शनिवार, ११ सप्टेंबर, २०१०

https://rajkiranjain.wordpress.com/

गणपती बप्पा मोरया !

आजच्या शुभमुर्ह्तावर मी माझा हा ब्लॉग " राज दरबार " नवीन पत्तावर हलवला आहे काय स्वरुपी.

https://rajkiranjain.wordpress.com/

सर्व मित्रांनी व वाचकांनी ह्यांची नोंद घ्यावी व आपल्या बुकमार्कमध्ये फेरबदल करुन घ्यावेत ही विनंती.


आपलाच मित्र,

राज जैन

शुक्रवार, १० सप्टेंबर, २०१०

पुणे-भिमाशंकर-शिवनेरी-लेण्याद्री-नाशिक-त्रिंबकेश्वर-मेटघर किल्ला- अंजनेरीगड-पुणे - भाग १

शनिवारीच बाईकवरुन कामानिमित्य पनवेलवारी ( २४० किमी येणे जाणे) करुन रात्री २ वाजता पोहचलो होतो घरी.

रवीवारी सकाळ सकाळी आई म्हणाली की नाशिकला जातोस का उद्या ( २१० किमी) ? पोर्णिमा आहे व एक पुजा करायची राहीली आहे तुम्ही नागबळी व त्रीपिंडीदान. हे राम ! हेच शब्द बाहेर पडले तरी म्हणालो बघतो विचार करुन. महाजालावर थोडीफार शोधाशोध केली तर तो भाग तर प्रचंड देखणा व निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेला आहे असे समजले. आईची इच्छा देखील पुर्ण होईल व थोडेफार जे ताप चालू आहेत ते देखील ह्या पुजेमुळे कमी होतात का हे पाहू असा उद्दात्त हेतू मनात ठेऊन आपले मित्रवर्य श्री पाषाणभेद ह्यांना फोन लावला व थोडक्यात विचार सांगितला. लगेच महाराजांनी इकडे तिकडे फोन करुन एक पंडित शोधला जो त्रिंबकेश्वर ( नाशिक पासून ३० किमी) मध्ये दोन्ही पुजा करुन देतो असा.

आईला ही माहिती दिली व म्हणालो उद्या सकाळी निघतो पहाटे उठव मला. सर्व तयारी सकाळीच करेन ;) झाले गजर लावले गेले, जबरदस्तीने दिवसाढवळ्या रात्री १० वाजता झोपा असा आदेश झाला, मन मोडून झोपी गेलो... सकाळी आईने ५ वाजता मला उठवण्याचा एक निष्फळ प्रयत्न केला मग सहा वाजता मग सात वाजता शेवटी ७.३० वाजता मी उठलो. साहेबांचा फोन परत आला की निघालो की नाही असे विचारणारा.. मी लगेच धावपळ करुन तयारी सुरु केली अंघोळ इत्यादी छोटी मोठी कामे लगेच १० मिनिटात आवरुन ८ वाजता नाष्टा करुन सरळ ८.३० ला हायवेवर लागलो.

रम्य सकाळ होती, हिरवळच हिरवळ चोहीकडे, पक्षी-पक्षिणी गुलुगुलु बोलत आहेत असे दृष्य मला तरी कोठे नजरेस पडले नाही पण हा नाही म्हणायला दोनचार म्हशी व गायी सकाळचा नाष्टा करायला बाहेर पडलेल्या दिसल्या... चला तेवढेच निसर्ग सौंदर्य पहाण्याची सुरवात झाली..
हायवेवर गाडी सुसाट पळवायचा हा विचार करुन सगळे ब्रेक, केबली, चाके, इंजिन, हवा, पाणी, बॅटरी चेक करुन घेतले व सुरवात केली प्रवासाची.

तोच आठवले अरे नाशिकला जायचे कसे ? रस्ता ? अडला राजे मीमकरांचे पाय धरी ! पटापट दोनचार फोन केले व दोनचार वेगवेगळे रस्ते सांगितले गेले, हरी ओम म्हणत बाईक लावली सरळ मुंबई हायवेला. हिंजवडचा उड्डाणपुल मागे टाकून पहिल्याच वळणावर एकाला विचारले नाशिक फाटा ? त्यांने कसाबसा रस्ता सांगितला त्याचे आभार माणून गाडी त्या वळणावर घातली, मग वाकड, चिचवड, पिंपरी इत्यादी भागाला फेरी मारुन विमोच्या (विवेक मोडकांच्या) घराचा रस्त्याला गाडी आल्यावर मग डोक्यात आले आपण शक्यतो रस्त्ता चुकलो. परत एकाला विचारुन घेतले व मग नाशिक हायवेवर लागलो (टोटल ६० एक किमी अतिरिक्त फिरणे).

नाशिकचा बोर्ड दिसला २१० किमी. च्यामायला म्हणजे ह्या फाट्यापासून २१० किमी व घरापासून इथपर्यंतचा प्रवास कोण मोजणार ? सिस्टमला दोनचार शिव्या देऊन पुढे निघालो, चाकण मागे गेले व मंद पाऊस चालू झाला. मस्त पैकी थंड हवा थोंडाला लागत होती व सकाळ पासून रस्ता शोधताना झालेली चिडचिड आपोआप कमी कमी होत गेली. ८०-९० चा काटा कधी मागे पडला व १०० च्यावर स्पिडवर बाईक कधी धावू लागली काही कळले देखील नाही मार्ग दाखवणारे बोर्ड झर झर मागे पडत होते मंचर जवळ आल्याचा एक बोर्ड समोर दिसला भिमाशंकर ! हे नाव कुठेतरी वाचले होते आठवत नव्हते, परत एकदा पाषाणभेद यांना फोन लावला व विचारले अरे भिमाशंकर ला काय आहे ?

प्रश्नातच उत्तर होते, सरळ डावीकडे बाईक टर्न केली व भिमाशंकरच्या रस्त्याला लागलो. दैवी प्रवास ! ह्या एका शब्दात वर्णन होऊ शकते. वाटेतच्या दोन्ही बाजूने निसर्गांने अक्षरशः अदभुत खेळ मांडला होता ऊन-पाऊस व निसर्गरम्य असा व मंत्रमुग्ध होऊन पहात रहावे असा खेळ ! गडबडीने बाईक रस्ताच्या बाजूला लावली व फोन बाहेर काढून फोटो काढायची तयारी केली तेव्हाच समजले मोबाईल मेला आहे ते. रात्रभर चार्ज करायचाच राहून गेला होता. त्याक्षणी खुप असाह्य वाटले रे.. यार ! वाटले देऊ या भिरकावून दरीमध्ये नोकियाला ;) पण आता हाच एकमेव आधार असल्यामुळे व आमचा जिवापाड प्रिय सॅमसंग अतिदक्षता विभागात अ‍ॅडमीट असल्यामुळे नोकिया विषयी सध्या मला खुप ममत्व वाटले म्हणून पुन्हा खिश्यात ठेऊन दिला. मधी एक दोनहॉटेल मध्ये ट्राय केला पण लाईट नव्हती व संध्याकाळी ५ वाजता येणार होती :( , भिमाशंकर विषयी मी काही लिहावे एवढा चांगला लेखक नाही आहे पण पुन्हा एकदा मी नक्की भिमाशंकर ला जाईन लवकरच व चांगले शेकड्यानी फोटो काढेन व ते प्रकाशित करेन.

