शनिवार, २८ ऑगस्ट, २०१०

माणूस म्हणून जगण्याची ही किंमत....

माणूस म्हणून जगण्याची ही किंमत
नशीबाच्या खेळामुळे जरा जास्तच होती
अस्तित्व जेथे गहाण पडले तेथे
शब्दांची लकीर खुप मोठी होती

घाव शब्दांचे चार छोटे होते
पण जख्म जरा मोठी होती
लपवावे काय आता येथे
व्रण चेहर्‍यावर पडले होते

नको नको म्हणत असताना
दर्द पदरी पडला होता
लवपावे काय व दाखवावे काय
आपल्यातच खोट दिसली होती

चार पुस्तके कमी शिकलो
त्यांची ही किंमत खुप वजनी होती
काय खरं व काय खोटं
नशीबाची थट्टाच थोरं होती

वाहत जावे असेल ठरवले तरी
जमीनीचे वळण खुप वेगळे होते
तडफडत जावे कोठे तरी येथे
आरसा दाखवणारे अनेक होते

माणूस म्हणून जगण्याची ही
किंमत जरा खरंच मोठी होती...
मेल्यावर तरी समाधान लाभेल
मुक्त होईन असे वाटले होते

पण राज्या नियतीची लेखणी
दुर्दवाने खुपच वाकडी होती
तुझ्या तिरडीला देखील गड्या
चार खांद्यांची वाणवा होती....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: