शनिवार, १९ सप्टेंबर, २००९

अंत... भाग-३

मी फोन बंद केला व गाडी बंद करुन सरळ.. जे होईल ते होईल हा विचार करुन त्या गाडीच्या दिशेने चालू लागलो... दरवाजा उघडा होताच, मी जरासे आत बघण्यासाठी
वाकलो तोच एकदम पोटात जोरात कळ आली, माझा हात आपसूकच पोटाकडे गेला तर हाताला काही तरी ओले लागले..... मी ओरडलो... वोह शट... गोळी मारली मला तू.... असे म्हणत मी खाली कोसळलो.... !


मागील भाग...



डॉक्टरांनी माझा जिव वाचवला, पण मला गोळी मारणारा तो कोण ? हाच विचार डोक्यातून जात नव्हता, हॉस्पिटल मध्ये मी एकटाच होतो जवळपास कोणच नव्हते, शेवटी फोन करुन तीला बोलवावे हा विचार डोक्यात आला, मी फोन वर तिचा नंबर डायल केला...

ती- हल्लो.
मी- हाय.
ती- कसा आहेस आता, तब्येत ठिक आहे ?
मी- ठीक आहे, भेटायचे आहे तुला.
ती- सध्या शक्य नाही,
मी- भेट. गरजेचे आहे. आजच.

मी फोन कट केला व ती येईल की नाही हा विचार करु लागलो. तोच दरवाज्यावर ट्क टक झाली.. व दरवाजा उघडला गेला व रिंकी आत आली.

रिंकी- अरे हे काय झालं ?
मी- काही नाही असेच.
रिंकी- पोलिस आले होते त्यांना तो गोळी मारणारा सापडला का ?
मी- नाही अजून तपास करत आहेत.
रिंकी- पण तुला का ?
मी- रिंकी एक गोष्ट सांग मला, तुझा फोन माझ्या कडे आहे जे अजून कोणाला माहीत होते त्या दिवशी ?
रिंकी- कुणालाच नाही.
मी- त्याचा फोन तुझ्या फोनवर आला माझ्यासाठी, हेच मोठे कोडे आहे सध्या. जरा विचार कर जेव्हा तु मला फोन केला होतास फोन विसरला आहे हे सांगण्यासाठी तेव्हा तुझ्या आसपास कोण होते ? जरा प्रयत्न कर.
रिंकी- कोणच नव्हते रे, मी आपली ऑफिसच्या गॅलरी तून तुला फोन केला होता.
मी- तुझं ऑफिस कुठले आहे, नाव काय आहे ?
रिंकी- अरे सांगितले ना तुला, कॉलसेंटर आहे मॅकस्पेस.
मी- मॅकस्पेस ???? बायपास रोड वर ?
रिंकी- हो.
मी- गॉट इट. एक लिंक सापडली. चल जरा आपण तुझ्या ऑफिस कडे चलू.
रिंकी- आता ? तुला बेड रेस्ट सांगितला आहे ना ?
मी- मी ठीक आहे, पंधरा दिवस झाले आता आरामच करतो आहे, चल जरा काम करणाची वेळ आली आहे.
रिंकी- पण तु ह्या अवस्थेत ? डॉक्टर परमीशन देतील का ?
मी- चल तु. डॉक्टरांना माझे मी बघेन.

दुपारची वेळ होती, सकाळचा डॉक्टर व्हिजिट करुन गेला होता संध्याकाळचा पाच पर्यंत येणार , तो पर्यंत मी परत येऊ शकतो हा विचार करुन मी व रिंकी गुपचुप पणे बाहेर आलो व रिंकीच्या गाडीतून सरळ तीच्या ऑफिसकडे आलो.

रिंकी- मी येथे उभी राहून तुला फोन करत होते. हा कॉमन फोन आहे.
मी- ठिक.

मी जरा आसपास नजर फिरवली, नेहमी प्रमाणे जसे कॉल सेंटर मध्ये वातावरण असते तसेच येथे पण होते, जेथे रिंकी उभी होती तेथे सर्व बॉस च्या वेगवेगळ्या केबीन्स होत्या व समोर भल्यामोठ्या काचेतून बाहेरचा हायवे दिसत होता आम्ही १६ व्या मजल्यावर होतो... मी केबीन वर लिहलेली नावे वाचत होतो तोच एका केबीन वरील नाव पाहून मी दचकलो... ! म्हणजे धोका ? माझ्याशी धोका ? रिंकीने ज्या जागी उभे राहून मला फोन केला होता तेथून ही केबीन चार-पाच पाऊलावरच आहे. सत्य शोधायलाच हवे, नाही तर प्लान आपल्यावर उलटेल.

मी- रिंकी, चल. मला हॉस्पिटल मध्ये पोहचव.
रिंकी- ठिक, चल.

मी व रिंकी हॉस्पिटल मध्ये परत आलो व माझ्या रुम मध्ये पोहचलो तोच काही पोलिस अधिकारी आत आले व त्याच्या पैकी एक म्हणाला...

तो- नमस्कार मी इं. साठे, तुमच्याकडे लायसन्स पिस्तुल आहे ?
मी- नमस्कार, हो माझ्या नावानेच आहे.
तो- सध्या कुठे आहे ते ?
मी- माझ्या गाडीच्या स्टेरिंग व्हिलच्या खाली एका गुप्त जागी, का ?
तो - तुमचा पिस्तुल नंबर व परवाना नंबर आहे तुमच्याकडे ?
मी- आहे, पण सध्या येथे नाही आहे व मला लक्ष्यात नाही आहे.
तो- आम्ही शोध घेतला आहे, खरं सांगा गोळी कुणी झाडली तुमच्यावर ?
मी- म्हणजे ?
तो- आम्हाला शंका आहे गोळी तुम्ही स्वत:च तुमच्यावर झाडली आहे.
मी- व्हॉट... आर यु मॅड ?
तो - पुरावा आहे आमच्याकडे
मी - काय ?
तो- तुम्हाला परवाना मिळालेली पिस्तुल व गोळ्या ह्यांची डिटेल आमच्याकडे आहे.
मी- मग ?
तो- तुमच्यावर झाडलेली गोळी तुमच्याच पिस्तुलातून झाडली गेली आहे..
मी- आर यु मॅड ? माझी पिस्तुल माझ्या गाडीमध्ये आहे.
तो - लास्ट टाईम तुम्ही तुमची पिस्तुल कधी पाहील व चेक केली होती ?
मी- आठवत नाही.
तो - आठवून उत्तर द्या. नाही तर तुम्हाला त्रास होईल खुप व तुमची गाडी आमच्या ताब्यात आहे हे तुम्हाला माहीत असावेच.
मी- व्हॉट डू यु मीन ?
तो- मी सरळ सांगतो तुमच्या शरिरातून मिळालेली गोळी तुमच्याच पिस्तुलातून झाडलेली आहे ह्याचा पुरावा आहे आमच्याकडे.
मी - काय ? हे कसे शक्य आहे ? तुम्ही फोन डिटेल चेक करा... माझी पिस्तुल दाखवा मला मी सांगेन तुम्हाला..
तो- फॉरेन्सिकं लॅब मध्ये हे तथ्य समोर आले आहे, खरं सांगा.
मी- काय ? साहेब काही तरी गेम आहे..... मोठी गेम.

तोच डॉक्टर आत आले व म्हणाले..

डॉ. - काय चालू आहे येथे ? पेशेंट जख्मी आहे व तो अजून ही सिरियस आहे.
इं.साठे - माफ करा पण आम्हाला आमचे काम करु द्या. प्लिज.
मी- डॉक्टर.. जख्म दुखत आहे..
डॉ- मी बघतो.... माय गॉड... जख्मेतून रक्त येत आहे.. नर्स !
मी- डॉक्टर प्लिज हेल्प मी.
डॉ.- शांत रहा, मी करतो आहे मदत. नर्स, लवकर.... इं. साठे प्लिज तुम्ही निघा, नंतर तुमचा तपास करा मला माझे काम करु द्या.
साठे- मी येथेच आहे बाहेर.

मी कुणाच्या कळत नकळत आपली जख्म आपल्याच हाताने ओरबडून काढली होती.. कुणालाच कळाले नाही पण शक्यतो रिंकी...

*****

सहा तासानंतर...

ती - काय चालू आहे मला काही कळेल का ?
मी- कळेल.
ती- तो पोलिस अधिकारी... काय म्हणतो होता ते खरं आहे काय ?
मी- आर यु मॅड... मी स्वतः वर गोळी का झाडेन ते पण पोटावर ?
ती- ठिक आहे मग तु आपली जख्म का ओरबडलीस ?
मी - तुला कळाले ते ?
ती - हो..
मी - सांगेन सर्व काही पण थाबावे लागेल तुला काही काळ.. ही सर्व गेम आहे ... मोठी गेम.
ती- गेम... कसली ?'
मी -सांगेन तुला...

तोच रुम च्या खिडकीतून गोळ्या चालल्या व काही कळायच्या आत रिंकी जमिनीवर पडली व मी स्वतःला वाचवण्यासाठी... बेडच्या खाली जाण्यासाठी उठलो तोच डाव्या हातातून प्रचंड कळ आली व मी मटकन खाली पडलो... साठे आत दरवाजा जवळ जवळ तोडत आत येताना दिसले व माझ्या मागील खिडकीवर ते अंधाधुंद फायरिंग करु लागले... मी हळू हळू बेशुध्द पडलो....


क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: