३.१५ नंतर लाईट गेली होती ती सरळ ६.३० ला आली...
मध्ये एक दोन कॉल आले होते मित्रांचे की मीमवर पाहूणे सदस्य वाढत आहेत.... मला वाटले होते नेहमी प्रमाणे ६०-७० असतील, पण आधी एकाने १५० + चा आकडा दिला व नंतर एकाने सरळ ४०० + चा तेव्हा मात्र मी चक्रावलो... ;)
साईटवर अटॅ़क झाला असे म्हणत टिआरपी वाढवायला एक ईश्यु मिळाला =)) असे माझ्या मनात आले ( नाही ). ;)
पण जेव्हा लॉग चेक केले तर समजले अरे हे तर खरोखरचे हिट्स आहेत... पेज हिट्स नाहीत... युजर हिट्स... दिवसभरात ३५०० + लोकांनी मीम हिट केले होते, व सर्वात जास्त हिट्स फेसबुक व ट्विटर वरुन आल्या होता व त्या खालोखाल गुगलवरुन !!!!
आज दिवसभरात ७५००० + पेज पाहीले गेले मीमवर... व हा रेकॉर्ड आहे आपला तरी नक्कीच ;)
आज असे काय नवीन घडले ह्याचा विचार केला असता आपण केलेले काही बदल व पुरवलेल्या काही नवीन सुविधा खुप लोकांना आवडल्या आहेत असे त्यांच्या आलेल्या मेल्स व व्यनी मधून कळाले हे एक कारण असावे तुम्हाला दुसरे काय कारण वाटते की काय झाले असावे असे खास ???
पण खरोखर मनापासून आनंद झाला... ह्या सर्वाचे श्रेय येथे नियमित लिहणार्या व प्रतिसाद देणार्या सदस्यांचे आहे ज्यांच्यामुळे मीम आज नावारुपाला येत आहे आपली एक आगळी वेगळी प्रतिमा निर्माण होत आहे मराठी अंतरजालावर....
सर्वांचे अनेकानेक धन्यवाद... !
H) हॅट्स ऑफ..... मित्रांनो !
पाहूण्यांनो मीमवर आपले मनापासून स्वागत आहे...
सर्वांनी असाच लोभ ठेवावा. !!!!
२ टिप्पण्या:
abhinandan!!
thank you
टिप्पणी पोस्ट करा