भटकणे हा उद्देश असल्यामुळे देवदर्शन इत्यादी फंदामध्ये पडलो नाही व मला लवकर नाशिक गाठायचे होते म्हणून भिमाशंकरची ही भेट थोडी लवकरच संपवली वर परतीच्या प्रवासास लागलो. दिड एकतासाच्या ड्राईव्ह नंतर एका हॉटेलात फोन चार्जिंगला लावला व मस्तपैकी वडापावावर दणका दिला फोन चार्ज होई पर्यंत मी इकडे तिकडे फिरावे म्हणून हॉटेलातून बाहेर पडलो तर समोर एक फाटा दिसत होता व तेथे बोर्ड लावला होता.. शिवनेरी २५ किमी... फक्त २५ किमी व शिवनेरी इकडे आहे ? आयला मी तर समजत होतो.. जाऊ दे. येथे पर्यत आलोच आहे तर जरा शिवनेरी जाऊन येऊ तसा ही हा भुईकोट किल्ला आहे असे शाळेतील पुस्तकात वाचले होतेच त्यामुळे चढाचढी करावी लागणार नाही व चालाचाली देखील असा विचार डोक्यात डोकाऊ लागला एक मन म्हणत होते जाऊ या एक म्हणत होते नको ! शेवटी माझा विजय झाला व दुष्ट दुसरे मन हरले.

नंतर च्या दहा मिनिटामध्ये मी शिवनेरीच्या रस्तावर वार्‍याशी शर्यत करत होतो.

अर्धा-पाऊण तासामध्येच शिवनेरीच्या पार्किंग लॉटमध्ये बाईक लावली ५ रु.चे टिकिट फाड्ले गेले व मस्त १० रु.चे लिंबू सरबत घेतले व गडाकडे जावयास निघालो पण गडाकडे बघिल्यावर लक्ष्यात आले की आपल्याला शाळेत शक्यतो चुकीचे शिकवले गेले आहे ;) शिवनेरी भुईकोट किल्ला नाही आहे चढावे लागनाराच व समोरचा गडाचा मॅप पाहून खात्रीच पटली की चालावे देखील प्रचंड लागणार आहे.... छत्रपती शिवाजी महाराज की ! असा एक घोष दिला तोच पाचपन्नास आवाज दुमदुमले जय !!!!!!!!!! आयला वर पायर्‍यावर खुप पब्लिक दिसत होते म्हणजे ह्या गडावर तरी मी नक्कीच एकटा भुतासारखा भटकणार नव्हतो तर... !

shivneri 1

पायथ्यावरुन शिवनेरीच्या आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर

shivneri २


shivneri ३

गडाचा मुख्य दरवाजा !

shivneri ४


shivneri ५

आई शिवाई चे मंदिर आत फोटो काढू देत नाहीत.


shivneri ६


अंबरखाना

shivneri ७


shivneri ८

गडावरील मनमोहक दृष्य !

shivneri ९


shivneri १०


shivneri ११


shivneri १२


shivneri १३

शिवाजी महाराजांचे जन्म स्थळ !

shivneri १४


shivneri १५




क्रमशः


( जेथे फोन चार्जिंगला लावला होता तेथून जेव्हा फोन काढला तेव्हा लक्ष्यात आले की फोनचा डिस्पले गंडला आहे :( पांढरा फटाक पडला होता. हे सर्व फोटो अंदाजाने घेतले आहेत त्यामुळे चांगले आले नाही आहेत समक्ष्व.)

शनिवार, २८ ऑगस्ट, २०१०

माणूस म्हणून जगण्याची ही किंमत....

माणूस म्हणून जगण्याची ही किंमत
नशीबाच्या खेळामुळे जरा जास्तच होती
अस्तित्व जेथे गहाण पडले तेथे
शब्दांची लकीर खुप मोठी होती

घाव शब्दांचे चार छोटे होते
पण जख्म जरा मोठी होती
लपवावे काय आता येथे
व्रण चेहर्‍यावर पडले होते

नको नको म्हणत असताना
दर्द पदरी पडला होता
लवपावे काय व दाखवावे काय
आपल्यातच खोट दिसली होती

चार पुस्तके कमी शिकलो
त्यांची ही किंमत खुप वजनी होती
काय खरं व काय खोटं
नशीबाची थट्टाच थोरं होती

वाहत जावे असेल ठरवले तरी
जमीनीचे वळण खुप वेगळे होते
तडफडत जावे कोठे तरी येथे
आरसा दाखवणारे अनेक होते

माणूस म्हणून जगण्याची ही
किंमत जरा खरंच मोठी होती...
मेल्यावर तरी समाधान लाभेल
मुक्त होईन असे वाटले होते

पण राज्या नियतीची लेखणी
दुर्दवाने खुपच वाकडी होती
तुझ्या तिरडीला देखील गड्या
चार खांद्यांची वाणवा होती....

शनिवार, २१ ऑगस्ट, २०१०

एका साहित्यचोराचे धिंडवडे - जोर का झटका धीरे लगे ;)

साहित्यचोर – बोक्या सातबंडे

ब्लॉगर्सचे लेख चोरुन आपल्या नावावर खपवणार्‍या व डुप्लिकेट आयडी घेऊन धुमाकुळ घालणार्‍या ह्या बोक्याला कांचनने कसे पकडले व आपल्या ब्लॉगवर सर्व पुराव्यानिशी कसे सिध्द केले की बोक्या सातबंडे साहित्यचोरी करत होता.
त्यांनी पोलिसात सर्व पुराव्यानिशी तक्रार देखील केली आहे, कारण त्यांने फक्त साहीत्यचोरीच नाही केली तर त्यांचे फेसबुक व जीमेल चे आयडी देखील हॅक केले होते.


आपण आपले साहित्यचोरले की दुर्लक्ष करतो पण त्यांचा ते मंडळी कसा गैरफायदा घेतात हे खरोखर वाचा व आपला अभिप्राय द्या.

कांचन चे हे आवाहन लक्ष्यात ठेवा व त्यावर अमंल देखील करा ही विनंती.



मला सहकार्य हवं आहे तुमच्या सगळ्यांकडून. कृपा करून स्वत:ला अंडरएस्टीमेट करू नका. आमचं लेखन कुणी चोरावं इतकं चांगलं नाही असं म्हणू नका. तुमच्या लेखणीत काय ताकद आहे, हे वाचकांना जास्त माहित आहे. जी वेळ माझ्यावर आली, ती कुठल्याही ब्लॉगरवर येऊ शकते. तुम्ही सर्व माझ्या पाठीशी आहात, हे मला माहित आहे. पण जेव्हा कुणाचं लेखन चोरीला जातं आणि तो ब्लॉगरच लेखाचा मूळ लेखक आहे, हे माहित असतं, तेव्हा संघटीत होऊन चोर ब्लॉगरच्या त्या लिंकवर प्रतिक्रिया देत जा. रिपोर्ट अब्यूज वर क्लिक करत जा. ट्विटर आय.डी. असल्यास संदेश पाठवत जा. गुगल बझ्झसारख्या ठिकाणी विचित्र टोपण नावं धारण करणा-या व स्वत:ची खरी ओळख लपवणा-या प्रोफाईकडे काटेकोरपणे लक्ष ठेवा. शक्य असल्यास अशा प्रोफाईल्सना ब्लॉक करा. ज्यांना विचित्र टोपणनावं धारण करायला आवडतात त्यांनी आपल्या प्रोफाईलवर कृपया स्वत:चं खरं नाव देखील जाहिर करत जावं म्हणजे संशयाची सुई त्यांच्याकडे वळणार नाही.

Read more: http://www.mogaraafulalaa.com/2010/08/content-thief-bokya-satbande.html?utm_source=feedburner&utm_medium=feed&utm_campaign=Feed%3A+mogaraafulalaa+%28%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE+%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A4%BE%29#ixzz0xD6yDtyN
Under Creative Commons License: Attribution Share Alike

गुरुवार, ५ ऑगस्ट, २०१०

अरे दिवाळी साजरी करा..........

राम राज्य आले हो...
म्हणजे काय ?
अरे गरिबांपेक्षा श्रीमंताची संख्या वाढली म्हणजे रामराज्यच ना !,

सकाळ सकाळी डोक्यावर नाही पडलो आहे, खरोखर दिवाळी साजरी करा...

नैशनल काउंसिल ऑफ एप्लाइड इकॉनमिक रिसर्च (एनसीएईआर) च्या रिसर्च (हाउ इंडिया अर्न्स, स्पेंड्स एंड सेव्स) प्रमाणे भारतात आता श्रींमतांची संख्या गरिबांपेक्षा जास्त झाली आहे.


रिपोर्ट के मुताबिक, पिछले तीन साल में इकनॉमिक स्लोडाउन के बावजूद मार्च 2010 तक देश में हाई इनकम परिवारों की संख्या 4 करोड़ 67 लाख हो जाने अनुमान लगाया गया है जबकि लो इनकम परिवारों की तादाद 4 करोड़ 10 लाख के आसपास मानी जा रही है। अगर यह सच है तो पिछले एक दशक में आया यह बहुत बड़ा बदलाव है। हाई इनकम ग्रुप का परिवार उसे माना जाता है, जिसकी सालाना आमदनी 2001-02 की महंगाई के आधार पर एक लाख 80 हजार से ज्यादा हो। जिस परिवार के सदस्य सालाना 45 हजार रुपये तक कमाते हों, उसे लो इनकम फैमिली माना जाता है।

सालाना 45 हजार रुपये से ज्यादा और एक लाख 80 हजार रुपये से कम कमाने वाले मिडल क्लास में आते हैं। एनसीएईआर का एस्टिमेट है कि मिडल इनकम हाउसहोल्ड्स की संख्या में भारी इजाफा हुआ है। एक दशक पहले लो इनकम परिवारों की तादाद 6 करोड़ 52 लाख थी। तब मिडल इनकम फैमिलीज़ की संख्या 10 करोड़ 92 लाख थी, जो अब 14 करोड़ 7 लाख होने का अनुमान है। रिपोर्ट में कहा गया है कि स्लोडाउन का सबसे ज्यादा असर मिडल क्लास परिवारों पर पड़ा। नंबरों के लिहाज से मिडल क्लास परिवारों की संख्या भले ही 2007-08 के 13 करोड़ 59 लाख से बढ़कर 2009-10 में 14 करोड़ 7 लाख हो गई हो, लेकिन पर्सेंटेज मंे यह घट गई है। 2007-08 में मिडल इनकम परिवार कुल परिवारों के जहां 62 पर्सेंट थे, वहीं 2009-10 में यह घटकर 61.6 पर्सेंट रह गए। दिलचस्प पहलू यह है कि हाई इनकम परिवारों की तादाद स्लोडाउन के दौरान भी बढ़ती रही। पिछले दो साल में यह 16.8 पर्सेंट से बढ़कर 20.5 पर्सेंट हो गई है। लो इनकम ग्रुप फैमिलीज़ की संख्या भी इस दौरान 21.1 पर्सेंट से घटकर 17.9 पर्सेंट रह गई।

2 लाख से 10 लाख रुपये सालाना कमाने वालों को वर्ल्ड बैंक मिडल क्लास मानता है। ऐसे लोगों की संख्या 2009-10 तक बढ़कर 2 करोड़ 84 लाख हो गई है। रिपोर्ट के मुताबिक, देश के मिडल क्लास में से दो-तिहाई परिवार शहरों में रहते हैं। यही नहीं, सेविंग करने में भी भारतीय आगे हैं। अनुमान है कि भारतीय परिवारों द्वारा की जाने वाली बचत की रकम जीडीपी के 36 पर्सेंट तक होती है।



खरं असेल बॉ !
गेल्या एक दोन महिन्यात एकापण शेतकर्‍याने आत्महत्या केली नाही आहे.
गेल्या काही महिन्यात हॉस्पिटलमध्ये / हॉस्पिटलच्या बाहेर औषधाला पैसे नाहीत म्हणून कोणी मेलं नाही आहे.
गेल्या काही दिवसापासून भारतात कुठे ही भुकबळी गेला नाही आहे.
गेल्या काही दिवसापासून रोजगार नाही म्हणून कोणी भिक व चोर्‍या करायला चालू केले नसेल.
गेल्या काही दिवसापासून महागाई किती ही वाढू दे जनतेला काहीच फरक पडत नाही आहे..


अरे हेच हेच तर ते रामराज्य !!!!

