शनिवार, १२ सप्टेंबर, २००९

अस्तित्व

आम्ही दोघं जवळ जवळ एकाच वयाचे. तो एक बराच शिकलेला. गरिबातून स्वतःच्या कष्टाने वर आलेला. एका प्रस्थापित कंपनी मध्ये मोठ्या हुद्यावर होता. घरात एक ५-६ वर्षाची छकुली व नवरा-बायको बस. आई-वडील आधीच मुक्त झालेले. जमीन-जुमला असून नसल्या सारखा. सुखी व समाधानी कुटुंब होतं ते. घरात काही कमी नाही जे हवं ते लगेच नाही पण मिळायचं जरुर त्यामुळे बायको पण खुष-मुलगी पण खुष. पण मागील वर्षी अमेरिकेत फुगा फुटला व काही च्या घरात धरणीकंप झाला. स्थीर नात्यावर... प्रेमावर टिकलेली घरे. ह्या अचानक आलेल्या वादळा मुळे बावरली. घर पडतं की काय असा भास होऊ लागला. त्याची व माझी मैत्री खुप जुनी. तो पण त्याचं कंपनीत होता ज्यातून मी सुरवात केली होती जिवनाची. आज तो मोठा झाला पण मला नाही विसरला. परदेशात होता. आता पिंक स्लिप मुळे परत आला. काही महिन्यापुर्वी भेटला होता. त्याने घरी बोलावलं म्हणून गेलो. तर ह्याची अवस्थाच बिकट झालेली त्याला काहीच कळतं नव्हतं काय करावे, जो भेटेल त्याच्या कडून सल्ले मागायचा माझ्या कडून ही मागितला. मी अडाणी काय सल्ला देऊ त्याला. हाच लेखन प्रचंच.

****
ती- त्यांची बायको
तो- वरील मित्र
मी- मीच.
छकुली - त्यांची छोटी मुलगी.
स्थळ- त्यांचेच घर.
****

ती- तु बघतो आहेस ना कसा तुटला आहे तो
मी- वहिनी कळजी नका करु सर्व होईल सुरळीत.
ती- मी पण हेच म्हणतं आहे पण हा.
मी- दादा, असं का करता तुम्ही शिकलेले सवरलेली माणसं तुम्ही.
तो- हा. हा. शिकलेली सवरली माणसं म्हणूनच तर जमीनदोस्त होत आहे, बाबा असते तर !
मी- बाबा असते तर काय ?
तो- त्यांनी जी जमीन आम्ही न कसता सोडून दिली आहे ती अशी कधीच राहू दिली नसती. दोन वेळचं जेवण तरी भेटलं असतं त्यातून.
मी- दादा, तुला पुन्हा नोकरी मिळेल रे.
छकुली- ये मामा, मला बाहेर जायचं आहे, बाबा कुठंच घेऊन जात नाही आहेत मला.

****
त्यांचा हुंदका फुटला व तो सरळ मला घेऊन बाहेर आला व म्हणाला " तुझ्या रुमवर चलू या." मी त्याला घेऊन माझ्या रुमवर आलो व काय घेणार हे न विचारताच त्याचा पॅग भरला व त्याच्या हाती दिला व बहाद्दुरला सांगितले जा जरा दोन तास फिरुन ये जा.

****

तो- काय उत्त्तर देऊ त्या मुलीला ?
मी- अरे, कमीत कमी तीला तरी बाहेर घेऊन जात जा रे. तीचे काय चुकलं आहे ह्या सर्वात. तीची का आबाळ.
तो- तु म्हणतो आहेस ते बरोबर आहे रे. पण माझं मनचं होत नाही आहे. तीने काही मागितले तर ?
मी- अरे असे काय करतोस. इवलीशी ती मुलगी चॉकलेट व बाहुली सोडून काय मागेल तुझ्या कडून.
तो- तुला माहीत आहे ? माझा जॉब जाऊन १० महिने झाले आहेत. मी आठ महिने तीकडेच जॉब शोधत होतो. मीळाला नाही.
मी- मग.
तो- मला वाटलं होतं की असेच छोटे मोठे वादळ आहे, शांत होईल. पण नाही झालं !
मी- ह्म्म. मग तु भारतात कधी आलास परत ?
तो- मी भारतात परत येण्यासाठी तीकडे गेलोच नव्हतो. मला वाटायचं की मी एवढा शिकलो आहे, जॉब चांगला आहे तीकडेच राहू.
मी- बरं पुढे.
तो- पण आठ महिने विदाऊट जॉब. परिवारासोबत. सर्व जमापुंजी कमी कमी होत गेली.
मी- ह्म्म. पण तु दोनचार वर्ष होतास ना तिकडे. पैसे पण चांगले मिळायचे तुला.
तो- हो. पण दोन वर्षापुर्वी जमा पैशातून घर घेतलं होतं. त्यावेळी भाव खुप वधारलेला होता. पण स्वत: घर ह्या नादात घेतले.
मी- ह्म्म. व आता फुगा फुटला.
तो- हो. जे घर एक रुपया देऊन घेतले होते ते ४० पैशाचे पण नाही राहिले. शेवटी ते पण विकले व जमा पैसे घेऊन इकडे आलो.
मी- ह्म्म. तु इकडे ट्राय नाही केलास जॉब साठी ? इकडे अजून येवढा हाल खराब नाही आहे.
तो- करत आहे रे. पण त्या स्टेटस चा जॉब नाही मिळत आहे.
मी- ह्म्म. तुझे गुंतवणूक केलेले फंड. त्याचा पण हाल खराब असेल.
तो- ५०% पेक्षा खाली आहेत.
मी- तुझ्या पॉलिसच व्यवस्थीत. हप्ते भरतो आहेस ना ?
तो- मागील वर्षापर्यंत आहेत अरे. ह्या वर्षाचे काही खरं दिसत नाही आहे. पण पॉलिसी पुर्ण पण होत नाही आहे. लॉन्ग टर्म वाले आहेत. सर्व.
मी- ह्म्म. हप्प्ते व्यवस्थीत भर. काही काही करुन. त्यामुलीचे भवितव्यासाठी ती गुंतवणूक गरजेची आहे.
तो- हम्म.
मी- तुला कुठली ऑफर आली होती का ?
तो- आली होती. बेंगलोरहून. पण पगार. लेव्हल.
मी- जरा काही काळ लेव्हल व पगार ह्या गोष्टी सोडून तु घरा कडे बघणार का ?
तो- म्हणजे ?
मी- अरे भावा, असं तु कर्ता पुरुष घरात बसून राहिलास तर वहिनीला काय त्रास होत असेल ह्यांची तुला कल्पना आहे का ?
तो- तीला कसला आला रे त्रास दोन वेळचं मिळत आहेच. बाबच्या कृपेने घर स्वतःचं आहे.
मी- रे , असं नसतं. तुला त्रास होत आहे हे तिला पण दिसत आहे व तुला त्रास होत आहे म्हनून तिला पण त्रास होत आहे.
तो- ह्म्म.
मी- तु मला फोटो पाठवले होतेस आठवतं.
तो- हो. आमच्या ट्रीपचे. तिकडे आमचे शेजारी व आम्ही गेलो होतो.
मी- बरोबर. त्यात वहिनी बघ व आता बघ. तुला कळेल मी काय म्हणतो ते.

****
तो हिरमुसला व कुठेतरी स्वतः मध्येच हरवला काही क्षण. चेह-यावरील त्याचे भाव क्षणागनिक बदलत होते, पण ते काळजीचे होते. मला जरा समाधान वाटलं. कमीत कमी ह्यांने विचार करायला सुरवात तरी केली. त्यांने जेवण केले व मी त्याला घेऊन परत त्याच्या घरी आलो व वहिनी शी थोडं बोलायचं हा विचार केला. तो गपचुप आपल्या बेडरुम मध्ये गेला व झोपी गेला.
****

मी- ह्याला आराम करु द्या.
ती- हो. तु चहा घेणार.
मी- ह्म्म. थोडासा. साखर कमी.
ती- ठिक बस.
मी- वहिनी, एक विचारु ?
ती- अरे विचार ना. तु काय परका.
मी- तसं नाही. हा ड्रिंक्स आधीपासूनच घेतो मला माहीत आहे, पण आजकाल जास्त घेतो का ?
ती-सोड रे ह्या गोष्टीला. त्याला त्रास होतो. मी अशी कमी शिकलेली. त्यामुळे मी देखील काही घराला हातभार लावू शकत नाही.
मी- पण तुम्ही त्याला व मुलीला व्यवस्थीत संभाळत आहातच ना. बस एक काम करा तुम्ही.
ती- काय ?
मी- त्याला बेंगलोरहून जॉब ऑफर मिळाली आहे. त्याला ती जॉब जॉईन करायला सांगा.
ती- मी बोलले होते त्याबद्दल. तर भडकला माझ्यावर.
मी- तुम्ही पुन्हा प्रयत्न करा. माणसाला आपला लेव्हल व स्टेटस एकदम सोडावसं वाटतं नाही. पण
ती- पण ?
मी- लेव्हल व स्टेटस ह्या नादात घरादाराची आबाळ झाली तर. तुमची मुलगी लहान आहे अजून.
ती- मी खुप समजावले रे. पण ह्या असा हट्टी तुला माहीत आहे. मी उद्या पुन्हा प्रयत्न करते.

****
वहिनी ने काय प्रयत्न केला समजले नाही. पण हा कसाबसा तयार झाला व बेंगलोर ला गेला एकदाचा. जॉब मध्ये सेटल झाल्यावर बायको-मुलीला घेऊन जातो असे सांगून. परत आला दोन महिन्यातच.
****

तो- तुला सांगत होतो मी. तो जॉब माझ्या लेव्हलचा नाही आहे.
मी- काय झालं.
तो- माझ्या पेक्षा कमी शिकलेले. कमी अनुभव असलेले माझे बॉस ?
मी- अरे. असं काय करतोस.
तो- नाही. जमत रे मला.
मी- अरे. हाच तर तुला चान्स आहे. आपला अनुभव व शिक्षण ह्याचा फायदा घेण्याचा.
तो- म्हणजे. मी त्या अडाणी लोकांच्या हाताखाली काम करु. मी तिकडे परदेशामध्ये टिम लिडर होतो. येथे टिमचा हिस्सा ?
मी- अरे. तु भारतात आहेस. तुझी जॉब गेली आहे. तुला आपलं घर चालवायचं आहे फक्त ह्याच गोष्टी तु डोक्यात ठेव ना.
तो- काहीच समजत नाही आहे.
मी- अरे, तुला किती मोठा मोका मिळाला होतो तुला माहीत आहे.
तो- मोका ? ह्यात तुला कुठे प्रगती दिसत आहे. ही तर अधोगती.
मी- एक सांग. मी आपल्या जुन्या कंपनीत एक हार्डवेअर इजिंनियर पासून आयटी मॅनेजर पर्यंत कसा पोहचलो ? तु होतास ना बरोबर.
तो- अरे तुझ्या वरचे सगळेच मुर्ख भरती होते. व तुझा नॉलेज होतं डिग्री नव्हती त्याच्या कडे डिग्री होती नॉलेज नव्हतं
मी- हे तुला कळतं व मी जे तुला आधी सांगितले ते नाही कळाले ?
तो- अरे हो. छे. मी मुर्खासारखा वागलो यार.
मी- हरकत नाही. हे बघ, ह्याच देशानं. ह्याच मातीने तुला लहानाचा मोठा केला. सरकारी शाळेत शिकलास तु पण ना. अनुदान मिळवून ?
तो- हो. मला दोन स्कॉलरशीप मिळाल्या होत्या. दहावी-बारावी.
मी- ते ऋण फेडण्यासाठी देवानं तुला मोका दिला आहे. आपली बुध्दी व शिक्षण येथे वापर. ती कंपनी पुढे जाईल. त्या बरोबर तु पण .देशपण.
तो- हह्म्म.
मी- तुला तुझे अस्तिव टिकवायचं आहे. तर थोडी तडजोड तर करावीच लागेल जिवनाशी.

****
तो परत गेला डिसेंबर मध्येच जॉब वर. परिवाराला घेऊन. मी गेलो होतो जानेवारी मध्ये बेंगलोर ला. त्याला पण भेटलो.

****

मी- कसा आहे नवीन जॉब.
तो- मस्त. आवडलं काम मला.
मी- काय छकुली. काय करत आहेस.
छकुली- मामा, हे बघ माझी नवीन बाहुली व बाहुलीचे नवीन घर.

****
छकुलीचं नवीन घरं व माझ्या मित्राचे नवीन घरं बघून आनंद झाला. ह्या मंदिच्या काळात स्वत:च अस्तित्व टिकवण्यासाठी थोडा वेळ आपल्या गर्वाशी, आपल्या लेव्हल व स्टेटस शी तडजोड केली तर हे जिवन किती सुखी होईल ह्याचा विचार ही शिकलेली माणसं का करत नाही हाच प्रश्न मला पडतो. स्वतःच्या अस्तित्वापेक्षा लेव्हल व स्टेटस ह्या गोष्टी नक्कीच मोठ्या नाहीत.
****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: