रविवार, ४ जुलै, २०१०

इंद्रधनुष्य - ई-अंक

सर्वांना सांगताना आनंद होत आहे की मी मराठी.नेट इंद्रधनुष्य नावाचे ई-मासिक चालू करत आहे.
ज्यामध्ये मीमराठी.नेट च्या सदस्यांनी लिहलेले लेख, कविता, प्रवासवर्णन, पाककृती ह्यांचा समावेश केला गेला आहे.
प्रथम अंक असल्यामुळे व अश्या प्रकारचा अंक काढण्याचा अनुभव मागे नसताना देखील आम्ही हा छोटासा प्रयत्न केला आहे. ज्याचा उद्देश मी मराठी वरील लेखन त्या ९५% लोकांच्यापर्यंत देखील पोहचावे ज्यांना ऑर्कुट, फेसबुक अथवा चॅट पलिकडली विश्व माहीतच नाही आहे. आपण मी मराठीवर प्रकाशित केलेले लेख तसे ही लेखकाचे व संकेतस्थळाचे नाव न देता मेल फॉरवर्ड मधून फिरत असतातच. तसाच प्रकारे हा ई-अंक देखील फिरेल व ज्यांना अजून आपले संकेतस्थळ व येथे लेखन माहिती नाही त्यांना आपल्या येथील ३०००+ असलेल्या लेखांची एक झलक मिळेल हा सरळ व साधा उद्देश ह्या अंकाचा आहे.

आपण प्रयत्न करुन प्रत्येक महिन्याच्या प्रथम आठवड्यामध्ये असा अंक नियमित काढू व आपले लेखन त्या ९५% मराठी बांधवाजवळ पोहचवण्याचा प्रयत्न करु. ह्या कार्यासाठी ई-मासिकाच्या जून महिन्याच्या समितीने लाख मोलाची मदत केली, त्या सर्वांचे अनेकानेक आभार. त्यांची नावे खालीप्रमाणे.

१. रमताराम
२. निर्मयी
३. डॉ. अशोक कुलकर्णी
४. सागर
५. विसुनाना
६. माया
७. पुष्करणी
८. सोना



_____

अंकामध्ये खालील लेख विभागवार मांडणी करुन दिलेले आहेत, सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा व आपल्या मित्र मैत्रीणी पर्यंत हा अंक पोहचवा ही विनंती.


  • कोकणसय - शैलजा

  • अद्वितीय - विशाल कुलकर्णी

  • बाबा हरवलाय – अनुराग

  • मात्रा – गणपा

  • कोहम ! – अवलिया

  • शहीद दिवस - पुणेरी ( प्रसन्न कुमार केसकर )

  • मृत्यू आणि मी - पुण्याचे पेशवे

  • रेजकुत्रे – मधुकर

  • दहा वर्ष - ३_१४ अदिती

  • सिडनीपुराणम्॥ - मेघवेडा

  • सहज सुचल म्हणुन – जयपाल

  • जन्मा येण्या कारण तू.. – प्राजु

  • हताश औदुंबर - गंगाधर मुटे

  • उ. न. क. अर्थात उपेक्षीत नवरे कमिटी - आदिजोशी

  • मिल्कः एक चळवळ – ऋषिकेश

  • लेमन केक - स्वाती दिनेश

  • चिकन साते – गणपा

  • स्पर्श – सागर



काही चुका राहिल्या असतील तर त्या दाखवून द्या योग्य ते बदल लगेच केले जातील.


DOWNLOAD PDF


धन्यवाद.

व्यवस्थापक
मीमराठी.नेट

गुरुवार, १७ जून, २०१०

कबीर - सत्याचा आरसा

१४ जून म्हणजे संत कबीर ह्यांचा जन्म दिवस.

ह्यांच्या बदल मला जास्त काही माहिती नाही आहे पण.. ह्यांची व माझी ओळख ही अशीच त्यांच्या दोहयातून होत गेली व हा संत म्हणण्यापेक्षा कवी कधी मनात घर करुन बसला ते कळलेच नाही. साध्या सोप्या शब्दामध्ये जीवनाचे मर्म त्यांनी व्यक्त करुन दाखवले.

