शनिवार, २१ ऑगस्ट, २०१०

एका साहित्यचोराचे धिंडवडे - जोर का झटका धीरे लगे ;)

साहित्यचोर – बोक्या सातबंडे

ब्लॉगर्सचे लेख चोरुन आपल्या नावावर खपवणार्‍या व डुप्लिकेट आयडी घेऊन धुमाकुळ घालणार्‍या ह्या बोक्याला कांचनने कसे पकडले व आपल्या ब्लॉगवर सर्व पुराव्यानिशी कसे सिध्द केले की बोक्या सातबंडे साहित्यचोरी करत होता.
त्यांनी पोलिसात सर्व पुराव्यानिशी तक्रार देखील केली आहे, कारण त्यांने फक्त साहीत्यचोरीच नाही केली तर त्यांचे फेसबुक व जीमेल चे आयडी देखील हॅक केले होते.


आपण आपले साहित्यचोरले की दुर्लक्ष करतो पण त्यांचा ते मंडळी कसा गैरफायदा घेतात हे खरोखर वाचा व आपला अभिप्राय द्या.

कांचन चे हे आवाहन लक्ष्यात ठेवा व त्यावर अमंल देखील करा ही विनंती.मला सहकार्य हवं आहे तुमच्या सगळ्यांकडून. कृपा करून स्वत:ला अंडरएस्टीमेट करू नका. आमचं लेखन कुणी चोरावं इतकं चांगलं नाही असं म्हणू नका. तुमच्या लेखणीत काय ताकद आहे, हे वाचकांना जास्त माहित आहे. जी वेळ माझ्यावर आली, ती कुठल्याही ब्लॉगरवर येऊ शकते. तुम्ही सर्व माझ्या पाठीशी आहात, हे मला माहित आहे. पण जेव्हा कुणाचं लेखन चोरीला जातं आणि तो ब्लॉगरच लेखाचा मूळ लेखक आहे, हे माहित असतं, तेव्हा संघटीत होऊन चोर ब्लॉगरच्या त्या लिंकवर प्रतिक्रिया देत जा. रिपोर्ट अब्यूज वर क्लिक करत जा. ट्विटर आय.डी. असल्यास संदेश पाठवत जा. गुगल बझ्झसारख्या ठिकाणी विचित्र टोपण नावं धारण करणा-या व स्वत:ची खरी ओळख लपवणा-या प्रोफाईकडे काटेकोरपणे लक्ष ठेवा. शक्य असल्यास अशा प्रोफाईल्सना ब्लॉक करा. ज्यांना विचित्र टोपणनावं धारण करायला आवडतात त्यांनी आपल्या प्रोफाईलवर कृपया स्वत:चं खरं नाव देखील जाहिर करत जावं म्हणजे संशयाची सुई त्यांच्याकडे वळणार नाही.

Read more: http://www.mogaraafulalaa.com/2010/08/content-thief-bokya-satbande.html?utm_source=feedburner&utm_medium=feed&utm_campaign=Feed%3A+mogaraafulalaa+%28%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE+%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A4%BE%29#ixzz0xD6yDtyN
Under Creative Commons License: Attribution Share Alike

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: