तो- अरे बाबा खुप सुखी आहेस रे.
मी- कारे असं का वाटलं तुला ?
तो- तुझं लग्न झाले नाही ना त्यामुळे.
मी- अच्छा.. म्हणजे ज्याचे लग्न नाय झालं तो सुखी ?
तो- नाय तर काय.. परवाची गोष्ट तो व्ही-डे काय विसरलो घरात महाभारत चालू आहे, तीने मला धुतला.
मी- तु व्ही- डे विसरलास लेका ? चांगले केले धुतला ते.
तो- अरे कामाच्या रगाड्यात विसरलो त्यात काय येवढे..३६४ दिवस प्रेम व्यक्त करतोच ना मी काही ना काही तरी करुन.
मी- काय झालं व्यवस्थीत सांग.
तो- शनिवारी सकाळी तीने मला हसून चहा दिला बेड वरच.
मी- मग, तु काय केलं.
तो- नेहमी पेक्षा त्यात साखर जास्त होती, म्हणून मी म्हणालो साखरेचे भाव खुप वाढले आहेत.. जपून वापरा.
मी- धत्त तेरी की.. पुढे.
तो- ति तनातना गेली पाय आदळत.. पुढील पंधरा मिनिटात काचेचे ग्लास व कप बश्या सगळ्या फुटल्या.
मी- तु वाचलास ना ?
तो- नाही ती किचन मध्ये भांडी धुत होती, मी नाष्टा मागीतला.
तो- जळलेला परठा व आंबट दही दिले.. लोंणचं पण नाही दिले यार.
मी- येवढं झालं तरी तुला आठवलं नाही की काहीतरी आज खास डे आहे ते ?
तो- अरे आज काल माझा गझनी झालेला आहे, नेहमी काहीना काही विसरतो, मार्केट मुळे डोक्यात पक्त भाव वरखाली वरखाली चालू असतात.
मी- अरे येड्या, लेका तुला किती दा सांगितले की ३.३० मार्केट बदं. डोक्यातनं सगळे बाहेर काढायचं लगेच.
तो- बरोबर आहे रे पण, त्या दिवशी मार्केट पण चालू नव्हतं सुट्टि होती, तरी देखील आठवलं नाही.
मी- तु मिपा वर नाही आला होतास का ? बुंदी पाडल्या प्रमाणे कविता-लेख पाडले होते यार व्हि-डे वर.. ते वाचून तर तुझ्या डोक्यात आलं असंतच.
तो- अरे मी मिपावर नाही आलो त्या दिवशी , जमलंच नाही.
मी- मग दुपारचे जेवण पाठवले तीने तुला ?
तो- नाही. मी फोन केला घरी व विचारले तर म्हणाली डोबंल तुझं... जेवणासाठी फोन करतयं येडं.
मी- अरे बापरे... म्हणजे जेवण कलटी ? तुझ्या ऑफिस मध्ये कोणीच नव्हतं का ? आसपास तुला कुठली खुण नाही दिसली व्हि-डेची ?
तो- अरे, शनिवार... एखाद दुसरा आजोबा सोडला तर ऑफिस मध्ये कोणिच येत नाही.. त्यात एयरटेलची लाइन खराब होती नेट पण चालू नव्हतं.
मी- ह्म्म. मग संध्याकाळी तू सरळ घरी गेला असणार.
तो- नाही यार लफडा तेथेच झाला.. एका मित्राचा फोन आला, खांदा मागत होता.
मी- अरे अरे, कोण गेलं ?
तो- अबे, कोणी गेलं नाही, तो म्हणाला मला रडायला हक्काचा खांदा हवा.
मी- असं काय... मग ठीक आहे, पुढे.
तो- मग काय मी खांदा दिला त्याने खंबा दिला.. माझाच आवडता ब्रन्डचा.
मी- म्हणजे तु टल्ली.
तो- नाही जास्त नाही पिली काहीच पॅग मारले तो रडता रडता व्हि-डे च्या आवशीला शिव्या देत होता.
मी- का ?
तो- त्याच्या बायकोने त्याला घरातून बाहेर काढलं होतं.
मी- का रे ?
तो- तो व्हि-डेला गिफ्ट नाही घेऊन गेला म्हणुन. तेव्हाच माझी पण ट्युब पेटली.
मी- बरं झालं तुला वेळीच आठवलं.
तो- अरे नाही यार, आठवलं खरं पण रात्री ९ ला दुकान कुठले उघडे असणार.
मी- मग तु काय केलंस.
तो- शहर भर भटकलो रात्री ११ पर्यंत.
मी- मग काही मिळाले का गिफ्ट.
तो- नाही पण एके जागी, नवीनच पॅक केलेले बुके पडलेले दिसलेले... चुकुन पडले असावे अथवा कोणी तरी रागाने फेकले असावे.
मी- मग काय केलंस तु ?
तो- मी ते बुके उचलले व त्याला व्यवस्थीत केले व तेच घरी घेऊन गेलो.
मी- धन्य आहेस, पुढे.
तो- दहा मिनिटे तीने दरवाजाच उघडला नाही, पण उघडल्यावर मी तीला ते बुके दिले व हॅप्पी व्हि-डे विश केला स्टाईल मध्ये.
मी- ती खुष झाली असणार मग.
तो- नाही, काय नुस्तेच बुके म्हणुन तीने ते बुके सोफ्यावर टाकले.
मी- मग काय झालं बॉ !
तो- त्या बुक्यातून एक छोटंस कार्ड बाहेर पडलं ते तीने उचललं व सरळ किचन मध्ये गेली.
मी- किचन मध्ये का ? चहा करायला गेली असेल तुझ्या साठी तु कार्ड मध्ये काही तरी चांगले लिहले असणार... ती पाघळली... ह्या बायका अश्याच.
तो- डोबंलाचं पाघळली, आत जाऊन एक खराटा व लाटणं घेऊन आली.... काली मातेच्या अवतारामध्येच सरळ एन्ट्रीं.
मी- का ? ती का भडकली रे ?
तो- अरे तीने अर्धा तास धुतल्यानंतर मला विचारले ही "राधिका कोण" म्हणून.
मी- आता ही राधिका कोण यार.. मध्येच आली ?
तो- अरे ते बुके कुठल्यातरी राधिकेने आपल्या जानु ला गिफ्ट केलं असणार त्यात " जानु, आय लव्ह यु - राधिका." लिहले होते.
मी-
तो- लेका राजा हसतो आहेस काय.. आता मी काय करु ? परवा पासून तीने जेवायला सोड.... चहा पण नाही विचारला .
मी- ह्म्म्म एक काम कर, एखादं नेकलेस गिफ्ट कर... जरा तीला खुष कर... मग हळुच सांग तु ते बुके कुठून आणलं होतंस ते व का !
तो- म्हणजे एका बुक्याची किंमत कमीत कमी पस्त्तीस हजार
मी- लेका एवढ्यातचं भागलं तर ठीक.. नाय तर किती शुन्य वाढतील पुढील व्ही-डे पर्यंत ते तुला काय त्या ब्रम्ह देवाला पण नाय कळणार... !
तो- ह्म्म ठीक. बघतो ट्राय करुन आज. सांगेन तुला उद्याच.
मी- चल. निघतो आता अजून एकाला खांदा देणे आहे, वाट बघत आहे बिचारा