या ( खेळाडूं च्या) सुरक्षेचा मोठा प्रश्न उभा राहील व त्याचा खर्च त्या त्या कंपनीला उचलावा लागेल ज्यांने त्यांना विकत घेतले आहे खेळण्यासाठी. हा सर्वात मोठा मुद्दा.

आयपीएल ही शुध्द व्यापार करण्यासाठी तयार करण्यात आली आहे हे सगळ्यांना माहीत आहे, व येथे सर्व आपल्या फायद्यासाठी पैसे गुंतवत आहेत जर फायदा होण्याचा चान्स कमी असेल तर कोण लंगड्या घोड्यावर कोण पैसा लावणार ? आजच्या घडीला पाकिस्तान क्रिकेट टिम किती ही चांगली असू दे पण त्यांचा देश पाकिस्तान खुप वाईट अवस्थेत आहे व त्यांच्या पंतप्रधानांचा देखील देशावर कंट्रोल नाही आहे जेथे आतंकवादी दररोज ब्लास्ट करत फिरत आहे व भारतावर हल्ला करण्याच्या रोज नवीन नवीन फतवे जारी होतात अश्या अवस्थेत पाकीस्तानी खेळाडूच्यावर पैसे लावणारा मुर्खच असेल म्हणून पाकिस्तानी खेळाडू आयपीएल मध्ये विकले गेले नाहीत. व सुरेक्षा कारणामुळेच दक्षिण आफ्रिकेने आपला दौरा रद्द केला , ह्याच कारणामुळे चॅम्पीयन ट्रोफी, वर्ल्ड कप च्या मॅचेस पाकिस्तान मधून बाहेर गेल्या...

पण वास्तवाकडे दुर्लक्ष करुन पाकिस्तानी खेळाडू व राजकर्ते ह्याला भारत विरुध्द पाकिस्तान असा रंग देत आहेत पण भारतीय सरकार ने सरळ शब्दात आयपीएल शी काही संबध नाही व ती व्यवसाईक संस्था आहे असे स्प्ष्ट केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: