बुधवार, २१ जुलै, २०१०

श्याम पिया मोरी ,रंग दे चुनरिया ॥

राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन!
मन मेरा बन गया सखी री सुँदर वृँदावन
कान्हा की नन्ही ऊँगली पर नाचे गोवर्धन
राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन!
मन मेरा बन गया सखी री सुँदर वृँदावन।

श्याम सांवरे, राधा गोरी, जैसे बादल बिजली!
जोड़ी जुगल लिए गोपी दल, कुञ्ज गलिन से निकली,
खड़े कदम्ब की छांह, बांह में बांह भरे मोहन!
राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन !

वही द्वारिकाधीश सखी री, वही नन्द के नंदन!
एक हाथ में मुरली सोहे, दूजे चक्र सुदर्शन!
कान्हा की नन्ही ऊँगली पर नाचे गोवर्धन!
राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन

जमुना जल में लहरें नाचें , लहरों पर शशि छाया!
मुरली पर अंगुलियाँ नाचें , उँगलियों पर माया!
नाचें गैय्याँ , छम छम छैँय्याँ , नाच रहा मधुबन!
राधा नाचे कृष्ण नाचे , नाचे गोपी जन!
मन मेरा बन गया सखी री सुँदर वृँदावन.

- पँडित नरेन्द्र शर्मा


radha


काहीतरी शोधताना अचानक वरील रचना दिसली व नकळत ब्रिजभूमी, वृँदावन, गोवर्धन नजरेसमोर आकार घेऊ लागले व अनेक दिवसापासून मनात सुप्त इच्छा होती की राधाकृष्ण ह्यांच्यावर आपण कधीतरी लिहावे म्हणून हा लेखन प्रपंच.



राधाकृष्ण ! जय राधे राधे, हरियाणामध्ये राम राम जेवढे प्रिय आहे तेवढेच हे दोन्ही शब्द देखील. आज ही जेव्हा कधी हे शब्द कानावर पडत तेव्हा एक वेगळीच अनुभुती होत असे. एकदा मनात असेच आले की नाही एवढे जवळ आहोत तर मथुरा-वृंदावन-गोवर्धन करु येऊ एकदा. भटकंती झाली, फिर फिर फिरलो सगळा भाग. जेवढा कृष्ण माहित होता तो महाभारतामुळे व थोडेफार गुणीजणांचा सत्संग हरिद्वारमध्ये लाभल्यामुळे. पण ह्या मथुरा-वृंदावन-गोवर्धनवारी नंतर कृष्ण जाणून घेण्याची व त्यापेक्षा आधिक राधिकाराणी ला समजून घेण्याची ललक मनामध्ये येऊ लागली व त्यांनतर शोध घेत, वाचन करत, थोरामोठ्यांना विचारलेल्या प्रश्नातून व आलेल्या उत्तरातून कृष्ण-राधिका मला समजतील का ह्याचे विवेंचन करु लागलो.


राधा !

एक अदभुत व्यक्तीरेखा. श्री कृष्णाच्या जिवनकथेतील एक महत्वाचा भाग. जीच्या शिवाय श्री कृष्ण पुर्ण होत नाही ना कृष्णकथा. प्रेमस्वरुप राधा, कृष्णाची सखी, प्रेमिका राधा, रायाण पत्नी राधा, ब्रीजची राधारानी. राधा राधा.. यत्र सर्वत्र राधा ! कृष्ण जीवन कथा राधामय होतं. सर्वात आधी कृष्ण म्हणजे देव हा विचार बाजूला ठेऊन मी लिहतो आहे माझ्या मते कृष्ण देवत्वाला पोहचलेला एक कसलेला राजकारणी, योध्दा व राजा होता जो आपल्या गुणामुळे, बुध्दी चातुर्यामुळे व डावपेचामुळे जिवनात यशस्वी झाला त्याच्या कथेतील एक भाग म्हणा अथवा जीने त्यांचे जीवन व्यापुन टाकले अशी राधा म्हणा. ही एक कल्पना आहे असे ही समजले जाते कारण जेथे साक्षात कॄष्णाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले नाहीत तेथे राधाचे कोठून मिळणार. त्यामुळे ह्या लेखाला काही इतिहास संदर्भ नाही आहे ना त्याचा मी कुठे शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसे पाहता महाभारतात कुठेच राधेचा संदर्भ येत नाही की उल्लेख पण जनसामान्यात राधेचा उल्लेख हा कृष्णाआधी येतो हे देखील नवलच नाही का ?

राधेकृष्ण...


राधा कोण हा प्रश्न महत्वाचा नाही आहे पण कृष्णावर तीची असिम भक्ती होती व ती कृष्णमय झाली. कृष्णाची बासरीची धुन जेव्हा जेव्हा परमसीमेवर पोहचत असे तसे तसे राधिकाराणी आपोआप कृष्णाजवळ खेचली जात असे. प्रेम भावना, कृष्णाला भेटण्याची अतिव इच्छामुळे अथवा प्रेमाचे अदभुत संगीतामुळे म्हणा पण ती मंत्रमुग्ध होऊन कृष्णमय होत असे. राधा शिवाय कृष्ण नाही व कृष्णाशिवाय राधा नाही ! कदंबाचे झाड कृष्णला अतीप्रिय तो नेहमी आपली बासुरी कदंब वृक्षाखाली बसून वाजवत असे. कृष्ण बासुरी वाजवतो आहे व राधा हलकेच डोके त्याच्या खांद्यावर ठेऊन मंत्रमुग्धपणे ते स्वर आपल्या हदयामध्ये जपून ठेवत आहे हे तर प्रसिध्द चित्र.

2

राधाकृष्ण ह्यांच्या नात्याची फोड करणे हे अत्यंत किल्ष्ट आहे, पुढील अनेक युगामध्ये ही प्रेमगाथा कधी कथेतून कधी बोली भाषेच्या गाण्यातून, संताच्या शब्दातून समोर येत गेली पण त्याचे सौंदर्य तसेच टिकून राहीले. तसे पाहता त्यांची कथा ही जगावेगळी प्रेमकथा आहे, सामजिक बंधन आहे, वयामध्ये खुप मोठे अंतर आहे, निर्मळ असे प्रेम आहे व वर्षानूवर्ष सहन करावा लागणारा विरह आहे व अनेक वर्षाच्या विरहानंतर फक्त काही क्षणाची भेट आहे ती ही दुरुन. पांडवांनी कुरुक्षेत्रामध्ये यज्ञकर्म केले होते त्यासाठी अन्य गोकुळवासीच्या बरोबर राधा देखील तेथे गेली होती अनेक वर्षाच्या ताटातूटीनंतरची ही अंतःकरणाला वेदना देणारी भेट, काही क्षणाची. काय वाटले असेल तेव्हा राधेला ? कृष्णाचे काय तो तोपर्यंत देवत्वाला पोहचला होता त्याच्या शिरावर भारतभूमीच्या उध्दाराचे अगणित काम होते व तोच त्याचा ध्यास होता, जी गीता त्याने अर्जूनाला सांगितली होती तीच त्याला रोज मनन करावी लागत होती, युध्दातून, राजकारणातून, डावपेचातून एखाद क्षण दिवसभरात त्याला कधी तरी मिळत असेल तेव्हा तो एकांतामध्ये राधा बरोबर असताना व्यतीत केले क्षण आठवत असेल, पण राधा ? घरातील कामे आवरली, गायी-म्हशींचे चारापाणी निपटले व त्यानंतर पुर्ण दिवसरात्र ती कृष्णमय होऊन जात असे. त्या बिचारीला ह्या शिवाय काय काम असणार ? ना ती शस्त्र हातीधरून सत्यभामे सारखे कृष्णाबरोबर जाऊ शकत होती अथवा ना ती कृष्णाएवढी प्रगाढ पंडित होती की उभ्या उभ्या जगाला गीतेचे अमृत पाजेल. ती तर साधीभोळी निरागस राधा. कृष्ण कृष्ण कृष्ण जपाशिवाय तिला दुसरे काही जमलेच नाही.


आता थोडे कळले आधी राधा का ते.. राधेकृष्ण......

पुढील भागात आपण थोडे खोलवर जाऊ.

( क्रमशः )

गुरुवार, ८ जुलै, २०१०

श्री दिपलक्ष्मी (क्लासिक)

लेखक:
संपादक : ग. का. रायकर
प्रकाशक:
रायकर ब्रदर्स पब्लिशिंग हाऊस





१९५८ ते २००० या काळातील श्री दिपलक्ष्मी मासिक / दिवाळी अंक यांतील निवडक कथा, लेख, चित्रे, व्यंगचित्रे ह्यांचा हा संग्रह.


सुरवातच होते जयवंत दऴवी ह्यांच्या "एक गोड गोड माणूस" ह्या लेखाने व पुढे काय पंचपक्वान्न येणार आहेत त्यांची एक झलक मिळते. व नंतर अनुक्रमणिका, त्यातील लेखकांची नावे खालील प्रमाणे.


  • पु.ल. देशपांडे

  • आर. के. लक्ष्मण

  • चिं. वि. जोशी

  • श्याम जोशी

  • शिरीष पै

  • विजय तेंडुलकर

  • दत्तू बांदेकर

  • दुर्गा भागवत

  • द. ग. गोडसे

  • मारिओ मिरांडा

  • अंबरीश मिश्र

  • मंगेश कुलकर्णी

  • वसंत सबनीस

  • जयवंत दळवी

  • श्री. पु. भागवत

  • व. पु. काळे

  • गौतम राजाध्यक्ष

  • अनंत सामंत

  • व्यंकटेश माडगूळकर

  • द्वारकानाथ संझगिरी

  • वा. ल. कुळकर्णी

  • पं महादेवशास्त्री जोशी

  • गो. वि. करंदीकर

  • शिरीष कणेकर

  • सुशीलकुमार जोशी

  • डॉ. नरेंद्र जाधव

  • जयंत पवार

  • कुमार केतकर

  • अनिल धारकर

  • बिझिबी

  • रेखा आठल्ये / शहाणे

  • हेमंत कर्णिक

  • मधुकर तोरडमल

  • सेतुमाधवराव पगडी

  • पु.रा. बेहेरे

  • वि.आ.बुवा

  • मं.वि. राजाध्यक्ष

  • म.द. वैद्य

  • दिनकर गांगल

  • श्री. ज. जोशी

  • साने गुरुजी

  • अच्युत बर्वे

  • आनंद वर्टी

  • ना. धों. ताम्हणकर

  • वि.स. खांडेकर

  • गो.नी. दांडेकर

  • अरविंद गोखले

  • मधु मंगेश कर्णिक

  • शं.ना. नवरे

  • आनंद साधले

  • ह्मो. मराठे

  • अ.र. कुळकर्णी

  • लक्ष्मण लोंढे

  • अंजली कीर्तने

  • राजेंद बनहट्टी

  • रघुवीर मुळगांवकर



व ह्याच बरोबर


  • वसंत सरवटे

  • हरिश्चंद्र लचके

  • व.ल.हळबे

  • मंगेश तेंडुलकर

  • श्याम जोशी

  • गवाणकर

  • श्रीनिवास प्रभुदेसाई

  • विकास सबनीस

  • संजय मिस्त्री

  • शशिकांत गद्रे

  • चिं.ग. मनोहर

  • मनोज जोशी

  • विजय पराडकर

  • ज्ञानेश सोनार

  • प्रशांत कुळकर्णी

  • प्रशांता अष्टीकर



ह्यांची हास्यचित्रे.


पुर्ण (A4 साईझपेक्षा थोडा मोठा) आकाराचा पेपर, ५०० पानं व उत्कृष्ट बांधणी हे या पुस्तकाचे वैशिष्टय. ( ह्यामुळेच वजन १२५० ग्रॅम आहे )



खरेदीसाठी येथे क्लिक करा.

रविवार, ४ जुलै, २०१०

इंद्रधनुष्य - ई-अंक

सर्वांना सांगताना आनंद होत आहे की मी मराठी.नेट इंद्रधनुष्य नावाचे ई-मासिक चालू करत आहे.
ज्यामध्ये मीमराठी.नेट च्या सदस्यांनी लिहलेले लेख, कविता, प्रवासवर्णन, पाककृती ह्यांचा समावेश केला गेला आहे.
प्रथम अंक असल्यामुळे व अश्या प्रकारचा अंक काढण्याचा अनुभव मागे नसताना देखील आम्ही हा छोटासा प्रयत्न केला आहे. ज्याचा उद्देश मी मराठी वरील लेखन त्या ९५% लोकांच्यापर्यंत देखील पोहचावे ज्यांना ऑर्कुट, फेसबुक अथवा चॅट पलिकडली विश्व माहीतच नाही आहे. आपण मी मराठीवर प्रकाशित केलेले लेख तसे ही लेखकाचे व संकेतस्थळाचे नाव न देता मेल फॉरवर्ड मधून फिरत असतातच. तसाच प्रकारे हा ई-अंक देखील फिरेल व ज्यांना अजून आपले संकेतस्थळ व येथे लेखन माहिती नाही त्यांना आपल्या येथील ३०००+ असलेल्या लेखांची एक झलक मिळेल हा सरळ व साधा उद्देश ह्या अंकाचा आहे.

आपण प्रयत्न करुन प्रत्येक महिन्याच्या प्रथम आठवड्यामध्ये असा अंक नियमित काढू व आपले लेखन त्या ९५% मराठी बांधवाजवळ पोहचवण्याचा प्रयत्न करु. ह्या कार्यासाठी ई-मासिकाच्या जून महिन्याच्या समितीने लाख मोलाची मदत केली, त्या सर्वांचे अनेकानेक आभार. त्यांची नावे खालीप्रमाणे.

१. रमताराम
२. निर्मयी
३. डॉ. अशोक कुलकर्णी
४. सागर
५. विसुनाना
६. माया
७. पुष्करणी
८. सोना



_____

अंकामध्ये खालील लेख विभागवार मांडणी करुन दिलेले आहेत, सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा व आपल्या मित्र मैत्रीणी पर्यंत हा अंक पोहचवा ही विनंती.


  • कोकणसय - शैलजा

  • अद्वितीय - विशाल कुलकर्णी

  • बाबा हरवलाय – अनुराग

  • मात्रा – गणपा

  • कोहम ! – अवलिया

  • शहीद दिवस - पुणेरी ( प्रसन्न कुमार केसकर )

  • मृत्यू आणि मी - पुण्याचे पेशवे

  • रेजकुत्रे – मधुकर

  • दहा वर्ष - ३_१४ अदिती

  • सिडनीपुराणम्॥ - मेघवेडा

  • सहज सुचल म्हणुन – जयपाल

  • जन्मा येण्या कारण तू.. – प्राजु

  • हताश औदुंबर - गंगाधर मुटे

  • उ. न. क. अर्थात उपेक्षीत नवरे कमिटी - आदिजोशी

  • मिल्कः एक चळवळ – ऋषिकेश

  • लेमन केक - स्वाती दिनेश

  • चिकन साते – गणपा

  • स्पर्श – सागर



काही चुका राहिल्या असतील तर त्या दाखवून द्या योग्य ते बदल लगेच केले जातील.


DOWNLOAD PDF


धन्यवाद.

व्यवस्थापक
मीमराठी.नेट