चाह मिटी, चिंता मिटी मनवा बेपरवाह ।
जिसको कुछ नहीं चाहिए वह शहनशाह॥

माटी कहे कुम्हार से, तु क्या रौंदे मोय ।
एक दिन ऐसा आएगा, मैं रौंदूगी तोय ॥

माला फेरत जुग भया, फिरा न मन का फेर ।
कर का मन का डार दे, मन का मनका फेर ॥

तिनका कबहुँ ना निंदये, जो पाँव तले होय ।
कबहुँ उड़ आँखो पड़े, पीर घानेरी होय ॥

गुरु गोविंद दोनों खड़े, काके लागूं पाँय ।
बलिहारी गुरु आपनो, गोविंद दियो मिलाय ॥

सुख मे सुमिरन ना किया, दु:ख में करते याद ।
कह कबीर ता दास की, कौन सुने फरियाद ॥

साईं इतना दीजिये, जा मे कुटुम समाय ।
मैं भी भूखा न रहूँ, साधु ना भूखा जाय ॥

धीरे-धीरे रे मना, धीरे सब कुछ होय ।
माली सींचे सौ घड़ा, ॠतु आए फल होय ॥

कबीरा ते नर अँध है, गुरु को कहते और ।
हरि रूठे गुरु ठौर है, गुरु रूठे नहीं ठौर ॥

माया मरी न मन मरा, मर-मर गए शरीर ।
आशा तृष्णा न मरी, कह गए दास कबीर ॥

रात गंवाई सोय के, दिवस गंवाया खाय ।
हीरा जन्म अमोल था, कोड़ी बदले जाय ॥

दुःख में सुमिरन सब करे सुख में करै न कोय।
जो सुख में सुमिरन करे दुःख काहे को होय ॥

बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर।
पंथी को छाया नही फल लागे अति दूर ॥

साधु ऐसा चाहिए जैसा सूप सुभाय।
सार-सार को गहि रहै थोथा देई उडाय॥

साँई इतना दीजिए जामें कुटुंब समाय ।
मैं भी भूखा ना रहूँ साधु न भुखा जाय॥

जो तोको काँटा बुवै ताहि बोव तू फूल।
तोहि फूल को फूल है वाको है तिरसुल॥

उठा बगुला प्रेम का तिनका चढ़ा अकास।
तिनका तिनके से मिला तिन का तिन के पास॥

सात समंदर की मसि करौं लेखनि सब बनराइ।
धरती सब कागद करौं हरि गुण लिखा न जाइ॥

साधू गाँठ न बाँधई उदर समाता लेय।
आगे पाछे हरी खड़े जब माँगे तब देय॥



काही निवडक दोहे व त्यांचा मला समजलेला अर्थ.

*

चाह मिटी, चिंता मिटी मनवा बेपरवाह ।
जिसको कुछ नहीं चाहिए वह शहनशाह॥



वाह !

इच्छा, लोभ हे सगळे माती आहे. सगळा जे सगळे रामायण-महाभारत घडते त्याच्या मूळामध्ये हा लोभच आहे.
पण ज्या मनात मध्ये चिंता समाप्त होते तेथे मग कसलीच चिंता राहत नाही मन एकदम निश्चिंत राहते..
व ज्याला काहिच इच्छा नाही, लोभ नाही व चिंता नाही तोच खरा शहेनशाह ! तोच खरा राजा !


*

माटी कहे कुम्हार से, तु क्या रौंदे मोय ।
एक दिन ऐसा आएगा, मैं रौंदूगी तोय ॥


माझे सर्वात आवडता दोहा आहे हा.

जे पेराल तेच उगवेल. जसे वागाल तसेच तुम्हाला मिळत जाईल.
कोणीच काळाच्या वरती नाही सर्व शक्तीमान तो काळ आहे.
आज तु राजा आहेस तर तो काळ तुला रंक देखील करु शकतो.

*


*

तिनका कबहुँ ना निंदये, जो पाँव तले होय ।
कबहुँ उड़ आँखो पड़े, पीर घानेरी होय ॥


कोणाला कधीच छोटे समजू नये व त्यास त्रास देऊ नये, त्याच्या नियतीमुळे तो तेथे आहे,
जर त्याचे दिवस फिरले तर तो तुमच्यावर देखील भारी पडू शकेल, घमंड कधीच नको.
सर्वांना आदर द्या.

*


सुख मे सुमिरन ना किया, दु:ख में करते याद ।
कह कबीर ता दास की, कौन सुने फरियाद ॥


गरज सरो वैद्य मरो अशी जर मानसिकता जर ठेवली तर वाईट काळामध्ये तुम्हाला कोणीच मदत करणार नाही. तेव्हा आपल्या चांगल्या काळामध्ये लोकांना मदत करत रहा जेणे करुन तुमच्या वाईट काळामध्ये कोणी ना कोणि तरी असेल जे तुम्हाला साथ देतील. आपल्या यशाच्या आनंदात मग्न राहून ज्यांच्यामुळे आपण येथे पोहचलो आहे त्यांना विसरु नका.


********

कबीर बाणी ...... Music for Soul !

एक सर्वांग सुंदर अल्बम !!!

