सोमवार, २९ मार्च, २०१०

बंद मंदिरातील धर्म..

बंद मंदिरातील धर्म.. खरं हे हे शिर्षक चुकीचेच वाटत आहे मला तर येथे उघडा मंदिरे अथवा उघडदार देवा आता उघड दार असे काही शिर्षक द्यावे असे वाटत आहे त्याला कारण ही तसेच आहे हा जैन धर्म.. हो मी जैन धर्माविषयी बोलतो आहे ज्या धर्माचा शेवटचा तिर्थंकर, प्रवर्तक २५०० वर्षापुर्वी होऊन गेला व ज्याची जयंती आज भारतभरातील जैन बांधव उत्साहाने व आनंदाने साजरी करतात तो धर्म म्हणजे जैन धर्म. गेली हजारो वर्ष हा धर्म मंदिरात अडकून आहे. पराकोटीच्या अहिंसेचे समर्थन करणारा हा धर्म.

jain dharma

णमो अरिहंताणं।
णमो सिद्धाणं।
णमो आइरियाणं।
णमो उवज्झायाणं।
णमो लोए सव्वसाहूणं॥


अरिहंतांना नमस्कार, सिध्दीनां नमस्कार, आचार्यांना नमस्कार, उपाध्यांना नमस्कार व सर्व साधुनां नमस्कार अशी पाचं परमेष्ठींना नमस्कार करावयास सांगणारा जैन धर्म !

कधी काळी तिर्थंकारांनी जैन म्हणजे काय हे सांगितले, त्यांचे कर्तव्य काय हे सांगितले व अतिंम ध्येय मोक्ष कसा मिळवावा ह्याचे मार्गदर्शन केले. जैन म्हणजे ज्याने मनावर विजय मिळवला आहे असा अथवा सर्वसाधारण ज्यांने मनावर विजय मिळवला तोच जैन ! ऋषभदेव पासून महावीरांपर्यंत सर्व २४ च्या २४ तिर्थिंकरांनी ह्याचेच सुतोवाच केले. अहिंसा हा धर्माचा मुल धर्म, मार्गदर्शन. नमोकार मंत्र म्हणजे जिवनात नम्र रहा ह्याची शिकवण व अतिंम ध्येय म्हणजे मोक्ष, ज्या जिवन मरण चक्रापासून मुक्ती व त्या परमशक्तीमान अश्या देवाच्या मध्ये एकरुप होऊन मुक्त होणे. एवढे साधेसोपे तत्वज्ञान असलेला हा धर्म बाकीच्यांना गुढ, विचित्र व वेगळा का वाटतो तर ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे हा धर्म नेहमी मंदिरामध्येच बंधीस्त राहीला पुजारी व मुनी मंडळींनी त्याला कधी सामान्य जनतेपर्यंत पोहचू दिला नाही अथवा तसा प्रयत्न केला नाही. सुरवातीच्या काळी ह्या धर्माला प्रचंडमोठ्या प्रमाणात राजश्रय मिळाला, रोज रोज होणारी युध्दे व अपरिमित मनुष्य व धन हानी ह्यापासून मुक्ती देणारा हा धर्म त्यामुळे हा शेवटपर्यंत पुर्ण राजश्रय मिळालेला धर्म ! शक्यतो ह्याचे कारण पण हेच असावे कि २४ च्या २४ तिर्थंकर हे राजकुमार अथवा राजा होते.

कधीकाळी जैन धर्मात मुर्तीपुजनास स्थान नव्हते पण जसा जसा धर्म वाढत गेला तस तसे ह्यात विभाग पडत गेले व दिगंबर जैन, श्वेतांबर जैन व तेरापंथी सारखे उपशाखा निर्माण झाल्या. ज्या तिर्थंकरांनी मोक्ष प्राप्तीसाठी घनदाट जंगलामध्ये अथक कष्ट घेऊन तप केले त्यांना ह्यांनी मंदिरात बसवले !

खुप सुंदर अश्या संगमरवर मंदिरात अतिशय देखणी जिन मुर्ती पाहण्याचे भाग्य हे फक्त जैनांनाच होते, व आज देखील आहे सर्व जागी नाही पण काही जागी नक्कीच सामान्य जनतेला प्रवेश नाही दोन उदाहरणे सांगतो एक खुप आधी जेव्हा मी अयोध्येला गेलो होतो तेव्हा...

अयोध्या, जैनाच्या पाच तिर्थंकरांचे जन्मस्थान ! हो आमचे काही तिर्थंकर रामाचे पुर्वज तर काहीचा राम पुर्वज असे मानले जाते त्यामुळे हिंदु धर्मात जेवढे महत्व अयोध्येचे आहे तेवढेच महत्व जैन धर्मात देखील आहे. तर अश्या ह्या जैन धर्माच्या पंढरीमध्ये मी पाच वेगवेगळ्या मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर मला मी दिगंबर जैन आहे हे सांगून सुध्दा प्रवेश नाकारला शेवटी मला त्याला नमोकार मंत्र पठन करुन दाखवावा लागला व काही तिर्थंकरांची नावे सांगावी लागली नशीब माझे मी जैन हॉस्टेल मध्ये शिकलो होतो म्हणून तेवढे आठवत होते नाही तर मी जैन आहे हे सर्टिफिकेट घेऊन मला फिरावे लागले असते.

दुसरा अनुभव, माझे काही विदेशी मित्र भारतभ्रमणसाठी आले होते त्यावेळी त्यांना घेऊन मी मथुरा बघावयास गेलो होतो तर जाताना रस्त्यात एक जिनालय आहे थोडेसे आड वाटेला आहे पण सुरेख असे निसर्गाच्या सानिध्यात आहे त्यामुळे ते संदुर ठिकाण त्या मित्रांना देखील दाखवावे म्हणून तेथे घेऊन गेलो सर्व प्रवेश प्रक्रिया पुर्ण झाली व आम्ही आत गेलो तर मला सांगण्यात आले की बाकीच्यांना प्रवेश नाही फक्त तुम्ही जाऊ शकता. ती ट्रिप जैन मंदिर न बघताच पुर्ण झाली हे सांगणे गरजेचे नाही.

गुडगांव मध्ये दिगंबर जैनांचे मोठे स्वामी, मुनी बाहुबली स्वामी ह्यांचा आश्रम आहे व त्यांचे जन्मगाव हे माझे आजोळ त्यामुळे तेथे मला जरा प्रवेशाला अडचण नव्हती मी त्यांच्याकडे गेलो व वरील अनुभव सांगून म्हणालो असे का ? त्यांनी धर्म, पवित्रता अशी काही ठेवणीतील कारणे दिली तेव्हा मी त्यांना भारतीय राजघटनेने दिलेले अधिकार सांगितले तर ते म्हणाले की प्रवेश आम्ही नाकारतो असे नाही पण आमचे पुजेचे व मंदिराचे नियम खुप कडक आहेत ते पाळले जात नाही म्हणून आम्ही थांबवतो. मग त्यांना २००१ मध्येच त्याच आश्रम मध्ये प्रवेश घेण्यासाठी मला स्वतःला पुरावे व वाद घालावा लागला होता व त्यांना स्वतः त्यात मध्यस्थी करावी लागली होती ह्याची आठवण करुन दिली व त्यांना विचारले की " टिशर्ट व जिन्स घातली म्हणजे धर्म कसा बाटतो ह्याचे विष्लेशन करा कृपा करुन." हॅ हॅ हॅ ठरले होते संध्येचे व ध्यानाचे कारण देऊन माझी बोळवणी करण्यात आली.


क्रमशः

शनिवार, २७ मार्च, २०१०

१ तास..

आज अर्थ अव्हर म्हणून आपण मी मराठी संकेतस्थळ एक तास ८.३० ते ९.३० बंद ठेवले व एका नव्या प्रयोगास सुरवात केली. हवे तर एखादे चित्र टाकून, मुखपृष्ठ सजवून आपण हा दिवस साजरा करु शकलो असतो पण काल मस्त कलंदर हिचा धागा व निखिल देशपांडे ह्यांनी अर्थ अव्हर मोड्युअल बद्दल सांगितले व मनात आले आपण हा प्रयोग करायचा. ह्यांने काय होईल, काय फरक पडेल सदस्य काय म्हणतील हा विचार बाजूला ठेवून हा निर्णय घेतला व एका प्रयोगास हातभार लावल्याचा आनंद मिळाला.

काही ठिकाणी ह्या प्रयोगाची खिल्ली उडवली गेली व काही जणांनी सरळ विचारले काय मिळाले हे करुन ? तर वर म्हणालो तसे एका प्रयोगात सहभागी झालो ह्यांचा आनंद मिळालाच पण आपल्या संकेतस्थळावरील वाचक व सदस्य ह्यांना आपण वेळेवर आठवण करुन देण्यात देखील यशस्वी झालो. इनमीन ताशी २००-३०० पानं पाहीली जाणारी आपली साईट व ताशी १०० एक वाचक व सदस्य असलेली साईट ह्यांनी आपले संकेतस्थळ एक तास बंद ठेवला म्हणून काय फरक पडला ग्लोबल वॉर्मिंग मध्ये ?

'प्रत्येक गोष्टीची सुरवात ही लहानच असते, शुन्यातून विश्व निर्माण होते' ह्या वाक्यावर माझी श्रध्दा आहे व हाच विचार डोक्यात घेऊन आपण हा प्रयोग केला. जर आपल्या सदस्यांपैकी / वाचकांपैकी एकाने जरी हा २०१० चा अर्थ अव्हर पाळला असेल तर तर आपण नक्कीच यशस्वी झालो आहोत ह्या प्रयोगात व हीच आपली सुरवात आहे. भारतासारख्या जेथे वीजेचा प्रश्न पाण्याच्या प्रश्नाप्रमाणेच गंभीर आहे तेथे असले अर्थ अव्हर पाळून काय होणार असा देखील एक सुर समाजात जाणवतो पण अश्या प्रयोगामुळे समाजामध्ये जागृती येते, ठीक आहे आपल्याकडे वीजेची टंचाई आहे पण जी आहे ती तर आपण जपून वापरायला शिकू अश्या प्रयोगामुळे त्यासाठी हा सगळा अट्टाहास. आजच्या ह्या एका तासामुळे आपण किती वीज वाचवली हे महत्वाचे नाही आहे पण आपण कमीत कमी वीज वाचवण्यासाठी सुरवात तरी केली हे महत्वाचे. आजचा दिवस संपला म्हणजे प्रयोग संपला असे नाही आपण वेळोवेळी अश्या प्रकारच्या सामाजिक बदल घडवणार्‍या प्रयोगांना समर्थन देऊ व शक्य तेवढा त्याचा प्रचार देखील करु.

इतर फालतु डे आपण आनंदाने व उत्साहाने पाळतो त्याच उत्साहाने व त्यापेक्षा द्विगुणीत आनंदाने हे असे सामाजिक उत्सव आपण पाळले पाहीजेत जेणे करुन आपली येणारी पिढी सुखाने ह्या धरतीवर श्वास घेऊ शकेल.

http://www.earthhour.org/ ही संस्था ह्यावर कार्य करत आहे व ह्यांनी जे मोड्युअल तयार करुन दिले होते ते वापरुन हा मराठी संकेतस्थळावर नवीन प्रयोग यशस्वीपणे राबवला त्यांचे व ड्रुपल चे अनेकानेक धन्यवाद.


***

आपण कसा व कश्या पध्दतीने अर्थ अव्हर पाळला व इतरांना तो पाळण्यासाठी कसे प्रोत्साहित केले ह्या बद्दल आपण जरुर लिहा.


धन्यवाद.

मी मराठी,
व्यवस्थापक.

हरवलेली पानं.... भाग - १

प्रस्तावना :- मनोगत :- जे काही म्हणायचे आहे ते :-

मागील आठवड्यात निखिल देशपांडे ह्यांनी माझ्या एका जुन्या लेखाचा हरवलेला धागा मला समोर आणून दिला व आज मी तो लेख " एक सोडून.... " लेख लिहला. जेवढे लेखन मी आजपर्यंत मराठी महाजालावर केले असेल त्यात कुठे ना कुठे सत्याचा अंश होता. माझी सफर ही लेखमाला वाचून चतुरंग ह्या सदस्यांने मला प्रतिसाद दिला होता त्याचा पुर्ण भाग आठवत नाही पण एक वाक्य नक्कीच होते, जीवन हे सफरचंदासारखं नसतं ! कुठून ही सुरवात करा.. गोडवाच मिळेल... असे नक्कीच नसते.... अशीच काही पानं मागे राहीली होती.. माझी सफरची सुरवात अशीच कुठेतरी मागे राहीली होती.. कारण काही पानं अशीचं हरवली होती.. काही पाने मुद्दाम मी झाकून ठेवली होती तर काही काळाच्या आड नकळत गेली होती.. ती आज अशीच मनावर ठसठसीत होती म्हणून हे सर्व काही... भाग किती, क्रमशः किती.. मला नाही माहीत, माझे सफरचे २० भाग झाले होते ते देखील अगदी अजाणतेपणे.. हे तर मी जाणूनबूजून लिहीत आहे त्यामुळे नक्की माहीत नाही कधी व कुठे थांबेन ते.. पण सुरवात आज नक्की करायला हवी आहे, उद्या जाताना मनात शल्य नको... !

काही जणांना वाटतं हे सगळे असे का ? हा राजे उर्फ राज जैन जो आज आपल्या समोर उभा आहे तो असा नसावा, माझी सफर लिहली मी तेव्हा मी वेगळा होतो व आज आहे त्यापेक्षा नक्कीच वेगळा होतो, एक तप पुर्ण झाले आहे. एखाद्या गोष्टीकडे तटस्थपणे पाहण्याची नजर मला कर्मामुळे, नशीबामुळे वयाच्या हिशोबाप्रमाणे जरा लवकरच मिळाली. ज्यांनी माझी सफर वाचली नाही त्यांना शक्यतो काही संदर्भ लागणार नाहीत पण ठीक आहे कधी ना कधी वाचतील व त्यांना मी काय म्हणतो आहे हे कळेल. असे नाही आहे मी सर्व जागी एकदम बरोबर आहे कुठे कुठे नक्की मी चुकत असेन चुकलो असेन नाही असे नाही पण हे जीवन मला असेच कळले व जसे कळले त्या शब्दात मी येथे लिहीत आहे, आईने कधी मध्ये रागामध्ये, प्रेमामध्ये ह्या गोष्टी सांगितल्या व मी तश्याच जगत आलो त्यामुळे शक्यतो कुणाची मने दुखावतील कोणाच्या हदयास घाव होईल, पण जेव्हा मुक्त होणे ठरवले आहेच तर सर्व गोष्टींना सामोरे जाणे हे माझे कर्तव्य आहे. म्हणून जे सत्य आहे तेच लिहीत आहे.. परवा पाय तुटला म्हणून घरी पडून होतो.. कधी कळून नये त्या गोष्टी कळाल्या.. तिळतिळ तुटावे असा हाल झाला... त्याचा परिणाम समजा अथवा आत्म्याची हाक...

*************

कधीतरी डोळे उघडले असतील जेव्हा मी जन्मायला आलो तेव्हा, विश्व म्हणजे काय हे डोळे उघडून पाहण्याचा प्रयत्न केला असेल तेव्हा माझ्यासमोर माझी आई, मावशी व मावशीचा नवरा सोडून कोणीच नव्हते. कुठेतरी इंचलकरंजी सारख्या खेडेगाव वजा शहरामध्ये मी जन्मलो. ते ही मावशीच्या घरी. एका खोलीत संसार तेथे एक जीव नवा. सांगायला व वाचायला सोपं वाटतं पण जगणे म्हणजे नरक हे समजणे खरोखर अशक्य हे समजणे थोडे फार नक्कीच अवघड आहे.

माझी आई, कधीतरी बालविवाह कायदा जुमानत नव्हता तेव्हा लग्न झालेलं, घरात जास्त कोणी शिकले नसेलले तरी रुढारुढ परंपरेपासून दुर असे माझे अजोळ पण कसे काय त्या विवाहास तयार झाले देव जाणे, जेथे लग्न ठरवले होते तेथे मानपानावरुन कसल्याश्या गोष्टीवरुन वाद झाला व वादाचे रुपांतर लग्न मोडण्यापर्यंत झाले, आजोबानीं देखील रागाच्या भरात लग्न तोडले. कुठेतरी कोल्हापुरामध्ये एका कपड्याच्या दुकानामध्ये काम करणारा घरदार सोडून दुरवर राहणारा कोणीतरी सांगितला म्हणून त्याला जावई करुन घेतला, घर काय, घराची अवस्था काय, घरात आहे काय, मागे कोण, पुढे कोण, काय नाही आहे काय, काय आहे, मुलगी जगणार कशी, राहणार कुठे ह्याचा सारासार विचार न करता रागाच्या भरात लग्न लावून दिले. लग्नाच्या पहिल्याच दिवशी महाशय तर्र होऊन घरी परतले होते व तो दिवस व शेवटचा दिवस ना ती दारु सुटली ना आईच्या मागच्या दारुची पिंडा... लग्नानंतर काही दिवसामध्येच दारुपायी मंगळसुत्र विकले गेले..

लग्नानंतर घर म्हणजे विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर, असे दिवस काढले तीने, कधी ही खोली कधी ती खोली, कधी शिवाजी पेठ, कधी मंगळवार पेठ कधी बुधवार पेठ तर कधी शुक्रवार पेठ. पण समाधान नाही तीच्या जीवाला, एकाचे दोन जीव झाले तरी साहेब काय सुधरावयास तयार नाहीत, शेवटी कसे बसे मावशीच्या नवर्‍याने इचलकरंजीमध्ये नोकरी लावली व आमचे शब्दश: घर... नाही उरलेले जपलेले, चार तांबे, दोन ताटे, एक स्टो, दोन सतरंजी, व दोन-तीन चादरी अक्षरशः गोळा करुन आपला वाड्यात एक खोली टाकले व त्यांचा संसार उभा केला, तेव्हा आईला दिवस गेलेले व महाराज नेहमी नशेमध्ये चुर, पगार मधल्यामध्ये कुठे गायब होत असे ते देखील कोणास कळायचे नाही. दुसर्‍याच्या घरादारची भांडी व कपडे-धुणे करुन काबाड कष्ट करुन आईने पोटात मला वाढवले. कसेबसे मी दोन वर्षाचे झालो तोच ताई पण घरात आली ते पण जीव घेणे दुखणे घेऊन, कसेबसे देवाची कृपा होती म्हणून वाचली व दोन महिन्यानंतर घरी आली, माझ्या पाठची पण सगळेच ताई म्हणायचे तिला म्हणून मी पण.

आई गावभर लोणी व तुप गोळा करायची व आठवडी बाजारासाठी ते तुप व लोणी डोक्यावर ठेऊन चालत १६ किलोमीटर दुरवर असलेल्या सदलगा ह्या गावी विकायला घेऊन जायची. काखेत ताई व चालत मी ! किती चालणार मी पण.. शेवटी रडारड, मग एका बाजूला अक्का व एका बाजूला मी वर डोक्यावर कपड्यांचा गठ्ठा व त्यात कुठेतरी तुप व लोणी. कपडे विकणे व त्याच बरोबर लोणी व तुप विकणे हा जोड धंदा. आठवड्यातून एकदाच पण तीची बिचारीची फरफट व्हायची ह्यामध्ये, दोघे लहान कधी ताईचे रडणे कधी माझे, हट्टी लहानपणापासूनच मी त्यामुळे प्रचंड त्रास. चार पाऊले चालले नाही की मला उचलून घे हा घोष. व राहीले बाबा, त्यांचे भावविश्वच वेगळे, ते कुठे असायचे व कुठे नाही देवाला माहीत. कधी मन केले तर दारुच्या दुकानात कामाला तर कधी हातमागावर....

हळुहळु मी देखील मोठा झालो, बाबा व आई परत कोल्हापुरला आले राहण्यासाठी. शिवाजी पेठेत. काय झाले काय माहीत पण माझे आजोबा म्हणजे माझ्या आईचे वडिल कधी आमच्या घरी आलेच नाहीत. पोरीला चुकीच्या हातात दिले ह्याचे शल्य की काय देव जाणे पण ते कधी फिरकलेच नाहीत कोल्हापुरकडे.. मरे पर्यंत ! माझी शाळा जवळच, मंगळवार पेठेत. केजी बीजी काय नव्हतं त्यावेळी. सरळ पाच वर्षांनी पहिलीत प्रवेश. मला जास्त नाही आठवत पण कधी कधी आई सांगायची एकदा प्रवेश घेण्यासाठी बाबा शाळेत गेले होते ते परत कधीच गेलेले नाहीत शाळेत. बाबांना मदत व्हावी म्हणून आईने घरी शिवण मशीन आणले तेव्हा असेन मी ४-५ वर्षाचा ते मशीन सरळ पाठीचा मणका दुखावला तेव्हाच बंद झाले नाही तर आहोरात्र चालूच होते... !

काही गोष्टी मला हळूहळू कळत होत्या पण अक्का पाठची तिला काहीच कळत नसे व तिला काही हवे नको ते मला व माझ्या ताकतीबाहेरचे असेल तर आईला सांगणे... एवढंच तिला कळायचे. आज तिला आठवत ही नसेल, कीती वेळा तिला सफरचंद हवेत म्हणून मी अंबाबाईच्या मंदिरासमोरील मार्केट मधून फेरीवाल्यांच्याकडून चोरली असतील व किती वेळा मला हवे म्हणून चिक्कू चोरले असतील. शाळेत प्रवेश झाला त्या दिवशी शक्यतो माझे आई-वडील एकत्र शाळेत आले असतील त्यानंतर कधीच नाही बाहूबली हॉस्टेलपर्यंत..तर नक्कीच नाही.. कारण मी गायब होतो म्हणून आले होते मी नसताना.

एक खोली, त्यातच किचन त्यातच बेडरुम व त्यातच बाजूला दोन-तीन फुट उंच भिंत बांधून केलेली बाथरुम. संडास कुठेतरी खाली नाहीतर सार्वजनिक. हे असे आमचे घर. चुल ठेवायला परवानगी नाही म्हणून स्टोव्ह. अल्युमिलियमची भांडी व स्टिलची दोन-चार ताटं.. आज नवल वाटतं तीने तो संसार कसा निभावला असेल.. कशी ती जगली असेल.. ती त्यावेळी.

शाळेतील सहली व शाळेतील जगणे हेच भावविश्व तेव्हा देखील व नंतर देखील. आम्ही कोठे ही गेलो तर माझी ताई माझ्याबरोबर असे. शाळेत हुषार, पहिले ते सहावी पर्यंत कधीच एक नंबर सोडला नाही कधी तरी दोन नंबर पण पहिल्या दोनात मी नक्कीच असे. शाळेतील शिक्षकांचे, मॅडमचे तेवढेच प्रेम... पण माझ्या एवढा दंगेखोर व टवाळखोर दुसरा कोणीच नव्हता शाळेत. त्यामुळे रोज मार व रोज ओरडणे. घरी आले तर गल्ली भर मस्ती करुन झालेली असायची. कधी बाबांनी माझा अभ्यास घेतला असावा असे आठवत देखील नाही, ना मला ना ताईला. हा पण मार मात्र प्रचंड खल्ला असेल, ताईने कमीच, शक्यतो नाहीच, पण मी मात्र... हिशोब नाही !

आधी शिवाजी पेठ ते मंगळवार पेठ व नंतर काही दिवसानंतर बुधवार पेठ ते मंगळवार पेठ, आम्ही चालत शाळेत यायचो, मी ताईचा हात पकडायचो व शाळेत आल्यावर सोडायचे. आमची रुपा खुप हुषार, माझ्यापेक्षा ही खुप हुषार अनेक पट्टीने, तिला चांगले काय वाईट काय लगेच समजायचे, खुप गोड.. पण माझ्या मनात नेहमी गोंधळ चाले, मी दंगा केला असो वा नसो बाईनीं बोलवले असो वा नसो माझे बाबा कधी शाळेत आलेच नाहीत. मात्र घरी मात्र मार कधी चुकायचा नाही, काही करो वा न करो, त्यांचा राग कुठेतरी नक्कीच निघायचा... त्यांची माझी काय दुश्मनी होती देवास ठाऊक. पण कधी जवळ घेणे नाही ना कधी प्रेमाने डोक्यावर हात फिरवणे नाही, नाही म्हणायला कसे काय कोण जाणे मी लहान असेन तेव्हा किती ते पण आठवत नाही व ताईला देखील आज आठवणार नाही, कधीतरी असे अचानक आम्हाला सहपरिवार आई, मी व अक्काला गोव्याला घेऊन गोव्याला आले, शक्यतो बाबांच्या बरोबर ह्या जन्मातील ती पहिली व शेवटची ट्रिप असावी ती आमची, त्यामुळे असेल नक्की माहीत नाही, पण मला ती ट्रिप नक्की पुर्ण आठवते, ते बीच, ते चर्च व तो दोना-पावला बीच जेथे बाबांनी त्यांची गोष्ट सांगितली होती व नंतर मोठे झाल्यावर कळाले होते की एक दुजें के लिए हा चित्रपट त्याच गोष्टीवर बेतला होता. ह्या नंतर असंख्य वेळा गोव्याला गेलो असेन पण दोना-पावला बीचवर कधी चुकून पण पाऊल नाही ठेवले आज देखील.

दहावी बारावीला मी टॉप करेन असा आत्मविश्वास माझ्या शाळेतील सरांना, मॅडमना देखील होता, आत्मस्तुती नाही पण जवळ जवळ प्रत्येक प्रश्नाचे उत्तरासाठी माझा हात वर असे व परिक्षेत देखील मी नेहमीच वरचढ असे... जवळ जवळ पहिली ते पाचवी-सहावी पर्यंत तरी नक्कीच... सायन्स असो वा ईतिहास.. नाहीतर भुगोल नाहीतर गणीत.. व्याकरण व इंग्रजी ह्यामध्ये जरा तडफडायचो पण कच्चा नक्कीच नव्हतो. नुतन मराठी विद्यालय सुटले व कधी जाउन बाहुबली हॉस्टेल मध्ये पडलो ते कळालेच नाही, आईचे शिलाई मशीन कधी थांबलेच नाही, रोज बाहेर असलेली सवत, ती दारु कुठल्या अंगाने घरात शिरली ते देखील आईला कळालेच नाही. रोज बाहेर घेणारे बाबा आजकाल घरात बसूनच बाटलीवर बाटली गटकवू लागले.कष्टाचे दिवस कमी झाले असे मनात येऊपर्यंत अपार कष्ट समोर येऊन पडले. लोकांच्या परकर व पिकोफॉल करण्याच्या कामावर घर चालणार नाही हे आईला लवकरच उमजले व तीने खानावळ चालू केली, हॉस्टेलमध्ये माझी पळापळ, घरात आई सोडून कुणालाच मी नको आहे ही भावना ह्यामुळे प्रचंड तगमग व त्यावर उपाय म्हणून रोज सकाळी उठून हॉस्टेल मधून पळण्याचा प्लॉन, फसला की मार, परत दुसरा दिवस परत दुसर प्लॉन.. ! आई जवळ जाणे हा एकच ध्यास, त्यावेळी कोणास ठाऊक कोणाला समजला नाही किंवा उमजला नाही, आई शिवाय राहणे शक्यच नव्हते ना.. रोज तीचीच सवय सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपूपर्यंत.

पण ते माझे भाव विश्व कोणास समजलेच नाही मी रोजच्या रोज निगरगट्ट होत गेलो, एकदा तर हॉस्टेल मधून चांगले चार दिवस पळून गेलो ना घरी गेलो ना हॉस्टेलमध्ये परतलो... पाचव्या दिवशी आईचीच आठवण जीवावर आली म्हणून परत ग़ंगावेशेत येऊन उभा राहीलो, पण ते चार दिवस दाजीपुरच्या जंगलात एका १२-१३ वर्षाच्या पोराने कसे काढले असतील ते येथे लिहणे शक्यपण नाही व मला लिहणे देखील. त्यानंतर आमचे जीवन जसे ढवळून निघाले, हॉस्टेल मधून मी परत कोल्हापुरात आलो व बाबांनी पण नोकरी सोडून कपड्याचा स्टॉल महाद्वार रोडवर घातला होता, आईचे काम देखील चालूच होते, दिवसभर मशीनवर परकर शिवणे, पिकोफॉल करणे... व सकाळ संध्याकाळ पिसीआर हॉस्पिटलच्या शिकाऊ डॉक्टर ना डब्बा पोहचवणे.. कधी ते जेवायला याचे तर कधी आम्ही डब्बा पोहचवायचो. असेच एक दिवस प्रचंड पाऊस पडत होता, जेवण तयार होते पण कोणीच पोहचू शकत नाही अशी अवस्था. नऊ वाजत आले होते शेवटी आईने शेजारच्या मुलाची सायकल मागून घेतली व मला डब्बे पोहचवण्यास सांगितले. त्याआधी कधी डब्बे पोहचवले नव्हते असे नाही पण एवढ्या रात्री आईने मला एकट्याला बाहेर पाठवण्याची पहिलीच वेळ. हो ना करत मी डब्बा घेऊन निघालो व परतुं येताना टाऊनहॉलच्या पाठीमागे असलेल्या सोन्यामारुती चौकामध्ये पाऊसामुळे रस्त्यात अडव्या पडलेल्या झाडाच्या फांदीला धडकून माझा अपघात झाला व मी मोकळे डब्बे व सायकल घेऊन उत्ताणा पडलो. जिवनात पहिला झालेला अपघात. जास्त काही लागले नाही पण.. बाबांच्या शिव्या व मार.. दुसर्‍याच्या मुलाची सायकल तुटली ह्याचा राग प्रचंड, पण स्वतःचा मुलगा सहिसलामत आहे ह्याची त्यांना फिकर नक्कीच नव्हती त्यावेळी.. काय करणार अक्कामाई पोटात गेली होती व ती बोलत व मारत होती...

क्रमशः

बुधवार, २४ मार्च, २०१०

देव.. चमत्कार व मी

देव ह्या संकल्पनेवर अनेकवेळा चर्चा होते व होत राहील, विज्ञाननिष्ठ व्यक्ती देव नसल्याचा पुरजोर दावा करेल व जो देव मानतो तो देव असल्याचा खात्रीलायक दावा करेल, येथे मीमराठीवर देखील अधून मधून ही चर्चा चालूच असते कधी धाग्यावर कधी खरडफळ्यावर तर कधी कट्टावर. देवाचे अस्तित्व नाकारावे की नाही हा ज्याच्या त्याच्या बुध्दीचा प्रश्न. विज्ञान देव ही संकल्पना मान्य करत नाही व प्रत्येक गोष्टीला एक कारक आहे , कारण आहे असे शास्त्र शुध्द नियमाद्वारे दाखवून देतो. अनिंस सारख्या संस्था व अनेक विज्ञान निष्ठ व्यक्ती मुळापासून देवाचे अस्तित्व मान्य करतच नाहीत पण हजारो वर्षापासून हिंदू मनावर देवाचे अस्तित्व वेगवेगळ्या कथेतून, ग्रंथातून, काव्यातून, अभंगातून बिंबवले जात आहे व त्यामुळे देवाचे अस्तित्व मान्य करणार्‍यांची संख्या ही जास्त दिसते, त्यामुळे हा वाद नेहमीच रंगतो.

दैवी चमत्कार मान्य करणे न करणे विज्ञाननिष्ठ व्यक्तीला सोपं जाते कारण त्याची मुळापासून आपल्या विज्ञानावर श्रध्दा असते व आपले मत बरोबर आहे ह्यासाठी विज्ञाननिष्ठ पुरावा ही त्याच्याकडे असतो ( जसे नाईल ह्यांनी विहीरी बाबत गणित मांडले आहे तसे) व प्रत्येक वेळी ते पुरावे सामान्य व्यक्तीला देखील पटतात. सामान्य व्यक्तीला आपल्या पुरातन संस्कृतीतून बाहेर पडण्यासाठी, पुरातन कथांना, चमत्कारांना, पुराण पुरुषाच्या अस्तित्वाला, देवाला नाकारणे जवळ जवळ अशक्य होऊन बसलेले असते कारण संस्कार, लोक-शिक्षणाची कमतरता.

मी स्वतः चमत्कार मान्य करतो पण तो विज्ञाननिष्ठ चमत्कार ! बाकी कुठला ही चमत्कार मी मान्य करु शकत नाही ह्यांचे कारण शक्यतो माझ्या वाचनामध्ये असेल किंवा जेव्हापासून डिस्कव्हरी व नॅशनल जीओग्रॉफिक टाईपची सर्वांग सुंदर दुरचित्रवाण्या आल्या त्यामुळे असेल. ह्यांनी दृष्टी दिली एखाद्या चमत्काराकडे कसे पहावे ह्याची. मी देवाचे अस्तित्व नाकारतो असे देखील नाही आहे कारण शेवटी मी देखील त्याच मातीतून आलो आहे जेथे लहानपणापासून देव सदैव आपल्याला पाहात आहे आपले कर्म पहात आहे असे शिकवले जाते. पण तरी ही काही गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर तोलून नक्की पहाव्या असे वाटतं.

कित्येक पिढ्यामागे माहीत नाही पण आमच्या घरातील एका व्यक्तीला आपला मुळ धर्म सोडून जैन धर्मात प्रवेश करावे असे वाटले असेल व त्यांनी त्यानूसार केला. पण मुळ धर्मातील देव हे ते देखील त्याग करु शकले नाहीत त्यामुळे नवीन धर्मात आल्यावर जसे नवीन देव देव्हार्‍यात आले तसेच जुने देव देखील तेथेच राहीले त्यामुळे आमच्या घरात लक्ष्मीपुजन होते, गणपती पुजन होते, कुल दैवत नाईकबाचे पुजन होते व त्याच बरोबर २४ तिर्थंकरांचे देखील पुजन मनन होते. त्यामुळे लहानपणापासून देव ह्या संकल्पनेवर प्रचंड विश्वासाचे वातावरण आमच्या घरात दिसे. देव व देवाचे मंदिर ह्या विषयी मला काय वाटते दे मी मागे एका लेखामध्ये लिहले आहे पण येथे देवाचेच अस्तित्व नाकारणारे वातावरण पाहीले की माझ्यासारखा माणूस बावरुन जातो. कोणाला बरोबर मानावे, कोणाचे सत्य सत्य म्हणून अंगिकारावे ह्या गोंधळात तो गप्प राहणेच पसंद करतो.

चमत्काराचा व माझा सरळ संबध आला तो जेव्हा मी बाहुबली हॉस्टेलमध्ये शिक्षण घेत असताना नेहमी दंगा व हॉस्टेलमधून पळून जाते असे प्रकार करत असे तेव्हा. कोणीतरी आईला सांगितले की ह्याच्यावर (माझ्यावर) कोणीतरी करणी केली असू शकते मग लगेच आमच्या माता आम्हाला कोल्हापुर पासून १३०-१४० किमी दुरवर कर्नाटकात एकोंडी नावाच्या गावी घेऊन गेल्या. बुवामहाराजांनी मला एका पुजेचे ठिकाण असलेल्या पाटावर बसवले व आपले मंत्र पठण चालू केले काही मिनिटानंतर डोक्यावर टपा टपा लिंबू पडू लागले चांगले वीस तीस लिंबू खाली पडले. अंगारा फुंकणे, चित्रविचित्र आवाज काढत गोल गोल फिरणे वर करुन लिंबू पाडणे हे काही वेळ चालू राहीले व आई कडून ५०१ रु. दक्षिणा घेऊन माझ्या डोक्यावरचे भुत उतरले आहे असे सांगून बोळवणी केली. त्या एरियातून बाहेर पडल्या पडल्या मी आईला प्रश्न विचारला ते महाराज मला बाहेर अंगणात बसवून ते लिंबू पाडून दाखवतील का ? झाले देवाबद्दल काय वाटेल ते विचारतोस म्हणून धप्पा धप्पा मार पडला रस्त्यावरच. माझी आई कमी शिकलेली आहे त्यामुळे मी त्या चमत्कारावर शंका व्यक्त करतो आहे म्हणजे मी त्याचे अस्तित्वच नाकारत आहे असे तिला वाटले. ( त्यानंतर देखील मी हॉस्टेलमधून अनेकवेळा पळून गेलो ही गोष्ट निराळीच ;) )

ह्यानंतरचा चमत्कार आमच्या पाहुण्यामध्येच एक स्त्री करत असे. पाटावर जोंधळे पसरवून त्यावर भरलेली पाण्याची तांब्याची घागर ठेवत असे समोर ती बसत असे व विरुध्द बाजूला ज्याला काही अडचण आहे ती व्यक्ती. मनातल्या मनात प्रश्न विचारायचे व त्या घागरी च्या काठांना दोन्ही हाताच्या मधल्या बोटाने फक्त स्पर्श करायचा व तिकडून तीने देखील तश्याच पध्दतीने स्पर्श करायचा उत्तर हो असेल तर घागर उजव्याबाजूला फिरु लागे व नाही असेल तर डाव्या बाजूला. मला ते पाहून एकदम तिच्यामध्ये असलेल्या शक्तीबद्दल तिच्या कार्याबद्दल व तिच्या अंगात येण्याबद्दल प्रचंड विश्वास वाटू लागला व काहीतरी दैवी शक्ती आहे ह्यामध्ये नक्की ह्या निर्णयापर्यंत आलो. असे काही दिवस भारावलेल्या अवस्थेत मी चांगल्या मुलासारखा वागलो तर घरी देखील तिच्याबद्दल विश्वास निर्माण झाला मग दर रवीवारी त्या पाहुणीकडे आमच्या फेर्‍या वाढल्या. घर पाहुण्याचेच असल्यामु़ळे मला व माझ्या बहिणीला प्रचंड मोकळीक होतीच. आम्ही खेळता खेळता त्या पुजाघरात शिरलो तर समोर ती घागर व साहित्य तयार होते अंगात मस्ती फार त्यामुळे लगेच समोर जबरदस्तीने बहिणीला बसवले व तिला त्या घागरीला स्पर्श करण्यास सांगितले व मी देखील केला काय नवल ती घागर माझ्यासारख्याच्या स्पर्शाने देखील उजवीकडे फिरली, मी बहिणीला हात त्या घागरीवरुन काढून पुन्हा स्पर्श करायला लावला पण आधी उजवे बोट स्पर्श कर असे सांगितले मग परत घाघर फिरली डाव्याबाजूला. हे पाहून माझी बहिणीची तंतरी उडली व ती तेथेच किंचाळली घागर फिरत आहे बघून. झाले परत मार पडला पण मला कळाले ही काहीही असो चमत्कार नक्कीच नाही आहे ह्यामागे. घरी आल्यावर आईला पटवून देण्याचा खुप प्रयत्न केला घरीच तसा सेटअप करुन तीला घागर फिरवून दाखवली तरी तीने ते मान्य केले नाही की तो चमत्कार नव्हता.

ही झाली दोन उदाहरणे भोंदुबाजीची म्हणा अथवा चमत्काराची कारण दोन्ही जागी लोकांच्या प्रचंड रांगा लागायच्या संकट निवारण्यासाठी. चांगल्या गोष्टीचा प्रसार होण्यासाठी वर्षानू वर्ष लागतात पण एखादा चमत्कार काही तासामध्ये जगभर पसरु शकतो, आपल्यापैकी जवळ जवळ सर्वांना "गणपती दुध पितो" चा पराक्रम माहीत असेल ना ! त्या दिवशी आमच्या घरातील डाव्या सोंडेचा सोनेरी गणपती देखील चमच्याने दुध पित होता व वाड्यात आमच्याच घरी गणपतीची मुर्ती असल्यामुळे घरी प्रचंड गर्दी व बाहेर रांगा लागल्या होत्या ते अजून आठवते ;)

असे अनेक चमत्कार करणारे पाहणे माझ्या नशीबी आले पण परवा परवा जेव्हा अपघात झाला म्हणून घरी आडवा पडलो होतो तेव्हा आईला कोणी तरी माझी दृष्ट काढावयास सांगितली, अर्धातास लेक्चर दिले पण आई काय बधली नाही व शेवटी मी हार मान्य करुन तीला तिचे कार्य करु दिले. दहा-बारा वाळलेल्या लाल मिर्च्या तीने माझ्यावर उतरवून चुलीत टाकल्या व चार पाच मिनिटाने माझ्याकडे आली व म्हणाली बघ.. आता तरी समजले का ? मला काहीच समजले नाही तेव्हा तीने मला सांगितले की तु एक लाल मीर्ची चुलीत टाकून बघ. काही न करता उचलायची व चुलीत टाकायची. माझे विज्ञान निष्ठ मन ह्यासाठी लगेच तयार झाले व म्हणालो बघ ह्या मिर्चीचा पण धुर होणार नाही म्हणून समोर असलेल्या पोत्यात हात घालून एक मिर्ची उचलली व सरळ स्वंयपाक घरातील चुलीत टाकली.......दहा मिनिटे खोकुन खोकुन जीव अर्धमेला झाला..

आईच्या डोळयात विजयी भाव होते व माझ्या मनात हे असे कसे झाले असावे ह्याचा विचार. त्याच पोत्यातील बागडी मिर्च्या ( कर्नाटकातील एक लाल मिर्चीचा प्रकार जो प्रचंड तिखट असतो व जहाल देखील) आईने माझ्यासमोर घेतल्या होत्या व चुलीतल्या निखार्‍यावर टाकल्या होता तेव्हा धुर न होता मिर्च्या जळून गेल्या पण त्याच पोत्यातील मिर्ची मी जेव्हा निखार्‍यावर नुस्तीच टाकली तेव्हा मात्र ती मिर्ची जळून न जाता घरात मिर्चीचा धुर करुन गेली असे का घडले असावे ? ह्याचे उत्तर मला काही सापडले नाही, आमच्या स्वयंपाक घरातून त्यानंतरचे चारपाच दिवस मिर्च्याचा धुर येतच असे.. कारण माझे समाधान झाले नव्हते पण प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मी मिर्ची टाकत असे तेव्हा धूर होत असे हे नक्की. शेवटी माझी मावस बहिणी आपल्या बाळाला घेऊन मला बघायला आली होती ते बाळ प्रचंड रडत होते म्हणुन आईने परत तोच प्रयोग त्या बाळावर केला तेव्हा मात्र धुर झाला नाही त्यामुळे डोके जाम सटकले विश्वास ठेवू नये असे नक्की माझे मन सांगत होते पण जे डोळ्यासमोर घडले त्याला काय म्हणावे ! ह्याला मी चमत्कार नक्कीच म्हणणार नाही पण कुठेतरी काहीतरी नक्की ह्यामागे कारण असेल हे मात्र खरं.

जाता जाता....

आग्र्याला ताजमहल आहे जगप्रसिध्द, वास्तू शास्त्रातील चमत्कार असे पण म्हणतात काही जण पण त्याचे मला कधीच आकर्षण वाटले नाही पण तेच जयपुर मध्ये हवा महल आहे तो मला नक्कीच चमत्कार वाटतो भर उन्हाळ्यात बाहेर ४०-४२ अंश उष्णता रखरखत असते व हवामहल मधील प्रत्येक खोली एसी लावल्याप्रमाणे थंडगार असते... चमत्कार म्हणावा तर ह्याला !

सोमवार, ८ मार्च, २०१०

ओळख काही संकेतस्थळांची व सुविधांची ! - भाग १

१. http://translate.google.com/translate_t#
गुगल भाषांतर सेवा, येथे तुम्ही काही ओळी अथवा पुर्ण संकेतस्थळ भाषांतरीत करुन पाहू शकता.



२. http://www.vuvox.com/
फोटो, चित्रफिती व गाणी ह्यात काही ही बदल करा (प्रेजेंटेशन साठी उपयुक्त) उदा. http://www.vuvox.com/create



३. http://www.scribd.com/
येथे तुम्हाला कार्यालयीन तसेच व्यक्तीगत उपयोगाच्या फाईली भेटतील, पत्र कसे लिहावे ह्या पासून... काय शब्द योजना असावी ह्या पर्यंत सर्व माहीती व तयार लेखन येथे भेटेल.



४. http://www.qipit.com/
सर्वात उपयोगी साईट आहे ही.. कुठल्याही लेखनाचा फोटो तुम्ही मोबाईल, स्कॅनर द्वारे घ्या व ह्या साईट वर अपलोड करा बस तुम्ही तुम्हाला हवा तो मजकरु शब्द रुपामध्ये कॉपी पेस्ट करा ;)



५. https://mozy.com/home
सगळ्यात बेस्ट डाटा बॅकअप प्रणाली ! तुमचा डाटा महाजालावर सुरक्षित ठेवला जातो जेव्हा हवा तेव्हा वापरा जगात कोठे ही.. फक्त महाजाल जोडणी असली की झालं !



६. www.howstuffworks.com/
कुठली ही गोष्ट / प्रणाली / सर्व्हीस / मशनरी / रसायन कसे काम करते अथवा तुम्ही एका मॉनिटर वर नाईन एमएमची गोळी झाडल्यावर काय होईल ... असली माहीती हवी असेल तर हे संकेतस्थळ योग्य जागा आहे ! जगातील कुठली ही गोष्ट कशी काम करते ते आम्ही दाखऊ असा ह्यांचा दावा आहे व संकेतस्थळ पाहील्यावर जाणवते की खरोखर सगळीच माहीती आहे येथे ;)



७. http://www.zamzar.com/
वर्ड फाईल पिडीफ मध्ये हवी आहे... अथवा ईतर प्रकारामध्ये ? तर हे संकेतस्थळ तुमच्यसाठीच आहे कनवर्टर आहे हा एक प्रकारचा डॉकुमेंट साठी ! कुठल्याही प्रकारचे साहित्य (files/songs/zip/image) तुम्ही येथे आरामात कनवर्ट करु शकता.





अजून खुप काही आहे महाजालावर !
अजून काही महत्वाची संकेतस्थळे लवकरच !

* पुर्वप्रकाशीत : - २००८

रविवार, ७ मार्च, २०१०

कार्तिक कॉलिंग कार्तिक





एक वेगळा चित्रपट अथवा थरारक चित्रपट असे नाही म्हणता येणार पण "कार्तिक कॉलिंग कार्तिक" नक्कीच पाहण्यालायक चित्रपट आहे हे नक्की. शेवट पर्यंत काय घडत आहे हे पाहण्याची उत्सुकता टिकून राहते मध्येच काहीवेळ चित्रपट स्लो होतो पण ओके नियमीत वेग पुन्हा येतो.

हा चित्रपट कार्तिक नावाच्या एका व्यक्तीवर अवलंबून आहे हे नावावरुन समजतेच हा कर्तिक साधा सुधा, एका कंपनीत काम करत असलेला, शोनाली ( सोनाली - असावे) वर जिवापाड प्रेम करत असलेला व प्रचंड हुशार असलेला पण लहानपणी घडलेल्या एका घटनेमुळे आत्मविश्वास नसल्यासारखा. त्यामुळे त्याला कोणी मित्र नाहीत व कोणीच त्याला समजवून घेत नाही उलट त्याच्याकडून जमेल तेवढा फायदा उचलणे असे घडत असल्यामुळे तो निराश झालेला असतोच पण जेव्हा ज्या सोनालीव्रर तो प्रेम करत आहे एका प्रसंगात तीच्या एका वाक्यात त्याला कळते की गेली चार वर्ष जेथे हा काम करत आहे तेथे तीला त्याची उपस्थीती देखील जाणवलेली नाही व हा आत्महत्या करण्याचे ठरवतो... घरी झोपेच्या गोळ्या घेण्याच्या तयारीत असतानाच जेव्हा फोन वाजतो... व समोरच्या त्याला सांगतो की तो पण कार्तिकच आहे...... तो तोच आहे जो हा आहे... ह्याची खात्री पटवून देण्यासाठी तो काही गोष्टी ज्या फक्त कार्तिकलाच माहीत आहेत त्या सांगतो..

ह्या क्षणापासून चित्रपट वेगवान होतो व पाहण्यालायक होतो. तो कार्तिक ( फोनवाला) ह्याचा पुर्ण आत्मविश्वास परत उभारुन ह्याचे जिवन सुखकर बनवण्यासाठी फोन वरुनच ह्याला मदत करतो व त्याच्यामुळेच ह्याचे प्रेम देखील यशस्वी मार्गावर येतं. येथे पर्यंत चित्रपट एका नेहमीच्या मार्गावर चालू असतो व फोनवाल्या कार्तिक ने ह्याला सांगितले असते की कोणाला ही माझे अस्तित्व सागू नकोस... पण हा सोनालीला सांगतो व ती त्याला वेड्यात काढते... व चित्रपट एकदम बदलतो... सर्वकाही गोड गोड चाललेले एकदम वेगळे होऊन जाते... हे सर्व तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच कळेल की काय घडतं पण एकदा पाहण्यास काही हरकत नाही असा हा चित्रपट आहे हे नक्की.

फरहान अख्तर व दीपिका पादुकोण ह्यांचा अभिनय उत्तम आहे पण तरी ही पुर्ण चित्रपटामध्ये फरहानच नजरे समोर राहतो व चित्रपट देखील ह्याच्या भोवती फिरत असल्यामुळे हे २ तास प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची अभिनय क्षमता हवी ती फरहानकडे नक्कीच दिसून येते त्यामुळे हा चित्रपट पाहणे देखील सुसह्य होते. चित्रपटातील काही दृश्य तर अतिशय उत्तम पध्दतीने साकारली गेली आहेत असे जेव्हा जेव्हा फोन वाजतो तेव्हा तेव्हा फरहान च्या वागण्यात, चेहर्‍यावर, डोळ्यात येणारे हाव भाव अतिशय योग्य पध्दतीने टिपलेले आहेत.

आपल्याकडील चित्रपटात हमखास छोट्या मोठ्या चुका राहतात मग तो ३ ईडियटस असो वा माय नेम ईज खान असो, पण हा चित्रपट पाहताना असे काही कच्चे दुवे सुटलेले आहेत असे वाटत नाही अथवा कुठली गोष्ट अशक्य कोटीतील वाटत नाही हेच ह्या चित्रपटाचे यश.

एकदा नक्की पाहू शकता ते ही सहकुटुंब बसून पाहता येईल असा चित्रपट आहे हा नक्कीच.. !

गुरुवार, ४ मार्च, २०१०

पंचगंगेच्या तीरावर....

कोल्हापुरच्या पंचगंगेच्या काठावर खुप सुंदर अशी मंदिरे आहेत त्याचे निवडक फोटो.



































बुधवार, ३ मार्च, २०१०

( रॉड )

आता जुळला आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय...
गरज मला म्हणून ' रॉड तू ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून रॉड तू मध्ये अचानक तुटू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
धातूचे मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक पाऊलात तुझी गरज भासत असेल
जन्मभर झेपेल इतकं भरून वजन तुझ्यावर मी टाकत असेन

तुझ्याच भरवश्यावर मी उभा , कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

झेपेल तितकं वजन घेत रहा, जमेल तितकी साथ देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा कळा देत रहा..

समाधानात जोडतोड असते...फक्त जरा समजून घे
'रॉड ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घेतले..

विश्वासाचे दोन शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक मी तुला जपतो , मध्येच माघार घेऊ नकोस...!

उलटा पडलो तरी, साथ सोडू नकोस
तुझ्यावीना मी व माझ्यावीना तु कवडीमोल ठरवू नकोस...



****

प्रेरणा : दुवा

मंगळवार, २ मार्च, २०१०

माझी सफर....आई... १८

तात्यांनी ओळख करुन दिली व त्या बिचारीचा आश्रुंचा बांध तुटावा अशी अवस्था झाली ! अर्धा एक तास ती रडल्या वर माझ्या जवळ आली व म्हणालदा..."दादा... बाबा गेले रे " असे म्हणून तीची शुध्दी हरपली.....

तो दिवस पुर्ण रडारडी मध्येच संपला, अक्काला कसे बसे सर्व काही समजावून मी परत मावशीच्या घरी आलो.. दोन दिवसामध्ये त्याना माझे ईतक्या वर्षाचे जिवनचक्र माहीत झाले व मला आई-वडीलांचे... माझ्या सारखा कमनशीबी कोणीच नसावे ह्या दुनियामध्ये... घराच्या वाईट अवस्थे मध्येच मी माझ्या घरासोबत नव्हतो.. ह्याचे दुखः जास्त होते..
पण कालचक्र सर्व दुखःवर उपाय ! अठवड्यानंतर फोन करुन विभा व ईतर मित्रमंडळीना बातमी सांगतली की मी घरी पोहचलो आहे.. पण आई प्रवासासाठी बाहेर आहे व दोन महीने लागतील तीला परत येण्यासाठी... व तोपर्यंत मी येथेच राहणार की परत दिल्लीला येणार ह्याचा निर्णय दोन एक दिवसामध्ये घेऊन फोन करेन.
तात्या व मी असेच शेतामध्ये फिरत होतो व बोलता बोलता तात्या म्हणाले.. " राजा, तुला माहीत नसेल पण दोन एक दिवसामध्ये मुर्हत काढून पंडीताकडून तुझी शुध्दी करुन घ्यावी अशी तुझ्या मावशीचा व माझी ईच्छा आहे"
मी " माझी शुध्दी ? का ? "
तात्या " कसे सांगू....तु ईतकी वर्ष बाहेर राहीलास.. ना तुझा अता ना पत्ता ! ..तुला जाऊन देखील त्यावेळी १० वर्ष झाली होती... तेव्हा आम्ही तुझे श्राध्द घातले होते... "
मी त्यांना बघतच राहीलो.... व एकदमच हसलो.. व म्हणालो "जेव्हा मी हरिद्वारमध्ये होतो.. तेव्हा माझ्या मनात नेहमी येत असे की मला काही बरे वाइट झालेच तर माझे क्रियाक्रम कोण करणार.. येथे माझे श्राध्द कोण घालणार.. तुम्ही सर्व माझे श्राध्द घालाल अशी पुसटशी देखील कल्पना नव्हती मला ... चला काही हरकत नाही.. मला नाही फरक पडत ह्या गोष्टीमुळे... पण तुम्ही माझा मृत्यूदाखला तर घेतला नाही ना ???"
तात्या " अरे नाही.. गरजच नाही पडली.. राशन कार्ड वर तुझे अजून नाव आहे"
मी " धन्यवाद...!" व आम्ही घरी परतलो... पण दोन महीने काम न करता येथे राहणे मला चालणार नव्हेते.. तेव्हा मी परत दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला व मावशीकडे माझा पत्ता व फोन नंबर लिहून दिला व दुस-या दिवशी मी सरळ पुण्यात आलो ... पुणा ते दिल्ली परत !

कामावर पुन्हा रुजू झालो व दोन दिवसातून एकदा मावशी कडे फोन करणे चालु झाले... पण ह्या सर्व लफड्यात मी व विभा जवळ जवळ... भेटेनासे झालो व कळत नकळत संपर्क देखील कमी होऊ लागला होता... त्यातच एक दिवस संजनाचा फोन आला ती म्हणाली.. " राज अभी के अभी घर पें आ जाओ !!"
मी तीला समजवण्याचा पर्यंत केला की काम करतो आहे..व सुट्टी झाली की येतो.. ती ठीक आहे म्हणाली व मी काम संपवून संध्याकाळी तीच्या घरी गेलो...
संजना " देखो राज... एक काम का प्रपोजल है ... पढो !" तीने काही पेपर हाती दिले व मी ते वाचू लागलो... चीन मधून काही संगणक सामान आयात करण्याबद्दल ते प्रपोजल होते.. मी म्हणालो .." अच्छा, काम है... कमाई हो सकती है.. ! " संजना " राज, तुम्हा रे नेहरु प्लेस में अच्छे जाणकार है... तुम अगर चाहो तो.. हमारे साथ पाटर्नरशीप में काम कर सकते हो..." मी म्हणालो " नही.. यार.. मेरे पास ईतना सारा पैसा कहा से आयेगा !" संजना " पैसे पुछे तुझे हमने ??.... वर्कीग पाटर्नरशीप ३०% तुम्हारा.. बाकी हमारा..!" मी म्हणालो.." हम्म ! मुझे दिक्कत नही है.. पर दो एक दिन तु पहले सोचो.. अपने पतीसे बात करो फिर !"
असे म्हणून मी जाण्याची तयारी करु लागलो व बाईक ची चावी शोधू लागलो !.. चावी कोठे गेली यार ... " संजना, चाबी देखी है... " संजना " नहीं... रुक जा, चाय तयार है.. पीके जाना !" मी ठीक आहे म्हणून.. सरळ समोर असलेल्या पीसीवर जाऊन बसलो.. डिस्कटॉप वर काही फोल्डर होते तेथे विभा नावाचा देखील एक फोल्डर होता.. हे घर.. मला काही नवीन नाही.. सगळेच मला ओळखतात.. विभा तर आपली.. तीचा फोल्डर उघडला तर काय फरक .. असा विचार करुन मी फोल्डर उघडला..त्यात विना व अना ने घरीच खेचलेले काही विभाचे फोटो होते.. मी ते फोटो पाहण्यात ईतका गुंग होतो.. की संजनाने चहा समोर ठेवलेला देखील मला जाणवले नव्हते....
संजना " जिसे फोटो में देख रहे हो.. व इस रुम में कम से कम १५ मिनिट से बैठी है..." मी दचकलोच.. व फटाफट तो फोल्डर बंद करण्यासाठी धडपडलो.. जवळच ठेवलेले स्पीकर व ईतर वस्तू माझ्या धडपडीमुळे खाली पडल्या.. व मी जरा हलकाच हसत... म्हणालो " बच्चोंने फोटो अच्छे खिचे है !... अरे विभा तुम कब आयी ? " सोप्यावर बसलेल्या पाहून मी विचारले.
मी असे विचारताच रागाने पाय आपटत ती सरळ संजनाच्या मुलीच्या रुम कडे निघून गेली.. व मला संजनाने तीच्या पाठीमागे पाठवले...
मी "विभा.. बात सूनो.." पण ती आपल्या रागातच होती.. मी दोन तीनदा प्रयत्न केला व सरळ बाहेर येऊन संजना बरोबर.. कामाची बोलणी चालू केली... अर्धा एकतास आमची मिटींग झाली व कामाचे स्वरुप लक्षात आले.. व मी काम करने नक्की केले.. तो पर्यंत विभाचा राग उतरला होता.. ती बाहेर आली.. " तुम्हे यहा वापस आ के... हप्ता हो गया है.. ना तुमने फोन कीया ना मिलने आहे.. क्या समजते हो अपने आप को" - विभा.
हम्म मॅडम ह्या रागात आहे तर.. मी तीला समोर बसवले व माझ्या सर्व प्रवासाची तीला माहीती व्यवस्थीत दिली व म्हणालो.." यार.. थोडा परेशान था.. ईन दिनों में... उस में ऑफिस का सारा काम रुका पडा था..टाईम नही था.. संजना के घर भी में आज ही आया हूं.. पुछो ! " ती जरा शांत झाली व म्हणाली.. " अपनी मम्मी से मिलने कब जाओगे?... जब मिलोगे ना तब उन्हे यही लेके आना... अपने साथ रहेगी ऑन्टी !" मी हसलो व म्हणालो.." ठीक है..प्लान कुछ मेरा भी यही था' थोड्यावेळाने मी पुन्हा जाण्यासाठी उठलो तेव्हा मात्र विभाने चावी माझ्या हातात दिली व हसली ! मी म्हणालो.." अच्छा इस वजह से मुझे पहले चाबी नहीं मिली थी" व मी विभाला तीच्या घरी सोडून सरळ रुम वर आलो !!!

मी दिल्लीला परत येऊन एक महीना झाला होता... व संजनाच्या नवीन कामासाठी मला आपली पहली जॉब सोडावी लागणार होती.. व कंपनीने दिलेली रुम वजा घर देखील ! त्याची तयारी करुन मी कंपनी मध्ये वर्मासरांकडे मी जॉब सोडणार आहे ह्याचा उल्लेख केला.. त्यांनी प्रचंड समजावून पाहीले व नंतर परवानगी दिली व मी संजना सोबत पाटर्नर म्हणून काम चालू केले... पण सामान आणण्यासाठी चीन ला जाणे गरजेचे होते.. व टेकनीकल माहीती मला जास्त होती म्हणून माझे ही जाणे गरजेचे होते... पण संजना व तीचे पती म्हणत होते की ह्या महीन्यामध्येच जाऊ.. पण आई देखील यात्रेवरुन परत येणार होती ते ह्याच महीन्यात कसे करावे ह्या विचारामध्ये मी मावशी कडे फोन लावला ..." मावशी, आईची काही खबर कधी येणार आहे परत .. फोन आला होता का ? " मावशी " अरे .. ह्याच आठवड्यात येणार आहे.. परत... तीचा फोन आला होता.. तु पण ये !" मी हो म्हणालो व फोन ठेवला.. मी संजनाला कल्पना दिली व म्हणालो... जाण्याची तयारी चालू करा टीकीट बूक करा मी घरी जाऊन लगेच परत येतो..!

मी सरळ दिल्ली एयरपोर्टवर जाऊन शुक्रवारची पुण्याची टीकीट बूक केली व परत येण्यासाठी बुधवारची !! शनीवारी आई घरी येणार होती !!
बझार मध्ये जाऊन.. अक्कासाठी एक तोळ्याची सोन्याची चेन व आई साठी देखील एक चेन घेतली व रुमवर जाऊन जाण्याची तयारी केली व संध्याकाळी निवांत बसून विभाला फोन करुन सर्व कल्पना दिली.. !

मी पुण्यामार्गे... सरळ कोल्हापुर व घरी पोहचलो... शनीवारी दुपारी !.....मावशीच्या घरात तर एकदम गर्दी झालेली होती... सर्व प्रवासी मंडळी देखील काही वेळापुर्वीच पोहचली होती व आई देखील...!
मी बाहेर ऊभा होतो.. व तात्या आले व मला आत घेऊन गेलो.. आई शी कसे भेटावे ह्याचा मनात विचार करत होतो.. काय सांगायचे.. कसे सांगायचे... माफी मागावी तर कशी ... डोळे पाण्याने सारखे सारखे भरुन येत होते... व मी सरळ घराचा पाठीमागील अंगणात पोहचलो... तेथे आई व मावशी बोलत बसली होती व मावशीने माझ्याकडे पाहीले व आईला म्हणाली " अक्का... राजा आला बघ ! " आई पळत माझ्या जवळ आली व मला छातीशी धरुन ओसाबोस्की रडू लागली.. व पाच दहा मिनीटे अशीच गेली.. ! मावशीने तीला धीर देऊन खाली बसवले व मी म्हणालो.." यऊ.. मी आलो आहे ना ... " व मी देखील डोळे पुसू लागलो व तात्या माझ्याकडे आले व मला बाजूला बसवले व पिण्यासाठी पाणी देऊन म्हणाले " राजा.. लेका रडतोस काय... आता तु मोठा झालेला आहेस.. आता काही काळजी नाही आम्हाला देखील.... मला देखील तीन मुलीच होत्या.. सगळ्या पाहूण्यामध्ये तु एकुलता एक मुलगा.. आम्ही मेलास असे समजून होतो पण देवाच्या कृपेने तु परत आला ... !! गप्प बस आता रडू नकोस.."
तासादोनतासाने सर्व वातावरण निवळले.. तात्या जाऊन अक्काला देखील घेऊन आला... तात्याच्या मुली.. माझा मावस बहीणी देखील आपल्या सासर हून परत आल्या होत्या....मला भेटायला !!!!.... राजा दादाला भेटायला... वर्षानू वर्ष राखी बाधण्यासाठी हक्काचा त्यांना दादा परत आला होता ना !
पुर्ण शनीवार.. रवीवार गप्पा मारण्यात व माझी सफर ह्याच मध्ये संपले ! मी हलकेच तात्यांना सूचना दिली की मला मंगळवारी संध्याकाळी जावयास हवे कारण ह्यामहीन्याच्या शेवटी मी चीनला जाणार आहे... ! तात्या ठिक आहे म्हणाले !
मला बेसनलाडू लहानपणी खुप आवडत असत व आईला तर विश्वासच बसला नाही की मी घर सोडल्यापासून बेसनलाडू साधा चाखूनपण बघीतला नाही ईतक्यावर्षात... खास माझ्यासाठी संध्याकाळी बेसनलाडू तयार करण्यात आले व माझी आवड्ती वाम्ग्याची भाजी !!!
ईतक्यावर्षाने घरचे आईच्या हातचे जेवण खाऊन मी तृप्त झालो होतो...! सोमवारी सकाळ्सकाळी मला जवळच्या देवस्थानावर घेउन गेले व आईने आपले सर्व नवस फेडले !!!
तीचा राजा परत आला होता.... ज्याला सर्व नातेवाईक नावे ठेवत होते की कोणी त्याला हॉटेलात सफाईकामाला देखील ठेवणार नाही.. असे छाती ठोक सांगणारे होते... त्याच्या.. विरुध्द जाऊन तीचा मुलगा यश घेऊन आला होता.. मोठया कंपनी मध्ये चांगले हजारो मध्ये पगार मिळवत होता.. तीचा नवस पुर्ण झाला !! तीने माझ्याकडे एक मागणे मागीतले म्हणाली जाण्याआधी तू गाव जेवण घाल ! बस. मी म्हणालो खरोखर मोठी गडबड झाली माझी बुधवारची टीकीटे बुक आहेत व जाणे गरजेचे .. पण तु म्हणतेस तर घालू गावजेवण !!

क्रमशः