बुधवार, २१ जुलै, २०१०

श्याम पिया मोरी ,रंग दे चुनरिया ॥

राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन!
मन मेरा बन गया सखी री सुँदर वृँदावन
कान्हा की नन्ही ऊँगली पर नाचे गोवर्धन
राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन!
मन मेरा बन गया सखी री सुँदर वृँदावन।

श्याम सांवरे, राधा गोरी, जैसे बादल बिजली!
जोड़ी जुगल लिए गोपी दल, कुञ्ज गलिन से निकली,
खड़े कदम्ब की छांह, बांह में बांह भरे मोहन!
राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन !

वही द्वारिकाधीश सखी री, वही नन्द के नंदन!
एक हाथ में मुरली सोहे, दूजे चक्र सुदर्शन!
कान्हा की नन्ही ऊँगली पर नाचे गोवर्धन!
राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन

जमुना जल में लहरें नाचें , लहरों पर शशि छाया!
मुरली पर अंगुलियाँ नाचें , उँगलियों पर माया!
नाचें गैय्याँ , छम छम छैँय्याँ , नाच रहा मधुबन!
राधा नाचे कृष्ण नाचे , नाचे गोपी जन!
मन मेरा बन गया सखी री सुँदर वृँदावन.

- पँडित नरेन्द्र शर्मा


radha


काहीतरी शोधताना अचानक वरील रचना दिसली व नकळत ब्रिजभूमी, वृँदावन, गोवर्धन नजरेसमोर आकार घेऊ लागले व अनेक दिवसापासून मनात सुप्त इच्छा होती की राधाकृष्ण ह्यांच्यावर आपण कधीतरी लिहावे म्हणून हा लेखन प्रपंच.



राधाकृष्ण ! जय राधे राधे, हरियाणामध्ये राम राम जेवढे प्रिय आहे तेवढेच हे दोन्ही शब्द देखील. आज ही जेव्हा कधी हे शब्द कानावर पडत तेव्हा एक वेगळीच अनुभुती होत असे. एकदा मनात असेच आले की नाही एवढे जवळ आहोत तर मथुरा-वृंदावन-गोवर्धन करु येऊ एकदा. भटकंती झाली, फिर फिर फिरलो सगळा भाग. जेवढा कृष्ण माहित होता तो महाभारतामुळे व थोडेफार गुणीजणांचा सत्संग हरिद्वारमध्ये लाभल्यामुळे. पण ह्या मथुरा-वृंदावन-गोवर्धनवारी नंतर कृष्ण जाणून घेण्याची व त्यापेक्षा आधिक राधिकाराणी ला समजून घेण्याची ललक मनामध्ये येऊ लागली व त्यांनतर शोध घेत, वाचन करत, थोरामोठ्यांना विचारलेल्या प्रश्नातून व आलेल्या उत्तरातून कृष्ण-राधिका मला समजतील का ह्याचे विवेंचन करु लागलो.


राधा !

एक अदभुत व्यक्तीरेखा. श्री कृष्णाच्या जिवनकथेतील एक महत्वाचा भाग. जीच्या शिवाय श्री कृष्ण पुर्ण होत नाही ना कृष्णकथा. प्रेमस्वरुप राधा, कृष्णाची सखी, प्रेमिका राधा, रायाण पत्नी राधा, ब्रीजची राधारानी. राधा राधा.. यत्र सर्वत्र राधा ! कृष्ण जीवन कथा राधामय होतं. सर्वात आधी कृष्ण म्हणजे देव हा विचार बाजूला ठेऊन मी लिहतो आहे माझ्या मते कृष्ण देवत्वाला पोहचलेला एक कसलेला राजकारणी, योध्दा व राजा होता जो आपल्या गुणामुळे, बुध्दी चातुर्यामुळे व डावपेचामुळे जिवनात यशस्वी झाला त्याच्या कथेतील एक भाग म्हणा अथवा जीने त्यांचे जीवन व्यापुन टाकले अशी राधा म्हणा. ही एक कल्पना आहे असे ही समजले जाते कारण जेथे साक्षात कॄष्णाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले नाहीत तेथे राधाचे कोठून मिळणार. त्यामुळे ह्या लेखाला काही इतिहास संदर्भ नाही आहे ना त्याचा मी कुठे शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसे पाहता महाभारतात कुठेच राधेचा संदर्भ येत नाही की उल्लेख पण जनसामान्यात राधेचा उल्लेख हा कृष्णाआधी येतो हे देखील नवलच नाही का ?

राधेकृष्ण...


राधा कोण हा प्रश्न महत्वाचा नाही आहे पण कृष्णावर तीची असिम भक्ती होती व ती कृष्णमय झाली. कृष्णाची बासरीची धुन जेव्हा जेव्हा परमसीमेवर पोहचत असे तसे तसे राधिकाराणी आपोआप कृष्णाजवळ खेचली जात असे. प्रेम भावना, कृष्णाला भेटण्याची अतिव इच्छामुळे अथवा प्रेमाचे अदभुत संगीतामुळे म्हणा पण ती मंत्रमुग्ध होऊन कृष्णमय होत असे. राधा शिवाय कृष्ण नाही व कृष्णाशिवाय राधा नाही ! कदंबाचे झाड कृष्णला अतीप्रिय तो नेहमी आपली बासुरी कदंब वृक्षाखाली बसून वाजवत असे. कृष्ण बासुरी वाजवतो आहे व राधा हलकेच डोके त्याच्या खांद्यावर ठेऊन मंत्रमुग्धपणे ते स्वर आपल्या हदयामध्ये जपून ठेवत आहे हे तर प्रसिध्द चित्र.

2

राधाकृष्ण ह्यांच्या नात्याची फोड करणे हे अत्यंत किल्ष्ट आहे, पुढील अनेक युगामध्ये ही प्रेमगाथा कधी कथेतून कधी बोली भाषेच्या गाण्यातून, संताच्या शब्दातून समोर येत गेली पण त्याचे सौंदर्य तसेच टिकून राहीले. तसे पाहता त्यांची कथा ही जगावेगळी प्रेमकथा आहे, सामजिक बंधन आहे, वयामध्ये खुप मोठे अंतर आहे, निर्मळ असे प्रेम आहे व वर्षानूवर्ष सहन करावा लागणारा विरह आहे व अनेक वर्षाच्या विरहानंतर फक्त काही क्षणाची भेट आहे ती ही दुरुन. पांडवांनी कुरुक्षेत्रामध्ये यज्ञकर्म केले होते त्यासाठी अन्य गोकुळवासीच्या बरोबर राधा देखील तेथे गेली होती अनेक वर्षाच्या ताटातूटीनंतरची ही अंतःकरणाला वेदना देणारी भेट, काही क्षणाची. काय वाटले असेल तेव्हा राधेला ? कृष्णाचे काय तो तोपर्यंत देवत्वाला पोहचला होता त्याच्या शिरावर भारतभूमीच्या उध्दाराचे अगणित काम होते व तोच त्याचा ध्यास होता, जी गीता त्याने अर्जूनाला सांगितली होती तीच त्याला रोज मनन करावी लागत होती, युध्दातून, राजकारणातून, डावपेचातून एखाद क्षण दिवसभरात त्याला कधी तरी मिळत असेल तेव्हा तो एकांतामध्ये राधा बरोबर असताना व्यतीत केले क्षण आठवत असेल, पण राधा ? घरातील कामे आवरली, गायी-म्हशींचे चारापाणी निपटले व त्यानंतर पुर्ण दिवसरात्र ती कृष्णमय होऊन जात असे. त्या बिचारीला ह्या शिवाय काय काम असणार ? ना ती शस्त्र हातीधरून सत्यभामे सारखे कृष्णाबरोबर जाऊ शकत होती अथवा ना ती कृष्णाएवढी प्रगाढ पंडित होती की उभ्या उभ्या जगाला गीतेचे अमृत पाजेल. ती तर साधीभोळी निरागस राधा. कृष्ण कृष्ण कृष्ण जपाशिवाय तिला दुसरे काही जमलेच नाही.


आता थोडे कळले आधी राधा का ते.. राधेकृष्ण......

पुढील भागात आपण थोडे खोलवर जाऊ.

( क्रमशः )

गुरुवार, ८ जुलै, २०१०

श्री दिपलक्ष्मी (क्लासिक)

लेखक:
संपादक : ग. का. रायकर
प्रकाशक:
रायकर ब्रदर्स पब्लिशिंग हाऊस





१९५८ ते २००० या काळातील श्री दिपलक्ष्मी मासिक / दिवाळी अंक यांतील निवडक कथा, लेख, चित्रे, व्यंगचित्रे ह्यांचा हा संग्रह.


सुरवातच होते जयवंत दऴवी ह्यांच्या "एक गोड गोड माणूस" ह्या लेखाने व पुढे काय पंचपक्वान्न येणार आहेत त्यांची एक झलक मिळते. व नंतर अनुक्रमणिका, त्यातील लेखकांची नावे खालील प्रमाणे.


  • पु.ल. देशपांडे

  • आर. के. लक्ष्मण

  • चिं. वि. जोशी

  • श्याम जोशी

  • शिरीष पै

  • विजय तेंडुलकर

  • दत्तू बांदेकर

  • दुर्गा भागवत

  • द. ग. गोडसे

  • मारिओ मिरांडा

  • अंबरीश मिश्र

  • मंगेश कुलकर्णी

  • वसंत सबनीस

  • जयवंत दळवी

  • श्री. पु. भागवत

  • व. पु. काळे

  • गौतम राजाध्यक्ष

  • अनंत सामंत

  • व्यंकटेश माडगूळकर

  • द्वारकानाथ संझगिरी

  • वा. ल. कुळकर्णी

  • पं महादेवशास्त्री जोशी

  • गो. वि. करंदीकर

  • शिरीष कणेकर

  • सुशीलकुमार जोशी

  • डॉ. नरेंद्र जाधव

  • जयंत पवार

  • कुमार केतकर

  • अनिल धारकर

  • बिझिबी

  • रेखा आठल्ये / शहाणे

  • हेमंत कर्णिक

  • मधुकर तोरडमल

  • सेतुमाधवराव पगडी

  • पु.रा. बेहेरे

  • वि.आ.बुवा

  • मं.वि. राजाध्यक्ष

  • म.द. वैद्य

  • दिनकर गांगल

  • श्री. ज. जोशी

  • साने गुरुजी

  • अच्युत बर्वे

  • आनंद वर्टी

  • ना. धों. ताम्हणकर

  • वि.स. खांडेकर

  • गो.नी. दांडेकर

  • अरविंद गोखले

  • मधु मंगेश कर्णिक

  • शं.ना. नवरे

  • आनंद साधले

  • ह्मो. मराठे

  • अ.र. कुळकर्णी

  • लक्ष्मण लोंढे

  • अंजली कीर्तने

  • राजेंद बनहट्टी

  • रघुवीर मुळगांवकर



व ह्याच बरोबर


  • वसंत सरवटे

  • हरिश्चंद्र लचके

  • व.ल.हळबे

  • मंगेश तेंडुलकर

  • श्याम जोशी

  • गवाणकर

  • श्रीनिवास प्रभुदेसाई

  • विकास सबनीस

  • संजय मिस्त्री

  • शशिकांत गद्रे

  • चिं.ग. मनोहर

  • मनोज जोशी

  • विजय पराडकर

  • ज्ञानेश सोनार

  • प्रशांत कुळकर्णी

  • प्रशांता अष्टीकर



ह्यांची हास्यचित्रे.


पुर्ण (A4 साईझपेक्षा थोडा मोठा) आकाराचा पेपर, ५०० पानं व उत्कृष्ट बांधणी हे या पुस्तकाचे वैशिष्टय. ( ह्यामुळेच वजन १२५० ग्रॅम आहे )



खरेदीसाठी येथे क्लिक करा.