राहूल देशपांडे ह्यांनी गायलेली कबीर बाणी ची सिडी ई-खरेदी विभागामध्ये उपलब्ध आहे.

रविवार, ६ जून, २०१०

ई- खरेदी

आज शुक्रवार, आई अंबाबाईचे नाव घेऊन आपण एक नवीन सुविधा मीमराठीच्या वाचकांसाठी / सदस्यांसाठी घेऊन येत आहोत.

खरेदी विभाग

ज्यामध्ये आपण आपल्याच सदस्यांनी लिहलेली / प्रकाशीत केलेली पुस्तके / कविता संग्रह / संगणक प्रणाली / सेवा व सुविधा व इतर वस्तू / साहित्य विक्रीस उपलब्ध करुन देत आहोत.

मी मराठी संकेतस्थळ व त्यांचे व्यवस्थापक सर्व व्यवहारामध्ये स्वतः लक्ष घालतील व येणारी / दिली जाणारी प्रत्येक वस्तू ही मी मराठी संकेतस्थळाकडूनच तुम्हाला मिळेल. सुविधा अजून प्राथ्रमिक स्वरुपात आहे, वेळोवेळी आपण त्यात योग्य ते बदल करत जाऊ. तुम्हाला ही काही अडचणी जाणवल्या तर त्या तुम्ही मला येथे सांगू शकता.


आपल्या प्रिय सदस्य श्री श्रावण मोडक ह्यांच्या कबीरबानी ह्या ध्वनीफीत संग्रहाद्वारे आपण आपल्या विभागाचे लोकार्पण करत आहोत. तेथे तुम्हाला शेअर मार्केट टिप्स. नावाचा एक विभाग दिसेल तो खास तुमच्यासाठी टेस्टिंग करण्यासाठी बनवण्यात आला आहे त्याचा वापर करुन पहावा व अडचणी येथे सांगाव्यात जेणे करुन आपण एक उत्तम व सुरक्षित अशी एक प्रणाली तयार करु शकू. मी मराठी संकेतस्थळ आपले आभारी राहील.

( टेस्टिंग साठी फक्त तुम्हाला शेअर मार्केट टिप्स हेच वाप्परण्याची परवानगी आहे.)


ज्यांना आपले / आपल्या मित्रांचे / आपल्या ओळखीतील व्यक्तींचे साहित्य / वस्तू / प्रणाली येथे विक्रीसाठी उपलब्ध व्हावी अशी इच्छा आहे त्यांनी मला संपर्क करावा.

योग्य ते बदल व सुचना येथे नियमीतपणे दिल्या जातील.
जय महाराष्ट्र !


व्यवस्थापक

बुधवार, २ जून, २०१०

मीम रॉक्स !!

mimarathi.net


३.१५ नंतर लाईट गेली होती ती सरळ ६.३० ला आली...

मध्ये एक दोन कॉल आले होते मित्रांचे की मीमवर पाहूणे सदस्य वाढत आहेत.... मला वाटले होते नेहमी प्रमाणे ६०-७० असतील, पण आधी एकाने १५० + चा आकडा दिला व नंतर एकाने सरळ ४०० + चा तेव्हा मात्र मी चक्रावलो... ;)

साईटवर अटॅ़क झाला असे म्हणत टिआरपी वाढवायला एक ईश्यु मिळाला =)) असे माझ्या मनात आले ( नाही ). ;)

पण जेव्हा लॉग चेक केले तर समजले अरे हे तर खरोखरचे हिट्स आहेत... पेज हिट्स नाहीत... युजर हिट्स... दिवसभरात ३५०० + लोकांनी मीम हिट केले होते, व सर्वात जास्त हिट्स फेसबुक व ट्विटर वरुन आल्या होता व त्या खालोखाल गुगलवरुन !!!!

आज दिवसभरात ७५००० + पेज पाहीले गेले मीमवर... व हा रेकॉर्ड आहे आपला तरी नक्कीच ;)


आज असे काय नवीन घडले ह्याचा विचार केला असता आपण केलेले काही बदल व पुरवलेल्या काही नवीन सुविधा खुप लोकांना आवडल्या आहेत असे त्यांच्या आलेल्या मेल्स व व्यनी मधून कळाले हे एक कारण असावे तुम्हाला दुसरे काय कारण वाटते की काय झाले असावे असे खास ???

पण खरोखर मनापासून आनंद झाला... ह्या सर्वाचे श्रेय येथे नियमित लिहणार्‍या व प्रतिसाद देणार्‍या सदस्यांचे आहे ज्यांच्यामुळे मीम आज नावारुपाला येत आहे आपली एक आगळी वेगळी प्रतिमा निर्माण होत आहे मराठी अंतरजालावर....


सर्वांचे अनेकानेक धन्यवाद... !

H) हॅट्स ऑफ..... मित्रांनो !

पाहूण्यांनो मीमवर आपले मनापासून स्वागत आहे...

सर्वांनी असाच लोभ ठेवावा. !!!!

शुक्रवार, २१ मे, २०१०

हॅप्पी बर्थ डे...Pac-Man ...

आताच गुगलचा नवीन लोगो पाहीला....

pak-man


व मन एकदम सुरवातीच्या काळात गेले, जेव्हा नकळत कसा बसा... संगणकाबरोबर जुडला गेलो होतो... ३८६ नंतर ४८६... मज्जा होती त्यावेळी... काळे-पांढरे पडदे व तो गेम.. Pac-Man !


जबरदस्त मज्जा येत असे त्याकाळी !

आज गुगलवर तो लोगो पाहीला...

आज Pac-Man चा ३० वा वाढदिवस.. ३० वा ? अरे तीसवर्ष झाली त्या गेमला ? काल परवा पर्यंत तर मोबाईलवर खेळताना देखील नवीनच वाटायचा तो मला.. Pac-Man !


असो,

ज्यांने तयार केला त्याला अनेकानेक धन्यवाद...
कारण हा एकच गेम होता ज्याच्यामुळे मी संगणकाच्या जवळ आलो...
व आज येथेवर... :)
मला ह्या गेमने खुप काही दिले... त्याचे आभारच मी ह्या छोटेखानी लेखाद्वारे व्यक्त करतो आहे... !


थॅक्यु !

Pac-Man

सोमवार, १७ मे, २०१०

फसवणूक

आपण वेगवेगळे फसवणूकीचे प्रकार नेहमी इकडे तिकडे पहात असतोच. असाच हा एक मस्त किस्सा ! कितपत खरा आहे माहीत नाही पण ज्यांने सांगितले त्याच्यावर मी विश्वास ठेऊ शकतो कारण तो गुडगावं पोलिस मध्ये होता ;)
स्थळ : गुडगाव, बादशहापुर.
काळ : जेव्हा प्रॉपर्टी मार्केट बुस्टवर होते तेव्हाचा ;)

*****




गावामध्ये एक घर.
कर्ता पुरुष काही वर्षापुर्वीच वारलेला.
बाईच सगळे बघायची, त्या जवळ जवळ न शिकलेलीच.
कमाईचे साधन शेत व दुसरे घर भाड्याने देणे.
लग्नाच्या वयाच्या दोन मुली.
बाई तशी चालाख इत्यादी नव्हती एकदम साधीभोळी.
मुली पण तश्याच.
त्या घरचे सगळे व्यवहार त्या तीघी मिळूनच चालवायच्या.

*

घराचा भाडेकरु तडकाफडकीचे घर सोडून गेला.
तीन-चार दिवसामध्येच एक ३०-३५ च्या आसपासचा व्यक्ती आला व घर भाड्याने मागितले.
दोन रुम व किचन असलेले ते घर, तीने मागितलेले भाडे व डिपॉझीट न कुरकुर करता दिले.
तो, तीची बायको व आई असे तीघे.
दोन एक महिन्यातच चांगलेच रुळले घरामध्ये.
त्या बाईशी देखील त्यांचे चांगले संबध प्रस्थापित झाले होते.

*

एके दिवशी त्या व्यक्तीच्या आईची तब्येत एकदम खालावली.
हॉस्पिटल मध्ये भरती करण्यासाठी घेऊन गेले व सरळ दोन दिवसांनी बातमी दिली आई गेली म्हणून.
१५-२० दिवसाने ती व्यक्ती एकटीच परत आली.
तीच्या जवळ बसून तिला सगळी राम कहानी सांगितली.
हॉस्पिटल मध्ये घेऊन गेल्यावर तीला हार्ट अटॅक आला व ती गेली,मग गावी घेऊन गेलो, तिकडेच सगळे उरकले. इत्यादी.

*

दुसर्‍या तिसर्‍या दिवशी तो परत घरी आला व एक मदत मागीतली.
तीला तो म्हणाला की आई वारल्यामुळे सगळे कर्जदार मागे पडले आहेत व त्यांना पैसे द्याचे आहेत.
मी माझे शेत विकावे म्हणतो आहे पण शेत आईच्या नावे होते व अजून ट्रान्सफर झाले नाही आहे माझ्या नावावर. तुम्ही मदत करा.
ती गोंधळली तिला वाटले पैसे मागतो की काय !
पण नाही त्यांने पैसे मागितले नाहीत एवढंच म्हणाला की तुमचे नाव व माझ्या आईचे नाव सारखेच आहे, तुम्ही माझ्या बरोबर त्या कंपनीत चला जी ते शेत घेण्यास तयार आहे तिकडे व त्यानंतर बॅकेत मी तुम्हाला एक टक्का देईन सर्व व्हवहाराबद्दल रोख मध्ये, जवळ जवळ दोन लाख रु..
आधी ती नाही म्हणाली पण दोन लाख मोठी रक्कम म्हणून तयार झाली.


*


हा तिला घेऊन कंपनी मध्ये गेला.
सगळे कागदपत्रे समोर उभे राहून सही करुन घेतले.
ह्या सगळ्यामध्ये एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ गेला.
दुसर्‍या आठवड्यात त्यांने वायदाप्रमाणे दोन लाख तिच्या हातात ठेवले.
त्यांनतर मोठ्या बँकेत जाऊन पैसे काढून आणले व तो पैसे घेऊन गावी जाउन येतो म्हणून निघून गेला.


*

फक्त सही करण्याचे दोन लाख मिळाले हे पाहून त्या बाईने दिवाळी साजरी केली.
मुलीं साठी दागीने घेतले, कपडे घेतले.
अर्धा गावाला नवर्‍याच्या नावाने जेवण घातले.

*

३-४ दिवशी ग्रामिण बॅकेचा शिपाई धावत पळत तिच्या घरी.
तिला घेऊन बँकेत गेला.
बँक मॅनेजर जवळ जवळ पळत येऊनच तीला आत घेऊन गेला.
व तीला बातमी सांगितली की तीच्या अकाउंट मध्ये ३ करोड रु. आले आहेत म्हणून.
हिला काहीच कळेना. गावच्या सरपंचापर्यंत बातमी गेली होतीच तो पण आला.
सगळेच गोंधळून गेले होते हीच्या खात्यात एवढे पैसे आलेच कसे.

*

तिला खोदून खोदून विचारल्यावर तीने दोन लाखाची कमाई कशी केली ते सांगितले.
सरपंचाला काहीतरी घोळ वाटला व तो तिला घेऊन साताबारा उतारा पाहण्यासाठी गेला.
तिथे पोहचल्यावर सगळे कळाले.
व सरपंचाने डोक्याला हात लावला व बाई ने तेथेच भोकांड पसरले....

*


तीची १० एकर जमीन त्यावेळी असलेल्या १ करोड प्रत्येक एकर भावाने तीनेच विकून टाकली होती त्या ठगाच्या फसवणूकीमुळे. तो ठग १० करोड घेऊन पळून पण गेला ! पण जाता ना त्याच्या मनात काय आले काय माहीत शक्यतो दया म्हणून तो ३ करोड तीच्या खात्यात भरुन निघून गेला.

*

पोलिसांची तपास चक्रे फिरली, सगळीकडे माहीती काढण्यात आली पण तो जो कर्ता होता तो कधीच ती बाई सोडून कोणाच्या समोर ही गेला नाही.
कंपनी मध्ये पण जेव्हा तो गेला होता तेव्हा गॉगल / दाढी व मोठी टोपी घालून गेला होता.
बँकेत देखील तसाच गेला त्यामुळे कोणीच त्यांची निट कल्पना देऊ शकत नव्हता.
त्या आधीच्या घरभाडेकरुला त्यांनेच धमकावले होते व पैसे दिले होते घर सोडण्यासाठी.
त्यांची बायको, आईच पत्ता नाही, शक्यतो त्या पण नकलीच.. असा पोलिसांचा कयास.
ह्यावरुन पोलिस फक्त एवढ्याच निर्णयावर आले की त्यांने खुप मोठा प्लॉन करुन ही फसवणूक केली.
फक्त त्या बाईचे नशीब की त्यांने जाताना ३ करोड तरी सोडले.. नाहीतर...

शुक्रवार, १४ मे, २०१०

बुडीत खाते

सत्य घटना :- दिल्लीमध्ये वास्तव असताना घडलेली माझ्या नजरे समोर व काही अंशी मी देखील त्यात सामिल होतो म्हणून.


**

२००६
असाच कुठलातरी महीना मित्राच्या मामाच्या फार्म हाऊसवर बसलो होतो, अशीच संध्याकाळची वेळ.
ढडाम्म्म !!!!! करुन मोठा आवाज झाला, आम्ही पळत बाहेर आलो तर एक ट्रॅक्टर रस्ता सोडून पलिकडील शेतामध्ये मस्तपैकी लोळत उलटा पडला होता. आम्ही धावाधाव करुन ड्राव्हअरला बाहेर काढला व बाकीच्या मजदुरांना.

थोडे पाणी पाजले व कोणाला काही लागले नाही लागले ह्याची चौकशी केली. सर्वजण ठीकठाक होते किरकोळ खरचटलेले सोडले तर. मी जख्मांना लावण्यासाठी काही मलम इत्यादी मिळते का हे पाहण्यासाठी बाईक घेऊन गावाकडे निघून गेलो, मामा एकदम बोलघेवडा लगेच कुठे चालला होता, काय घेऊन चालला आहात काय काम असे अनेक शेकडो प्रश्न विचारुन घेतले होते व मी आल्यावर मला सांगितले की हे मोबाईल टॉवरचे काम करणारे मजदुर आहेत व ह्यांचा हेड आता येत आहेच.


त्यांचा हेड थोड्यावेळाने आपली मारुती ८०० घेऊन लगबगीने आला व चारपाच शिव्या देऊन ड्राव्हर ला आमचे आभार मानले व आम्ही केलेल्या मदतीची परतफेड मी कशी करु असे सारखं सारखं बडबडत बसला. मी कंटाळून उठलो व आता रुम मध्ये जाऊन टीव्ही पाहू लागलो, गेला असेल एक तास दिडतास. मामाने मला आवाज दिला व म्हणाला हे घे गाडीची चावी व पटापट श्रीपादकडे जाऊन बाटल्या घेऊन ये मी फोन केला आहे. समोर तो त्या मजदुरांचा हेड अजून बसलाच होता मजदुर गेले होते. माझे डोके क्षणीक फिरलेच होते पण आपल्या स्कोडाची चावी हातात देऊन त्याने माझा राग शांत केला होता ;) त्याला माहीत होते मला कसे कामाला पाठवायचे ते :D


मस्त पैकी तासभर मी स्कोडा एनएच-8ÿÿ वर मनसोक्त उडवून बाटल्या घेऊन परत आलो. मामाने एक नजर स्कोडावर टाकली व लगेच म्हणाला आत बसू या की बाहेर रे ? आता बाटल्या आल्या होता बाहेर कश्यासाठी बसतो मी... ;) लगेच म्हणालो बाहेरच बसू गवतावर.. ! हळू हळू गप्पा चालू झाल्या वर जसे जसे पॅग मोकळे होऊ लागले तस तसे कळले की बाजूच्या दोनचार गावामध्ये जवळ जवळ ४-५ मोबाईल टॉवर लागणार आहेत व ह्याचा सर्व ठेका ह्या मजदुरांच्या हेडकडे होता व तो मामाला म्हणत होता की तुम्ही हो म्हणा व थोडी जागा बघा मी सगळा सेटअप करुन देतो व सगळे टॉवर तुमच्याच जागेत लावण्याची व्यवस्था करुन देतो. प्रत्येक महिन्याला एका टॉवरचे भाडे २०,०००/- रु. मामाच्या डोळ्यासमोर महिन्याचे ८०,००० ते एक लाख फिरु लागले होते तो पर्यंत. नंबरांची देवाण घेवाण करुन घेतली व तो व्यक्ती निघून गेला व मामा मला म्हणाला " बघ, दुसर्‍याला मदत केल्यावर असा फायदा होतो. कह गये कबीर......." मी म्हणालो " कबीर पैसे देण्यासाठी येणार नाही आहे मामा."

पण माझे मनावर घेईल तो मामा कसला, लगेच दुसर्‍या दिवशी सेटींग आसपासच्या गावातील मोक्या मोक्याची जागा मिळेल त्या भावाने विकत घेतली ( आधीच काही शे कोटी जमीनी विकूनच आलेला पैसा होता हातात त्यामुळे नो प्रॉब्ल्म ;) ) सगळी प्रोसेस झाल्यावर एक आठवड्याने त्यांने त्या हेडला (तिवारी त्याचे नाव) फोन करुन परत फॉर्म हाऊसवर बोलवून घेतला व आम्ही शुक्रवार ते सोमवार सकाळ वाजू पर्यंत पडीक मेंबर फॉर्म हाउसचे त्यामुळे मी पण हाजीर होतोच.

प्लान पेपर मध्ये त्यांने थोडे हेरफार केले व एक रिपोर्ट तयार करुन आमच्या समोरच म्हणाला " उद्या कोणी तरी चला माझ्याबरोबर त्यांच्यासमोरच मी हा लिफाफा माझ्या हेडकडे ( मालकाकडे) देईन व तुम्हाला माझे ऑफिसपण बघता येईल. " मामा म्हणाला "ठीक आहे आम्ही येऊ उद्या सकाळी तुमच्या बरोबर. " रात्रभर त्याला फुल्लपार्टी ;)


दुसर्‍या दिवशी कॅनॉट प्लेसच्या एकदम पॉश ऑफिस मध्ये जाऊन आम्ही ते पेपर त्याच्या मालकाला दिले व तेथे आमची चांगलीच सेवा केली गेली.. दोन तीन तासाच्या मिटिंग नंतर आम्हाला एकदम पक्के आश्वासन देऊन पाठवणात आले की सात पैकी चार जागेवर नक्कीच टॉवर आम्ही उभे करु व त्याचे ऑफर लेटर व बाकीच्या गोष्टी २-३ दिवसामध्ये पुर्ण करुन काम चालू केले जाईल.

मामा ने फार्म हाऊसवर फुल्ल्टू मोठी पार्टी दिली सगळ्यांसाठी.

दोन एक दिवसामध्ये तो हेड ४८ पोस्टडेटेड चेक ( २०,०००/- रु.चा एक चेक) घेऊन हजर. व बरोबर लेबर काम चालू करणे आहे ऑफर लेटर हातात दिले ! मामा जाम खुष. गावामध्ये आता इज्जत अजून वाढणार होती ( आता महिना काहीच न करता प्रत्येक महिन्याला ८०,०००/- रु.येणार म्हणजे बाकीचे पब्लिक जळणार व ते जेवढे जळतील तेवढी इज्जतीत वाढ हा सरळ हिशोब ;) ).

टॉवरचे खड्डे खणून झाले होते, जनरेटरसाठी रुमचा पाया खणून झाला.
हेड मामाकडे आला व म्हणाला "जरा काम थांबवावे लागेल. काही दिवस. त्यांने कंपनीमध्ये आलेल्या एका अडचणीचे नाव घेतले" व म्हणाला "मी बघतो काय करता येईल ते." मामाने लगेच हरयाणवी स्पेशल हत्यार बाहेर काढले व म्हणाला "बघा काही चिरमिरी देऊन लवकर होते का ते ? इनकम चालू होईल लगेच बाकी काही नाही." त्याने अशक्य अशी मान हलवली व म्हणाला " मालकाकडूनच बुच लागले आहे बघतो तरी पण का करता येतं का ते "

मामाचे डोके फारच फिरले होते... त्याला कारण पण तसेच होते ४८ पोस्टडेटेड चेक हाता होते म्हणजे जवळ जवळ ९,५०,०००/- रु. तो हेड परत आला व म्हणाला " बघा, सेटिंग होऊ शकते पण खुप महाग पडेल तुम्हाला नाही परवडणार" असे म्हणतातच मामाने त्याचे कॉलर पकडले व एकदम रागाने म्हणाला " काय म्हणालास, नाही परवडणार..मला नाही परवडणार.. १०० कोस मध्ये माझ्या आजोबाच्या पेक्षा मोठा जमीनदार नव्हता, व आज ही जवळच्या पन्नास गावांना आम्ही विकत घेऊ एवढी ताकत आहे, तोंड संभाळून बोल" तो हेड जवळ जवळ त्याच्या पायातच लोळण घेऊ लागला व म्हणाला " चुकलो, चुकलो सरकार, माफ करा. मी बोलतो आताच त्यांच्या पार्टनर बरोबर तो ५०% चा मालक आहे तो तयार झाला की दुसरा नाही म्हणूच शकत नाही" मामाने मिशीवर ताव दिला व म्हणाला " आताच सांग काय ते, नाहीतर मग आम्ही बघू तुमचे काय करायचे ते "


तासभर तो फोनवर बोलत बोलत पुर्ण फार्म हाऊसला दहा चक्करा मारुन आमच्याकडे येऊ लागला. मी मामाला म्हणालो " कसा वाटतो हा माणुस ? विश्वास ठेवण्यायोग्य ? " मामा ताडकन म्हणाला " धोकेबाज आहे हा, पण मी त्याचा बाप आहे " मी गप्प बसलो. तो आला व म्हणाला " दुसरे मालक भेटू म्हणत आहेत व तुम्हालाच फक्त कारण ते परवा इंग्लडला जाणार आहेत त्याच्या आधी भेटू म्हणत आहेत." मामा ने हो म्हणून सांगितले व दुसर्‍या दिवशीची मिटिंग ठरली.

दुसरा दिवस, दुपारचे दिड एक वाजला होता, मामाचा फोन आला व म्हणाला " राज, एक काम कर रे, जसा आहेस तसाच जा घरी मी फोन केला आहे आई पॅकेट देईल ते घेऊन तु रेडिसनवर बार मध्ये ये. " मी म्हणालो " मामा, गाडी नाही आहे, अरुण घेऊन गेला आहे व मी अजून जेवलो नाही आहे" त्यावर माझा लगेच म्हणाला " ऑफिसच्या बाहेर स्कोडा आहे, चावी माझ्या बॅगेत आहे व बॅग कुठे असते तुला माहीत आहे. चल पटापट नाटके करु नकोस." आता काहीच पर्याय नव्हता म्हणून मी उठलो व त्यांच्या बॅगेतून चावी घेतली व सरळ त्यांच्या घरी गेलो. पॅकेट चांगलेच जड होते, पैसे घेतले व गाडी रेडिसनकडे वेगाने घेऊन जाऊ लागलो ते पॅकेट साईडलाच सीटवर पडले होते.


मी पटापट गाडी पार्किंगमध्ये लावली व पॅकेट घेऊन सरळ आत बारकडे वळलो, एकदम कोपर्‍यामध्ये एका कोचावर मामा पसरलेला होता व बाकी तो हेड व एक सुटाबुटातला एक माणूस समोरील कोच मध्ये बसला होता व समोर वाईन, व्हिस्की व बियरचे ग्लास दिसत होते. मी मामाच्या बा़जूला जाऊन बसलो व ते पॅकेट मामाकडे सोपवले. मामा ने विचारले "मोजलेस का ? " मी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे बघितले. त्यांनी मला पॅकेट परत दिले व म्हणाले " मला मोजता आले असते तर मी भावाला नाही का बोलवला असता साल्या... " व खळखळून हसले व मी पण हसलो. लगेच मोजायला घेतले काही वेळ पॅग इत्यादी गोष्टी सोडल्यातर माझे पैसे मोजणे सोडून कुठेच लक्ष नव्हते. ७ लाख होते पुर्ण. त्यांचे बोलणे झाले होते मामाने एका हाताने पॅकेट त्या सुटाबुटातल्या माणसाकडे सोपवले व एका हाताने त्याच्या हातातील पॅकेट घेतले. माझ्या मनात आले की एकदा ते पेपर पहावेत पण मामा पेक्षा जास्त गडबड ते दोघे जाण्यासाठी करत होते, तो व तो हेड दोघे लगबगीने आपला पॅग घेऊन निघून गेले....

" झाले काम राज. मज्जा आली, वेटर स्कॉच घे रे.. " मामा ओरडला. मला काहीच कळेना... मी म्हणालो " म्हणजे ? " मामा म्हणाला " अरे टॉवरचे काम झाले" मी पण खुष.. मामापण खुष.. वेटर पण खुष... सगळेच खुष. ;)

त्यानंतर काही दिवस मी बाहेर गेलो होतो...
परत आल्यावर शुक्रवारी नेहमी प्रमाणे मामाच्या फॉर्म हाउसवर..
सगळे उदासपणे बीयर पीत होते....
मी गेलो तर मामा माझ्याकडे तावातावाने आला व म्हणाला " तु ते पॅकेट का नाही बघितलेस "
मी गोंधळलो मी म्हणालो " कुठले पॅकेट ??? "
मामा म्हणाला " अरे ते त्या बिहारीने दिले होते ते... "
मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला तो त्या सुटाबुटातील माणसाबदल बोलत आहे.
मी म्हणालो " मी येण्याआधीच तुमचे सगळे ठरले होते मामा, म्हणून तर तुम्ही पैसे घेउन मला बोलवले... मला वाटले की तुम्ही बघीतले असतील पेपर.. "
मामा ने झटकरुन हात कप्पाळावर मारला व म्हणला " *****द फसवले रे त्यां ***च्यांनी. "


मग कळली खरी हकीकत.... ती अशी.

तो ट्रॅक्टर पलटणे हे नाटक होते.
तो हेड येणे हे नाटक होते.
तो हेड नकली होता.
ती लेबर नकली होती..
कॅनोट प्लेसचे ते ऑफिस ऑन रेंट बेसिस वर होते...
पेपर मध्ये व चेक मध्ये नाव असलेली असली कुठलीच कंपनी अस्तित्वात नव्हती...
मोबाईल कंपनी सगळेच आसपासचे टॉवर टेंडर एकाच कंपनीला देत नाही...
एकाच एरियामध्ये एकाच कंपनीचे चारपाच टॉवर लागू शकतच नाहीत.



काही महिन्याआधीच जवळच एका मोठ्या जमीनदाराच्या फॉर्म हाऊस बाहेर पण असाच एक टॅक्टर पलटला होता.. त्याला वीस लाखाचा गंडा बसला होता...

मामा नशीबवान, फक्त सात लाखाचा गंडा... बाकी जमीन घेतली ती तर आज ना उद्या विकली की पैसे मोकळे होतीलच... !

मामाने कप्पाळावरचा हात काढत... आमच्याकडे पहात म्हणाला " सात लाखाचे अजून एक बुडीत खाते.... "


आम्ही ओरडलो " काय ? अजून एक ? म्हणजे ? "

तो म्हणाला.... " सांगतो.... काय झाले माहीत आहे का.... "