शनिवार, ३० जानेवारी, २०१०

माझी सफर... नोकरीपर्व ... भाग - ७

राहीलेल्या वेळात सर्व राहीलेली कामे संपवली व एक दिवस जाऊन जेवणाचे पैसे व मागील सर्व देणे चुकवले व तेथेच थोडावेळ दिनेश बरोबर इकडचे तिकडचे बोललो व पुन्हा खोलीवर परत आलो... संध्याकाळी असाच गच्चीवर बसलो असताना मनात विचार आला की अरे आपले येथे काम व्यवस्थीत चालू आहे जास्त नाही पण नफा व्यवस्थीत आहे ते जिदल साहेब पगार किती देणार काय देणार ह्या विषयी काहीच बोलले नाही मी काय करावे ? की चारीजी नी सांगितले आहे तर काही विचार करुनच सांगितले असेलच तेव्हा काय ह्याच्या वर विचार करावा... सोड का होईल ते होईल चल जिंदल कडेच काम करु ह्या विचारावर येऊन मी रात्री झोपी गेलो.

व दुस-या दिवशी जाऊन चारीजींना मी निर्णय सांगितला वर जिदल साहेबांना देखील फोन केला व काही दिवसामध्येच मी त्यांच्याकडे कामासाठी रुजू झालो पहिल्या दिवशीच विक्रम नावाच्या पंजाबी युवकांशी माझी ओळख करुन दिली व राहण्याची व्यवस्था त्याच्या बरोबरच केली गेली. चारीजींनी व्यवस्थीत बोलणी केली असतील ह्या विचाराने मी पगार तथा इतर काही गोष्टी न विचारताच काम चालू केले व कार्यालयातील अस्त-व्यस्त झालेले सर्व सिस्टम तथा प्रिंटरची साफसफाई करुन त्यांना कामा योग्य बनवले, न सांगताच मी काम करत होतो व माझ्या सर्व कामावर, हालचालीवर जिंदल साहबांचे व्यवस्थीत लक्ष होतेच.. मला नेहमी वाटे की त्यांना कसे कळत असे की मी कार्यालयात काय केले.... एके दिवशी त्यांनी आपल्या लहान मुला बरोबर [वयाने नाही पण त्यांना तर तो लहानच वाटायचा २२ वर्षाचा होता तो] अभीषेक शी ओळख करुन दिली व मी त्याच्या साठी एक महत्वाचाच व्यक्ती ठरलो त्याला संगणक हवा होता व कुठला ह्यावा ह्या पासुन कसा चालवावा ह्यांची माहीती तो माझ्याकडुन शिकू लागला व लवकरच त्याने व मी मिळून एक नवीन संगणक घरी आणला तेव्हा मात्र जिंदल साहबांनी मला आपल्या घरीच एक खोली दिली व राहण्याची व्यवस्था करुन दिली. मी त्यांच्या कधी कधी रात्री गप्पा मारत बसायचो, त्यांना निद्रानाशाचा विकार होता व मला रात्री १-२ पर्यंत जागण्याची सवय.
कधी आपल्या बद्दल तर कधी आपल्या तीन लहान भावांशी विषयी सांगत... त्यांनी सांगितलेल्या काही कष्टांचा मी विचार करत असे की हा माणूस स्वत:साठी जगला किती वेळ असे ? वयाच्या २० व्या वर्षा पासून एक पिठाची गिरणी ते ३००-४०० करोड रुपयांची ही कंपनी.. ह्याला खरोखर वेळ मीळाला असे का जिवनामध्ये स्वत:साठी. बाकीचे घरातील सर्वजण त्यांच्या शब्दाच्या आत.. कधी त्यांचा आदेश अथवा गोष्ट कोणी टाळलेली अथवा मोडलेली मला दिसलीच नाही एकदम प्रभावी व्यक्ती. समोरच्याला बोलण्यातूनच आपलंस करुन घेण्याचे खास तत्व त्यांना माहीत होते व त्यांचाचे ते नेहमी वापर करत बोलता बोलत ते माझ्या कडुन कार्ययातील घडामोडी विषयी विचारुन घेत व इतर कर्मचारी वर्ग काय करतो ह्या विषयी विचारत कधी नाव घेऊन अथवा कधी आड्नाव घेऊन.. मग मला लक्षात आले की आपण कार्यालयात काय करतो आहे हे त्यांना कसे कळत असे.

कंपनीमध्ये काम करताना मला चार महीने झाले होते व पगाराचे नाव काही कोणी घेत नव्हते तेव्हा मात्र माझी चलबिचल झाली व मी माझ्या स्वभावाला अनूसरुन सरळ जिंदल साहेबांच्या कडे पोहचलो व त्यांना एकदम प्रेमाने हसतच मी विचारले " बाबूजी, मुझे आज चार महिने हो गये है आप के पास काम करते हुवे, चारीजींने आपसे क्या बात कि है मुझे पता नही पर मुझे आप बता दे की मेरी तनख्वा कब मिलेगी तथा कितनी मिलेगी... क्यूं की मेरे भी कुछ खर्चे है.." त्यांनी जरा ही विचार न करता खिश्यात हात घातला व ५०००.०० रु काढून मला दिले व म्हणाले " इससे काम चलाना आगे देखता हूं क्य तनख्वा देनी है" मला जरा विचित्रच वाटले पण मी काही कुरकुर न करता पैसे घेतले व खोलीत निघून गेलो.

मला येथे काम करता करता चार महीने झाले होतेच त्यामुळे बाकी कर्मचारी वर्गा बरोबर देखील माझी ओळख व्यवस्थीत झाली होती त्यामध्ये तर काही जण खास बंदे होतेच. एक जिवन सिंग ह्या जिदल साहबांचा ड्रायवर.. राजस्थानी ६ फुट उंच एकदम खडा आवाज... माझी त्याची चांगलीच मैत्री जमली होती... हा जिवन सिंग वयाने कमीत कमी ५५ वर्षाचा असावा पण मला तो कधीच आहो-जाहो बोलवू देत नसे मला म्हणत असे " राज, देखो उम्र कुछ नही होती है..... जब हम दोस्त बन सकते है तो काहे काका-मामा या भाई बने ? तुम मुझे अपने दोस्त के तर ही बुलाया करो... देखो कंपनी मै सारे मुझे जिवन सिंग जी कहते है.. तुम्ही भी मुझे जिवन कहा करो" मला ह्या माणसाचा जिंदादिल पणा खुप आवडायचा गेली २२ वर्षे तो तेथे काम करत होता... जेव्हा आला तेव्हा डोक्यावरचे केस काळे होते आता ह्य भरगच्च मिश्या व डोक्यावरची केसे दोन्ही पांढरी पडलेली पण अवखळपणा, मन मात्र एकदम तरुण. खरं जिवनाचा प्रत्येक क्षण आनंदात कसा जगावा हे मला त्याच्याकडुन कळाले व मी त्याला गुरु मानले तो देखील गर्वांना सर्वांना सागायचा " देखो... यह राज भी मुझे गुरु मानता है.... नही तो तुम लोग कभी मेरी कदर ही नही की " व जोर जोरात हसत असे. अजून एक माणूस जोडी... पवन व शर्माची. काय झकास जोडी होती एकाला झाकावा व दुस-यला उघडावा तर दोन्हीतला फरक एकदम स्पष्ट दिसे... पवन सर एकदम बारीक, कामसू... हसणे कधी कधीच... तर शर्माजी गोलगच्च नाही पण भरलेले शरीर व कंपनी मध्ये हसणे हा त्यांचा हक्क असावा ह्या पध्दतीने टेबलावर हात मारून मारुन हसत असत ते देखील सात मंजिली.... काम... अरे राज काम को मार गोली... तुम्हे पता है... आज क्या हुंआ ? अशी त्यांची गाडी चालू होत असे व संपुर्ण दिल्ली फिरुन पुन्हा आपल्या जिदल साहबांच्यावर रोज एकवाक्य ठरलेलेच " राज, पिछले ९ साल हो गए मुझे - पवन को यहा काम करते करते... जिंदल साहब ने एक भी लडकी कभी काम पे नही रखी... तम जरा पुछना उन्हे क्या दिक्कत है... यार हमारा भी दिल करता है... बाते करने के लिए... हसी मजाक करने के लिए... लेकिन यह बुढा.... खुद कुछ करता नही हमे करने देता नही" व पुन्हा जोर जोरात हसे व मी लगेच त्यांना म्हणायचो " शर्माजी, बुढे तो आप भी हो" लगेच शर्माजी " अबे जा, बुढा तेरा बाप, मै तुझे बुढा नजर आता हूं ? ४९ का तो हूं .... अभी कम से कम ५१ साल तर रहूंगा यहा" आमचा हा दंगा रोज संध्याकाळी चालत असे व विक्रम, मी व नरेन वयाने त्यांच्या पेक्षा कितीतरी लहान असलेल्या सह-कर्मचा-याबरोबर ते दिलखुश होऊन गप्पा मारायचे.
आमचे एक सीए होते वर्मा जी त्यांच्या बद्दल तर शर्माजींनी टिप्पणी म्हणजे जाण्याची वेळ आली हे नक्की " अरे, तुम्हे पता है ? यह वर्मा सीए भी है तथा कंपनी मै डायरेक्टर भी.... लेकिन कसे बना ? ... साला ५ सालतक बाबू जी केलीए सुबह सुबह दुध ले के जाता था ... स्कुटर पे.... तब कही जा के सीए बना ...हरा**...." झाले इतके बोलले की आपली पिशवी उचलत व मला म्हणत निघायचे " देख अभी तु नया है.. तो ६ बजे तक काम कर... हम तो पुराने पुर्जे है... हमे ५ बजे जाने की इजाजत है.." व मला डॊळा मारुन निघून जात... ते गेले की पवनजी लगेच बोलायचे " साला बुढा....लडकी की बात हो तो अभी तो मै जवान हूं.... काम की बात होतो पुराना पुर्जा.... राज देखो बुढे को" व गालातल्या गालात हसत आपली पिशवी घेऊन पसार...

क्रमश:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: