शनिवार, १९ सप्टेंबर, २००९

माझे महान प्रयोग - १

मागील आठवडा असाच झोपून घालवला, खुप कंटाळा येतो नाही असं बेड वर पडून राहणे, पण ह्या रविवारची सकाळ जरा वेगळीच होती मस्त पैकी अंगात तरतरी जाणवत होती व शक्ती आली आहे असे वाटत होते, त्यामुळे विचार केला चला आज जरा बाहेर पडू, थोडा वेळ बागेत फिरलो, हिरवळीचा आनंद घेतला. रविवार होता त्यामुळे सर्वत्र आनंदी आनंद होता, , युवक-युवती मस्त पैकी सकाळाच्या कोवळ्या उन्हात गप्पा मारत होते, दोनचार आजोबा टाईप व्यक्तीमहत्वे त्यांच्या कडे चोरून चोरुन पाहत गप्पा मारत होते... पण हे सर्व बघून मी लवकरच कंटाळलो व परत घरी आलो, इकडे तिकडे करताना दिवाळीच्या वेळेस आणलेला डिस्टेंपरचा डब्बा दिसला व मनात एक विचार चमकला की चला आज आपली रुम पेंट करु या. दहा लिटरचा डिस्टेंपरचा डब्बा घेऊन मी आपल्या रुम मध्ये आलो व कुठली भिंत रंगवावी ह्याचा विचार चालू केला, बेडच्या समोरची भिंत स्काय ब्ल्यु रंगाने रंगवायचे मनात ठरवले व रुम मधील सामान एक एक करुन बाहेर काढायला सुरवात केली !

सर्व सामान जेव्हा मी बाहेरील हॉल मध्ये काढले तोच आमचा गडी किचन मधून बाहेर आला व म्हणाला " क्या कर रहे हो भाई ?"
मी म्हणालो " कुछ नही, जा तु रोटी बना" मी असे म्हणून बाथरुम मधील बाल्टी घेऊन आलो व दिड एक लिटर डिस्टेंपर बाल्टी मध्ये ओतले, तोच लक्ष्यात आले की ब्रेश नाही आहे व ब्ल्यु पिडीडिंन्ट तर नाहीच आहे, मग हळूच प्रेमाने गड्याला हाक दिली व म्हणालो " सतबीर, एक काम कर यार, मार्केट से ब्रेश तथा ब्ल्यु पिडीडिंन्ट ले के आजा यार.. बाईकले के जा." त्याने मला खाऊ का गिळू नजरे ने बघत म्हणाला " मै रोटी बना रहा हूं ! आप को भी कुछ काम नही है.. रुको अभीला के देता हुं! " चरफडत तो सामान घेऊन येण्यासाठी कसाबसा गेला, आजकाल शोधायला गेले तर देव भेटेल पण गडी भेटणार नाही, त्यामुळे ह्यांचे भाव जरा वाढलेलेच असतात, असो.

तो येऊ पर्यंत जरा आपलं कपाट साफ करु ह्या विचाराने कपाट साफ करायला घेतले, कपाट उघडताच समोर चार्-पाच सिग्नेचर च्या बाटल्या डोळ्यासमोर चमकल्या... अत्यंत दुखःने मी त्या बाटल्या उचलून आपल्या नजरे आड करत हॉल मधील कपाटमध्ये ठेवले ! व परत रुम मधील कपाटाकडे वळलो, खालचा कप्पा साफ करताना फोस्टर बियर च्या कॅनचा सरळ सरळ बॉक्सच हाती लागला जो मागच्या महिन्यात केलेल्या कॅकटेल पार्टी साठी आणला होतो, पण सर्वांचाच व्हिस्की व व्होडका मध्ये टांगा पलटी झाल्यामुळे बियर पण आहे हे जवळ जवळ सर्व जण विसरले होते व ती पेटी कपाटात राहिली होती, मी अत्यानंदाने वेडा व्हायचा तेवढा राहिलो.. चला डॉक्टर ने व्हिस्की सांगितले आहे घेऊ नको, बीयर ला थोडीच ना आहे... हा विचार करुन मी लगेच त्यातील दोन्-चार कॅन फ्रिज मध्ये लावल्या व निवांत पणे सोफ्यावर हुडपलो... आता काही वेळात बियर थंड होणार व मी त्या सर्व च्या सर्व गटकणार.. आठवडाभर पिली नाही त्याचा वचपा आज काढणार म्हणून मी खुषीत होतो, तोच माझ्या डोक्यात विचार आला च्यामायला त्या उमेश ला (माझा मित्र + डॉक्टर) विचारुन घेऊ या एकदा की बियर चालेल का नाही, नाही तर बियरच्या नादात मला स्वर्ग मिळायचा फुकटात...

मी त्याला फोन लावला " उमेश, क्या हाल है भाई ?"
तो " मजे में, हॉस्पिटल में हुं बोल, ठीक है अब. कोई तकलिफ ?"
मी " नही यार, ठीक हुं, मेरे पास व्हिस्की है... "
तो जवळ जवळ ओरडलाच " राज, हात तोड डालूंगा, साले व्हिक्सि को हात भी लगा या तो"
मी नर्वस होत म्हणालो " अबे, पुरी बात तो सुन. मेरे पास तीन-चार बोतले पडी हुंई है, जो मेरे काम की तो फिलाल है नहीं, तु ले जा." मी त्याला लालच + मस्का लावत म्हणालो.
तो " अच्छा ! चल कोई बात नहीं, दोस्त कब काम आएगें, शाम को ले जाऊंगा"
मी " तुझ्या आवशीचा घो, फुकट म्हणजे दे"
तो " क्या बोला बे ? समज में नही आया"
मी सावरासावरी करत म्हणालो " अबे तुझे नही, मुझे बियर चल सकती है क्या ?"
तो म्हणाला " चलेगी... जल्दी उपर जाना है तो पी , तेरे पास बियर का भी स्टॉक पडा है क्या ?"
मी गडबडीने म्हणालो " नही, नही. मंगाने वाला था, अब नहीं "
तो " अब आया लाईन पें, शाम को घर आ रहा हूं "
मी " ठीक. आ जाना !"

म्हणजे, पिण्याचा मार्ग संपला होता, पण येवढं होऊ पर्यंत सतबीर ब्रेश व बाकीचे सामान घेऊन माझ्या समोर उभा राहिला,मी त्याच्या हातातून सामान घेतले व सरळ आपल्या रुम मध्ये गेलो व आतातून दरवाजा बंद करुन घेतला.
बाल्टी मध्ये हलकेसे पिडीडिंन्ट टाकुन मी त्याला कश्याने घुसळायचा हा विचार करु लागलो काहीच सापडले नाही म्हणून शेवटी सरळ हात घातला व घुसळू लागलो .. थोड्या वेळा ने फिकट निळा रंग दिसू लागला पण त्या रंगाने माझे समाधान झाले नाही म्हनून अजून जरा पिडीडिंन्ट ओतले पण जरा जास्तच पडला पिडीडिंन्ट त्यामुळे तो एकदम निळा पेंट तयार झाला हे पाहून मी त्यात अजून थोडे डिस्टेंपर घातले अर्धा एक लिटर तर तो रंग परत हलका निळा झाला... थोडा पिडीडिंन्ट थोडा डिस्टेपर असे करत करत सरते शेवटी मला हवा तो निळा रंग तयार झाला, पण तो पर्यंत बाल्टी आर्धी भरली होती जवळ जवळ सहा एक लिटर रंग तयार झाला होता.. आता काय करायचे हा विचार करता करता मला ती सैफ अली खान ची पेंट ची जाहिरात आठवली ज्यामध्ये तो रंग ब्रेश ने भिंती वर झाडतो, हवे तसे ब्रेश फिरवतो व एक सुंदर कला कृती निर्माण होते, माझ्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली व मी ती कल्पना प्रत्यक्षात आपल्या भिंती वर उमठवण्याची तयारी सुरु केली.

पहिला ब्रेश रंगात बुडवला व झपाक करुन भिंती वर उडवला, पण भिंती वर थोडा व माझ्या चेह-यावर जास्त उडाला... मी सद-याच्या बाही ने तोंड फुसत आपले काम नेटाने चालू ठेवले, कधी तलवारी सारखा ब्रश चालव तर कधी, गाडीचे स्टेरिंग फिरवत आहे तसा चालव, कधी उड्या मारत चालव तर कधी आडवा तिडवा जसा हवा तसा फिरव... तास भराच्या महनती नंतर अर्धी भिंत माझ्या कलाकृती ने भरली होती, माझी छाती एक इंच भर फुलली व मी परत नेटाने काम चालू केले, सपासप ब्रेश चालवत राहिलो व पुर्ण सहा लिटर पेंट भिंत वर अक्षरशः ओतून मी एकदम कौतुकाने ती माझी भिंत पहात उभा राहिलो !

टक टक, टक टक.
"भाई, क्या कर रहे हो अंदर ?" सतबीर म्हणाला बाहेरून.
"रुक जा पाच मिनिट" मी म्हणालो.

पुन्हा एकदा आपल्या कलाकृती वर नजर टाकुन मी विजयी आवेशा मध्ये दरवाजा उघडला तोच सतबीर तोंड वासून उभा माझ्या समोर.
"हे भगवान, कलर से नहा लिया है क्या ?" असे म्हणून तो अक्षरशः पोट धरुन हसू लागला.. मी त्याच्या कडे रागाने बघत हॉल मधील आरसा समोर उभा राहिलो, ७०% मी रंगात भिजलो होतो, केसं, तोंड, कपडे... चप्पल सर्व काही निळा / आकाशी रंग झाला होता, मी हसत म्हणालो, " अबे, कुछ काम करते करते गंदे हो गये तो उस में हसने वाली कोणसी बात है ?, चल चाय बना ! "
मी माझ्या हातातला ब्रश तलवारी सारखा फिरवत परत आपल्या रुम मध्ये गेलो व आपली कलाकृतीला आपल्या नजरेत साठवत उभा राहिलो, तोच सतबीर चहा घेऊन आत आला व भिंती कडे बघत म्हणाला " ए क्या है सब ? बाल्टी फेक दी क्या दिवार पें ?" मी कपाळाला हात लावत म्हणालो " अबे, ढक्कन. यह नया टाईप का डिझाईन है... अच्छा लग रहा है ना ? " मी त्याला डोळ्याने वटारत म्हणालो... त्याला समजले होयच म्हणायचे आहे ते. तो म्हणाला " बहोत बढियां, यह सब ठीक है... पर आपने फर्श क्युं रंग दिया.. अब इसे धोयेगा कोन ?" तेव्हा मी खाली बघितले, जवळ जवळ सर्व रुम ची फर्श निळ्या रंगात रंगली होती.. मी ब्रेश जसे हवे तसे चालवले त्यावेळी अर्धा रंग भिंती वर व अर्धा रंग सर्व रुम मध्ये पसरला होता.. मी आपली जिभ चावत त्याला म्हणालो " कोण साफ करेगा मतलब. दो घंटे के अंदर साफ कर रुम. मै अभी घुम के आता हूं बाहर से. तब तक एकदम ठीक ठाक होणी चाहीए रुम."

असे म्हणून मी जवळ जवळ पळतच बाथरुम मध्ये गेलो व अंघोळीला उभा राहिलो, आत मन भरुन हसून घेतल्या वर मी अंघोळ करुन बाहेर आलो तोच सतबीर चे एक वाक्य कानावर पडले जो फोन वर बोलत होता आपल्या कुठल्या तरी जाणकाराशी " रे यार, हमारे साहब भी पगला गये है, पुरा घर गंदा कर दिया.. मेरा संन्डे बरबाद कर दिया यार... ! " अरे रे मला खुप वाइट वाटले म्हटले ह्याचे पण काही प्लान असतील... आपल्या मुळे राहिलेच. त्याला बोलवले व म्हणालो " फ्रिज में चार बियर की कॅन रखी है, कल छुट्टी ले लेना, साथ में बियर भी लेके जा. लेकिन आज रुम साफ कर फटाफट." तो म्हणाला " ठिक है साब, पर फिर मत करना पेंन्ट का काम.. आप के बस की नहीं है.... पेंट करना.. दिवार खराब कर दी." माझ्या महान कलाकृतीला खराब म्हणाल्या म्हणाल्या मला खुप राग आला त्याचा पण.. हा गेला तर उपासमार होईल व अजून एक भुकबळी म्हणून आपली पण सरकार दप्तरी नोंद होईल ह्या भविष्यकालीन विचार करुन मी त्याला काहीच म्हणालो नाही.....

पण,

उद्या सुट्टी दिली आहे त्याला... उद्याची उचापत आताच माझ्या मनात रेंगत होती.. उद्या सतबीर ला सुट्टी दिली आहे.. मिपावर पाककृती दालन मध्ये डझनाने कलाकृती पडल्या आहेत त्यातील एक उचलणे व स्वयंपाक घरात आपली तलवार चालवणे.... ढ्णठढड्याण !!!!!!! ढ्णठढड्याण !!!!!!! ढ्णठढड्याण !!!!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: