गणपती बप्पा मोरया !
आजच्या शुभमुर्ह्तावर मी माझा हा ब्लॉग " राज दरबार " नवीन पत्तावर हलवला आहे काय स्वरुपी.
https://rajkiranjain.wordpress.com/
सर्व मित्रांनी व वाचकांनी ह्यांची नोंद घ्यावी व आपल्या बुकमार्कमध्ये फेरबदल करुन घ्यावेत ही विनंती.
आपलाच मित्र,
राज जैन
शनिवार, ११ सप्टेंबर, २०१०
शुक्रवार, १० सप्टेंबर, २०१०
पुणे-भिमाशंकर-शिवनेरी-लेण्याद्री-नाशिक-त्रिंबकेश्वर-मेटघर किल्ला- अंजनेरीगड-पुणे - भाग १
शनिवारीच बाईकवरुन कामानिमित्य पनवेलवारी ( २४० किमी येणे जाणे) करुन रात्री २ वाजता पोहचलो होतो घरी.
रवीवारी सकाळ सकाळी आई म्हणाली की नाशिकला जातोस का उद्या ( २१० किमी) ? पोर्णिमा आहे व एक पुजा करायची राहीली आहे तुम्ही नागबळी व त्रीपिंडीदान. हे राम ! हेच शब्द बाहेर पडले तरी म्हणालो बघतो विचार करुन. महाजालावर थोडीफार शोधाशोध केली तर तो भाग तर प्रचंड देखणा व निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेला आहे असे समजले. आईची इच्छा देखील पुर्ण होईल व थोडेफार जे ताप चालू आहेत ते देखील ह्या पुजेमुळे कमी होतात का हे पाहू असा उद्दात्त हेतू मनात ठेऊन आपले मित्रवर्य श्री पाषाणभेद ह्यांना फोन लावला व थोडक्यात विचार सांगितला. लगेच महाराजांनी इकडे तिकडे फोन करुन एक पंडित शोधला जो त्रिंबकेश्वर ( नाशिक पासून ३० किमी) मध्ये दोन्ही पुजा करुन देतो असा.
आईला ही माहिती दिली व म्हणालो उद्या सकाळी निघतो पहाटे उठव मला. सर्व तयारी सकाळीच करेन ;) झाले गजर लावले गेले, जबरदस्तीने दिवसाढवळ्या रात्री १० वाजता झोपा असा आदेश झाला, मन मोडून झोपी गेलो... सकाळी आईने ५ वाजता मला उठवण्याचा एक निष्फळ प्रयत्न केला मग सहा वाजता मग सात वाजता शेवटी ७.३० वाजता मी उठलो. साहेबांचा फोन परत आला की निघालो की नाही असे विचारणारा.. मी लगेच धावपळ करुन तयारी सुरु केली अंघोळ इत्यादी छोटी मोठी कामे लगेच १० मिनिटात आवरुन ८ वाजता नाष्टा करुन सरळ ८.३० ला हायवेवर लागलो.
रम्य सकाळ होती, हिरवळच हिरवळ चोहीकडे, पक्षी-पक्षिणी गुलुगुलु बोलत आहेत असे दृष्य मला तरी कोठे नजरेस पडले नाही पण हा नाही म्हणायला दोनचार म्हशी व गायी सकाळचा नाष्टा करायला बाहेर पडलेल्या दिसल्या... चला तेवढेच निसर्ग सौंदर्य पहाण्याची सुरवात झाली..
हायवेवर गाडी सुसाट पळवायचा हा विचार करुन सगळे ब्रेक, केबली, चाके, इंजिन, हवा, पाणी, बॅटरी चेक करुन घेतले व सुरवात केली प्रवासाची.
तोच आठवले अरे नाशिकला जायचे कसे ? रस्ता ? अडला राजे मीमकरांचे पाय धरी ! पटापट दोनचार फोन केले व दोनचार वेगवेगळे रस्ते सांगितले गेले, हरी ओम म्हणत बाईक लावली सरळ मुंबई हायवेला. हिंजवडचा उड्डाणपुल मागे टाकून पहिल्याच वळणावर एकाला विचारले नाशिक फाटा ? त्यांने कसाबसा रस्ता सांगितला त्याचे आभार माणून गाडी त्या वळणावर घातली, मग वाकड, चिचवड, पिंपरी इत्यादी भागाला फेरी मारुन विमोच्या (विवेक मोडकांच्या) घराचा रस्त्याला गाडी आल्यावर मग डोक्यात आले आपण शक्यतो रस्त्ता चुकलो. परत एकाला विचारुन घेतले व मग नाशिक हायवेवर लागलो (टोटल ६० एक किमी अतिरिक्त फिरणे).
नाशिकचा बोर्ड दिसला २१० किमी. च्यामायला म्हणजे ह्या फाट्यापासून २१० किमी व घरापासून इथपर्यंतचा प्रवास कोण मोजणार ? सिस्टमला दोनचार शिव्या देऊन पुढे निघालो, चाकण मागे गेले व मंद पाऊस चालू झाला. मस्त पैकी थंड हवा थोंडाला लागत होती व सकाळ पासून रस्ता शोधताना झालेली चिडचिड आपोआप कमी कमी होत गेली. ८०-९० चा काटा कधी मागे पडला व १०० च्यावर स्पिडवर बाईक कधी धावू लागली काही कळले देखील नाही मार्ग दाखवणारे बोर्ड झर झर मागे पडत होते मंचर जवळ आल्याचा एक बोर्ड समोर दिसला भिमाशंकर ! हे नाव कुठेतरी वाचले होते आठवत नव्हते, परत एकदा पाषाणभेद यांना फोन लावला व विचारले अरे भिमाशंकर ला काय आहे ?
प्रश्नातच उत्तर होते, सरळ डावीकडे बाईक टर्न केली व भिमाशंकरच्या रस्त्याला लागलो. दैवी प्रवास ! ह्या एका शब्दात वर्णन होऊ शकते. वाटेतच्या दोन्ही बाजूने निसर्गांने अक्षरशः अदभुत खेळ मांडला होता ऊन-पाऊस व निसर्गरम्य असा व मंत्रमुग्ध होऊन पहात रहावे असा खेळ ! गडबडीने बाईक रस्ताच्या बाजूला लावली व फोन बाहेर काढून फोटो काढायची तयारी केली तेव्हाच समजले मोबाईल मेला आहे ते. रात्रभर चार्ज करायचाच राहून गेला होता. त्याक्षणी खुप असाह्य वाटले रे.. यार ! वाटले देऊ या भिरकावून दरीमध्ये नोकियाला ;) पण आता हाच एकमेव आधार असल्यामुळे व आमचा जिवापाड प्रिय सॅमसंग अतिदक्षता विभागात अॅडमीट असल्यामुळे नोकिया विषयी सध्या मला खुप ममत्व वाटले म्हणून पुन्हा खिश्यात ठेऊन दिला. मधी एक दोनहॉटेल मध्ये ट्राय केला पण लाईट नव्हती व संध्याकाळी ५ वाजता येणार होती :( , भिमाशंकर विषयी मी काही लिहावे एवढा चांगला लेखक नाही आहे पण पुन्हा एकदा मी नक्की भिमाशंकर ला जाईन लवकरच व चांगले शेकड्यानी फोटो काढेन व ते प्रकाशित करेन.
भटकणे हा उद्देश असल्यामुळे देवदर्शन इत्यादी फंदामध्ये पडलो नाही व मला लवकर नाशिक गाठायचे होते म्हणून भिमाशंकरची ही भेट थोडी लवकरच संपवली वर परतीच्या प्रवासास लागलो. दिड एकतासाच्या ड्राईव्ह नंतर एका हॉटेलात फोन चार्जिंगला लावला व मस्तपैकी वडापावावर दणका दिला फोन चार्ज होई पर्यंत मी इकडे तिकडे फिरावे म्हणून हॉटेलातून बाहेर पडलो तर समोर एक फाटा दिसत होता व तेथे बोर्ड लावला होता.. शिवनेरी २५ किमी... फक्त २५ किमी व शिवनेरी इकडे आहे ? आयला मी तर समजत होतो.. जाऊ दे. येथे पर्यत आलोच आहे तर जरा शिवनेरी जाऊन येऊ तसा ही हा भुईकोट किल्ला आहे असे शाळेतील पुस्तकात वाचले होतेच त्यामुळे चढाचढी करावी लागणार नाही व चालाचाली देखील असा विचार डोक्यात डोकाऊ लागला एक मन म्हणत होते जाऊ या एक म्हणत होते नको ! शेवटी माझा विजय झाला व दुष्ट दुसरे मन हरले.
नंतर च्या दहा मिनिटामध्ये मी शिवनेरीच्या रस्तावर वार्याशी शर्यत करत होतो.
अर्धा-पाऊण तासामध्येच शिवनेरीच्या पार्किंग लॉटमध्ये बाईक लावली ५ रु.चे टिकिट फाड्ले गेले व मस्त १० रु.चे लिंबू सरबत घेतले व गडाकडे जावयास निघालो पण गडाकडे बघिल्यावर लक्ष्यात आले की आपल्याला शाळेत शक्यतो चुकीचे शिकवले गेले आहे ;) शिवनेरी भुईकोट किल्ला नाही आहे चढावे लागनाराच व समोरचा गडाचा मॅप पाहून खात्रीच पटली की चालावे देखील प्रचंड लागणार आहे.... छत्रपती शिवाजी महाराज की ! असा एक घोष दिला तोच पाचपन्नास आवाज दुमदुमले जय !!!!!!!!!! आयला वर पायर्यावर खुप पब्लिक दिसत होते म्हणजे ह्या गडावर तरी मी नक्कीच एकटा भुतासारखा भटकणार नव्हतो तर... !
पायथ्यावरुन शिवनेरीच्या आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर
गडाचा मुख्य दरवाजा !
आई शिवाई चे मंदिर आत फोटो काढू देत नाहीत.
अंबरखाना
गडावरील मनमोहक दृष्य !
शिवाजी महाराजांचे जन्म स्थळ !
क्रमशः
( जेथे फोन चार्जिंगला लावला होता तेथून जेव्हा फोन काढला तेव्हा लक्ष्यात आले की फोनचा डिस्पले गंडला आहे :( पांढरा फटाक पडला होता. हे सर्व फोटो अंदाजाने घेतले आहेत त्यामुळे चांगले आले नाही आहेत समक्ष्व.)

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)