शनिवार, २७ फेब्रुवारी, २०१०

चिली मध्ये प्रचंड मोठा भुकंप

दक्षिण अमेरिकेतील चिली देशातील कन्सेप्सिअन शहरात आज पहाटे ३ . ३४ वाजता झालेल्या भूकंपाने ७८ जणांचा बळी घेतला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष मायकल बॅचलेट यांनी पत्रकारांना दिली. या भूकंपाची तीव्रता ८.८ रिश्टर इतकी होती.

इमारती हादरल्या आणि राजधानी सॅन्टियागोतील वीजपुरवठाही ठप्प झाला. चिलीतील भूकंपानंतर लगेच चिली आणि पेरू या देशांना , ` पॅसिफिक त्सुनामी केंद्रा ' तर्फे संभाव्य त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. कन्सेप्सिअन शहरापासून ईशान्येकडे सुमारे ९० किलोमीटर अंतरावर भूगर्भात ५५ किलोमीटरवर या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे.



प्रचंड मोठा भुकंप झाला आहे, हैतीच्या भुकंपापेक्षा कैक पटीने हा भुकंप मोठा आहे समजले.. कोणाकडे काही बातमी असेल तर येथे द्यावी ही विनंती.



* वरील माहीती टाईम्स ऑफ ईडियाच्या सौजन्यांने. त्यांच्या संकेतस्थळावरुन.

शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१०

मी मराठी.नेटची लोकमत तर्फे दखल !

http://www.mimarathi.net




हा दुवा वाचा
आहो अगदी तुमची नावे.. ज्या सदस्यांची नावे आहेत त्यांचे अभिनंदन, ज्या संकेतस्थळांची नावे ह्यात आहेत त्यांचेही अभिनंदन
हि & हि चा अर्थ पण दिला आहे ;)

त्यातच नवीन सुरू झालेली "मी मराठी" जास्त खेळकर व अनेक नव्या सुविधा असल्याने अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे!

अशी ओळख करुन दिल्या बद्दल लोकमत ऑक्सिजनचे आभार !!!!

गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१०

देशाचा अपमान व षंढ राजकर्ते !

दुवा वाचा व गप्प बसा !

घ्या अजून घ्या ह्यांना शिंगावर... भें** साले झ* भर नाहीत पण दंगा किती... आपले सरकारच षंढांचे आहे दोष कोणाला म्हणून देणार... कसली चर्चा करायला जाता तुम्ही ! येता जाता थुकतो तो तुमच्यावर तुमच्या कुटनितीवर.... ! अरे काय हे देशाचे नशीब.. कर्मदरिद्री जनता व त्यापेक्षा लाखोपटीने नालायक राजनेते हेच पाहत राहणे हेच ह्या पिढीच्या नशीबी आहे वाटतं !!!

पाकिस्तान के विदेश मंत्री सलमान बशीर ने कहा है कि भारत-पाक बातचीत कश्मीर पर ही केंद्रित रही। उन्होंने कहा कि पाकिस्तान कश्मीर में चल रहे संघर्ष को राजनीतिक, कूटनीतिक और नैतिक समर्थन देता रहेगा।


हो तुम्ही द्याच सपोर्ट तुम्ही कसा व कुठे देता ते जगाला माहीत आहे.... साले हरामखोर... पण त्यांचा दोष नाही आहे हा.. दोष आपला आहे.. आपल्या मध्ये तो दमखम / जोष नाही आहे की शत्रुच्या नांग्या पायाने ठेचाव्यात.... अरे तुम्हाला गरज काय पडली आहे त्याच्या दरवाज्यावर जाण्याची शांतीची भिक मागत ! मणगटामध्ये ताकत असेल तर शांती प्रस्थापित करुन दाखवता येतेच ना... इवलेले इस्त्राईल.. आहे ना जगाच्या नकाश्यावर.. ते पण नाकावर टिच्चून... आपली ताकत / शक्ती दाखवून ... !

देशाने किती अपमान सहन करायाचा ह्या षंढ राजकरणापायी ?????


हाफिज सईद को सौंपने की भारत की मांग पर उन्होंने कहा,'हाफिज सईद पर जो कुछ हमें दिया गया है वह डॉजियर नहीं बल्कि साहित्य का नमूना है।'


एवढं बोलल्यावर देखील हे हरामखोर नेते गप्प कसे ??????

की अपमान सहन करण्याची तयारी आधीच केली होती ?

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१०

गोल्ड - मार्केटवर एक नजर

सोनं खरेदी करावे की नाही करावे हा प्रश्न सर्वसामान्य गुंतवणूकदाराना नेहमी पडतो. गेले खुप दिवस गोल्ड १६००० - १७००० च्या रेंज मध्ये फिरत आहे व आपला भाव अस्थिर ठेऊन आहे, ह्यामागे गुंतवणूकदारांची मानसिकता आहे व थोडेफार शेअर मार्केट मधील चढ-उताराचा हात देखील. २५ नोव्हेंबर २००९ ला सोन्याने १८००० चा भाव दाखवला होता व त्यानंतर वीस दिवसाच्या आतच भाव १६५०० पर्यंत आला होता. व सध्या तो १६०००-१७००० च्या भावामध्येच फिरत आहे.
भारतामध्ये सोने खरेदी सर्वात जास्त लग्नासाठी केली जाते व त्याचा खुप मोठा फरक मार्केटवर पडतो , ऑफ सिझन मध्ये सोने खरेदी करणारे खरेदीदार आता खरेदी करत नाही आहेत कारण त्यांना असे वाटत आहे की सोन्यामध्ये अजून १०००-५०० रु. चा उतार येईल व शक्यतो येईल ही कारण लग्नाचा सिझन येण्यासाठी अजून खुप महिने बाकी आहेत व डिसेंबर महिन्याच्या तुलनेने जानेवारी महिन्यात सोन्याच्या खरेदी मध्ये १०-१५% ची घट झाली आहे हीच घट चालू राहीली तर सोन्याचा दरावर नक्कीच फरक पडेल. जास्तित जास्त ग्राहक सध्या सोन्यामध्ये भाव उतरण्याची वाट बघत आहेत जर काही कारणाने सोन्याच्या भावामध्ये १०००-१५०० ची घट झाली तर नक्कीच सोनं खरेदीदारांची झुंबड उडेल खरेदीसाठी हे नक्की.
शेअर मार्केट व नजर मारली तर मागील दोन महिने मार्केट खुप मोठा चढ उतार दाखवत आहे व त्याचा देखील मानसिक परिणाम गोल्ड मार्केटवर होतो. कारण मोठ मोठे गोल्ड फंड वाले मार्केट खाली जात असेल तर आपला पैसा गोल्ड मध्ये गुंतवतात व मार्केटवर जात असेल तर शेअरमध्ये (हेजिंग पध्दतीने ) पण रेंज बाऊड शेयर मार्केट मुळे त्याना देखील तसे करणे अवघड होऊन बसलेले आहे कारण शेयर मार्केट + गोल्ड दोन्ही पण सध्या रेंज बाउंड झाले आहेत. शक्यतो पुढील आठवड्यात येणार्‍या बजट मुळे ही अढी सुटायला मदत होईल.
एक नियमित विचारला जाणारा प्रश्न की मला गोल्ड मध्ये गुंतवणूक करायची आहे कसे करु ?
ह्याचे उत्तर - मार्केट चा विचार करुन गुंतवणूक करावी. जसे वर लिहले आहे की लग्न सिझनला अजून खुप वेळ आहे व त्या दरम्यान गोल्ड मार्केट मध्ये खुप चढ उतार होईल तुम्हाला आपल्यासाठी एक रेट टार्गेट फिक्स करावे लागेल ( जसे मी १५५०० चे टार्गेट फिक्स केले आहे) कि त्या रेट ला आल्यावर मला गुंतवणूक करायची आहे ५०% गुंतवणूक तुम्ही तेव्हा करा व चुकून अजून काही शे रु. रेट खाली गेला तर राहीलेले २५% खरेदी करा व २५% आपले खेळते भांडवल ठेवा म्हणजे जर मार्केट मध्ये तेजी दिसत असेल तर काही चढ्या भावाने देखील उरलेले २५% चे गोल्ड घेता येऊ शकेल.
गोल्ड घेताना शक्यतो २४ कॅरेट च्या कॉईन / विटा ह्या स्वरुपात घ्या. शक्यतो दागीने घेऊ नका कारण जेव्हा विक्री करण्याची वेळ येते तेव्हा त्याच्यातील तुट वजा करुन किंमत मिळते व २४ कॅरेट मध्ये तुम्हाला पुर्ण भाव मिळतो. गोल्ड मधील गुंतवणूक ही दिर्घ अवधीची गुंतवणूक मानली जाते ह्याचा खरेदी करताना नक्की विचार करावा. जास्त रिस्क घेण्याची इच्छा नसेल तर मार्केट मध्ये चांगले गोल्ड फंड आहेत त्यामध्ये गुंतवणूक करणे चांगला पर्याय होऊ शकतो.
***********
गुंतवणूक करताना आपल्या अर्थ सल्लागाराकडुन पुर्ण माहीती घ्यावी.
वरील लेख हा माहीतीसाठी लिहला आहे, सल्ला नाही आहे ह्याची नोंद घ्यावी.


मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१०

लुटा 'लुफ्त' - अवस्था -ए- बाईकची ;)










हॅ हॅ हॅ !


सगळे फोटो मुद्दाम वरुन घेतले आहेत, व्यवस्थीत अ‍ॅगल् ने फोटो घेतले तर तुटलेले ईजिंन ड्रम दिसला असता व नको ती इज्जत उघड्यावर आली असती =))

माझी सफर..... भेट -भाग -१७

मी जेथे होतो तेथेच पोहचलो होतो.... नोकरी करत होतो त्यामुळे परत जाणे गरजेचे होते काय करावे काय नाही ह्या विवंचनेतून मी परत दिल्लीला जाणे व काही काळाने परत येणे हा निर्णय घेतला.

काहीच कळत नव्हते काय करावे ? कोल्हापुरातून परत जाणे हे गरजेचे होते कारण नोकरी ! पैसा हवा होता येथे परत येण्यासाठी.
मनाला कसेबसे समजावले व परत दिल्लीला जाणे नक्की केले.
असाच फिरत फिरत मी महाद्वार रोडवरुन पापाच्या टिकटी कडे चालतच निघालो होतो, समोरुन एक चेहरा ओळखीचा वाटत होता, पण कोठे पाहीले होते अथवा ह्यांचे नाव काय असावे हा गोंधळ चालू होता व ती व्यक्ती माझ्यासमोरुन निघून गेली.. तोच त्यांचे नाव आठवले, पाटिल काकू... आमचे पुर्वीचे शेजारी ! मी लगेच मागे वळलो व त्यांच्या जवळ गेलो.
मी - " नमस्कार, तुम्ही पाटील काकू ना ? ज्या बुधवार पेठे मध्ये राहत होता...रॉकेल डेपो जवळ ? "
त्या - " हो. पण मी तुम्हाला ओळखले नाही "
मी - "काकू मी राजा.. जैन... सुशिला जैन ह्यांचा मुलगा, आम्ही तुमच्या शेजारी राहत होतो आठवले ?"
त्या - " राजा तू ! कीती बदलला आहेस रे, व मोठा ही झाला आहे ! कोठे असतोस रे.... आई कशी आहे... बाबा अजून ही दारु पीतात ?"
माझ्या डोळ्यातून एकदमच पाणी आले व मला डोळ्यासमोर अंधाकार झाल्या प्रमाणे वाटले मला वाटले होते ह्या भल्या मोठ्या कोल्हापुरात मी खुपच वर्षाने परत आलो आहे कोणाला ओळखेन न ओळखेन पण नशीबाने ह्या भेटल्या ... पण नशीब फुटकेच होते ह्यापण त्याच विवंचनेत होत्या ज्या विवंचनेत मी होतो... मी त्यांना जवळच कामत मध्ये घेऊन गेलो व सविस्तर सगळे सांगितले.. काकूच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले व म्हणाली " लेका... हे काय झाले रे.. एका भरलेल्या घराची अशी कशी वाताहात लागली.. काळजी करु नकोस देव बघतो आहे... आज ना उद्या तुला तुझे आई वडील भेटतीलच."

मी त्यांचा निरोप घेऊन परत हॉटेलवर आलो व सर्वात प्रथम जाण्याचे टीकीट रद्द केले व निर्णय घेतला की परत नसलापूरला जाणे व तेथून काही मार्ग दिसतो का ते पाहणे !

सकाळ सकाळी मी नसलापुरला पोहचलो व गावाच्या पारावर बसलेल्या वृध्द लोकांच्या समुहाकडे गेलो व आपली ओळख सांगितली, त्यातील काही नी मला लहान पणी पाहीलेले होते तर काहीं ना माझे नाव तुरळक आठवत होते... मी त्यांच्या कडे खुप आस लावून आलो होतो... व देवा ने माझी प्रार्थना स्वीकार केली एकाने मला माझ्या मोठ्या मावशीच्या घराचा पत्ता दिला.
मी थोडा आनंदलो व मार्ग दिसला म्हणून परत देवाचे आभार मानले... सरळ बस पकडुन कुडची येथे गेलो व तेथे जाऊन मावशीच्या घरचा पत्ता शोधला, घराच्या जवळ येता येता मला दरदरुन घाम फुटू लागला व ह्रदयाची गती वाढू लागली ... मी घरासमोर जाउन उभा राहीलो व दरवाजा वाजवला...

एक लहानशी ७ एक वर्षाची मुलगीने दरवाजा उघडला... व मला विचारु लागली " आपण कोण ?"
मी म्हणालो" मावशीला.... सारीका मावशीला बोलवशील का ?"
ती हो म्हणालो व आत निघून गेली , थोड्या एक वेळाने सारीका मावशी आतून बाहेर आल्या.. मी त्यांना १४ एक वर्षानंतर पाहत होतो.. शक्यतो मी ८ एक वर्षाचा होतो तेव्हा पाहीले होते ....
मावशी - " कोण पाहीजे ?" माझी सगी मावशी मला विचार होती व मी जरा हसलो व म्हणालो " मावशी मी राजा... तुमच्या लहान बहीणीचा मुलगा ... कोल्हापुरवाला"
त्या एकदमच दचकल्या व म्हणाल्या " राजा तू ? यल्ल दी नो मगना ( कुठे होतास रे लेकाच्या - कन्नडमध्ये) आत ये "
त्या पाणी घेऊन आल्या व घरातील सर्व मंडळी माझ्या भोवती बसलेली मोठी माणसे""मी आज भूत पाहीले "ह्या नजरे ने मला निहाळत होते.. दोन एक तास माझी कर्म कहाणी एकल्यावर तात्यांनी (मावशीचा नवरा) माझ्या पाठीवर थोपाटले व म्हणाले " राजा, एका चुकीचे प्रचंड मोठे परिणाम तु व तुझ्या घरातल्यांनी भोगले... देवाची करणी.. पण तु गेल्या नंतर आम्ही सर्वांनी प्रचंड शोधा शोध केली.. तु कोठे काही भेटला नाहीस ना काही खबर... पाच एक वर्षानी तुझे वडील देखील अती दारु मुळे मरण पावले .... तुझ्या बहीणीचे लग्न आम्ही करुन दिले आहे एका चांगल्या घरात ! तुझी आई व माझी आई व गावातील अजून काही जणी चारधाम यात्रेसाठी गेल्या आहेत... मागच्याच आठवड्यात त्यांना परत येण्यासाठी दिड एक महीना हवा.."
माझ्या डोळ्यातून निरंतर आश्रु वाहू लागले व मी तेथून उठलो व म्हणलो जरा मला वर बालकनी वर जाणे आहे रस्ता दाखवता का ?
माहीत नाही कीती वेळ मी तसाच बाल्कनी मध्ये उभा होतो व डोळ्यातून पाणी वाहत होते...
मी घराचा कुलदिपक .. एकच मुलगा ! पण वडील वारले व मी त्याना अग्नी देण्यासाठी पण उपलब्ध नव्हतो... ह्याचीच मला लाज वाटू लागली ! मीच का नाही मेलो ... हा विचार डोक्यात सारखा सारखा येऊ लागला ! तोच मावशीने मला हलवले व म्हणाली.. " जे झाले ते झाले विसर सगळे व चल खाली .. थोडे फार खाऊन घे ! "
मी म्हणालो " नको.. मी जरा कोल्हापुरला जाऊन येतो, तेथील एका लॉजवर माझे कपडे आहेत ते घेऊन येतो ! "
त्यांनी मला जाऊच दिले नाही व म्हणाले " अजून एक दिवस थांब.. सकाळी तुझ्या बहीणीच्या घरी जाऊ "

मी रात्र कशी काढली हे माहीत नाही.. सकाळ सकाळी आम्ही तयार होऊन तात्याच्या बरोबर अक्काच्या ... बहीणीच्या घरी निघालो..

दोन एक तासाच्या प्रवासानंतर आम्ही एका मळ्यातील घरासमोर थांबलो...
तात्यांनी आवाज दिला " कोणी आहे का घरात "
एक माझ्या वयाचा मुलगा बाहेर आला व तात्यांना पाहून नमस्कार केला व म्हणाला " अहो पाहूणे... आत या ! तुमचेच घर आहे असे विचारुन काय येताय" तात्यांनी मला परिचय करुन दिला व म्हणाले " राजा.. हे सागर. रुपाचा नवरा !" व सागरला सांगितले मी कोण आहे ते.
सागर " तुम्हीच का रुपाचे भाऊ.... अहो किती शोधायचे तुम्हाला... जेव्हा जेव्हा पुणा-मुंबईला गेलो... नजर तुम्हालाच शोधत असे... तुमचा एक लहान पणीचा फोटो आहे माझ्या कडे अजून ही..." असे म्हणून रुपाला आवाज दिला.

आतून एक एक स्त्री बाहेर आली व पाठोपाठ दोन लहान लहान मुले.

काय बोलावे काय.. विचारावे... काय उत्तर द्यावे.. काही शब्द भेटत नव्हते ना गळ्यातून आवाज येत होता!
तात्यांनी ओळख करुन दिली व त्या बिचारीचा आश्रुंचा बांध तुटावा अशी अवस्था झाली ! अर्धा एक तास ती रडल्या वर माझ्या जवळ आली व म्हणालदा..."दादा... बाबा गेले रे " असे म्हणून तीची शुध्दी हरपली.....

मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१०

गावाची भटकंती..

कॅमेरा - आपला नेहमीचाच सॅमसंग मोबाईल ;)

स्थळ - सदलगा, चिक्कोडी. कर्नाटक.