सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१०

माझी सफर.... मैत्री !!! --- भाग -१२

सर्व काही व्यवस्थीत चालू होते, एक दोनदा कंपनीच्या कामासाठी मला गुजरात तथा मध्यप्रदेशला पाठवले गेले होते पण ह्यावेळी मला जवळच जयपुर येथे पाठवले गेले ते सरळ एक महीन्यासाठी. एक सुंदर शहर व एकदम मस्त समाज असे जयपुरचे मी वर्णन करेन, शहरापासून १५ एक कीमी वर आमची कंपनी होती व राहण्याची व जेवणाची सोय तेथेच. ह्या मुळे मी मात्र जाम खुष होतो जेवण बनवण्याची कटकट मीटली होती व संध्याकाळचा वेळ मला जसा हवा तसा वापरता येत होतो, तेव्हा मी जवळ जवळ मी महीनाभर रोज कोठे ना कोठे जयपुर फिरुन येत असे. जयपुर वारी मध्ये वेगळे असे काही घडले नव्हते तेव्हा जास्त काही लिहीत बसत नाही.

महिन्याच्या कालावधी नंतर मी परत गुरगांव कार्यालयात आलो व व सर्व रिपोर्ट व्यवस्थापनाला देऊन मी आपल्या कामावर रुजू झालो, तर येथे जरा नवीनच अडचण आली होती काही उंदरांच्या दंग्यामुळे कंपनीतील नेटवर्क विसकटले होते व काही प्रमाणात केबल्स ही खराब झाल्या होत्या रितसर पध्दतीने केबल तथा जरुरी सामान ह्याचा मी पीओ बनवून घेतला व लगेच दुस-या दिवशी सामान पोहचल्यावर नवीन केबल टाकणे चालू केलेच होते.. जुन्या पध्दतीच्या ह्या कंपनीमध्ये केबल टाकताना माझे केस , कपडे हे धुळीने माखलेच होते व चेह-यावर ही काही जागी काळे पाढंरे डाग पडले होते अश्या अवतारात मी एका केबीन मधुन दुस-या केबीन पर्यंत काम करत होतो, उन्हाळ्याचे दिवस त्यातून मी घामाघुम झालो होतो तेव्हा मी आपला शर्ट काढला व टी-शर्ट मध्येच काम चालू केले, माझा शर्ट व कंपनीचे आय-कार्ड दोन्ही बाजूलाच पडले होते व मी ते उचलून वर ठेवावे ह्या उद्देशाने माझ्या केबीन कडे ह्याच अवतारात निघालो, तोच एक मधुर आवाज कानावर पडला " अरे सुनो" मी चमकुन इकडे तिकडे पाहीले तर जी केबिन गेली सात-आठ महिने बंद होती ती उघडलेली होती व एक युवती हातामध्ये काही जुन्या फायली घेऊन काहीतरी शोधत होती, ती मला म्हणाली, " जरा बहाद्दुर को बोल ना मुझे चाय पीलायेगा" मी तीच्या चेह-याकडे पाहातच राहीलो व तीने पुन्हा मला तीच आर्डर परत मला दिली, मी हसलो व म्हणालो " अभी बोलता हूं" मी विचार करत च बाहेर रिशेपशन जवळ आलो व रिशेपशन वर जो शर्मा होता त्याला मी विचारना केली की ही नवीन बया कोण ? तर तो म्हणाला " दस-दिन हो गये है कंपनी में काम कर रही है.. पर क्या काम कर रही है यह तो साहब को ही पता होगा" मी त्याला तीची आर्डर सांगितली व आपले काम पुन्हा चालू केले.

दोन एक दिवसामध्ये माझे काम संपले व मी नेहमी प्रमाणे माझ्या केबीन मध्ये बसू लागलो, तोच शर्मा माझ्या कडे आला व साहबांनी बोलवले आहे असे सांगून निघून गेला, मी लगेच साहेबांच्या केबीन मध्ये गेलो " राज, देखो व जो विभा है ना उसे एक पीसी तथा प्रिंन्टर चाहीए देखना को कुछ होता है क्या , जादा दिन के लिए नही चाहीए १० दिन काही उसका काम है" मी ठीक आहे म्हणालो व एक पीसी विभाच्या केबीन मध्ये घेऊन गेलो व त्यांना माझी ओळख करुन दिली व म्हणालो " अगली बार चाय चाहीए होतो २३१ पें रिंग करना " मी असे म्हणताच ती एकदम जोरात हसली व माझी क्षमा मागीतली व आपली ओळख करुन दिली.

कंपनीमध्ये तीचे काम दुपार पर्यंत चालत असे व ती तीन नंतर आपल्या घरी जात असे पण जशी जशी आमची ओळख होत गेली तसे तसे तीचे घरी जाण्याचे टाईम बदलू लागले, पाच-सहा दिवसामध्ये आमची चांगलीच गट्टी जमली व आम्ही खुप जुने दोस्त असू ह्या पध्दतीने वागू लागलो होतो, माझी ही जवळीक वर्माजींनी ओळखली व मला आपल्या केबीन मध्ये बोलावले, एकदोन कामाच्या गोष्टी करुन ते मुख्य मुद्द्यावर आले व म्हणाले "राज, दो-तीन दिन से देख रहा हूं तुम बहोत खुश रहने लगे हो.. क्या बात है?" मी जरा वरमलोच व म्हणालो असे काही नाही आहे मी असाच आहे तर ते हसत म्हणाले " कोई बात नही सीए ट्रेनी है वह, चल उसे रख ना न रख ना मेरे हात में है... जा तू" मी हसत बाहेर आलो व मी विचार केला खरोखर माझ्यात काही बदल झाला आहे का ?

दोन एक दिवसांनी विभाने मला सांगितले की कंपनीमध्ये ती अजून दोन एक महीना ट्रेनिंग घेणार आहे व त्याची परवानगी तीने वर्मा सर कडून घेतली, मी अचानकच हसलो व मला वर्माजींचे बोल आठवले, तीने खुप प्रयत्न केला विचार ण्याचा की मी का हसलो पण मी वेळ मारुन नेली. ती देखील विचारात पडली की हा असा मध्येच का हसला असावा, पण तीने जास्त वेळ न घेता आपल्या कामावर परत गेली.

कामाच्यावेळेतून मला बाहेर जाण्याचा वेळ कधी मीळत नसे व कधी वेळ मीळालाच तर बाहेर जाऊन काय करावे ह्या विचाराने मी कंपनी मध्येच पडीक असे, पण एक रविवारी विचार केला चला आज बाजार मध्ये जाऊन कपडे घेऊ व जरा फिरुन येऊ या. प्लान तयार केला की लगेच अमंलबजावणी करने हा माझा स्वभाव त्यामुळे मी लगेच सेक्टर १४ पोहचलो व काही दुकानामध्ये फे-या मारल्या पण जिवनामध्ये दोनगोष्टी कधी जमल्याच नाही एक भाजी विकत घेणे व दुसरे कपडे विकत घेणे, मी माझा कपडे खरेदी करण्याचा निर्णय रद्द केलाच होता तोच मागुन कोणीतरी राज अशी आवाज दिली , व पक्के माहित होते की तो आवाज विभाचाच आहे, मी मागे वळुन पाहिले तर ही आपल्या मत्रिणी बरोबर येत होती, मी हसून तीचे व तीच्या मैत्रीणेचे स्वागत केले व विचारले " यहा कहा, घुम रही हो आप ? " तीने सांगितले की दर रवीवारी ती व तिची मैत्रीण येथेच फिरत असतात काही ना काही खरेदी करण्यासाठी. मी माझे कारण सांगितले तर ती म्हणाली चल ठीक आहे मी करुन देते खरेदी.

मनातील ईच्छा पुर्ण झाली मला संगे कोणीतरी हवेच होते तेव्हा ही विभा आली, मी,ती व तीची मैत्रिण माझे कपडे खरेदी करण्यासाठी एका शोरुम मध्ये घुसलो " तेथील एक दोन कपड्यांचे भाव पाहताच मी विभाच्या कानामध्ये कुजबुजलो व म्हणालो " विभा मेरा बजेट सिर्फ २००० तक ही है " ती हसली व म्हणाली " बहोत है २००० तो रुको पहले पसंद करो" तीन शर्ट दोन टिशर्ट व दोन एक जिन्स अशी खरेदी विभाने मला १६०० रु. मध्ये करुन दिली व मी तीचे आभार मानले व तीला म्हणालो " विभा तुम नही आते तो शायद में खाली हात ही रुम पे जाता, चलो तुम्हारी वजह से मेरा एक काम तो हो गया चलो तुम मेरे साथ एक एक कप चाय पीलो या कुछ खालो" ती हसली व म्हणाली " नही कभी ओर दिन आप की चाय का मजा लेंगे, मुझे देर हो रही है में चलती हू" असे म्हणून ती आपल्या मैत्रीणी बरोबर निघून गेली व मी काही क्षण तेथेच थांबलो व परत आपल्या रुम वर आलो, आल्या वर सर्व कपडे पाहीले तर जरा मी वैतागलोच अरे यार, कसला हा रंग, काय ही रंगसंगती, आणी ही विभाच्या नजरेतील अर्धवट रंग गेलेली सर्वात मस्त जिन्स. कोई बात नही १६०० गये पाणी में... व मी दिवस भर झालेल्या घडामोडीचा पुन्हा विचार केला तेव्हा आठवले की आपण आपल्या आवडीचे काही घेतलेच नाही ही सर्व निवड तर विभाची आहे, मी जरा दचकलोच व म्हणलो, राज बेटा जरा दुर रह ना.... अभी तो बहोत कुछ करना है"

जवळ दिवाळी आली होती सर्वजण आपापल्या घरी जाण्याची, कपडे खरेदी करण्याची अथवा सोने चांदी खरेदी करण्याचा प्लान तयार करत होते व मी मात्र विचार मग्न होऊन मागे गेलेल्या जिवनातील एक एक दिवाळाची आठवण काढून त्यावरच खुष होत होतो. मी जरा भुतकाळामध्येच मग्न राहू लागलो व कामामध्ये चुका करु लागलो, तेव्हा माझी गत ना घर का ना घाट का...... अशी झाली होती, एक दिवस असेच बसलो होतो केबीन मध्ये तर शर्माजींनी एक साप्ताहीक वाचन्यासाठी दिले तर त्या साप्ताहीकामध्ये भारतभर साज-या होणा-या दिवाळीची सचित्र माहीती दिली होती, एका पानावर महाराष्ट्रातील दिवाळीची माहीती व काही चित्रे दिली होती ते पाहताच कळत न कळत डोळ्यातुन काही आश्रु गालावर ओघाळत आले व ते मी फुसत असतानाच विभा माझ्या केबिनमध्ये आली व माझा मुड पाहून विचारु लागली " राज, क्या हुवा ? " मी " कुछ नही, तुम बता क्या काम था " पण तीने पिच्छा सोडला नाही व जवळ जवळ दहा मिनिटे ती माझ्या जवळ बसुन दिवाळीची माझी अडचण समजुन घेतली, व म्हणाली बस यही बात ? चल यह दिवाली हम मनायेंगे एकदम खुषी से " मी हसलो व म्हणालो " वह सब ठीक है, तुम बता काम क्या था " ती हसतच बाहेर निघून गेली व थोड्यावेळाने परत आली व म्हणाली "देखो परसो संन्डे है तब तुम पालम विहार आ जाना मेरे घर पे मुझे फोन करना वहा आ के वहां से में तुझे लेके अपने दिदी के घर चलूंगी वही पास में है, वह भी १० साल महाराष्ट्र में रही है मेरी अभी बात हुंई है उससे ठीक है ना" मी हो म्हणालो व विचार केला चल थोड्या ओळखी तर वाढतीलच अजून काय... मी होकार दिला.

रवीवारी जसा प्लान होता तसा मी विभा बरोबर तीच्या बहीणीच्या घरी आलो, एक छानसं तीन खोल्यांचे ते बसके घर, आतील रंगसंगती तथा सामान सगळे कसे एकदम व्यव्स्थीत. तोच तीची बहीण आली संजना. माझी ओळख करुन घेतली व मला सांगितले की तीने आपले काही शिक्षण नागपुरला घेतले होते व काही काळ ती पुण्यात देखील होती पण मराठी सध्या ती विसरली होती जे काही तेथे शिकलेली होती ते. त्यांच्या घरी दोन लहान मुली होत्या, त्या ही आमच्या गप्पा मध्ये सामिल झाल्या व कामाच्या विषयावरुन घरी असलेला संगणक ही मला दाखवला, त्यांनी तो नवीन घेतला होता. चहा व खान्यापीण्याचे सामान तयार करण्यासाठी त्या दोघी स्वयंपाक घरात गेल्या व मी ह्या लहान मुलीं बरोबर बोलत बसलो.
"आपका नाम क्या है बेटा " "मामा, मेरा नाम वीना है" मोठी मुलगी प्रथम बोलली व लगेच पाठून छोटी देखील " मेरा नाम अना है.. अनामिका" मी हसलो. थोड्यावेळातच त्या छोट्या मुली बरोबर तथा विना बरोबर गट्टी जमवली व त्यांच्याशी गप्पा मारु लागलो, मोठीचे वय नऊ वर्ष तर, छोटीचे वय सात वर्ष. दोघी Egilish मिडीयम शाळेमध्ये जात होत्या व बोलता बोलता माझ्या बोलण्यातील चुका काढत होत्या. चहा पाणी झाल्यावर विभाने सांगितले की ही संजना तीची मुंहबोली (मानलेली) बहीण. मी त्यांना म्हणालो खरोखर खुप दिवसानंतर मी एका घरगुती वातावरणामध्ये आलो व मला तुम्हाला भेटून आनंद झाला व तसेच तुमच्या मोठ्या मुलीने मला मामा बनवलेच आहे तर चला मला देखील भाऊबीज व राखी साठी येथेच एक बहीण भेटली व मी हसतच त्यांचा व त्या दोन छोट्या मुलींचा निरोप घेतला व विभा बरोबर तीला सोडण्यासाठी तीच्या घरापर्यंत गेलो.

1 टिप्पणी:

Smit Gade म्हणाले...

adhi hi post vachali ani maag shodhun shidun baki sagalya post vachalaya..trivar mujara..khup aatur ahe pudhache bhag vachanyas..aata jast tangate thevu naka...sagale liha