मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०१०

नैनिताल

नैनीताल, वाह ! हा एकच शब्द तोंडातून बाहेर पडतो जेव्हा आपण नैनीताल च्या पहाडी वर पोहचतो, सरोवरांचे शहर नावाने जग प्रसिध्द असलेले हे शहर नैनीताल, भारतात व जगात सर्वांत सुंदर हिल स्टेशन म्हणून ख्याती असलेले छोटे.. पण निसर्गाने मुक्त पणे उधळणं केलेले शहर. १९३९ मीटर उंची वर वसलेले हे शहर खरं तर इंग्रजाची देन भारताला, त्या जागेची सुंदरता व निसर्गांचा आविष्कार जगा समोर आणला ते पी बैरन ह्यांनी १९३९ मध्ये.


नैनीताल हे शहर नैनी झील (तलाव, सरोवर) च्या चारोबाजूला वसलेले आहे, अशी कथा आहे की जेव्हा भगवान शंकर सती मातेचे शव आपल्या खांद्यावर घेऊन तांडव करत होते तेव्हा जगाला वाचवण्यासाठी विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राद्वारे सतीच्या शवाचे तुकडे केले होते व सतीचा एक डोळा येथे नैनीताल मध्ये पडला व त्या डोळ्यामुळे नैनी झील (सरोवर) निर्माण झाले. नयन+ताल (ताल =सरोवर) नैनीताल. त्या तलावाचा आकार पण डोळ्या सारखाच आहे व उत्तर दिशेला सतीमातेचे सुंदर मंदिर आहे.
शहराचे दोन भाग आहेत एक मल्लीताल जो उत्तर दिशेला आहे व दुसरा तल्लीताल जो दक्षिण दिशेला आहे. मल्लीताल मध्येच देवीचं मंदिर आहे व १८४४ मध्ये बांधलेला चर्च पण.


नैनी तलाव हा १३५८ मीटर लांब व चौड़ा ४५८ मीटर आहे व ह्यांची जी खोली लिहली आहे तेथे बोर्ड वर ती १५ -१५६ मिटर आहे, ह्या तलावाचं वैशिष्ठ असे आहे की ह्या तलावामध्ये तुम्हाला आजू बाजूला असलेल्या पर्वतरांगेचे, जंगलाचे पुर्ण प्रतिबिंब पहावयास मिळते. ह्या सरोवराचे वैशिष्ट म्हणा अथवा निसर्गाचा चमत्कार उन्हाळामध्ये पाणी हिरव्या रंगाचे, पावसाळ्यात हल्का कॉफी कलर व थंडीच्या दिवसामध्ये निळा.. सरोवर मध्ये तुम्हाला विविध पक्षी दिसतात, सरोवर मध्ये जाण्यासाठी व फिरण्यासाठी बोटी व नावाची सुविधा आहे नाममात्र शुल्क घेउन तुम्हाला सरोवरची सफर घडवतात. टेनिस, पोलो, हॉकी, फुटबाल, गॉल्फ, मासेमारी और नौका प्रतियोगिता असे अनेक खेळ नैनीताल मध्ये वर्षभर चालू असतात जे पाहण्यालायक आहेत.


पर्यटकांसाठी नैनीताल म्हणजे स्वर्ग आहे, निसर्ग पाहण्या बरोबरच येथे खरेदी करण्यासाठी पण गर्दी उडते, तिब्बती बाझार मध्ये तुम्ही देशी-विदेशी सामान एकदम स्वस्त मध्ये विकत घेऊ शकता. तेथे जाण्यासाठि मार्च ते जून हा सर्वोत्तम कालावधी आहे पावसामध्ये पण जाऊ शकता पण बदलत असलेल्या हवामानाची सवय असावी लागते, जर तुम्हा ह्याची सवय आहे तर निसर्गाचा मनसोक्त आनंद घेउ शकता. रेल्वे ने जर जाणार असाल तर जवळचे रेल्वे स्टेशन हे काठगोदाम आहे व एअरपोर्ट जवळ म्हणजे पंतनगर एअरपोर्ट. दिल्ली हून ३३० किलोमीटर आहे व तुम्ही येथून गाडी अथवा बस ने जाऊ शकता.


* सर्व छायाचित्रे गुगलचित्रसेवा द्वारे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: